SHAIV AGAMVAD
गेल्या दोन वर्षात भारतीय सांस्कृतिक इतिहासामध्ये जे काही महत्त्वाचे बदल घडले त्यातील एक म्हणजे शैव सर्व ठिकाणाहून हटवणे साहजिकच दत्तात्रयांच्या संदर्भातल्या सर्वशैव पोस्ट या हळूहळू गायब झालेल्या दिसतात विकिपीडिया मधला सुद्धा या यासंदर्भातला भाग आता गायब झालेला दिसतो हे करण्यामागचे उद्देश काय आहेत हे कळणे कठीण आहे पण एकंदरीत संपूर्ण संस्कृती ही युरेशियन झाली पाहिजे असा अट्टाहास आहे
वास्तविक दत्त संप्रदायाचे सर्वात प्राचीन मंदिर हे 400 वर्षापूर्वीचे आहे त्याच्या आधीचे एकही मंदिर महाराष्ट्रात उपलब्ध नाही महाराष्ट्र बाहेर आणि कर्नाटका बाहेर दत्त संप्रदायाविषयी फारसा गवगवा नाही त्यामुळे अनेक प्रकारचा गोंधळ निर्माण झालेला आहे आणि हा गोंधळ वाढतच चाललेला आहे याबाबतीतला शैव इतिहास गहाळ झालाय आणि नवनाथ संप्रदाय कसा आपल्या तालावर नाचेल याची व्यवस्थित काळजी हल्ली घेतली जात आहे
मुळात नवनाथ संप्रदायाचा अर्थच हल्ली चुकीचा घेतला जातो. नवनाथ याचा अर्थ नवे नाथ नऊ नाथ न्हवे जैन प्रभाव जसा जसा वाढत गेला तसा तसा नाथ संप्रदायाचा प्रसार ओसरत गेला आणि त्याचे पुन्हा एकदा पुनर्जीवन करण्यासाठी म्हणून जी व्यक्ती पुढे आली ती आसाम मधून आली तिचे नाव होते मच्छिंद्रनाथ! मच्छिंद्रनाथ हे ब्राह्मण नव्हते साहजिकच त्यांना कसे बाजूला काढता येईल हे ब्राह्मण इतिहासकार आणि कायमच पाहिलेले आहे साहजिकच जास्तीत जास्त काही गोरक्षनाथाच्या नावावर होईल या दृष्टीने काळजी घेतलेली आहे प्रत्यक्षामध्ये गोरक्षनाथ सुद्धा गोरखनाथ होते आणि ते पंडित घराण्यात जन्मले होते ब्राह्मण घराण्यात नाही मी मागेच बोललो आहे की शैव धम्मामध्ये ब्राह्मण नसतात पंडित असतात आणि हे पंडित वर्ण जात मानत नाहीत आणि त्यामुळेच नाथ संप्रदायात त्यांना ब्राह्मण म्हणून म्हणणारे लोक असून सुद्धा गोरखनाथ जात आणि वर्ण मानत नव्हते महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदायाचे प्रचंड प्रमाण पंडितांच्यात होते आणि बहुतेक सर्व पंडित नाथ संप्रदायाचेच होते यामध्ये निवृत्तीनाथ ज्ञानेनाथ आणि एकनाथ सुद्धा येतात पंधराव्या शतका नंतर महाराष्ट्रात पंडितांचा शॉर्टफॉर्म होऊन त्यांना फक्त पंत म्हणण्याची परंपरा सुरू झाली. अगदी मोरोपंत सुद्धा पंडित होते आणि ते बहुदा वर्ण आणि जाती व्यवस्था पाळत नसावेत शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये फक्त पंत होते त्यामुळेच ते जात आणि वर्ण मानत नव्हते म्हणूनच ते शिवाजींना क्षत्रिय आहात की नाही हा प्रश्न सुद्धा विचारत नव्हते किंवा शहाजी महाराजांना सुद्धा त्यांनी कधीही हा प्रश्न विचारलेला नाही हा प्रश्न नेहमीच विचारलेला आहे पंडितांनी नाही पंडित लोकांनी नेहमीच महाराजांना सहकार्य दिलेले आहे आणि महाराजांनी त्यांचा नेहमी आदर केलेला आहे साहजिकच दत्त संप्रदायामध्ये सुद्धा अनेकदा पंडितांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसतो कारण खुद्द दत्त हे नाथ संप्रदायातच आलेले होते आणि मी मागेच म्हटल्याप्रमाणे ते नवीन नाथ होते नाथ ह्या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान मार्गाने ज्याने मोक्ष मिळवलेला आहे तो सिद्ध पुरुष होय ! स्त्रियांना मात्र नाथिन म्हटलेले नाही असे वाटते
शैव धम्मानुसार हिरण्य वंशातील कपिल यांची बहीण अनुसया होती जी स्वतःच नंतर सिद्ध झाली तिचा विवाह दक्षिण भारतीय अत्री नावाच्या साधकाशी झाला हे अत्रि म्हणजे वैदिक ऋषी नव्हेत हे शंकराचे भक्त होते आणि साहजिकच त्यांची सर्व साधना शैव होती पुढे नवरा आणि बायको दोघेही सिद्ध झाले साहजिकच त्यांच्या पोटी जी मुले जन्माला आली ती अत्यंत प्रतिभावंत होती त्या काळामध्ये आर्य आणि अनार्य यांचे संबंध इतके ताणले गेलेले नव्हते साहजिकच मुलांची नावे चंद्रमा दत्तात्रय आणि सुवास अशी ठेवली गेली होती आणि हे तिघेही पुढे सिद्ध झाले आणि साहजिकच कपिल यांचे जे षष्ठीतंत्र होते ते या तिघांनीही आपल्या पद्धतीने पुढे नेले
यातील सुवास होते त्यांना नंतर दुर्वास म्हटले गेले खरे पण प्रत्यक्षात त्यांचे खरे नाव सुवासच होते त्यांचे नाव शंकराच्या परम शिष्य पैकी एक असलेल्या सुवास यांच्या नावाने ठेवले गेले होते आणि त्यांनी आपल्या नावाप्रमाणेच सुहास यांनी मांडलेल्या अवस्था तंत्राला पुन्हा एकदा पुनर्जीवित केले आणि त्याची मांडणी केली ज्याचा थेट प्रभाव नंतर आचार्य शंकर आणि नंतर आद्य शंकराचार्य यांच्यावर पडलेला दिसतो त्यातूनच पुढे अद्वैत्वाद उदयाला आला
चंद्रमा हे मात्र ब्रह्मा म्हणूनच काम करत राहिले भगवान बुद्धांच्या बरोबर ज्यांचे संवाद झाले ते ब्रह्मा हे या परंपरेतूनच आलेले होते ब्रह्म धर्म सांगणे हे त्या काळामध्ये या ब्रह्मांचे परम कर्तव्य होते गौतम बुद्धाच्या काळातही ते त्यांचेच प्रतिनिधित्व करत होते
यांच्यात जे दत्तात्रय होते ते मात्र उत्तरेकडे गेलेच नाहीत ते दक्षिण भारतातच काम करत राहिले त्यांची प्रामुख्याने चार वेदांच्या वर प्रचंड कमांड होती ते वेद म्हणजे १ ज्योतिष ऍस्ट्रॉनॉमी २ आयुर्वेद ३ शस्त्र वेद विशेषतः त्रिशूल चालवण्यात अतिशय प्रवीण होते ४ नाट्यवेद
त्यांचे मामा कपिल ज्यांनी षष्ठीतंत्र मांडले जे पुढे सांख्यतंत्र बनले आणि नंतर सांख्य धर्म बनले आणि शेवटी सांख्य दर्शन बनले ते यांनी आपल्या पद्धतीने पुढे नेले त्यांचा वारसा त्यांनी थेट अंग अथवा वंग देशात सोडला आणि या प्रांतातच यांच्या अनुयायांना दत्त असे आडनाव मिळाले. आज सुद्धा हे आडनाव बांगलादेशामध्ये आणि आत्ताच्या पश्चिम बंगालमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे आणि स्वामी विवेकानंद हे यातूनच पुढे आलेले आहेत आणि हे स्वतःला क्षत्रिय म्हणतात ब्राह्मण नव्हे कारण कपिलाचा वंश हा हिरण्य वंश म्हणजेच राजवंश होता ज्याला महात्मा फुले यांच्यामुळे अलीकडे बळी वंश म्हणून ओळखले जाते
पुढे दहाव्या शतकामध्ये कर्नाट म्हणजे आत्ताचा महाराष्ट्र व कर्नाटक या प्रांतात आणखी एक नाथ नाथ संप्रदायामध्ये दत्त म्हणून जन्माला आले त्यांचे मूळ कुठे सापडेना तेव्हा ही आधीच्या होऊन गेलेल्या दत्तात्रयांची शैव कथा त्यांना जोडण्यात आली त्यांचे वैष्णवीकरण करण्यात आले आणि त्यातूनच आत्ताचे दत्त रूप आपल्यापुढे उभे राहिले आहे
भारतामध्ये युरेशियन संस्कृती आणि अनार्यांची शैव संस्कृती यांचा मिलाफ घडवण्यासाठी आद्य शंकराचार्यांनी प्रयत्न केले असे म्हणतात त्यानंतर ज्याला आपण दुसरे सिंथेसिस म्हणू शकतो असे सिंथेसिस या दत्तात्रयान्नी केले आद्य शंकराचार्यांनी फक्त वैष्णव आणि शैव एकत्र आणले होते आणि ते ब्रह्म दर्शन या मूळ वेदांताशी जोडून सादर केले होते ज्याला आपण आज हिंदू धर्म म्हणतो दत्तात्रय नाथांनी यापुढे जाऊन ब्रह्मा विष्णू आणि शिव असे तिन्ही धर्म एकत्र आणले आणि त्यांना अनुक्रमे जगाचा निर्माता जगाचा सांभाळ करणारा आणि जगाचा विनाश करणारा असे रूप देऊन एक नवा सिद्धांत मांडला हिंदू धर्माचा पुढे हा एक मुख्य सिद्धांत होत गेला आणि आता हिंदू धर्मात ही त्रयी स्वीकारली जाते
आजचा जर हिंदूधर्म पाहिला तर आपणाला आद्य शंकराचार्य आणि आद्य दत्तात्रय यांच्या प्रचंड प्रभावाची स्पष्टपणे जाणीव होते
दत्तात्रयांचा आणखी एक प्रभाव म्हणजे त्यांनी महानुभवांची पार्श्वभूमी तयार केली. नववैष्णववादाच्या आधी या देशांमध्ये प्रथम दत्तात्रय संप्रदाय तयार झाला हे आपण लक्षात घेतले पाहिजे किंबहुना महानुभव लोकांनाच दत्तात्रयांची व्यवस्थित मांडणी करावी लागली आणि आज सुद्धा त्यांनी जे रचले आहे ते सर्वाधिक पापुलर आहे
कीं चैतन्यकनकाचा लांबणदीवा : आत्रीवंशआनंदकुळैवा
कीं स्वयंप्रकाश आखंड लाखवा : जीवोद्धरणाचा
कीं सर्वशक्तीचा मेळीं : परज्ञानचक्रगोंदळीं :
आनंद प्रकटला भूतळीं : जीवा उदो करीतु
कीं अनुसयागर्भगगनीं तापनाशकु : उदैला आनंदमृगांकु
त्रिभुवन धवळिता एकु: तृप्त जीव चकोरां
.
.
.
.
कनकगीरीचा गाभा सोलुनि : वर सूर्यप्रकाश संचारौनि
ओपा सारिजैल घोंटाळुनि : तऱ्ही उपमा नव्हे
परि हे उपमा पाबळी : करणीयचि नुरे पारबाळी
श्रीदत्ताची अंगकांति आगळी : सहज म्हणौनि
.
.
.
.
तंव तो देखिला पर्वतु : जो कुळाचळांमाजि विख्यातु :
तेथ असे क्रिडतु : अत्रीनंदनु
कायि सांगौ तेथिचीं झाडें : तीये पाहुनि सुरतरू बापुडे :
तयां फळभोग जोडे : श्रीदत्तदर्शन
तेथिचिया परमाणुची थोरी : ब्रह्मादिकां न बोलवे परी :
कृपाकटाक्ष झटके जयावरि : श्रीदत्तात्रयाचा
असे श्री रवळोबास यांनी त्यांच्या
सैहाद्रवर्णन सह्याद्री वर्णन या ग्रंथात म्हटले आहे
नाथ संप्रदायामध्ये शिव हे पारंपारिक आदिनाथ मानले जातात त्यांना रिप्लेस करण्यासाठी म्हणून हळूहळू दत्तात्रयांना आदिगुरु असे संबोधले जाऊ लागले कारण काही करून भगवान शंकर यांना रिप्लेस करणे वैष्णव लोकांना आवश्यक वाटत होते आणि त्या अंगाने अनेक प्रकारचे सांप्रदायिक राजकारण खेळले गेले
महाराष्ट्रामध्ये महानुभव लोकांनी दिलेले वर्णन प्रमाण मानले जाते विशेषता माणिक प्रभू यांना दत्तात्रयाचे अवतार मानले जाते
विसाव्या शतकामध्ये दत्तात्रयांना पुढे आणणे अत्यंत आवश्यक बनले कारण हिंदू धर्म जेव्हा नवे रूप धारण करायला लागला तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश असे तिघेही एकत्र येणे एकत्रीकरणासाठी आवश्यक वाटणारा एक मोठा ब्राह्मण लोकांचा समूह होता विशेषता आता ब्राह्मण बनलेले पण पूर्वी पंडित असणारे लोक याबाबतीत जास्त पुढाकार घेत होते कारण मुळची शैव परंपरा सोडता येत नाही आणि नव्याने स्वीकारलेली वैष्णव परंपरा त्यागता येत नाही अशी यांची गोची होती साहजिकच अशा प्रकारचे तिन्ही देवतांना सामावून घेणारे सिंथेसिस त्यांना हवेच होते आणि म्हणूनच मग दत्तात्रय संप्रदाय अधिक फोफावत गेला मात्र अशी गरज महाराष्ट्र आणि कर्नाटकांच्या बाहेर का जाणवली नाही हा प्रश्न विचार करण्याजोगा आहे आणि यातच महाराष्ट्रात आणि कर्नाटकातच का आर्य संस्कृती झिरपली त्याचेही उत्तर आहे केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधले पंडित कमजोर निघाले त्या उलट तमिळ आणि तेलुगु मधले पंडित हे सशक्त होते त्यांनी शेवटपर्यंत शैव-धर्माचा त्याग केलाच नाही परिणाम एवढाच झाला की केरळमध्ये हळूहळू ब्राह्मणी हिंदू धर्माला कंटाळून अनेक लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला परिणामी आज तिथे शैव धर्म ओसरायला लागला आणि वैष्णव धर्म हा प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेचा भाग बनला इतका कि केरळमध्ये जेवढी कडक वर्ण व्यवस्था आली तितकी भारतामध्ये कुठे झाली नाही परिणामी ख्रिश्चन धर्माला हळूहळू शिरकाव मिळाला आणि सरते शेवटी तिथे कम्युनिस्ट राज्यव्यवस्था जास्त प्रस्थापित झाली
सुदैवाने कर्नाटकामध्ये लिंगायत धर्म संस्थापक बसवेश्वर झाल्याने कर्नाटक पुन्हा एकदा वाचला परंतु महाराष्ट्र मात्र पंडित लोकांनीच शैव धम्माचा त्याग केल्यामुळे युरेशियन प्रभावापासून वाचू शकला नाही आणि त्यामुळेच महाराष्ट्रामधूनच हिंदुत्ववादाचे तत्त्वज्ञान सांगणारे लोक निर्माण होत राहिले आणि आज अवस्था अशी आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सत्ता प्रस्थापित झालेली आहे साहजिकच दत्त संप्रदाय वाढता ठेवणे हे हिंदुत्ववादाला अत्यंत आवश्यक असल्याने तो वाढतच जाणार आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही एक है तो सेफ है जर खरोखर अमलात आणायचे असेल तर दत्त संप्रदाय ही एक फार चांगली सिंथेसिस करणारी तत्वभूमी आहे ती भारतीय जनता पक्ष नांगरल्याशिवाय गप्प बसणे शक्यच नाही यामध्ये खरी कसोटी शैव लोकांची लागणार आहे कारण मूळचे दत्त असो किंवा दहाव्या शतकातले नाथ संप्रदायातले दत्त असोत हे दोघेही मूळचे अस्सल शैव होते त्यांना असे काही रूप दिले जाईल याची कल्पना शैव लोकांनी केली सुद्धा नव्हती असो ज्या लोकांना स्वतःच्या धर्माची काळजी नसते ते लोक स्वतःच्या धर्मासकट शेवटी स्वतःच बुडतात इराण हे याचे उत्तम उदाहरण आहे तिथला पारसी धर्म आता औषधाला सुद्धा शिल्लक नाही
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment