बाकीबाबच्या आठवणीत अर्थात पंडित कवी , रोमँटिसिझम आणि बा भ बोरकरांची कविता श्रीधर तिळवे नाईक बोरकरांची मी वाचलेली पहिली कविता ही पुढील कविता होय गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले दिन लंघुनि जाय गिरी पद उमटे क्षितिजावरि पद्मरागवृष्टि होय माड भव्य न्हाले धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी सज्ज तृषा तृप्तीचें धन घनांत बघुनि मन निवालें उतट बघुनि हरिकरुणा हरित धरा हो गहना मंदाकिनिवरुनि धवल विहगवृंद डोले रजतनील, ताम्रनील स्थिर पल जल, पल सलील हिरव्या तटिं नावांचा कृष्ण मेळ खेळे मीन चमकुनी उसळे जलवलयीं रव मिसळे नवथर रसरंग गहन करिति नयन ओले धूसर हो क्षितिज त्वरित ढोर पथीं अचल चकित तृण विसरुनि जवळिल तें खिळवि गगनिं डोळे टप, टप, टप पडति थेंब मनिंवनिंचे विझति डोंब वत्सल ये वास, भूमि आशीर्वच बोले बा भ बोरकर या कवितेत सर्वात प्रथम काही माझ्या डोळ्यात भरले असेल तर ते म्हणजे नवीन जोडशब्द पुढे लक्षात आले की हे त्यांचे वैशिष्ट...
Posts
Showing posts from July, 2026