सिद्ध गौतम याचे पंचतंत्र श्रीधर तिळवे नाईक
गौतम बुद्धाच्या विचार करताना विचार करावयाची सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालीमध्ये गौतम बुद्धाचा उल्लेख सिद्धार्थ असा नसून सिद्धथ गोतम (siddhattha)असा आहे याचा अर्थच सिद्ध गोतम असा आहे त्याला बुद्ध असे म्हटले जात नव्हते बुद्ध ही संकल्पना सिद्ध या संकल्पनेनंतर आलेली आहे त्याचा काळ 566 ते 486 ईसा पूर्व असा सांगितला जातो आणि अलीकडे काही लोक तो 368 ते 404 इसापूर्व असाही मानतात बौद्ध परंपरेनुसार बुद्धाच्या मृत्यूनंतर पाचशे अर्हत राजगुह येथे जमा झाले आणि त्यामधून विनयपिटक आणि सुत्तपिटक तयार झाले अभीधम्मपिटक हे तिसरे पीटक असून ते नंतर तयार झालेले आहे पीटक या शब्दाचा अर्थच मुळात पाठांतराशी निगडित आहे जो सर्व मान्य अथवा लिखित केला गेला असा मौखिक पाठ हा त्याचा खरा अर्थ ! त्या काळामध्ये लिखित आवृत्ती तयार करणे हे प्रचंड खर्चाचे होते आत्ताच्या भाषेत सांगायचे तर करोडो रुपये मागणारे होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे राज्याच्या पाठिंब्याशिवाय लिखित संहीता या अवघड होत असत अलीकडेच तुकारामाची लिखित सहिता तयार करायला जवळजवळ एक करोड रुपये लागलेले होते असे सांगितले जाते आणि ही १९व्या शतकातली गोष्ट आहे बुद्धाच्या काळाच्यानंतर जो पिटककाळ आला त्यात हा खर्च निदान डबल तरी असावा हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्या काळामध्ये लिखाणासाठी लागणारे शाई व इतर साहित्य सामग्री प्रचंड महागडी होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे .
थेर म्हणजे थोर ! मराठी लोकांनी थेरवादा ऐवजी थोरवाद असेच म्हणणे आवश्यक आहे जेणेकरून त्यामागे किती थोर व गंभीर अर्थ आहे ते लक्षात यावे पाश्चात बुद्धिस्ट स्कॉलर साधारणपणे थोरवादाला जास्त महत्त्व देतात कारण तो इसवी सन पूर्व 250 च्या आसपास लिहिला गेलेला आहे हा थोर वाद हे सर्वात पहिले संहितेचे स्वरूप असावे आणि अलीकडे त्याचे जे वाचलेले रूप आहे ते फक्त पाली भाषेतले आहे प्रत्यक्षामध्ये तत्कालीन अनेक प्राकृत भाषांच्यामध्ये हे सर्व लिखाण त्यांची वर्जनस होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे पाली मधले वांग्मय वाचले कारण ते परदेशातही टिकले होते भारतात मात्र प्राकृत भाषेतले बौद्ध वांग्मय कुठे नष्ट झाले हा एक प्रश्न आहे अलीकडे एक प्रती सिद्धांत सुद्धा उदयाला आलेला आहे तो म्हणजे पाली स्कूल हे प्राचीन नसून ते प्रत्यक्षात पाली स्कूलनेच आपली प्राचीनता निर्माण केल्याने प्राचीन झाले आहे साहजिकच त्यामुळेच इतर देशी भाषांच्या कडे वळणे आणि त्या काय बुद्ध धर्माविषयी म्हणतात किंवा भारतातला लोकधर्म बुद्ध धर्माविषयी काय म्हणतो ते समजून घेणे आता काही विद्वान लोकांना आवश्यक वाटते म्हणजे उदाहरणार्थ अशोकाचे शिलालेख बुद्धाचा उल्लेख शाक्यमुनि असाच करतात तर मग हा जर मुनी होता तर मग बुद्ध कसा झाला असा प्रश्न आता निर्माण करता येतो किंवा चीनमध्ये पाली निकाय " निकाय "म्हणून येत नाहीत तर "आगम" ग्रंथ म्हणून येतात याचा अर्थ गौतम बुद्ध कदाचित स्वतःला आगम परंपरेतला म्हणूनच आणि सिद्ध म्हणूनच सादर करत होता आणि मौर्य घराण्यामध्ये जैन हे नाथ शैव धर्माचे असल्याने मुनी हा शब्द सहज स्वीकारला जात होता आणि म्हणूनच गौतम बुद्धासाठी शाक्य मुनी असा शब्द अशोकाने वापरलेला आहे पुढे आपणाला असे दिसते की नागार्जुन ,असंग आणि बसूबंधू हे तिघेही या आगम परंपरेशी परिचित होते आणि ते या निकायआगमपरंपरेला प्रमाण मानत होते मात्र तरीही बुद्धाचे मौखिक आणि नंतरच्या बौद्ध लोकांचे लिखित यांच्यात जे अंतर आहे ते अंतर तसेच राहते हे स्वीकारावे लागते मात्र मौखिक बुद्ध ऐतिहासिक होता म्हणूनच लिखित बौद्ध धर्म निर्माण झाला याबद्दल कोणीही शंका घेऊ नये बोधगयेमध्ये सिद्ध गोतमाने सांगितलेले धम्मचक्र परिवर्तनसुत्त हे या धम्माचा आरंभ होता याबद्दलही आता फारशा शंका उरलेल्या नाहीत आता अलीकडे प्रश्न एवढाउरला आहे की हे सूत्र(सुत्त ) सांख्य धम्माचे कितपत देणे लागते? बाबासाहेब आंबेडकर यांना प्रमाण मानायचे ठरवले तर हे सर्व प्रथम सांख्य धम्मामध्ये आलेले होते पण सिद्ध गौतम हा इथेच थांबतो का तर नाही तो पुढे अष्टांग मार्ग सांगतो पुढे जे दुसरे महत्त्वाचे सूत्र आहे ते अर्थातच कालाम सुत्त आहे जे आलार कलमाला सांगितले गेले परंपरेला प्रमाण मानू नकोस(हे इतके स्पष्ट सांगूनही परंपरेला प्रमाण मानणाऱ्या देशीवादाला स्वीकारणारे काही अतिशहाणे बौद्ध आहेतच ) कुठल्याही धर्मग्रंथाला किंवा पुस्तकाला प्रमाण मानू नकोस फक्त स्वतःच्या अनुभवाला प्रमाण मान असा उपदेश इथे दिलेला आहे म्हणजेच धम्मचक्रपरिवर्तनसुत्तात संसार काय आहे हे सांगितले जाते आणि तो दुःखाने भरलेला असल्याने निर्वाण हाच मार्ग आहे हे सांगितले जाते आणि मग आपणाला निर्वाणाचा मार्ग सांगितला जातो आणि मग या मार्गावर फक्त अनुभवाचे प्रामाण्य स्वीकारायला सांगितले जाते बुद्धाचा खरा आणि खरा उपदेश हाच आहे ज्याच्याबद्दल शंका घेता येत नाही सॉक्रेटिसच्या कितीतरी आधी बुद्धाने फक्त स्वतःलाच प्रमाण मानायला सांगितले होते बुद्धाला एका अर्थाने प्रागमॅटिक तत्त्वज्ञानाचा आद्य क्रांतिकारक मानता येईल असा हा उपदेश आहे
अर्थातच दिसत असणारा संसार दुःखाने भरलेला आहे मग दिसत नसलेल्या संसाराचे काय तर तिथेही गौतम बुद्ध अत्यंत व्यवहारी उपदेश करतो या जगाच्या किंवा विश्वाच्या आरंभी काय होते आणि शेवटी काय असणार किंवा हे विश्व आधी काय होते ते कसे अस्तित्वात आले वगैरे वगैरे प्रश्न त्याने सरळ सरळ नाकारलेच या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यात वेळ वाया घालवू नये असाच त्याचा उद्देश आहे अलीकडच्या काळात आपण असे म्हणू शकतो की ह्या प्रश्नांची उत्तरे आपण वैज्ञानिकांच्या वर सोपवावीत उगाच आपले डोके याबाबतीत खपवू नये त्यापेक्षा आपले लक्ष मोक्षाच्या साधनेवर असावे
म्हणजेच सिद्ध गौतम
१ अव्याकृत प्रश्नता
२ संसाराची दुःखमयता
३ अनात्मता बुद्ध आत्मा आणि नित्य जगत मानत नव्हता
३ निर्वाणाची उपाययोजना निर्वाण हेच अंतिम ध्येय
५ अष्टांग मार्ग आणि पंचशीलता
अशी पाच तंत्रे सांगतो त्यानंतर येणारे सर्व काही याचा या पंचतंत्राचा विस्तार आहे
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment