मूळ मुद्दा भारतात जन्मलेल्या धर्मांना स्वतंत्र जागतिक ओळख असायला हवी की नाही श्रीधर तिळवे नाईक 

हिंदुत्ववादाचा विचार करताना किंवा हिंदूवादाचा विचार करताना एकच गोष्ट अत्यंत स्पष्ट असायला हवी ती म्हणजे भारतात जन्मलेल्या धर्मांचे करायचे काय ? हा प्रश्न टाळूनच अनेक जण विशेषतः पुरोगामी लोक विचार करतात आणि त्यातूनच आत्ताचा सगळा पुरोगामीवादाचा घोळ झालेला आहे. मुळात मुद्दा वेगळा आहे. जगात सर्वच धर्म स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात यशस्वी झाले अशा प्रकारचे राष्ट्र किंवा अशा प्रकारचा राष्ट्रीय समूह निर्माण करण्यामध्ये भारतीय धर्मांना मात्र यश मिळालेले नाही याचे कारण अर्थातच ब्राह्मणी व्यवस्था आहे या ब्राह्मणी व्यवस्थेने भारताचे धर्माच्या आधारे राष्ट्र होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आणि पुन्हा असा काही विचार होणार नाही आणि प्रत्येक धर्म आपल्या कंट्रोलमध्येच राहील याची सातत्याने काळजी घेतलेली आहे प्रश्न असा आहे की ब्राह्मणी कारस्थानाला आता काही विरुद्ध उत्तर द्यायचे की नाही की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप बसायचे? 


पुरोगामी लोक असे सांगतात की तुम्ही मूग गिळून गप्प बसा तर हे मूर्खपणाचे आहे आणि हे आता काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले आहे कारण आपण गप्प बसलो तरी ब्राह्मणी हिंदुत्व किंवा ब्राह्मणी सत्ताबाज कारस्थाने गप्प बसत नाहीत हे आता स्पष्ट दिसते आहे . ते आपला नवीन धर्म घेऊन येतातच आणि तो मग सगळ्या भारतीयांना द्यायला बघतातच त्याचा पद्धतशीर प्रचार करतातच. प्रश्न असा की याचा काही प्रतिकार करायचा की नाही ? पण प्रतिकार करायचा राहिला बाजूलाच या मूर्ख पुरोगामी लोकांनी मूर्खासारखा धर्मनिरपेक्ष वाद आणला. आपला देश काय आपल्या देशाचे सातत्य काय आहे आपल्या देशाची विशेषता काय त्याचा कसलाही विचार या पुरोगामी लोकांनी केला नाही परिणाम झाला असा की परंपरा पुन्हा एकदा उत्तर आधुनिकतेच्या नावाखाली परत आली आणि आज ती सत्तेवर आलेली आहे . याबाबतीत आधीच जर का पुरोगामी लोकांनी खोलवर विचार केला असता तर ही भानगड झाली नसती प्रॉब्लेम असा आहे की युरोप मधले जे काही भारताबाबत अप समाज असणारे मूर्ख लोक आहेत आणि ब्रिटिशांच्या साम्राज्यवादामध्ये वाढलेल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये शिकलेले कलोनाईजड झालेले जे लोक आहेत त्यांच्यामुळे हा सर्व घडलेले आहे यामध्ये गांधींच्या पासून ते नेहरूंसारखे लोक सुद्धा येतात. 

साहजिकच या सगळ्याला जो आकार द्यायला निघालेला मनुष्य होता तो मनुष्य म्हणजे विनायक दामोदर सावरकर! सावरकर वादावर अनेक पद्धतीने टीका करायला हवी परंतु त्यांनी एक मूलभूत गोष्ट मांडली ती म्हणजे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात हिंदुत्व आणि हे हिंदुत्व भारतीय धर्माच्या स्वतंत्र सातत्याबद्दल व स्वतंत्र आयडेंटिटीबद्दल बोलत होते तिच्या स्वायत्त्य ओळखीला सन्मान देत होते प्रश्न असा होता की हा सन्मान भारतीय जनतेला हवा होता की नाही? इंग्रजांच्या काळामध्ये स्वातंत्र्यसंग्राम जर का हिंदुत्ववादी लोकांनी लढवला असता तर कदाचित धर्मनिरपेक्षता विजयी झालीच नसते पण भारतात ती विजयी झाले कारण धर्मनिरपेक्ष लोकांनी स्वातंत्र्यसंग्राम अतिशय चांगल्या रीतीने टिळकांच्या नंतर लढवला आणि त्याचा फायदा त्यांना मिळाला विजय झाल्यानंतर काँग्रेसच्या राजवटीमुळे एक वातावरण असे तयार झाले की हा सन्मान नको होता प्रत्यक्षामध्ये हा सन्मान भारतीय जनतेला हवा होता परंतु ज्यांनि या गोष्टीसाठी प्रयत्न करायला हवे ते मुळात असा सन्मान मिळवायला सुद्धा स्वातंत्र्य लागते हे मूलभूत गोष्टच विसरून गेले याचे कारण या काळामध्ये ज्यांना हा सन्मान हवा होता त्यांना हा सन्मान स्वतःसाठी हवा होता स्वतःचे ब्राह्मणी वर्चस्व राखण्यासाठी हवा होता आणि ब्राह्मणी वर्चस्व राखण्यासाठी ब्रिटिश काळ हा अधिक अनुकूल असणार हे यांना कळाले होते त्यामुळे यांनी जेव्हा हा सन्मानाचा मुद्दा मांडला तेव्हा तो स्वीकारण्याची तयारी वर्ण जाती सकट असलेले पॅकेज डील म्हणून येत होती आणि हे पॅकेज डील स्वीकारण्याची तयारी भारतातल्या सामान्य जनतेची नव्हती परंतु दुर्दैवाने असे नंतर झाले नाही कारण हळूहळू जनतेला या धर्मनिरपेक्षतेने नेमके काय केले हे कळून चुकले अल्पसंख्याकांचे लाड हे इंग्लंडप्रमाणे करणे असला काहीतरी नतदष्ट्र उद्योग सेक्युलर वादाच्या नावाखाली झाला असं एक इंग्लंडने काही भारतासारखे अर्धा धर्म जन्माला घातले नव्हते त्यामुळे त्यांचा प्रश्नच वेगळा होता आणि मुळात मुस्लिम लोकच नव्हते त्यामुळे त्यांना मुस्लिमांचे लाड करणे सहज शक्य होते आता मुस्लिम लोक वाढत आहेत तर त्यांच्याही धर्मनिरपेक्षते पुढे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत किंबहुना झालेलेच आहेत तिथे हिंदुत्व टाईप काही ख्रिश्चनत्व जन्मले तर मला आश्चर्य वाटणार नाही यांच्या या मूर्खपणामुळे आज आपण पाकिस्तानने बांगलादेश नावाचा मोठाचा मोठा भूप्रदेश गमावला . म्हणजे झाले असे की मुस्लिम लोक आपली ओळख आपली आयडेंटिटी विसरायला तयार नव्हते आणि हे लोक मूर्खासारखे सांगत होते की ही धार्मिक ओळख कशी मूर्ख आहे म्हणजे मुस्लिमांची धार्मिक ओळख अस्सल आणि भारतात जन्मलेल्या सगळ्या धर्मांची ओळख मात्र नक्कल असला काहीतरी उद्योग आणि चावटपणा या सेक्युलर लोकांनी केला आता गुलामगिरीला मान्यता देणारा इस्लाम आणि वर्णजात व्यवस्थेला मान्यता देणारा हिंदू धर्म किंवा वैष्णव धर्म किंवा ब्राह्मण धर्म यांच्यामध्ये तसा काय फरक होता? दोघेही गुलामगिरीचीच गोष्ट बोलत होते महंमद पैगंबर असल्याने आणि ते शेवटचे असल्याने त्यांचा आदेश अंतिम त्यामुळे गुलामगिरी इस्लाम धर्मातून नष्ट होणे कधीही शक्य नाही कारण तो खुद्द प्रेषिताचा आदेश आहे त्या उलट भारतामध्ये जे धर्म युरेशियन आहेत त्यांच्यामध्ये सुधारणा घडवण्याचा चान्स होता व आहे . पण हा मूलभूत फरकसुद्धा न कळल्याने भल्या भल्या साम्यवादी आणि समाजवादी लोकांनी शेण खाल्ले . यांनी कधीही हा प्रश्न विचारला नाही की मुस्लिम कंट्रीज मध्ये सेक्युलारिझम का नाही ? तिथे अल्पसंख्याकांचे हक्क कसे काय गायब होतात ? 

त्यामुळे साहजिकच हळूहळू सहजपणे या गोष्टी डोळ्यात दिसत असल्याने भारतातला सामान्य धर्मावर विश्वास ठेवणारा मनुष्य आणि लोक बदलत गेले आणि ते हिंदुत्वाकडे सरकत गेले.

आजही लोक ऐकायला तयार नाहीत आणि हिंदुत्ववादी त्यामुळेच निवडून येतात यामध्ये नेमका गोंधळ कुठे झाला? गोंधळ असा झाला की बहुजन धर्माच्या शैव धर्माकडे या सगळ्या पुरोगामी लोकांनी आणि चळवळीने दुर्लक्ष केले आणि यांनी टार्गेट करायला आणि टीका करायला कायमच वैदिक ब्राह्मणी वैष्णव आणि हिंदू धर्म हे युरेशियन धर्म केंद्रस्थानी आणले जे प्रत्यक्षामध्ये अल्पसंख्यांक होते पण या लोकांच्या प्रचंड टीका लेखनामुळे नेमका उलटा परिणाम झाला आणि असा गैरसमज पसरला की संपूर्ण भारत हा युरेशियन धर्माच्या प्रभावाखाली आहे या लोकांना बाकी जाऊ द्या पण शिवाजी महाराजांचा शैवधर्म सुद्धा नीट दिसत नव्हता इतके आंधळे होते खास प्रकारचा बहुजन समाजाच्या धर्माबद्दलचा बधिरपणा या या स्वतःला संवेदनशील समजणाऱ्या लोकांनी कमावलेला आहे आणि यांना वाटते की ही बौद्धिक संपत्ती आहे आता ही बौद्धिक संपत्ती पूर्ण फाट्यावर मारण्याची वेळ आलेली आहे पण हे लोक हे करणार नाही कारण संस्कार असे घनदाट असतात की ते सहजासहजी जात नाही एक पिढी मेली तरी हे ताळ्यावर येत नाहीत त्यामुळे यांची तिसरी नवीन पिढी यांच्या बाजूने उभी राहतच नाही उलट ती हिंदुत्वाला जाऊन मिळते हीच वस्तुस्थिती त्यामुळे यांच्याच घरामध्ये आढळत आहे आणि त्यामुळेच त्यांच्या घरात आता हिंदुत्ववादी जन्मने अटळ आहे 

मग लढा उरतो कुठे ? तर दोन प्रकारच्या हिंदुत्वामध्ये ! अल्पजन युरेशियन हिंदुत्व आणि बहुजन शैव हिंदुत्व ! त्यामुळे पुरोगामी लोकांनी आता शैव हिंदुत्व स्वीकारावे किंवा मग स्वतःच्या घरामध्येच स्वतःचेच नातवंड अथवा पणतवंडे हिंदुत्ववादी झालेली पाहण्याची तयारी करावी आणि शांतपणे रिटायरमेंट घ्यावी नाही रिटायर झाला तर तुमची तुमची नातवंडे पणतवंडेच तुम्हाला रिटायर करतील तेव्हा बघा आधी स्वतःला बदला मग इथे इतरांना बदलायला सांगा तुमचा धर्मांच्या बाबतीतला बेसिक घोळच अजून तुम्हाला निस्तरता आलेला नाही तो आधी निस्तारा आणि आपण भारतात आहोत याचे मुख्य म्हणजे भान बाळगा .

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे