मार आणि हर श्रीधर तिळवे नाईक 

महाराष्ट्रामध्ये फार प्राचीन काळापासून दोन सर्व समाज अस्तित्वात आहे आणि हे दोन्हीही लढवय्यांचे समाज आहेत 

पहिला मार आणि दुसरा हर यातील मार या शब्दाचा अर्थच नेतृत्व करणारा असा आहे हा एक सतत युद्धाला तयार असलेला समाज होता तो शांत होता आणि तुळजाभवानी ही त्याची कुलदेवता होती तर खंडोबा हे त्याचे कुलदैवत होते ह्यात प्रामुख्याने कुणबी म्हणजे शेती करणारे लोक येतात त्याचबरोबर पंडित लोक सुद्धा यामध्ये येतात जे पुढे ब्राह्मण झाले पण प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रातील 99% ब्राह्मण हे मूळचे पंडितच आहे आणि या लोकांनी आता पुन्हा पंडित व्हावे हे बरे हेच लोक मार म्हणून बौद्ध वाङ्मयात अनेकदा येतात कारण ते संपूर्ण भारतभर पसरलेले होते मारणे मारामारी करणे वगैरे सर्व क्रियापदे आणि नामे ही या मार शब्दापासूनच तयार झालेली आहेत साधारणपणे इसवी सन दुसऱ्या शतकाच्या आसपास उत्तरेकडून इरेशन ब्राह्मण भगत लोक आले आणि त्यांनी महाराष्ट्र बिघडवायला सुरुवात केली. मात्र त्यांना यश मिळायला तब्बल सात शतके जायला लागली पण आश्चर्यकारक इथे आहे लोक चिकाटीने हा समाज कसा फोडता येईल याची वाट पाहत राहिले आणि शेवटी पहिला राज्यकर्ता यांच्यापुढे दुभंगला जो यादव म्हणवून घेऊ लागला आणि इथूनच महाराष्ट्राच्या अधःपतनाची सुरुवात झाली मुख्य म्हणजे आत्तापर्यंत वर्ण आणि जात या दोन्ही गोष्टींना नकार देणारा शैव मराठी समाज हा आता वर्ण आणि जात या दोन गोष्टीत बुडायला लागला 


यादवकाळात वैष्णव वारकरी संप्रदायाने या लोकांच्या मधूनच अत्यंत व्यवस्थितपणे जे नेतृत्व करणारे लोक होते त्यांना क्षत्रियांचा दर्जा देऊन 96 कुळी मराठा नावाची एक कृत्रिम जात तयार केली जी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता संपादित करून बसलेला वर्ग झालेली आहे आणि जो नवा वर्ग झाला आहे तो स्वतःला आपण वैदिक आहे असे समजतो वास्तविक हे लोक कधीही वैदिक नव्हते परंतु स्वतःचीच मुळे विसरायची ठरवलेला असा हा 96 कुळी मराठा उपसमाज बनला आहे ज्याने आता स्वतःचे मूळशैव रूप विसरायला सुरुवात केलेली आहे मात्र तरीही यांचे मूळ कुलदैवत सुटलेले नाही ते खंडोबा म्हणजेच स्कंद होय शिवाय तुळजाभवानी आहेच या मार समाजाचा गौतम बुद्धाशी सुद्धा प्रचंड वाद झाला तो इतका वाढत गेला की पुढे मार म्हणजे सैतान अशी प्रतिमा तयार झाली या लोकांना बुद्धाची हिंसा आणि अहिंसा याविषयीची जी संकल्पना होती ती कधीही मान्य नव्हती किंबहुना गौतम बुद्धाला अत्यंत ठाम पणाने मार आणि हर या दोन्ही समाजांनी विरोध केलेला होता आश्चर्याची गोष्ट अशी की आता हे दोन समाज गौतम बुद्धाचे समर्थन करतात विशेषत: हर समाज विशेषत: त्यातील महाहर समाज याचे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केलेले आकलन होय ते प्रत्यक्षात किती खरे आहे हे कोणी तपासून पाहण्या ची सुद्धा तसदी घेतलेली नाही इथे बाबा वाक्य प्रमाणम झालेले आहे प्रत्यक्षात मात्र घराघरांमध्ये आजही जो शैव वारसा आहे तो जसाच्या तसाच शाबूत राहिलेला दिसतो याचे कारण तो खरा आहे तर बौद्ध विरासत ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांच्यातून प्राप्त झालेली ओळख आहे ती काल्पनिक आहे तिला पुराव्यांचा आधार नाही प्रत्यक्ष पुरावा शोधायला गेलो तर आपणाला घराघरांमध्ये शैव टाक दिसतात 


यातील मार समाजापासूनच पुढे मराठा हा समाज बनला हर हा समाज पूर्ण पणे शिव होता हर होता महादेवाची पूजा करणारा होता यात धनगर कोळी महाहर चर्महर सोन हर असे अनेक उपसमाज समाविष्ट होते हर हा समाज केवळ युद्ध करत नव्हता तर तो गावाचे रक्षण सुद्धा करत होता आणि हा प्रामुख्याने रक्षक होता त्या उलट राज्याच्या लढाया या नेहमी मार समाज लढत होता यांची जी भाषा होती तिलाच आता आपण मराठी म्हणतो मराठी ही भाषा ही मार आणि हर या दोन समाजांची भाषा आहे यातील मार समाजाची घोषणा जय शिवजी जय भवानी तर हर समाजाची घोषणा हर हर महादेव ह्या होत्या आणि आहेत त्यामुळेच हे दोन्ही समाज या घोषणा देत शत्रूंवर तुटून पडत हे महाराष्ट्राचे आदिम समाज आहेत अनेकदा मिळून लढताना दोघे मिळून सर्वच घोषणा दे त कारण आपण शैव आहोत याची त्यांना पक्की जाण होती ही जाण त्यांनी विसरावी म्हणून वारकरी संप्रदाय नावाचे का अत्यंत सुंदर खेळी निर्माण केली गेली आणि खेळली गेली आज अवस्था अशी आहे की वारकरी संप्रदाय हा जणू काही महाराष्ट्र नियंत्रण करतो असा गैरसमज सर्वांचाच झालेला आहे 


यातील हर समाज अनेकदा जोहार म्हणे अलीकडे त्या शब्दाचा अर्थ काय हे सुद्धा अनेकांना कळत नाही जोहार हा जय आणि हर म्हणजेच जय हर या शब्दापासून बनलेला संयुक्त शब्द आहे तो उच्चारताना जोहार होऊन जातो आणि तो तसाच मग रूढ होत गेला 


 मार आणि हर हे दोन समाज आज दोन टोकांना उभे आहेत याचे कारण वारकरी संप्रदाय अथवा वैष्णव धर्म या दोघांच्या मध्ये अनेक चिरफाड्या करण्यात यशस्वी झालेले आहेत या चिरफाड्यात चिरफाड्या चिरफाळ्या एकत्र करून पुन्हा बांधण्यात शिवाजी महाराज यशस्वी झाले आणि या दोघांना आणि सर्वांना मिळूनच मराठा असा नवा संस्कार मिळाला हा संस्कार महाराष्ट्रात पुन्हा जागृत होणे आवश्यक आहे पंडित , शेतकरी , कुणबी , धनगर , वंजारी, माळी , महा हर , चर्म हर वगैरे सर्व शैव उपसमाज आता एकत्र आले पाहिजेत आणि आपली सर्वांची मिळून एक मराठा ही ओळख आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे 

श्रीधर तिळवे नाईक

नवयानी बौद्ध शैव धर्माच्या विरोधात उभे केलेले शस्त्र बनत आहे का 

 श्रीधर तिळवे नाईक 


भारतातील शासक समुदाय ही एक अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट आहे. या शासक समुदायातील क्षत्रिय लोक ही त्याहून अधिक गुंतागुंतीची अशी युरेशियन गोष्ट आहे जिचे आकलन अनेकांना आजही होत नाही .भारतातल्या जवळ जवळ सर्व वाईट गोष्टींच्या मध्ये यांचे असलेले योगदान अधोरेखित करणे इतिहासकारांना जमत नाही याचे कारण या लोकांचे असलेले सामुदायिक बल आणि त्याविषयी निर्माण झालेले भय होय याउलट शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, शाहू महाराज ,यांच्यासारखे शैव शासक मात्र लोककल्याणाची बांधिलकी सांभाळत काम करताना दिसतात या लोकांना क्षत्रियत्व देऊन ब्राह्मण लोक त्यांना आपल्याकडे अनेकदा मिळवत असतात खरे पण प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ते शक्य होत नाही कारण मोजके राज्यकर्ते सोडले तर समोरजी वस्तुस्थिती येते ती फारशी उत्साह जनक नाही ब्रिटिश भारतामधील तत्कालीन संस्थांनामधल्या जवळ जवळ ७०० क्षत्रियांनी आणि त्यांच्या नोकरदार लोकांनी इंग्रजांच्याकडून कसे पेन्शन घेतले याचा अभ्यास केला की पेन्शनधरी शासक हे फक्त भारतातच निर्माण झाले की काय अशी शंका यायला लागते डोळ्यात भरण्याइतपत त्यांची संख्या मोठी आहे या युरोशियन क्षत्रिय शासनकर्त्यांनी किती पैसे जनतेकडून गोळा केले यांचे राजवाडे कसे उभे राहिले या राजवाड्यांच्या मध्ये इंग्रजांच्या काळात नेमके काय चालले होते याची कोणीतरी रसाळ कहाणी सांगणे आवश्यक आहे तीही बहुजनवादी दृष्टिकोनातून ! लढवय्या समाजाला लाज आणणारे लोक म्हणून या काळातल्या अनेक युरेशियन शासक लोकांच्याकडे बघता येते या काळामधील संस्थानिकांच्याकडे जाणारा सर्व पैसा हा अंतिमता जनतेकडून इंग्रजांनी गोळा केलेल्या करा मधून निर्माण झालेला होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे म्हणजे जनताच त्यांच्या राजे राजवाड्यांचा खर्च पुरवत होती 


त्यामुळे मला नेहमीच असे वाटत आलेले आहे की 1947 मध्ये भारतामध्ये कम्युनिस्ट राजवट येणे फार आवश्यक होते कारण त्याशिवाय भारतामधल्या धार्मिक प्रभावाचा अंत झालाच नसता आणि संस्थानिकांच्या शोषण व्यवस्थेतून निर्माण झालेली अफाट संपत्ती ही सरकारच्या दरबात दाखल झाली नसती दुर्देवाने पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सारखा एक सत्तामतलबी स्वभावाने चांगला मध्यम मार्ग काढणारा माणूस भारताचा पंतप्रधान झाला ज्याने कधीही कसलीही ठोस भूमिका घेतली नाही जर हा खरा समाजवादी असता तर याने सगळ्या संस्थानिकांची राजवाड्यांची संपत्ती ही जनतेची संपत्ती आहे असे घोषित करून ती आपल्या ताब्यात घेतली असती पण भारतात कम्युनिस्ट क्रांती झालीच नाही आणि भारतातले कम्युनिस्ट तर नंतर इतके लेचेपेचे होत गेले की त्यांनी कसलेही सोल्युशन शोधले नाही आणि आता अशी स्थिती आहे की आपण मागे जाऊ शकत नाही इतके खाजगीकरण आपण केलेले आहे योग्य काळात योग्य कृती न करणे ही भारतीय शासकांची दोष शैली आहे भारतीय इतिहासामध्ये त्याचे सतत पुरावे मिळत असतात तरी देखील आपल्या लोकांचे राजांच्या विषयी असलेले आकर्षण काही संपत नाही वास्तविक जे योग्य राजे होऊन गेले त्यांना अधिकाधिक आपण प्रसिद्धी दिली पाहिजे पण 99% शासक हे अत्यंत वाईट शासक होते हे आता सांगणे आवश्यक आहे आजही या स्थितीमध्ये काही फरक पडलेला नाही आणि शासक वर्ग जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे बोट वळते तेव्हा तेव्हा ते बोट ब्राह्मणांच्या कडे वळवण्यात यशस्वी होतात वास्तविक ब्राह्मण धर्माचे रक्षण या देशातल्या युरेशियन क्षत्रियांनीच केलेले आहे आणि या दोघांचे आपापसातले साटे लोटे म्हणजे वैष्णव धर्म होय या दोन्ही वर्णांनी स्वतःला पुण्य योनि मानत सर्वश्रेष्ठ स्थान दिलेले आहे किंबहुना वैष्णव धर्माची ही फार मोठी खासियत ज्याच्या जीवावर सर्व राजे राजवाड्यांचे व्यवस्थित ब्राह्मणीकरण करून त्यांना वैष्णव करण्यात आले 


ब्राह्मण आणि क्षत्रिय यांची ही युती आजही अनेकांना कळत नाही काँग्रेसने ही युती कंटिन्यू केली त्यामुळेच काँग्रेस कधीही सरंजामशाहीतून मुक्त होऊ शकली नाही इस्लामचा प्रश्न निर्माण झाला नसता तर कदाचित काँग्रेसचे राज्य आज सुद्धा टिकले असते इस्लामच्या प्रश्नानेच भाजपने सत्ता मिळवली पण भाजप सुद्धा आता काँग्रेसच्याच मार्गाने जात आहे फक्त महात्मा गांधी यांच्यामुळे जो वैश्य वर्ण या दोन उच्च वर्णांना जाऊन मिळाला होता तो आता भाजपमध्येही जाऊन मिळालेला आहे आणि अधिक प्रभावी झालेला आहे किंबहुना भारताचे दोन मुख्य प्रमुख शासक नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे वैश्य वर्णातून आलेले आहेत किंबहुना आणलेले आहेत जेणेकरून बहुजन समाज आपल्या मागे उभा राहावा 


भाजप येण्यापूर्वी काँग्रेसने आपला हा युरेशियन वैष्णव चेहरा दिसू नये याची व्यवस्थित काळजी घेतलेली दिसते तो कळला होता फक्त बाबासाहेब आंबेडकर यांनाच ! मात्र काही सोलुशन देण्याआधीच दुर्दैवाने त्यांचे निधन झाले बाबासाहेब शेवटी शेवटी द्रविड संस्कृतीकडे वळले होते याचे कारण त्यांनाही कोण चुकले होते की हा सांस्कृतिक संघर्ष आहे तो लक्षात घेऊनच त्यांनी नवयानबौद्ध धर्म निर्माण केला आणि हे निर्माण प्रचंड आव्हान देऊ शकते याची कल्पना ,१९७० सालापासून काँग्रेसला यायला लागली आणि हा प्रभाव कसा नष्ट करायचा हा प्रश्न काँग्रेसच्या युरेशियन वारकरी वैष्णव शासक लोकांना सतावायला लागला या काळात या शासक लोकांचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे होते साहजिकच या काळात शरद पवार यांनी एक उत्कृष्ट खेळी केली ती म्हणजे नवयान बौद्ध धर्म स्वीकारलेल्या सर्वांनाच जातीनिहाय सवलत जाहीर केली राखीव जागा दिल्या याचा परिणाम असा झाला की बौद्ध धर्माचा ठसा कमी झाला आणि पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीचा ठसा मोठा होत गेला जी झुंजार वृत्ती 1980 पर्यंत दिसत होती जे खरोखरच पँथर वाटत होते त्यांचे हळूहळू युरेशियन शासक लोकांनी सवलत घेणारे मांजर करून टाकले 


भाजपने या नवयान बौद्ध संप्रदायाला कसे हाताळायचे यासंदर्भात एक पॉलिसी डिझाईन करायला सुरुवात केली जी जवळजवळ काँग्रेस सारखीच होती पण या दरम्यान एक घटना घडली ती म्हणजे मंडल आयोग आणि अचानक ओबीसी लोक संघटित व्हायला लागत त्यामुळे प्रश्नांचा तोंडवळा बदलला आणि हळूहळू शैव आयडेंटिटी पुढे येऊ लागली 


शैव आणि बौद्ध एकत्र लढले तर ते परवडणार नाही याची कल्पना मुळात काँग्रेसला झाली होती आणि म्हणूनच काँग्रेसने नेहमीच हिंदू धर्म म्हणजे शैव आणि वैष्णव या दोन संप्रदायांनी बनलेला धर्म असे प्रोजेक्शन दिले जे प्रोजेक्शन नंतर भारतातल्या सर्वच विचारवंतांनी स्वीकारले 


मंडला आयोगामुळे ओबीसी लोकांचे झालेले धृवीकरण परवडणारे नाही याची जाणीव भाजपमध्ये अधिक तीव्रतेमध्ये होती त्यातूनच मग ओबीसी आणि बीसी एकमेकांशी लढणे आणि लढवणे आवश्यक ठरले ओबीसी लोकांचा मुख्य धर्म शैव असल्याने साहजिकच त्या विरोधात नवयान बौद्ध असलेले लोक कसे लढतील याची काळजी घेणे आवश्यक होते आणि हळूहळू नवयान बौद्ध शैव-धर्मा विरोधात मोठ्या प्रमाणात लढू लागले आपण आपल्याच ओबीसी बीसी आदिवासी लोकांच्या विरोधात लढतोय याचीही कल्पना यांना आली नाही आपला जन्म बहुजन समाजाचे नेतृत्व करण्यासाठी झालेला आहे असा गैरसमज बाळगणारे हे लोक होते प्रत्यक्षात असे नेतृत्व कोणीच ठरवू शकत नाही ते सर्व समाजाने स्वीकारावे लागतात अशी क्षमता बाबासाहेब आंबेडकरांच्या ठाई होती त्यानंतर सर्वच शैव लोकांनी मायावती यांना पाठिंबा दिला आणि बहुजन समाज त्यांच्या मागे उभा राहिला पण दुर्दैवाने त्यांनी इतके बौद्ध बौद्ध बौद्ध केले की बिहारमध्ये खुद्द शैव धर्म त्यांच्या विरोधात उभा राहिला आणि गोरखनाथ मठाचे प्रमुख आदित्यनाथ योगी यांचे राज्य नेतृत्व त्यातून निर्माण झाले मुळातच मायावती यांचे भ्रष्ट आचरण आणि त्यांनी उभा केलेली वैयक्तिक संपत्ती डोळ्यात भरणे सुरू झाले होते ओबीसी समाजाने एका अर्थाने बीसी लोकांना दिलेले हे नेतृत्व होते पण त्याची कदर करण्याऐवजी शैव धर्मावरच हल्ले सुरू झाले वास्तविक ज्या चर्म हार समाजातून मायावती यांचे नेतृत्व आले होते तो पूर्णपणे शैव होता अपवाद रविदासांच्या मुळे झालेले काही झालेले वैष्णव ! पण मायावती यांच्या हे लक्षातच आले नाही आणि शेवटी मायावती यांना सर्व ओबीसी लोकांनी आणि बीसी लोकांनी निवडणुकीत व्यवस्थित पाडले कारण तोपर्यंत शैव-धर्माचा एक नवा चेहरा आदित्यनाथ योगी यांच्या रूपाने उदयाला यायला लागला होता


याच काळापासून महाराष्ट्रात प्रत्येक शिवलिंग हा बौद्ध स्तूप होता अशा प्रकारचा प्रचार चालू झाला प्रत्येक शिवलिंग कसा बौद्ध विहार होता हे सांगणाऱ्या पोस्टी फिरू लागल्या यामुळे आपण बहुजन समाजाला नाराज करत आहोत याचीही कल्पना नव बौद्ध लोकांना आली नाही खुद्द या समाजातले अनेक लोक हळूहळू स्वतःला बौद्ध म्हणवुन घेत असतानाही शैव पद्धतीने सर्व संस्कार करू लागले घरामध्ये पुन्हा एकदा शैव-धर्माचे कम बॅक झाले अपवाद काही नव बौद्ध विचारवंत होते जे देशी वादाच्या कच्छपी लागून वैष्णव झाले मात्र खुद्द नवबौद्ध लोकांच्यामध्ये कधीही या लोकांना स्थान मिळाले नाही म्हणजेच जे पुरोगामी लोकांचे झाले तेच या तथाकथित पुरोगामी नव बौद्ध लोकांचे झाले मीडियामध्ये उंची जास्त असलेले हे लोक प्रत्यक्षात स्वतःच्या समाजात खूप बुटके होते 


काँग्रेस आणि भाजप हे दोघेही युरेशियन प्रभावाखाली आसल्याने त्यांनी शैव-धर्मा विरोधात लढण्यासाठी यांचा वापर केला यातील भाजपचे धोरण अतिशय स्पष्ट आहे एका बाजूला शैव धर्माला ते मतासाठी जवळ करायचे आणि पाहुण्याकडून लाठी मारायची या धोरणाच्या अंतर्गतच नव बौद्ध विचारवंतांच्या कडून शैव धर्माला ते काठी मारत असतात हा खरं तर ब्राह्मणवादाचा सनातन फॉर्म्युला आहे स्वतः मारायचेच नाही दुसऱ्याकडून मारायचे किंबहुना त्यासाठी क्षत्रिय नावाचा वर्ण निर्माण केला गेला तोच फॉर्मुला येथे गिरवला गेलेला आहे परिणामी सर्व बौद्ध साइट्स वर अलीकडे शैव धर्माच्या विरोधात अनेक पोस्ट पडत असतात आपण यामुळे ओबीसी समाजाकडून किंवा 90% बीसी समाजाकडून (पूर्वाश्रमीचे महार सोडले तर अलीकडे कोणीही या लोकांना पाठिंबा देत नाही किंबहुना हे आपल्याच बीसी समाजामध्ये अल्पसंख्यांक होत चाललेले आहेत )आणि आदिवासी समाजाकडून दूर जात आहोत याचे कसलेही भान मुठभर असलेल्या नवयानी बौद्ध विचारवंतांना नाही वैष्णव विचारवंत यांच्या कायम पाठीशी असतात कारण त्यांना सरते शेवटी सर्व शैव समाज आपल्या वैष्णव अजेंडा खाली आणायचा आहे त्यामुळेच रविदासांचे महत्त्व वैष्णव म्हणून वाढवणे वारकरी संप्रदायाचा आकार वाढवणे असा प्रकार चाललेला असतो एकदा का सर्व ओबीसी बी सी आदिवासी वैष्णव अजेंडा खाली आले की व्यवस्थित वर्णजाती व्यवस्था राबवता येते याची कल्पना वैष्णव लोकांना विशेषता ब्राह्मण आणि क्षत्रिय लोकांना आहे हे लोक पैशाची गरज असल्याने आज जरी वैश्य लोकांच्या युतीत असले तरी आज ना उद्या ते त्यांना पाप योनीतच ढकलणार या विषयी माझ्या मनात शंका नाही कारण मुळातच यातले बहुतांशी लोक हे वाणी आणि पणी आहेत जे शैव होते किंवा आहेत 


या सगळ्या राजकारणामध्ये मग नव्या बौद्ध लोकांच्याकडून काय करून घ्यायचे याचा अजेंडा स्पष्ट आहे आणि तो राबवला जात आहे प्रश्न आहे नव बौद्ध असलेल्या लोकांना हा अजेंडा का कळत नाही? ते का पुन्हा पुन्हा शैव धर्मावर अटॅक करत आहेत ? की बौद्ध धर्माच्या प्रसारामध्ये सर्वात मोठा अडथळा प्राचीन काळी सुद्धा पाशुपत शैव धर्म होता आणि आताही शैवधर्म हाच मोठा अडथळा आहे असे यांना वाटते ? लढायचे असेल तर लढा पण एकदा शैवधर्मीय सुरू झाले की ते थांबत नाहीत एवढेच सांगतो मुळात मी गौतम बुद्ध यांना शैव धर्मी सिद्ध मानतो त्यांच्या मधून नंतरच्या लोकांनी एक स्वतंत्र धर्म निर्माण केला ही वेगळी गोष्ट आहे पण आता पुन्हा एकदा इतिहास नव्याने तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे एवढे नक्की ! थोडक्यात एक गोष्ट नक्की आहे हळूहळू का होईना परंतु नवयानी बौद्ध धर्म स्वीकारलेले विचारवंत कळत नकळत अलीकडे युरेशियन लोकांच्या हातातील शैव-धर्माविरोधातील शस्त्र बनत आहेत हे असेच राहिले तर मग फायदा शेवटी युरेशियन लोकांना होणार आहे याचे भान या लोकांना कधी येणार हा खरा प्रश्न आहे 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे