अण्णाभाऊ साठे आणि त्यांचा समाज आणि विरुद्ध नव बौद्ध श्रीधर तिळवे नाईक फायनल

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मुळे हल्ली पूर्वाश्रमीच्या मातंग समाजावर प्रचंड मोठी चर्चा घडताना दिसते आहे अनेक वेगवेगळ्या अंगाने ही चर्चा घडते आहे आणि एका अर्थाने ते बरोबरच आहे हे घडले पाहिजे पूर्वाश्रमीच्या मातंग समाजाचे आयकॉन म्हणून अण्णाभाऊ साठे यांना प्रमोट करणे हे नेमके कुणाकुणाला आवश्यक झाले हा यानिमित्ताने पुढे आलेला एक फार मोठा प्रश्न आहे माझ्या मते याची सुरुवात काँग्रेसने केली होती आणि त्या मागचा उद्देश स्पष्ट आणि स्वच्छपणे नव बौद्ध लोकांचा वाढलेला प्रभाव रोखणे हा होता त्यामुळे साहजिकच महाहर आणि माता अंग समाज एकमेकापासून वेगळे होत गेले त्यातच अण्णाभाऊ साठे यांनी ज्याचा आग्रह धरला तो साम्यवाद मुळातच सगळीकडे पराभूत झाला आणि या समाजावर कम्युनिस्टांचा प्रभाव पडण्याची सर्व शक्यता नष्ट झाली साम्यवाद पराभूत झाल्यानंतर साहजिकच भाजपचे लक्ष आणि हिंदुत्ववादाचे लक्ष त्याच्याकडे गेले हा समाज आपल्या हिंदुत्ववादी अजेंडा खाली आणता येणे शक्य आहे याची कल्पना हिंदुत्ववादाला आली आणि त्याने काँग्रेसला फॉलो करत अण्णाभाऊ साठे यांना अत्यंत जाणीवपूर्वक आयकॉन म्हणून प्रमोट केले मी नेहमीच मांडत आलेलो आहे की काँग्रेस आणि हिंदुत्ववाद या दोन्ही प्रवाहामध्ये वैष्णव धर्माची ताकद प्रचंड प्रभावी आहे साहजिकच बौद्ध धर्म स्वीकारलेल्या महा हर लोकांचा प्रभाव नष्ट करणे या लोकांना आद्यकर्तव्य वाटते त्यासाठी काय करता येईल याची त्यांची एक स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजी चा एक भाग म्हणजे पूर्वाश्रमीचा मातंग समाज हा आपल्या बाजूने वळवण्यामध्ये सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर भाजपला प्रचंड यश मिळालेले दिसते साहजिकच कम्युनिस्ट असलेले अण्णाभाऊ साठे हे काँग्रेसने प्रमोट केलेल्या आणि भाजपने वाढवलेल्या डाव्या आयडियालॉजीचे सिम्बॉल बनत गेले विशेषता साम्यवादी लोकांनी तर ते साम्यवादी असल्याने त्यांची जयंती विशेष करून साजरी केली 


दुसरी गोष्ट अशी की बाबासाहेब आंबेडकर यांनी कितीही सांगितले तरी प्रत्यक्षामध्ये अनेक पूर्वाश्रमीचे अस्पृश्य हे कधीही स्वतःला आपण पूर्वी बौद्ध होतो ही गोष्ट स्वीकारायला तयार झाले नाहीत अपवाद फक्त पूर्वाश्रमीचे महार पण या पूर्वाश्रमीच्या महार समाजात सुद्धा अनेक जण असे आहेत ज्यांनी आपली स्वतःची शैव आयडेंटिटी अजूनही मेंटेन केलेली आहे आणि त्यातूनच मग घरात गणपती बसवण्यापर्यंत अनेक प्रकार घडतात आणि त्या विरोधात महार समाजातील नवयान मानणारे लोक बंड करतात समजावतात भाऊ कदम यांच्या निमित्ताने ही गोष्ट पुढे आली होती पण एकंदर गोष्ट अशी आहे की हे लोक स्वतःला शैव समजतात आणि ते पुढेही स्वतःला शैवच समजतील अशीच आता चिन्हे दिसतात अर्थात ही वस्तुस्थिती स्वीकारणे नव बौद्ध धर्मी लोकांना फार कठीण जात आहे कारण त्यांना असे वाटले होते की संपूर्ण भारत आंबेडकर सांगतात त्याप्रमाणे बौद्धमय होईल पण भारत जाऊ द्या संपूर्ण अस्पृश्य समाज सुद्धा बौद्धमय व्हायला तयार नाही कारण त्यामागे असलेले जे गृहीतक आहे त्याला इतिहासाचे कसलेही पाठबळ नाही किंवा त्यामागे कसलेही ऐतिहासिक पुरावे नाहीत तसे ते आहेत असा नव बौद्ध लोकांचा विश्वास आहे पण हा विश्वास लोकांना पटलेला नाही शिवाय लोक त्यांच्या देव्हाऱ्यात काय आहे ते बघतात आणि देव्हाऱ्यात सर्वत्र जर शैवदेव असतील तर मग तो प्रत्यक्ष पुरावा सोडून बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केलेले चिन्हात्मक ऐतिहासिक पुरावे लोकांनी का स्वीकारावेत ? काही घरांमध्ये वारकरी संप्रदाय सुद्धा आहे आणि तो पिढ्यान पिढ्या चालत आलेला आहे असे लोक वैष्णव धर्मी आहेत नवयानी बौद्ध लोक ही वस्तुस्थिती स्वीकारायला तयार नाहीत कारण त्यांचा जो भारत बौद्धमय करण्याचा अजेंडा आहे त्याच्या विरोधात या सर्व गोष्टी जातात आणि आज पूर्वाश्रमीचा मातंग समाज आणि पूर्वाश्रमीचा महार समाज यावरूनच एकमेकांशी भांडण करताना दिसत आहेत नव बौद्ध समाजाला असे वाटते की या समाजाने नव बौद्ध धर्म स्वीकारावा नवे यान स्वीकारावे पण अजून तरी पूर्वाश्रमीच्या मातंग समाजाकडून यासंदर्भात पुरेसा प्रतिसाद आलेला नाही आणि यामुळेच नव-बौद्ध समाज हा प्रचंड प्रमाणात अस्वस्थ आहे आणि तो या अंगाने कधी कधी टॉनटिंग करताना दिसतो या भांडणाच्या मुळाशी कोणी जायलाच तयार नाही भारतात युरेशियन श्रुतीने जातीव्यवस्थेचे आणि वर्णव्यवस्थेचे प्रचंड प्रभावप्रस्थ निर्माण केलेले आहे त्यातून कोणाची सुटका होत नाही आणि हिंदुत्ववादी राजवटीत जो तो अधिकाधिक जातीयवादी बनत चाललाय परिणामी प्रत्येक जातीला आता स्वतःची आयडेंटिटी निर्माण करणे गरजेचे वाटत चाललंय जे जातीयता वाढवणारे आहे एकीकडे सर्व हिंदू एक असे म्हणायचे आणि दुसरीकडे जातीनिहाय इव्हेंट्सना प्रोत्साहन द्यायचे असे काहीतरी चाललेले दिसते याचा परिणाम सुद्धा या संघर्षावर झालेला दिसतो आणि त्यातूनच मग प्रबोधनाचा मक्ता किंवा ठेका काय फक्त पूर्वाश्रमीच्या महार समाजाने घेतला आहे का असा उद्वेग निर्माण करणारा दर्शवणारा प्रश्न नव बौद्ध लोक व विचारवंत निर्माण करत आहेत स्वतःचा शैव धर्म अथवा वारकरी संप्रदाय न सोडणारे लोक साहजिकच टिकेला पात्र होत आहेत यावर खरा उपाय हा आहे की मुळात शैव धर्म हा कसा समतावादी आहे आणि वर्ण जाती व्यवस्था ही गोष्ट शैव-धर्मामध्ये अस्तित्वात नाही हे पटवणे हा आहे त्यासाठी या समाजाचा नेमका इतिहास सांगणे गरजेचे आहे


पूर्वाश्रमीचे मातंगी म्हणजे मातेचे अंग असणारे म्हणजे शाक्त होत. हे लोक प्राचीन काळामध्ये वैद्य होते आणि साथीच्या रोगावर त्यांच्याकडे काही रामबाण उपाय असत हे मुलत: प्राचीन काळातील महाराष्ट्रातल्या मार समाजातून आलेले होते जो लढवय्या होता लढायांच्या मध्ये हे प्रामुख्याने वैद्य म्हणून काम करत त्यामुळेच मरीआईला म्हणजेच मारी आईला पूजत तिची उपासना करत पूर्वाश्रमीचा मातंग समाज हा मूळचा शक्तीच्या या रूपाची पूजा करणारा शाक्त समाज आहे पूर्वाश्रमीचा प्रत्यक्ष योद्धे असणारा महा हर समाज यांना दुय्यम लेखायचा आणि त्यामुळेच कळत नकळत पूर्वीच्या व्यवस्थेमध्ये या लोकांच्यात एक भांडण होते लढणारा श्रेष्ठ की वाचवणारा श्रेष्ठ संरक्षण करणारा श्रेष्ठ की संरक्षण करताना जखमी झालेल्यांना वाचवणारा श्रेष्ठ असा हा मूळचा पारंपारिक वाद आहे म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचे तर सोल्जर महत्त्वाचा की डॉक्टर असे हे भांडण आहे हे भांडण आजही संपलेले नसावे याला काय म्हणावे ?


मुळातच स्वतःची अम्मार ही आयडेंटिटी सोडायला हा समाज तयार नाही  


 शैव धर्मामध्ये रेखार म्हणजे पंडित दंडार म्हणजे लढवय्ये ज्यांच्या हातात राजदंड आहे आणि जे दंडित करू शकतात आणि ज्यांच्यावर आज दंडाची म्हणजे आजच्या भाषेत सांगायचे तर संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे आणि अम्मार म्हणजे अम्माची म्हणजे शक्तीची पूजा करणारे ! मातंग समाज स्वतःला अमाँर म्हणवून घ्यायचा आणि आज त्याची खिल्ली उडवण्यासाठी पूर्वाश्रमीच्या काही महाहर लोकांच्याकडून मँगो हा शब्द वापरला जात आहे हे सगळे शब्द मराठीत अजूनही शाबूत आहेत विशेषत: पूर्वाश्रमीच्या मातंग समाजानेच ते जपलेले आहेत आणि दक्षिणेत तर आहेतच आहेत 


याला उत्तर म्हणून अलीकडे अनेक लोक अण्णाभाऊ साठे यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या तुलनेत स्थान द्यायला लागलेले आहेत मला वाटते की तुलनाच योग्य नाही 


अण्णाभाऊ साठे हे कलावंत होते आणि उत्कृष्ट साहित्यिक होते याबद्दल माझ्या मनात काडीची शंका नाही त्यांचा आदर आपण केलाच पाहिजे त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठीमध्ये आत्तापर्यंत न आलेले अनेक समाज आणून सोडलेले आहेत एकेकाळी ते अस्तित्वात आहेत हे सुद्धा मराठी साहित्य कबूल करत नव्हते आता निदान हे अस्तित्व मान्य झालेले आहे आणि त्याचे निर्विवाद श्रेय आपण अण्णाभाऊ साठे यांना दिले पाहिजे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची चिकित्सा ही अनेकदा नव बौद्ध लोकांनीच केलेली दिसते हे या समाजाने लक्षात घेणे आवश्यक आहे 


मात्र बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे व्यक्तिमत्व आहे हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे मुळात ते कुठल्या जातीचे नायक नव्हेत ते संपूर्ण भारताचे आणि मी ज्याचा कट्टर समर्थक आहे त्या आगमवादाचे महानायक आहेत पण त्यांना सुद्धा त्यांच्या काळाच्या मर्यादा होत्या त्यांना अशा काही मर्यादा नव्हत्या असे म्हणणारे सुद्धा काही महाग भाग पुढे आलेले आहेत पण त्याने नुकसानच होणार आहे प्रत्येक महापुरुषाला त्याच्या त्याच्या काळाची मर्यादा असते त्याच्या त्याच्या काळाचे प्रश्न असतात आणि त्या त्या काळामध्ये त्या त्या काळानुसार त्याला सुचलेली उत्तरे असतात आता काळ बदललेला आहे संशोधन अधिक झालेले आहे नवे पुरावे समोर आलेले आहेत आणि त्यांच्या प्रकाशात आपणाला पुढे जाता आले पाहिजे म्हणजे आंबेडकर यांना कधीच आर्य बाहेरून आले हे मान्य नव्हते पण आता जेनेटिक पुरावे इतक्या मोठ्या प्रमाणात पुढे आलेत की आंबेडकरांना यासंदर्भात बाजूला करून युरेशियन नावाचे लोक वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या टोळ्यांच्या रूपात युरेशिया मधून भारतात आले अशी मांडणी करावी लागते आणि युरेशियन ही गोष्ट आयडेंटिटी म्हणून स्वीकारावी लागते पण पुराव्यांच्या झालेले बदल लक्षात घेण्याऐवजी दुर्दैवाने काही विचारवंत मागेच पाहत आहेत पुढे पाहण्याऐवजी स्वतःचा जाती आणि वर्णीय अहंकार पुढे आणण्यातच गुंतलेले आहेत परिणाम इतकाच झालाय की आपण पुढे जात नाही आहोत सगळी परिवर्तनाची चळवळ ही 1817 ते 1947 या दरम्यान झालेल्या विचार मंथनातच अडकलेली आहे हा सगळा काळ वसाहतवादी होता आणि इंग्रज लोकांनी तो प्रचंड आपल्या विचारसरणीच्या आणि कलोनेल मेंटॅलिटीच्या वर्चस्वाखाली आणला हे लक्षात न घेताच या काळाची उसनवारी करणे आपल्या मांडणीमध्ये सतत चाललेले असते अनेकदा हे लक्षातच घेतले जात नाही की या काळामध्ये हिंदू धर्म असा शब्द वापरलेला सुरुवातीला नाही या काळामध्ये ब्राह्मणधर्म असा शब्द अगदी ब्रिटिश सुद्धा वापरत होते आणि त्या काळातले अनेक विचारवंत सुद्धा वापरत होते 1880 नंतर हिंदू हा शब्द वापरण्याला सुरुवात झाली अगदी राजाराम मोहन राय यांनी सुद्धा हिंदू वाद Hinduism असा शब्द वापरलेला आहे पुढे मग हिंदूधर्म हा शब्द अत्यंत जाणीवपूर्वक जास्तीत जास्त प्रचलित केला गेला कारण भारताची स्वातंत्र्य चळवळ चालवण्यासाठी या चळवळीत एकात्मता निर्माण करण्यासाठी भारतातले अनेक धर्म एकत्र करणे अनेकांना आवश्यक वाटले या काळामध्ये बहुतांशी अस्पृश्य समाज हा ब्रिटिशांच्या पाठीमागे जास्तीत जास्त उभा राहिला याला जे काही मोजके लोक अपवाद होते त्यामध्ये अण्णाभाऊ साठे होते आणि इथे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पेक्षा वेगळे होतात हे त्यांचे वेगळेपणही आपण मान्य केले पाहिजे ते जर कम्युनिस्ट नसते तर कदाचित त्यांनीही ब्रिटिश राजवटीचे समर्थन केले असते पण कम्युनिजमने त्यांना जी दृष्टी दिली त्यामध्ये ब्रिटिश राजवटी साम्राज्यवादी राजवट आहे भांडवलशाहीचा विस्तार असणाऱ्या प्रचंड शोषण यंत्रणेचा ती भाग आहे हे त्यांना पटले होते आंबेडकर शेवटपर्यंत ब्रिटिशांशी तडजोड करत राहिले कारण त्यांना स्वतःच्या समाजाच्या संरक्षणासाठी हे आवश्यक वाटत होते येऊ घातलेल्या स्वतंत्र राजवटीत अस्पृश्यांचे नेमके काय स्थान ठेवले जाईल याविषयी त्यांना शंका होत्या म्हणून तर त्यांनाच जास्तीत जास्त संविधानाच्या कामांमध्ये समाविष्ट केले गेले जेणेकरून कुणालाच इनसिक्युअर वाटू नये आणि अर्थातच त्यांचा असलेला अधिकार तो मान्य करायलाच हवा या संविधान निर्मितीसाठी हे सर्वाधिक पात्र होते ही वस्तुस्थिती आहे अलीकडे या वादामध्ये कळत नकळत त्यांचा असलेला सिंहाचा वाटा नाकारण्याचा प्रयत्न चालू आहे जे बरोबर नाही भारताचे संविधानकार म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव घेतले पाहिजे असो 


पूर्वाश्रमीच्या मातंग समाजाने आपला रस्ता बौद्ध दिशेने नेलेला नाही ही वस्तुस्थिती आहे याचे कारण त्यांच्या पार्श्वभूमीत आहे आणि मला स्पष्ट दिसते की ते यापुढे बौद्ध दिशेने जाणार नाहीत अशावेळी त्यांना शैव दिशेने घेऊन जाणे हेच योग्य ठरते कारण मुळात ते शैव आहेत आणि तेही शाक्तशैव आहेत त्यांचे वैष्णवीकरण झाले तर ते वर्ण जात व्यवस्थेचे बळी झाल्याशिवाय राहणार नाही अशा वेळेला फक्त शैव धर्मच त्यांना वाचवू शकतो तेव्हा हे जे काही भांडण चाललेले आहे ते कळत नकळत बौद्ध विरुद्ध हिंदू शैव विरुद्ध हिंदू वैष्णव हिंदुत्व असे चाललेले आहे आणि पूर्वाश्रमीच्या मातंग समाजाला आता नक्कीच एक भूमिका घ्यावी लागेल ते कोणती भूमिका घेतात हा नक्कीच उत्सुकतेचा विषय आहे सध्या तरी हा कल शैव हिंदुत्वाच्या दिशेने जाताना दिसतो आता हे ज्यांना स्वीकारता येणार नाही येत नाही त्यांची तगमग होणे अटळच आहे पण जर का समोरच्या व्यक्तींचे समाजाचे धार्मिक स्वातंत्र्य मान्य केले तरच ही तगमग थोडी कमी होऊ शकेल आणि ज्यांना बौद्ध धर्म स्वीकारावासा वाटेल त्यांना ते अनुमती घटनेनेच दिलेली आहे पण एखादा समाज नवबौद्ध होत नाही याचा अर्थ तो कायम मागासलेलाच राहील हे जे काही गृहीतक आहे ते भविष्यात टिकेल याची कसली खात्री मला वाटत नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

अण्णाभाऊ साठे आणि त्यांचा समाज आणि विरुद्ध नव बौद्ध श्रीधर तिळवे नाईक 

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मुळे हल्ली पूर्वाश्रमीच्या मातंग समाजावर प्रचंड मोठी चर्चा घडताना दिसते आहे अनेक वेगवेगळ्या अंगाने ही चर्चा घडते आहे आणि एका अर्थाने ते बरोबरच आहे हे घडले पाहिजे मातंग समाजाचे आयकॉन म्हणून अण्णाभाऊ साठे यांना प्रमोट करणे हे नेमके कुणाकुणाला आवश्यक झाले हा यानिमित्ताने पुढे आलेला एक फार मोठा प्रश्न आहे माझ्या मते याची सुरुवात काँग्रेसने केली होती आणि त्या मागचा उद्देश स्पष्ट आणि स्वच्छपणे नव बौद्ध लोकांचा वाढलेला प्रभाव रोखणे हा होता त्यामुळे साहजिकच महाहर आणि माता अंगी समाज एकमेकापासून वेगळे होत गेले त्यातच अण्णाभाऊ साठे यांनी ज्याचा आग्रह धरला तो साम्यवाद मुळातच सगळीकडे पराभूत झाला आणि या समाजावर कम्युनिस्टांचा प्रभाव पडण्याची सर्व शक्यता नष्ट झाली साम्यवाद पराभूत झाल्यानंतर साहजिकच भाजपचे लक्ष आणि हिंदुत्ववादाचे लक्ष त्याच्याकडे गेले हा समाज आपल्या हिंदुत्ववादी अजेंडा खाली आणता येणे शक्य आहे याची कल्पना हिंदुत्ववादाला आली आणि त्याने काँग्रेसला फॉलो करत अण्णाभाऊ साठे यांना अत्यंत जाणीवपूर्वक आयकॉन म्हणून प्रमोट केले मी नेहमीच मांडत आलेलो आहे की काँग्रेस आणि हिंदुत्ववाद या दोन्ही प्रवाहामध्ये वैष्णव धर्माची ताकद प्रचंड प्रभावी आहे साहजिकच बौद्ध धर्म स्वीकारलेल्या महा हर लोकांचा प्रभाव नष्ट करणे या लोकांना आद्यकर्तव्य वाटते त्यासाठी काय करता येईल याची त्यांची एक स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजी चा एक भाग म्हणजे मातंग समाज हा आपल्या बाजूने वळवणे त्यामध्ये सुरुवातीला काँग्रेसला आणि नंतर भाजपला प्रचंड यश मिळालेले दिसते साहजिकच कम्युनिस्ट असलेले अण्णाभाऊ साठे हे काँग्रेसने प्रमोट केलेल्या आणि भाजपने वाढवलेल्या आयडियालॉजीचे सिम्बॉल बनत गेले 


दुसरी गोष्ट अशी की बाबासाहेब आंबेडकर यांनी कितीही सांगितले तरी प्रत्यक्षामध्ये पूर्वाश्रमीचे अस्पृश्य हे कधीही स्वतःला आपण पूर्वी बौद्ध होतो ही गोष्ट स्वीकारायला तयार झाले नाहीत अपवाद फक्त पूर्वाश्रमीचे महार पण या पूर्वाश्रमीच्या महार समाजात सुद्धा अनेक जण असे आहेत ज्यांनी आपली स्वतःची शैव आयडेंटिटी अजूनही मेंटेन केलेली आहे आणि त्यातूनच मग घरात गणपती बसवण्यापर्यंत अनेक प्रकार घडतात आणि त्या विरोधात महार समाजातील नवयान मानणारे लोक बंड करतात समजावतात पण एकंदर गोष्ट अशी आहे की हे लोक स्वतःला शैव समजतात आणि ते पुढेही स्वतःला शैवच समजतील अशीच आता चिन्हे दिसतात अर्थात ही वस्तुस्थिती स्वीकारणे नव बौद्ध धर्मी लोकांना फार कठीण जात आहे कारण त्यांना असे वाटले होते की संपूर्ण भारत आंबेडकर सांगतात त्याप्रमाणे बौद्धमय होईल पण भारत जाऊ द्या संपूर्ण अस्पृश्य समाज सुद्धा बौद्धमय व्हायला तयार नाही कारण त्यामागे असलेले जे गृहीतक आहे त्याला इतिहासाचे कसलेही पाठबळ नाही किंवा त्यामागे कसलेही ऐतिहासिक पुरावे नाहीत शिवाय लोक त्यांच्या देव्हाऱ्यात काय आहे ते बघतात आणि देव्हाऱ्यात सर्वत्र जर शैवदेव असतील तर मग तो प्रत्यक्ष पुरावा सोडून बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केलेले चिन्हात्मक पुरावे लोकांनी का स्वीकारावेत ? नवयानी बौद्ध लोक ही वस्तुस्थिती स्वीकारायला तयार नाहीत कारण त्यांचा जो भारत बौद्धमय करण्याचा अजेंडा आहे त्याच्या विरोधात या सर्व गोष्टी जातात आणि आज पूर्वाश्रमीचा मातंग समाज आणि पूर्वाश्रमीचा महार समाज यावरूनच एकमेकांशी भांडण करताना दिसत आहेत या भांडणाच्या मुळाशी कोणी जायलाच तयार नाही भारतात युरेशियन श्रुतीने जातीव्यवस्थेचे आणि वर्णव्यवस्थेचे प्रचंड प्रभावप्रस्थ निर्माण केलेले आहे त्यातून कोणाची सुटका होत नाही आणि जो तो अधिकाधिक जातीयवादी बनत चाललाय याचा परिणाम सुद्धा या संघर्षावर झालेला दिसतो आणि त्यातूनच मग प्रबोधनाचा मक्ता किंवा ठेका काय फक्त पूर्वाश्रमीच्या महार समाजाने घेतला आहे का असा उदवेग निर्माण करणारा दर्शवणारा प्रश्न नव बौद्ध निर्माण करत आहेत स्वतःचा शैव धर्म न सोडणारे लोक साहजिकच टिकेला पात्र होत आहेत यावर खरा उपाय हा आहे की मुळात शैव धर्म हा कसा समतावादी आहे आणि वर्ण जाती व्यवस्था ही गोष्ट शैव-धर्मामध्ये अस्तित्वात नाही हे पटवणे हा आहे त्यासाठी या समाजाचा नेमका इतिहास सांगणे गरजेचे आहे


पूर्वाश्रमीचे मातंगी म्हणजे मातेचे अंग असणारे म्हणजे शाक्त होत. हे लोक प्राचीन काळात मध्ये वैद्य होते आणि साथीच्या रोगावर त्यांच्याकडे काही रामबाण उपाय असत हे मुलत: हा प्राचीन काळातील महाराष्ट्रातल्या मार समाजातून आलेले होते जो लढवय्या होता लढायांच्या मध्ये हे प्रामुख्याने वैद्य म्हणून काम करत त्यामुळेच मरीआईला म्हणजेच मारी आईला पूजत तिची उपासना करत पूर्वाश्रमीचा मातंग समाज हा मूळचा शक्तीच्या या रूपाची पूजा करणारा शाक्त समाज आहे महाहर किंवा चर्महर यांच्याप्रमाणे तो युद्धात हर हर महादेव म्हणत नाही अनेकदा तो युद्धात जय महाकाली किंवा जय मातंगी म्हणायचा पूर्वाश्रमीचा प्रत्यक्ष योद्धे असणारा महा हर समाज यांना दुय्यम लेखायचा आणि त्यामुळेच कळत नकळत पूर्वीच्या व्यवस्थेमध्ये या लोकांच्यात एक भांडण होते लढणारा श्रेष्ठ की वाचवणारा श्रेष्ठ संरक्षण करणारा श्रेष्ठ की संरक्षण करताना जखमी झालेल्यांना वाचवणारा श्रेष्ठ असा हा मूळचा पारंपारिक वाद आहे म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचे तर सोल्जर महत्त्वाचा की डॉक्टर असे हे भांडण आहे हे भांडण आजही संपलेले नसावे याला काय म्हणावे ?


मुळातच स्वतःची अम्मार ही आयडेंटिटी सोडायला हा समाज तयार नाही  


 शैव धर्मामध्ये रेखार म्हणजे पंडित दंडार म्हणजे लढवय्ये ज्यांच्या हातात राजदंड आहे आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आहे आणि अम्मार म्हणजे अम्माची म्हणजे शक्तीची पूजा करणारे ! मातंग समाज स्वतःला अमाँर म्हणवून घ्यायचा आणि आज त्याची खिल्ली उडवण्यासाठी पूर्वाश्रमीच्या काही महाहर लोकांच्याकडून मँगो हा शब्द वापरला जात आहे हे सगळे शब्द मराठीत अजूनही शाबूत आहेत विशेषत: पूर्वाश्रमीच्या मातंग समाजानेच ते जपलेले आहेत आणि दक्षिणेत तर आहेतच आहेत 


याला उत्तर म्हणून अलीकडे अनेक लोक अण्णाभाऊ साठे यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या तुलनेत स्थान द्यायला लागलेले आहेत मला वाटते की तुलनाच योग्य नाही 


अण्णाभाऊ साठे हे कलावंत होते आणि उत्कृष्ट साहित्यिक होते याबद्दल माझ्या मनात काडीची शंका नाही त्यांचा आदर आपण केलाच पाहिजे त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठीमध्ये आत्तापर्यंत न आलेले अनेक समाज आणून सोडलेले आहेत एकेकाळी ते अस्तित्वात आहेत हे सुद्धा मराठी साहित्य कबूल करत नव्हते आता निदान हे अस्तित्व मान्य झालेले आहे आणि त्याचे निर्विवाद श्रेय आपण अण्णाभाऊ साठे यांना दिले पाहिजे 


मात्र बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे व्यक्तिमत्व आहे हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे मुळात ते कुठल्या जातीचे नायक नव्हेत ते संपूर्ण भारताचे आणि मी ज्याचा कट्टर समर्थक आहे त्या आगमवादाचे महानायक आहेत पण त्यांना सुद्धा त्यांच्या काळाच्या मर्यादा होत्या त्यांना अशा काही मर्यादा नव्हत्या असे म्हणणारे सुद्धा काही महाग भाग पुढे आलेले आहेत पण त्याने नुकसानच होणार आहे प्रत्येक महापुरुषाला त्याच्या त्याच्या काळाची मर्यादा असते त्याच्या त्याच्या काळाचे प्रश्न असतात आणि त्या त्या काळामध्ये त्या त्या काळानुसार त्याला सुचलेली उत्तरे असतात आता काळ बदललेला आहे संशोधन अधिक झालेले आहे नवे पुरावे समोर आलेले आहेत आणि त्यांच्या प्रकाशात आपणाला पुढे जाता आले पाहिजे म्हणजे आंबेडकर यांना कधीच आर्य बाहेरून आले हे मान्य नव्हते पण आता जेनेटिक पुरावे इतक्या मोठ्या प्रमाणात पुढे आलेत की आंबेडकरांना यासंदर्भात बाजूला करून मांडणी करावी लागते आणि युरेशियन ही गोष्ट स्वीकारावी लागते पण दुर्दैवाने काही विचारवंत पुढे पाहण्याऐवजी स्वतःचा जाती आणि वर्णीय अहंकार पुढे आणण्यातच गुंतलेले आहेत परिणाम इतकाच झालाय की आपण पुढे जात नाही आहोत 


पूर्वाश्रमीच्या मातंग समाजाने आपला रस्ता बौद्ध दिशेने नेलेला नाही ही वस्तुस्थिती आहे याचे कारण त्यांच्या पार्श्वभूमीत आहे आणि मला स्पष्ट दिसते की ते यापुढे बौद्ध दिशेने जाणार नाहीत अशावेळी त्यांना शैव दिशेने हेच योग्य ठरते कारण मुळात ते शैव आहेत आणि तेही शाक्तशैव आहेत त्यांचे वैष्णवीकरण झाले तर ते वर्ण जात व्यवस्थेचे बळी झाल्याशिवाय राहणार नाही अशा वेळेला फक्त शैव धर्मच त्यांना वाचवू शकतो तेव्हा हे जे काही भांडण चाललेले आहे ते कळत नकळत बौद्ध विरुद्ध हिंदू शैव विरुद्ध हिंदू वैष्णव हिंदुत्व असे चाललेले आहे आणि पूर्वाश्रमीच्या मातंग समाजाला आता नक्कीच एक भूमिका घ्यावी लागेल ते कोणती भूमिका घेतात हा नक्कीच उत्सुकतेचा विषय आहे सध्या तरी हा कल शैव हिंदुत्वाच्या दिशेने जाताना दिसतो आता हे ज्यांना स्वीकारता येणार नाही येत नाही त्यांची तगमग होणे अटळच आहे


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे