२०२५ ऑल

 सगळे एकत्र आहे 

सगळं गेल्यात जमा आहे 

पण कोणाला तमा आहे


तो दिसतोय देव भोळा 

पण हा चकमा आहे 


कसा विश्वास टाकावा 

वैद्यालाच दमा आहे 


ते म्हणतात त्यांचे शाश्वत 

कोणी केली खातरजमा आहे 


कापतील निघून जातील 

त्यांची तलवारच विमा आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीधर तिळवे नाईक

कुठलाही गुरु तुम्हाला आयुष्यात कधीही न फळो 

स्वतःचा रस्ता स्वतः शोधायचा असतो हे कळो 


जे जे वाचाल ते ते ताडून पाहिले जावो तुमच्याकडून

ज्याचा प्रत्यक्ष पुरावा नाही ते तुमच्यात आपोआप जळो 


एका कानाला फुटोत तुमच्या शंभर कान 

ऐका इतके समग्र इतके एकाग्र की ऐकण्यानेच विषय कळो 


काहीच प्रमाण मानू नका अगदी आत्मप्रमाणही 

इतक्या बाजूने खुले राहो शरीर की सत्य तुम्हाला कवटाळो 



तुम्हालाही सदबुद्धी सुचो कोणाचा गुरु न होण्याची 

तुमच्यामुळेच पायवाट निर्माण न होवो न पायवाट मळो 


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरीज मधील निर्वाणानंतरच्या कविता या काव्यफायलीतून)


उत्साहाची कशी आता गावीत गाणी 

त्यांनी माझे चोरले अन्न आणि पाणी 


जमिनीचे चार तुकडे बाकी आहेत 

शेती करणे म्हणजे जगणे आणीबाणी 


त्यांना संपूर्णच खरेदी करायचे आहे 

थांबलेत कारण परवडत नाही माझी वाणी 


त्यांच्या चार कागदांनी तलवार मोडीत काढली 

माझे मर्दुमकी झाली पराजयाची निशाणी 


जगलो आणि आता पुढेही जगावे लागेल 

आयुष्य माझे झाले वाळलेले पाणी 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तू जवळ आहेस 

आणि ती दूर 


तिच्याजवळ खूप झाडं आहेत 

आणि शिशिर ऑन आहे 


ती मला पानगळीत बुडवणार 

हे स्पष्ट आहे 


तू एकुलत्या एक झाडासारखी ओसाड 

पण झाड असल्याने झाडपणावर खुश 


मी तुझ्या सावलीत झोपावं 

कि तिच्या अरण्यात चालतं व्हावं ?


मोडलेल्या खिडक्या फिक्स करण्यात ती वाकबगार 

आणि तुला दारं सताड उघडी टाकल्याशिवाय झोप येत नाही 


ती गोवन मासेमारीत निपुण 

तिच्या हातांना पाणी सवयीचे 

आणि वय ती हालचालीवरून ओळखते 


तू मुंबईकर 


कोळीवाड्यातली तुझी येजा फक्त सिनेमॅटिक 


तुला समुद्राची फक्त सवय आहे 

पण त्याच्यात वाकणारं आकाश 

तू फक्त फोटोसाठी वापरतेस 

आणि फक्त फोटोपुरता हातात पकडलेला सूर्य 

जो पहायला तू सकाळी लवकर उठतही नाहीस 


ती जे जगण्याच्या स्पर्धेत टिकत नाही 

तळघरात ढकलते 

अडगळी आपसुख मरतात अशी तिची समजूत 


तू न टिकणाऱ्या गोष्टींना ठार मारलं पाहिजे म्हणत 

त्यांच्यामागे काळाची गन घेऊन त्यांच्या मागे 


गोव्यातील हिप्नॉटिक शेवटांना ती देते आरंभ 

तू लोकलमध्ये आरंभशूर 

मग गर्दीवर सोपवून 

मोबाईल गेम खेळत लेडीज डब्यातील लाटांच्याप्रमाणे धपापणारी 


असं नाही कि मी थ्रीसम खेळू शकत नाही 


पण तुमच्या अहंकाराची के मॅनेजमेंट करता करता माझी पिसं निघतील 

हे मी जाणतो 


असंही नाही कि चीटिंग करायला लागणारी चॅप्टरगिरी माझ्यात नाही 

पण फसवणूक माझ्या नैतिकतेत बसत नाही 


पतनाला अक्कल लागत नाही 

आणि वासना अक्कलशून्य 

पाणी काढून 

ताटात काहीच न वाढता निघून जाणारी 


तुम्हां दोघींनाही मी सांगतोय कि दोघी आहात 

आणि मी केऑसमध्ये 


"हे सगळं तुझ्या पत्रीकेतील लाभात असलेल्या तुळेच्या चंद्र शुक्र युतीमुळे घडतंय

आणि मी ती दुरुस्त नाही करू शकत "


गोवेकर निघून चाललीये 

आणि तू चंद्राला आग लावत 

"शुक्र करो मैं ऍस्ट्रोलॉजी पे विश्वास नही करती "


मी मुंबईत बॉल टाकतोय 

आणि तू आणलेला कंडोम 

त्यांना व्यवस्थित वाया जाऊ देतोय 


श्रीधर तिळवे नाईक 


(नेट सिरीज मधील नेट लव्ह ह्या काव्यफाईलीतून )


ना तू मुंगी ना मी मुंगी 

ही पृथ्वीच एक मुंगी 

कार्यकारी 

राणी मुंगीच्याभवती टाकत फेरी


आपण तिच्या पाठीवरचे फुंगी 

जी तिला दिसत नाही


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

वो इसतरहसे अपने पुराने दिमागमें उलझ गये 

हर सांस नई है इसिलिये जिंदगी नई हैं भूल गये 


तुम तो जिंदा हो तुम्हे लोगों की क्या जरुरत 

कंधा उनको देना पडता है दुनिया मे जो हैं मर गये 


कैसे भूले तेरा चेहरा किसी से मिलता ही नही 

वैसे दुनिया की भीड मे दिलमे लाखो चेहरे खिल गये 


ये अजीब है तुने वफा ना की और खफा हो गये 

एक हम वफा करकेभी बदनाम होकर रह गये 


ये पृथ्वी किसीभी नरकसे अलग नही है 

तू जिसे स्वर्ग कहता है उसके तोते कबके उड गये 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलोन सिरीज मधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल: भक्ती या काव्यफायलीतून)


पता नही क्या मगर कुछ लोगोंका कुछ औरही चलता है 

सामने होते हैं मगर दिमाग किसी और जगह हिलता हैं 


लगता है अपनी तरह इसी दुनिया मे पैदा हुए थे मगर 

शायद ही उनकी आँखोका नजारा दुनिया से मिलता हैं 


वो आपकी हाँमे हाँ और ना में ना मिलाते रहते है 

बाद में पता चलता है वो किसी और भाषा मे जलते हैं 


चुपचाप किसी समुंदर की तरह सामने बैठते है 

मचलतेभी है तो किसी लहर की तरह मचलते है


लगता है उनसे ये दुनिया संभाली नही जाती 

बादमें पता चलता है वे वो थे जो दुनियाको संभलते है 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे