गजू तायडे ,भक्ती ,पुरोगामी वाद आणि हिंदुत्ववाद श्रीधर तिळवे नाईक 

गजू तायडे या आमच्या फेसबुक मित्ताने एक पोस्ट टाकली आहे ती पुढील प्रमाणे,

"एखादी प्रचंड व्यासंगी व्यक्ती कितीही ढिगानं पुस्तकं वाचत असू देत. त्यांवर कितीही विद्वत्तापूर्ण लेख लिहू देत.


किंवा एखादी खूप शिकलेली व्यक्ती सर्वसाधारणपणे उदारमतवादी समजल्या जाणार्‍या एखाद्या देशात राहू देत.


भक्तीचं शेण एकदा मेंदूत घुसलं, की त्यांचा कायमचा झोंबी होतो.


माझ्या फेबुलिस्टीतच अशा व्यक्ती आहेत. हे लोक स्वतःसोबतच कसे जगतात ह्याचं मला आश्चर्य वाटतं."


या पोस्टसंदर्भात मला काही गोष्टी बोलाव्याशा वाटतात कारण त्या निमित्ताने काही वेगळ्या गोष्टींच्यावर प्रकाश टाकता येतो


ही पोस्ट मी समजून घेऊ शकतो पण तिच्यामुळे काही गैरसमज ही पसरू शकतात म्हणून हे लिखाण आहे काही विद्वान लोक हे हिंदुत्ववादी असतील किंवा तसं कुठल्यातरी आयडियालॉजीचे पुरस्कर्ते असतील तर इतके विद्वान लोक असे भावनिक असू कसे शकतात असा हा प्रश्न आहे किंवा मग सामान्य लोक असे कसे असू शकतात अशी ही सुरुवात आहे आणि नंतरच्या तिसऱ्या भागात ते सगळा दोष भक्तीला देतात आणि ती भक्ती माणसाला झोंबी बनवते असे विधान करतात मी असे मानतो की त्यांचे हे विधान राजकीय संदर्भात जास्त असावे म्हणजेच मोदी यांची फॅन गिरी जिला ते भक्ती म्हणतात आणि फॅन्स ज्यांना ते भक्त म्हणतात यांच्याविषयी ते असावे तर त्यांनी ते स्पष्ट लिहायला हवे किंवा वाचणाऱ्यांनी ते तसे समजून घ्यावे


मी गेले कित्येक वर्षे सातत्याने सांगत आहे की तुम्ही भक्ती हा शब्द वापरू नका कारण भक्ती हे मोक्षाकडे नेण्याचे तंत्र आहे आम्ही शैव त्याला भाव तंत्र म्हणतो आणि ज्या लोकांचा स्वभाव हा भावकेंद्री आहे जे लोक खूप इमोशनल आहेत त्यांच्यासाठी हा मार्ग उत्तमरीत्या काम करतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे मराठीमध्ये भाव तंत्राने मोक्ष मिळवणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे त्यात मुख्य म्हणजे संत नामदेव आणि संत तुकाराम संत बहिणाबाई आणि संत जनाबाई मराठी बाहेर संत कबीर आणि संत रोहिदास यां सारख्या संतांचा समावेश होतो हे सर्व लोक भक्तीवादी आहेत आणि म्हणूनच तुम्ही भक्ती हा शब्द वापरू नका त्यासाठी फॅन हा इंग्लिश शब्द अतिशय योग्य आहे हे मी वारंवार सुचवत असतो मोदींचे फॅन म्हणा किंवा आणखी कुणालाही फॅन म्हणायचे असेल तर फॅन म्हणा जेव्हापासून भक्ती हा शब्द तुम्ही वापरायला लागलाय तेव्हापासून हा काहीतरी धार्मिक अटॅक आहे अशा प्रकारची समजूत करून घेणारे लोक आहेत आणि तुम्ही त्यांना कळत नकळत संरक्षण देत आहात . खरे तर याला खरा शब्द हा रोमँटिसीझम म्हणजे भावप्रामाण्यवाद हा आहे या शब्दाला प्रतिशब्द देताना आपल्याकडे मुर्खासारखा सौंदर्यवाद हा शब्द वापरला गेला आणि त्यामुळे अनेक गोंधळ झाले स्पॉंटेनियस ओव्हरफ्लो ऑफ पावर फुल फिलिंग हे जाऊन कारण नसताना सौंदर्याकडे लक्ष केंद्रित झाले मोदी बद्दल त्यांच्या फॅन्सना जे काही वाटते ते भावनापूर्ण आहे आणि म्हणूनच भावनिक आहे म्हणूनच आपण फॅन हा शब्द वापरावा असे माझे मत आहे कारण एकदा का आपण भक्ती हा शब्द वापरला की कळत नकळत नरेंद्र मोदी देव होऊन जातात आणि मग देव चुका करत नाही तर हा शब्द वापरून पुरोगामी लोकांनी आपल्याच पायावर दगड का पाडून घ्यावा ?


प्रश्न असा आहे की मग हा शब्द विशेषता फॅन हा शब्द का वापरला जात नाही ? याचे उत्तर देताना हे लोक तर्कशुद्ध असत नाहीत म्हणून असे देता येते हे फॅन लोक मोदींची बौद्धिक चिकित्साच करत नाहीत फक्त इमोशनल जोडले जातात आणि तर्कशून्य प्रतिवाद करत राहतात असे पुरोगामी लोकांना म्हणायचे असावे वास्तविक हे इतके सोपे आहे का? मुळातच पुरोगामी लोक म्हणतात तसे हे जर का कॉन्ट्रॅक्ट बेस वर हे चालले असेल असे आपण क्षणभर मान्य करू पण मग हे तर पद्धतशीरपणे चालले आहे आणि जर का हे पद्धतशीर चालले असेल तर ही भक्ती कशी ? आपण जर का बारकाईने पाहिले तर अशा प्रकारची स्ट्रॅटेजी ही खास ब्राह्मण धर्माची स्ट्रॅटेजी आहे असे लक्षात येईल म्हणजेच लोकांना इमोशनली भडकवणे ब्राह्मण्यवाद किंवा युरोप मधला पुरोहित वाद नेहमीच करत होता आणि आजही असतो तर मग याला ब्राह्मण्यवाद किंवा पुरोहित वाद म्हणावे म्हणजेच हे सर्व ऍक्च्युली एका स्ट्रॅटेजीच्या अंडर चाललेले आहे तर ते झोंबी कसे ? झोंबी असण्यामध्ये मनुष्य डोके वापरण्यास विसरून जातो आणि बुद्धी नाहीशी होते असा काही प्रकार इथे खरोखर होतो का ? की मोदी यांचा टीकाकार आपल्या अजेंडाच्या आडवा येतो याची जाणीव झालेले हे मोदीनिष्ठ लोक ज्या ज्या पद्धतीने झोडपता येईल त्या त्या पद्धतीने विरोधकांना झोडपतात ? आता हे जर झोडपणे असेल तर ते झोंबी कसे ? मी माझा एक सिद्धांत नेहमीच मांडत आलेलो आहे तो म्हणजे रोमँटिक लोक सर्वाधिक स्वार्थी असतात ते लोकांना इमोशनल फुल बनवतात आणि प्रत्यक्ष स्वतःच्या स्वार्थाबाबत ते इमोशनल कूल असतात आपण काय करतो हे त्यांना व्यवस्थित माहिती असते आणि आपला स्वार्थ साधण्यासाठी ते लोकांचा इमोशनली ब्लॅकमेल करून वापर करत असतात रोमँटिसीझम हा अनेकदा त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग असतो किंबहुना हिंदुत्ववाद हा रोमँटिसिझमचा म्हणजेच भावप्रामाण्यवादाचा भारतीय अविष्कार आहे असे माझे स्पष्ट मत आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कविता जर का आपण बारकाईने पाहिली तर ती रोमँटिक स्कूलमध्येच मोडते या स्कूलमध्ये बहुतांशी लोक अत्यंत इमोशनल पद्धतीने वैचारिक लिखाण करतात तर हे सर्व झोंबी कसे ? या लोकांचा मुळात सिद्धांतच असा आहे की माणूस हा प्रामुख्याने भावनाशील प्राणी आहे आणि ही माणसाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी आहे भावप्रामाण्यवाद हा "माणूस हा एक रॅशनल प्राणी आहे" या बुद्धि प्रामाण्यवादी रॅशनल गृहीतकाचा प्रतिवाद करतो आणि मनुष्य हा एक इमोशनल प्राणी आहे हे गृहीतक गृहीत धरतो नॅचरल मॅन हा इमोशनल असतो हे गृहीतक यामागे आहे आणि त्याचे समर्थन रुसोच्या लिखाणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेले दिसते हे लोक त्यामुळे सशस्त्र क्रांतीचे कायमच समर्थक राहिले आणि आपल्या अशा क्रांती नायकांना हिरो बनवत राहिले तर हे सर्व झोंबी कसे ? हिरो लोकच समाज बदलतात हा या लोकांचा विश्वास आहे ते लोकांच्या सामुदायिक प्रयत्नांना नकार देतात त्यांच्या मते लोकांच्यात परिवर्तनाची ताकद नसते जेव्हा कोणी हिरो येतो तेव्हा तो लोकांना एकत्र आणून परिवर्तन घडवतो अशी ही परिवर्तनाची परिवर्तन वादाची भाव प्रामाण्यवादी मीमांसा आहे आणि त्यातूनच फ्रेंच रीवोल्युशन झालेली आहे अनेकदा रोमँटिक सीझम मांडणारा मनुष्य स्वतःला हिरो समजत असतो आपण सावरकर यांच्याबाबत हे सहज मान्य करू शकतो 


थोडक्यात काय भावप्रामाण्यवाद ही एक आयडियालॉजी आहे झोंबीगिरी नाही वस्तुस्थिती अशी आहे की ही एक पद्धतशीरपणे उभी केलेली स्ट्रॅटेजी आहे आणि त्यातून इमोशनल राष्ट्रवाद इमोशनल नॅशनॅलिझम निर्माण होतो कारण राष्ट्र ही इमोशनल गोष्ट आहे याबद्दल त्यांना खात्री आहे कारण राष्ट्र बौद्धिक युक्तिवाद करून उभं करता येत नाही असे त्यांचे तर्कशास्त्र आहे अगदी सद्गुरूंच्या सारखा हिंदुत्ववादी माणूस सुद्धा जेव्हा राष्ट्रगीताचे समर्थन करतो तेव्हा हेच सांगत असतो ही मांडणी झोंबी सारखी पागलपंती म्हणून जन्मलेली नाही तिच्यामागे काही युक्तिवाद आहेत आणि ते डावलता येणे अवघड जाते विशेषत: राष्ट्राचा आधार इमोशनल असतो की रॅशनल असतो हा फार मोठा पेच आहे अगदी जवाहरलाल नेहरूंच्या लिखाणामध्ये विशेषता डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये ते जेव्हा इंडिया बद्दल लिहितात तेव्हा अनेकदा इमोशनल झालेले असतात त्यांची शेवटची इच्छा ही सुद्धा रोमँटिकच इच्छा होती देशासाठी हसत हसत प्राण देण्याची भावना ही कळत नकळत रोमँटिक असते म्हणूनच देशप्रेम आणि देशभक्ती यासारखे शब्द आकाराला येतात कारण इथे देश हाच देव बनलेला असतो देव देश आणि धर्मा पायी प्राण घेतलं हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती हा यांचा युक्तिवाद आहे देव देश आणि धर्म हे वेगवेगळे करता येत नाहीत अशी ही मांडणी आहे आणि त्याच्यासाठी प्राण देणे हेच शौर्य आहे ही मांडणी आहे आणि ही मांडणी युरोप मधल्या रोमँटिक लोकांनी अनेकदा केलेली दिसते आपल्या नेत्यासाठी प्राण सुद्धा देणे त्याच्या चरणावर आपले प्राण गहाण ठेवणे असा हा प्रकार असतो आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या साठी आपले प्राण देऊ इच्छिणारे देणारे बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे बहिर्जी नाईक वगैरे सर्व शूरवीर हे आदर्श म्हणून वारंवार सादर केले जातात त्यांच्यावर त्यासाठी फिल्म काढल्या जातात सगळा इतिहास इमोशनल पद्धतीने सादर केला जातो कारण इतिहासाने इमोशनस भावना जागवल्या पाहिजेत अशी ही मांडणी आहे युरोपमध्ये नेशन्स निर्माण होत असताना या रोमँटिसीझमची प्रचंड गरज सर्व युरोपियन देशांना भासत होती शेवटी धर्माने जन्माला घातलेला राज्यवाद हा पुरोगामी कालखंडामध्ये राष्ट्रवाद बनला होता मात्र या राष्ट्रवादाला बौद्धिक आधार देणे रॅशनॅलिझमला कधीही शक्य झाले नाही विशेषता सर्वसामान्य माणसांना संविधानवाद कसा पटवायचा हा खरा पेच निर्माण झालेला होता आणि आहे पुरोगामी वादाचा राष्ट्रवाद हा नेहमीच संविधानवाद असतो कारण बौद्धिक पातळीवर आणखीन कोणताही आधार राष्ट्रवादाला देता येत नाही ही वस्तुस्थिती आहे प्रश्न असा आहे की संविधानावर प्रेम कसे निर्माण करायचे आणि इथे पुन्हा एकदा भावनाच येतात जर का आपण आंबेडकरवादी लोक बघितले तर ते सुद्धा संविधानाबाबत प्रचंड इमोशनल आणि अनेकदा हळवे झालेले असतात असे दिसते नंतर मग त्या संविधानामागचा रॅशनॅलिझम म्हणजेच बुद्धीप्रामाण्यवाद दिसतो


तेव्हा केवळ भक्त भक्त झोंबी झोंबी अशी झोंबा झोंबी करून वा असे ओरडून आपण हा भावप्रामाण्यवाद मोडीत काढू असे जर का पुरोगामी लोकांना वाटत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात आहेत जर का तुम्हाला प्रतिकार करायचा असेल तर तुम्हाला तुमचा बुद्धी प्रामाण्यवाद हाच सतत जिवंत आणि सळसळत ठेवला पाहिजे तर्कशास्त्राने कायमच पोल खोल केली पाहिजे  


पुढचा प्रश्न असा की हा रोमँटिसिझम आला कुठून ?रॅशनल पुरोगामी वादाने जेव्हा इंग्लंडमध्ये क्रांती घडवून एक नवीन व्यवस्था आणली आणि अनेक राष्ट्रीय व्यवस्था निर्माण केल्या तेव्हा या व्यवस्थांच्या मधला विरोधाभास पुढे येऊ लागला आणि त्या व्यवस्थांच्याबद्दल एक असमाधान निर्माण होऊ लागले आपल्याकडे 1947 नंतर आपण व्यवस्था निर्माण केल्या आणि या व्यवस्थांच्याबद्दल प्रचंड मोठे असमाधान निर्माण झाले कारण त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत त्या पूर्ण होतील या अपेक्षा होत्या म्हणूनच अपेक्षाभंग झाला हिंदुत्ववाद हा एक अल्टरनेटिव्ह राजकीय डिस्कोर्स आहे त्यानेही काही अपेक्षा निर्माण केल्या होत्या आणि आता हळूहळू त्याच्याबाबत ही अपेक्षाभंग निर्माण होत जाईल ज्या गोष्टींची वचने दिली होती त्यापैकी एक राम मंदिर सोडले तर काहीही झालेले नाही मथुरा आणि काशीचा प्रश्न पूर्णपणे सोडून दिला आहे समान नागरी कायदा इतकी वर्षे राज्य करून सुद्धा भारत जाऊ द्या उत्तर प्रदेशासारख्या राज्यात सुद्धा आणता आला नाही एकंदरच या लोकांनी नेमकी कसली वचने दिली आणि वचनभंग कुठे कुठे झाले हे पहावे लागेल आणि त्या अनुषंगाने टीका करावी लागेल यासंदर्भात हे असे झोंबी झोंबी प्रकार फारसे कामाला येणार नाहीत पुरोगामी लोकांची खरी गोची ही आहे की ते काशीमध्ये मस्जिद पाडून तिथे शंकराचे जुने पाडले गेलेले मंदिर पुन्हा उभे करावे अशी मागणी ते करू शकत नाही आणि याचा एक परिणाम असा होतो की हे काम फक्त भाजपच करू शकतो हे जनतेला अधिकाधिक कळते आणि भाजप तर हे काम करायला तयार नाही कारण शैव म्हटले की बरेचसे प्रॉब्लेम येतात हे यांना आतून अतिशय व्यवस्थित माहिती आहे पण तरीही नाईलाजाने का होईना पण कुंभमेळा घ्यावा लागतो कारण कुंभमेळा हे एक तात्कालीक इन्फ्रास्ट्रक्चर असते जे कधीही काम संपले की डी कन्स्ट्रक्ट करता येते कारण शेवटी शैव मतदारांची संख्या प्रचंड आहे त्याला डावलता येत नाही आणि हेच तात्कालीक असल्याने ते दरवर्षी उभा करणे काढणे करता येते पण काशीमध्ये मंदिर बांधणे म्हणजे परमनंट इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणे असते तिथे अनेक गोष्टी गुंतलेल्या असतात त्यामुळे ते टाळले जाते 


पुरोगामी लोक हे अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण यांचे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यामध्ये प्रचंड अपयशी झालेले आहेत कारण लोकांनी मुळात त्यासाठीच जवळजवळ किमान 50 वर्षे तरी पुरोगामी वादाला सत्ता दिली होती आणि या काळामध्ये तुम्ही यातले किती प्रश्न सोडवले हा प्रश्न जनता विचारत राहते म्हणजे सत्ता होती तेव्हा जे प्रश्न तुम्ही सोडवलेच नाहीत जो तुमचा अजेंडा होता तो तुम्ही पार पाडलाच नाही आणि आता तुम्ही ज्या गोष्टी स्वतः केल्या नाहीत त्या भाजपने कराव्यात अशी विचित्र अपेक्षा करत आहात? यातला विरोधाभास स्पष्ट आहे पुरोगामी लोकांना यातला विरोधाभास दिसत नाही वास्तविक याबाबतीत आपण नेमके काय काय काम केले हे सतत सादर करणे आवश्यक आहे मुळातच लोकसंख्या वाढीचा मुख्य प्रश्न नीट न हाताळल्याने पुरोगामी लोकांनी घडवून आलेला विकास लोकसंख्येने खाऊन टाकला हे अजूनही पुरोगामी वादाला कळलेले दिसत नाही जोपर्यंत तुम्ही लोकसंख्या वाढीचा प्रश्न नीट हॅण्डल करत नाही हाताळत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही विकास करा लोकसंख्यावाढ हा विकास खात राहणार आणि या देशांमध्ये गरिबी राहणारच राहणार लोकसंख्या वाढीचा एक अर्थ गरिबांची लोकसंख्या वाढ असाही होतो हे अजूनही पुरोगामी लोकांना कळलेले दिसत नाही याबाबतीत नीट प्लॅनिंगची आवश्यकता होती परंतु ती प्लॅनिंग केली गेलीच नाही याचे कारण लोकसंख्या वाढीचा अजेंडा हा कळत नकळत मुस्लिम तुष्टीकरणाच्या संदर्भामध्ये इनऍक्टिव्ह राहिला तेव्हा भाजपाला जर खरोखरच पेचात पकडायचे असेल तर त्यांनी काय प्रॉमिसेस केली आणि त्यातली किती पूर्ण केली या अंगाने मांडणी करावी लागेल यातले किमान समान नागरी कायद्याचे तत्व पुरोगामी लोकांना स्वतः स्वीकारावे लागेल आणि ते जर का ते स्वीकारणार नसतील तर समान नागरी कायद्यावर आणखी एक निवडणूक भाजप जिंकेल किंबहुना पुढची निवडणूक ही समान नागरी कायद्याच्या आधारे काशी मधल्या मंदिराच्या आधारे लढली जाईल आणि मथुरा मंदिर पुढच्या इलेक्शनच्या आधी बांधले जाईल जसे राम मंदिर मागच्या निवडणुकीआधी बांधले गेले मुळातच प्रॉब्लेम असा आहे की समान नागरी कायदा पुरोगामी लोकांनाच करायचा नाहीये कारण त्यांनाही मुस्लिमांची मते अल्पसंख्यांकांची मते पाहिजेत म्हणजेच भाजप जे करू शकत नाही जे करत नाही त्याच्या कडे बोट दाखवून ते इलेक्शन जिंकू शकत नाहीत आणि जे अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण यांचे प्रश्न आहेत तो मुळात भाजपचा अजेंडाच नाही किंबहुना त्याबाबत अधिकाधिक उजवे धोरण राबवता कसे येईल आणि आपल्याकडे त्या अंगाने फंडिंग कसे येईल हे पाहिले जात आहे भाजप हा अत्यंत आपल्या आयडिओलॉजी बद्दल क्लिअर आहे तुम्ही आंधळे आहात तुम्हाला ती दिसत नाही यातली सर्वात विचित्र गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे पुरोगामी लोकांनी प्रतिवाद करणारा धर्म म्हणून बौद्ध धर्म निवडलेला आहे आता यातला प्रॉब्लेम असा आहे की बौद्ध लोकांची संख्या या देशांमध्ये धड एक टक्का सुद्धा नाही तर प्रतिधर्म म्हणून तुम्ही कितीही बौद्ध धर्म सादर करा तो इलेक्शन जिंकू देऊ शकत नाही तुम्ही जिंकत होता कारण आम्ही शैवधर्मी लोक तुमच्या मागे होतो पण तुम्ही आमचे काय केले ते आम्हाला माहित आहे आज सुद्धा बौद्ध धर्म ज्या तऱ्हेने शैव धर्माची अवहेलना करत आहे ते पाहिले की पुढच्या इलेक्शन सुद्धा तुमच्याने होणार नाहीत हे स्पष्ट आहे भाजप निदान इमोशनल लेवलला का होईना शैव-धर्माचे कट्टर समर्थन करत असतो त्यामुळेच ओबीसी भाजपच्या मागे गेले पुरोगामी लोकांना जर का इलेक्शन जिंकायचे असतील तर आपले धार्मिक आकलन थोडे चष्मे काढून करावे लागेल भक्तीच्या विरोधातली भारतामध्ये सर्वात पहिली चळवळ ही जैन आणि बौद्ध धर्माने निर्माण केली आणि याबाबतीत बौद्ध धर्म हा जास्त कट्टर होता तायडे कळत नकळत बौद्धधर्मी असतात हा माझा अनुभव आहे किंबहुना ते प्रतिनिधी आहेत म्हणूनच हे लिखाण करतो आहे त्यामुळेच प्राचीन काळामध्ये बौद्ध लोक भक्तीची जशी टिंगल टवाळी करत होते तसेच ते करत असतात आणि त्यातूनच हे लिखाण आलेले आहे प्राचीन काळामध्ये प्रत्येक तंत्र हे स्वतःच्या तंत्रालाच महान मानायचे त्यामुळेच ज्ञानतंत्री लोक हे भाव तंत्राने जाणाऱ्या लोकांची चेष्टा करायचे तर भक्ती तंत्राने जाणारे लोक अनेकदा ज्ञानतंत्र अथवा ज्ञानतंत्री अथवा शरीरतंत्रि लोकांची चेष्टा उडवायचे अगदी तुकारामाने सुद्धा योगाची प्रचंड चेष्टा केलेली आहे कारण त्यांच्यासमोर जे योगी होते त्या संदर्भात ते बोलतात प्रत्यक्षामध्ये खरोखर त्या योगी लोकांच्याबद्दल तुकाराम यांना खरे आकलन होते का की फक्त भक्ती तंत्रावरचा आपला विश्वास ते प्रकट करत होते ? माझ्या मते त्यांना खरा योगी शरीर तंत्र माणूस कळत होता आणि म्हणून तर ते ज्ञानेश्वरांचे गुण गायन करत होते पण त्यांच्या काळात त्यांच्या आसपास अनेक फेक योगी असावेत साहजिकच मग त्यावर त्यांनी हल्ले केलेले आहेत जो अत्यंत अस्सल योग्य योगी आहे शरीर तंत्राने जाणारा साधक आहे त्यांच्याशी त्यांचे नक्कीच नीट जुळलेले असणार आजही भारतामध्ये खरे भक्त किती हा प्रश्न आहेच की ! ज्ञानमार्ग आणि भक्ती मार्ग यांच्या मधला हा संघर्ष कळत नकळत बौद्ध विरुद्ध ब्राह्मण धर्म असा होता तो नवीन आयडालॉजीशी जुळवून आणण्यात काही अर्थ आहे असे मला वाटत नाही म्हणूनच मी म्हणतो की फॅन हा शब्द वापरा अधिकच तीव्रता दाखवायची असेल तर आंधळे फॅन मूर्ख फॅन असा शब्द प्रयोग करायला हरकत नाही पण भक्ती हा शब्द वापरू नका 


बाकी अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहेच त्याबाबतीत मी नेहमीच तुमच्या मागे उभा राहीन किंबहुना तुमची विचारसरणी विचार प्रणाली मला पटत नाही पण वेळप्रसंगी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आला तर मी तुमच्या मागे ठामपणे उभा राहीन हे तत्व ही पुरोगामीवादाची एक फार मोठी देणगी आहे जमेची बाजू आहे आणि एक महत्त्वाचे तत्त्व आहे ज्याचा मी ही स्वीकार करतो 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे