Posts

Showing posts from June, 2026
कलाकृतीचा प्रभाव, आशय ,अभिव्यक्ती , अवस्था आणि वेदांत श्रीधर तिळवे नाईक  भारतीय कला शास्त्रामध्ये जे काही प्रश्न असतात त्यामध्ये आशय आणि अभिव्यक्ती यांचा फार विचार केला जातो त्यातील शैव हे कलाशास्त्र आशय प्रधान आहे तर युरेशियन कला शास्त्र हे अभिव्यक्ती प्रधान आहे त्यामुळेच शैव भावांचा विचार अत्यंत खोलात जाऊन करतात आणि सात्विक तात्विक महात्विक या आशयाच्या तिन्ही डायमेन्शन ना अतिशय महत्त्व देतात . याचा अर्थ ते अभिव्यक्तीचा विचार करत नाहीत असे नाही परंतु ही अभिव्यक्ती या तीन गोष्टींना व्यक्त करण्यासाठी आहे याची त्यांना स्पष्टपणे जाणीव आहे याचे कारण ते आशय आणि अभिव्यक्ती यांच्यात शिवशक्ती यांच्याप्रमाणेच युग्म अवस्था असते असे मानतात. याशिवाय मग ते अभेद, भेद, विशिष्ट भेद ,अतिभेद व पूर्ण भेद अशा पाच अवस्था मान्य करतात.  त्या उलट युरेशियन श्रुतीमध्ये मुळातच आशय काय व्यक्त करायचा हे आधीच ठरलेले आहे, वेद ,रामायण ,महाभारत , पुराण अपवादात्मक वेळेला ब्राम्हण ,स्मृती, आरण्यक यांच्यातील कथांचा वापर करून तुम्ही अभिव्यक्ती केली पाहिजे असा युरेशियन काव्यशास्त्राचा आग्रह आहे म्हणजेच इथे एका...

शाहू महाराज आणि ब्राह्मण्य

 ब्राह्मणवाद , ब्राह्मण्य आणि पाच सामाजिक कॉम्प्लेक्स श्रीधर तिळवे नाईक  शाहू महाराजांची जयंती साजरी झाली की त्याबरोबर जो एक प्रश्न उठतो तो नेहमीच ब्राह्मणवादाचा असतो . ब्राह्मणवाद म्हणजे काय ? धर्मकथा, दंतकथा , जात, वंश, रंग, देश, प्रदेश , मंदिर व्यवस्था , यज्ञ संस्था , धर्मग्रंथ ,परंपरा आणि कधीकधी इतिहास आदि कारणांचा वापर करून स्वतःला तसेच स्वतःच्या वर्णबंधूंना सर्व ब्राह्मणेतर लोकांच्या पेक्षा श्रेष्ठ समजणे म्हणजे ब्राह्मणवाद होय. हा अनावश्यक आणि प्रभुत्व निर्माण करणाऱ्या किंवा करू पाहणाऱ्या काल्पनिक श्रेष्ठत्वाचा प्रकार आहे हे तर उघडच आहे.  हे काल्पनिक श्रेष्ठत्व अनेक गोष्टींच्यामुळे निर्माण होते  १ पहिली गोष्ट काल्पनिक सुपर कॉम्प्लेक्स म्हणजे आम्ही जन्मदत्तच परमपुरुषदत्त असल्याने आणि मुख हाच माणसाचा आणि परमपुरुषाचा सर्वश्रेष्ठ अवयव असल्याने कारण त्यात मेंदू असतो अशा त्या परमपुरुषाच्या मेंदू युक्त मास्तिष्क युक्त परममुखापासून आम्ही जन्मलेलो असल्याने सर्वश्रेष्ठ आहोत असा हा कॉम्प्लेक्स आहे  आता या संदर्भामध्ये प्रत्यक्ष पुरावा काय ? आणि हा जो कोणी परमपुरुष...

पोस्ट ट्रूथ जग सत्योत्तर जग

 पोस्ट ट्रूथ जग श्रीधर तिळवे नाईक  प्रश्न : तुम्ही गेली काही वर्षे सातत्याने पोस्ट truth' बद्दल बोलत आहात खरोखर असे जग अस्तित्वात आले आहे काय ?   श्रीधर तिळवे नाईक: माझ्या माहितीप्रमाणे साधारण २०१६ च्या आसपास ही संज्ञा आली पण हा फिनॉमिना आत्ता आला का ? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जग कायमच truth ful होते किंवा पोस्ट truth सत्योत्तर होते आणि मोक्ष शोधणारे लोक अशा या जगामध्ये सत्यापर्यंत पोहोचत होते आणि post truth सत्योत्तर ला शह देत पुन्हा पुन्हा सत्याची स्थापना करत होते . इतिहासात जाल तर आदिम युगात निसर्गसत्य natural truth राज्य करत होते आणि या जगाला छेद देणाऱ्या सत्योत्तर जगाची सुरुवात श्रद्धेच्या काळातच झाली होती .श्रद्धेनेच प्रथम हे जग कसे निर्माण झाले अमुक एक वनस्पती कशी काय निर्माण झाली अमुक एक प्राणी असा कसा यासारख्या किंवा या प्रश्नांना कलात्मक उत्तरे द्यायला सुरुवात केली आणि तिथूनच post truth सत्योत्तर जगाचा आरंभ झाला उदाहरणार्थ बायबलचा आरंभ हे जग सात दिवसात कसे निर्माण केले या कथेने होतो आता ही कथा स्पष्ट आणि स्वच्छपणाने पोस्ट ट्रूथ म्हणजेच सत्योत्तर आहे म्हणज...
 जाणीव, ज्ञान ,आत्मा आणि मोक्ष श्रीधर तिळवे नाईक  प्रश्न : जाणीवेला जाणिवेची जाणीव असते का ? श्रीधर तिळवे नाईक: शैव श्रुतीमध्ये हा प्रश्न अधिक व्यापक पद्धतीने विचारायला हवा म्हणजे शिवाला जीवाची जाणीव असते का ? पण तुम्ही पाश्चात्य परंपरेतून आलेला आहात म्हणून तुम्ही त्या पाश्चात्य परंपरेमधून हा प्रश्न विचारत आहात. हरकत नाही . पाश्चात्त्य देशांमध्ये consciousness हा फार महत्त्वाचा मानला गेलेला आहे. भारतामध्ये या प्रश्नाची उत्तरे तीन अंगाने येतात पहिले अंग अर्थातच शिवाचे आहे शिव हा जिवात कसा असतो तर त्याचे उत्तर आहे प्राणरूपात ! तुम्ही जर का हाच प्रश्न युरेशियन श्रुतीला विचारालात तर ते म्हणतील आत्मा रुपात ! त्या उलट तुम्ही जर का बुद्धाला हा प्रश्न विचारला तर तो म्हणेल आत्मा नाही म्हणजेच तो अनात्मवाद सांगेल आणि तो बौद्ध तत्त्वज्ञानाचा फार मूलभूत नियम आहे . प्रत्यक्षात घडली काय आहे तर शैव श्रुतीचे उत्तर हे पॉझिटिव्ह पद्धतीने आलेले आहे प्राण असतो प्राण जातो. प्राण गेला की देह नि:ष्प्राण होतो स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टी स्पष्टपणे आधीच नाकारल्या गेल्या होत्या . त्या उलट युरोपियन श्रुती ...
 हॅपनिंग प्रक्रिया श्रीधर तिळवे नाईक प्रत्येक दशक स्वतःच्या काही हॅपनिंग प्रक्रिया घडवतच साकार होत असते चौथ्या नवतेची ऐन्शोत्तर पिढी पर्सनल कम्प्युटर रंगीत टीव्ही अप्रोनेट कॅसेनेटिंग अशा काही हॅपनिंग प्रक्रियांना सामोरी गेली नव्वोत्तर पिढी इंटरनेट लॅपटॉप डीव्हीडी अशा काही हॅपनिंग प्रक्रियांना सामोरी गेली तर द्विसहस्त्रोत्तर पिढी फेसबुक ट्विटर पेनड्राईव्ह आदी अशा काही हॅपनिंग प्रक्रियांना सामोरी गेली तर द्विदशकोत्तर पिढी स्मार्ट फोन व्हाटसप अँप अशा काही हॅपनिंग प्रक्रियांना सामोरी गेली प्रश्न असा आहे कि साहित्यिक ह्यांना सामोरे कसे गेले ऐन्शोत्तर पिढीला चारही दशक नावीन्याची नवतेची होती नव्वोत्तर पिढीला पर्सनल कम्प्युटर रंगीत टीव्ही अप्रोनेट कॅसेनेटिंग ह्या प्रक्रिया जूनता म्हणून लाभल्या  द्विसहस्त्रकोत्तर पिढीला पर्सनल कम्प्युटर रंगीत टीव्ही अप्रोनेट कॅसेनेटिंग इंटरनेट लॅपटॉप डीव्हीडी अशा काही हॅपनिंग प्रक्रियां जूनता म्हणून लाभल्या तर द्विदशकोत्तर पिढीला पर्सनल कम्प्युटर रंगीत टीव्ही अप्रोनेट कॅसेनेटिंग इंटरनेट लॅपटॉप डीव्हीडीफेसबुक ट्विटर पेनड्राईव्ह ह्या प्रक्रिया जूनता...
 स्त्रिया देवदर्शनाला जास्त का या या श्रीधर पवार यांच्या प्रश्नाला मी दिलेले उत्तर श्रीधर तिळवे नाईक  कारण त्या क्रिएटिव्ह असतात आणि क्रिएशनशी संबंध जोडणे त्यांना आवश्यक वाटते शेवटी त्यांना जन्म द्यायचा असतो आणि आपला जन्म या ब्रह्मांडाचा भाग आहे याची त्यांना व्यवस्थित कल्पना असते आणि त्या मुळाशी नाते जोडू इच्छितात स्त्रिया संपूर्ण निसर्गच असतात साहजिकच निसर्गाने निसर्गाशी जोडलेले हे नाते असते श्रीधर तिळवे नाईक 
 शैव आणि वटपौर्णिमा श्रीधर तिळवे नाईक  माझ्या गावाचे नाव बांदिवडे त्याचा अर्थच वडांनी बांदी केलेले म्हणजे वेढले गेलेलं किंवा वडांची (वैज्ञानिक नाव फिकस वा फायकस मायक्रोकार्प ) तटबंदी असलेलं गाव ! साहजिकच गावात वड भरपूर होते हळूहळू काही अतिशहाण्यांनी ते कापायला सुरवात केली मात्र माझे वडप्रेम पुढेही कमी झाले नाही संपूर्ण ब्रह्मांडाचा पसारा वडाप्रमाणे आहे ही शैव कल्पना त्याला शह म्हणून बौद्धानी बोधी तर वैष्णवांनी अश्वत्थ ह्या नावाने पिंपळ वृक्ष आणला गीतेत श्रीकृष्णाने वृक्षांच्यात मी अश्वथ असे सांगितले आहेच  शैव आणि आर्य संस्कृतीतील हा वृक्षसंघर्ष हा त्यांच्या संस्कृती संघर्षाशी साजेसा आहे पुढे जेव्हा शैवांचे वडप्रेम कमी होईना तेव्हा ह्या वडाशी जी ऍडजस्टमेन्ट झाली त्यातून आत्ताची हिंदू सावित्रीक वटपौर्णिमा जन्मली जे बाहेरून पराभूत करता येत नाही ते स्वतःत सामावून घेऊन त्याचे देशीकरण करून गिळून टाकायचे ही आर्यांची सांस्कृतिक प्रथा आहे देशीवाद हे त्यासाठी शोधलेले आर्यांचे प्राचीन हत्यार आहे जे प्रत्येक गोष्टीचे आर्यीकरण करण्यात त्यांना मदत करते  वडपौर्णिमेचे मूळ हे मुळात आ...
 इस्रायल इराण युद्धात भारताने काय करावे श्रीधर तिळवे नाईक उत्तर आधुनिकतेचा पहिला पायोनियर हा फ्रेडरिक नितशे होता एकीकडे ईश्वराचा मृत्यू झालेला आहे हे तो सांगत होता आणि दुसरीकडे इतिहास म्हणजे माणसाने तयार केलेली सरचना असते कन्स्ट्रक्शन असते असेही मांडत होता सर्व संहिता म्हणजे कन्स्ट्रक्शनच असे त्याचे सिद्धांतन दिसते कळत नकळत तो नकळतपणे नवीन धर्माची नवीन धर्मनिर्माणची आवश्यकता सांगत होता पण भारत सोडला तर कोणीही ही गोष्ट फारशी मनावर घेतलेली दिसत नाही  याचा व्हायचा तोच परिणाम झाला जुना धर्म परत आला तो सर्वात प्रथम इस्लामने आणला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो प्रथम भारतात परतला काँग्रेसच्या सेक्युलरिझम मुळे तुम्ही काँग्रेसला जॉईन होऊ नका असे सांगणारा हा सर सय्यद अहमद खान नावाचा विचारवंत मुस्लिमांच्या पारंपारिक धर्माचा कट्टर पुरस्कर्ता आणि एज्युकेशनिष्टसुद्धा होता त्याच्यामुळेच मुस्लिम लीग स्थापन झाली आणि पुढे पाकिस्तान नावाचे राष्ट्र निर्माण झाले उत्तर आधुनिक तत्त्वज्ञानामध्ये जी धर्माची वापसी झाली त्याला ज्या घटना जबाबदार होत्या त्या मधले सर्वात महत्त्वाचे प्रकरण हे अर्थातच हिटलर...