इतिहासाच्या नि: वजनीकरनाचे युरेशियन प्रयत्न श्रीधर तिळवे नाईक
14जुलै 24
गेली तीस वर्षे भारतीय इतिहास लेखनामध्ये जे काही घडते आहे त्यातील इतिहासाचे नि: वजनीकरण ही एक फार गुंतागुंतीची घटना घडते आहे ही युरेशियन श्रुतीतून आलेल्या लोकांच्याकडून घडत असल्याने तिचा मीडियावर प्रचंड परिणाम होतानाही दिसतो आहे ही प्रक्रिया नेमकी काय आहे हे समजायचे असेल तर प्रथम इतिहासाचे ओझे ही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे वेट ऑफ हिस्ट्री समजून घेणे आवश्यक आहे
कुठलीही प्राचीन संस्कृती ही सभ्य नव्हती तिच्यात गुलामगिरीच्या अनेक प्रथा आणि संरचना उपस्थित होत्या या संरचना ज्यांनी उभ्या केल्या त्यांना साहजिकच एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात प्रश्न विचारले गेले आणि यातूनच आपल्या पूर्वजांनी केलेल्या पापाचे ओझे शोषकांच्यावर पडत गेले भारतात प्रामुख्याने स्वतःला पुण्य योनी म्हणवून घेणाऱ्या लोकांच्यावर हे ओझे पडत गेले हे ओझे इतके होते की त्या दबावाखालीच राखीव जागांचे धोरण मान्य केले गेले शेवटी पिढ्यान पिढ्या आपल्याकडून झालेल्या अन्यायाची भरपाई आपण करायला हवी असे ह्याच वर्गातील अनेकांना वाटत होते साहजिकच राखीव जागा देणे, प्रोत्साहनपर लिखाण करणे आणि स्वतःला झालेला पश्चाताप सतत व्यक्त करणे अशा प्रोसेस घडत होत्या. मी ह्या प्रोसेस ना इतिहासाचे ओझे वाहणे म्हणतो उदाहरणार्थ दलित साहित्याच्या संदर्भात पु ल देशपांडे यांनी कायमच अशा प्रकारचे प्रोत्साहन पर लिखाण केले कारण आपल्या ब्राह्मण किंवा क्षत्रिय पूर्वजांनी जे काही दलितांच्या बाबतीत केले त्याचा एक guilt त्यांच्या मनामध्ये असावा होता हा हिस्टॉरिकल गिल्ट होता आणि तो इतिहासात स्पष्टपणे दिसत असल्याने सर्वांनीच मान्य केला होता अलीकडे हा गिल्ट सर्वच ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या मनात मात्र नव्हता की काय अशी शंका येण्याइतपत युरेशियन लोकांच्या पैकी काही लोकांचे वर्तन बदलते आहे यातूनच अनेक गोष्टी घडतात घडत आहेत या मागचे एक तर्ककारण अत्यंत स्पष्ट आहे ते म्हणजे आमच्या आजोबांनी केलेल्या गुन्ह्यासाठी आम्ही फाशी का जावे दिसायला हा प्रश्न खूप सोपा वाटला तरी त्यामागे आम्ही समूह म्हणून जे शोषण केले त्याचे वजन आम्ही जितके व्हायला हवे तितके वाहिले आता आम्ही ते ओझे म्हणून वाहणार नाही असा हा सूर वजा इशारा आहे यातूनच अनेक गोष्टी इतिहासाच्या संदर्भात घडत गेल्या यातल्या दोन ठळक गोष्टी आपणाला दिसतात पहिली गोष्ट युरेशियन लोकांचे आपण बाहेरून आलेलो आहोत हेच अमान्य करणे आणि इथल्या शैव लोकांची सिंधू संस्कृती ही वैदिक संस्कृती म्हणून ताब्यात घेण्याचा झालेला प्रयत्न करणे दुसरी गोष्ट दलितांच्या वर काहीही अन्याय झालेला नाही आणि दलित साहित्य म्हणजे सामान्य दर्जाचे आणि खोटे साहित्य असे दर्शवणे
हे सगळे नेमके कशासाठी चाललेले आहे तर ह्याला मी इतिहासाचे नि: वजनीकरण म्हणजे डी वेटिंग हिस्टरी Deweighting History' किंवा Deweightification of History करण्याचा प्रयत्न म्हणतो म्हणजे पूर्वजांनी केलेल्या शोषणाचे वजन आम्ही आता वाहणार नाही असा ध्वनी यातून निघत असतो वास्तविक शोषण झाले ही वस्तुस्थिती वर्णव्यवस्था तुम्ही लादली ही वस्तुस्थिती जातीव्यवस्था तुम्ही लादली ही वस्तुस्थिती पण ही वस्तुस्थिती स्वीकारण्याएवजी अलीकडे ती खोटी आहे असे भासवणे सुरू झाले आहे.यातूनच एक प्रचंड मोठा युरेशियन खोटेपणा उभा राहतो आहे हा खोटेपणा आपल्याला नेमका कोणत्या दिशेने घेऊन जाईल याचा बहुतेक अनेक युरेशियन लोकांना अंदाज आलेला दिसत नाही आश्चर्याची गोष्ट अशी आहे की यामध्ये पूर्वी फक्त ब्राह्मण होते आता क्षत्रिय सुद्धा या नि: वजनीकरणात सामील होतात की काय अशी शंका येते आहे वास्तविक व्हायला काय हवे होते तर आमच्या पूर्वजांच्या कडून चुका झाल्या असे स्पष्टपणे कबूल करून आता आपण थोडा वर्तमानाचाच विचार करूया असे म्हणत वर्तमानात सर्व गोष्टी आणणे सुरू करायला हवे पण असे न करता या देशाचा भूतकाळच बदलण्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि हा प्रयत्न अंतिम पातळीवर एका मोठ्या संघर्षाकडे घेऊन जाणे अटळ आहे जणू काय बहुजन समाजाचे हात बांधले गेलेत आणि तो हे सारे मुकाटपणाने सहन करेल अशा भ्रमात काहीजण आहेत की काय अशी हल्ली मला शंका येते आहे कुठलीही मस्ती ही एका मर्यादेपर्यंतच खपवली जाते हे मर्यादा गेल्या हजार वर्षात कधीच ओलांडली गेलेली आहे ती आता पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनात घेऊन येणे सुरू झाले तर त्याचे अत्यंत वाईट परिणाम होणे अटळ आहे एक प्रकारच्या दुफळीकडे सर्व घेऊन जाणारे आहेत यातील पहिला मोठा उद्योग हा प्रामुख्याने राखीगढी आणि सिनोली येथील उत्खननाच्या संदर्भात घडलेला आहे वास्तविक जेनेटिक टेस्टने निर्विवादपणे युरेशियन लोकांचा डीएनए सिद्ध केलेला असताना राखीगाडीतले डीएनए टेस्टिंगच बदलण्याचा प्रयत्न झाला आणि निष्कर्ष स्पष्ट आणि स्वच्छपणे बदलणे सुरू केले यात आश्चर्यकारकरित्या वसंत शिंदे यांच्यासारखा विचारवंत सामील होता आणि आहे या जगामध्ये सर्वत्रच स्थलांतरे झालेली आहेत त्यात वाईट काय आहे यामधला एक मोठा विरोधाभास बहुजन समाजाकडून आहे तो म्हणजे मुसलमानांचे स्थलांतर योग्य पण ब्राह्मणांचे आणि युरोशियन लोकांचे स्थलांतर मात्र मूलनिवासी लोकांच्यावर आक्रमण ! आता अशा भूमिका तुम्ही घेतल्या तर त्या कशा चालतील ? वास्तविक सर्व धर्मियांची स्थलांतरे स्वीकारायला हवीत युरेशियन श्रुतीचे धर्म व स्थलांतर आपण स्वीकारणे त्यातील शोषण दाखवून देणे हेच उदारमतवादाचे मुख्य लक्षण आहे बहुजन समाजातल्या काही कट्टर लोकांना हे कळत नाही असे दिसते याला प्रतिकार म्हणून मग युरेशियन लोकांनी आम्ही मूळचे इथलेच अशी हाकाटी करायला सुरुवात केली हे सर्व तेथे थांबले असते तर प्रॉब्लेम नव्हता परंतु पुढे जाऊन इथल्या अनार्य शैव लोकांची संस्कृतीच हडपण्याचे प्रयत्न सुरू झाले. आता हे अनार्यांनीं कसे खपवून घ्यावे पुरावे म्हणावे तर ते कसलेच आलेले दिसत नाहीत केवळ पूर्वी पुराणे लिहिली जात तशी नवी पुराणे लिहिली जात आहेत असा पुराण लिहून इतिहास सिद्ध करण्याचा कालखंड कधीच संपला हे अनेकांच्या लक्षातच येत नाही असे दिसते अनेक ठिकाणी अर्थनिर्णयने सोयीस्कररित्या फिरवली जात आहेत उदाहरणार्थ सिणोली मध्ये धनुष्यबाणाचा पत्ता नाही आणि ही जागा महाभारताच्या युद्धाची म्हणून प्रमोट केली गेली आता हे कसे चालेल ? सापडल्या आहेत त्या फक्त ताम्र तलवारी आहेत तुम्ही पुरावे जर चुकीच्या पद्धतीने सादर करत असाल तर त्याचा प्रतिकार बहुजन समाजातील इतिहासकार करणारच ऋग्वेदात लोखंडाचा उल्लेख आल्याने ऋग्वेद लोहयुगात लिहिला गेलाय हे सर्व मान्य आहे मग तांबे म्हणजे ताम्रयुगातल्या गोष्टींना पुरावे म्हणून कसे स्वीकारता येईल ? साहजिकच इतिहास जाणीवपूर्वक भ्रष्ट केला जात आहे असे जर बहुजन समाजाला वाटले तर आश्चर्य ते काय ? गोष्टी दोन्ही बाजूने जेव्हा बिघडतात तेव्हा दोघांचे चुका दाखवून देणे आवश्यक असते मुळातच युरेशियन लोक कुठून आले हे इतिहासाच्या अभ्यासासाठी ठीक आहे परंतु वर्तमानात जगण्यासाठी ते हजारो वर्षे इथे जगत आलेत हे नाकारण्यात काही अर्थ नसतो जसा मुसलमानांचा भारतावर हक्क आहे तसाच या युरेशियन लोकांचाही इथे राहण्याचा हक्क आहे हे तुम्ही अमान्य केले म्हणून सगळा गोंधळ सुरू झालेला आहे दुसरी एक गोष्ट सातत्याने नजरेआड केली जात आहे ती म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय या वर्णांमध्ये केवळ युरेशीयन लोक आहेत असा करून घेतलेला गैरसमज वास्तविक काळ्या आणि सावळ्या रंगाचे अनेक लोक ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यात असतात या लोकांच्या मुळेच ऍक्च्युली आपण इथले आहोत असे यूरेशियन लोकांना वाटत असते आणि ह्या इथल्याच लोकांच्यातून ब्राह्मण आणि क्षत्रिय झालेल्या लोकांना तर आपण कसे काय परकीय असे वाटणे साहजिकच आहे कारण यांचा रंग काळा आणि सावळा आहे त्यांची अंगकाठी अंग यष्टी ही द्रविड आणि नाग संस्कृतीतल्या लोकांची आहे आता हे लोक आम्ही बाहेरून आलो आहोत हे कसे काय स्वीकारणार ? मला खात्री आहे या दोन वर्णातील किमान 50 टक्के लोकांचे जीन्स हा नॉनयुरेशीयनच असणारच तेव्हा गोष्टीतली गुंतागुंत सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे मूलनिवासी वादाचा सिद्धांत हा जरूर सामाजिक शास्त्राच्या संदर्भात मांडावा परंतु तो वर्तमानाच्या संदर्भात कोणी आपलाय करत असेल आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी अशा प्रकारच्या घोषणा करत असेल तर ती एक फार मोठी चूक असेल जगाच्या इतिहासात अमेरिकेसारख्या खंडातल्या यूएसए सारखा देश हा जस्ट सातशे वर्षाच्या स्थलांतरितांनी बनलेला आहे पण म्हणून कोणी त्यांना परत फिरा म्हणून सांगत नाही किंवा परत जा म्हणून सांगत नाही आणि इथे साडेतीन हजार वर्षांपूर्वी आलेल्या युरेशियन लोकांना आपण जर का परत जा म्हणून सांगत असू तर आपली काही वैचारिक गफलत आहे एवढं नक्की ! याला दिला जाणारा प्रतिसादही तितकाच चुकीचा आहे तुम्ही युरेशियन आहात हा प्रॉब्लेम नाहीये पण उच्चपणाचा माज आहे तो प्रॉब्लेम आहे तूम्ही जे तुमचे नाहीये त्यावर तुम्ही क्लेम करायला जाऊ नका इथे तुम्ही येण्याआधी संपन्न आणि समृद्ध विकसित आणि प्रगतीशील संस्कृती नांदत होती हे स्वीकारा इथले लोक म्हणजे काही वानर होते किंवा मागासलेले नरभक्षक होते हे जे काय नरेटिव्ह तुम्ही तुमच्या शोधनिबंधात वा महाकाव्यात सादर करत सुटलाय ते खपवून घेण्याच्या मनस्थितीत आत्ताचा बहुजन समाज नाहीये
अलीकडे दलित साहित्य संदर्भातही अचानक काही कट्टर युरेशियन लोकांनी उलटी भूमिका मांडायला सुरुवात केलेली आहे या सर्व कंड्या आहेत असे काही घडतच नव्हते वगैरे वगैरे जे काही चाललेले आहे आणि त्यातून दलित लोकांचे झालेले शोषण नाकारण्याचा जो उपद्व्याप सुरू केलेला आहे तो इतिहासाला धरून नाही दलित साहित्य म्हणजे फक्त शिवराळ साहित्य असा प्रचार करणे म्हणजे एका मोठ्या शोषणाची जबाबदारी नाकारणे अशा जबाबदाऱ्या नाकारून जर का इतिहासापासून सुटका करता आली तर आणखी काय हवे ? यावरचा खरा उपाय आंतरजातीय आणि आंतरवर्णीय विवाह हाच आहे तो कसा जास्तीत जास्त राबवता येईल ते न पाहता उलट आणखीनच काड्या टाकणार असाल तर समाजात दुफळी माजणे अटळ आहे
इतिहासाचा अभ्यास हा वर्तमान नीट करण्यासाठी करायचा असतो बिघडवण्यासाठी नाही याचे भान दोन्ही बाजूंनी लोपलेले दिसते हे भान दोन्ही बाजूंना आले तरच या लेखाचे सार्थक नाहीतर इतिहासातल्या तलवारी घेऊन लढायचे असेल तर लढत बसा त्याने नवा इतिहास घडणार नाही उलट इतिहासाचे एक जीर्ण पान तलवारीत म्यान होऊन उलटले जाईल जे वाचणे पुढच्या पिढ्यांना आणखीनच दुःखदायक बनेल इतिहासापासून काहीच न शिकणारे पूर्वज लोक अशी आपली नोंद होईल इतिहासापासून काहीच न शिकणारे लोक इतिहासातल्या चुका रिपीट करत जातात असे रिपीटर व्हायचे की नाही हे तुम्ही ठरवा बाकी तुमची मर्जी
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment