पुन्हा फुले , भगत , ब्राह्मण, ब्राह्मणांची उत्पत्ती आणि मार्टिन श्रीधर तिळवे नाईक 

आज गुरुपौर्णिमा साहजिकच वेगवेगळ्या गुरूंच्या वर चर्चा होणे अटळ ! शैव प्रवाहात महाराष्ट्रात फुले यांचे सामाजिक सुधारणांचे गुरु म्हणून असलेले स्थान अढळ आणि अटळ आहे त्यांनी मांडलेला सत्यशोधक धर्म हा जरी आता प्रवाही राहिला नाही तरी त्याचा प्रभाव पूर्णपणे ओसरलेला नाही 


आंबेडकर यांनी त्यांचा उल्लेख गुरु असा केलेला आहे याचे कारण उघड आहे अस्पृश्याची कैफियत मांडणारे ते पहिले विचारवंत दिसतात 


त्यांनीच ब्राह्मण आणि ब्राह्मणे तर वाद सुरू केला असे म्हणायला हरकत नाही म्हणजे बौद्ध धर्मामध्ये ब्राह्मण धर्मविरुद्ध बौद्ध धर्म असा वाद आहे पण तो धर्म संघर्ष आहे वर्ण संघर्ष नाही पुढे बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा बौद्धांचाच धडा गिरवत धर्म संघर्ष मांडला आणि तो हिंदुधर्म विरुद्ध बौद्ध धर्म अशा तऱ्हेने आला 


 मात्र त्यांच्यापूर्वी फुले यांनी संघर्ष मांडला होता आणि महात्मा फुले यांच्यामुळेच ब्राह्मण म्हणजे काय आणि ब्राह्मण्य म्हणजे काय याविषयी चर्चा करावी लागते प्रश्न असा आहे की आपण त्याआधी काही त्याचे मूळ होते काय हे तपासू शकतो का ?


खरंतर पश्चिम हिंदुस्थानातील युनायटेड सर्विस इन्स्टिट्यूशन मध्ये 21 ऑगस्ट 1863 रोजी मार्टिन हाग या विचारवंताने प्रथम "ब्राह्मण वर्णाचे मूळ" या नावा चे व्याख्यान दिले आणि त्याने प्रथम जाहीर केले की ब्राह्मण वर्ण काहीही म्हणत असला तरी ब्राह्मण वर्ण हा अगदी स्वतंत्र असा कधी स्थापित झाला आणि या वर्णाचे वर्चस्व धर्म प्रकरणात कधी स्थापित झाले याविषयी आधार पर लेख कोठेही आढळत नाही माझ्यामते असा आधार मिळणार कसा कारण ब्राह्मण धर्माचे मुळात कधी वर्चस्वच नव्हते परंतु इंग्रजांच्या काळामध्ये ह्या देशामध्ये ब्राह्मण वर्णाच्या हातात लेखणी आणि छापीलता आली आणि त्यांनी मोकाटपणाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले याच वेळेला शासन दरबारामध्ये अधिकाऱ्यांची संख्या ही ब्राह्मण असल्याने जास्त असल्याने साहजिकच सरकारी पाठिंबाही या गोष्टीला मिळत गेला आणि खरोखरच असे काही वर्चस्व अस्तित्वात होते की हे लोक हवेतल्या हवेत बोलत होते याची शहनिशा करण्याची काळजी कोणी केली नाही या काळात ब्राह्मण वर्ण हा इंग्रजांना प्रत्यक्ष ईश्वराच्या मुखापासून आमची निर्मिती झाली आहे असे सांगत आणि आमचा धर्म हा प्रत्यक्ष ईश्वराने दिला आणि मनुष्य मात्रा स् ज्ञान देण्यासाठी व कैवल्याचा मार्ग दाखवण्यासाठी ईश्वराने आमची योजना केली आहे असेही सांगत अर्थातच मार्टिन म्हणतो त्याप्रमाणे हे मनुष्य मात्र फक्त हिंदुस्थानातल्या हिंदूंच्या पुरते मर्यादित होते माझ्यामते त्यामुळे हिंदूंच्या खेरीज अस्तित्वात असलेल्या धर्मात जाऊन धर्म प्रचार करण्याची जबाबदारी कधीच ब्राह्मणांनी स्वीकारली नाही त्याचा परिणाम जो व्हायचा तो झाला तुम्ही प्रचार केला नाही म्हणून त्यांनी प्रचार केला आणि तुमच्या धर्मात घुसून तुमचे लोक धर्मांतरित केले यातील आश्चर्यकारक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे हिंदू धर्मातले जे लोक आहेत ते सोडून इतर धर्मातले जे लोक आहेत त्यांना ब्राह्मण अतिनिच प्राणी मानतात असे निरीक्षण मार्टिन हागने नोंदवलेले आहे म्हणजेच हिंदूधर्मवर्तीपुण्यमानव आणि पशु अशी ब्राह्मण लोकांनी या काळामध्ये समाजाची द्विध्रुवात्मक विभागणी केली होती अशी त्याची मांडणी आहे या काळामध्ये परदेशस्थ लोकांच्यासाठी म्लेंच्छ असा शब्द त्यामुळेच ब्राह्मण लोक वापरत होते असे त्याचे म्हणणे आहे आणि या म्लेंच्छ लोकांना स्वर्ग दाखवण्याची वा मिळवून देण्याची ब्राह्मणांची इच्छा नव्हती असेही तो सांगतो 


स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ब्राह्मण लोक आमचे विशेष वर्चस्व हे ईश्वराने स्थापित केलेले आहे आणि ते सिद्ध करण्याकरता अनादी आणि अपौरुष असे मानलेले जे वेद त्यांचा आधार ब्राह्मण या काळात दाखवत होते या काळामध्ये ऋक, यजुष, साम , अथर्वण अशी वेदांची चार नावे होती ती अलीकडे बदललेली आहेत या जुन्या नावातील अथर्वण फार महत्त्वाचे नाव आहे ज्याला नंतर अथर्व केले गेले आणि पुढे गणपतीचे अथर्वशीर्ष निर्माण केले गेले याच काळामध्ये पुरुष सूक्त हाच पुरावा म्हणून दाखवले जात होते आणि म्हणूनच या काळानंतर पुरोगामी कालखंडामध्ये पुरुष सूक्त भोवती सर्व चर्चा फिरायला लागलेली दिसते अगदी आंबेडकरही यातून सुटले नाहीत याला कारण मुळात ब्राह्मण वर्ण श्रेष्ठत्वाचा अधिकाराचा पुरावा म्हणून पुरुष सूक्त सादर करत होते पुरुष म्हणजे आदिमानव किंवा सर्वात पहिला जन्मलेला मनुष्य होय असे त्याने अर्थ निर्णयन दिले आहे नंतर याचा अर्थ ईश्वर झाला असे तो सांगतो मी मागेच म्हटले आहे की ईश्वर हा शब्द अनार्य लोकांच्याकडून आर्यांच्याकडे गेला आणि वेदांच्यात तो वापरला गेलेला आहे पुढे मग चराचराचा आत्मा म्हणून पुरुष प्रस्थापित झाला झोराष्ट्रीयन धर्मामध्ये सुद्धा पहिल्या माणसाचा जन्म गायोमार्त (याचा अर्थ गायीचा मालक म्हणजे बैल असा घ्यावा का असा प्रश्न नक्की पडावा) आणि अहिरमन यांच्या संघर्षातून झाला अर्थात सोन्यातून मनुष्य जन्मला अशी त्यांची कथा आहे स्कॅनडेवियन लोकांच्यातही यमीर नावाचा राक्षस मारून त्याच्या देहाच्या तुकड्यां पासून मनुष्य जात निर्माण झाली असे मानले जाते मार्टिन हाग या पुरुषाच्या मुखापासून ब्राह्मण लोकांची निर्मिती झाली असे म्हणत नाही तर या पुरुषाच्या मुखाच्या जागी ब्राह्मण आले असे म्हणतो इतकेच नव्हे तर तो असे सांगतो की नरमेध यज्ञामध्ये ज्यात मनुष्य बळी दिला जात असे पुरुष सूक्त म्हटले जात असे माझ्या मते मग याचा अर्थ हे सुक्तच मुळात नर मेध यज्ञासाठी निर्माण झाले होते का ? त्या पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की मग आपण पुरुषाच्या आणि या यज्ञाच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या सुक्ताचा वापर स्वतःच्या वर्चस्वासाठी करावा असे ब्राह्मणांना का वाटले असेल ? आपली उत्पत्ती म्हणून अशा प्रकारचा यज्ञाला का प्राधान्य दिले गेले असावे ? 


मार्टिन हाग सांगतो यजुर्वेद काळात मात्र पद्धत बदलली बदलत गेली नंतरच्या काळामध्ये मनुष्य वधस्तंभाला बांधून आणला गेला जाऊ लागला मात्र आता मनुष्य बळी देण्याऐवजी त्याच्या ऐवजी पशु बळी दिला जाऊ लागला आणि मनुष्य प्रतीकात्मक ठेवत प्रत्यक्ष बळी पशुचा जायला लागला नंतरच्या काळामध्ये हा बांधून आणलेला मनुष्य बळी नेहमीच दुसऱ्या जातीचा म्हणजेच अनार्य असायचा आणि नंतर त्याला बहुदा सोडले जात असावे मार्टिन च्या मते इराणी आणि हिंदू म्हणजेच ब्राह्मणधर्म मानणारे लोक हे दोघेही एकच होते आणि याचा पुरावा म्हणून तो समाज व्यवस्था म्हणजेच वर्णव्यवस्था दोन्हीकडे समान होती असे सांगतो athrav चे ब्राह्मण झाले रथस्थ क्षत्रिय झाले आणि वशत्र्य फशुयन हे वैश्य झाले खरी वस्तुस्थिती अशी आहे की आज सुद्धा पारशी धर्मामध्ये पुरोहित पद हे वंशगतच असतं याबाबतीत ब्राह्मण धर्म आणि पारशी धर्म एकसारखेच आहेत माझ्या मते zarthrusht ने नवा धर्म स्थापन करून ही व्यवस्था मोडीत काढली आणि हा नवा धर्म तरी स्वीकारा किंवा मग देश सोडून पळा असा पर्याय या नवीन स्थापन झालेल्या धर्माने दिला माझ्या मते अथरन हे नंतर मिळालेले नाव आहे त्यापूर्वी इराणच्या प्रदेशांमध्ये हे तिथल्या टोळ्यांचे भगत होते आणि यांनी पारशी धर्म स्वीकारायला नकार दिला म्हणून यांना इराण मधून पळून यावे लागले आणि भारतात त्यांना आश्रय मिळाला आणि तेच इथे ब्राह्मण बनले पुढे खुद्द पारशी लोकांना सुद्धा भारतातच आश्रयाला यावे लागले आणि आज ब्राह्मणधर्म नि पारशी धर्म यांचे आपापसात खूप छान चाललेले असते कारण उघड आहे पहिल्याला दुसऱ्याने हाकलले आणि मग दुसऱ्याला तिसऱ्याने हाकलले म्हणजेच मुसलमानाने हाकलले मात्र येताना ब्राह्मण स्वतःबरोबर सर्व मंत्र घेऊन आले कारण शेवटी ते भगत होते इथे त्यांचा संकर देवगणाशी झाला आणि ते देवगणाचे भगत बनले मात्र इराण प्रमाणेच त्यांचा मुख्य पुरोहित अग्नी होता आणि इंद्र हा राजा होता किंबहुना ते राजाला इंद्र म्हणत आणि त्याची स्तुती गात होते भारतात पुरोहित महत्त्वाचा की राजा महत्त्वाचा हा संघर्ष अग्नी महत्त्वाचा की इंद्र महत्वाचा यातून आलेला आहे व असा बदललेला आहे आणि त्यामुळेच पारशी धर्म आणि ब्राह्मण श्रद्धा यांच्यात संघर्ष झालेला आहे कारण ब्राह्मण श्रद्धा ही इंद्राला मुख्य मानत होती हळूहळू देवगणच पराभूत होत गेला आणि इंद्राचे वर्चस्व कमी होत गेले साहजिकच स्वतःचे वर्चस्व निर्माण करणे गरजेचे बनले आणि त्यातूनच मग देवगणाच्या वैदिक धर्मापेक्षा स्वतःचा ब्राह्मण धर्म वेगळा काढला गेला त्यासाठी ब्राह्मणे लिहिली गेली आरण्यके लिहिली गेली आणि पुढे पुढे स्मृती सुद्धा लिहिल्या गेल्या बाहेरून आलेल्या पाहुण्याने हिमालयाच्या पायथ्याशी असलेले स्थानिक देवलोक आपल्याला नियंत्रणाखाली आणले अर्थात विश्वामित्रांच्यासारखी किंवा याज्ञवलक यांच्यासारखे लोक विरोध करत होते परंतु तो विरोध मोडून काढला गेला किंवा सामावून घेतला गेला देव गणातला पाहुणा देवगणाचा मालक झाला 


ब्रह्म या शब्दाचा अर्थ मार्टिन हाग पवित्र गाणे किंवा प्रार्थना असा देतो माझ्या मते हे मुळातच भगतांचे मंत्र आहेत आणि मंत्र हे नेहमीच आवाहक असतात तसे ते आवाहक आहेत म्हणून ते प्रार्थना वाटतात पण त्यांचा उद्देश त्या त्या देवतेला आपल्या नियंत्रणाखाली आणून तिने आपल्या इच्छेने आपल्याला किंवा आपल्या यजमानाला हवी ती किंवा हवे ते द्यावे हा उद्देश आहे भगत जसे संपूर्ण देवांवर कंट्रोल आहे असे सांगतात तसेच ऋग्वेदात सांगितले गेलेले आहे अग्नी हा आद्य पुरोहित आहे याचे कारण यज्ञामध्ये अग्नि केंद्रस्थानी असतो आणि तो मुख्य पुरोहित आहे आणि हा मुख्य पुरोहित त्याला प्रज्वलित केल्यानंतर त्या त्या देवतेला आपल्या नियंत्रणाखाली आणतो अशी ही धारणा आहे मंत्रांच्या साहाय्याने काल्पनिक नियंत्रण हा भगतगिरीचा पायाच असतो आणि साहजिकच त्यामुळेच संपूर्ण जगभर क्षत्रिय आणि व्यापारी लोक या भगतगिरीच्या नादाला लागलेले दिसतात 


या भगत यांच्यापेक्षा " द्रष्टा" नावाचा एक वेगळाच प्रकार भगत लोकांच्यामधूनच निर्माण झालेला दिसतो देवगणामध्ये त्यांना ऋषी म्हटले जात होते हे जे द्रष्टे लोक आहेत ते कुठल्याही वर्ण जातीतून येत होते त्यामुळेच ऋग्वेदाची रचना ही ब्राह्मणांनी केलेली नसून ती ह्या द्रष्ट्या ऋषीनी केलेली आहे आणि ते सर्व जाती-जमातीतून आलेले आहेत अगदी ग्रीक लोकांच्यातसुद्धा असा कोणी ना कोणीतरी द्रष्टा माणूस नाटकात दिसतो याच्या पुढची अवस्था मोक्षक असतो आणि देव गणातून त्यामुळेच विश्वामित्र आणि जनक असे लोक जे द्रष्टे होते पण क्षत्रिय होते ते ब्राह्मणांशी वाद घालताना दिसतात सहाजिकच मग आता आपणाला याच्या पुढे पाऊल टाकावे लागणार याची कल्पना असलेले ब्राह्मण तपस्या करायला लागले आणि त्यातूनच काही अष्टावक्रांच्यासारखे ब्राह्मण मोक्ष मिळवून महाद्रष्टे झाले


अर्थातच अष्टावक्रासारख्या लोकांची संख्या खूप कमी होती त्यापेक्षा पशु प्राप्ती, पुत्रप्राप्ती आणि स्वर्गप्राप्ती यज्ञांच्याद्वारे प्राप्त करून देऊ असे सांगणारे ब्राह्मण जास्त होते पुढे पुढे तर यज्ञाच्या मार्गे आम्ही मोक्ष सुद्धा मिळवून देऊ असे हे लोक सांगायला लागले त्यातूनच पुढे मीमांसा दर्शन निर्माण झाले एखाद्या पुरोहित जमातीचा अहंकार किती मोठा असावा याचा सर्वात मोठा पुरावा ब्राह्मण आहेत आणि त्यांचे मीमांसा दर्शन आहे म्हणजे मोक्षाचा सुद्धा बाजार मांडण्याची तयारी होती किंवा हा बाजार सुरू झाला होता सुदैवाने आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या म्हणजे मीमांसा दर्शनाच्या सर्व आचार्यांना पराभूत करून पुढचा अनर्थ टाळला 


मार्टिनच्या मते यागामध्ये कुश नामक दर्भाची मुष्टी बांधून जे तयार होते त्याला वेद म्हणतात आणि ते एका पुरोहिताकडून दुसऱ्या पुरोहिताकडे जात राहते आणि यज्ञ संपन्न होतो  


यातील कर्मकांड आपणाला फार महत्त्वाचे नाही कारण जगातल्या सर्वच वेगवेगळ्या टोळ्यांच्या मध्ये भगत असतात आणि त्या त्या टोळ्यांची कर्मकांडे असतात आणि तिकडे सुद्धा अगदी आफ्रिकेत सुद्धा भगत काही आपल्या भगतापेक्षा कमी नसतात बहुजन समाजामध्ये जे भगत असतात तेही काही कमी नसतात या कर्मकांडांच्यात चूक झाली तर मग अनर्थ होतो ही भीती सुद्धा भगत नेहमीच निर्माण करत असतात तशी ती इथेही निर्माण केलेली आहे जर का प्रत्यक्षात यजमानाला फळप्राप्ती झाली नाही तर मग यज्ञात काहीतरी कर्मकांडांमध्ये चूक झाली असे सांगता यावे म्हणून हे कारण तयार केलेले आहे अर्थात अनेकदा दुसऱ्यांदा यज्ञ करताना दक्षिणा मात्र नेहमीच घेतली जात होती माझी चूक झाली असे काही भगत म्हणत नाही आणि दुसरा यज्ञ ही फळला नाही तर मग भाग्य आहेच देवाची इच्छा आहेच पुढे पुढे मग मागच्या जन्माचे कर्म हे महत्त्वाचे कारण म्हणून दिले गेले ब्राह्मण लोकांनी किंबहुना हा जो पुनर्जन्माचा सिद्धांत स्वीकारला त्याचे सर्वात मोठे कारण त्याच्या आधारे त्यांना सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देता येत होती म्हणजे शुद्राने आम्ही शूद्र का असा प्रश्न विचारला तर मग तुमच्या मागच्या जन्मातली 

कर्मे असे उत्तर देता येत होते किंवा आम्ही ब्राह्मण आणि क्षत्रिय का तर आमची मागच्या जन्मातली कर्मे असे उत्तर देता येत होते शोषण करणाऱ्या व्यवस्थेमध्ये ही एक सोयीस्कर पळवाट देता येत होती आणि आजही ती दिली जाते ज्या ब्राह्मणांना स्वतःचा मागचा राहू द्या या जन्मातला लहानपणाचा काळ आठवत नाही त्यांना स्पष्टीकरण म्हणून बरी सगळ्यांची मागच्या जन्मातली कर्मे दिसत होती 


सर्वसाधारणपणे प्राचीन काळी यज्ञातल्या चुका या सामगयनात असत किंवा पुरोडाशमध्ये असत त्या हळूहळू मागच्या जन्माकडे सरकायला लागल्या अर्थात याला प्रतिसाद मिळणे अशक्य झाले म्हणूनच ब्राह्मण यज्ञ सोडून पूजेकडे वळले 


 हाग म्हणतो की साहजिकच असा एक काळ होता जिथे अशी चूक घडू नये म्हणून जो मुख्य पुरोहित नेमला जायचा तो ब्रह्मा म्हणून ओळखला जात होता माझ्या मते पुढे गौतम बुद्धाला जो ब्रह्मा भेटला तो हा सुद्धा असू शकतो 


शब्दांच्या मध्ये काहीतरी अद्भुत ताकद आहे हे सर्व मंत्र विद्येचे गृहीतक आहे किंबहुना पवित्र शब्द किंवा पवित्र पुस्तक हे वाक्प्रचार यामुळेच अस्तित्वात आलेले आहेत आज आपणाला शब्दांची किंमत वाटत नाही परंतु त्या काळामध्ये शब्द आजच्या इंटरनेट सारखे ताजे होते आणि त्यांच्यामध्ये काहीतरी जादूई ताकद आहे अशी श्रद्धा होती आणि ही श्रद्धा केवळ भारतातच नव्हे तर जगभर अस्तित्वात असलेली दिसते त्यामुळेच पवित्र पुस्तक हे राजकारणाचे सर्वात मोठे केंद्र होत गेले आणि यालाच शब्दप्रामाण्यवाद असे म्हणतात आणि डेरीदाने पुढे यातूनच आपल्या संकल्पना विकसित केल्या प्रत्यक्षात त्या भारतामध्ये फार प्राचीन काळापासूनच अस्तित्वात आहेत त्याच्या संकल्पनेपैकी एक शब्दब्रह्मवाद अशी आहे यजमानाचे सर्व पातक नष्ट करण्याची ताकद या ब्रह्म म्हणजेच पवित्र शब्दात आहे अशी श्रद्धा आहे ही विधी वाक्ये आहेत पवित्र देव ,पवित्र शब्द, पवित्र ग्रंथ , पवित्र आहुती , पवित्र पुरोहित अशी एक कर्मकांडात्मक बहुविधताच आपणाला यज्ञ विधीमध्ये नांदतांना दिसते इथेही गद्य अभिनेते आहेत जे गद्य मंत्र म्हणतात आणि पद्य अभिनेते आहेत जे साम गायन करतात महाराष्ट्रामध्ये संगीत नाटक बहरले याचे कारण हा यज्ञविधी आहे 


या व्याख्यानात मार्टिन हाग आढावा घेत जातो प्रश्न असा आहे की फुले यांच्या लिखाणावर या व्याख्यानांचा प्रभाव पडला का? माझ्या मते तो पडला असावा कारण या व्याख्यानांच्या नंतरच साधारण काही महिन्यांनी फुले यांचे लेखन आलेले आहे अपवाद फक्त त्यांनी या व्याख्यानाआधी लिहिलेले तृतीय रत्न हे नाटक आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे या नाटकामध्ये मात्र फुले यांची नंतरची जी ब्राह्मणांच्या विषयीची भाषा आहे ती आढळत नाही उलट ते भट हा शब्द जास्त वापरतात पुढच्या लिखाणात मात्र ब्राह्मण -- ब्राह्मणे तर, आर्य आणि अनार्य असा संघर्ष स्पष्टपणे फुले मांडायला लागतात आणि कळत नकळत त्याला हे व्याख्यान जबाबदार असावे असा माझा कयास आहे 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे