उपवास आणि माणसातील पशु
उपवास आणि माणसातला पशु श्रीधर तिळवे नाईक
पाशवी म्हणजे काय हा प्रश्न नेहमीच माणसाला पडलेला असतो त्याचे उत्तर श्वास अथवा प्राण, आहार ,निद्रा ,भय आणि मैथुन हे मनुष्य आणि पशु या दोन्हींच्या मध्ये पाशवी म्हणून उपस्थित असतात इथे आहारामध्ये अन्न आणि पाणी दोन्हींचा समावेश होतो प्रश्न असा आहे की या पाचांच्या पाशवीपणातून ते आधीक उन्नत होण्याचे चान्सेस किती आहेत? बहुतांशी लोक हे आपले आयुष्य या पाच गोष्टी गोष्टीतच घालवतात मोक्षाच्या साधनेमध्ये त्यामुळे त्या पाचांच्यावर कशी मात करायची हा मूलभूत प्रश्न सुरुवातीच्या काळात सर्व साधकांच्या पुढे ठाकलेला असतो या पाच गोष्टीसाठी त्याचा ठोका कायमच हृदयामध्ये धडकत असतो आणि मोक्ष मिळवणाऱ्या माणसाला त्यांच्यावर मात करण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही माणसे या पाच गोष्टींसाठी पशु बनतात ती कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि त्यामुळेच या पाचही गोष्टींच्या वर संयम कसा प्राप्त होईल हा पहिला प्रश्न असतो ज्या साधना या पाच गोष्टींना हाताळतच नाहीत त्या काल्पनिक राहतात यातील काही गोष्टींच्या पासून मुक्त होणे शक्य नसते म्हणजे आहारापासून मुक्ती मिळू शकत नाही तो अत्यंत आवश्यक असतो हीच गोष्ट श्वासा बाबत आहे मात्र त्यांच्यावर संयम साधता येऊ शकतो साधक सुरुवातीला उपाशी राहण्याची प्रॅक्टिस करत राहतो दुर्देवाची गोष्ट अशी आहे की आज काल इथे सुद्धा भारतीय माणसाने पळवाट काढलेली आहे एकादशी दुप्पट खाशी ही म्हण त्यातूनच आलेली आहे युरोपियन लोकांनी आणलेले खाद्यपदार्थ हे उपवासाला चालतात हे कोणी ठरवले ? तर ज्यांना प्रचंड भुक लागते आणि ज्यांचे भुकेवर अजिबात नियंत्रण नाही अशा लोकांनी काढलेली ही सोयीस्कर पळवाट आहे साबुदाणा असो किंवा बटाटा असो हे सर्व बाहेरून आलेले पदार्थ आहेत साहजिकच ते उपवासाला चालतात असे या भुकेल्या लोकांनी स्वतःच ठरवून टाकले आणि त्याची धार्मिक रूढी बनवून टाकली विशेषत: वैष्णव लोकांच्या मध्ये अशा पळवाटा भरपूर निर्माण झालेल्या दिसतात श्वासा बाबत तर माणसाला काहीच करायला लागत नाही कारण तो हवेतून येतो आणि हवा मुबलक आहे आणि फुकट आहे अजून तरी हवेचे मानुषीकरण घडलेले नाही ते ज्या दिवशी घडेल त्या दिवशी हवेबाबत सुद्धा नैतिकतेचे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत त्यामुळे तिथे संयमाची गरजच नसते मात्र अन्न आणि पाणी यामध्ये संयम प्राप्त व्हावा म्हणूनच उपवास ही संकल्पना उदयाला आलेली आहे तेव्हा उपवास कोणाच्याही नावाने करत असाल तर तो प्रामाणिक असला पाहिजे आणि एक दिवस तो पाण्याशिवाय असला तर अधिक उत्तम जेणेकरून पाणी नाही म्हणून तुमच्याकडून कोणतेही अनैतिक कृत्य घडता कामा नये किंबहुना उपवासामध्ये नैतिकता शिकणे आणि त्यासाठी आहारावर विजय मिळवता येणे हेच अभिप्रेत आहे जर का एखादा मनुष्य पाच दिवस उपाशी राहू शकत असेल तर त्याचा संयम वाढल्याचे लक्षण आहे मात्र प्राचीन काळी आहार न घेतल्यामुळे काय दुष्परिणाम होतात याविषयी फारशी कल्पना नव्हती आता ते आल्याने उपवास फारसे ताणवत नेऊ नयेत असे माझे मत आहे मुळातच उपवास जर झेपत नसतील तर ते करू नका निदान पक्षी हे स्वीकारा की तुम्हाला तुमच्या आहारावर नियंत्रण प्राप्त करता आलेले नाही याबाबतीत जी खोटेगिरी चाललेली आहे ती बकवास आहे किंबहुना हिंदू (म्हणजे ज्यात भारतात जन्मलेले सर्व धर्म येतात) विनाकारण चतुर खेळाडू बनत असतात खरंतर ही स्वतःचीच केलेली फसवणूक असते या अशा फसवणुकी तुम्हाला धार्मिक बनवत नाहीत तर पोकळ आणि हिपोक्रेट म्हणजेच दांभिक बनवतात आज हिंदू आणि मुसलमान हे जगातील सर्वात दांभिक लोक बनलेले आहेत याचे कारण त्यांचे हे दृष्टिकोन होय याबाबतीत मुसलमान सुद्धा परवडतात कारण ते किमान रोजे तरी उग्र पद्धतीने करत असतात हिंदूंच्यात फार थोडे लोक आता असे आहेत की जे खरोखरच मनापासून उपवास करतात शैवधर्मी लोकांच्या मध्ये दर सोमवारी उपवास करणे गृहीत धरले जाते किंबहुना स्वतःचा व्यवसाय बंद ठेवण्यामागे हेच कारण असते की त्या दिवशी तुम्ही जेवत नाही उपवास करता त्यामुळे व्यवसाय करायला लागणारी ताकद तुमच्याकडे नसते बाकी सण वगैरे येत असतातच पण त्यांची संख्या जास्त नाही दुर्दैवाने भारतामध्ये नंतर इतके धर्म झाले की प्रत्येक धर्माचे दिवस आले त्यातून फक्त सुट्ट्या वाढत गेल्या आणि हिंदू लोक अधिकाधिक आळशी बनत गेले कामचोर बनत गेले देवाच्या नावाने सुट्ट्या मागणारी ही एकमेव जमात असेल बरे त्या दिवशी काही अध्यात्मिक साधना वगैरे केली तर समजून घेता येते पण अनेकदा ती सुद्धा होत नाही सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी असतात अशी अलीकडे हिंदूंची समजूत झालेली आहे अर्थातच याला काही सन्माननीय हिंदू अपवाद आहेत जे अगदी प्राण पणाला लावून साधना करतात उपवासामध्ये एकदा आहारावर नियंत्रण आले की मग हळूहळू निद्रेवर नियंत्रण आणावे लागते आणि ते मिळवणे सोपे जाते कारण एकदा आहाराच्या वेळा नियंत्रणात आल्या की मग झोपेच्या वेळा नियंत्रणात आणणे सोपे जाते आणि या दोन वेळा नियंत्रणात आल्या की मग मैथुनाच्या वेळा सुद्धा नियंत्रणात आणता येतात आणि इथूनच मग प्राणायामाची सुरुवात होती आणि उपवासाच्या दिवशी आहार निद्रा आणि मैथुन यांच्यावर एकदा संयम साधला की प्राणावर म्हणजे सुरुवातीला श्वासावर संयम प्राप्त करणे सोपे जाते आणि एकदा का या चार गोष्टींच्यावर संयम् साधता आला की हळूहळू भयावर सुद्धा संयम साधता येणे शक्य होते कारण मग भुकेवर नियंत्रण मिळते भुकेने आपण मरू ही भीती कमी व्हायला लागते आणि एकदा का मरणाची तयारी झाली की मग तुम्ही हळूहळू भयापासून मुक्त होऊ लागता म्हणूनच उपवास ही साधनेची सुरुवात होऊ शकते
मात्र भयापासून संपूर्ण मुक्ती मिळवता येणे केवळ उपवासाद्वारे शक्य नसते म्हणजे सविकल्प समाधी मिळाल्यानंतरही नैसर्गिक प्रतिक्रिया जिवंत राहतात म्हणजे सविकल्प समाधी मिळाल्यानंतर असे होत नाही की समोर वाघ ठाकल्यावर नैसर्गिक प्रतिक्रिया येत नाही ती येतेच मात्र तो वाघ आता भुकेला आहे की त्याची भूक संपली आहे याचे आकलन समोर त्याला पाहून होते अन्यथा भयाला शरण जाऊन तुम्ही त्याला ठार मारता किंवा किमान हाकलून लावण्याचा प्रयत्न करता किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करता हिंसेचे मूळ अनेकदा भय असते जर का तुम्ही भयापासून संपूर्ण मुक्ती मिळवली की मग तुम्ही निर्वीकल्प समाधीमध्ये गेला असे समजावे कारण तिथे मात्र भय उरत नाही भय आधी संपते की निर्विकल्प समाधी आधी मिळते ही एक अत्यंत वैयक्तिक गोष्ट होते आणि प्रथम नेमके काय घडेल हे सांगता येत नाही.
तेव्हा उपवास करण्याआधी या सगळ्या गोष्टींचा विचार करावा म्हणजे उपवास कशासाठी आहे हे नीट कळेल अन्यथा एकादशी दुप्पट खाशी हे चालू राहिलंच
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment