शैववादी दृष्टिकोनातून इतिहास लिहिणारा कदाचित मी पहिला आणि शेवटचा इतिहासकार आहे माझ्यानंतर कदाचित ही पद्धत शिल्लक राहणार नाही किंवा कदाचित फार भरभराटेल याची मला कल्पना नाही
साहजिकच या पद्धतीने नुसार वैष्णव हा धर्म युरेशियन धर्म असल्याने मी त्याच्यावर टीका करतो आणि त्यानुसार वारकरी संप्रदायावरही ! कारण माझे प्रामाणिक मत असे आहे की वारकरी संप्रदाय वर्ण जाती व्यवस्थेचे समर्थन करतो आणि वेदप्रामाण्य मानतो शेजारच्याच कर्नाटक राज्यात लिंगायत संत झालेले आहेत त्यांच्याशी जर का वारकरी संतांची तुलना केली तर वाढला जाते व्यवस्थेला विरोध करायचा म्हणजे काय करायचे हे कळू शकते बसवेश्वर यांनी आंतरजातीय विवाह लावण्याचे जसे प्रयत्न केले तसे काही प्रयत्न वारकरी संतांनी केलेले दिसतात असं नाही सामाजिक समते विषयीचे स्पष्ट आणि स्वच्छ दाखले लिंगायत संतांच्यात मिळतात तसे दाखले वारकरी संतांच्या मिळत नाहीत हे लोक केवळ आध्यात्मिक समता मागतात असेच दिसते या अध्यात्मिक समतेच्या मागणीला सामाजिक समतेची मागणी आहे असे वाचवणे हे इतिहासाशी प्रामाणिक राहणे आहे असे आम्हाला वाटत नाही संतांनी कर्मकांडाच्या विरोधात प्रचंड आवाज उठवला हे खरे आहे त्याने यज्ञसंस्थेविरोधात आवाज उठवला हेही खरे आहे पण मुळात भारतातील वर्ण जातीव्यवस्था ही केवळ यज्ञकर्मानुसार येत नाही तिच्यामागे वैष्णव नावाचा एक धर्म ठामपणे उभा आहे अनेकदा हे गृहीतक स्पष्टपणे नाकारले जाते परंतु त्याने इतिहास बदलत नाही वैष्णव धर्माने एकीकडे यज्ञसंस्था शिथिल केली आणि शैवांची पूजा व्यवस्था स्वीकारली हे खरे असले तरी त्याने वर्ण आणि जाती व्यवस्था नाकारली नाही हेही खरे! वारकरी संप्रदाय ही वैष्णव परंपराच पुढे घेऊन जातो महाराष्ट्रातल्या अनेक विचारवंतांना यातली गोम कळत नसल्याने त्या अनेकदा संतांना कोट करतात पण त्यांचा नेमका रेफरन्स कुठे आहे हे ते पाहत नाहीत अध्यात्मिक समता हे वैष्णोधर्माचे खास वैशिष्ट्य पण त्याचबरोबर सामाजिक समता जोपासणे मात्र वैष्णव धर्माने कायमच नाकारलेले आहे आणि पाप योनी आणि पुण्य योनी असे स्पष्टपणे विभाजन केलेले आहे गीतेमध्ये हे स्पष्टपणे लिहिलेले आहे या व्यवस्थेचा फायदा क्षत्रिय आणि वैशांना सुद्धा प्रचंड प्रमाणात होत असल्याने हे लोक वैष्णव होतात यात खरी गोष्टी शूद्र अति शूद्र आणि आदिवासी लोकांचीच आहे आणि त्यांचे मत विचारात घेणे कोणालाच गरजेचे वाटत नाही हा अवस्था असे आहे की या लोकांनाही हल्ली ॲडजस्टमेंट ची सवय झालेली आहे त्यामुळेच वारकरी संप्रदायाला विरोध हा शिल्लक राहिलेला नाही साठोत्तरीचे हे सर्वात मोठे पाप म्हणायला हरकत नाही नसलेली सामाजिक समता शोधून ते ती अस्तित्वात असल्याचा चांगला बहाणा या लोकांनी शोधला परंपरा शोधायच्या नादात आधुनिकता मारली
दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की यामध्ये अनेकदा बहुजनांचे नेते ही फसलेले दिसतात उदाहरणार्थ फुले साहजिकच ब्राह्मणे तर चळवळीने संतांच्या चळवळीला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे याचे काही भीषण परिणाम झालेले आहेत म्हणजे जातीव्यवस्थेवर आघात झालेलेच नाहीत आणि लढा मात्र जाती व्यवस्थेच्या विरोधात आहे असा आव आणला गेलेला आहे असो मुळात धार्मिक क्षमता किंवा आध्यात्मिक समता ह्या फार थोर नसतात ख्रिश्चन आणि इस्लाम मध्ये अशा प्रकारची समता दिलेली आहे परंतु या दोन्ही धर्मात सामाजिक समता नाकारलेलीं आहे आणि गुलामगिरीला मान्यता दिलेली आहे हेच अनेकांच्या लक्षात येत नाही हे धर्म कोणत्याच अर्थाने क्रांतिकारक नव्हते यांनी नेहमीच पुरोहितांच्या आणि राजे लोकांच्या हितसंबंधांची पाठराखण केली वारकरी संप्रदायाने यापेक्षा वेगळे काही केलेले नाही साहजिकच मी कायमच वारकरी संप्रदायाच्या विरोधात टाकलेला आहे अर्थात ज्यांना मोक्ष मिळालेला आहे त्यांच्या मोक्षाची मात्र मी सदैव माझ्या कवितेतून पाठ राखण केलेली आहे या अंगाने माझ्या संत तुकाराम यांच्यावर अनेक कविता आहेत कारण त्यांच्या मोक्ष विषयी मला कसली शंका नाही पण मोक्ष मिळाला म्हणून संपूर्ण वारकरी संप्रदायाची भलावण करण्याची कसली इच्छा माझी नाही अगदी शैवांच्यात सुद्धा वैदिकांच्या नादी लागून वर्ण जाती व्यवस्था स्वीकारणारे व मानणारे लोक आहेत त्यांना मी कधीही स्वीकारलेले नाही हे लोक बहुतांशी ब्राह्मण असतात आणि शैव धर्मात घुसून त्यांनी हा उद्योग केलेला असतो
माझ्या ह्या शैव इतिहासाची मांडणी बसवेश्वर व फुलांच्या पासून प्रेरणा घेते
मुळात फुले यांनी जेव्हा अनार्यवादी इतिहास ही संकल्पना मांडली तेव्हा त्यांनी भारतातल्या संपूर्ण इतिहास लेखनालाच एक छेद दिला होता कारण तोपर्यंत सर्व इतिहास हा आर्यवादी इतिहास होता
या आरेवाडी इतिहासात आर्यवादी इतिहासात इतिहासाची दोन स्कूल्स फार प्रभावी आहेत पहिले स्कूल हे ब्राह्मणी स्कूल आहे ते श्रुती स्मृती प्रमाण मानते तर दुसरे स्कूल हे क्षत्रिय आहे ते रामायण महाभारत आणि पुराणांना प्रमाण मानते यातील ब्राह्मणी स्कूल हे वारकरी संप्रदायाला श्रुती स्मृतीपुराणुक्त धर्म पुराणोक्त धर्म स्वीकारणारा संप्रदाय मानते आणि तशीच मांडणी करत मराठी मध्ये असे मांडणे अनेकांनी केलेली आहे आणि ती प्रामुख्याने ब्राह्मणांच्या कडून झालेली आहे दुसरे स्कूल हे शत्रे यांचे आहे क्षत्रियांचे आहे ते सध्या तरी गोंधळलेले आहे यात प्रामुख्याने वैष्णव संप्रदायाच्या अंगाने मांडणी केली जाते यात प्रामुख्याने सदानंद मोरे ,भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे , आ ह साळुंखे येतात त्यांच्या मते तुकाराम हा क्षत्रिय असून त्याला ते वारकरी संप्रदायाचा मुख्य संत मानतात आणि त्या अंगाने ही मांडणी येते यातील काहीजण तुकारामांचे नाते गौतम बुद्धाची जोडतात आणि तुकाराम हे वर्ण जाती मानत नव्हते अशी मांडणी करतात प्रत्यक्षात ती इतिहासाला धरून नाहीये या अंगाने अनेक हिंदुत्ववादी लोकांनी आपली मांडणी सादर केलेली आहे ती जोपर्यंत तुम्ही खोडून काढत नाही तोपर्यंत तुमच्या मांडणीला काही अर्थ राहत नाही माझा मुख्य प्रश्न असा आहे हे मुळात वाजला जाती व्यवस्था मोडीत काढायला परंपरेची गरज कशाला लागते विज्ञान पुरेसे आहे पण देशीवादी लोकांना परंपरे शिवाय काही करता येत नाही म्हणूनच मग तुकाराम आत आधार शोधला जात जातो पण समजा उद्या जर काय असे सिद्ध झाले हे तुकाराम हे वर्ण जाती व्यवस्था पाळत होते तर मग तुमच्या परंपरेचे करायचे काय माझ्या मते वर्ण जाती व्यवस्थे विरोधात लढायचे असेल तर परंपरेचा दाखला देणे गरजेचे नाही ही व्यवस्थाच कशी चुकीची आहे हे विज्ञानाच्या आधारे सिद्ध करणे गरजेचे आहे प्रश्न असा आहे की क्षत्रिय लोक हे का करतात हे लोक खरोखरच वर्ण जाती व्यवस्था मोडू इच्छितात का की केवळ ब्राह्मण वर्णाला छेद देऊन शह देऊन आपल्या वर्णाचे वर्ष स्थापन करण्याचा हा डिप्लोमॅटिक प्रयत्न आहे? कारण प्रत्यक्ष व्यवहारात या लोकांच्या पैकी किती जणांनी वर्ण जाती व्यवस्था मोडली असाच प्रश्न पडतो आजही क्षत्रियांच्या बाबतीत ते वर्ण जाती व्यवस्था मोडायला तयार आहेत असे चित्र दिसत नाही उलट त्यामानाने ब्राह्मणच लग्न करताना वर्ण जाती सहजरीत्या मोडताना दिसतात हा खरे तर परस्पर विरोध आहे म्हणजे जे ब्राह्मण वर्ण जाती व्यवस्थेच्या संदर्भात कट्टर वाटतात ते आधुनिकतेत दाखल होत वर्ण जाती व्यवस्था मोडतात आणि जे क्षत्रिय वर्ण जाती व्यवस्थेच्या विरोधात आहोत असे भासवतात ते मात्र जाती व्यवस्था पाळताना दिसतात सैराट सारखे चित्रपट त्यातूनच आलेले आहेत आर्यवादी इतिहासातला हा परस्परविरोध आहे
फुले हे पाहिले होते ज्यांनी हा इतिहास खारीज केला आणि अनार्यवादी इतिहासाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला अर्थात या इतिहासाची तपशीलवार मांडणी त्यांना करता आली नाही ती जबाबदारी पुढे ब्राह्मणे तर चळवळीने स्वतःच्या खांद्यावर घेतलीं पण हे करताना वेगळ्याच दिशेने ही मांडणी नेली ही दिशा होती वैदिक विरुद्ध हिंदू सर्व ब्राह्मणेतर चळवळीतल्या लोकांना वारकरी पंथाचा प्रचंड अभिमान होता कृष्णाविषयी त्याला प्रचंड आदर होता साहजिकच रामकृष्णशिव यांनी मिळून हिंदू धर्म तयार होतो अशी ही मांडणी होती आणि उरलेले सर्व देव ब्राह्मण असल्याने ते ब्राह्मणे देव होतात म्हणजेच वैदिक विरोधात वैदिक देवांच्या विरोधात हिंदू देव अशी ही मांडणी आली साठोत्तरी पिढीमध्ये या मांडण्याचा प्रचंड विस्तार सुरू झाला ऐंशोतरी पिढीमध्ये पार्थ पोळके यांनी हिंदू विरुद्ध वैदिक अशी मांडणी करणारा ग्रंथ लिहिला आमच्या पिढीमध्ये या मांडणीला सर्वात उत्कृष्ट आकार मिळाला आणि हे आकार देणारे विचारवंत होते संजय सोनवणि त्यांनी वैदिक विरुद्ध हिंदू ही मांडणी अत्यंत व्यापक केली आणि आत्तापर्यंत आलेल्या सर्व मांडणीमध्ये त्यांची मांडणी ही उत्कृष्ट आहे असे म्हणायला हरकत नाही
फुलांच्यानंतर रामकृष्ण शिव ही ब्राह्मण्यतरांची मांडणी जीं प्रामुख्याने प्रबोधनकार ठाकरे यांच्या मुळे विकसित झालीं होती ती बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे ठाकली आश्चर्याची गोष्ट अशी होती की या काळातली काँग्रेस हे रामकृष्ण वादी होती तिला रामराज्य आणायचे होते आणि गीता हा तिचा धर्मग्रंथ होता एका अर्थाने काँग्रेसचे पूर्ण पणे वैष्णव होते मात्र विष्णू पेक्षा तिचे केंद्र राम कृष्ण हेच होते आता स्वतः आर्य लोकांनीच रामकृष्ण स्वीकारल्यानंतर करायचे काय असा एक मोठा प्रश्न निर्माण होतो मुळात रामकृष्ण हरी असाच प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आरेखी अनाडी अनारीय असाच प्रश्न त्यामुळे निर्माण झाला बाबासाहेब आंबेडकर आणि साहजिकच ही कोडी उलगडण्याचा प्रयत्न करून रिडल्स ऑफ राम लिहिले त्यांनी राम आणि कृष्ण नाकारले आणि पुढे जाऊन शिवही नाकारला त्याउलट फुलांच्याच परंपरेत गौतम बुद्ध हा अत्यंत मानाचा स्थान मिळवून असल्याने त्याने गौतम बुद्ध स्वीकारला हे एका अर्थाने ब्राह्मणे तर चळवळीला दिलेली बौद्ध डायमेन्शन होती हे आतूनच मग रामकृष्ण बुद्ध अशी वेगळी करायची या देशातल्या क्षत्रियांनी पुढे आणायला सुरुवात केली. यात प्रामुख्याने आहा साळुंखे यांच्यासारखे विचारवंत होते ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी रामाने कृष्ण नाकारले त्यांना केवळ राम आणि कृष्ण शत्रिय आहे म्हणून स्वीकारायचे आणि बुद्ध हा ही क्षत्रिय म्हणून स्वीकारायचा अशातऱ्हेची ही क्षत्रिय वादी मान्य होते मांडणे होती
माझ्या स्वतःच्या आयुष्यात शिव अवतारला तो थेट शक्तिपात होऊन त्यामुळे शिवाला नकार देण्याचा कधीच प्रश्न आला नाही मात्र आंबेडकरांना प्रमाण मानून मी रामाने कृष्ण यांना आकार दिला. मात्र शिवाला नाकार देण्याची गरज मला भासली नाही उलट शिव आणि बुद्ध असे दोघे एकत्र चालले 1982 ते 87 या कालखंडात शिव हा जास्त प्रमाणात माझ्या विचारात होता तर 1987 ते 2005 माझ्या केंद्रस्थाने गौतम बुद्ध होता नंतर मात्र बऱ्याचशा गोष्टी बदलत गेल्या यामध्ये इस्लाम ज्या तऱ्हेने वाढत होता ती गोष्ट होती इस्लामचा मुकाबला करणे हे बौद्धांना कधीच जमले नाही हा बौद्धांचा इतिहास होता किंबहुना ज्या ज्या प्रदेशात बौद्ध होते तिथे तिथे धर्मांतर होऊन अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मुस्लिम झाले तो पूर्व बंगाल मुस्लिम झाला हे तिन्ही प्रदेश बौद्ध भाऊ होते बाहुल होते भारताच्या खाली अनेक ठिकाणी बौद्धांना इस्लाम स्वीकाराला भाग पाडले गेले माझे असे लक्षात आले की उद्या इस्लाम विरोधात लढाईची वेळ आली तर बौद्ध काय फारशी कामाचे नाहीत म्हणून मी पुन्हा सर्वांचा विचार करायला लावला अर्थात हे दुय्यम कारण होते मुख्य कारण बौद्ध पद्धतीने नेरविकल्प समाधीत जाऊ शकत नव्हता जात नव्हत जवळजवळ 18 वर्षे गेली होती आणि जंप मात्र जमले नव्हते साहजिकच मी पुन्हा एकदा वेगळ्या ठिकाणी पोचलो पुन्हा एकदा माझ्या आयुष्यामध्ये शिवाचे केंद्रस्थान बनत गेले मी पुन्हा एकदा नव्याने इतिहास लिहिला हा इतिहास सेवा केंद्र होता 2005 ते 2010 या दरम्यानच हा इतिहास लिहिला होता त्यातूनच मी अधिकाधिक सर्व दिशेने सरकलं
शैव पद्धतीने इतिहास यावा की नाही असा अनेकांना प्रश्न पडू शकतो माझ्यामध्ये इतिहास लेखनात लिहिण्याच्या अनेक पद्धती आहेत त्यातील मुख्य पद्धती या आर्यविरुद्ध अनार्य अशाच आहेत आणि ह्या अनार्य पद्धतीत मी व सांगितलेल्या हारे विरुद्ध अनाऱ्य अनाऱ्य वैदिक विरुद्ध हिंदू अशा दोन पद्धती आहेत या दोन्ही पद्धतीमध्ये वारकरी चळवळ स्वीकारली गेलेली आहे आणि ती हिंदूंची पद्धत म्हणून मान्य केली गेली पण पण हिंदू म्हणजे नेमके काय हे अनेकांना आजही नीट मांडता आलेले नाही अनेक जण वस्तुस्थिती सोडून देतात हिंदू हे श्रुती स्मृतीपुराणोक्त धर्म मानतात ते वर्ण आणि जाती व्यवस्था मान ही वस्तुस्थिती या वस्तूस्थितीचे नेमकं काय करायचं हे काही वैदिक विरुद्ध हिंदू हे मांडणी करणारे लोक सांगत नाहीत त्यामुळेच नाईलाजाने मला युरेशनविरुद्ध शेव अशी मांडणी करावी लागते
श्रीधर तिळवे नाईक
वेद शैवांचे आणि वेद आर्यांचे श्रीधर तिळवे नाईक
सुरवातीला कित्येक शतके आर्य आपल्या संस्कृतीला वैदिक वा ब्राम्हण संस्कृती म्हणत होते पण जशी जशी आर्यांना स्वतःची संस्कृती स्वायत्त ठेवण्याचा चस्का लागला तसे नवे नामकरण आवश्यक वाटायला लागले त्यातून मग आर्य धर्म आर्य संस्कृती हे शब्द प्रचलित झाले ह्याचं कारण वेद व ब्राम्हण हे दोन्ही शब्द मूळचे अनार्य द्रविड तामिळ शब्द होते आणि आर्यांनी ते उसने घेतले होते पण आर्य संस्कृतीत पुढे पुढे वेदांची महती इतकी वाढत गेली कि वेद हा शब्दच जणू आर्यांचा असल्याच्या थाटात वापरला जाऊ लागला हीच गोष्ट ब्राम्हण शब्दांची वास्तविक जगभर म्हणजे रशिया युरोप भारत अफगाणिस्तान आर्य ह्या काळात पुरोहितांसाठी एकच शब्द वापरत होते तो म्हणजे सामन वा शामन साम म्हणजे प्रार्थना जो प्रार्थना रचतो गातो तो शामन वा सामन भारतातील आर्यही हाच शब्द वापरत होते पुढे भारतात ह्या शब्दाला श्रमण असे सुंदर रुपडे प्राप्त झाले व श्रमण हा शब्द असुर आर्य विशेषतः जैन व बौद्ध सर्रास वापरू लागले ह्याउलट शैव संस्कृतीत भगत , गुरव , जंगम व ब्राम्हण हे शब्द प्रचलित होते
शैवांचा जो भगत आहे तोच आर्यांचा शामन आहे दोघांचे काम प्रार्थना व मंत्र तंत्र आहे शैवांच्यात मंत्र रचणाऱ्या लेखन करणाऱ्या लोकांना उद्देशून ब्राम्हण हा शब्द वापरला जात असे ह्या अर्थाने आजचे सर्व लेखक हे ब्राम्हण आहेत मात्र हे कर्म जन्माप्रमाणे न्हवते कोणीही हे कर्म करू शकत असे त्याउलट गुरवांचे काम हे लेखन सादर करणे पूजा अर्चना करणे संस्कार करणे हे होते त्यामुळे गावात गुरवांना प्रत्येक उत्सवात शैव ब्राम्हणाने लिहिलेले नाटक दिग्दर्शक म्हणून बसवून सादर करावे लागे कालिदास वैग्रे सर्व नाट्यलेखक हे त्यामुळेच शैवब्राम्हण आहेत आणि त्यांनी प्राकृतात लिहिलेली नाटके पुढे संस्कृतमध्ये भाषांतरित केली गेली
इसवीसनपूर्व १५०० नंतर आर्य लोकांनी स्वतःच्या देवांचे मंत्र स्वतःच रचायला सुरवात केली आणि त्यातूनच पुढे संहिता तयार झाल्या आणि पुढे व्यासांनी ह्यांचे एडिटिंग करून दोन वेदांची निर्मिती केली ऋग्वेद आणि यजुर्वेद जे असुर आर्य होते त्यांनी दोन वेदांची निर्मिती केली १ अवेस्ता २ अथर्ववेद पुढे ब्राम्हणांनी ऋग्वेदातून सामवेद निर्माण केला आणि अथर्ववेद असुरांचा असूनही स्वीकारला गेला कारण सूर असुरांचा झगडा भारतात सम्पला
पुढे व्यासांनी आर्य महाभारत लिहिले आणि वाल्मिकीने आर्य रामायण ह्या रामायणात रावणाचा उल्लेख करताना तो वेदपंडित होता असा उल्लेख यायला लागला आणि चार वेद हे शिवानेच दिले असे सांगितले जाऊ लागले आणि ह्यातून अलीकडे खूपच गोंधळ माजलेला दिसतो
प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे ? वस्तुस्थिती अशी आहे कि शिवाने चार वेद दिले हे खरं आहे पण हे वेद आर्यांचे वेद न्हवेत शिवांनी
१ आयुर्वेद
२ ज्योतिषवेद
३ नाट्यवेद
आणि
४ शस्त्रवेद
हे चार वेद दिलेत आणि रावण ह्या चारी वेदात निपुण होता रावणाने सगळे ग्रह आपल्या मांडीखाली ठेवले होते ह्याचा अर्थ त्याला ज्योतिष येत होते त्याला दहातोंडे होती ह्याचा अर्थ तो उत्कृष्ट मेकप करून दहा चेहऱ्यांनी बोलू शकत असे कारण नाट्यवेदाचा तो मास्टर होता आणि त्यामुळेच सीतेला संन्याश्याचे रूप घेऊन तो चकवू शकला तो उत्कृष्ट वैद्य होता आणि शस्त्रात तो वाकबगारच होता
शैव ब्राम्हण व शैव गुरु(गुरव ) ह्या दोघांनाही हे चार वेद शिकणे सक्तीचे होते रावण हा शैव ब्राम्हण होता वैष्णवांनी त्याला नंतर भ्रष्ट रूप दिले
तेव्हा शैव वेद हा शब्द वापरतात तेव्हा त्याचा अर्थ १ आयुर्वेद २ ज्योतिषवेद ३ नाट्यवेद आणि ४ शस्त्रवेद असा होतो हे आर्य आणि शैव ह्या दोघांनीही लक्ष्यात घ्यावे शैवांच्यातील भगतांची स्थिती जशीजशी ढासळत गेली तसे त्यांनी आपले मंत्रतंत्र काम आर्यांच्यात न्हेले आर्यांचे शामन वा सामन व शैवांचे भगत ह्यांनी आर्यांचे वेद रचले आहेत काही शैव ब्राम्हणांनीही शैवांचे चार वेद शिकून मास्टर करणे कठीण वाटल्याने वैदिक संस्कृती स्वीकारून आर्यन वेदांच्या निर्मितीत महत्वाचा रोल निभावला आहे
शैवांच्या चार वेदांचा आद्य प्रणेता मास्टर म्हणून आपण शंकरांचा सन्मान करतो त्यांच्या दोन मुलांनी प्रत्येकी दोन वेद मास्टर केले आयुर्वेद व ज्योतिषवेद हे गणपतीने तर नाट्यवेद व शस्त्रवेद कुमारने त्यामुळेच आजही धर्मांन्तरित होऊनही वैद्य व ज्योतिषी आरंभ शिवपुजनाने व गणपतीपूजनाने करतात ओम शिवाचा तर गणपतये गणपतीचा असतो आर्यांनी शस्त्रवेद क्षत्रियांना तर नाट्यवेद शूद्रांना देऊन टाकला आहे एक काळ असा होता कि शैव आपल्या मुलाच्या मागे कुमार हे नाव शंकराच्या मुलाचा सन्मान करण्यासाठी वापरत त्यामुळे कुमार श्रीधर असे लिहीत आज ही फक्त प्रथा उरलीये आपण कुमार का लिहितो हेच शैवांना माहित नाही कालांतराने मुलींच्याही आधी कुमारी लिहिले जाऊ लागले ह्यामागे कारण मुलगा कुमारसारखा निर्भय व योद्धा व्हावा अशी इच्छा असे कालिदासाने (ह्याच्या नावातच काली आहे तरी तो आर्य असल्याचा समज आहे )आपल्या शंकर पार्वती ह्या प्रणय नाटकाचे नाव कुमारसम्भवम ठेवले आहे कारण शंकर पार्वतीत जे घडले ते सर्व शस्त्रनिपुण कुमारचा जन्म व्हावा म्हणून घडले असे कालिदास मानतो
आणखी एक गोष्ट इथे सांगणे गरजेचे आहे ज्योतिष हा शब्द शैव ऍस्ट्रॉनॉमी ह्या अर्थाने वापरतात पण त्यात भूगोलाचाही समावेश होतो थोडक्यात ज्योतिष म्हणजे पंचमहाभूतांचे ज्यात अंतरिक्षही येते आणि भूमीही ज्ञान होय ऍस्ट्रोलॉजीसाठी शैवांच्यात फलज्योतिष असा स्वतंत्र शब्द आहे आणि फलजोतिष ही शैवांच्या मते कला आहे शास्त्र न्हवे आणि मी नेहमीच म्हणतो कि सरकारने फलज्योतिषाला कलेचा दर्जा द्यावा व त्याकडे प्राचीन शैव जसे करमणूक करणारी कला म्हणून पहात होते तसे करमणूक करणारी कला म्हणून पहावे त्यामुळे सद्या जो दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप येतो तो येणार नाही चॅनेल्स , साईट्स व वर्तमानपत्रांनीही फलज्योतिष छापताना वा सांगतांना आम्ही फलज्योतिष ही कला मानतो असे सांगावे म्हणजे त्यांच्यावरही दुटप्पी असण्याचा आरोप येणार नाही आणि त्याचा आस्वाद घेणारे त्याकडे जादूच्या प्रयोगाकडे पहावे तसे पाहतील आणि त्याचे जे दुष्परिणाम होतात ते होणार नाहीत किमान कमी होतील अलीकडे आलेल्या भविष्यविज्ञानाला (फ्यूचरॉलॉजी )मात्र शास्त्राचा दर्जा द्यावा
गमतीचा भाग असा कि एकेकाळी शैव वैद्यांना वैदू म्हणवून हिणवणारे लोकच आता आयुर्वेद आयुर्वेद म्हणून गळा काढतायत अनेकांना हेही माहित नाही कि काही वैदिक राज्यात वैद्याचा दर्जा हा शूद्राचा होता कारण वैद्य शैव होते असो
माझं स्वतःचं स्पष्ट मत असं आहे कि सर्व ब्राम्हणांनी आता ह्या आर्यन वेदांचा धर्मग्रंथ म्हणून त्याग करून शैव वेदांचा स्वीकार करावा किमान जे मूळचे शैव आहेत त्यांनी पुनः शैव वेद स्वीकारावेत हे उत्तम तुम्ही मूळ शैव होता कि नाही हे ओळखण्याची साधी खूण तुमचे कुलदैवत आहे ते जर शिव पार्वती कार्तिकेय स्कंद गणपती वा सूर्य ह्या शैव पंचायतनांपैकी एक असेल तर तुम्ही मूळचे शैव आहात
आणि धर्म ह्या गोष्टींचाच त्याग केलात तर मस्तच !
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment