हॅपनिंग प्रक्रिया श्रीधर तिळवे नाईक


प्रत्येक दशक स्वतःच्या काही हॅपनिंग प्रक्रिया घडवतच साकार होत असते चौथ्या नवतेची ऐन्शोत्तर पिढी पर्सनल कम्प्युटर रंगीत टीव्ही अप्रोनेट कॅसेनेटिंग अशा काही हॅपनिंग प्रक्रियांना सामोरी गेली नव्वोत्तर पिढी इंटरनेट लॅपटॉप डीव्हीडी अशा काही हॅपनिंग प्रक्रियांना सामोरी गेली तर द्विसहस्त्रोत्तर पिढी फेसबुक ट्विटर पेनड्राईव्ह आदी अशा काही हॅपनिंग प्रक्रियांना सामोरी गेली तर द्विदशकोत्तर पिढी स्मार्ट फोन व्हाटसप अँप अशा काही हॅपनिंग प्रक्रियांना सामोरी गेली


प्रश्न असा आहे कि साहित्यिक ह्यांना सामोरे कसे गेले ऐन्शोत्तर पिढीला चारही दशक नावीन्याची नवतेची होती नव्वोत्तर पिढीला पर्सनल कम्प्युटर रंगीत टीव्ही अप्रोनेट कॅसेनेटिंग ह्या प्रक्रिया जूनता म्हणून लाभल्या 

द्विसहस्त्रकोत्तर पिढीला पर्सनल कम्प्युटर रंगीत टीव्ही अप्रोनेट कॅसेनेटिंग इंटरनेट लॅपटॉप डीव्हीडी अशा काही हॅपनिंग प्रक्रियां जूनता म्हणून लाभल्या तर द्विदशकोत्तर पिढीला पर्सनल कम्प्युटर रंगीत टीव्ही अप्रोनेट कॅसेनेटिंग इंटरनेट लॅपटॉप डीव्हीडीफेसबुक ट्विटर पेनड्राईव्ह ह्या प्रक्रिया जूनता म्हणून लाभल्या


ह्या हॅपनिंग प्रक्रियांचे त्या त्या पिढ्यांच्यावर नेमके काय काय परिणाम झाले ?


एक वेळ अशी होती कि समाजशास्त्रीय पिढ्यांचा अस्त चौथ्या नवतेत होईल असं वाटलं होत पण प्रत्यक्षात तसं झालं नाही सतीश तांबे सुनील तांबे रवींद्र लाखे चं प्र देशपांडे ह्यांची काहीशी आयडियॉलॉजीला टच करणारी पिढी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व दाखवत राहिली श्रमिकांच्याबद्दलचा कळवळा ह्या पिढीला फेसबुकवरही वाटतच राहिला आणि सामान्य जनाविषयीची आस्था अगदी उत्तराधुनिक टोक गाठतांनाही कमी झाली नाही नव्वोत्तर पिढीचा चंगळवाद आणि संधिसाधूपणा लपवता म्हंटला तरी लपला नाही द्विसहस्त्रकोत्तर पिढी ह्या दोन्ही पिढ्यांचा सुवर्णमध्य साधण्याचा भूमिकेत रेंगाळत राहिली संधिसाधूपणाऐवजी प्रोफेशनल मार्केटिंग आणि चंगळवादी ऐश विवेकाने करण्याची धडपड ही पिढी करतांना दिसते देशी चौथ्या नवतेच्या स्पष्ट पाऊलखुणा ह्या लोकांच्या लेखनात आढळतात पण आश्चर्यकारकरित्या सत्यकथेचा प्रतिमावाद इथे कमबॅक करतांना दिसतोय मात्र सत्यकथेची चूक हे लोक करत नाहीत सत्यकथेची सर्वात मोठी चूक कुठली असेल तर ती म्हणजे अभिरुचीने जो मर्ढेकरी प्रतिमावाद आणला तो आशयकेंद्री व अर्थकेंद्री होता ही मूलभूत गोष्टच ती विसरली पुढे सौष्ठव च्या बाबतीत हीच चूक अभिधानानंतरने केली ही पिढी सत्यकथा आणि अभिधानंतरने केलेली प्रतिमाबंबाळतेची चूक करत नाहीयेत ती ह्याबाबत अभिरुची सौष्ठव सारखी प्रतिमेला साधन म्हणून वापरण्याबाबत अधिक सजग आहे


प्रत्येक पिढीच्या वाट्याला पाच प्रकारच्या आशयधारा थीम्स येतात प्रश्न असतो त्या आशयधारा ती कशा प्रकाशते ?


१ सनातन आशयधारा ह्यात सूर्य चंद्र आकाशगंगा झाड जंगल ह्या सारख्या आशयधारा येतात ह्यातल्या अनेक वापरून गुळगुळीत झालेल्या असतात मात्र नवा प्रतिभावंत त्यांना पुन्हा नवा आशय देतो


२ पारंपारिक आशयधारा ह्यात परंपरेने चालत आलेल्या आशयधारा येतात मात्र नवा प्रतिभावंत त्यांना पुन्हा नवा आशय देतो उदा विठ्ठल रुक्मिणी भीमा पंढरपूर शिवाजी संभाजी पेशवे रामायण महाभारत बुद्ध शिव


३ प्रस्थापित आशयधारा ह्यात मागील दोन तीन पिढ्यांनी वापरलेल्या अन प्रस्थापित झालेल्या आशयधारा येतात शाहू आंबेडकर चवदार संविधान निवडणुका चौकोनी कुटुंब देशीवाद अस्तित्ववाद


४ समांतर आशयधारा ह्यात मागील पिढीने वापरलेल्या पण अद्याप प्रस्थापित न झालेल्या आशयधारा येतात लिव्ह इन रिलेशनशिप पर्सनल कम्प्युटर सेम जेंडर विवाह कवितावाचन व काव्यगायनाचे कमबॅक देशीवादाऐवजी मार्गी देशी पोटी जमाती घटकांचे इंटरेस्टिंग इंटरनेटींग ह्या आमच्या पिढीच्या काही आशयधारा ह्यांनी चौथी नवता सुरु केली आता ह्या समांतर आशयधारा झाल्यात कारण त्या अद्याप प्रस्थापित नाहीत मात्र समाजाचा विरोध आता मावळत चालला आहे


५ प्रायोगिक आशयधारा ह्यात आत्ताच्या ताज्या अवकाशात व काळात नव्याने प्रवेश केलेल्या आशयधारा येतात ह्यांच्यामुळेच नवतेची सुरवात होते प्रश्न असा आहे कि ह्या पिढीला स्वतःच्या काही आशयधारा सापडल्या आहेत का ? कि आमच्या पिढीच्या आशयधारा ह्याच ह्याही पिढीच्या आशयधारा आहेत आमची पिढी जे लिहायचंय ते लिहून चुकली आहे पुढे लिहीलही पण आमचा ब्रेनही हलवेल असं काही ह्या पिढीपुढे आहे का कि अजूनही आम्हीच ह्यांचा ब्रेन हलवतो आहे ?

श्रीधर तिळवे नाईक

ह्या आशयधारा इतक्या कालबद्ध आणि हवाबंद नसतात. एकाच वेळी दोन तीन किंवा जास्त असू शकतात.

आनंद थत्ते 

हो 

श्रीधर तिळवे नाईक 

हा प्रश्न महत्त्वाचा आहे की लिहिती पिढी काय करेल? आणि त्यापुढची इन्स्टाग्राम वगैरेवरची पिढी काय व कशी असेल? त्याचं जे काही असेल ते उत्तर मिळेल. पण - ब्रेन हलवणारं काही येईल का - याबाबत मला प्रश्न आहेत. साहित्य/कलेने नक्की काय केलं पाहिजे? ब्रेन हलवणं हे तुम्ही कोणत्या अर्थी म्हणता आहात मला समजलं नाही, पण मला ते सुपरफिशल वाटतंय. एक खरं की आजपर्यंत तरी माझ्या पिढीने आमचं म्हणावं असं कोणतंही व्यासपीठ उभारलेलं नाही, ज्यातून काही तात्त्विक मांडणी झाली व होईल. एकाअर्थी ही माझी पिढी मला स्कॅटर्ड व आत्ममग्न वाटते. ती वरवर सामूहिक असल्याचं भासवते, पण आतून स्वतःत रमलेली वाटते. यात सगळे प्रवाह/कवी/लेखक आले. याची कारणं काय हे शोधायला हवं.

प्रणव सखदेव 

Samuhgaan haa prakaar post 90s nantar sampalaay....

महेश लीला पंडित 

Mahesh Leelapandit मला वाटत नाही तसं. सामूहिक भान असणं व तुम्ही म्हणताय तसं समूहगान गाणं यात फरक आहे. गान अजूनही चालू आहे, उलट जोमात चालू आहे. पण वेगळ्या प्रकारे. या पिढीला व्यवस्थेतल्यांशी डील कसं करायचं व त्यातून फायदे कसे मिळवायचे हे नीट माहितेय. उघड बंडखोरी वगैरे ते करत नाहीत, पण त्याऐवजी त्यांनी जे स्वीकारलंय ते किती चांगलंय हे काळाच्या ओघात पाहाणं आवश्यक आहे. (ही पिढी म्हणजे वयानुसार नव्हे तर या काळात लिहू लागलेले, पुनरुज्जिवीत झालेले बहुतांश कवी/लेखक.)

Mahesh Leelapandit ok.

प्रणव सखदेव 

Pranav Sakhadéo Mahesh Leelapandit कुठलीही नवता फक्त निर्माण होऊन चालत नाही तिला चांगल्या व्यवस्थापनाचीही गरज असते कलाक्षेत्रात व्यवस्थापन हे फार संवेदनशीलतेने करावे लागते हे व्यवस्थापन सत्तेचे राजकारण खेळायला लागले आणि हुकूमशहा बनून छाताडावर नाचायला लागले कि त्या नवतेची वाट लागते 


मराठीत प्रबोधनवादी नवतेचे सर्जन महात्मा फुल्यांनी केले पण ह्या नवतेला चांगला व्यवस्थापकच लाभला नाही आणि प्रबोधनवाद मराठी साहित्यात नीट उमटलाच नाही साधं फुल्यांचं नाटक सुद्धा ह्या लोकांनी सादर केलं नाही त्याउलट केशवसुतांनी स्वछंदवादी नवतेचे सर्जन मर्यादित कुवतेनुसार केले आणि त्याचे व्यवस्थापन हे ब्राम्हणी परिघात घुटमळत राहिले वास्तविक ह्या नवतेला सावरकरांच्यासारखा क्रांतिकारक माणूस लाभला होता त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेलाच नाही बालकवी आणि गडकरी ह्या उत्तम सर्जकांनी चांगले काम केले १९३० नंतर मात्र अचानक ह्या नवतेत एकापेक्षा एक दिग्गज कवी नाटककार निर्माण झाले आणि ही नवता बहरली कुसुमाग्रज बा भ बोरकर पु शि रेगे बहिणाबाई चौधरी ना घ देशपांडे पु ल देशपांडे आचार्य अत्रे ही ठळक नावे तिसरी फळी आली तीही दमदार ना धो महानोर ग्रेस आरती प्रभू लोकांचाच पाठिंबा असल्याने हिला व्यवस्थापनाची गरजच भासली नाही 


व्यवस्थापनाची खरी गरज भासली ती आधुनिकतावादी नवतेला ! मर्ढेकरांनी आपला सर्जकाचा रोल उत्तम निभावला तर पुरुषोत्तम चित्रेंनी अभिरुचीद्वारा उत्तम व्यवस्थापन केले पुढे ह्या नवतेचे व्यवस्थापन केले ते श्री पु भागवत ह्यांनी त्यांनीच ह्या नवतेचा व्यवस्थापकीय प्रपंच नेटका उभा केला मात्र प्रतिमावाद हा आधुनिकतावादी चळवळीचा अनेक वादांपैकी केवळ एक वाद होता ह्याचाच त्यांना विसर पडला स्वतःच्या मनमानीने त्यांनी ही चळवळ फारच संकुचित केली आणि व्यवस्थापन सर्जनावर हावी झाले प्रतिमावादी चि त्र्यं खानोलकर जी ए कुलकर्णी ग्रेस ह्यांना मेन ट्रेंड बनवण्यात ह्या व्यवस्थापनाचा बराच हात होता त्यामुळे आधुनिकतावादी असूनही अस्तित्ववादी विलास सारंगही मागे पडले ह्यांचेच असूनही ! गोतावळा प्रतिमावादीही वाटत असल्याने प्रमोट केली गेली पण प्रतिमावादातून वास्तववादाकडे आणि नंतर फुलेवादाकडे वळलेले आनंद यादव नकोसे झाले आणि झोंबी मौजेबाहेरून आली

श्रीधर तिळवे नाईक 

Shridhar Tilve I second you here! Jevha vyavasthapan sarjanaat hastakshe karate an vyavasthapak hukumshah banun basataat tevhaa ghol hotoch

महेश लीला पंडित 

Mahesh Leelapandit Because of dictatorship SAMUHGAN begins

श्रीधर तिळवे नाईक 

Shridhar Tilve yes, this is where the objective changes

महेश लीला पंडित 

Pranav Sakhadéo Mahesh Leelapandit देशीवादी नवतेत सर्जक आणि व्यवस्थापक ह्या सीमारेषा अंधुक झाल्या आणि सर्जकांनी व्यवस्थापन न सांभाळता धडाक्याने पुस्तके काढली उदा नेमाडेंनी काढलेले चित्र्यांचे पुस्तक कवितेनंतरच्या कविता अपवाद अशोक शहाणे खरेतर अशोक शहाण्यांनी आपला व्यवस्थापकीय रोल अधिक नीट ओळखायला हवा होता आणि वर्षातून किमान चार पुस्तके काढायला हवी होती पण टाईमपास जास्त झाला आणि कोसलासारखी कादंबरी देशमुखीनंतर पॉप्युलर प्रकाशनासारख्या अतिशय उमद्या व्यवस्थापनाकडे गेली आणि ते बरेच झाले कारण अरुण कोलटकरांच्या कविता आणि गद्य काढायला शहाण्यांनी जो उशीर केला तो बघता कोसलाही अशीच रेंगाळत आली असती साहित्य मठांच्याविरुद्ध बंड करण्याचा आव आणणाऱ्या अनियतकालिकांची चळवळ नंतर पॉप्युलर प्रकाशनाच्या व्यवस्थापनात विसर्जित व्हावी हा क्रांतीचे व्यवस्थापन बोंबलले कि काय होते त्याचा नमुनाच म्हंटला पाहिजे मात्र साठोत्तरी व्यवस्थापनाने विशेषतः अशोक शहाण्यांनी मराठी पुस्तकांचा चेहरा बदलला हे मान्यच करावे लागले

Pranav Sakhadéo Mahesh Leelapandit चौथ्या नवतेचे आम्ही जेव्हा साहित्यात आलो तेव्हा आमच्यापुढे तिसऱ्या नवतेच्या व्यवस्थापनाचे काय झाले ते समोर होते श्री पु भागवत व्हायचं नाही आणि अशोक शहाणेही हे पक्के होते विंदा करंदीकरांनी मला कविता पॉप्युलर किंवा मौजेला पाठव असा सल्ला दिला माझी ह्या काळातील अक्कल झिरो होती त्यामुळे कसलाही विचार न करता मी एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार पॉप्युलरला पाठवून दिला बहुदा १९८५ ८६ साली आणि कवी काळा कि गोरा हे माहीत नसतांना पॉप्युलरने तो ताबडतोब स्वीकारला मी हा सस्पेन्स बऱ्यापैकी सांभाळला होता पण राजन गवस ह्या आमच्या मित्राने तो कोल्हापुरात येऊन फोडला मला २१ व्या वर्षीच थेट पॉप्युलरमध्येच एंट्री मिळाल्याने माझ्या वाट्याला काही लेखकाचा संघर्ष बिंघर्ष आला नाही मात्र नवता पसरवण्यासाठी हे पुरेसे न्हवते पॉप्युलर प्रकाशन जसे तिसऱ्या नवतेमागे ठामपणे उभे राहिले तसे चौथ्या नवतेमागे राहिले नाही आणि ही आपली चूक आहे हेही ह्या प्रकाशनाला कधी कळले नाही त्यामुळे आपल्याला चौथ्या नवतेचा प्लॅटफॉर्म उभे करणे गरजेचे आहे हे कळून चुकले १९९० पासून ह्या अंगाने माझ्या जे एस हॉल हॉस्टेलला आणि रूईयाच्या कट्ट्यावर अनेकांशी मिटींगा व्हायला लागल्या भालचंद्र कुबल हा माझा त्यावेळचा परम मित्र आशुतोष आपटे संजय सावंत संतोष क्षीरसागर हे चित्रकार मित्र व त्यांची जेजे गॅंग शेखर सरतांडेल गजेंद्र अहिरे निशिकांत कामत अभिजित पानसे ज्ञानदा समीर परांजपे मंगेश सोमण हे रुईयायिट असा त्यावेळचा माझा मित्रपरिवार होता ह्यातून चित्र स्पष्ट होत गेले आणि मी सर्जकाचा संपादकाचा आणि भालचंद्र कुबलने प्रकाशक व्यवस्थापकाचा रोल पार पाडायचा असे ठरले पुढे चंदू हा जयराज साळगावकरांचा मित्र असल्याने जयराजही ह्यात पुढे आला आणि सौष्ठवचा पहिला अंक आम्ही दणक्यात प्रकाशित केला कालनिर्णयने तो मस्त छापला होता ह्या अंकानेच प्रभावित होऊन एक तरुण पुढे आला त्याचे नाव हेमंत दिवटे ज्याला साहित्यात काहीतरी करायचे होते पण काय करायचे हे स्पष्ट न्हवते तो आता काहीही म्हणत असला तरी चौथ्या नवतेतलं त्याला शस्पही माहित न्हवते मात्र उत्साह भरपूर होता त्याच्या माझ्या मीटिंगमध्ये मी सर्जक आणि त्याने व्यवस्थापक अशी जबाबदारी वाटून घ्यायची ठरली आणि माझ्या मते ही एक चांगली जोडी होती आणि तिने आपले काम चोखपणे पार पाडले पुढे माझ्या कवितेमुळे जी केस झाली त्याने चित्र बदलले आणि उत्तरोत्तर राजकारणही वाढत गेले पण मी सर्जनाच्या अंगाने आणि हेमंत व्यवस्थापनाच्या अंगाने वाढत गेला दुर्देवाने इथे श्री पु भागवत नव्याने जन्मला आणि त्याने सर्वांनाच आपल्या कानाच्या खाली उभे करायला सुरवात केली ज्यांची उंचीच कमी होती ते थांबले आणि चमचे झाले ज्यांची जास्त होती ते बाहेर पडले

Pranav Sakhadéo Mahesh Leelapandit ह्यानंतरची पिढी हा सर्जक व्यवस्थापक प्रकार कसा पेलतीये हा प्रश्न आहे मुळात ह्या पिढीत असा काही प्लॅटफॉर्म का तयार झाला नाही जो नवी संवेदनशीलता प्रकट करेल वास्तविक मेघना भुस्कुटे आणि अभिजित रणदिवे ह्यांनी फार छान सुरवात केली पण घोडे नेमके कुठे पेंड खायला लागले ? नितीन वाघ कायतरी करतील असे वाटले होते त्यांचे काय झाले ? कि मुळात फेसबुक मीटिंग मेटींग आणि मेल्टिंग स्पॉट असल्याने अशा काही प्लॅटफॉर्मची गरजच उरलेली नाही ?कि प्रत्येकाचे इगो आडवे येतायत ?


ह्या पिढीचा एक चेहरा तयार झाला आहे काय ही पिढी आमच्या पिढीपेक्षा खरोखर कुठे वेगळी आहे त्याची मांडणी नेमकी कोण आणि कधी करणार ? ह्यांनी नव्वदोत्तर पिढी मुळात समग्र वाचायचा साधा प्रयत्न तरी केलाय का ? आम्ही हेलपाटे टाकून साठोत्तरी लेखन कमावले तसं ह्यांनी काही केलं का ? कि होम डिलिव्हरीची सवय झाल्याने ह्यांना सगळ्या क्रिएटिव्ह लेखनाचीही होम डिलिव्हरी हवी आहे ? माझा अनुभव असा कि हेही साठोत्तरीच्या मागे लागले हे म्हणजे आमच्या पिढीने मर्ढेकरांच्या नादाला लागण्यासारखं होतं त्याचा एक दुष्परिणाम असा झाला कि नव्वोदत्तरी पण साठोत्तरी च्या प्रभावाखाली आणि ही पिढीही ! ह्या पिढीने केलेल्या अनेक गोष्टी तुमच्या पिढीच्या आधीच कुणी केल्या असल्या तर ह्या पिढीला त्याचं श्रेय मिळणे अवघड आहे लेखनाला मान्यता मिळवण्याचा जो आटापिटा नव्वोदत्तरी पिढीने केला त्याच्या झाश्यात हे पण आलेत काय आणि त्या नादात आता स्वतःच्या क्रिएटिव्ह प्रोसेसकडे ही पिढी दुर्लक्ष्य करत आहे काय ?


पुढच्या पिढीचे कौतुक करून त्यांना सोकावून ठेवणारे साहित्यिक प्रत्येक पिढीत असतात त्याने काहीच फायदा होत नाही मुळात संपूर्ण जागतिक काव्यक्षेत्रातच एक प्रकारची मरगळ आहे मी माझे समकालीन युरोपियन अमेरिकन वाचतो तेव्हा फार ग्रेट कविता वाचतोय असं मला वाटत नाही आमच्या पिढीतले खरे कवी सर्वत्रच झाकले गेले असं दिसतंय आणि सर्वत्रच साठोत्तरीने पुढच्या पिढीला बिघडवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो त्यातून फक्त तेच वाचलेत ज्यांनी मान्यतेचा टिळा लावायला नकार दिला एक मात्र खरे जोवर सर्जन आणि व्यवस्थापन ह्यांचा समतोल कसा साधायचा हे ह्या पिढीला स्पष्टपणे कळणार नाही तोवर ह्या पिढीचे साहित्य एक क्रिएटिव्ह चळवळ म्हणून उभे राहणे कठीण आहे आऊटडेटेड लोकांच्या मान्यता तुम्हाला अपडेट करत नाहीत त्या तुम्हांलाही ऑऊटडेटेड करत जातात धिस इज द हाय टाइम टू रिअलाईझ इट . 


श्रीधर तिळवे नाईक


Shridhar Tilve 👍👍 मला असे वाटते की सज्जड काम करत रहावे लागते हे आमची पिढी विसरत जातेय की काय? लुटुपुटूच्या लढाया व कौतुकात ती रमते आहे का? तुम्ही जे व्यवस्थापन वगैरे म्हणताय तो मुद्दा कळीचा आहे. सर्जनासाठी वेगवेगळी रिस्क घ्यावी लागते. ती घेण्यासाठी मान्यता/पुरस्कार वगैरे गोष्टी गमवायला ही पिढी तयार नसावी असे वाटते. आता बहुधा या पिढीचे असे कुठे व्यासपीठ तयार होणं कठीण वाटतं. आता या पुढच्या पिढीने ते केलं तरच.

प्रणव सखदेव 

Maanyatechaa tilaaa lavaayalaa naakaar is the strength of the creative writer as well as it’s a weakness that doesn’t allow a movement to take place...

महेश लीला पंडित 

या चर्चेत भाग घ्यायची क्षमता नाही पण काही फार महत्वाची कटू सत्ये येथे प्रतीपादली गेली आहेत.

पूर्वी जे काम एक युगप्रवर्तक कमितकमी प्रथम माणूस पार पाडत होता तसा तो आताच्या बदललेल्या मानसिकतेत,माझ्या जीवनात माझ्या साहित्याचे स्थान हे फक्त माझ्याच पायाखालची वाट मलाच कळण्यापुरते आहे,मी दीपस्तंभ नाहीच व मला करु नकाच.केलात तर मी कधीही दिवा टाकून पळून जाईन

होणे कठीण आहे.

कलेक्टीव्हली काही आकृती स्पष्ट झाली तर झाली.

आशुतोष दिवाण 

Ashutosh Diwan मी काय घडलं ते वस्तुनिष्ठ पद्धतीने सांगितले आहे सौष्ठवचा चौथ्या नवतेचा अंक आला तेव्हा त्याचवेळी हेमंत दिवटेंचा अभिधाचा अंक आला होता आणि तो चक्क सुरेश भट ह्यांच्यावरचा गझल विशेषांक होता आता हे ऐतिहासिक सत्य तुम्ही मारे सैद्धांतिक मांडणी केली म्हणून थोडेच बदलणार आहे ? इतिहास पुरावे बघतो आणि मागतो प्रत्येकवेळी अनेक लोकांनी सृजनशीलता दाखवली असं सिद्ध करता येईल का आजही कित्येक सिद्धांत किंवा शोध एका व्यक्तीने लावले आहेत विज्ञानातील सारीच नोबल अनेकांना विभागून देण्यात आलेली नाहीत कधीकधी ती एकालाच द्यावी लागलेत सत्य काय हे सर्वात महत्वाचं आहे उद्या मी चुकीचा आहे असं कुणी सिद्ध केलं तर माझी काही ना नाही मुद्दा सत्यतेचा आहे कृपया हे लक्ष्यात घ्यावे आपण कोल्हापूरचे आहात म्हणून सांगतो त्यावेळी शंकर सारडांनी पुढारीत ह्या अंकावर एक विशेष लेख लिहिला होता

श्रीधर तिळवे नाईक 

हा इतिहास काही मला माहीत नाही व तो माझ्या अभ्यासाचा भागही नाही.

त्यामुळे वरील मत मी आपल्या मराठी कवितेतल्या स्थानाबद्दल केले नाही.

आजच्या बदललेल्या तरुणांच्या मला पर्सीव्ह होणाय्रा जीवनदृष्टी वरुन मला असे वाटले.प्रणवने तश्याच अर्थाचे लिहीले आहे.(असे मला वाटले.)

मागील पिढी पुढच्या पिढीला ॲसिमीलेट करण्याचा प्रयत्न आपला रिलेव्हन्स जास्त काळ जगवण्यासाठी करते हे आपले विधान मला फार महत्वाचे वाटले.

आशुतोष दिवाण 

Ashutosh Diwan 👍👍👍

श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे