इतिहासाचा इतिहास , फिनॉमिनोलॉजी ,उत्तर आधुनिकता आणि शैव भाग तिसरा श्रीधर तिळवे नाईक

Final 

शैव समाजांच्या मध्ये जशी मातृसत्ताक पद्धत होती तशीच मातृसत्ताक पद्धत युरेशियन समाजांच्यामध्ये किंवा टोळ्यांच्यात होती का हा एक प्रश्न आहे आपल्याकडे शरद पाटील वगैरे लोकांनी असा स्टान्स घेतलेलाा दिसतो प्रत्यक्षामध्ये अशी पद्धत जर असती तर रामाच्या घरी सीता येण्याऐवजी सीतेच्या घरी राम गेला असता रामाच्या घरी सीता आली नसती हीच गोष्ट द्रौपदी बाबत द्रौपदी आपल्या वडिलांच्याकडे सुरक्षित राहिली असती आणि कुंती सुद्धा ! युरेशियन लोक भारतात आले तेव्हा ते पूर्णपणे पितृसत्ताकच होते तेव्हा उगाच फाटे फोडण्यात काही अर्थ नाही इथे त्यांचा संबंध शेतीशी आला आणि मग त्यांनाा शैव लोकांच्या मातृसत्ताक प्रथा या आत्मसात करााव्या लागल्याा किंवाा केल्या गेल्या त्यांची नि: ऋती ही देवता स्वीकारली गेली याचे कारण पुन्हा तेच होते मुळात स्त्रीला पुरुषापासून मुल होते हेच माहीत नव्हते आणि ते जेव्हा माहिती झाले तेव्हा आपोआपच पितृसत्ताक पद्धती अस्तित्वात आली मुळातच दुष्काळांच्यायामुळे हा शोध लागला असावा कारण पाऊस पडला नाही की भूमी कोरडी आणि रुक्ष होत जाते आणि पीक उगवत नाही आरण्य उगवत नाही इतके हळूहळू उमजत गेले आणि त्यातूनच हा शोध लागला की शेवटी वीर्य नावाचा पाऊस लागतो.

भारताच्या इतिहासामध्ये नेहमीच एक प्रश्न उपस्थित करणे आवश्यक ठरते ते म्हणजे जमिनीच्या सुफलीकरणासाठी पुरुषाचा मेध युरेशियन लोक करत होते का ? नरमेध वा पुरुषमेध हा यज्ञाचा एक पद्धत म्हणून विकसित झाला होता असे दिसते हे पुरुषाचे महत्त्व वाढवण्यासाठी होते की प्रतीकात्मक होते ? ज्याप्रमाणे पुरुषाचे वीर्य नाहीसे होते स्त्रीच्या पोटात त्याचप्रमाणे पुरुषाला प्रतिकात्मकरीत्या जमिनीमध्ये गाडले किंवा जमिनीला चढवले की तो गायब होतो आणि मग जमीन सुफलीत होते असा काही तर्क यामागे होता का हा एक फार मोठा प्रश्न आहे 

पुरुषप्रधान व्यवस्थेने शैव लोकांच्या मातृसत्ताक व्यवस्था आपल्या ताब्यात याव्यात म्हणून रामायण व महाभारत ही महा काव्ये रचली का हा त्या पुढचा प्रश्न आहे 

म्हणजे दिसते असे की रावण हा मातृसत्ताक श्रीलंकेत राज्य करत आहे श्रीलंका मुळात मंदोदरीशी आहे रावणाची नाही आणि रावण महाराष्ट्रातून श्रीलंकेत गेलेला आहे हे शैव मातृसत्ताक राजवटीतले सर्वात बलाढ्य साम्राज्य होते त्याचा पाढाव निदान काल्पनिक पातळीवर करणे युरेशियन लोकांना आवश्यक होते आणि म्हणूनच त्यांनी रामायण रचले भ्रमात्मक विजय पुराण आणि महाकाव्यातून साजरे करायचे आणि मग ते वास्तव होते असे पटवायचे असे हे राजकारणाचे इतिहासकारण आहे किंवा इतिहासाचे राजकारण आहे सुरुवात शैव राजवटीने करायची आणि मग शेवट पुरुषप्रधान युरेशियन विजय दाखवत करायचा 

म्हणजे जनपद ही शैवांची मातृसत्ताक व्यवस्था म्हणूनच दशरथ नासिक जनस्थान सोडून कोसल मध्ये जातो कोसल मध्ये कौशल्या राणी असते आणि तिचे मातृसत्ताक वर्चस्व असते त्यांची कुलदेवता महाकाली असते शैव प्रथेप्रमाणे रामाने जानकीच्या घरात जायला हवे पण राम जानकीच्या घरी जात नाही उलट जानकीला कोसल मध्ये घेऊन येतो आणि इथूनच पितृसत्ताक वर्चस्व सुरू होते यामागे कोण आहे तर विश्वामित्र व वशिष्ठ नावाचे दोन युरेशियन ऋषी मुळात दशरथाच्या दरबारामध्ये यांना स्थान मिळालेले आहे त्याचे कारण त्याला पुत्रप्राप्ती होत नाही आणि या लोकांच्या मुळे आपल्याला पुत्रप्राप्ती झाली म्हणून मग इथे पुत्रसत्ताक राजवटीचे आरंभाचे उद्योग शिरलेले दिसतात इथे राम जन्मापासूनच युरेशियन राजकारणाचा प्रारंभ होतो आणि मग सर्व पॉलिटिक्स सुरू होते आणि युद्धही होते आता जानकी पुन्हा अयोध्येतच म्हणजे सासरी परतते फक्त तीच अशी आहे की जी जनकाची मुलगी आहे की नाही याबद्दल शंका आहे कारण ती धरतीवर सापडली असा उल्लेख आहे आणि लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी की तिलाच शेवटी वनवास भोगावा लागतो जनकाच्या इतर कन्यांना वनवास भोगावा लागत नाही कारण त्या पितृसत्ताक संस्कारामध्ये वाढलेल्या आहेत आणि त्या तिथेच सासरमध्येच सुखाने राहतात 

हा मातृसत्ताक आणि पितृसत्ताक यांच्यातला लढा आहे तो मुळात सुरू कधी झाला तर मी मागेच म्हटल्याप्रमाणे हे सगळे ज्ञानाचे प्रताप आहेत जोपर्यंत स्त्री स्वतःच मुलाला जन्म घालते असे अंधश्रद्धात्मक गृहीतक होते तोपर्यंत स्त्री राज्ये चालली जसे पुरुषाला कळले की आपल्याशिवाय स्त्रीला मूल जन्माला घालता येत नाही तसे पुरुषांनी त्यांच्या शारीरिक बळाच्या जीवावर स्त्रियांच्यावर प्रभुत्व निर्माण केले आता या सगळ्या गोष्टींच्याकडे कसे पाहता येईल कारण शेवटी स्त्रीच्या शरीराजवळ मुलाला जन्माला घालण्याची ताकद असते त्याचे काय करायचे पुरुषाची शारीरिक ताकद वेगळी आणि स्त्रीची शारीरिक ताकद वेगळी असे आता स्पष्ट दिसते पण समजा आता स्त्रीमुक्ती चळवळीमध्ये पुढचा जो टप्पा आलेला आहे त्यामध्ये मुलाला जन्मच द्यायचा नाही असा आग्रह असेल तर मग स्त्री पुरुष संबंधांचे समीकरण बदलणार कसे आहे ?

सर्व ज्ञानात्मक पातळीवर तपासायचे असेल तर त्यामागे मुळातच एक प्रश्न आहे तो असा की मनुष्य हा जर प्राणी आहे तर हा प्राणी नेमका पुरुष आणि स्त्री यांना पाहतो कसा ? एक नर म्हणून आणि एक मादी म्हणून हे एकमेकांना कसे पाहतात ?त्यांच्या नैसर्गिक प्रक्रिया काय असतात ? वर्तमान काळाच्या संदर्भामध्ये हा फिनॉमिना समजून घेणे फार आवश्यक आहे कारण त्याशिवाय ह्या प्राचीन गोष्टी समजणे अशक्य वाटते सीमां डे बुवाच्या सेकंड सेक्स या पुस्तकानंतर एक काळ असा होता की स्त्रिया सर्व प्रकारच्या त्यांच्या स्वभावदत्त गोष्टींना पुरुषप्रधान व्यवस्थेला जबाबदार धरत होत्या आता मात्र असे म्हणता येत नाही आणि इतक्या सहजासहजी या सगळ्या प्रश्नांच्यातून सुटकाही होणार नाही मुळात माणसाचे वैज्ञानिक नर म्हणून आणि मादी म्हणून काय नाते आहे हे आता तपासायची वेळ आलेली आहे प्राण्यांच्या मध्ये काही प्राणी असे आहेत की जिथे मादी नराला खाते किंवा संभोगानंतर नाहीशी करते माणसांच्या मादीमध्ये असे काही आहे का ? किंवा मग पुरुषांमध्येच निसर्ग दत्त माकड उड्या आहेत का ? आत्तापर्यंतचे तरी पुरावे असं सांगत नाहीत मात्र मुलांचा जन्म झाल्यानंतर स्त्रियांचा त्याच्या पुरुषातला लैंगिक इंटरेस्ट संपतो का हे मात्र वैज्ञानिक पातळीवर तपासणे आवश्यक आहे मुलांच्या शिक्षणासाठी येणारा खर्च त्यांच्या पालनपोषणसाठी येणारा खर्च आता इतका अवाार्ड हवे अवाढव्य होत गेला आहे की मुले नकोत अशी वृत्ती वाढत चाललेली आहे आता ही काही नैसर्गिक भावना नव्हे तर ही सामाजिक आणि आर्थिक संरचनेतून आणि नेटवर्क मधून आलेली भावना आहे स्त्रिया या गोष्टी नीट समजून घेत आहेत का त्यांना हे कळते का की हे आर्थिक नेटवर्क लाभलेले नकारात्मक थिंकिंग आहे ? भूतकाळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे पुरुषसत्ताक राजवटींनी स्त्रियांच्यावर नकारात्मक थिंकिंग लादलेले नव्हते का ? माणसाचा स्वभाव जितका जन्मदत्त असतो जनुक दत्त असतो त्याहून अधिक तो जालदत्त असतो म्हणजेच समाज दत्त ही असतो आणि शेवटी सगळा निर्णय ते संपूर्ण व्यक्तित्व ते मग स्त्रीचे असो किंवा पुरुषाचे असो कुठल्या बाजूने झुकत जाते त्यावर बऱ्याचशा गोष्टी ठरत जातात काही लोक समाज दत्त लाच स्वदत्त समजायला लागतात तर काही स्वदत्त साठी समाजदत्त वापरायला शिकतात सामाजिक चलाखी आणि वैयक्तिक चलाखी ही माणसाच्या निसर्गदत्त आहे अगदी स्त्री पुरुष संबंधात सुद्धा या संदर्भात अधिक चला कोण हाच प्रश्न उरतो बायका ही पुरुषांना वापरायला शिकलेल्या आहेत किंवा कदाचित त्यापूर्वीही वापरतच होत्या आणि पुरुष तर पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे यामध्ये संस्कारदत्त प्रवीण झालाय 

साहजिकच त्यामुळे आता अशी वेळ आलेली आहे की स्त्री-पुरुषांच्या संदर्भामध्ये आता आपणाला क्वांटम आणि पोस्ट क्वांटम भूमिका स्वीकारावी लागणार आहे म्हणजे असे की स्त्री आणि पुरुष एकमेकाला कोणत्या जागेवरून आणि नेटवर्क मधून त्यांचे कोणते अंग पाहतात त्यावर त्यांचे त्यासंदर्भातले अनुभव आणि ज्ञान अवलंबून असतात असे आता म्हणता येईल का ? त्याचबरोबर आपणाला स्त्री आणि पुरुष यांच्या आत मध्ये जी हेतूग्रस्तता आणि त्याहून खोलात आसक्ती असते तत्कालीन आसक्तीवर हे आकलन अवलंबून असते का ? आसक्तीग्रस्तता ही नेमकी यासंदर्भात काय रोल निभवते याचे आकलनभान फार आवश्यक होऊन बसते 

पार्वती ही शंकराच्या प्रेमात पडली आणि तिने हिमालयापर्यंत तिचा पाठलाग केला ही शैव कथा असते पण जेव्हा हीच कथा युरेशियन लोक सादर करतात तेव्हा मग ते शंकरामध्ये रुद्राला मिसळतात ब्रह्मदेवाला आणतात आणि मग ब्रह्मदेव नारदामार्फत पार्वतीला युक्तिवाद करून पटवतो की त्रिपुरासुराचा अंत होण्यासाठी तुला पुत्र जन्माला घालावा लागेल आणि त्यासाठी काम नावाच्या देवाला मग शंकराच्या आत काम प्रज्वलित करण्यासाठी पाठवले जाते आणि एका मिशनसाठी म्हणून हे लग्न होते हे मिशन अर्थातच एका असुराला मारण्याचे आहे आपल्याकडे दीपक चोपडांच्यासारखे सोकॉलड विचारवंत सुद्धा असल्या दंतकथा सांगत बसतात कारण युरेशियन लोकांना काहीही करून शंकर हा रुद्र म्हणून आत्मसात करायचा असतो आता हे जे युरेशियन पॉलिटिक्स आहे ते समजून न घेता जर का आपण इतिहास पाहायला लागलो तर सगळा गोंधळ उडायला लागतो इथे आत्ताचा वर्तमान हा कुठली कथा निवडायची हे ठरवतो म्हणजेच इथे अधिकार ना शंकरा जवळ आहे ना पार्वती जवळ आहे नंतरचे लोक ठरवत आहेत की ते नेमके काय होते आता इतिहासात हा जो वर्तमान दत्त भूतकाळ ठरवण्याचा अधिकार इतिहासकार लोकांना प्राप्त होतो तो बरोबर की चूक असा प्रश्न आता आपण विचारायला पाहिजे इतिहास असत नाही इतिहास वर्तमान काळातला इतिहासकार त्याच्या वर्तमानानुसार आणि त्याच्या हितसंबंधांनुसार रचतो किंबहुना इतिहासकार म्हणजे इतिहास नावाची व्यक्तिरेखा निर्माण करणारा अभिनेता होय आणि हे भारताच्या जर का आपण दंतकथा पाहिल्या तर आपल्याला जास्त स्पष्ट होते त्यातली वाईट गोष्ट ही असते की शैव दंतकथेमध्ये नसलेली सती सती प्रथा रूढ झाल्यानंतर मुद्दाम म्हणून आणली जाते आणि मग राजपूत समाजासारखा शैव समाज सुद्धा सती प्रथा स्वीकारून बसतो हे जे काही युरेशियन राजकारण चालते ते राजकारण नीट तपासावे लागते उत्तर आधुनिकतेच्या साह्याने परंपरा आणि इतिहास पुन्हा पुन्हा रचण्याची सुवर्णसंधी सर्व शोषण कारी व्यवस्थांना मिळत गेली आणि आज अवस्था अशी आहे की भल्या भल्या लोकांचे भल्या भल्या देशांचे भल्या भल्या समाजांचे इतिहास या उत्तराधुनिक गंडवा-मांडवी करणाऱ्या इतिहासकारांच्या घरात गहाण पडत चाललेले आहेत त्यामुळेच इतिहासकारांना केवळ उत्तर आधुनिक भूतकाळ पाहून चालत नाही तर आत्ताच्या वर्तमान काळात इतिहासाच्या संदर्भात काय चालले आहेत तो फिनॉ मीना तपासणे गरजेचे बनते

श्रीधर तिळवे नाईक

इतिहासाचा इतिहास , फिनॉमिनोलॉजी ,उत्तर आधुनिकता आणि शैव भाग तिसरा श्रीधर तिळवे नाईक semi 

शैव समाजांच्या मध्ये जशी मातृसत्ताक पद्धत होती तशीच मातृसत्ताक पद्धत युरेशियन समाजांच्यामध्ये किंवा टोळ्यांच्यात होती का हा एक प्रश्न आहे आपल्याकडे शरद पाटील वगैरे लोकांनी असा स्टान्स घेतलेलाा दिसतो प्रत्यक्षामध्ये अशी पद्धत जर असती तर रामाच्या घरी सीता येण्याऐवजी सीतेच्या घरी राम गेला असता रामाच्या घरी सीता आली नसती हीच गोष्ट द्रौपदी बाबत द्रौपदी आपल्या वडिलांच्याकडे सुरक्षित राहिली असती आणि कुंती सुद्धा ! युरेशियन लोक भारतात आले तेव्हा ते पूर्णपणे पितृसत्ताकच होते तेव्हा उगाच फाटे फोडण्यात काही अर्थ नाही इथे त्यांचा संबंध शेतीशी आला आणि मग त्यांनाा  शैव लोकांच्या मातृसत्ताक प्रथा या आत्मसात करााव्या लागल्याा किंवाा  केल्या गेल्या त्यांची नि: ऋती ही देवता स्वीकारली गेली याचे कारण पुन्हा तेच होते मुळात स्त्रीला पुरुषापासून मुल होते हेच माहीत नव्हते आणि ते जेव्हा माहिती झाले तेव्हा आपोआपच पितृसत्ताक पद्धती अस्तित्वात आली मुळातच दुष्काळांच्यायामुळे हा शोध लागला असावा कारण पाऊस पडला नाही की भूमी कोरडी आणि रुक्ष होत जाते आणि पीक उगवत नाही आरण्य उगवत नाही इतके हळूहळू उमजत गेले आणि त्यातूनच हा शोध लागला की शेवटी वीर्य नावाचा पाऊस लागतो.

भारताच्या इतिहासामध्ये नेहमीच एक प्रश्न उपस्थित करणे आवश्यक ठरते ते म्हणजे जमिनीच्या सुफलीकरणासाठी पुरुषाचा मेध युरेशियन लोक करत होते का ? नरमेध वा पुरुषमेध हा यज्ञाचा एक पद्धत म्हणून विकसित झाला होता असे दिसते हे पुरुषाचे महत्त्व वाढवण्यासाठी होते की प्रतीकात्मक होते ? ज्याप्रमाणे पुरुषाचे वीर्य नाहीसे होते स्त्रीच्या पोटात त्याचप्रमाणे पुरुषाला प्रतिकात्मकरीत्या जमिनीमध्ये गाडले किंवा जमिनीला चढवले की तो गायब होतो आणि मग जमीन सुफलीत होते असा काही तर्क यामागे होता का हा एक फार मोठा प्रश्न आहे 

पुरुषप्रधान व्यवस्थेने शैव लोकांच्या मातृसत्ताक व्यवस्था आपल्या ताब्यात याव्यात म्हणून रामायण व महाभारत ही महा काव्ये रचली का हा त्या पुढचा प्रश्न आहे 

म्हणजे दिसते असे की रावण हा मातृसत्ताक श्रीलंकेत राज्य करत आहे श्रीलंका मुळात मंदोदरीशी आहे रावणाची नाही आणि रावण महाराष्ट्रातून श्रीलंकेत गेलेला आहे हे शैव मातृसत्ताक राजवटीतले सर्वात बलाढ्य साम्राज्य होते त्याचा पाढाव निदान काल्पनिक पातळीवर करणे युरेशियन लोकांना आवश्यक होते आणि म्हणूनच त्यांनी रामायण रचले भ्रमात्मक विजय पुराण आणि महाकाव्यातून साजरे करायचे आणि मग ते वास्तव होते असे पटवायचे असे हे राजकारणाचे इतिहासकारण आहे किंवा इतिहासाचे राजकारण आहे सुरुवात शैव राजवटीने करायची आणि मग शेवट पुरुषप्रधान युरेशियन विजय दाखवत करायचा 

म्हणजे जनपद ही शैवांची मातृसत्ताक व्यवस्था म्हणूनच दशरथ नासिक जनस्थान सोडून कोसल मध्ये जातो कोसल मध्ये कौशल्या राणी असते आणि तिचे मातृसत्ताक वर्चस्व असते त्यांची कुलदेवता महाकाली असते शैव प्रथेप्रमाणे रामाने जानकीच्या घरात जायला हवे पण राम जानकीच्या घरी जात नाही उलट जानकीला कोसल मध्ये घेऊन येतो आणि इथूनच पितृसत्ताक वर्चस्व सुरू होते यामागे कोण आहे तर विश्वामित्र व वशिष्ठ नावाचे दोन युरेशियन ऋषी मुळात दशरथाच्या दरबारामध्ये यांना स्थान मिळालेले आहे त्याचे कारण त्याला पुत्रप्राप्ती होत नाही आणि या लोकांच्या मुळे आपल्याला पुत्रप्राप्ती झाली म्हणून मग इथे पुत्रसत्ताक राजवटीचे आरंभाचे उद्योग शिरलेले दिसतात इथे राम जन्मापासूनच युरेशियन राजकारणाचा प्रारंभ होतो आणि मग सर्व पॉलिटिक्स सुरू होते आणि युद्धही होते आता जानकी पुन्हा अयोध्येतच म्हणजे सासरी परतते फक्त तीच अशी आहे की जी जनकाची मुलगी आहे की नाही याबद्दल शंका आहे कारण ती धरतीवर सापडली असा उल्लेख आहे आणि लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी की तिलाच शेवटी वनवास भोगावा लागतो जनकाच्या इतर कन्यांना वनवास भोगावा लागत नाही कारण त्या पितृसत्ताक संस्कारामध्ये वाढलेल्या आहेत आणि त्या तिथेच सासरमध्येच सुखाने राहतात 

हा मातृसत्ताक आणि पितृसत्ताक यांच्यातला लढा आहे तो मुळात सुरू कधी झाला तर मी मागेच म्हटल्याप्रमाणे हे सगळे ज्ञानाचे प्रताप आहेत जोपर्यंत स्त्री स्वतःच मुलाला जन्म घालते असे अंधश्रद्धात्मक गृहीतक होते तोपर्यंत स्त्री राज्ये चालली जसे पुरुषाला कळले की आपल्याशिवाय स्त्रीला मूल जन्माला घालता येत नाही तसे पुरुषांनी त्यांच्या शारीरिक बळाच्या जीवावर स्त्रियांच्यावर प्रभुत्व निर्माण केले आता या सगळ्या गोष्टींच्याकडे कसे पाहता येईल कारण शेवटी स्त्रीच्या शरीराजवळ मुलाला जन्माला घालण्याची ताकद असते त्याचे काय करायचे पुरुषाची शारीरिक ताकद वेगळी आणि स्त्रीची शारीरिक ताकद वेगळी असे आता स्पष्ट दिसते पण समजा आता स्त्रीमुक्ती चळवळीमध्ये पुढचा जो टप्पा आलेला आहे त्यामध्ये मुलाला जन्मच द्यायचा नाही असा आग्रह असेल तर मग स्त्री पुरुष संबंधांचे समीकरण बदलणार कसे आहे ?

सर्व ज्ञानात्मक पातळीवर तपासायचे असेल तर त्यामागे मुळातच एक प्रश्न आहे तो असा की मनुष्य हा जर प्राणी आहे तर हा प्राणी नेमका पुरुष आणि स्त्री यांना पाहतो कसा ? एक नर म्हणून आणि एक मादी म्हणून हे एकमेकांना कसे पाहतात ?त्यांच्या नैसर्गिक प्रक्रिया काय असतात ? वर्तमान काळाच्या संदर्भामध्ये हा फिनॉमिना समजून घेणे फार आवश्यक आहे कारण त्याशिवाय ह्या प्राचीन गोष्टी समजणे अशक्य वाटते सीमां डे बुवाच्या  सेकंड सेक्स या पुस्तकानंतर एक काळ असा होता की स्त्रिया सर्व प्रकारच्या त्यांच्या स्वभावदत्त गोष्टींना पुरुषप्रधान व्यवस्थेला जबाबदार धरत होत्या आता मात्र असे म्हणता येत नाही आणि इतक्या सहजासहजी या सगळ्या प्रश्नांच्यातून सुटकाही होणार नाही मुळात माणसाचे वैज्ञानिक नर म्हणून आणि मादी म्हणून काय नाते आहे हे आता तपासायची वेळ आलेली आहे प्राण्यांच्या मध्ये काही प्राणी असे आहेत की जिथे मादी नराला खाते किंवा संभोगानंतर नाहीशी करते माणसांच्या मादीमध्ये असे काही आहे का ? किंवा मग पुरुषांमध्येच निसर्ग दत्त माकड उड्या आहेत का ? आत्तापर्यंतचे तरी पुरावे असं सांगत नाहीत मात्र मुलांचा जन्म झाल्यानंतर स्त्रियांचा त्याच्या पुरुषातला लैंगिक इंटरेस्ट संपतो का हे मात्र वैज्ञानिक पातळीवर तपासणे आवश्यक आहे मुलांच्या शिक्षणासाठी येणारा खर्च त्यांच्या पालनपोषणसाठी येणारा खर्च आता इतका अवाार्ड हवे अवाढव्य होत गेला आहे की मुले नकोत अशी  वृत्ती वाढत चाललेली आहे आता ही काही नैसर्गिक भावना नव्हे तर ही सामाजिक आणि आर्थिक संरचनेतून आणि नेटवर्क मधून आलेली भावना आहे स्त्रिया या गोष्टी नीट समजून घेत आहेत का त्यांना हे कळते का की हे आर्थिक नेटवर्क लाभलेले नकारात्मक थिंकिंग आहे ? भूतकाळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे पुरुषसत्ताक राजवटींनी स्त्रियांच्यावर नकारात्मक थिंकिंग लादलेले नव्हते का ? माणसाचा स्वभाव जितका जन्मदत्त असतो जनुक दत्त असतो त्याहून अधिक तो जालदत्त असतो म्हणजेच समाज दत्त ही असतो आणि शेवटी सगळा निर्णय ते संपूर्ण व्यक्तित्व ते मग स्त्रीचे असो किंवा पुरुषाचे असो कुठल्या बाजूने झुकत जाते त्यावर बऱ्याचशा गोष्टी ठरत जातात काही लोक समाज दत्त लाच स्वदत्त समजायला लागतात तर काही स्वदत्त साठी  समाजदत्त वापरायला शिकतात सामाजिक चलाखी आणि वैयक्तिक चलाखी ही माणसाच्या निसर्गदत्त आहे अगदी स्त्री पुरुष संबंधात सुद्धा या संदर्भात अधिक चला कोण हाच प्रश्न  उरतो बायका ही पुरुषांना वापरायला शिकलेल्या आहेत किंवा कदाचित त्यापूर्वीही वापरतच होत्या आणि पुरुष तर पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे यामध्ये संस्कारदत्त  प्रवीण झालाय 

साहजिकच त्यामुळे आता अशी वेळ आलेली आहे की स्त्री-पुरुषांच्या संदर्भामध्ये आता आपणाला क्वांटम आणि पोस्ट क्वांटम भूमिका स्वीकारावी लागणार आहे म्हणजे असे की स्त्री आणि पुरुष एकमेकाला कोणत्या जागेवरून आणि नेटवर्क मधून त्यांचे कोणते अंग पाहतात त्यावर त्यांचे त्यासंदर्भातले अनुभव आणि ज्ञान अवलंबून असतात असे आता म्हणता येईल का ? त्याचबरोबर आपणाला स्त्री आणि पुरुष यांच्या आत मध्ये जी हेतूग्रस्तता आणि त्याहून खोलात आसक्ती असते तत्कालीन आसक्तीवर हे आकलन अवलंबून असते का ? आसक्तीग्रस्तता ही नेमकी यासंदर्भात काय रोल निभवते याचे आकलनभान फार आवश्यक होऊन बसते 

पार्वती ही शंकराच्या प्रेमात पडली आणि तिने हिमालयापर्यंत तिचा पाठलाग केला ही शैव कथा असते पण जेव्हा हीच कथा युरेशियन लोक सादर करतात तेव्हा मग ती शंकरामध्ये रुद्राला मिसळतात ब्रह्मदेवाला आणतात आणि मग ब्रह्मदेव नारदामार्फत पार्वतीला पटवतो की त्रिपुरासुराचा अंत होण्यासाठी तुला पुत्र जन्मा ला घालावा लागेल आणि त्यासाठी काम नावाच्या देवाला मग शंकराच्या आत काम प्रज्वलित करण्यासाठी पाठवले जाते आणि एका मिशनसाठी म्हणून हे लग्न होते हे मिशन अर्थातच एका असुराला मारण्याचे आहे आपल्याकडे दीपक चोपडांच्या सारखे सोकॉल विचारवंत सुद्धा असल्या दंतकथा सांगत बसतात कारण इलेक्शन लोकांना काही करून शंकर हा रुद्र म्हणून आत्मसात करायचा असतो आहे जे युरेशियन पॉलिटिक्स आहे ते समजून न घेता जर का आपण इतिहास पाहायला लागलो तर सगळा गोंधळ उडायला लागतो इथे आत्ताचा वर्तमान हा कुठली कथा निवडायची हे ठरवतो म्हणजेच इथे अधिकारांना शंकरा जवळ आहे ना पर्वती जवळ आहे नंतरचे लोक ठरवत आहेत की ते नेमके काय होते आता इतिहासात हा जो वर्तमान दत्त भूतकाळ ठरवण्याचा अधिकार इतिहासकार आला प्राप्त होतो तो बरोबर की योग्य असा प्रश्न आता आपण विचारायला पाहिजे इतिहास असत नाही इतिहास वर्तमान काळातला इतिहासकार त्याच्या वर्तमानानुसार आणि त्याच्या हितसंबंधांनुसार रचतो हे भारताच्या जर का आपण दंतकथा पाहिल्या तर आपल्याला जास्त स्पष्ट होते त्यातली वाईट गोष्ट ही असते की शैवदंत कथेमध्ये नसलेली सती सती प्रथा रूढ झाल्यानंतर मुद्दाम म्हणून आणली जाते आणि मग राजपूत सारखा शैव समाज सुद्धा सती प्रथा स्वीकारून बसतो हे जे काही युरेशियन राजकारण चालते ते राजकारण नीट तपासावे लागते उत्तर आधुनिकतेच्या साह्याने परंपरा आणि इतिहास पुन्हा पुन्हा रचण्याची सुवर्णसंधी सर्व शोषण कार्य व्यवस्थेला मिळत गेली आणि आज अवस्था अशी आहे की भल्या भल्या लोकांचे भल्या भल्या देशांचे भल्या भल्या समाजांची इतिहास या उत्तराधुनिक गंडवा-मांडवी करणाऱ्या इतिहासकारांच्या घरात गहाण पडलेले आहेत 

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे