शैव श्रुती
शैवाने पंचायतन कसे निवडावे आणि कुठले निवडावे किंवा पुजावे श्रीधर तिळवे नाईक
भगवान शंकरांनी दिलेले पहिले पंचायतन हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे याला मी आद्यपंचायतन म्हणतो तेच प्रथम सर्वात पुजावे किंवा आचरण करावे हे पुढील प्रमाणे
१ शिव
२शक्ती
३संसार अथवा भवसागर त्यातील जीव
४ईश्वर आणि
५ मोक्ष
यानंतर आद्य शैव-धर्मातील पंचसिद्ध आपण पुजावेत ते पुढील प्रमाणे
१ भगवान शंकर किंवा त्यांची विविध रूपे जसे महादेव किंवा भैरव किंवा मार्तंड
२ माता पार्वती किंवा भगवती पार्वती किंवा तिची विविध रूपे जसे सुंदरा मीनाक्षी कामाक्षी किंवा शांभवी किंवा तुळजाभवानी किंवा गौरी किंवा महामाया किंवा प्रचंडी (चंडी) किंवा हरा
३ गणपती अथवा वृषभनाथ
४ कुमार स्कंद कार्तिकेय किंवा त्याची रूपे महाराष्ट्रात खंडोबा किंवा दक्षिणेत मुरुगन
५ नंदी आद्य शिवभक्त
या काळात आलेले दशनायक आपण जागते ठेवले पाहिजेत
१ यम
२ हिरण्य
३ हिरण्यकशपू
४ बळी
५ नरकासुर
६ सुवास ( दुर्वास)
७
८ झरतृष्ट
यानंतर आलेले तिसरे हे लोकदशायतन आहे ते लोकधर्मातून पुढे आलेले आहे ते पुढील प्रमाणे आहे
१ नकुलिश
२ पतंजली नाथ
३ कपिल
४ भगवान महावीर
५ गौतम बुद्ध
६ नयनार संत
७ सिद्ध नाथ वज्र यान
८ बोधी धर्म
९ मच्छिंद्रनाथ अथवा
१० गोरखनाथ अथवा इतर नाथ महाराष्ट्रात निवृत्तीनाथ
यानंतर पुरोगामी शैव अथवा मोक्ष उदयाला आलेले आहेत यांना मी पुरोगामी पंचायतन म्हणतो ते पुढील प्रमाणे आहे
१ बसवेश्वर गुरू (हे चांभार होते आणि त्यांचे नाव आता गायब केले गेलेले आहे)
२ बसवेश्वर वा बसवाण्णा
३ अक्क महादेवी
४ निवृत्तीनाथ
५ गुरुनानक
याशिवाय ह्या काळातील पुढील दशनायकांचा जागर आपण सतत जागता ठेवला पाहिजे
१ छत्रपती शिवाजी महाराज
२ छत्रपती संभाजी महाराज
३ पहिले बाजीराव पेशवे
४ अहिल्याबाई होळकर
५ यशवंतराव होळकर
६ गुरू गोविंद सिंग
७ राजा रणजित सिंग
८महात्मा ज्योतिराव फुले
९ सावित्रीबाई फुले
१० बाबासाहेब आंबेडकर
आधुनिक कालखंडातील पुढील पंचायतन आपण पुजले पाहिजे आणि आचरणात आणले पाहिजे
१ काडसिद्धेश्वर
२ साईनाथ अथवा साईबाबा
३ गुर्जिफ
४ जे कृष्णमूर्ती
उत्तरआधुनिक पंचायतन पुढीलप्रमाणे
१ भैरवी ब्राम्हणी
२ रामकृष्ण परमहंस
३ प्रभात रंजन सरकार आनंद मार्ग
४ यू जी कृष्णमूर्ती
५ सद्गुरू
श्रीधर तिळवे नाईक
मुकुंद टांकसाळे यांचा प्रश्न आणि त्याला दिलेले उत्तर श्रीधर तिळवे नाईक
प्रश्न :व्यक्तींशिवायही वासना आसक्ती असते त्यांचेपासूनच्या सुटकेचा ही विचार यात असणं अपेक्षित नं?
श्रीधर तिळवे नाईक : असनेला दोन दिशा असतात पहिली आसेची जी नेहमीच शिव दिशेने जायला धडपडत असते म्हणजे शून्याच्या दिशेने जाण्यासाठी धडपडत असते जिच्यातून असोशी निर्माण होते आणि दुसरी आसक्तीची जी नेहमी शक्तीच्या म्हणजे अनंताच्या दिशेने जायला धडपडत असते प्रसरण पावत असते जिच्यातून १ कामना :ही प्रामुख्याने इंद्रियांच्या संदर्भात असते अनुभव घेण्याची आसक्ती यातूनच निर्माण होते काम यातूनच निर्माण होतो आकर्षण यातूनच निर्माण होते
२ वासना :ही अन्न जल वस्त्र निवारा आरोग्य आणि ज्ञान यांच्या संदर्भात असतं अनेकदा पैसा हा यांच्या देवाणघेवाणीसाठीच निर्माण झालेला असतो हिच्यातूनच लोभ निर्माण होतो अगदी घरावर सुद्धा अनेकदा आपण शुभ लाभ असे लिहितो
३ श्वसना :ही नेहमी कर्माचे फळ मिळावे म्हणून फळाच्या संदर्भात असते हिच्यातूनच इच्छा निर्माण होते फलप्राप्तीची इच्छा त्यामुळेच सर्व धरून असतात जुडाईक धर्मामध्ये तर इच्छा म्हणजेच डिझायर फळं पाहून उगवते आणि फळाविषयीची वासना जागी होते आणि ईव्हचा संसार सुरू होतो तेथे सुद्धा संसार ईव्हनेच थाटलेला आहे फक्त या गोष्टीला पाप मानले गेलेले आहे आपण असे मानत नाही उलट संसाराला आपण शिवशक्तीची लीला म्हणतो
४ ममता :ही नेहमी नात्यांच्या संदर्भात असते हिच्यातूनच ममत्व म्हणजे माझे माझे म्हणणारे माझेपण निर्माण होते माझी आई माझा बाप माझा भाऊ माझी बहीण माझी बायको माझी मुले माझा बॉयफ्रेंड माझी गर्लफ्रेंड वगैरे
५ महत्वाकांक्षा :ही नेहमी कीर्तीच्या प्रसिद्धीच्या म्हणजेच स्वतःचे महत्व वाढवण्याच्या म्हणजेच महत्त्वाच्या संदर्भात असते हिच्यातूनच लोलूपता निर्माण होते प्रसिद्धी लोलुपता वगैरे
६ आकांक्षा :ही नेहमी सत्तेच्या संदर्भात असते हिच्यातूनच मोह निर्माण होतो राजकीय यात शासकीय सत्ताही येते सत्तेचा मोह हा तर आपल्या सर्वांच्याच पाचवीला पुजलेला आहे
७ असोशी : ही नेहमी मोक्षाच्या संदर्भात असते हिच्यातूनच तळमळ निर्माण होते हल्ली आपण या सर्व संज्ञांचे कसे आणि कुठेही वापर सुरू केलेले आहेत त्यामुळे नेमका अर्थ अनेकांना कळत नाही इंग्रजी शिक्षणाचा हा प्रभाव आहे
हा संसार प्रामुख्याने शक्तीने म्हणजे अनंताने मांडलेला आहे म्हणूनच काही वेळा अनंताची पूजा शक्तीचा भाऊ म्हणून केली जात होती प्रत्यक्षात हे दोन वेगळे नाहीत पण पुरुष सत्ताक राजवटीत अत्यंत जाणीवपूर्वक शक्ती बाजूला काढून अनंत स्थापित केला जातो आणि पुढे जाऊन या अनंताचा विष्णू हा पर्याय बनवला जातो आणि संसार विष्णू पाहायला लागतो प्रत्यक्षात अनंत स्त्रैण आहे त्यामुळेच आपल्याकडे शक्ती संसार मांडते आणि आपण सर्वजण सध्या शक्तीने थाटलेल्या संसारामध्ये जगत आहोत या संसारामध्ये शिव सुद्धा सगुण रूपात महाप्राण म्हणून उपस्थित राहतो त्याला परमेश्वर म्हटले जाते आणि या परमेश्वराचीच अनेक रूपे असतात त्यांना आपण ईश्वर म्हणतो ईश्वर म्हणून त्यांची पूजा करतो जीवामध्ये हा प्राण म्हणून उपस्थित असतो प्राण गेला की जीव सुद्धा जातो
या सातही आसक्तीना घनरूप द्रव्य रूप आणि वायुरूप प्राप्त होते घनरूपाला आपण भूक द्रव्य रूपाला आपण तृष्णा आणि वायु रूपाला आपण निकड असे म्हणतो
थोडक्यात काय वासना हे केवळ एक रूप आहे हे लक्षात घ्या व्यवहारामध्ये आपण अनेकदा अन्नावरची वासना उडाली असे म्हणतो प्रत्यक्षात आपली वस्त्रावरची निवारावरची सुद्धा वासना उडत असते निवाऱ्याला आपण म्हणूनच निवास किंवा आवास म्हणतो प्रवास म्हणजे निवास आवास सोडणे आहे आणि दुसऱ्या आवास निवासाच्या दिशेने जाणे आहे वासने पासूनच वस्ती येते वसणे येते वसवणे येते इतकेच कशाला वस्त्रांनासुद्धा आपला मूळ शब्द वसन आणि वसने हाच आहे दारू सारख्या जलाचे म्हणूनच आपणाला व्यसन लागते कारण व्यसन हा शब्द सुद्धा वासनेपासुनच आलेला आहे वासने विषयी जे अवधान येते त्याला आपण व्यवधान म्हणतो व्यसनामध्ये हे व्यवधान पूर्णपणे सुटते त्यामुळे स्वतःवरचे नियंत्रण सुटते आणि माणूस स्वैर म्हणजेच स्व सोडून इतरा बाबत अनियंत्रित म्हणजेच बेफाम होत जातो म्हणूनच मोक्षासाठी संपूर्णपणे निर्व्यसनी होणे हे अत्यंत आवश्यक आहे मला वाटते इतके उत्तर पुरेसे आहे
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment