शाहू महाराज आणि ब्राह्मण्य

 ब्राह्मणवाद , ब्राह्मण्य आणि पाच सामाजिक कॉम्प्लेक्स श्रीधर तिळवे नाईक 

शाहू महाराजांची जयंती साजरी झाली की त्याबरोबर जो एक प्रश्न उठतो तो नेहमीच ब्राह्मणवादाचा असतो . ब्राह्मणवाद म्हणजे काय ?

धर्मकथा, दंतकथा , जात, वंश, रंग, देश, प्रदेश , मंदिर व्यवस्था , यज्ञ संस्था , धर्मग्रंथ ,परंपरा आणि कधीकधी इतिहास आदि कारणांचा वापर करून स्वतःला तसेच स्वतःच्या वर्णबंधूंना सर्व ब्राह्मणेतर लोकांच्या पेक्षा श्रेष्ठ समजणे म्हणजे ब्राह्मणवाद होय. हा अनावश्यक आणि प्रभुत्व निर्माण करणाऱ्या किंवा करू पाहणाऱ्या काल्पनिक श्रेष्ठत्वाचा प्रकार आहे हे तर उघडच आहे. 

हे काल्पनिक श्रेष्ठत्व अनेक गोष्टींच्यामुळे निर्माण होते 

१ पहिली गोष्ट काल्पनिक सुपर कॉम्प्लेक्स म्हणजे आम्ही जन्मदत्तच परमपुरुषदत्त असल्याने आणि मुख हाच माणसाचा आणि परमपुरुषाचा सर्वश्रेष्ठ अवयव असल्याने कारण त्यात मेंदू असतो अशा त्या परमपुरुषाच्या मेंदू युक्त मास्तिष्क युक्त परममुखापासून आम्ही जन्मलेलो असल्याने सर्वश्रेष्ठ आहोत असा हा कॉम्प्लेक्स आहे 

आता या संदर्भामध्ये प्रत्यक्ष पुरावा काय ? आणि हा जो कोणी परमपुरुष आहे तो अस्तित्वात आहे याचा पुरावा काय असा प्रश्न आपण विचारायचा नाही कारण तो अस्तित्वात आहे असे आपणाला ब्राह्मणच सांगणार . माणूस ही जमात कशी जन्मली हे सांगणारी ही निर्माण कथा आहे आणि या निर्माण कथेच्या काल्पनिकतेतून हे काल्पनिक श्रेष्ठत्व निर्माण झालेले आहे. त्यामुळेच त्याला अनावश्यक काल्पनिक धार्मिक श्रेष्ठत्व मानले जाते. अशा प्रकारचा सुपेरियर कॉम्प्लेक्स हा मनोविकार मानावा की नाही हा एक फार मोठा प्रश्न आहे कारण हा मुळातच संस्कारविकार आहे आणि तो लहानपणापासून बालपणापासून संस्कार केल्यामुळे ब्राह्मण बालकांमध्ये जन्मतो आणि ब्राह्मण कुमार वयात तो प्रसरण पावतो.

सर्वसाधारणपणे भारतामध्ये सर्वच गोष्टींना युरेशियन संस्कृती पदार्थ म्हटले जाते . या पदार्थांना तीन गुण असतात हे जे गुण असतात ते जन्मदत्त गुण असतात या धारणेतून या अनावश्यक काल्पनिक श्रेष्ठत्वाला पुरावा जोडला जातो सप्लीमेंट जोडली जाते . आता प्रॉब्लेम असा आहे की मुळातच गुण हे असे सामूहिक असत नाहीत अनेकदा ते वैयक्तिक असतात किंवा जीवजातींचे species चे म्हणजे माणसाच्या संदर्भात होमो सेपियनचे असतात त्यामुळे श्रेष्ठत्व हे नेहमी त्या त्या जीवजातीत वैयक्तिक गुणांच्या आधारे ठरवावे लागते म्हणजे व्यक्ती व्यक्ती मध्ये भेदच करायचा असेल आणि तो गुणांच्या आधारे करायचा असेल तर व्यक्तिगत पातळीवर त्या माणसाकडे किती गुणवत्ता आहे हे पाहिले पाहिजे दुसरी गोष्ट गुणवत्ता फक्त जन्मदत्त जनुक दत्त असत नाही तर ती संस्कार दत्त आणि समाज दत्त सुद्धा असते यातील समाजदत्त मध्ये शिक्षण सुद्धा येते आणि म्हणूनच ती शिक्षण दत्त सुद्धा असते . अशा वेळेला सामूहिक जन्मदत्त संकल्पनेच्या आधारे एखाद्या समूहाने स्वतःकडे वर्ण श्रेष्ठत्व घेणे म्हणजे संपूर्ण मानव जातीचा अपमान करणे असते आणि जर कोणी असा अपमान करत असेल तर त्याला आपण म्हणतो की हा ब्राह्मण्याने ग्रासलेला आहे . असे ग्रसन आणि ग्रहण फक्त ब्राह्मणांनाच संस्कार दत्त म्हणून मिळालेले नसते तर ते ब्राह्मणेतर लोकांना सुद्धा संस्कारदत्त म्हणून दिले आणि शिकवले जाते त्यांच्या मनामध्ये घातले जाते त्यांच्या मेंदूमध्ये उमटवले जाते त्यामुळेच अनेकदा ब्राह्मणांचे हे काल्पनिक अनावश्यक श्रेष्ठत्व मान्य करणारे अनेक ब्राह्मणेतर लोक आपणाला दिसतात आणि त्यांच्या ठाई असलेले ब्राह्मण्य हे सुद्धा तितकेच या अनावश्यक श्रेष्ठत्वाला उत्तेजन देणारे असते . 

२ दुसरी गोष्ट आयडेंटिटी कॉम्प्लेक्स भारतात बाहेरून आलेल्या अनेक लोकांना विशेषतः पुरोहित वर्गाला स्वतःच्या पौरोहित्यपणाचे काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न पडलेला असतो कारण ते जिथून आलेत तिथले देव आणि धर्म ते इथे अप्लाय करू शकत नाहीत उदाहरणार्थ इराण मधून आलेल्या आर्य लोकांना जेव्हा झोराष्ट्रीयन लोकांनी हाकलून लावले तेव्हा स्वतःच्या मांत्रिकीचे आणि मांत्रिक म्हणून असलेल्या आयडेंटिटीचे काय करायचे हा फार मोठा प्रश्न सतावत होता. त्यांची स्वतःची मांत्रिकी होती पण ती मांत्रिकी झोराष्ट्रीयन धर्म स्वीकारायला तयार नव्हती साहजिकच त्यांनी स्थलांतर केले आणि ते भारतात आले. त्यांच्याकडे इराणमधल्या परंपरेने चालत असलेल्या गाथा होत्या ज्या नंतर झोराष्ट्रेन झालेल्या लोकांच्याकडेही होत्या या गाथांना फार वेगळा अर्थ देत त्याच्यामध्ये भर टाकत झरतृष्ठाने स्वतःचा पारशी किंवा अवेस्तन धर्म नव्या गाथांच्या आधारे निर्माण केला काही पुरोहित लोकांना या नवीन गाथा मान्य नव्हत्या मुख्य म्हणजे ते सूर्याला मुख्य देव मानायला तयार नव्हते एकेश्वर वाद स्वीकारायला तयार नव्हते त्यांच्या दृष्टीने त्यांचा बहुदेववाद हाच खरा होता इंद्र हाच देवता मंडलाचा त्यांचा मुख्य देवता होता. साहजिकच मग त्यांचा असुर म्हणजे सूर्याचे पूजक असणाऱ्या लोकांशी संघर्ष झाला . हे पुरोहित लोक प्रामुख्याने मेंढपाळ होते साहजिकच त्यांच्यासाठी पाऊस फार महत्त्वाचा होता . त्यांना शेती करणे म्हणजे पृथ्वीला दुखावणे असे वाटत होते . हे लोक भारतात आपले देव घेऊन आले परंतु त्यांच्या दुर्दैवाने इथे शैव धर्म होता . त्यामुळे साहजिकच त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये समायोजन सुरू केले आणि शैव अनार्य लोकांच्या काही गोष्टी स्वीकारल्या . मात्र तरीसुद्धा आऊटसाईडर असण्याचे फिलिंग गेले नाही या लोकांना स्वतःची आयडेंटिटी प्रिय होती ते आपल्या मांत्रिकीला आणि मंत्रांना फार पवित्र मानत होते साहजिकच आम्हाला सर्वश्रेष्ठ माना असा आग्रह त्यांनी धरायला सुरुवात केली. त्यांची ही ओळख शैव लोकांना कशी काय पटणार ? हे बाहेरून आलेले लोक आपल्या इराणी श्रद्धेमध्ये आणि समाजामध्ये सर्वश्रेष्ठ होते पण हे सर्वश्रेष्ठत्व भारतातल्या लोकांनी का मान्य करावे ? या सगळ्यांमध्ये मग पुरोहित मांत्रिक लोकांच्या पुढे एकच पर्याय उरला तो म्हणजे स्वतःची ओळख स्वायत्त ठेवणे आणि तिचा प्रचार आणि प्रसार करणे त्यासाठीच त्यांनी मग प्रथम वैदिक धर्म स्थापन केला हा धर्म लवचिक होता पण त्याची ही लवचिकता नवीन आलेल्या मांत्रिकांना सोयीची नव्हती कारण या वैदिक धर्मामध्ये मंत्र निर्माण करणारे ऋषी मानले जात होते . साहजिकच जे नवीन लोक स्थलांतरित झाले त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये हे सर्व मंत्र शिकायला सुरुवात केली आणि वैदिक धर्म स्वतःची आयडेंटिटी बनवला . प्रॉब्लेम तेव्हा सुरू झाला जेव्हा हे लोक इथल्या आदिवासी लोकांच्या जमिनी यज्ञ करून ताब्यात घ्यायला लागले . जे समायोजन करायला लागले होते ते लोक आता संघर्ष करायला लागले. पुढे पुढे सांख्य आणि ब्रह्म धर्माचा प्रभाव वाढत गेला तशी मांत्रिकी अधिकाधिक धोक्यात आली वेदांच्या पेक्षा उपनिषदांना अधिक महत्त्व प्राप्त होऊ लागले . यामुळे ब्राह्मण मांत्रिक वर्गाचे अस्तित्वच धोक्यात आले ते पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी म्हणून मग या लोकांनी नवा धर्म स्थापन केला तो म्हणजे ब्राह्मण धर्म होय. आम्ही तुमच्या सांख्य किंवा ब्रह्म धर्मात येणार नाही पण तुमच्या धर्मातला मोक्ष आम्ही घेतो आणि आमचा धर्म अधिक व्यापक करतो या धर्मात तुम्ही या असा काहीतरी विचित्र आग्रह यामध्ये होता . पुरोहित वर्गाचे हे स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणे फक्त भारतातच होते असे नाही जगात ते सर्वत्र दिसते . भारतात सुद्धा शैव लोकांच्या मध्ये सुद्धा जे भगत उपस्थित होते ते मांत्रिकीच करत होते आणि तेही स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतच होते. त्यांचे हे सर्वश्रेष्ठत्व भगवान शंकर यांनी मोडीत काढले होते आणि मोक्षाची स्थापना केली होती .याही लोकांचा आपला स्वतःचा सर्वश्रेष्ठ असल्याचा दावा होता आणि त्यांच्या मांत्रिकीला जागा सापडत नव्हती. या दोन्ही मांत्रिकी एकत्र आल्या आणि त्यातूनच मग आत्ताचा ब्राह्मण वर्ण जन्माला आला. ऐतरेय ब्राह्मण हे इराणी पुरोहित मांत्रिकाने लिहिलेले नाही तर ते चक्क भगत आणि इराणी यांच्या अंतर्विवाहातून निर्माण झालेल्या ऐतरेय याने लिहिले आहे जो पुरुष सत्ताक व्यवस्थेमुळे वैदिक म्हणून ओळखला जात होता. आर्य आणि अनार्य अशा दोन्ही संस्कृतीमध्ये असलेल्या मांत्रिकी लोकांनी निर्माण केलेला वर्ण जो त्यांनी आपली ओळख शाबूत ठेवण्यासाठी स्थापन केला तो म्हणजे ब्राह्मण वर्ण होय . ओळखीचे हे राजकारण निरंतरपणे ब्राह्मण वर्ण चालवत आहे आणि आजही आपणाला मंत्र येतात याचा प्रचंड अहंकार काही लोकांना आहे हे लोक स्वतःला सर्वश्रेष्ठ मानतात कारण त्यांना असे वाटते की आम्हाला संस्कृत येते आम्हाला मंत्र येतात. मात्र आपण परमापुरुषाच्या मुखापासून जन्मलो याबरोबरच आता ते आणखी एक भर टाकतात ती म्हणजे गोत्र ! ही संकल्पना मुळची शैव आदिवासी लोकांच्यात होती व आजही काही आदिवासी जमातींच्यात आहे . गणगोत म्हणजे एका गोताचे लोक . या गौतपासूनच गोत्र तयार झाले आहे गौतम या शब्दाचा मूळ अर्थ ज्याच्यापासून गोत म्हणजे गोत्र म्हणजे मूळ सुरू होते असा पुरुष होय तर गौतमी म्हणजे जिच्यापासून गोत्र सुरू होते ती स्त्री होय . गौतम बुद्धाला गौतम म्हटले जाते याचे कारण बुद्धांचे गोत्र त्याच्यापासून सुरू होते . आदिवासी लोकांच्यातली ही संकल्पना या मांत्रिक लोकांनी स्वीकारली आणि ज्या ज्या ऋषींनी मंत्र रचले त्या ऋषींना आपले मूळ पुरुष म्हणजे गोत्र पुरुष बनवून आपण अधिक पवित्र असल्याचा दावा करायला सुरुवात केली. आयडेंटिटी पवित्र करण्याचाच हा एक धार्मिक मार्ग होता. थोडक्यात म्हणजे स्वतःची पवित्र आयडेंटिटी हे एक फार मोठे कारण ब्राह्मणवादामागे आहे . यालाच मी ब्राह्मणवादाचा आयडेंटिटी कॉम्प्लेक्स म्हणतो 

३ तिसरी गोष्ट इन्फिरियर कॉम्प्लेक्स भारतात जेव्हा युरेशियन लोक आले तेव्हा ते अत्यंत मागासलेले पशुपालक होते अपवाद फक्त त्यांच्याकडे असणारे घोडे होते. साहजिकच इथल्या स्थानिक शैव लोकांच्या ज्ञानामुळे त्यांना न्यूनगंड आला आणि त्यावर मात करण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे स्वतःला सुपेरियर समजणे . साहजिकच मग आपल्यातल्या न्यूनगंडावर मात करण्यासाठी या लोकांनी सुपिरिअर कॉम्प्लेक्स निर्मिती केली आणि स्वतःला कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न केला. आज सुद्धा अनेकदा अधून मधून कॉन्फिडन्स हालत असतो पण आपला कॉन्फिडन्स हलतोय हे काही ब्राह्मण लोक कळू देत नाहीत. त्यामुळेच त्यांच्या सुपेरीयर कॉम्प्लेक्स मागे सुद्धा अनेकदा इन्फिरियर कॉम्प्लेक्स असतो .

४ मायनॉरिटी कॉम्प्लेक्स : पशुपालक म्हणून ज्या समुदायातून ते आले त्या समुदायात हे पुरोहित लोक संख्येने सर्वात कमी होते आणि साहजिकच अल्पसंख्यांक असल्याने बहुसंख्यांक असणाऱ्या विश् समुदायाचे त्यांच्यावर प्रचंड प्रेशर होते. स्वतःला डिवाइन म्हणजेच दैवी सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती कारण ते स्वतःला मांत्रिक समजत होते आणि आमच्या मंत्रांच्यामुळेच तुमच्यामध्ये बदल घडतात सृष्टीत बदल घडतात हे दाखवणे आवश्यक होते मात्र कोणत्याही क्षणी यातील कोणीही आपणाला आव्हान देऊ शकतो याची त्यांना कल्पना होती. त्याचबरोबर आपण अल्पसंख्यांक आहोत हेही त्यांना माहिती होते त्यामुळेच ब्राह्मण धर्म हे एका अर्थाने ब्राह्मण लोकांच्या मायनॉरिटी मधून निर्माण झालेले धार्मिक प्रकरण आहे आणि यातूनच ब्राह्मणवाद जन्मलेला आहे. क्षत्रियांचे प्रोटेक्शन हवे म्हणून हे लोक सतत क्षत्रियांना मनुस्मृतीच्या साह्याने प्रचंड सवलती देतात फार मोठा उच्च सन्मान देतात आणि आपल्या हाताखाली त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात. एका मायनॉरिटीने फार मोठ्या मेजॉरिटीवर मात करण्याचा शोधलेला उपाय म्हणजे ब्राम्हणवाद होय.

५ आऊटसाईडर कॉम्प्लेक्स भारतात बाहेरून आलेल्या अनेकांना हे पूर्णपणे माहिती आहे की आपण बाहेरून आलेलो आहोत साहजिकच त्यांच्यामध्ये एक आऊटसाईडर कॉम्प्लेक्स असतो अशावेळी आपल्याला समाजाच्या बाहेर ठेवले जाऊ शकते असे वाटते आणि आपण अत्यंत खालच्या तळावर जाऊ याचीही भीती असते म्हणूनच मग आपण थोर आहोत हे पटवणे स्वतःच्या अस्तित्वासाठी आवश्यक असते त्याचबरोबर आपण इन्सायडर आहोत हेही सतत सांगणे पटवणे गरजेचे असते . हा सगळा कॉम्प्लेक्स आऊटसाइडर कॉम्प्लेक्स मधून येतो 

तेव्हा ब्राह्मणवाद आणि ब्राह्मण्य समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला हे पाचच्या पाच कॉम्प्लेक्स समजून घ्यावे लागतात. ते फक्त ब्राह्मणांना लागू होत नाहीत अनेकदा ते मुस्लिम लोकांना सुद्धा लागू असल्याचे तुमच्या सहज लक्षात येईल. पारशी लोकांच्यात तर हा कॉम्प्लेक्स प्रचंड आहे मात्र ते स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत नाहीत पण आयडेंटिटी वेगळी ठेवण्याचा प्रयत्न डेफिनेटली करत असतात . ख्रिश्चन लोक तर स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतात आणि ब्राह्मणांच्यात आणि ख्रिश्चन लोकांच्यात कॉम्प्लेक्स बाबतीत फार फरक नाही त्यांच्यातही हे पाच कॉम्प्लेक्स आहेत 

त्यातूनच मग स्वतःला वेगळे काढणे आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत कॉन्फिडन्स देत राहणे असा उद्योग सतत चाललेला असतो . आपली मेजॉरिटी बनली पाहिजे आणि आपली ओळख ही शाबूत राहिली पाहिजे अशा प्रकारचा एक विरोधाभास त्यातून तयार होतो आणि आश्चर्यकारक रित्या तोच त्यावरचा उपाय आहे हेही या मायनॉरिटीत असलेल्या लोकांना पटलेले असते म्हणूनच हे लोक धर्मांतर घडवण्याबाबतीत सर्वाधिक उत्सुक असतात अपवाद कदाचित पारशी धर्मच असावा .

ब्राह्मणवादा बाबतीत साधारणपणे तीन विरोध स्पष्ट आणि स्वच्छपणाने येतात 

पहिला विरोध सरळ सरळ शैव लोकांचा शैव संस्कृतीचा आहे याचे दृश्य स्वरूप आपणाला नचिकेत , बळी, बसवेश्वर आणि महात्मा फुले यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसते . ब्राह्मणवादविरोध करण्यामध्ये जेवढे हे लोक आघाडीवर आहेत तेवढे कदाचित कोणीच नाही. यामध्ये प्रामुख्याने स्वतःला शैव समजणारे पंडित , वीर , वाणीपणी , ओबीसी दलित आणि आदिवासी लोक येतात .

दुसरा विरोध क्षत्रिय वादातून येतो यामध्ये प्रामुख्याने गौतम बुद्धाला क्षत्रिय मानून बुद्धानंतर ब्राह्मण धर्माचा कट्टर प्रतिवाद केला गेला . किंबहुना भारतामधला संघर्ष हा ब्राह्मण धर्म विरुद्ध बौद्ध धर्म आहे असे सुद्धा सांगितले गेले . साहजिकच मग क्षत्रिय वाद दोन पद्धतीने फंक्शन करताना अलीकडे दिसतो आहे पहिले फंक्शन जन्मदत्त क्षत्रिय वाद आहे हे लोक स्वतःला जन्मदत्त क्षत्रिय समजतात आणि यांच्यातले अनेक विचारवंत हे जन्माने क्षत्रिय असल्यामुळे ब्राह्मणांना विरोध करतात आणि त्या मागचा हेतू ब्राह्मणांच्या सत्तेला विरोध करणे हा असतो . अलीकडच्या काळामध्ये मेधा कुलकर्णी यांना झालेला विरोध हा यातून झालेला आहे का असा प्रश्न नक्की पडतो. 

कर्मदत्त क्षत्रिय वाद हा क्षत्रिय वादाचा दुसरा अवतार आहे यामध्ये आम्ही पूर्वी क्षत्रिय होतो परंतु नंतर आम्ही अतिशूद्र झालो शूद्र झालो किंवा वैश्य झालो आणि अलीकडे गेल्या 10 वर्षापासून आदिवासी लोकांच्यात काही आदिवासी जे स्वतःला उच्च वगैरे समजतात आदिवासी राहिलो अशी भूमिका घेतली जाते . ही भूमिका अत्यंत विस्ताराने प्रामुख्याने बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली आहे आणि नंतर तिचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार झालेला आहे. स्वतःच्या जातीचे वर्णउन्नयन करणे हा या मागचा हेतू असतो. प्रत्यक्षात हे घडत नाही कारण जे जन्मदत्त क्षत्रिय वाद मानत असतात ते स्वतःला क्षत्रिय समजणाऱ्या लोकांना आणि त्यांच्या कर्मदत्त क्षत्रिय वादाला कधीच स्वीकारत नाहीत किंवा आम्ही क्षत्रिय होतो ही आर्ग्युमेंट ही स्वीकारत नाही. अनेकदा तर खाजगी मध्ये नकली क्षत्रिय असे सुद्धा म्हणतात . त्यामुळे स्वतःला अस्सल क्षत्रिय समजणारे क्षत्रिय या लोकांना फक्त ब्राह्मणांना विरोध करण्यासाठी वापरतात . कधीकधी या कर्मदत्त क्षत्रियवादी लोकांना आधारही देत राहतात पण बेटी पेटीचा व्यवहार आला की बरोबर बाजूला काढतात तिथे मग यांचे जन्मदत्त श्रेष्ठ समजण्याचे सगळे आकार प्रकटायला लागतात . अर्थातच याला काही अपवाद आहेत काही क्षत्रिय स्वतःला कर्मदत्त क्षत्रिय समजतात असे लोक मात्र आता आंतरजातीय आणि आंतरवर्णीय विवाहाला तयार असलेले दिसतात पण हे अपवाद लोक आहेत .

तिसरा विरोध प्रामुख्याने वैश्यवादातून होतो यामध्ये प्रामुख्याने जैन धर्माने केलेला विरोध येतो आणि जैन धर्मातले लोक अनेकदा व्यापारी असतात मुळातच हा धर्म वैश्य विश वाणी लोकांनी स्थापन केला आणि याच लोकांनी वाढवला ज्यांना ब्राह्मणांचे जन्मदत्त वर्चस्व मान्य नव्हते . हे स्वतःला ब्राह्मणांच्या पेक्षा श्रेष्ठ मानतात . अलीकडे तर हे सर्व स्वतःला क्षत्रिय समजायला लागलेले आहेत . पण प्रत्यक्षात व्यापारच करतात याचे कारण मुळातच हे वैश्य लोकांच्याकडून निर्माण झालेले आणि वैश्य लोकांनीच वाढवलेले असे धार्मिक आणि मूळ शैव असलेलेच अवतरण आहे जे महावीर यांच्यामुळे स्वतंत्र झाले. जो शस्त्र चालवत नाही तो क्षत्रिय कसा असा साधा प्रश्न सुद्धा हे लोक स्वतःला विचारत नाहीत . वस्तुस्थिती अशी आहे की वाणी आणि पणी लोकांनी निर्माण केलेला हा धर्म आहे आणि तोच हा धर्म चालवत आहेत . यांनी जर का स्वतःला क्षत्रिय समजण्याची चूक केली नसती तर वैश्य आणि शूद्र यांच्यामध्ये हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रसरण पावला असता पण दुर्दैवाने असे घडले नाही आणि त्यातूनच या धर्मावर अल्पसंख्यांक होण्याची पाळी आली. मात्र ब्राह्मण वादा विरोधात याने सुरुवातीला फार ठाम भूमिका घेतली होती. ही भूमिका इतकी तीव्र होती की एका जैन राजाने सर्व ब्राह्मण कापून टाकले असाही सिद्धांत या लोकांनी प्रचलित केला होता . आता मात्र ब्राह्मण लोकांशी तडजोड करण्याच्या मनस्थितीत हे लोक आलेले आहेत . यांच्यामुळेच ब्राह्मण आणि बौद्ध लोकांनी शाकाहार स्वीकारला .

याशिवाय ब्राह्मणवादाचा प्रतिकार हा ख्रिश्चन आणि मुस्लिम लोक सुद्धा करत असतात . यातील काही लोक तर आम्ही धर्मांतर केले कारण ब्राह्मणवाद आणि त्याने निर्माण केलेली वर्ण जात व्यवस्था होय असेही सांगतात .

खरे तर जगातली जी सर्वात मोठी बौद्धिक आश्चर्य आहेत त्यामधले एक महा विशाल बौद्धिक आश्चर्य म्हणून ब्राह्मणवादाचा उल्लेख करावा लागतो . अनावश्यक काल्पनिक श्रेष्ठत्वाचा हा नमुना भारतामध्ये तयार व्हावा हे भारतीयांचे दुर्दैव होय . या दुर्दैवाने अनेक दुर्दैवाचे दशावतार आणले स्पॉन्सर केले आणि आत्ताही हे थकलेले नाही . ब्राह्मणी हिंदुत्वाच्या रूपाने ते पुन्हा पुन्हा आज सुद्धा बहुजन समाजाच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न चालूच आहे. 

यावर एक उपाय म्हणून मी ब्राह्मणांनी स्वतःला पंडित म्हणवून घ्यावे असे सांगितले होते म्हणजे त्यांच्या कर्मदत्त भूमिकेची थोडीफार गॅरंटी बहुजन लोकांना वाटेल असे मी प्रतिपादन करत असतो पण मला अजून तरी या संदर्भात फार प्रतिसाद मिळत नाही. जोपर्यंत ब्राह्मण ब्राह्मण वर्ण टाकत नाहीत आणि फक्त पंडित होत नाहीत तोपर्यंत भारतातली वर्णव्यवस्था नष्ट होणे शक्य नाही कारण जोपर्यंत ब्राह्मण आहे तोपर्यंत तो वर्णव्यवस्था वर्णव्यवस्था असे ओरडत राहणार आहे . मला कधी कधी वाटते खरोखरच एखाद्या काळात फक्त ब्राह्मणांच्यापुरती संपूर्ण वर्ण व्यवस्था स्वीकारली जावी आणि त्यांना फक्त ब्राह्मण वर्णाचे काम द्यावे म्हणजे मंदिरांची आणि पौराहीत्य कामाची बिनडोक हमाली करायला लावावी. बाकी इतर सर्व वर्णांच्या कामामध्ये त्यांना अजिबात वाव देऊ नये म्हणजे शेती करू देऊ नये अभिनय करू देऊ नये नाचायला देऊ नये कॅम्पुटर वगैरे सर्व क्षेत्रातून हकालपट्टी करावी कारण ह्या सेवा आहेत आणि सेवा फक्त शुद्राने कराव्यात असे वर्ण व्यवस्थेत सांगितले गेले आहे त्यांच्याकडून सर्व प्रकारचे व्यापार आणि व्यापारी कामे काढून घ्यावीत शूद्र लोकांची सर्व प्रकारची सर्व वस्तूंची उत्पादन व्यवस्था त्यांच्याकडून काढून घ्यावी बघूया कसे जगतात ते? वर्णव्यवस्थेत आपल्यासाठी काय लिहिले आहे याची अनेक ब्राह्मणांना कल्पना येत नाही म्हणूनच हा कर्मठ ब्राह्मणी माज आहे .अर्थात सध्या ही कल्पना असली तरी भविष्यात असे होणार नाही याची कसलीही गॅरंटी नाही कारण बहुजन समाजातून जर का एखादे तितकेच कडवे नेतृत्व आले तर हेही घडू शकते .ब्राह्मण या शक्यतेला कसे तोंड देणार आहेत ते त्यांनाच माहीत! वर्ण व्यवस्थेने सर्वाधिक नुकसान हे ब्राह्मण वर्णाचे झालेले आहे हेच ब्राह्मण वर्णाला कळत नाही. याला स्वतःच्या पायावर स्वतःचे डोके आपटून घेणे म्हणतात . मी नेहमीच त्यामुळे ब्राह्मण हा फार डोके चालवणारा नसतो असे म्हणत असतो. त्याला दूरदर्शी फायदे दिसत नसतात त्याला फक्त जवळचे छोटे छोटे फायदे दिसत असतात. आणि यामध्येच त्याने वर्ण व्यवस्था शाबूत ठेवून स्वतःचे सर्वाधिक नुकसान करून घेतलेले आहे त्याला कोणीतरी ही जाणीव सतत करून दिली पाहिजे . स्वतःची उंची वाढवण्याच्या नादात एखादा मनुष्य एखादा समुदाय इतरांना बुटके बनवतो त्या बुटक्यांचा नेता बनतो आणि बुटक्यांचा नेता हा चार फुटापेक्षा अधिक उंचीचा नसतो हेच ब्राह्मण लोकांच्या लक्षात येत नाही. कदाचित 21व्या शतकात तो शहाणा होईल .

श्रीधर तिळवे नाईक

छत्रपती शाहू महाराज आणि दूरदृष्टी श्रीधर तिळवे नाईक 

छत्रपती शाहू महाराजांच्यावर मी अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने लिहिलेले आहे माझ्या अनेक कवितांचे ते विषय आहेत कोल्हापुरात जन्मलेल्या कुठल्याही माणसाला महाराजांच्या विषयी ममत्व वाटतेच शाहू महाराज माझे वैचारिक आजोबा आहेत म्हणा ना ! आणि आजोबा जितका स्ट्रॉंग तितका नातू स्ट्रॉंग निघतो जर माझ्यात काही बळ असेल तर त्याचे श्रेय शाहू महाराजांनाही जाते शाहू महाराजांनी काय केले ? 


युरोपमधला पुरोगामी प्रोजेक्ट हा जर कुठल्या शहरात सर्व अंगाने साकार झाला असेल तर तो कोल्हापूर शहरामध्ये झाला आणि ह्याचे संपूर्ण श्रेय शाहू महाराजांना जाते पुरोगामी वादाच्या केंद्रस्थानी ज्ञान ही संस्था होती आणि विज्ञान ही नवीन ज्ञानपद्धत होती महाराजांनी हे अचूक ओळखले ज्ञान हे भविष्य आहे हे कळलेले जे मोजके लोक होते त्यात शाहू महाराजांचा समावेश होतो साहजिकच शाहू महाराजांनी सर्व जातीजमातींच्यासाठी शिक्षणाची सोय केली प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले आणि मुख्य म्हणजे सर्वांच्यासाठीच हॉस्टेल्स निर्माण केली यामुळे किती गरीब लोक शिकले याची गिनती नाही मी ज्या न्यू कॉलेजमध्ये शिकलो ते कॉलेज शाहू महाराजांच्या विचारावरच उभे होते 


युरोपमध्ये धर्म या संस्थेमध्ये राजे महाराजे यांनी अनेक हस्तक्षेप केले विशेषता इंग्लंड मध्ये तिथल्या राजाने प्रोटेस्टंट हा धर्म स्वीकारला आणि वाढवलाही तसाच हस्तक्षेप शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात केला आर्य समाजाच्या तत्त्वानुसार त्यांनी ब्राह्मणेतर शंकराचार्य दिले यातील एक शंकराचार्य तर थेट बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्यात पुढे सामील झाले हे फक्त शाहू महाराजांच्यामुळे शक्य होते


शाहू महाराजांनी या ज्ञानव्यवस्थेबरोबरच एक राजकीय व्यवस्था निर्माण करावी लागणार हे अचूक ओळखले ते आरक्षणाचे पायोनियर होते हे तर सर्वांनाच माहिती आहे मुख्य म्हणजे प्रशासनात आणि शासनात ब्राह्मणांचे असलेले वर्चस्व त्यांनी मोडून काढले आणि ब्राह्मणतरांनाही जागा देत एक नवी राजकीय व्यवस्था निर्माण केली त्यामुळेच इंग्लंडच्या राजाने जे जे केले ते ते त्यांनी संस्थानात आणले त्यांच्यावर दोन प्रभाव होते. पहिला प्रभाव हा आर्य समाजाचा तर दुसरा प्रभाव हा सत्यशोधक समाजाचा होता त्यांनी या दोन्ही चेहऱ्यांची योग्य ती सांगड घातली यातूनच ब्राह्मणेतर चळवळीचा दुसरा चेहरा तयार झाला हा चेहरा मध्यममार्गी होता फुल्यांनी जसा वर्ण व्यवस्थेला निकराचा विरोध केला तसा विरोध महाराजांनी केला नाही मात्र सर्व जातीत समता येईल याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली राज्य संस्थेत असलेल्या माणसाने वर्ण आणि जाती व्यवस्था कशी हँडल करावी याचा एक आदर्श त्यांनी निर्माण केला. जो पुढे आपणाला यशवंतराव चव्हाण यांच्यात दिसतो आपण ज्या युगात जन्मलोय त्या युगात एकदम क्रांतीवादी होणे परवडणार नाही याची त्यांना कल्पना होती. कारण राज्य इंग्रजांचे होते इंग्रजांना डावलून काहीही करता येणे त्या काळात शक्य नसल्याने शाहू महाराजांचेही राज्य हे राज्यांतर्गत राज्य होते आणि तरीही त्यांनी ते ज्या पद्धतीने चालवले ती पद्धत आज सुद्धा अचंबित करते कोल्हापूर हे स्वतःमध्येच स्वतंत्र साम्राज्य असल्यासारखे वावरत असते आम्ही कोल्हापूरकर अत्यंत स्वायत्त आणि स्वतंत्र असतो आणि जगातल्या सर्व गोष्टींना आम्ही फाट्यावर मारू शकतो हा जो आमच्यात आत्मविश्वास आलेला आहे तो शाहू महाराजांनी दिलेला आत्मविश्वास आहे एका विशिष्ट पद्धतीने सर्व समाज आणि समाजाचे घटक त्यांनी पुढे नेले ब्राह्मणांच्या सर्व ब्राह्मणी खटाटोपांना त्यांनी निकराचा विरोध केला आणि कोल्हापूर संस्थान हे पूर्णपणे समतावादी बनवले मी कोल्हापुरात जन्मलो हे मी माझे भाग्य समजतो कारण शाहू महाराज हे या नगरीचे राजा होते त्यांनी पार्श्वभूमी तयार केली नसती तर आम्ही किती पुढे आलो असतो हा एक प्रश्न आहे मी ज्या गावातून आलेलो आहे त्या नागेशी बांदिवड्याचे कोल्हापूरच्या या संस्थानाशी खास नातं आहे आमच्या गावातून आलेल्या प्रत्येक माणसाला कोल्हापुरने आधार दिला होता ह्यात माझ्या वडिलांच्यापासून ते विश्वनाथ नागेशकरांच्या पर्यंत अनेक लोक येतात


शाहू महाराजांनी आपला पुरोगामी प्रोजेक्ट यशस्वीरित्या राबवल्यानंतर वास्तविक त्यानंतर आधुनिक प्रोजेक्टची सुरुवात व्हायला हवी होती पण दुर्दैवाने महाराजांच्या इतकं कर्तुत्ववान व्यक्तिमत्व कोल्हापुरात झालंच नाही आणि याचा कोल्हापूरला प्रचंड फटका पडला वास्तविक शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूर हे मुंबई इतकंच ऍडव्हान्स होतं पण याचा विसर खुद्द कोल्हापूरकरांनाच पडला वास्तविक चित्रपटासाठी आवश्यक असलेली पार्श्वभूमी ही शाहू महाराजांच्या काळातच कोल्हापुरात तयार झाली होती असे असून सुद्धा आधुनिक चित्रपटसृष्टी कोल्हापुरातून निर्माण झाली नाही एकही सत्यजित रे कोल्हापुरातून जन्मला नाही हे केवळ आश्चर्याचे नाही तर धक्कादायक आहे एखादा महापुरुष जन्मतो तेव्हा तो नवीन युगामध्ये तुम्ही कसे जायचे याचेही योग्य असे मार्गदर्शन करून जातो शाहू महाराजांनी असे मार्गदर्शन केलेले होते दुर्दैवाने या पुढचे जे विजन होते ते साकार झाले नाही पुढे उत्तरआधुनिक कालखंडाला लागणारा परंपरा आणि आधुनिकता यांचा मिलाफ कोल्हापुरात होता साहजिकच कोल्हापुरातून देशीवाद फडफडला तरी राजन गवससारखे काही मोजके अपवाद वगळता ज्याला अस्सल देशीवादी लेखक म्हणावे असे फार कमी लेखक निपजले कोल्हापुरात माझ्या चौथ्या नवतेला झालेला विरोध मी गृहीतच धरला होता कारण जिथे आधुनिकता आणि उत्तर आधुनिकता फारशी झेपत नव्हती तिथे चौथी नवता झेपेल अशी अपेक्षाच नव्हती मी कोल्हापूर सोडण्याचे एक मोठे कारण कोल्हापुरात असलेला चौथ्या नवतेचा अभाव हे होते ज्यांना खरोखर शाहू महाराजांचा वारसा पुढे न्यायचा आहे त्यांना महाराजांच्याकडून एक शिकायची गोष्ट आहे ती म्हणजे दूरदृष्टी ! जग नेमके कोणत्या दिशेने चाललेले आहे त्या दिशेने जाणे आणि कधीकधी जगाच्या पुढे जाणे हे शाहू महाराजांच्या दृष्टीचे मर्म आहे तेच जर का आपण आत्मसात करणार नसू तर शाहू महाराजांचे वारसदार म्हणवून घेण्याचा आपणाला काडीचाही अधिकार नाही शाहू जयंतीनिमित्त माझा महाराजांना त्रिवार मुजरा


श्रीधर तिळवे नाईक

ओरिएंटॅलिझम व वेदोक्त प्रकरण श्रीधर तिळवे नाईक


प्रथम आमचे जिवलग मित्र बाळकृष्ण शिर्के ह्यांच्या प्रश्नाचे उत्तर 


Balkrishna Shirke


प्रश्न है आहे कि, पूर्ण सत्य काय ?

व प्रमाण सत्य कोणती

च्या प्रश्नाचे उत्तर 


पूर्ण सत्य हे आहे कि ब्राम्हण आणि क्षत्रिय हे आणि इतर सर्व वर्ण काल्पनिक आहेत वेदोक्त आणि पुराणोक्त दोन्ही मंत्र काल्पनिक त्यामुळे हा जो वाद त्याकाळी होता त्याचे आधार काल्पनिक होते पण वाद व भांडण खरे होते बाकी प्रश्न प्रमाणाचा तर टिळक ब्राम्हणांच्या समर्थनार्थ मुद्दे मांडतायत आणि मी ते त्यांचेच तर्कशास्त्र वापरून खोडतोय इथे दोघेही वैदिक धर्मात अधिकार काय त्याविषयी भांडतायत टिळकांना भीती अशी आहे कि एकदा का हा अधिकार शाहू महाराजांना दिला तर मग तो क्षत्रियाचा दावा करणाऱ्या प्रत्येकाला द्यावा लागेल 

आणि त्याला त्यांची तयारी नाहीये ह्याचाच अर्थ टिळक ब्राम्हण व शूद्र असे दोनच वर्ण मानतायत जे समजून घेणे अवघड जाते पुराणोक्त मंत्र हे फक्त शुद्रांसाठी असतात हे इथे लक्ष्यात घेणे आवश्यक आहे आज अवस्था अशी आहे कि क्षत्रिय व वैश्य शाहू महाराजांची लढाई विसरून गेले आहेत आणि दोघांच्याही लग्नात ब्राम्हण पुराणोक्त मंत्रच म्हणत आहेत म्हणजेच ब्राम्हणांच्या दृष्टीने हे दोघे शुद्रच मग ते स्वतःला काहीही समजोत 


टिळकांचा वेदोक्त प्रकरणातला जो स्टान्स आहे त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात ज्याची टिळकांना जाणीव नाही 

सर्वात पहिला प्रश्न असा निर्माण होतो कि खरोखरच ब्राम्हणांचा आर्य क्षत्रिय व आर्य वैश्य नाहीसे झालेत ह्यावर विश्वास आहे का ? ह्या प्रश्नांची चर्चा मी स्वतः काशीतल्या अनेक वैदिक ब्राम्हणांशी केली आहे आणि त्यांचं उत्तर हो असे आहे त्यामुळे टिळकांनी हा जो स्टान्स घेतलाय तो शास्त्रानुसार घेतलाय हे आपण लक्षात घ्यायला हवं 

शेवटी ह्या काळात टिळकांचा शास्त्रांचा जेवढा अभ्यास होता तेवढा क्वचितच कुणाचा असेल टिळक जे म्हणतायत त्यात शास्त्र काय सांगते ते मी सांगतो आहे असा स्टान्स आहे पुढे टिळक ह्याउपर कुणाला नव्या जमान्यात काही व्यक्तिस्वातंत्र्याच्या आधारे इंग्रजी कायद्यात बसेल असं काही करायचं असेल तर ते करायला मुखत्यार आहेत असे टिळक सांगतात जर एखादा ब्राम्हण तुमच्यासाठी वेदोक्त मंत्र म्हणत नसेल तर तुम्ही त्याला पौराहित्य देऊ नका किंवा पौराहित्य दिले असेल तर ते काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे असे ते सांगतात मात्र त्या ब्राम्हणाला जो जमीन जुमला दिलाय तो काढून घेऊ नका असे ते म्हणतात हे शाहू महाराजांना उद्देशून आहे हे तर उघडच आहे ह्यावर माझे म्हणणे असे कि जर जमीन जुमला पौराहित्य काम करण्यासाठीच दिला असेल आणि तुम्ही ते करायला तयार नसाल तर राजाला जमीनजुमला काढून घेण्याचा अधिकार आहे शेवटी पैसे व जायदाद कामासाठी मिळते ती जायदाद काही त्या ब्राम्हणाने स्वतः कमावलेली न्हवती ती महाराजांनी दिली होती त्यामुळे इथेही टिळकांचा युक्तिवाद चुकलेला आहे 

टिळकांचा सर्वात स्ट्रेंज युक्तिवाद हा ओरिएण्टल विद्वान वेद शिकले त्या संदर्भात आहे टिळकांचे म्हणणे असे कि युरोपियन लोकांना ब्राम्हणांनी वेद शिकवलेत पण आम्ही त्यांच्यावर वेदोक्त संस्कार केलेले नाहीत त्यामुळे वेदोक्त संस्काराचा मुद्दा युरोपियन लोकांच्याबाबत लागू होत नाही म्हणजे ओरियंटल्स वेद शिकले ते मान्य पण केवळ वेद शिकल्याने आणि त्यांचे पाठांतर केल्याने कोणी ब्राम्हण होऊ शकत नाही म्हणजेच विद्येला काडीचेही महत्व नाही महत्व आहे ते वेदोक्त संस्कार व्हायला हे संस्कार झाले तर तो ब्राम्हण आणि वेदोक्त संस्कार करायचे कि नाही हे ठरवणार कोण तर ब्राम्हणच ! थोडक्यात सगळीकडून आमचीच लाल ! एखादी जात किती कट्टर होऊ शकते त्याचा हा अजिबोगरीब नमुना आहे आता ह्यानंतर ब्राम्हण ब्राम्हणेतर चळवळ पेटेल नाहीतर काय ?


ह्यापुढचा माझा प्रश्न असा कि जे वेद युरोपियन लोकांना शिकवले तर चालतात ते शूद्रांना शिकवण्यात प्रॉब्लेम काय आहे तिथे मग भेदाभेद कुठून येतो ? म्हणजे परका चालतो पण शूद्र चालत नाही आणि हा गृहस्थ स्वराज्याच्या गप्पा मारतोय स्वराज्य म्हणजे काय मग ब्राम्हणांची ब्राम्हणशाही आणि दादागिरी ? हे कोण खपवून घेईल ? आता ह्या पार्श्वभूमीवर ब्राम्हण ब्राम्हणेतर वाद पेटेल नाहीतर काय होईल कारण ब्राम्हणवादाच्या मते धर्मशास्त्रानुसार सारे क्षत्रिय वैश्य शुद्रच ! आता समजा सगळे वेदच कचऱ्यात टाकले तर !

आणि तुम्ही तुमची वैदिक पाठशाळा उबवत बसा असे सांगितले तर !


ब्राम्हणांना अनेकदा आपण समोरच्या माणसाला स्वतःच्या इकवल समजत नाही त्यामुळे समोरच्याला आपण अपमानित करत आहोत हेच कळत नाही ह्याची मग रियॅक्शन येणारच तुम्ही श्रेष्ठ मानले म्हणजे तुम्ही श्रेष्ठ होत नाही समोरच्यानेही मानले पाहिजे ना ? ब्राम्हणांची भट भटुरडे अशी जी कुत्सित अवहेलना सुरु झाली त्याला कारण ब्राम्हणांचा हा अहंगंड आहे 


आमचाच वर्ण श्रेष्ठ म्हणणारे ब्राम्हण आणि आमचाच धर्म व प्रेषित सर्वश्रेष्ठ म्हणणारे मुस्लिम ह्या दोघांच्या मानसिकतेत काह्ही फरक नाही आणि हे दोघे एकमेकांशी भांडतायत 

श्रीधर तिळवे नाईक

वेदोक्त प्रकरण का घडले ? श्रीधर तिळवे नाईक

वेदोक्त प्रकरण हे महाराष्ट्राच्या इतिहासात फार महत्वाचे आहे कारण महात्मा फुलेंची जी ब्राम्हण विरुद्ध ब्राम्हणेतर अशी मांडणी आहे त्याचा हे प्रकरण म्हणजे पुरावा झाले आणि पुढे कित्येक वर्षे ब्राम्हणेतर काँग्रेसपासून फटकून राहिले १८९४ -९५ च्या गणेशोत्सवात तांबोळ्यापासून चांभारापर्यंत सर्वच सामील झाले होते आणि टिळकांनी त्यासंदर्भातल्या भाषणात त्यांचं कौतुक केलं होतं ह्या गणेश उत्सवात चांभारांच्याबाबत अस्पृश्यता पाळली गेली न्हवती कारण टिळक अस्पृश्यतेला शास्त्रानुसार मान्यता नसल्याने मान्यता देत न्हवते आज हा विरोधाभास विचित्र वाटतो चांभार सुरवातीपासूनच काँग्रेसला पाठिंबा देत होते आणि त्याला कारण टिळक होते हे आपण लक्ष्यात घेतले पाहिजे पुढे गांधीजींनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींना बसवून अस्पृश्यतेला हिंदू धर्मशास्त्र पाठिंबा देते का ह्याची चिकित्सा करायला सांगून असा शास्त्राचा पाठिंबा नाही असं तर्कतीर्थांनी सांगितल्यावर अस्पृश्यता हिंदू धर्माचा भाग नाही असा स्टान्स घेतला होता टिळक स्वतःच हिंदू धर्मशास्त्र जाणत होते त्यामुळे १८९३ पासूनच त्यांनी अस्पृश्यता शास्त्रात बसत नाही असे सांगायला सुरवात केली होती आणि त्यामुळे चांभारांना गणेशउत्सवात खुला प्रवेश होता ह्याउलट वेदोक्त वादात शास्त्र ब्राम्हणेतरांच्याविरुद्ध असल्याने टिळक ब्राम्हणेतरांनी पुराणोक्त मंत्र म्हणावेत असा स्टान्स घेत होते वेदोक्त मंत्र म्हंटले काय किंवा पुराणोक्त मंत्र काय प्रत्यक्षात काय फरक पडतो असा त्यांचा प्रश्न होता आणि माझेही म्हणणे हेच कि जर फरक पडत नसेल तर वेदोक्त मंत्र म्हणायला हरकत काय आहे ?


एकदा का टिळकांचा स्टान्स स्वीकारला कि त्यातून अनेक विचित्र प्रश्न निर्माण होतात ह्या स्टान्सनुसार ब्राम्हणांखेरीज 

१ मूळ आर्य क्षत्रिय आर्य वैश्य नाहीसे होतात मग फक्त एकच वर्ण उरतो तो म्हणजे शूद्र म्हणजेच ज्या लोकांनी वैदिक धर्म वा हिंदू धर्म स्वीकारला आहे ते जर ब्राम्हण नसतील तर ते शूद्र असतील आणि होतात ह्याचा एक गमतीशीर परिणाम असा होतो कि जे मूळचे ब्राम्हण आहेत आणि जे क्षात्र वा वैश्य कर्म करतायत ते स्वतःचे कर्म वैश्य असले तरी स्वतःला ब्राम्हणच म्हणवून घेतात उदा माहेश्वरी किंवा शेणवी ब्राम्हण व्यापारी झाले तरी स्वतःचा वर्ण ब्राम्हणच सांगतात आणि कर्माचा संबंध तुटतो आणि वर्णव्यवस्था जन्माधिष्टितच राहते कर्माधिष्ठित राहण्याचे तिचे चान्सेस कमी होतात माहेश्वरी किंवा शेणवी ह्या दोघांनाही आपण वैश्य म्हणून स्वतःला डिक्लेअर केले तर आपले वैदिक संस्काराचे हक्क जातील असे भय आहे आणि त्यात तथ्य आहे कारण ज्यांनी असं डिक्लेअर केलंय त्यांचे वैदिक संस्काराचे हक्क गेलेले आहेत गोव्यात ज्यांनी वैदिक धर्म स्वीकारलाय ते सर्व शेणवी ब्राम्हण स्वतःला आता सारस्वत म्हणवून घेतायत तर जे आपल्या मूळ शैव धर्माला चिटकून आहेत ते स्वतःला शैव ब्राम्हण किंवा शेणवी ब्राम्हण किंवा शैव शेणवी ब्राम्हण म्हणवून घेतायत ह्यातल्या ज्यांनी ब्राम्हणत्व काढून टाकून वैश्य कर्म स्वीकारले त्यांचे वैदिक हक्क काढून घेऊन त्यांना वैश्य हा वर्ण देण्यात आलाय 

२ ह्यापुढचा प्रश्न शूद्रांचा आहे हे सर्व शूद्र अनार्य म्हणजे स्थानिक आहेत आणि त्यांच्यासाठीच चौथा वर्ण निर्माण करण्यात आलाय हा वर्ण शैव आहे आणि तरीही त्याने हिंदू धर्म स्वीकारल्याने तो शूद्र आहे आणि त्यांचा स्वीकार करण्याची ब्राम्हणांची तयारीच नाही ह्यातूनच मग एक तडजोड निर्माण झाली त्या तडजोडीचे नाव वैष्णव धर्म आणि पुढे हिंदू धर्म आणि आता हिंदुत्व 

म्हणजे काय तर 

१ मोक्षाचा अधिकार शुद्रांनाही द्यायचा अध्यात्मिक समता स्वीकारायची आणि वासुदेव पंथ स्वीकारायचा २ त्याचे वैष्णवीकरण घडवायचे स्वतःकडे वेदोक्त मंत्र व वेद ठेवून घ्यायचे पुराणे खुली करायची ३ वैष्णव आगम स्थापन करायचा तो खुला करायचा ४ आणि ह्यातील कर्तृत्ववान लोकांना क्षत्रिय व वैश्य कर्म करायची अनुमती द्यायची मात्र पौराहित्य कामाचा अधिकार आपल्याकडेच ठेवायचा 

शिवाजी महाराजांना जो राज्याभिषेक झालाय तो ह्या हिंदुत्ववादी धोरणांतर्गत झाला आहे सर्व वैष्णव संतांना ह्या धोरणांतर्गत मान्यता मिळाली आहे 

शिवाजी महाराजांच्याप्रमाणे समजा सयाजीराव गायकवाडांनी वा शाहू महाराजांनी राज्याभिषेक केला असता तर टिळकांनी त्याला मान्यता दिली असती का तर हो दिली असती पण विधी मंत्र पुराणोक्तच म्हंटले असते मोदी ओबीसी असले तरी राजे होऊ शकतात तेही ह्याच हिंदुत्ववादी धोरणामुळे ! 

थोडक्यात काय हिंदुत्व पौराहित्य सोडले तर इतर सर्व अधिकार कुणालाही द्यायला तयार आहे अलीकडे पौराहित्य खुले होते आहे कारण खुद्द ब्राम्हणांनाच पौराहित्यात इंटरेस्ट उरलेला नाही मात्र शंकराचार्यांची पोस्ट अजूनही ब्राह्मणांसाठी राखीव आहे 

थोडक्यात काय शास्त्रानुसार जी कर्मे ब्राम्हणांची न्हवतीच ती कुणालाही द्यायची हिंदुत्ववाद्यांची तयारी आहे कारण त्यांच्या मते ना आर्य क्षत्रिय उरलेत ना आर्य वैश्य 

ह्यातून एक प्रश्न उरतोच जे कर्तृत्ववान नाहीत त्यांचं काय तर त्यांनी शुद्रच राहावे टिळकांच्या मते शिवाजी महाराज कर्तृत्ववान होते म्हणून त्यांनी स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेतले तर ते योग्यच आहे पण इंग्रजांची गुलामगिरी करणारे कसले क्षत्रिय ?

थोडक्यात काय कर्तृत्वाचा मुद्दा ब्राम्हणांना लागू नाही पण ब्राम्हणेतरांना लागू आहे


ह्या सगळ्याचा अर्थ काय तर वेदोक्त प्रकरण घडले त्याचे मुख्य कारण हिंदू धर्मशास्त्र होते हे धर्मशास्त्र बदलण्याची वेदोक्त ही संधी होती टिळकांनी ही संधी साधली नाही उलट ते कालबाह्य झालेल्या हिंदू धर्मशास्त्राचा कवटाळून बसले आणि त्यामुळेच त्यांच्याप्रमाणे कट्टर असलेल्या ब्राम्हणांच्यामुळे वेदोक्त प्रकरण घडले


श्रीधर तिळवे नाईक 

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १०६

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे