चीनमधील मोक्ष धर्म आणि बौद्ध श्रीधर तिळवे नाईक
भारताइतकीच समांतर अशी इतिहास लेखनात जी संस्कृती जाते ती म्हणजे चीनची संस्कृती साहजिकच तिथला इतिहास तपासणे भारतीय इतिहासकारांना अनिवार्य बनत जाते जगातल्या सर्वच देशांच्या प्रमाणे चीनमध्ये सुद्धा सुरुवातीला टोळी व्यवस्थेतून गण व्यवस्था आलेली होती आणि याचा एक मोठा परिणाम होत शेवटी तिथे श्रद्धेला शह देणारा असा मोक्ष जन्मला आणि त्याची सुरुवात लाओस्थेने केली होती त्याने तिथे ताओ नावाचा मोक्ष दिला
या मोक्षाला शह देण्यासाठी कोणीतरी येणारच होता तसा तिथे पंडिती टाईप धर्म आला ज्याला कन्फ्युशन जन्माला घातली होती कन्फ्युशियसने जन्माला घातले होते यामुळे तिथे अनेक भगत लोक बेकार झाले आणि हे काही ना काही तरी करणारच होते
कन्फ्यूशियसने जी सभ्य माणसांची लक्षणे सांगितलेली होती त्यामध्ये एक लक्ष हे सामावून घेणारी उदारता होते त्याच्यामध्ये सभ्य माणसे नवीन गोष्टी समजून घेतल्या की त्या आपल्या जीवनशैलीत सामावून घेतात आणि मूर्ख लोक सहमत होतात पण सामावून घेत नाहीत नाही म्हटले तरी या गोष्टीचा प्रचंड प्रभाव चीनमध्ये आजही आहे
त्यामुळेच चीनमध्ये आजही ज्यांचे बहुमत आहे म्हणजे साधारण किमान 90 टक्के लोक आहेत ते हान इसवी सन पूर्व 200 च्या आसपास सत्तेवर आले आणि त्यांनी 400 वर्षे राज्य केले म्हणजे इसवी सन 200 पर्यंत ! पण हळूहळू या साम्राज्याला घरघर लागली आणि कळत किंवा कळत कन्फ्यूशियस चे तत्वज्ञान स्कॅन खाली आले याच वेळेला सिल्क रूट तयार व्हायला लागला आणि साहजिकच हळूहळू का होईना परंतु चीन मधून भारतात येणे आणि भारतातून चीनमध्ये जाणे शक्य होऊ लागले अगदी हिंदू कुश पर्वतातून येणेजाणे सुद्धा शक्य होऊ लागले बुद्धाचा उपदेशच असा होता की जगभर जाऊन धर्माचा प्रसार करा बुद्धा आधी फक्त भगवान शंकराने असे सांगितले होते आणि शैव धर्म थेट व्हिएतनाम कंबोडिया पर्यंत पोहोचला होता भारतातले बाकीचे धर्म पूर्णपणे संकुचित होते आणि त्यांना भारताबाहेर राहण्याची इच्छाच नव्हती या सर्व धर्मांचे पुरोहित अत्यंत संकुचित स्वदृष्टीचे आणि आळशी आईतखाऊ होते पुढे शैव पुरोहितांनी अवगुण आत्मसात केले आणि शैव धर्माचा प्रसार थांबला या सर्वच भारतीय धर्मांना आपल्या धर्माचा प्रसार करण्यापेक्षा इथल्याच लोकांना exploit जास्त इंटरेस्ट होता बुद्ध धर्म मात्र असा नव्हता मुळात बुद्धानेच संघ स्थापन केला होता आणि संपूर्ण प्रचार करा अशी आज्ञा दिली होती साहजिकच चीनमध्ये सुद्धा काही बुद्धिस्ट भिखु पोचले आणि त्यांनी तिथे आपल्या बौद्ध धर्माचा प्रचार करायला सुरुवात केली या धर्माबाबत सर्वात आकर्षक वाटणारी गोष्ट विशेषत: चीनच्या क्षत्रिय शासक वर्गाला होती ती म्हणजे खुद्द गौतम बुद्ध हा स्वतःला शास्ता म्हणजेच एका अर्थाने राजाच म्हणवून घेत होता आणि मुख्य म्हणजे त्यांच्या दृष्टीने गौतम बुद्ध नेपाळमध्ये जन्मलेला असल्याने तो एका अर्थाने पिवळ्या संस्कृतीतलाच माणूस होता आजही चीन मधल्या बुद्धाच्या सगळ्या मूर्ती त्याला चायनीज लुकच देतात किंबहुना जगभरातल्या गौतम बुद्धाच्या मूर्ती या चेहऱपट्टीने प्रामुख्याने चायनीजच आहेत
सिल्क रूट हा प्रामुख्याने भारतामध्ये पणी आणि वाणी वापरत होते आणि गौतम बुद्धाला या लोकांच्या मध्ये प्रचंड फॉलोविंग होते या लोकांनीच प्रथम सिल्क मार्गावरून बौद्ध धर्म वहन केला आणि तिथून तो चीनमध्ये गेला या काळामध्ये याच पणी व वाणी लोकांनी चंपा राज्यात म्हणजेच आत्ताचा दक्षिण व्हिएतनाम मध्ये शैव धर्म पोहोचवला होता यांच्याच द्वारे बौद्ध भिकू प्रथम चंपा राज्यात म्हणजेच दक्षिण व्हिएतनामध्ये पोहोचले आणि मग तिथून ते चायनात पोचले हा सामुद्री मार्ग होता
म्हणजेच भूमी मार्गाने आणि जलमार्गाने चीनमध्ये बौद्ध धर्म दाखल झाला आणि ज्याची पार्श्वभूमी शैव लोकांनी कळत नकळत तयार केली होती मुळात हा धर्म प्रचंड अहिंसक असल्याने व्यापारी लोकांना व्यापार करायला ज्या शांतीची आणि सुव्यवस्थेची गरज होती ती त्यामध्ये मुबलक भागवली जात होती
आणि नेमका याच वेळी अशोकाचा उदय झाला आणि अशोकाने व्यापार वाढवा म्हणून अनेक चांगली धोरणे राबवली आणि बौद्ध धर्म प्रसाराला मदतच केली त्याच्यामुळेच हळूहळू चीनच्या दिशेने वाटचाल करण्याच्या वाटा खुल्या होऊ लागल्या तो सुरुवातीला शैव होता त्यामुळे साहजिकच शैव लोकांच्या सर्व वाटा बौद्ध प्रचारकांना ओपन झाल्या दावो अन् किन घराण्याची जी काही कागदपत्रे आता उपलब्ध होत चाललेत त्यावरून दिसते ते असे की साधारणपणे इसापूर्व २४३ मध्ये सर्वात प्रथम दहा बौद्ध भिकू जे भारतातून निघाले होते चीनमध्ये पोहोचले त्यांनी राजाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला पण परिणाम उलटा होऊन त्यांना राजाने अटक केले पण डायमंड बॉडी मॅन असे ज्याला म्हटले जाते तो आला आणि त्याने त्यांची सुटका केली आणि ह्या चमत्कारामुळे राजाने बौद्ध धर्म स्वीकारला यातला चमत्काराचा भाग काढला तर दिसते असे की यांच्या बद्दल ज्यांना सहानुभूती होती अशा एका सुरक्षारक्षकाने त्यांना सोडवले असावे शी लिंग फिंग हा यांचा प्रमुख होता आणि तो अशोक राजाने पाठवला होता की नाही याबद्दल आजही भरपूर मतभेद आहेत एक सिद्धांत असा आहे की किंग उदी याला त्याच्या सेनापतीने बुद्धाचा सुवर्ण पुतळा दिला होता अर्थात आता या सिद्धांताला फारसा अर्थ ओढलेला नाही कारण हा पुतळा बुद्धाचा नव्हता हे सिद्ध झाले आहे तो Xiong nu या चायनीज देवतेचा होता हे आता सिद्ध झाले आहे. मुळातच पुरवितांच्या पुरवहितांच्या पूर्वहितांच्या पुरोहितांच्या आहारी तोपर्यंत बौद्ध धर्म गेला होता त्यामुळे बुद्धाच्या नावाने खोटे रचणे सुरू झाले होते त्यामुळे असा पुतळा किंवा एका राजाला संपूर्ण राजवाड्यावरच बुद्ध दिसणे आणि मग त्याने चौकशी करणे आणि मग मंत्री ने भारतातल्या आकाशात उडू शकणाऱ्या गौतम बुद्ध विषयी बोलणे अशा कथा दिसतात या अशा कथा महायान समाजाला मी शैव बौद्ध म्हणतो संप्रदायात जास्त होत्या येथे बुद्धाचे रूपांतर देवतेत झालेले होते जय जय शंकर त्याच्या कथेमध्ये करत होता ते ते सर्व बुद्ध करायला लागला होता आणि चीनमध्ये जो बौद्ध धर्म पसरला तो सगळा महायानी असाच होता एकंदरच मीन राजाच्या राजवटीत काही बौद्ध भिक्खू पोहोचले आणि त्यांचे स्वागत राजाने केले आणि तिथूनच पुढे दोन हजार वर्ष बौद्ध धर्म पसरत राहिला अशी एक मांडणी आहे आणि अनेकदा बौद्ध एनसायक्लोपीडिया मध्ये ती असते.
एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे भारतातून काही बौद्ध भिक्खू तिथे गेले चीनच्या राजाने सुरुवातीला विरोध केला हा राजा कोण हा वाद विवादाचा विषय तो आपण सोडून देऊ परंतु कालांतराने त्या बौद्ध भिक्खूंच्या वागण्यामुळे त्याच्यावर प्रभाव पडून त्याने त्यांचे म्हणणे ऐकले आणि नंतर हळूहळू आपल्या दरबारातून काही प्रवासी भारतामध्ये पाठवायला सुरुवात केली आणि त्यांनी घोड्यांच्या वर आणि इतर प्राण्यांच्या वर लादून अनेक बौद्ध ग्रंथ चायना मध्ये आणले त्यांचा अनुवाद केला आत्ताच्या चीनच्या सरकारने त्यामुळेच हे हायपोथेसिस स्वीकारून 1998 मध्ये बुद्ध धर्माचे चीनमध्ये झालेल्या आगमनाचे 2000 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उत्सव साजरा करायला परमिशन दिली आणि आता ऑफिशिअली आपण असे म्हणू शकतो की इसवीसन पूर्व 2 ला मिंगराजेच्या राजवटीत बौद्ध धर्माची सुरुवात झाली म्हणजे एका अर्थाने चायना हा दोन आयात झालेल्या विचारवंतांचे ऋण मानतो पहिला गौतम बुद्ध आणि दुसरा कार्ल मार्क्स बाबासाहेब आंबेडकरांनी या दोघांना एकत्र पाहिले होते परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी चायना मध्ये झाली की काय अशी आता शंका येते आहे
आजही चीनमध्येFo shuo si shi er zhang jing qian shi (佛說四十二章經淺釋) हे 42 विभागात विभागले गेलेले पुस्तक बौद्ध धर्माचा आदिग्रंथ मानला जातो कारण हा ग्रंथ भारतामधून बहुदा संस्कृत मधून चीनमध्ये भाषांतरित झाला आणि इथूनच चीन मधल्या बौद्ध धर्माची सुरुवात झाली असे मानले जाते
याचा अर्थ स्पष्ट आहे सर्व धर्माप्रमाणे शैव धर्माप्रमाणे तिथेही सुरुवातीला ताओ नावाची मोक्ष श्रुती आली मग शैव लोकांची अर्थशास्त्र केंद्री मांडणी आली तशीच कन्फ्यूशियसची कर्मकांडात्मक अशी धर्मपद्धती आली जिचे हळूहळू ब्राह्मणीकरण होत गेले आणि मग ज्याप्रमाणे भारतात श्रमण पद्धत उदयाला आली त्याचप्रमाणे चीनमध्ये सुद्धा बौद्ध धर्माच्या नावाखाली एक श्रमण पद्धत उदयाला आली हा क्रम भारतासारखा असल्यामुळे चीन आणि भारत यांचा विकास सारख्याच पद्धतीने झाला असे आता दिसते भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकर झाले चीनमध्ये माओ त्से तुंग झाला मात्र आंबेडकर सर्व लोकांना घेऊन जाण्यामध्ये यशस्वी झाले नाहीत पण माओ मात्र यशस्वी झाला त्यामुळे जो फरक पडला तो पुढे पुढे अधोरेखित होत गेला हे घडण्याचे सर्वात मोठे कारण भारतातील वर्णव्यवस्था या काळामध्ये पुन्हा एकदा हिंदू धर्माच्या नावाखाली इंग्रजांच्या राजवटीत दाखल झाली तिने मुळे धरली आणि बा कायदा हिंदू धर्म नावाचा एक धर्म जो सर्वांना गिळत गेला स्थापन झाला आणि ज्यावर ब्राह्मण धर्माचेच प्रभुत्व होते चीनमध्ये ब्राह्मण नव्हते आणि त्याचा चीनला प्रचंड फायदा झालेला दिसतो ब्राह्मणांनी कधीही धर्म मोक्षाचा विसर पडू दिला नाही माओने मात्र या दोन्ही गोष्टी फेकून दिल्या याचे कारणच तिथे जी लाओ त्से ते गौतम बुद्ध अशी नास्तिक परंपरा होती तीच मुख्य होती त्यामुळे तिथे सहजच मोक्ष सुद्धा फेकून देता आला मात्र माझा अंदाज चुकला नाही तर चीनमध्ये आज ना उद्या मोक्ष म्हणजेच निर्वाण पुन्हा परतेल मात्र त्याचा चीनला फायदा होईल की तोटा होईल हे सांगणे मात्र कठीण आहे कारण मोक्षाचे पुरोहितीकरण होऊ शकते आणि ते झाले की मोक्ष हा धर्मा इतकाच भीषण होऊन जातो.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment