युरेशियन लोकांचे चार प्रवर्ग आणि त्यातून निर्माण झालेल्या चार युरेशियन उपसंस्कृती श्रीधर तिळवे नाईक 


भारताच्या इतिहासाचे आकलन करताना युरेशियन श्रुती आणि इथल्या स्थानिक लोकांची शैव अथवा तंत्र श्रुती या दोन्ही श्रुतींचा अभ्यास करावा लागतो कारण या दोन्ही श्रुती मिळून भारतीय संस्कृती तयार होते अनेकदा तुम्ही स्वतः कुठल्या श्रुतीच्या परंपरेमध्ये जन्मलेले आहात त्या अनुषंगाने आपली इतिहासाची मांडणी करत असता त्यामुळेच अनेकदा इतिहासाच्या मांडणीमध्ये काही चुका होऊन जातात ज्या इतिहासकाराच्या संस्कारजन्य चुका म्हणून ओळखता येतात किंवा श्रुतीजन्य चुका म्हणून जाणता येते म्हणजे तुम्ही जर का युरेशियन संस्कृतीमध्ये जन्मलेला असाल (हिचा प्रभाव तुम्ही जर का ब्राह्मण क्षत्रिय वैश्य असाल तर असतोच असतो) तर तुम्ही कळत नकळत युरेशियन श्रुतीचे समर्थकच बनता तर या उलट तुम्ही जर का शेव अथवा तंत्रशुतीच्या वातावरणात वाढला असेल तर कळत नकळत तुम्ही शैव अथवा तंत्र श्रुतीच्या प्रभावाखाली येता (तुम्ही वाणीपणी , ओबीसी, बीसी आणि आदिवासी असाल तर हा प्रभाव टाळता येत नाही) आणि त्यातल्या उणिवांच्याकडे लक्ष देत नाही अनेकदा तर तंत्र श्रुतीमध्ये सुद्धा भगत असतात याकडे दुर्लक्ष होते भगत काही फक्त युरेशियन श्रुतीतच असत नाहीत तर ते तंत्र अथवा शैव श्रुतीमध्ये सुद्धा असतात हे लक्षात घेतले पाहिजे किंबहुना आज आपण ज्यांना शैव ब्राह्मण म्हणतो ते अनेकदा भगत होते पंडित किंवा पुजारी नव्हते अगदी गुरव समाजात सुद्धा अनेक लोक भगत बनतात पंडित किंवा पुजारी बनत नाहीत आचार्य तर फारच दूरची गोष्ट आहे आणि मग साधक साधू आणि सिद्ध हा प्रवास तर अनेक लोकांच्यासाठी अशक्यच बनलेला दिसतो बहुजन समाज या लोकांच्या तालावर नाचत असतो त्यामुळे यांची सुद्धा चिकित्सा झाली पाहिजे हे लक्षात घेतले जात नाही आणि काही जण मग देवदासी प्रथा सारख्या प्रथांचे समर्थक बनतात हे ग्रीक लोकांच्या कडून आलेले आयात केलेले प्रकरण आहे हे सुद्धा अनेकांना कळत नाही 


सर्वसाधारणपणे युरेशियन श्रुतीच्या बाबतीत ती एका चेहऱ्याची होती असे गृहीत धरलयाने इतिहासाच्या आकालनामध्ये प्रचंड गोंधळ झालेला दिसतो जणू काय स्थलांतर सर्वांनी मिळून एकत्र आणि फार वैज्ञानिक पद्धतीने प्लॅन आखून पद्धतशीरपणे केले असा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो प्रत्यक्षामध्ये कोणीही मुद्दाम म्हणून स्थलांतर करत नाही आज सुद्धा युरेशियन लोकांचे पहिले स्थलांतर नेमके कुठल्या मार्गाने झाले हे सांगणे कठीण आहे आणि त्यामुळेच कुठला प्रवर्ग भारतात प्रथम दाखल झाला हे सांगणे कठीण आहे युरेशियन प्रदेशातून स्थलांतर करताना या लोकांनी नेमका कुठे मुक्काम ठोकला हे आपल्याला सहज लक्षात येऊ शकते सर्वसाधारणपणे दिसते ते चित्र पुढील प्रमाणे आहे 


माझ्या मते चार स्थलांतरे झाली

१ पहिले स्थलांतर हे वैदिकांचे होते आणि ते अफगाणिस्तानामध्ये प्रथम सेटल झाले आणि तिथेच ऋग्वेदाची निर्मिती वैदिक लोकांनी केली. या वैदिक लोकांच्यामध्ये वर्णव्यवस्था जन्मदत्त नव्हती त्यामुळेच वेदाची रचना करणाऱ्या लोकांच्यामध्ये ऋषी लोकांच्या मध्ये आपणाला विश्वामित्र सारखा क्षत्रिय सुद्धा दिसतो अनेक स्त्रिया सुद्धा रचनाकार म्हणून दिसतात किंबहुना सर्वाधिक महत्त्वाचा मानला जाणारा गायत्री मंत्र हा एका क्षत्रिय ऋषीने रचलेला आहे आणि तो विश्वामित्र आहे. अफगाणिस्तानातल्या भूगोलाचा प्रचंड मोठा प्रभाव आपणाला ऋग्वेदावर स्पष्टपणे दिसतो त्या काळामध्ये अफगाणिस्तान हा काही भारताच्या संस्कृतीपासून फारसा वेगळा नव्हता त्यामुळे एका अर्थाने ऋग्वेद हा भारतीय संस्कृतीचाच भाग आहे हे आपण स्वीकारले पाहिजे त्यामुळेच वैदिक संस्कृती ही एका अर्थाने भारतातच निर्माण झालेली संस्कृती आहे मात्र तिच्यामध्ये युरेशियन संस्कार प्रचंड आहेत या लोकांना आपण वैदिक लोक असे म्हणू ऋग्वेद निर्माण करण्याचे पूर्ण श्रेय हे वैदिक लोकांना जाते हे मुख्य म्हणजे अति कट्टर नव्हते अधिक ओपन होते त्यांचे संघर्ष झाले तरी समायोजनाचे सुद्धा काही प्रकार तिथे दिसतात हे कट्टर पशुपालक असल्याने त्याचे स्पष्ट निनाद उमटलेले आहेत 

२ दुसरे स्थलांतर हे साधारणपणे ज्याला आज मंगोलिया म्हटले जाते तो भाग आणि त्याच्या थोडा वरचा रशियन भाग इथून झालेले आहे आणि ते हिमालय पार करत वाया तिबेट बिहार आणि उत्तराखंडमध्ये झालेले दिसते हे लोक युरेशियन लोकांच्या मधले सर्वाधिक ओपन माइंडेड असे लोक आहेत त्यांना एकीकडे स्वतःच्या आर्य संस्कृतीचा प्रचंड गर्व आहे अगदी गौतम बुद्धासारखा माणूस सुद्धा त्यातून सुटलेला नाही तो स्वतःला आर्य म्हणवून घेतो मात्र त्याने आर्य या शब्दाला अधिक चांगला आणि सभ्य असा शब्दार्थ बहाल केला मुख्य म्हणजे स्थानिक लोकांचा मोक्ष या लोकांनी सहर्ष स्वीकारला आणि याचा परिणाम असा झाला की मोक्ष स्वीकारणारे आर्य अशी एक नवीन संस्कृती जिला पुढे नंतर समन संस्कृती म्हणून ओळखले जाऊ लागले ती या प्रवर्गातून निर्माण झाली उत्तर पूर्व भारतातल्या स्थानिक शैव लोकांशी या लोकांचे अतिशय व्यवस्थित पटलेले दिसते या लोकांनी जी युरोशियन संस्कृती स्थापन केली तिला आर्य संस्कृती असे म्हणायला हवे किंबहुना आर्य संस्कृतीचा घोष जितका बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड बंगाल या प्रदेशात होतो तितका तो इतरत्र होत नाही याचे कारण हे लोक स्वतःला आर्य म्हणवून घेत होते या लोकांनी गंगा ब्रह्मपुत्रा आणि यमुनेच्या काठी अनेक वस्त्या केल्या किंवा गंगा यमुनेच्या ब्रह्मपुत्राच्या परिसरामध्ये अनेक वस्त्या केल्या आणि यजुर्वेदाची निर्मिती ही या संस्कृतीची देणगी आहे ऋग्वेदामध्ये आणि यजुर्वेदामध्ये जो फरक पडलेला आहे तो कळत नकळत भूभागांचा फरक आहे ऋग्वेदाची जडणघडण अफगाणिस्तानामध्ये आहे तर यजुर्वेदाची जडणघडण ही एका अर्थाने आज ज्याला उत्तर भारतीय संस्कृती म्हणतो त्यामध्ये झालेली आहे यातूनच पुढे वेदांच्या विरुद्ध बंड ही झालेले दिसते आणि त्याचे नेतृत्व हे प्रामुख्याने महावीर आणि गौतम बुद्ध यांनी केलेले आहे या लोकांनी समन संस्कृतीचे अतिशय संरचनात्मक सुबक स्वरूप सादर केले ते इतके प्रभावी होते की कळत नकळत त्याचा जगभर नंतर प्रसार आणि प्रचार झाला 

३ तिसरे स्थलांतर हे युरेशियन भागामधून विशेषत : रशियाच्या पश्चिम भागांमधून आणि कदाचित शक्य आहे की कॉक्सस पर्वत सुद्धा असावा तिथून प्रथम इराण आणि इराक मध्ये वस्ती करत झालेले आहे हे लोक सुरुवातीला जरी स्वतःला अरिय म्हणत असले तरी त्यांचे पुढे पूर्णपणे पारसीकरण झाले आणि झोराष्ट्रीयन धर्म त्यांनी स्वीकारला मात्र त्यांचे जे भगत होते त्यांनी मात्र हा नव्याने निर्माण झालेला पारसी धर्म स्वीकारला नाही आणि ते इराण इराक मधून थेट पंजाब मध्ये दाखल होत हरियाणा राजस्थान दिल्ली काश्मीर या दिशेने सरकत राहिले हे लोक एका अर्थाने झोराष्ट्रीयन लोकांनी हाकलून दिलेले लोक होते यांनी आपला भगतपणा सोडला नाही यांना आता आपण ब्राह्मण म्हणतो हे ब्राह्मणांचे स्थलांतर आहे आणि यांनीच सामवेद रचलेला आहे हा सामवेद मूळच्या संहितेतून आलेला आहे आणि ही संहिता ऋग्वेदाला समांतर असावी हे स्पष्ट दिसते किंबहुना ऋग्वेद, अवेस्ता यांना कॉमन असलेल्या संहितेतूनच सामवेदाची निर्मिती झालेली आहे त्यामुळेच ऋग्वेदात नसलेल्या काही सुक्तांचा समावेश सामवेदात दिसतो सामवेदा मागची मूळ संहिता आता गायब आहे मात्र तरीही ऋग्वेद आणि सामवेद यांचे नाते स्पष्ट दिसते याचे कारण मुळात या सर्वांचे युरेशियन मुळ एकच आहे याच लोकांनी भारतात आल्यानंतर पुढे ब्राह्मण धर्म निर्माण केला 


४ चौथे स्थलांतर हेही पुन्हा मंगोलिया आणि त्याच्या आसपासचा प्रदेश इथून झालेले आहे हेही पुन्हा भगत लोकांचे स्थलांतर आहे शक्यता अशी आहे की चीनमधूनसुद्धा काही लोक आलेले असावेत कारण कन्फ्यूशियसचा प्रभाव जसा जसा वाढत गेला तसा तसा भगत लोकांचा चीन मधला प्रभाव कमी झाला या भगत लोकांना संपूर्ण युरेशियामध्ये शमण म्हटले जात होते हेही काहीसे कट्टर होते आणि यांनी आपला शमन धर्म सोडला नाही यांनीच चौथा वेद निर्माण केला तो म्हणजे अथर्ववेद त्यांनी इथल्या स्थानिक लोकांशी जुळवून घेतले आणि त्यांचे देव सुद्धा त्यांचे मंत्र सुद्धा आपल्या मांत्रिकी मध्ये सामील करून घेतले ज्यांना आजकाल आपण तांत्रिक मांत्रिक वगैरे म्हणतो हे प्रामुख्याने सुरुवातीला या वर्गातून आलेले होते कारण हळूहळू यांना ब्राह्मण म्हणण्याऐवजी तांत्रिक म्हणणे सुरू झाले पण त्यातूनच अनेकदा गोंधळ पण निर्माण झाला अथर्व वेदातले मंत्र हे प्रामुख्याने जादूटोणाचे मंत्र आहेत कारण ते शेवटी भगतांचे इथल्या केसमध्ये शमणांचे मंत्र आहेत तुम्ही जर का वज्रयानाचा अभ्यास केला तर त्यावर जो मांत्रिकीचा प्रभाव आपणाला दिसतो तो या प्रवर्गातून आलेला आहे एका अर्थाने आजही तिबेट हा या संस्कृतीच्याच प्रभावाखाली आहे याने सुद्धा मोक्ष स्वतःत सामावून घेतला 


एकदा का हा सगळा भौगोलिक कॅनवास आपण नीट समजावून घेतला तर मग इंडो- युरेशियन संस्कृती कशी काय विकास पावत गेली ते आपणाला स्पष्ट होत जाते भारतीय युरेशीयन संस्कृती ही भारतातच डेव्हलप झालेली आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे मात्र तिचे मूळ युरेशियामध्ये आहे हे ही तितकेच खरे आहे किंबहुना हे लोक सुद्धा स्वतःला वेगळे समजायला बघतात आपण युरेशियामधून आलेलो आहोत याचा अहंकार सुद्धा या लोकांच्या ठाई अजूनही आहे काय असा प्रश्न पडतो अगदी गौतम बुद्धा सारखा माणूस सुद्धा आर्य आणि अनार्य असा भेद जो प्रथम यजुर्वेदामध्ये आलेला आहे स्वीकारतो आपल्या धम्माची मांडणी करताना तो वारंवार हे दोन ध्रुव सादर करतो आता जर गौतम बुद्धाचीच ही स्थिती असेल तर मग इतरांच्या स्थितीविषयी काय बोलावे ? सभ्यतेच्या व्याख्या जेव्हा अनार्य आणि आर्य यांच्या चौकटीत एखादा धम्म करतो तेव्हा बऱ्याच गोष्टी घडायला लागतात अगदी इराण आणि इराकचे लोक सुद्धा आपणाला आर्य म्हणवून घेतात आणि त्यातही सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचा गर्व आहे असो 

प्रश्न असा आहे की भारतातल्या आधी आलेल्या किंवा मूळच्या भारतीय लोकांना असा सांस्कृतिक भेद का करावासा वाटला नाही ? त्यांनी अशी द्विध्रुवात्मक रचना का केली नाही? याचे कारण स्पष्ट आहे इथल्या लोकांना मोक्ष सापडला होता आणि एकदा का मोक्ष सापडला की मग भेदाभेद करण्याची गरजच भासत नाही 


आता शेवटचा प्रश्न तो म्हणजे देव संस्कृती ! ही पाचवी संस्कृती आहे असे सकृत दर्शनी वाटले तरी ती आफ्रिकेतून स्थलांतरित झालेल्या आणि हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या लोकांची अत्यंत मूळ असलेली अशी भारतीय संस्कृती आहे हे लोक हिमालयाच्या पायथ्याशी वसल्याने गोरे होत गेले मात्र त्यांना कधीही सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचा गंड झाला नाही पुढे युरेशियन लोकांनी त्यांच्याशी जास्त जुळवून घेतले कारण ते गोरे होते प्रत्यक्षामध्ये या लोकांची देव संस्कृती आणि देवगन हा थेट शिवाच्या काळापासून अस्तित्वात आहे हा प्रामुख्याने आता काश्मिरी भागात वावरत होता आणि त्यांचा संस्थापक कश्यप हा शिवभक्त होता पुढे युरेशियन लोकांच्या नादाला लागून यांनी स्वतःला युरेशियन म्हणवून घेतले तरी प्रत्यक्षात हे युरेशियामध्ये कधीच गेलेले नव्हते ते इथलेच झाले आणि भारतातला गोरा रंग हा त्यांच्यामुळेच ज्याला आज आपण निमगोरा रंग म्हणतो अस्तित्वात आहे आणि गोरा रंग सुद्धा भारतात फार प्राचीन काळापासून आहे हे पार्वतीच्या उदाहरणावरून स्पष्ट व्हावे देवगण आणि इतर गण यांच्यातले वैवाहिक संबंध हे प्रथम निर्माण करणारा क्रांतिकारक माणूस म्हणूनच शंकराला बघावे लागते त्याला प्रचंड विरोध झालेला दिसला तरी नंतर त्याच्या मुलाने संकटकाळात म्हणजेच स्कंदाने देवगणचे नेतृत्व केलेले आहे आणि सेनापती बनून रक्षण पण केलेले आहे याच देव गणातून पुढे काश्मिरी पंडित निर्माण झालेले आहेत यांना युरोशियन समजण्याची चूक वारंवार झाल्यामुळे काश्मीरचा प्रश्न आपणाला काही वेळा कळत नाही या लोकांना मुसलमान होत असताना युरेशियन लोक का तमाशा बघत बसले हे ह्या पार्श्वभूमीशिवाय कळत नाही किंबहुना युरेशियन लोकांची काश्मीरमध्ये झालेली बाराव्या तेराव्या शतकातली एन्ट्रीच काश्मीरला घातक ठरलेली दिसते यांनीच बौद्ध राजपुत्राचे आणि सेनापतीचे धर्मांतर घडवून आणण्याला नकार दिला आणि आमच्या धर्मात आम्ही कोणाला घेत नाही असे युरेशियन तत्व सांगितले परिणामी त्याच्या सकट त्याच्या सैनिकांनी इस्लाम स्वीकारला आणि त्यातूनच पुढचे काश्मीरचे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत असो 


या चार प्रवर्गातच नंतर बंड झालेले आहे वैदिक श्रद्धे विरोधात ब्रह्मधर्म उभा ठाकला तर ब्राह्मण धर्माविरोधात लोकायत आणि सांख्य धर्म निर्माण झाला आर्य धर्माविरोधात आणि श्यामन धर्मविरोधात जैन धर्म आणि बौद्ध धर्म निर्माण झाले युरेशियन लोकांचा इतिहास म्हणजे केवळ प्रस्थापित वेद नव्हे तर त्या वेद संस्कृती विरोधात झालेले बंडसुद्धा त्या इतिहासाचा भाग आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि त्यामुळेच मी ब्रह्म धर्म जो उपनिषदात नंतर साकार झाला आणि ज्यातून पुढे वेदांत निर्माण झाला सांख्य धर्म जो सरळ सरळ शैव धर्माचे रूपांतर आहे जैन आणि बौद्ध धर्म ज्यांच्यावर शैव श्रुतीच्या मोक्षाचा विचारप्रभाव आहे यांना आदर देतो सन्मान देतो मात्र जिथे जिथे वर्ण व्यवस्थेचा जातीव्यवस्थेचा आणि गुलामगिरीचा समर्थन करणारा उद्गार निघतो तिथे माझा विरोध होतो 


एकदा का ही चार स्थलांतरे , चार प्रवर्ग आणि चार प्रवर्गातून निर्माण झालेले चार वेद आणि या चार प्रवर्गातच चार वेदांच्या विरुद्ध बंड करणारे चार धर्म आपण नीट पाहिले की मग बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट व्हायला लागतात आणि भारतीय संस्कृतीचे आपले आकलन अधिक नीट होते 


इतिहासामध्ये काय घडले हे नीट समजून घेतले की मग संपूर्ण भारतीय संस्कृती कशी नव्याने निर्माण करायची आणि तिचे एकविसाव्या शतकात काय रूप ठेवायचे हे आपणाला व्यवस्थित स्पष्ट होऊ शकते भारत ही धर्मांची भूमी आहे कारण येथे आदीशैव धर्म ,लोकशैव धर्म, पाशुपत धर्म , लिंगायत धर्म , ब्रह्म धर्म , सांख्य धर्म , ब्राह्मण धर्म , जैन धर्म , बौद्ध धर्म , वैष्णव धर्म असे अनेक धर्म निर्माण झाले इतके धर्म कुठल्याच भूमित निर्माण झालेले नाहीत त्यामुळेच भारताचा इतिहास तपासताना कळत नकळत धर्म केंद्रस्थानी येत जातात भारतात निर्माण झालेल्या विचार प्रणालींनी जर का या धर्माचा नीट विचार केला असता तर कदाचित आपल्या विचारप्रणाली अधिक सशक्त आणि अधिक जमिनीवरच्या झाल्या असत्या आणि आत्ताचे धर्मातून निर्माण झालेले उत्तर आधुनिक प्रश्न आपण अधिक नीट हाताळले असते 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे