शैव श्रुती का आवश्यक आहे

पुन्हा एकदा श्रीधर तिळवे नाईक 

आनंद मोरे यांनी प्रश्न विचारलेला आहे 

शैव वैष्णव आणि धर्मनिरपेक्षतावाद याबद्दलच्या तुमच्या पोस्ट्स वाचताना नेहमी एक प्रश्न मनात येतो की धर्मनिरपेक्ष लोकांनी शैवधर्म स्वीकारावा असं तुमचं मत आहे. पण ज्याप्रमाणे वैष्णव आणि धर्मनिरपेक्ष लोक सत्ताकांक्षी आहेत त्याप्रमाणे शैव स्वतः सत्ताकांक्षी नाहीत का? आपण संपूर्ण भारतभर आपल्या शैवधर्माचा प्रसार करुन संपूर्ण भारत शिवमय करावा अशी आकांक्षा त्यांच्या मनात नाही का? आणि नसेल तर सत्ताविन्मुख होणाऱ्या गटाचा धर्म स्वीकारून धर्मनिरपेक्ष लोक सत्ताकांक्षी वैष्णवांचा मुकाबला कसा काय करु शकतील?


सर्वात प्रथम तुम्ही एक जेन्यूइन प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल तुमचे अभिनंदन ! 


सर्वात पहिली गोष्ट जो खरा वैष्णव असतो तो राम कृष्ण हरीच्या मागे लागतो सत्तेच्या मागे लागत नाही जो शैव असतो तो शून्याच्या मागे लागतो 0 प्राप्तीच्या शून्य अवस्था प्राप्त करण्याच्या मागे लागतो सत्तेच्या मागे लागत नाही 


तर आता एक टेंडन्सी म्हणून पाहू . सत्तेची आकांक्षा सर्वच माणसांच्यात असते त्यामुळे आपणाला असे म्हणता येत नाही की ती शैव लोकांच्या जास्त किंवा कमी किंवा वैष्णव लोकांच्या जास्त किंवा कमी असे काही नसते 


प्रॉब्लेम असतो तो नेहमी सामूहिक विश्वासाचा सामूहिक आत्मविश्वासाचा असतो आणि मला वाटते की शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या पहिल्या बाजीरावाच्या निधनानंतर आणि शिक सुद्धा पराभूत झाल्यानंतर कुठेतरी शेव लोकांचा सामूहिक आत्मविश्वास हरवलेला आहे आणि तो परत मिळणे अत्यंत आवश्यक आहे किंबहुना त्यासाठी आवश्यक ती धडपड चाललेलीच असते परंतु आपण जर का नरेंद्र मोदी म्हण यांना पाहिले आणि त्यांच्या आधीचे पंतप्रधान पाहिले तर तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की हर हर महादेव म्हणणारा हा कदाचित एकमेव पंतप्रधान भारतामध्ये आलेला आहे आत्तापर्यंत ही घोषणा इतरांना का द्यावीशी वाटली नाही हा प्रश्न कधीतरी विचारायला हवा नरेंद्र मोदी यांना जे अफाट यश मिळाले त्याचे सर्वात मोठे कारण सर्वशैव त्यांच्यामागे एकजुटीने उभे राहिले याचे कारण ते प्रथमच हर हर महादेव म्हणणारे होते आता त्यांचा विजय बघितला तर आत्मविश्वास कमी होता असे म्हणता येत नाही त्यांच्यासमोरचा तिढा वेगळा निर्माण करण्यात आला आणि त्यांना श्रीरामाच्या भरीला घालण्यात आलेले आहे. त्यामुळे शैव लोकांची सत्ता आकांक्षा कमी झालेली नसून उलट ती वाढलेली असावी आणि यापुढे ते अधिकच वाढत जाईल असे दिसते . 


खरा प्रॉब्लेम हा सिद्ध लोकांचा आहे . बुद्ध झालेले सरळ सरळ समाजात येतात आणि नवीन धर्म सांगतात परंतु अनेकदा सिद्ध मात्र आपापल्या व्यवसायात मग्न असतात . म्हणजे मी आयुष्यामध्ये एका सिद्ध भाजीवाल्याला , सिद्ध मोटरसायकल दुरुस्ती करणारा, किंवा सिद्ध झाल्यानंतर एका आदिवासीला झाडावर बसलेला पाहिलेला आहे . यांना समाजात काय यावेसे वाटत नाही हा प्रश्न मला कायमच पडतो . वास्तविक भारतामध्ये कुठल्याही इतर धर्मापेक्षा शैवशृतीमध्ये प्रचंड संख्येने सिद्ध निर्माण होत असतात परंतु लोकांच्यात मात्र कोणीच यायला बघत नाही. अपवाद कदाचित सद्गुरु असतील . त्यामुळेच असे वाटते की अरे हे लोक असे का वागतात ? पण एक गोष्ट नक्की आहे हळूहळू का होईना परंतु सिद्ध नाही आले तरी दर्शनकार मात्र शैव धर्मांत मधून प्रचंड प्रमाणात निर्माण होतील असे मला वाटते शेवटी ओबीसीबीसी आणि आदिवासी या लोकांना आपली मुळे शोधावीशी वाटणार आहेत आणि त्यानंतर बरेचसे बदलेल असे मला वाटते.


आता मुद्दा धर्मनिरपेक्षतेचा !धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थच मुळे धर्म राज्य शासनापासून वेगळा काढणे आणि सर्वांना समान कायदे असणे हा होतो पुरोगामी लोकांनी हा अर्थ कधीच घेतलेला नाही आणि अल्पसंख्यांकांचे हक्क या नावाखाली अनेक सवलती दिल्या गेल्या आणि आणि धर्म निरपेक्षता या संकल्पनेची वाट लावली. एका अर्थाने हे सर्व दांभिक धर्मनिरपेक्ष लोक आहेत मुळात कायदा धर्माच्या आधारे असू नये. कारण खुद्द धर्म हाच अडचणीत आणणारा कायदा आहे मी हे कितीदा मांडलेले आहे की धर्म ही राजकीय विचार प्रणाली आहे त्यामुळे तिला कायदे करताना पूर्णपणे बाजूला काढायला हवे होते पण हे झालेच नाही 


याच्या मुळाशी आपण गेलो तर मग आपणाला दिसते की मुळातच ही धर्मनिरपेक्ष पोझिशन सुरुवातीपासूनच अशी गोंधळलेली राहिली आहे वास्तविक आधुनिकतेने ईश्वर मेला गॉड इज डेड अशी घोषणा केलेली होती त्यानंतर धर्माचे पुनरआगमन होता कामा नये पाहिजे होते किंबहुना धर्माबाबतीत नव धर्माची स्थापना हा पुरोगामी वाद आहे या उलट नवधर्म स्थापन करून सुद्धा प्रश्न सुटत नाहीत हे कळल्याने धर्म बाजूला काढावा लागेल किंवा नाहीसा करावा लागेल हे कळणे म्हणजे आधुनिक वाद आहे. धर्मनिरपेक्षतावाद हा आधुनिक वाद आहे की पुरोगामी वाद आहे हाच खरा प्रश्न आहे . माझ्या मते तो आधुनिक असला पाहिजे आणि त्याने धर्म पूर्णपणे बिनकामाचे असल्याने ते नाहीसे झाले पाहिजेत अशी भूमिका घ्यायला हवी परंतु अशा प्रकारची कसलीही ठाम भूमिका आधुनिक धर्म निरपेक्षतावादाला घेता आली नाही आणि म्हणूनच आत्ताचे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत .


पुरोगामी वादाने वैज्ञानिक बंड केले खरे परंतु त्यांनी कधीही स्पष्ट आणि स्वच्छ पणाने धर्म नाकारलेले नाहीत त्यामुळेच फ्रान्सिस बेकन पासून न्यूटन पर्यंत सर्व विज्ञानवादी तत्ववेते लोक धर्माची चर्चा करताना दिसतात याचे कारण त्या काळामध्ये विज्ञान इतके स्ट्रॉंग झाले नव्हते की थेट ईश्वराला नकार द्यावा . अनेक पुरोगामी लोक हे ईश्वर नष्ट होणे शक्य नाही असे स्वीकारून बसले होते त्यामुळे त्यांनी धर्म घरात राहावा म्हणून धर्मनिरपेक्षता वाद स्वीकारला म्हणजेच बाहेरची जी ईश्वराविरोधाची लढाई होती ती या लोकांना लढायची नव्हती अपवाद फक्त डावे लोक होते. आधुनिकतेने मात्र एक ठाम निर्णय घेतला आणि गॉड इज डेड घोषित केले पण याचा परिणाम जो व्हायला हवा होता तो झालाच नाही याचे सर्वात मोठे कारण माणसाला आपल्या आसपासच्या "इतर" ज्याला तुम्ही प्रकृती म्हणा निसर्ग म्हणा ब्रम्हांड म्हणा शिवांड म्हणा नाते जोडणे अत्यंत आवश्यक वाटते. प्रश्न नेहमी हे नाते कसे जोडायचे हाच असतो आणि असे नाते प्रत्यक्ष जोडण्याची जीवनशैली म्हणजे मोक्षशैली होय . इथे प्रत्यक्ष प्रमाणाप्रमाणेच साधना करावी लागते . आणि दुर्दैवाने नेमके हेच लोकांना नको असते. कारण त्यासाठी पाळावी लागणारी नैतिकता त्यांना असे वाटते की झेपणार नाही प्रत्यक्षामध्ये ही नैतिकता अत्यंत सोपी आहे पण पाळून तरी बघायला हवे असे कोणाला वाटत नाही याचे कारण या काळामध्ये आधुनिक वादाकडून निर्माण झालेला कार्पोरेट वाद तुम्हाला प्रचंड असुरक्षित करतो याचा जो परिणाम व्हायचा तोच झाला तो म्हणजे धर्माचा पुन्हा एकदा कम बॅक झाला कारण मुळात अनैसर्गिक गोष्ट टिकत नाही आणि निसर्गाशी नाते जोडण्याचा होणारा प्रयत्न हा अत्यंत सनातन प्रयत्न असतो आणि तो कायमच होत राहील माणसाला शेवटी आपण निसर्गाचे एक भाग आहोत हे नीट माहिती असते आणि म्हणूनच मग हा भाग जे काही ते आहे त्या एकाशी किंवा त्या महाएकाशी जोडण्याचा प्रयत्न त्याचा भाग होण्याचा प्रयत्न करणारच म्हणूनच मी म्हणतो की मोक्ष हा पर्याय नाही तर मोक्ष हाच मुख्य आहे आणि मोक्षाला नष्ट करायला म्हणून निर्माण झालेली राजकीय प्रणाली म्हणजे धर्म होय सत्ता अत्यंत बेबंध असते अनैतिक असते तिला आपले सगळे चाळे चालवून घ्यायचे होते म्हणून तिने मोक्षाकडून येणारी नैतिकता धुडकावून लावता यावी म्हणून धर्म निर्माण केला किंवा धर्म निर्माण करायला मदत केली आणि आपले सगळे चोचले पुरवून घेण्याची व्यवस्थित या सत्तेने राजसत्तेने व्यवस्था केली. आपल्याला असे वाटते की राजे म्हणजे काहीतरी खूप सज्जन वगैरे होते प्रत्यक्षामध्ये 90% राजे हे अत्यंत नालायक आणि नीच होते त्यांनी फक्त आपला धर्म आपल्या स्वार्थासाठी वापरला आपल्या ऐय्याशीसाठी वापरला त्यांच्या हाताखाली असणारे लोक ,खात्यात असणारे लोक यासंदर्भात त्यांना मदत करत होते आणि स्वतः ही त्या व्यवस्थेचा जितका फायदा उठवता येईल तितका उठवत होते 


मोक्ष साइडलाईन करण्यामध्ये जगात जवळजवळ सर्वत्रच यश मिळालेले दिसते कारण भारत सोडून उर्वरित जगात मोक्षाविषयीच्या कल्पना खूप अंधुक होत्या आणि पुष्कळशा अनुभव नसलेल्या होत्या . याला अपवाद फक्त भारत हा देश होता फक्त याच देशांमध्ये शंकरांच्या मुळे अनेक मोक्षाची 114 तंत्रे निर्माण झाली विस्तार पावली तयार झाली आणि त्यामुळे मोक्ष कसा मिळवायचा याची एक जीवन प्रणाली तयार झाली आणि म्हणूनच भारतामध्ये मोक्ष केवळ उदयाला आला नाही तर लाखो लोकांनी मोक्ष मिळवला मोक्ष ही जीवनशैली भारतामध्ये अनेकदा मुख्य जीवनशैली बनलेली दिसते . अगदी मोठे मोठे सम्राट सुद्धा अनेकदा या जीवनशैलीच्या प्रेमात पडलेले दिसतात 


आता सुद्धा झाले काय तर उत्तर आधुनिक लोकांना मुळातच विशेषता सत्ताधारी लोकांना कसलाही मोक्षाचा द्वादशशील किंवा पंचशील नैतिकतेचा कंट्रोल नको आहे. त्यांना हवे तसे मोकाट चरण्याचे मैदान मोकळे लागते आणि मोक्ष हे देऊ शकत नाही म्हणूनच हे लोक व्यवस्थितपणे मोक्षाला साईडलाईन करतात आणि धर्माला मुद्दाम म्हणून स्पॉन्सर करत बसतात आपली सत्ता मोकाट असली पाहिजे असे त्यांना वाटत असते . अनेकदा सर्वसामान्य माणसाला सुद्धा पळवाट हवी असते आणि अशी पळवाट मोक्ष देत नाही पण धर्म मात्र अशा अनेक पळवाटा निर्माण करून देतो अनेक पापावर उपाय सुचवतो आणि हे उपाय अत्यंत साधे आणि ऐहिक असतात त्यामुळे माणसे पाप करायला मोकळी होतात . पाप याचा अर्थ पंचशील किंवा द्वादशशील न पाळणे या अर्थाने हा शब्द मी वापरत आहे अनेकांना दारू प्यायची असते परंतु मोक्ष त्याला शंभर टक्के अडकाठी करतो मग दारूला विरोध करण्याऐवजी मोक्षालाच मोडीत काढायचे असे चाललेले असते त्या उलट धर्म पळवाटा निर्माण करून देतो . त्यामध्ये सर्वात हुशार पुरोहित कोणते असतील तर ते म्हणजे इस्लाम आणि ब्राह्मण पुरोहित होय . 


अशा ह्या परिस्थितीमध्ये करायचे काय ? कारण धर्म तर तुमच्या बोडक्यावर पुन्हा बसलेलाच आहे . याला उपाय एकच असतो तो म्हणजे मोक्ष सहजस्वाभाविक बनवणे संपूर्ण व्यवस्था संपूर्ण जालना मोक्ष प्रधान पंचशील प्रधान द्वादश शील प्रधान बनवणे .


आणि हे करण्याचा मार्ग म्हणून मी शैव श्रुतीकडे पाहतो पूर्णपणे दफन झालेली अनेक तंत्रे त्यामुळेच मी खोदून काढून पुन्हा ती सादर केलेली आहेत . त्यामुळे होते काय एकच एक मार्ग एकच एक तंत्र असे राहत नाही आणि मुख्य म्हणजे जवळजवळ ११४ मोक्षाकडे नेणाऱ्या वाटा तुम्हाला निर्माण होतात इतका विस्तार इतर कुठल्याच धर्मामध्ये किंवा श्रुतीमध्ये नाहीये इतक्या वाटा शैव श्रुतीमध्ये आहेत म्हणून मी शैव श्रुती आणू इच्छितो. आणखी काहीही कारण नाही सामान्य माणसांना अनेकदा श्रुती शब्द कळत नाही म्हणून मी धर्म हा शब्द वापरतो खरा परंतु मी जेव्हा धर्म हा शब्द वापरतो विशेषता शैवसंदर्भात तेव्हा मला श्रुती असेच म्हणायचे असते हे एकच जीवनजाल असे आहे की जे या जगात धर्म जन्मण्यापूर्वीच जन्माला आले होते आणि म्हणूनच त्याच्या साह्याने सहजरित्या धर्म नाकारता येतो. तेव्हा पुरोगामीच नव्हे किंवा फक्त धर्मनिरपेक्षच नव्हे किंवा फक्त राजकीय पक्षानेच नव्हे तर सर्वांनीच शैव श्रुती स्वीकारावी असा माझा आग्रह असतो याचे कारण तेवढाच एक पर्याय मला दिसतो दुसरा कुठला पर्याय कोणी सुचवत असेल तर सांगावा मला तरी तो दिसलेला नाहीये . आता तुम्ही म्हणाल की मग धर्म आणि मोक्ष यांना नाकारणाऱ्या लोकांच्या संदर्भात तुमचे म्हणणे काय आहे ? तर माझे म्हणणे या संदर्भात स्पष्ट आहे की त्यांना त्यांचा नास्तिकपणा जपण्याचा पूर्णपणे हक्क आहे . इतकेच कशाला शैव श्रुतीवर किंवा इतर कुठल्याही श्रुतीवर धर्मावर टीका करण्याचा त्यांचा हक्क आहे आणि तो शाबूत राहिलाच पाहिजे . आम्ही नेहमीच म्हणतो की एक वेळ खरा नास्तिक खरा मोक्षाचा साधक होऊ शकतो पण खोटा धार्मिक कधीच मोक्षाचा साधक होऊ शकत नाही . त्यामुळे खरा नास्तिक कधीही परवडणारा असतो .


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog