अवकाश भूगोल आणि मराठी भाषेचा आग्रह श्रीधर तिळवे नाईक 


अवकाश ही एक अशी गोष्ट आहे जी कधीही आपणाला संपूर्ण दिसत नाही प्रतीत होत नाही आपल्या इंद्रियांच्या मर्यादा आणि आपण जो इंद्रिय विस्तार केलेला असतो उदाहरणार्थ दुर्बीण त्यांच्या मर्यादा आपणाला पडलेल्या असतात विश्वाचा प्रचंड अमर्याद आनंद आकार आपणाला कळावा म्हणूनच शिवतत्वाला प्रचंडेश्वर आणि शक्ती तत्त्वाला प्रचंडी असे म्हटले जाते त्या प्रचंडचाच पुढे चंड आणि प्रचंडीचा चंडी झाला शैव लोकांना पूर्वीपासूनच आपल्यासमोर जो अवकाश ठाकलेला आहे तो प्रचंड आहे याची जाणीव होती किंबहुना ही जाणीव करून दिली ती भगवान शंकरांनी आणि म्हणूनच आपण त्यांना प्रचंडेश्वर असेही नाव दिलेले आहे आजही भारतामध्ये चंडीची पूजा प्रचंड केली जाते कारण आपण जो अवकाश बघतो तो शक्तीचा अवकाश आहे शक्तीचा विस्तार आहे जो प्रचंड आहे ज्याला हा चंड किंवा चँडी कळते तो चंट म्हणजे अवकाश तज्ञ असतो जो सहजरित्या स्वतःचा भूगोल म्हणजेच अवकाश हाताळत असतो अलीकडेही हा शब्द आपण वापरत असतो पण अनेकदा आपल्याला त्यामागे काय आहे हे माहीत नसते किंवा अनेक शैव शब्द आपल्या दैनंदिन आयुष्याच्या भाग आहेत पण त्यांचा अर्थ मात्र जाणीवपूर्वक विपरीत केलेला आहे त्यापैकीच एक शब्द म्हणजे चंट होय 


प्रश्न असा आहे की यापैकी आपल्या कवेत किती अवकाश येणार ?


सर्वसाधारणपणे आपण शिवांडाचा अवकाश ,ब्रम्हांडाचा अवकाश , आकाश गंगेचा अवकाश ,सूर्य मालिकेचा अवकाश ,पृथ्वीचा अवकाश, राज्याचा अवकाश ,समाजाचा अवकाश ,गणगोताचा अवकाश, आप्तांचा अवकाश, कुटुंबाचा अवकाश ,स्वतःच्या शरीराचा अवकाश अशी अवकाशाची विभागणी करतो आणि ही विभागणी करतच आपण जगत असतो या अवकाशाला अनेकदा आपण भूगोल असे नाव देतो किंबहुना भूगोलाचा अभ्यास म्हणजे अवकाशाचाच अभ्यास असतो 


भूगोलामध्ये सर्वसाधारणपणे आपण आपल्या राज्याचा अलीकडच्या काळात राष्ट्राचा अवकाश त्यानंतर राज्याचा म्हणजेच महाराष्ट्राचा अवकाश मग जिल्ह्याचा अवकाश आणि मग आपल्या शहराचा किंवा गावाचा अवकाश शिकवायला हवा आणि अनेकदा तो शिकवला जातो फक्त अपवाद आपल्या शहराचा किंवा नगराचा किंवा गावाचा अवकाश यांच्यापासून आपण सुरुवात करत नाही जे अत्यंत चुकीचे आहे विशेषता आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा आम्हाला कोल्हापूरचा भूगोल शिकवला गेला होता पण तिथेच थांबून घोळ घातला गेला वास्तविक आम्हाला कोल्हापूर शहराचा भूगोल ही शिकवला जायला हवा होता जे घडले नाही तसेच त्या त्या गावांमध्ये त्या त्या गावाचा भूगोल शिकवला गेला पाहिजे होता आणि तो सर्वात प्रथम शिकवायला हवा होता जेणेकरून भूगोल या विषयाविषयी प्रेम निर्माण होईल माणसाला सर्वात प्रथम ज्यांना आपण स्थानिक अवकाश असे म्हणतो तो शिकणे आणि तो भूगोलाद्वारे शिकणे आवश्यक आहे पहिलीत गावाचा किंवा नगराचा किंवा शहराचा भूगोल आणि इतिहास दुसरीत जिल्ह्याचा भूगोल आणि इतिहास तिसरीत राज्याचा भूगोल आणि इतिहास आणि चौथीत राष्ट्राचा भूगोल आणि इतिहास शिकवले गेले पाहिजेत मग पाचवीत पुन्हा अत्यंत तपशीलवार पणे पुन्हा स्वतःचे गाव किंवा स्वतःचे शहर किंवा स्वतःचा तालुका किंवा स्वतःचे नगर शिकवले गेले पाहिजे मग सहावीत पुन्हा स्वतःचा जिल्हा सातवी मध्ये पुन्हा राज्याचे तपशीलवार भूगोल आणि इतिहास आठवी पुन्हा राष्ट्राचे भूगोल आणि इतिहास आणि नववीत खंडाचा उदाहरणार्थ आपल्याकडे आशिया खंडाचा इतिहास आणि भूगोल शिकवले गेले पाहिजेत आणि दहावीत संपूर्ण जगाचा भूगोल आणि इतिहास शिकवला गेला पाहिजे तरच अभ्यासक्रम नीट चालेल आणि मुख्य म्हणजे त्याच्याशी नातं जोडता येईल 


माणूस फक्त अवकाश पहात अवकाशात जगत नाही तर त्या अवकाशावर नियंत्रण मिळू पाहतो जी एक अत्यंत पाशवी अशी प्रेरणा आहे आणि ती नैसर्गिक आहे माणसाच्या ताब्यात आलेला अवकाश म्हणजे क्षेत्र होय आणि त्या क्षेत्राच्या अधिपतीला आपण क्षेत्रपती असे म्हणतो त्या क्षेत्रपतीच्या अधिपत्याखाली अनेक क्षेत्रक येतात सर्वसाधारणपणे सर्व राजकारण हे क्षेत्राच्या आधारे चाललेले असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळेच त्या त्या क्षेत्राचे झालेले प्राप्त झालेले ज्ञान म्हणजे भूगोल होय भूगोल हे आपले त्या त्या क्षेत्राचे ज्ञान असते आणि प्रत्येक भूगोलाच्या पलीकडे त्या त्या क्षेत्रामध्ये काम असते म्हणूनच भूगोल अत्यंत मूलभूत विषय म्हणून शिकवला जातो आणि तो तसाच शिकवला गेला पाहिजे 


हा भूगोल नेमका कसा चालतो याचे जे ज्ञान होते त्याला आपण भौतिकी असे म्हणतो त्यामध्ये प्रामुख्याने भौतिक विज्ञान येते रसायन विज्ञान येते अगदी गणित आणि भूमितीची सुरुवात सुद्धा भूगोलाच्या ज्ञानापासूनच सुरू झालेली आहे क्षेत्र मोजणे ही माणसाला लागलेली एक सवय आहे आणि त्यातूनच पुढे भूमिती निर्माण झालेली आहे 


त्या त्या भूगोलामध्ये साहजिकच ज्या ज्या गोष्टी असतात त्यांचे जे ज्ञान असते ते आपोआपच भाषेमध्ये साठवले जाते आणि त्यातूनच त्या त्या भूगोलाची म्हणून एक विशिष्ट भाषा निर्माण होत जाते या भाषेला आपण भौगोलिक भाषा असे म्हणू शकतो भाषा म्हणजे केवळ चिन्ह नसतात तर त्या चिन्हांच्यामध्ये साठवलेले त्या त्या अवकाशाचे त्या त्या भूगोलाचे ज्ञान असते आणि म्हणूनच भौगोलिक भाषेच्याबाबतीत तडजोड करता येणे अशक्य असते मराठी भाषेमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलासंदर्भात अनेक खोल ज्ञान असणारे शब्द असतात महाराष्ट्रामध्ये भौगोलिक भाषा म्हणजे फक्त प्रमाण मराठी भाषा नव्हे तर तिचे अनेक प्रादेशिक अवतार अनेक आदिवासी भाषांचे अवतार येतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे भाषेच्या आधारे अवकाश विकसित होत नसतो तर अवकाशाच्या आधारे अवकाशाच्या ज्ञानाच्या आधारे भाषा विकसित होत असते साहजिकच जेव्हा तुम्ही स्थलांतर करता तेव्हा तुम्ही स्वतःच्या भूगोलाचा आणि स्वतःच्या अवकाशाचा त्याग करत असता आणि परक्या अशा त्या त्या अवकाशात दाखल होत असता त्या अवकाशात आम्ही जगू अशी प्रतिज्ञा करत असता आणि म्हणूनच ज्या अवकाशात तुम्ही जगता त्या अवकाशाचे ज्ञान व्यवस्थित व्हावे म्हणून तुम्हाला त्या त्या अवकाशाची त्या त्या भूगोलाची भाषा येणे अत्यंत आवश्यक असते कारण ते ज्ञान ते अनुभव फक्त त्या त्या भाषेतच आलेले असतात मला त्या अनुभवांशी मला त्या ज्ञानाशी काहीही देणे घेणे नाही हे निष्काळजी पण असते आणि हे निष्काळजिता परवडणारी नाही परवडत नसते भारतामध्ये स्वतःच्या भूगोलाविषयीचा निष्काळजीपणा हा इतका प्रचंड प्रमाणामध्ये आहे की जणू काय आम्ही भूगोलाशिवाय जगतो आहोत आमच्या अवकाशा शिवाय जगतो आहोत अशी काहीतरी भावना अनेकांच्या मनात असते विशेषता शहरांमध्ये तुम्ही वाढला की भूगोलांशी तुमचे नाते तुटत जाते आणि आसपास फक्त काँ क्रिट च्या बिल्डिंगज असल्या की त्या त्या अवकाशाचे ज्ञान घटत जाते आणि स्वतःच्या मुंबई नामक शहरांमध्ये काय प्रकारचा भूगोल अस्तित्वात आहे याविषयी तुम्हाला कसलीही आस्था उरत नाही याचे कारण तुम्ही इंग्रजी माध्यमातून शिकल्यामुळे तुम्हाला इंग्रजी भूगोल कळतो ज्याचा तुम्हाला बोंबलायला काहीही उपयोग नसतो जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या जगण्याच्या भूगोलामध्ये उतरत नाही त्यासाठी त्या भूगोलामध्ये जात नाही तोपर्यंत तुमच्या जगण्याला सार्थकत्व येणे अवघड असते म्हणजेच एका अर्थाने तुम्ही इंग्लिश शिकता तेव्हा इंग्लंडमध्ये किंवा इंग्लिश भाषा जिथे आहे तिथेच स्थलांतर करण्याची तुमची प्रवृत्ती आहे हेच सिद्ध होत असते म्हणूनच मग विदेशात गेलेल्या लोकांना स्टेटस सिम्बॉल प्राप्त होते वास्तविक फक्त विज्ञानच आणि तंत्रज्ञानच आणि चिन्ह विज्ञानच आणि चिन्ह तंत्रज्ञानच शिकवण्यासाठी शिकण्यासाठी आपणाला इंग्लिश ची गरज आहे खरे तर ती सुद्धा असता कामा नये परंतु ती तशी कृत्रिमरीत्या भारतावर राज्य करू पाहणाऱ्या लोकांनी निर्माण केलेली आहे आपल्या पोरांना इंग्लिश माध्यमात टाकत या भूगोलावर वर्चस्व गाजवायचे अशी ही सत्तेची खेळी असते आणि दुर्दैवाने इंग्लिश मीडियम ही सत्तेची खेळी आहे हे न कळलेल्या प्रजाजनांना कसलेही राजकारण कळत नसते कारण त्यांच्याही डोक्यामध्ये आपण कसे इंग्लिश मध्ये शिकू आणि त्या प्रस्थापित व्यवस्थेत सामील होऊ हाच प्रश्न टाकला जातो एका अर्थाने विदेशीकरणासाठी तुम्हाला तयार केले जाते एडिट केले जाते आणि म्हणूनच भलेभले लोक परदेशात गेले की मस्तपैकी फोटो टाकून आपले स्टेटस सिम्बॉल वाढवत बसतात प्रत्यक्षामध्ये परदेशात गेल्यानंतर तिथल्या परदेशस्थ भूगोलाविषयी नेमके तुम्हाला काय वाटले आपल्या भूगोलांचे आणि त्याच्या भूगोलांची तुलना करावीशी वाटली की नाही हे सगळं काही भूगोलाविषयीचे तुमचे निरीक्षण भूगोलाविषयीचे तुमचे अनुभव तुमच्या लिखाणामध्ये आले पाहिजे पण त्या ऐवजी आपण त्या भूगोलात गेलो म्हणजे काय तरी आपल्या आयुष्याचे सार्थक झाले असेच अनेकांना वाटते वास्तविक त्या भूगोलामध्ये असलेल्या आणि आपल्या भूगोलाला उपयुक्त पडू शकतील अशा गोष्टी आपण त्या भूगोलातून आयात केल्या पाहिजेत परंतु असे काहीही होत नाही याचे कारण ज्या लोकांचे स्वतःच्या भूगोलाशी नाते नसते स्वतःच्या अवकाशाशी नाते नसते त्यांचे दुसऱ्या भूगोलांशी ही काहीही नाते नसते त्यामुळेच परदेशात गेलेला पेशव्यांचा वकील तिथून पुस्तकांच्या विषयीची माहिती घेऊन येत नाही छापखाने टाकत नाही शिवाजी महाराज व अकबर यांना सुद्धा छापखाने टाकावेसे वाटलेले नाही याचे कारण भूगोलामध्ये तुलनात्मक दृष्ट्या आपल्याकडे आपल्या भूगोलामध्ये काय आहे आणि त्यांच्या भूगोलाम मधून आपण काय घेऊ शकतो आपण घेऊ शकतो असे त्या भूगोलामध्ये काय आहे अशी तुलना करण्याची संधीच आपल्याकडच्या लोकांना मिळत नाही परदेश गमन थांबले की अनेकदा प्रगती थांबते याचे कारण तुलनेला सतत आपल्यापुढे दुसऱ्यांचे भूगोल असणे आवश्यक असते भूगोलाच्या बाबतीत तरी भेदाभेद अमंगल अजिबात असत नाही तो मंगलच असतो आपल्याकडे मोक्षामधून प्राप्त होणारा एकात्मपणा तुलना करायला नकार देतो आणि तुलना ही भूगोलांच्या संदर्भामध्ये अत्यंत आवश्यक असते कारण ती आपल्याकडे काय आहे आणि आपल्याकडे काय नाही हे सांगत असते आणि हे सर्व करण्यासाठी मुळातच तुम्हाला तुमचा भूगोल नीट माहिती असावा लागतो आणि भूगोल नीट माहिती होण्यासाठी त्याचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी तुम्हाला त्या भूगोलाची भौगोलिक भाषा व्यवस्थित यावी लागते कारण त्या भौगोलिक भाषेमध्ये केवळ आत्ताचाच भूगोल असत नाही तर त्या भूगोलाचा इतिहास सुद्धा असतो जेव्हा आपण राज्यभाषा मराठी असे म्हणतो तेव्हा आपण मराठी राज्याच्या भूगोलाची भाषा असे म्हणत असतो अवकाशात स्थलांतर करायचे आहे पण त्या अवकाशाची भाषा नाकारायची आहे हे चालणे शक्यच नसते मुळातच मराठी अवकाशात स्थलांतर करून मराठी भाषा नाकारणारे लोक अर्बन नक्षल असतात ते फक्त अर्बन कल्चर बघत जणू काही अर्बन कल्चर म्हणजेच मराठीचे कल्चर आहे महाराष्ट्राचे कल्चर आहे अशी सोयीस्कर गैरसमजूत करून घेत जगायला बघत असतात या अवकाशाची आणि या भूगोलाशी नाते तोडत असतात असे नाते तोडू पाहून जगु पाहणाऱ्या लोकांना खरंतर अनेकदा कोपच्यातच घेणे आणि समजावणे आवश्यक आहे मराठी लोकांचा आकांत नेमका कशासाठी चाललेला आहे हेच या लोकांना कळत नाही आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की स्वतःची जमीन विकत तिला अर्बन करणारे मराठी महाभाग त्यांनाही हे काही समजून घ्यायचे नसते कारण त्यांनाही अर्बन नक्षल यांच्याप्रमाणे फक्त पैसा दिसत असतो आपण जमीन गमवत असतो तेव्हा आपण भूगोल गमवत असतो हे साधे तथ्य या लोकांना कळत नाही त्यांना आपली जमीन दिसत नसते आणि एकदा जमीन दिसायची बंद झाली की अवकाश दिसायचा बंद होतो आणि मग हळूहळू आपली भाषा दिसणे बंद होते आपल्याकडच्या अनेक इंग्लिश मीडियम मध्ये गेलेल्या इंग्लिश मध्ये शिकलेल्या लोकांच्या बाबतीत हे घडलेले आहे आणि यामध्ये मराठी लोक सुद्धा येतात आपल्याकडे हिंदीचे समर्थन करणाऱ्या लोकांना मराठीचा अवकाश दिसणे बंद झालेले आहे असा याचा अर्थ आहे हिंदी कडे स्वतःच्याच भूगोलाचे ज्ञान अलीकडे कमी होत चाललेले आहे आणि विज्ञान तंत्रज्ञान चिन्ह विज्ञान चिन्ह तंत्रज्ञान यासंदर्भामध्ये या क्षणी हिंदीचा काहीच फायदा नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे हिंदी शिकण्याची गरज नाहीच मी अलीकडे उत्तर भारतात फिरलोय आणि मला जाणवलेली गोष्ट अशी की अनेक शहरात शिकणाऱ्या हिंदी भाषी लोकांना त्यांच्या भूगोलाविषयी आता कसलीही असता उरलेली नाही आणि हे भीषण आहे आपण फक्त मराठीचा विचार करतो पण खरंतर हिंदीचाही विचार हिंदी लोकांनी करायला हवा असे त्यांना सांगणे आवश्यक आहे कारण एकेकाळी हिंदीतल्या अवकाशाविषयी माहिती असणारे खूप तज्ञ लोक मला भेटायचे तिथले वृक्ष तिथली जमीन यांच्याविषयी त्यांना प्रचंड माहिती असायची आत्ताच्या शहरात इंग्लिश माध्यमात शिकलेल्या अनेक हिंदी भाषिकांना त्यांच्या भूगोलाविषयी कसलीही माहिती नाही आस्था नाही हा माझा अलीकडचा अनुभव आहे त्यामानाने पंजाबी लोक स्वतःच्या भूगोलाविषयी थोडे सजग दिसले पण मारवाड्यांनी आपल्या राजस्थानातल्या भूगोलाविषयी कमालीची अनास्था स्वीकारलेली दिसते प्रश्न फक्त मराठीचा नाहीये तर प्रश्न सगळ्या राज्यीय भाषांचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे 


भाषा म्हणजे त्या भूगोलाचे सातत्य असते आणि हे सातत्य पारंपारिकच असायला हवे असे नव्हे ते ऐतिहासिक असले तरी चालते किंबहुना जितक्या लवकर आपण परंपरा नाकारायला शिकू तितक्या लवकर आपण इतिहासाकडे वळू परंपरा ही आभासी असते कारण ती धर्माने निर्माण केलेली असते या उलट इथे असा वस्तूगत पूराव्यांच्या आधारे निर्माण झालेला असतो आपल्या भूगोलामध्ये पूर्वी काय घडले आणि आता काय घडत आहे याची तुलना त्यामुळे करता येते आणि इतिहास या संदर्भात फार महत्त्वाचा असतो मात्र या सातत्यात रमणे हे सुद्धा अतिशय घातक असते कारण तुम्ही फक्त तुमचे सातत्य घेऊन नसता तर जगभरातले असे अनेक भूगोल स्वतःचे सातत्य घेऊन जन्मलेले असतात वाढत असतात त्यांची दखल घेणे ही तितकेच आवश्यक असते इतकेच नव्हे तर त्या सातत्यामध्ये आपल्याकडे नसणारे असे काही असेल आणि जे आपल्याला उपयुक्त असेल तर आपणाला ते उसने घ्यावे लागते आणावे लागते आत्मसात करावे लागते म्हणूनच देशीवाद फारसा कामाला येत नाही या नात्या मार्गाने देशी वादाला सुद्धा देशी करण किंवा तत्सम संकल्पना स्वीकाराव्या लागतातच याचे कारण तुमचे भौगोलिक सातत्य हे स्वायत्त असत नाही इतर अनेक सातत्यांशी तुमचे दळणवळण चाललेले असते हे दळणवळण सुटले की पेशवाई तयार होते आणि पेशवाई तयार झाली की मग फक्त परंपरेतील अत्यंत स्वार्थी आणि सत्तेला सोकावलेले लोक परंपरेचा गैरवापर करत फक्त शोषण व्यवस्था निर्माण करत असतात परंपरा ही फार डेंजरस गोष्ट असते कारण परंपरा ही अनेकदा कालबाह्य झालेल्या गोष्टींना पुनर्जीवित करत राहते जसे आता मनुस्मृतीचे पुनर्जीवन करणे शक्य आहे का ते वारंवार आजमावले जात आहे 


थोडक्यात काय ज्या भूगोलात तुम्ही राहाता आणि जगता त्या भूगोलाचे भौगोलिक सातत्य त्या भौगोलिक भाषेत सातत्याने सळसळत असल्याने आपणाला ती भौगोलिक भाषा आत्मसात करायलाच हवी ही जाणीव प्रत्येकाने ठेवावी हेच प्रत्येकाच्या भल्याचे आहे 


श्रीधर तिळवे नाईक


गोवा, दमण आणि दीव हे प्रदेश साडेचारशे वर्षे पोर्तुगीज वसाहत होते. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय लष्कराकरवी `ऑपरेशन विजय' ही कारवाई करून १९ डिसेंबर १९६१ रोजी हा प्रदेश भारतीय संघराज्याचा भाग बनवला. 


या छोट्याशा प्रदेशातील अनेक लोकांनी मागील तीनशे चारशे वर्षांच्या काळात पोर्तुगालला किंवा पोर्तुगीजांच्या वसाहती असलेल्या मोझांबिक, टांझानिया वगैरे ठिकाणी स्थलांतर केले होते.


सध्या पोर्तुगालचे पंतप्रधान असलेल्या अंतोनियो कोस्टा यांच्या आजोबांनीही असेच गोव्यातल्या मडगाव येथून मोझाम्बिक येथे स्थलांतर केले होते. गोवा, दमण आणि दीव या पोर्तुगीज वसाहतीतील लोकांना पोर्तुगालच्या नागरिकांनाप्रमाणे नागरी हक्क होते आणि पोर्तुगीज पासपोर्ट असायचा.  


गोवा, दमण आणि दीव भारताचा भाग बनला तेव्हा या प्रदेशातून पोर्तुगालला किंवा पोर्तुगालच्या इतर वसाहतीत राहायला गेलेल्या बहुतेक लोकांनी स्वतःचा पोर्तुगीज नागरिकाचा पासपोर्ट कायम ठेवणे म्हणजेच पोर्तुगालचे नागरिक म्हणून राहणे अधिक पसंत केले, 


त्यानंतर ते गोव्यात आणि भारतात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले ते परदेशी नागरिक म्हणूनच.  


अशा लोकांची संख्या प्रचंड होती. अर्थात यामध्ये कॅथोलिक लोकांचा भरणा अधिक होता हे साहजिकच होते.  


गोव्यातील हिंदू लोक उच्च शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा कॅरियरच्या शोधात मुंबई-पुण्याकडे वळत असत तसे इथले पाश्चात्य संस्कृतीकडे ओढा असलेले कॅथोलिक लोक लिस्बन किंवा इतर शहरांत जात असत.        


धर्मगुरु होण्यासाठी सत्तरच्या दशकात मी जेसुईटांच्या गोव्यातल्या मिरामार इथल्या प्री-नॉव्हिशिएटमध्ये दाखल झालो तेव्हा पोर्तुगीज राजवटीच्या इथल्या खूप खाणाखुणा अस्तित्वात होत्या. पोर्तुगीज पासपोर्ट असणारे आणि नोकरीनिमित्त पोर्तुगाल किंवा पोर्तुगीजांच्या पूर्वीच्या वसाहतीत राहणाऱ्या काही पालकांची मुलं माझ्याबरोबर या प्री-नॉव्हिशिएटमध्ये होती.  


साहजिकच पोर्तुगीज भाषेत बोलणे त्यांना जमायचे. विशेष म्हणजे यापैकी काही मुलं गोव्यात जन्मलेली होती तर काही चक्क पोर्तुगालमध्ये किंवा नैरोबी वगैरे शहरांत जन्मली होती.  


आमच्यासारखी ही मुलं भारतीय नव्हती, त्यांच्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट असल्याने माझे हे मित्र पोर्तुगीज नागरिक होते हे मला खूप, खूप उशिरा कळाले. 


वयाची २१ वर्षे पूर्ण होण्याआधीच म्हणजे सज्ञान होण्याआधीच यापैकी काही मुलं आपल्या भावंडांसह गोव्यातून भुर्रकन उडाली आणि आपल्या पोर्तुगीज पासपोर्टच्या आधारे लंडन वगैरे युरोपातल्या शहरांत स्थायिक झाली.  


सज्ञान झाल्यानंतरही त्यांनी गोव्यात राहायचे ठरवले असते तर त्यांना भारतीय पासपोर्ट म्हणजे नागरीकत्व घ्यावे लागले असते आणि याबाबत ही मुलं आणि त्यांचे आईवडील फार उत्सुक नव्हते. 


ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला अशा पद्धतीने पोर्तुगालमार्गे युरोपला, अमेरीका किंवा कॅनडाला स्थायिक झालेल्या माझ्या या मित्रांशी गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमांमुळे पुन्हा संपर्क झाला आहे. 


आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना भेटण्यासाठी ते चारपाच वर्षांतून एकदा येतात ते परदेशी नागरिक म्हणूनच. पोर्तुगालचे पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर अंतोनियो कोस्टा २०१७ ला गोव्याच्या भेटीवर आले होते तसे. 


गेल्या महिन्यात मी गोव्यात होतो तेव्हा सहज फिरताना पोर्तुगीज वकिलातीचे कार्यालय दिसले.  


गोव्यात अठरावा जून रोडवर पणजी चर्चजवळ असलेल्या पोर्तुगालच्या वकिलातीच्या कार्यालयात पोर्तुगीज पासपोर्ट म्हणजे नागरीकत्व मागण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या आजही खूप आहे.      


भारतीय वंशाचे असलेल्या ऋषी सुनक यांनी इंग्लंडच्या राजकारणात मारलेली झेप आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांचे उदाहरण आपल्या समोर आहेच.  


पणजीतले इंग्रजी दैनिक `द नवहिंद टाइम्स'चा बातमीदार असताना `गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टस' (गुज) चा मी सरचिटणीस होतो. तेव्हाची म्हणजे १९८६च्या आसपासची ही घटना.  


अखिल भारतीय पत्रकार महासंघ संलग्न असलेल्या अखिल भारतीय वृत्तपत्र कामगार महासंघाचे अध्यक्ष आणि शासननियुक्त पत्रकार आणि बिगरपत्रकार वृत्तपत्र कामगारांसाठी असलेल्या वेतन आयोगाचे सभासद असलेले कॉम्रेड एस. वाय. कोल्हटकर गोवा भेटीवर होते.


आणि गुज सरचिटणीस म्हणून मी त्यांचा यजमान होतो. 


डोना पावला येथे नव्यानेच सुरु झालेल्या पंचतारांकित हॉटेल सिदाद दि गोवा येथे `सिटु'चे दीर्घकाळ अध्यक्ष असलेले कॉम्रेड कोल्हटकर उतरले होते. तिथली त्यांची जीवनशैली पाहून मी चक्क झालो आणि त्यांच्या हातातली करड्या रंगाची `555' ब्रँडची परदेशी सिगारेट्स पाकिटे पाहून मी अगदी थक्क झालो. 


युरोपात रशिया आणि बल्गेरिया येथे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी असताना तिथे अशी जीवनशैली मी स्वतः अनुभवली होती. मात्र गोव्यात मी ``फोर स्क्वेअर’ या ब्रॅन्डचे एक रुपयाला दहा सिगारेट्स असणारे पाकीट मी विकत घेत असायचो.


`फाईव्ह फाईव्ह फाईव्ह’ हे महागडे सिगारेट कसे परवडते असा बालबोध प्रश्न मी विचारला तेव्हा आखाती देशात स्थायिक झालेला आपला मुलगा सिगारेट्सच्या पाकिटांचे कार्टन्स आणतो हे त्यांचे उत्तर ऐकले आणि मी सर्द झालो !      


(`उत्तुंग' या माझ्या व्यक्तिचित्रसंग्रहात ( 1993) कॉ. कोल्हटकर यांच्यावरही एक प्रकरण आहे.)


कामगार चळवळीत निस्वार्थपणे झोकून देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मला कॉम्रेड कोल्हटकरांच्या मुलाची परदेशात चाललेली कॅरियर माझ्या डोळ्यांत अंजन टाकणारी ठरली.  


त्यानंतर देशभर अख्ख्या कामगार चळवळीतील नेत्यांचे आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचे आदर्श असलेल्या साथी जॉर्ज फर्नांडिस यांचे चिरंजीव सिंगापूर कि इतर कुठे स्थायिक असल्याचे वाचले तेव्हा असाच धक्का बसला होता. 


नंतर असे धक्के पुन्हापुन्हा बसू लागले आणि जीवनात स्वतःबाबत आणि आपल्या कुटुंबियांच्या जबाबदारीबाबत अधिक जागरुक राहण्याची जाणिव अगदी वेळेत झाली.     


गोवा सोडून पुण्यात स्थायिक होऊन स्वतःचे बिऱ्हाड केल्यानंतर आणि मुलीच्या जन्मानंतर कानाला खडा लावला आणि कामगार चळवळीला कायमचा रामराम ठोकला.  


अहमदनगर जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या माझ्या थोरल्या भावाचे- कट्टर शिवसैनिक मार्शलआप्पा पारखे - याचे अखेर काय झाले याचा अतिशय कटु अनुभव मला स्वतःला होताच.   


अर्थात परदेशातली चांगली कॅरीयर सोडून भारतात परतणाऱ्यांची काही उदाहरणे आहेतच. 


माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या निधनानंतर भारताच्या राजकारणात त्यांची जागा घेण्यासाठी त्यांचे चिरंजीव अजित सिंग आपले परदेशातील वास्तव्य सोडून मायदेशी परतले होते. 


अर्थात अजित सिंग यांना आपल्या वडलांप्रमाणे देशपातळीवर स्थान मिळवण्यात अपयश आले आणि उत्तर प्रदेशातल्या एका छोट्याशा पट्ट्यात त्यांचा बालेकिल्ला राहिला आणि केंद्रात काही काळ मंत्रिपद त्यांना मिळाले.  


नवीन पटनाईक मात्र याबाबत यशस्वी ठरले. ओडिशाचे एकेकाळचे लोकप्रिय नेते आणि माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांच्या निधनानंतर परदेशात स्थायिक झालेले त्यांचे चिरंजीव नवीन पटनाईक भारतात परतले आणि ओडिशाचे चार वेळा सलगतेने मुख्यमंत्रीपद राखण्याचा विक्रम आज त्यांच्यावर आहे, 


याकाळात अगदी मोदी लाटेलाही त्यांनी ओडिशात थोपवले आहे. परदेशात राहिल्याने त्यांना त्यांची मातृभाषा असलेली ओडिशा भाषा चांगली बोलता येत नाही असे म्हणतात. 


आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे मुंबई-न्युयॉर्क या मार्गांवर विमान चालवणारे वैमानिक असलेले राजीव गांधी यांना अनिच्छेनेच भारतात आणि राजकारणात यावे लागले होते हे आपल्याला ठाऊक आहेच.   


मात्र परदेशातला निवास संपवून भारतात येऊन अशी महत्त्वाची सत्ताकेंन्द्रे भूषवणे सर्वांनाच शक्य होत नाही.    


मी स्वतः पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी पूर्व युरोपात बल्गेरिया येथे राहिलो, तिथली बल्गेरियन भाषा बोलण्याचे आणि सिरिलिक (रशियन) लिपी वाचायचे शिकलो,  


या दरम्यान रशियाचा दौरा केला. गोव्यात परतलो तेव्हा अनेकांनी मी `बल्गेरियात स्थायिक होण्याचा विचार केला नाही काय?'' असे विचारले होते. 


अशी अनेक उदाहरणे मला स्वतःला आणि इतरांनाही माहित आहेतच.     


काही महिन्यांपूर्वी आचार्य प्र. के. अत्रे यांच्या परदेशस्थित मुलीचे निधन झाले अशी बातमी वाचली. `मराठा' दैनिकाचे संपादक आचार्य अत्रे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक मोठे नेते. 


या चळवळीत हुतात्मे झालेल्या १०८ लोकांचे स्मारक मुंबईत आहे आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार अशी आवई उठली कि लगेचच या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करुन दिली जाते. 


तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले मुख्य नेते असलेल्या आचार्य अत्रे त्यांचे वंशज आता युरोपात स्थायिक आहेत हे ऐकले तेव्हा ``संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील या १०८ हुतात्म्यांचे वारस आज कुठे असतील आणि काय करत असतील?'' असा एक विचार मनाला सहज चाटून गेला.    


`महाराष्ट्र टाइम्स'चे दीर्घकाळ संपादक असलेले गोविंद तळवलकर आपल्या निवृत्तीनंतर परदेशात स्थायिक असलेल्या आपल्या मुलीकडे राहायला गेले होते आणि तेथून ते महाराष्ट्राच्या आणि भारतातल्या घडामोडींवर चिंतनात्मक लेख बरीच वर्षे लिहीत असत.  


समाजवादी नेते नानासाहेब तथा ना. ग. गोरे हेही वर्षांतून काही काळ परदेशातल्या आपल्या मुलीकडेच राहत असत. 


अशी कितीतरी उदाहरणे लोकांना माहित असतील.   


गोव्यात अनेक गावांत परदेशात स्थायिक असलेल्या गोंयकारांची मोठमोठी घरे बेवारस स्थितीत आहेत आणि त्यांच्यावर `लँड माफियां'चा डोळा आहे. यावर चाप लावण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारने पावले उचलली आहेत.  


पुण्यात भांडारकर रोड सारख्या अनेक परिसरांत जुन्या घरांची अशीच स्थिती असेल.


आपल्या देशात अगदी अलीकडच्या काळापर्यंत समुद्रगमन करणे अर्थात परदेशी जाणे निषिध्द होते. 


विलायतच्या दौऱ्यावरुन परतल्यावर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना त्याबद्दल प्रायश्चित घ्यावे लागले होते. 


आता तसे काहीही आपण मानत नाही. परदेशी शिक्षणासाठी वा नोकरीसाठी जाणे आता कौतुकास्पद असते. 


व्यवहारात शहाणी असलेल्या लोकांना आपला भलेपणा कशात आहे याची जाणीव असते आणि त्यानुसार ते निर्णय घेत असतात. 


भावनेच्या भरात वाहत जाणारी माणसे नंतर मग आपल्या नशिबाला बोल लावत बसतात, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 


गेल्या काही वर्षांत अनेक भारतीयांनी देशातले आपले चंबुगबाळे आवरुन परदेशाची वाट धरली आहे, याची आकडेवारी बाहेर आली आहे.  


यात नवल, धक्कादायक किंवा वाईट असे काही नाही.     


Camil Parkhe, July 22, 2022

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे