सृजनशीलता , लग्न , वारसा आणि खर्च श्रीधर तिळवे नाईक 


भारतामध्ये तीन विधि अतिशय महत्त्वाचे मानले जातात . जन्म, लग्न आणि मरण ! त्यातील जन्माचा संबंध थेट लग्नाशी जोडला गेलेला आहे कारण मुलाचा आणि मुलीचा जन्म लग्नानंतर झाला तरच तो व्हॅलिड मानला जातो अन्यथा त्याला नावे ठेवली जातात . साहजिकच लग्नबाह्य संबंधातून निर्माण झालेल्या मुलांना आपल्याकडे चुकीचे मानले जाते त्यांना वारसा नाकारला जातो पूर्वी जेनेटिक कोड नसल्याने काय कायदेशीर हे ठरवणे अवघड होते पण आता जेनेटिकली आपणाला बाप आहे की नाही आई आहे की नाही हे ठरवता येणे शक्य असल्याने यासंदर्भात लग्नबाह्य संबंधातून निर्माण झालेल्या संततीलाही समान अधिकार देणे गरजेचे झालेले आहे 


खरे तर प्रत्येक समाजामध्ये लग्न ही संस्था महत्त्वाची बनत गेलेली दिसते कारण तीच मुलांना जन्म द्यायला कायदेशीर अनुमती देते त्यामुळे या तीन विधींच्या संदर्भात एक गोष्ट अतिशय कॉमन आहे ती म्हणजे खर्च ! त्यातील मरणाच्या विधीचा खर्च खूप कमी आहे जन्माच्या विधीचा खर्च मध्यम आहे पण लग्नाच्या विधीचा खर्च मात्र वारे माप होऊन बसलेला दिसतो असे का असा प्रश्न जर का आपण विचारला तर त्याचे उत्तर अतिशय स्पष्ट आहे. याचा संबंध थेट वारसा हक्काशी आहे जैविक कारणच शोधायचे झाले तर मुलगा आणि मुलगी यांना वारसाबाबत समान हक्क असला पाहिजे पण इथे एक आणखी गोष्ट येते ती म्हणजे म्हातारपण आणि इथेच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे म्हातारपणी म्हाताऱ्यां माणसांना कोण सांभाळणार ? याचे उत्तर मुले आणि मुली यांनी मिळून सांभाळायला हवे असे आहे पण पितृसत्ताक पद्धतीमध्ये याबाबतीत एक अडथळा येतो तो म्हणजे मुलगी जर का आई-वडिलांच्याकडे राहणारच नसेल तर मग ती आई-वडिलांना सांभाळणार कशी? साहजिकच जी मुलगी आई-वडिलांना सांभाळणारच नाही तिला त्यांनी आपली इस्टेट का द्यावी असा प्रश्न निर्माण होतो ? इस्टेटीच्या बाबतीत दोन प्रश्न असतात पहिला प्रश्न इस्टेट जन्मदत्त असेल तर ती विभागून द्यावी का आणि जर ती कर्मदत्त असेल तर तिचे काय करायचे ? यावर तोडगा म्हणून कर्म दत्त इस्टेट असेल तर मग त्या संदर्भातला अधिकार त्या कर्माने इस्टेट कमावलेल्या कर्तृत्वशाली माणसाकडे( मग स्त्री असो अथवा पुरुष )देणे गरजेचे बनते कारण शेवटी त्याने ती इस्टेट स्वतः कमावलेली असते पण जी इस्टेट कर्मदत्त नसते तर जन्मदत्त असते तिचे काय करायचे असा प्रश्न पडतो आणि इथेच खरा प्रश्न निर्माण होतो आणि उत्तर दिले जाते की मुलगी ही जन्मदत्त इस्टेटीमध्ये लग्नानंतर राहणारच नाही तर मग ती आई-वडिलांची सेवा सुद्धा करू शकणार नाही आणि जर का ती आई-वडिलांची सेवाच करणार नसेल त्यांना म्हातारपणी सांभाळणार नसेल तर मग तिला त्या जन्मदत्त इस्टेटीचा हक्क का द्यावा? दुसरी गोष्ट समजा जमीनीसारखी किंवा घरासारखी इस्टेट मुलीला द्यायचे ठरवले तर तीही इस्टेट माहेराला कशी घेऊन जाणार ? कारण ही काही मोबाईल इस्टेट नाही तिला स्थावर इस्टेट त्यामुळेच म्हणतात स्थावर जंगम आपल्याकडचा शब्द ! मग ही इस्टेट वाटायची कशी म्हणजे पुन्हा ही विकली गेली पाहिजे आता विकायचे ठरवले तर मग विकत कोण घेणार विकत घेतली तरी मग पैशावरून किमतीवरून मारामाऱ्या होणार वैगरे हा सर्व विचार करून मग एक पितृसत्ताक पद्धतीत तोडगा काढला गेला तो म्हणजे त्या इस्टेटीच्या बदल्यामध्ये मुलीला काहीतरी देणे आणि हे जे देणे आहे त्याला आपल्याकडे हुंडा असा शब्द प्राप्त झाला किंवा कन्यादान असा शब्द प्राप्त झाला. कन्यादान म्हणजे कन्येला दिलेले दान ! आता दान हा शब्द योग्य आहे का? तर नाही! तर कन्येचा वारसा असाच शब्द असला पाहिजे पण त्याला कन्यादान असे म्हणून अधिक सुसंस्कृत ? केले गेले .प्रश्न असा आहे की मग हे कन्यादान कोणी ठरवायचे तर त्याचा हक्क पुन्हा जर का कर्मदत्त ईस्टेट असेल तर ज्याच्या स्वकर्तृत्वावर त्या इस्टेटीची निर्मिती झालेली आहे तोच माणूस हे ठरवणार हे उघड आहे म्हणजेच इथे बापानेच किंवा आईनेच ठरवायचे आहे की माझ्या मुलीला वा मुलाला मी किती इस्टेट देणार ? पण जर काही इस्टेट जन्मदत्त असेल तर मग हे कोणी ठरवायचे तर बाप याबाबतीत काही ठरवण्याऐवजी याबाबतीतले अधिकार कळत नकळत मुलगी ज्या घरात जाणार आहे त्या घरातले लोक ठरवायला लागले आणि यातूनच आजचे सगळे हुंड्याचे प्रश्न निर्माण झालेले दिसतात हुंडा म्हणजे ुलीची दिली गेलेली आणि सासर्‍याने ठरवलेली इस्टेट असते ही एकदा ठरल्यानंतर वास्तविक गोंधळ होऊ नये परंतु नालायक सासरकडचे नालायक नीच लोक अनेकदा अशा गोष्टी वाढवतच नेतात आणि हे शोषण असते अशा लोकांना शिक्षा मिळायला हवी कारण हा अधिकार सासरच्या लोकांना नाही यामध्ये सर्वोत्कृष्ट पद्धत हीच आहे की मुलीला त्या इस्टेटच्या वाटणीची जी किंमत येते ती किंमत त्या मुलीला देणे पण ही किंमत मग कशी द्यायची कारण जर का मुलगे कर्तुत्ववान निघाले तर ते आरामात ही इस्टेट पैशात मोजून ते पैसे मुलीला म्हणजे बहिणीला देऊ शकतात परंतु ते जर का तसे निघाले नाहीत तर काय ? आपल्याकडे कायदा करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे खरा परंतु त्यातल्या खाचा खोचा कोणाच्याही लक्षात आलेल्या दिसत नाहीत किंवा आलेल्या असूनही पब्लिक स्वतः बघून घेईल असा काहीतरी कायदे करणाऱ्यांचा समज झालेला असावा


या सगळ्यांमध्ये असे गृहीत धराले जाते की पितृसत्ताक पद्धत हीच आदर्श आहे उलट विचार करून आपण प्रश्न विचारला की आत्ताची जी मुलीला सासरला पाठवण्याची पद्धत आहे ती बदलता येणे शक्य आहे का ? म्हणजे समजा जावयालाच आपण तू बाबा आमच्याकडे म्हणजेच मुलीकडे येऊन जाऊन रहा मुलगी आमच्याकडेच राहील अशी जुनी मातृ सत्ताक पद्धत जर का आपण स्वीकारली तर ती चालू शकेल का ? प्राचीन शैव पद्धतीमध्ये हाच वारसा प्रकार स्वीकारलेला होता की ज्यामध्ये आपोआपच जावयाला पाहुणा मानले जात होते जावयाने यावे राहावे परंतु पुन्हा आपल्या घरी जावे आणि आपल्या बहिणीच्या मुलांचा मामा बनून सांभाळ करावा ज्यामुळेच आपल्याकडे बापापेक्षा मामा महत्त्वाचा ठरत जात होता ही पद्धत इसवीसन पूर्व १००० च्या आसपास शैव लोकांनी नाकारायला सुरुवात केली कारण युरेशियन लोक स्वतःची पितृसत्ताक पद्धत घेऊन आले होते आणि तिचा प्रभाव कळत नकळत इथल्या इंडियन लोकांच्या वर पडलेला दिसतो अनेकदा या मातृ सत्ताक पद्धतीमध्ये जावई ठिय्या मांडून बसलेले दिसतात आणि अशा घर जावयांना खूप नावे ठेवणे आपल्याकडे चाललेले असते मातृसत्ताक पद्धतीत सुद्धा फार काळ जावई थांबणे बरे मानले जात नव्हते .प्रश्न असा आहे की मग करायचे काय? एक तर सुनमुखी कारभार असावा किंवा जावईमुखी कारभार असावा आत्ताच्या काळामध्ये मला असे वाटते की आपण हे दोन्ही चॉईसेस ओपन ठेवावेत आणि मग या दोन चॉईसेसमध्ये जे दोन लोक ज्यांचे लग्न होणार आहे यांनी लग्न करताना सरकारला आपला चॉईस कायदेशीरपणे कळवावा म्हणजे गोष्टी कायदेशीर करता येतात उदाहरणार्थ जर का तुम्ही सूनमुखी पद्धत स्वीकारली तर मग मुलगी सून सासरी जाईल आणि जाताना मग तिला वारसा कसा द्यायचा हे ठरवता येईल आणि हे लग्नाआधीच ठरले पाहिजे असा कायदा करणे आवश्यक आहे आणि तो सर्व जोडप्यांनी पाळला पाहिजे अशी सक्ती करावी जर का जावईमुखी पद्धत स्वीकारली जाणार असेल तर मग जावई कुठल्या टर्म्स आणि कंडिशन्सवर मुलीच्या घरात राहणार किती काळ राहणार हे सुद्धा आधीच ठरवले पाहिजे आणि या संदर्भात सुद्धा आवश्यक तो कायदा करून त्या कायद्याची सक्ती केली गेली पाहिजे मुलींना इस्टेटीमध्ये समान हक्क मिळायलाच पाहिजे परंतु तो हक्क जर एखाद्या मुलीला सोडायचा असेल तर तिला तो सोडण्याचा अधिकार आपण दिला पाहिजे किंवा तिला जर का तो पकडून ठेवायचा असेल तर तो पकडून ठेवण्याचा अधिकार सुद्धा आपण त्या मुलीला दिला पाहिजे शक्यता अशीही आहे की एखादा मुलगा स्वतःच आपल्या बहिणीला सर्व देऊन टाकेल मुळात या गोष्टी आपापसात मिळून ठरवल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचे कागदपत्र तयार झाले पाहिजे आणि ते सरकार दरबारी रजिस्टर झाले पाहिजे आपण आता मातृसत्ताक किंवा पितृसत्ताक पद्धत सक्तीने लादू शकत नाही कारण अजून तरी यातला कुठलातरी एक चॉईस चांगला आहे असे निर्विवादपणे सिद्ध करता येत नाही मला स्वतःला मातृसत्ताक पद्धती जास्त योग्य वाटते कारण तिथे मामा आणि बाप , आई आणि मावशी असे दोन्ही प्रकारचे प्रेम अपत्याला मिळू शकते मुख्य म्हणजे भांडणे कमी होण्याची शक्यता आहे अर्थातच माणसाचा आसक्ती स्वभाव पाहता भांडणे होणार नाहीत याची मात्र कसलीही खात्री नाही समजा अधून मधून जर का एखाद्या मुलीला आपल्या सासरी जावेसे वाटले तर तिलाही मातृसत्ताक पद्धतीत तसा अधिकार द्यायला हवा पण मात्र पितृसत्ताक पद्धतीत आई-वडिल सांभाळण्याची त्यांचे म्हातारपण नीट करण्याची जबाबदारी मुलींच्यावर सुद्धा टाकली गेली पाहिजे फक्त इस्टेट घेऊन जायची आणि आई-वडिलांची जबाबदारी मात्र स्वीकारायची नाही हा अप्पल पोटेपणा आहे स्वार्थ आहे तो करण्याची आणि पाळण्याची मुभा वा सवलत मुलीला देता कामा नये तुम्ही जेव्हा हक्क मागता तेव्हा तुमच्यावर जबाबदारी सुद्धा येते अलीकडे काही केसेस मध्ये मुली फक्त इस्टेटची मागणी करतात पण जबाबदारी नाकारतायेत त्यामुळे मुलांच्यावर डबल ओझे पडलेले दिसते हेही चालणार नाही याबाबतीत जर एखादी मुलगी असे म्हणत असेल की मी आई-वडिलांची संपूर्ण जबाबदारी मुलग्यावर म्हणजे भावांच्यावर टाकते आणि सासरीच राहते मात्र यापुढे आई-वडिलांची संपूर्ण जबाबदारी ही मुलग्याने घ्यावी तर तसा करार सुद्धा करण्याची अनुमती आपण द्यायला हवी आई-वडिलांच्या म्हातारपणाची जबाबदारी ही अपत्यांच्या वरच आहे ज्याप्रमाणे मुले वय वर्ष 1 ते 21 पर्यंत सांभाळण्याची जबाबदारी आईवडिलांच्यावर आहे मी तुझे बालपण सांभाळतो तू माझे म्हातारपण सांभाळ असा हा करार आहे आणि तो दोन्ही बाजूने पाळला गेला पाहिजे आणि तो व्यवस्थित पाळला जाईल याची काळजी शासनाने घेतलीच पाहिजे अलीकडे अनेक मुली आपल्या पालकांची जबाबदारी स्पष्टपणे नाकारताना दिसतात आणि म्हातारपण तुम्हीच सांभाळा असे सांगतात हे चालणार नाही तुम्ही अमेरिकेत जा नाहीतर जापान मध्ये जा तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची जबाबदारी सांभाळली पाहिजे जर का तुम्हाला ती प्रत्यक्ष उपस्थितीने सांभाळता येणे शक्य नसेल तर मग तुम्ही नोकर ठेवा भारतामध्ये अजूनही लोकसंख्या जास्त असल्याने श्रमिक उपलब्ध आहेत आणि ते तुमच्या आई-वडिलांना सांभाळतील आणि त्या बदल्यात तुम्ही त्यांना आवश्यक ते पैसे द्या अशी ही व्यवस्था असली पाहिजे शेवटी इस्टेट कशाला दिली जाते तर वंश टिकावा म्हणून आणि वंश हा केवळ अधोमुखी नसतो तो पाठ मुखीही असतो म्हातारपण हे पाठ मुखी असते म्हणून त्याकडे बघायचेच नाही हे जे काय चालले आहे ते चुकीचे आहे काही नालायक नीच आईबाप असतात ते अधोमुखी असण्याची जबाबदारी घेत नाही अशांना सुद्धा शिक्षा ठोठवली पाहिजे कारण मुलांना जन्म देताना त्यांना सांभाळण्याची जबाबदारी तुमचीच आहे नाहीतर मग मुलांना जन्म देऊ नका तेव्हा मातृसत्ताक आणि पितृसत्ताक पद्धती उपलब्ध करून देणे आणि त्यातून निवड करायला देणे हे आवश्यक आहे वारसा हक्काचा प्रश्न सोडवायचा नाही आणि हुंड्याबाबत तक्रार करत राहायची याला काहीही अर्थ नाही तुम्हाला हुंडा बंद करायचा असेल तर स्त्रीला वारसा हक्क तुम्ही कसा देणार ते ठरवलेच पाहिजे आणि हा प्रश्न त्या त्या कुटुंबाचा असल्याने त्या संदर्भात कौटुंबिक कागदपत्रे करणे हाच उपाय उरतो याबाबत एक नैतिक चौकट देणे हे काम कायद्याचे आहे प्रत्यक्ष अंमलबजावणी त्या त्या कुटुंबानेच केली पाहिजे भारतामध्ये अलीकडे हक्क पाहिजेत पण जबाबदारी नको अशी काहीतरी फालतुगिरी चालली आहे या फालतूगिरीला विरोधच केला पाहिजे जोपर्यंत स्त्रियांना वारसा बाबत स्थितीबाबत समान हक्क मिळत नाही तोपर्यंत हुंड्याची समस्या संपणार नाही 


सर्वात मोठा प्रश्न हाच येतो की जे गरीब आहेत त्यांनी काय करायचे? अलीकडे मुली बाप गरीब असला तरी नवरा श्रीमंत पाहिजे असं गृहीत धरून जातात असं शक्य नसतं माणसाजवळ फक्त जेनेटिक वारसा येत नाही तर धनेटीक वारसा पण येतो हा धनेटीक वारसा तुम्हाला स्वीकारायलाच हवा अशावेळी कर्तुत्ववान मुलाचा शोध घ्या जो पुढे काही ना काही करेल जो मुलगा मूळचाच गर्भश्रीमंत आहे तो कर्तुत्ववान असेलच असे नाही आणि जर का तो श्रीमंत असेल तर त्याने तुमची गरिबी तुमच्या गरिबीचा वारसा सहर्ष स्वीकारला पाहिजे तो जर का तो स्वीकारत नसेल आणि आधी हुंड्याची मागणी करत असेल तर अशा माणसाबरोबर लग्न करून काय फायदा? कारण तो धनकेंद्री आहे आणि धनकेंद्री माणूस कधीही स्त्रीला इज्जत देणे शक्य नाही हेच मुलाला सुद्धा लागू होते मुलाने ही निवड करताना मुलीच्या कडे असलेले गुण व कर्तुत्व बघावे तिच्याकडे किती इस्टेट वारसा हक्काने येणार आहे ते पाहू नये आणि हुंडा तर अजिबात पाहू नये घेऊ नये जर ती गर्भ श्रीमंत असेल आणि तिला वाटा इस्टेटचा वाटा मिळणार नसेल तर मग तिच्या कर्तृत्वाकडेच पहावे गुणाकडेच पहावे बाप गरीब असेल तर मग अशा वेळी फक्त मुलीकडे पाहावे आणि जर का असे पाहता येत नसेल आणि समाजमान्य श्रीमंतीच्या स्टेटस मध्ये वाहवत जायचे असेल तर मग मुलीच्या वारसा हक्काची सर्व कागदपत्रे नीट तपासावीत आणि लग्न करावे मात्र हे लग्न फालतुगिरी आहे हे मी सांगू इच्छितो कारण प्रेमाचा आणि श्रीमंतीचा काडीचाही संबंध असत नाही दुर्दैवाने अशी लग्ने होतात 


हा प्रश्न सोडवण्याचा एक उपाय कम्युनिस्ट लोकांनी दिला होता तो म्हणजे खाजगी इस्टेट नष्ट करणे पण सध्या तरी प्रॅक्टिकल लेवलला तो शक्य होत नाहीये आणि कम्युनिस्ट व्यवस्थेत सुद्धा मुळातच उच्च निच्यपणा कमी होत नाही फक्त सरकार दरबारी कोण उच्च आणि कोण नीच्च एवढेच ठरते आणि त्यावरून मग पुन्हा तशीच लग्न व्हायला लागतात एकंदरच मानवी स्वभाव हा वर खाली करत असतो कोण वर कोण खाली हे चाललेलेच असते याला कसा घालायचा आळा घालायचा हा प्रश्न ! मोक्ष हा त्यावरचा उपाय आहे परंतु हा उपाय सध्यातरी अमलात येताना दिसत नाही 


त्यामुळे जिथे खाजगी इस्टेटला परमिशन आहे तिथे मातृसत्ताक आणि पितृसत्ताक अशा दोन्ही पद्धती स्वीकारून कौटुंबिक कायद्यांचे नवीन मंडल तयार करून हुंड्याला मनाई करून पण स्त्रीचा वारसा हक्क मान्य करून हा प्रश्न सोडवला पाहिजे एकीकडे स्वातंत्र्य शाबूत ठेवले पाहिजे पण त्याचबरोबर हक्क दिले गेले पाहिजेत आणि त्या हक्काबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या सुद्धा व्यवस्थित अटी घालत पार पाडल्या जातील याची काळजी घेतली पाहिजे हे थोडे गुंतागुंतीचे आहे खरे परंतु कौटुंबिक गोष्टी या नेहमीच गुंतागुंतीच्या असतात हे आपण लक्षातच घेतले पाहिजे 

थोडक्यात काय 

१ मुलगा अथवा मुलगी दोघांनीही लग्नाआधीच पितृसत्ताक अथवा मातृ सत्ताक यांच्यापैकी कोणती पद्धत स्वीकारायची हे ठरवावे 

२ मातृसत्ताक पद्धत स्वीकारली तर जावयाने अधून मधून आपल्या सासरी जावे मात्र आपल्या मुलांच्या संगोपनांची जबाबदारी ही आपली पत्नी आणि तिचा भाऊ म्हणजे मुलाचा मुलीचा मामा यांच्यावर सोपवावी मुलीला तिची इस्टेट सांभाळण्याची परमिशन द्यावी त्यामध्ये ढवळाढवळ करू नये मात्र सल्ला जरूर द्यावा आणि मुलीनेही सल्ला जरूर घ्यावा म्हातारपणी आपल्या म्हातारपणाची जबाबदारी आपल्या मुलांच्यावर टाकावी आणि त्यांनी ती स्वीकारावी 


३ जर पितृसत्ताक पद्धत स्वीकारली असेल तर मुलीने आपली इस्टेट कशी घेऊन जायची त्यासंदर्भातले काय काय व्यवहार करायचे हे कुटुंबाने तिच्या लग्नाआधीच ठरवावे मात्र अंतिम निर्णय हा मुलीचाच असला पाहिजे आणि तिनेच लग्नाआधी सर्व इस्टेटची काय व्यवस्था असेल हे ठरवावे जेणेकरून एकदा ती सासरी गेली की काय करायचे या संदर्भात तिच्यावर लादले जाऊ नये मुलींनी हुंडा देऊ नये आणि आपला वारसा हक्क सोडायचा की नाही हे पूर्णपणे स्वतः ठरवावे जर का त्यांना वारसा हक्क राखायचा असेल तर मग काय करायचे हेही ठरवावे पितृसत्ताक पद्धत स्वीकारायची की नाही हे सुद्धा मुलींनी स्वतः ठरवावे आणि जर का पितृसत्ताक पद्धत स्वीकारली असेल तर मग इस्टेटचे काय करायचे हे ठरवण्याचा अधिकार आणि त्याचबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या कशा घ्यायच्या हे सुद्धा ठरवण्याचा अधिकार कुटुंबाने घ्यावा मात्र याबाबतीत भावंडांनी कायदेशीर चौकटीत निर्णय घेणे आवश्यक आहे जर का फक्त इस्टेट हवी आणि जबाबदारी नको असे ठाम मत असेल तर अशा मुलीला इस्टेट देऊ नये अलीकडे अनेक जावई लबाड झालेले आहेत ते पद्धतशीरपणे प्रेशर आणत राहतात अशावेळी योग्य ती काळजी घेतली जाणे आवश्यक आहे काही झाले तरी सासरच्यांना मुलीच्या माहेरची इस्टेट मिळणार नाही याची काळजी घ्यावी अर्थात अपवाद कर्मदत्त इस्टेट पण त्याचबरोबर मुलीच्या माहेरच्या लोकांना तिच्या सासरची इस्टेट जोपर्यंत तिथे कर्मदत्त इस्टेट आणि मालक ठरवत नाही तोवर वारसा मिळणार नाही हेही स्पष्ट असावे मुलग्याने जर कायद्याने आपल्या आई-वडिलांची जबाबदारी घेतली असेल आणि त्याबाबतीत टर्म्स आणि कंडिशन ठरली गेली असेल तर मग त्या एग्रीमेंट नुसार त्याने जबाबदारी पार पाडावी अनेकदा असेही घडलेले आहे की मुलगी जबाबदारी घेते आणि मुलगा पाठ फिरवतो हे चालणार नाही 


तर हुंड्याचा प्रश्न सोडवायचा असेल हुंडाबळींचा प्रश्न सोडवायचा असेल तर प्रथम स्त्री वारसा हक्क नीट मांडता आला पाहिजे सोडवता आला पाहिजे आणि त्यासाठी एक कायदेशीर चौकट अधिक विस्तृत केली पाहिजे तरच हा प्रश्न नीट सुटू शकतो मुळाला हात घालायचाच नाही आणि फक्त फांद्यांच्या वर चर्चा करायची त्याने काही हाती लागत नाही 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे