कविता e

आतून तुटलेली माणसे 

किंचाळत नाहीत 

स्वतःची चळत चाळत जातात 


स्वतःच्या जखमांच्यावर फुंकर घालण्याची विद्या 

त्यांना अवगत असते 

मात्र जखमा करणाऱ्यांचे हात त्यांना ओळखता येत नाहीत 


त्यांच्या हातावर ईश्वर नसतो 

वर्कर असतो 

अनेकदा स्वतःवर काम करायला ही त्यांना वेळ मिळत नाही 

ती आतून तुटतानाही 

संगीत ऐकत असल्याचे नाटक करतात 


आतून तुटलेली माणसे 

आपल्या दुःखांना सभ्यता शिकवतात 

त्यामुळेच त्यांचा क्रांतीला उपयोग नसतो 

त्यांना अनेकदा क्रांती आमंत्रण देते 

ती गप्प बसतात 

रस्त्याच्या कडेला उभी राहत 

एका अनिवार आशेने पहात 

स्वतःवर संशय व्यक्त करत 


त्यांचा गर्दीचा अनुभव 

फार चांगला नसतो 

गर्दी त्यांना एकाद्या सुऱ्यासारखी वाटते 

त्यांना मोर्चा आणि गर्दी यातला फरक कळत नाही 


आतून तुटलेली माणसे 

निराशा आणि हताशा यांना 

हातात येऊ देत नाहीत 

ती त्यांना डोक्यात वागवत 

स्वतःचं टक्कल गोळा करत राहतात 


आतून तुटलेली माणसं 

मरणाला हत्ती सारखं बघतात 

त्यांना मृत्यू व्हेज वाटतो 

त्यांना कळत नाही 

मृत्यू त्यांना व्हेज थाळी म्हणून खाणार आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


अशुभ वार्ता तर येऊन गेली कधीच 

आता आणखी कोणता दिवा विझणे बाकी आहे 


अश्रू तर संपून गेले धाय मोकलून रडून झाले 

बर्फ रक्ताचा पिघळला भूतकाळ खोडून झाले 


मरण तर वाट्याचे येऊन गेले कधीच 

अजून कोणते काळीज विझणे बाकी आहे


वेलू गगनी गेला नाही ना डोह आनंदी झाला 

ज्याला महादेव व्हायचे होते तो दारातला नंदी झाला 


आकाश फाटले समुद्र आटला आयुष्याचा कोरडा दुष्काळ झाला 

जे आत मध्ये होते ते उडून गेले कधीच 

आतल्या ओसाड बागेत कोणते फुल उमलणे बाकी आहे

आयुष्य तर संपून गेले कधीच 

आता कोणते जगणे बाकी आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

जारवा 

जारवा ना सज्जन

ना दुर्जन 

ते फक्त होमो सेपियन


स्वतःच्या काळया रंगाचा त्यांना करडा अभिमान 

म्हणूनच गोरी संतान झाली की 

ते थेट मारून टाकतात 

कारण त्यांना संशय असतो 

गोरा रंग आपल्या जमातीचा नाही

आणि तरीही ते होमोसेपियन आहेत 


निरागस 

आणि तरीही प्रचंड संरक्षक 


आपल्या प्रदेशात ते येऊ देत नाहीत जमाती बाहेरच्या माणसाला

कोणी आला की मारतात 

- थेट 

कारण ते होमो सेपियन आहेत 


त्यांच्याही श्रद्धा आहेत 

पण त्यांचा धर्म झालेला नाही 

कारण ते होमोसोपियन आहेत 


त्यांची संख्या घटत चाललीये हळूहळू 

कदाचित काही वर्षांनी ते फक्त इतिहासात आढळतील 

कुणालाच कळत नाही" का ?"


कदाचित जगात सर्वत्रच होमोसेपियन घटत चाललेत 

आतून आटत चाललेत 

पारंपारिक कपड्यातून फाटत चाललेत 


ते आहेत माझ्या इतिहासाची आदिम आठवण

वर्तमानात त्या आदीमतेची साठवण 

अशी पाठ राखण 

जी अपयशी आहे

कारण ती आफ्रिकेतून निघाली 

पण इंडियापर्यंत पोहोचलीच नाही


अडकली मधल्या मध्ये 

बेटांच्यावर

बांबू लागलेली 


त्यावेळी त्यांना आपली मातृभूमी आठवली का 

की  समोर ठाकलेले बेट हे आफ्रिकेचाच भाग आहे 

असे त्यांना वाटले ?


ते नेमके कुठून निघाले का निघाले 

ते त्यांना आठवत नाही 

कारण जे आत्ताचे आहेत 

ते बेटावर आहेत 

त्यांचा वर्तमान बेटावर आहे 

आणि तरीही ते माझी आदिम आठवण आहेत 


तज्ञ सांगतात की ते आफ्रिकन वंशाचे आहेत 

म्हणून म्हणायचे ते आफ्रिकन वंशाचे भारतीय आहेत


त्यांच्याबरोबर आलेल्या आफ्रिकन लोकांचे भारतात असुर झाले 

जारवा मात्र असुर झाले नाहीत 


त्यांचा तीर कामठा जगाच्या दृष्टीने आऊट डेटेड झालाय 

पण ते अजूनही त्याच्या साहाय्याने शिकार करतात 


त्यांच्या पेक्षा पुढे गेलेले लोक 

कधीकधी जातात त्यांना पाहायला

वाहनात बसून त्यांच्यात राहायला

आपल्यापेक्षा मागे राहिलेल्या लोकांच्या आयुष्याचा आदमास घेण्यासाठी 

संतोष कमावण्यासाठी 

की आपले पूर्वज यांच्यापेक्षा हुशार निघाले


ते वर्तमान काळात उपस्थित असलेला होमोसोपियानिक भूतकाळ आहेत 

अर्थात त्यांना असं म्हटलेले चालणार नाही 

कारण त्यांच्या दृष्टीने ते वर्तमानात आहेत 

असा वर्तमान जो भारत सरकारने सुरक्षित ठेवला आहे 


सरकारे किती काळ त्यांचा असा वर्तमान भूतकाळ म्हणून सुरक्षित ठेवणार आहेत? 


पन्नास वर्षे 100 वर्षे पाचशे वर्षे?


तोवर ते टिकतील ?

की शेवटी मुख्य प्रवाहात येऊन वाकतील

आणि पोहायला शिकतील ?


कि तिसरे महायुद्ध झाल्यानंतर 

"शिल्लक राहिलेले लोक" या कॅटेगिरीत ते येतील ?


समजा तिसरे महायुद्ध होऊन पुन्हा त्यांच्यापासूनच उत्क्रांती सुरू झाली तर 

ते कुठे पोहोचतील ?


जिथे पर्यंत आपण पोहोचलो तिथेच ?


सध्या तरी त्यांना इतर जगापासून वाचवण्यातच तृप्ती मिळते आहे 


ही तृप्ती नेमकी कशाची हे सांगता येत नाही 


आडवांस झालेले होमोसेपियनस 

आडवांस न झालेल्या होमोसेपियन बरोबर 

असे का वागतात ?


 की ते वाट पाहतायत 

कधीतरी यांना असे राहण्याचा कंटाळा येईल 

आणि ते 

आपल्याला येऊन मिळतील 


सध्या तरी ते त्यांची 5000 वर्षे घेऊन जिवंत आहे 

आणि त्यांना माहित नाही की ते असे अस्तित्वात येऊन 5000 वर्षे झालेली आहेत 


ते इतिहासाबाहेर त्यांचा वर्तमान जगत आहेत 

किंवा आपल्या वर्तमानाच्या बाहेर ते त्यांचा इतिहास जगत आहेत

जो कदाचित आपल्यापेक्षा जास्त जिवंत आणि रसरसलेला आहे 

बालपणासारखा 


त्यांना मोठे करावे का ?


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीजमधील चॅनेल: स्पिरीच्युअल ह्या काव्यफायलीतून)


इतनी भी ना मिला करो 

की मिलना आदत बन जाये 

दोस्ती तकही ठीक हैं मामला 

ये ना मोहब्बत बन जाये


रास्ते पे दिखाई दे तो थोडा 

कभी कभी करो अनदेखा

हर बार देखनेसे खीच होगी पैदा 

कही वो न इबादत बन जाये


तेरी दोस्ती की एहमीयत 

 मैं जान चुका हुं कब का

अभी तक रिश्ता हैं परंपरा 

कही वो ना बगावत बन जाये 


दोस्ती है तो खुलेआम मिलोगी 

मोहब्बत करोगी हो जाएगी चोरी

कहेंगे दोस्ती के नाम पे किया नाटक

कही दोस्ती ना शिकायत बन जाए


इजाजत मिली है इजाजत रहने दो 

तू तेरा ढूंढ मै मेरी ढूंढता हुं 

जो जवानीके चान्सेस हैं अभी 

वो फिसलकर ना बेइज्जत बन जाए 


कौन उम्रभर यहाँ देता है साथ 

तू भी जायेगी कोल्हापूर छोडकर 

दरम्यान रख अभीसे सही फासला

ये रिश्ता ना जरूरत बन जाये


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


नको जाऊया बेडवर सेक्स चा कंटाळा आलाय 

कितीही कर खालीवर सेक्सचा कंटाळा आलाय 


सगळे कसे रिपीट रिपिट आनंदाची कृत्रिम खीटपिट 

सुख देखील करतय बोअर सेक्सचा कंटाळा आलाय 


कधीकाळी होता गोडवा हृदय म्हणतय आता पुढे व्हा 

सगळं झालंय शुअर शुअर सेक्सचा कंटाळा आलाय 


शरीर बदलता न्हवते येत म्हणून मी तऱ्हा बदलल्या 

राहिले तरी उथळ वरवर सेक्सचा कंटाळा आलाय 


बहुदा मोक्ष बोलवतो आहे कंटाळा माझ्यात थाटतो आहे 

त्यापार जाईन म्हणतो खोलवर सेक्सचा कंटाळा आलाय 


श्रीधर तिळवे नाईक 

( चॅनेल सिरीज मधील चॅनेल:  ज्ञ : लव,लव इन अँड लव आउट या काव्यफायलीतून)


वाटो कितीही ते मुलायम आहे

आत्महत्या शेवटचे पलायन आहे


तू तिला धाडणार वनवासातच 

शेवटी खिशात तुझ्या रामायण आहे 


कोण ज्यास दुःख नाही झाले आयुष्य 

प्रेमभंग , रोग, मृत्यू , म्हातारपण आहे


त्याचा अमरत्वाचा ध्यास इतका की 

क्षणभंगुर आनंद वाया घालवण्यात त्याचे तज्ञपण आहे 


मिळेल तसा अनुभव कवटाळतो जाणतो

 येणार शेवटी मिठीत शहाणपण आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डे कॅथलॉन: अनकॅटेगरीकल : तंत्र या काव्यफायलीतून)


मी तुला निर्माण करायला बसलोय 

आणि मला कळत नाही 

तुला कसं निर्माण करायचं ते 


देव निर्माण करणं इतकं सोपं नसतं 


मी तुला थेट भाषेतून निर्माण करू 

की भाषेतून चालत आलेल्या संहितेतून निर्माण करू? 


भाषा नव्हती तेव्हा तू कुठे होतास ?

तुझ्या निर्माणाची संकल्पना कुठे होती ?


मी भाषा शिकलोय 

आणि मी आता भाषा निर्माण करू शकतो 

माझ्या पूर्वजांनी आता इतका तरी भार 

माझ्यावर टाकलेला नाही 


मी विचार करतोय की 

पूर्वजांनी माझी भाषा कशी निर्माण केली असेल ?

त्यांना त्यासाठी किती खटपटी कराव्या लागल्या असतील ?


भाषा तुला निर्माण करणारी माती आहे 

आणि त्या मातीपासून भाषेतून तुला मला निर्माण करायचंय 


झूसपासून ज्युपिटर निर्माण झाला तसे तुला मी निर्माण करू का ?

की नाहीशा झालेल्या इंद्रापासून तुला मी पुन्हा जन्माला घालू ?


देव जन्मतात आणि मरतात 

अमर असतात ते फक्त भक्त 

आणि कदाचित पुरोहित 


भक्त आणि पुरोहित पुन्हा पुन्हा जन्म घेतात 

आणि म्हणूनच देव पुन्हा पुन्हा निर्माण करावे लागतात 


काळानुसार आणि अवकाश बघून 

मला तुला निर्माण करायचंय 


की शिव जसे तत्व होते मग देव झाले तसे एखादे तत्त्व निवडू ?


उदाहरणार्थ उत्क्रांती या तत्त्वापासून देव निर्माण करता येईल का ?

की उत्क्रांती स्त्रीलिंगी असल्यामुळे मी देवता निर्माण करावी उत्क्रांती नावाची ?


विष्णू वेदांच्या मध्ये फक्त काही सूक्ते होता 

मग वाढवत वाढवत मोठा देव झाला 

मीही आरंभ काही सुक्तांच्या पासून करावा का ?

आणि वाढवत नेण्याची जबाबदारी माझ्या वंशजांच्यावर टाकावी ?


किंवा मग एखादे महाकाव्य लिहावे का? 

रामायण आणि महाभारतासारखे ?

आणि मग त्या महाकाव्याचा नायक देव बनवून सादर करावा? लोक त्या काल्पनिक महाकाव्याला 

इतिहास म्हणतील 

याची खात्री मी बाळगावी का ?


मला तुला जन्माला घालायचंय 

आणि मला सुचतच नाहीये 

करावं काय ?

बाईला मुल जन्माला घालताना अशाच प्रश्नकळा होत असतील काय ?

की मूल जन्माला घालता येत नाही म्हणून 

मी देव जन्माला घालतो आहे ?


माझ्या अस्तित्वात न आलेल्या मुला 

मी तुला देव म्हणून कसे जन्माला घालावे?


श्रीधर तिळवे नाईक 

(डे कॅथलॉन या सिरीजमधील डे कॅथलॉन :अन कॅटेगरी कल : भक्ति या काव्यफायलीतून)


भाषा बोंबलत जातात 

शून्य चालत जातात 


निर्माण व्हायचे असते 

शक्ती हलत जातात 


होतात फक्त स्फोट 

आकार उचलत जातात 


संसार उभा राहतो 

ब्रह्मांडे डुलत जातात 


आत एकवटतो प्राण 

ईश्वर झुलत जातात 


वाढत राहतो आकार 

मर्यादा सलत जातात 


मुळाकडे जावेसे वाटते 

नद्या कलत जातात 


साधना तेजस्वी होतात 

सर्वस्व सोलत जातात 


परतणारा परतत जातो 

शून्य उमलत जातात 


श्रीधर तिळवे नाईक 

(डे कॅथलॉन या सिरीजमधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल:तंत्र या काव्यफायलीतून)



(चॅनेल सिरीज मधील चॅनेल स्पिरीच्युअल या काव्यफायलीतून)

ये एहसास दिल का है या जानका 

शायद दोनोंका नही | है बदनकी पहचानका


इश्क ने न्यू कॉलेज निकम्मा कर दिया

वरना मै भी स्टुडंट था कम्प्लीट विज्ञानका


पढाई करू या मै तुझे ही पढ लू?

पता नही क्या हो जाएगा मेरी शानका


पिक्चरकोभी बुरखा पहनके आयेगी क्या?

मै फॅन हू मिथुनका ना फिरोज खान का


ये इश्क का मामला है दो इंसानों के बीच 

तू क्यूँ बना रही है इसे हिंदूका मुसलमानका


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


जाहिराती श्रीधर तिळवे नाईक 


निरागस मुलाचं हसू पाहण्यासाठी 

मी बाळांच्या सामानांच्या जाहिराती पाहतो


मी जाहिराती पाहतो 

उत्तम मेकअप केलेले सुंदरी पाहण्यासाठी


उत्तम दातासाठी 

टूथपेस्टच्या जाहिराती 


उत्तम आरोग्य पाहण्यासाठी 

औषधांच्या सेमी औषधांच्या जाहिराती 


उत्तम पैसे पाहण्यासाठी 

इन्व्हेस्टमेंटच्या जाहिराती 


मला खात्री आहे 

जे जे उत्तम 

ते फक्त जाहिरातीत


मी मरत नाही 

कारण उत्तम कसे मरावे 

याची जाहिरात अजून आलेली नाही 


ती आली 

की मी जाईनच

जाहिरातीप्रमाणे मरून 

ऍड स्टाईलड


आणि मग

त्यानंतर मी जाहिरात पाहणार नाही 


जाहिराती बाहेर गेलेल्या माणसाचं काय होतं 

मला माहित नाही 


कदाचित 

तोही एक मृत्यूची जाहिरात होत असेल


ज्या समाजात 

मेल्यानंतर माणूस फक्त जाहिरात बनून फिरत असेल 

त्या समाजाचे काय होत असेल ?


मला कळून चुकलय 

सारे महापुरुष जाहिरात आहेत 


समग्र इतिहास जाहिरातींचा इतिहास आहे 


कदाचित मोक्ष म्हणजे निर्जाहीतीकरण 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल स्पिरीच्युअलया काव्यफायलीतून)

नको जाऊया बेडवर सेक्स चा कंटाळा आलाय 

कितीही कर खालीवर सेक्सचा कंटाळा आलाय 


सगळे कसे रिपीट रिपिट आनंदाची कृत्रिम खीटपिट 

सुख देखील करतय बोअर 

सेक्सचा कंटाळा आलाय 


कधीकाळी होता गोडवा 

हृदय म्हणतय आता पुढे व्हा 

सगळं झाले शुअर शुअर 

सेक्सचा कंटाळा आलाय 


शरीर बदलता न्हवते येत 

म्हणून मी तऱ्हा बदलल्या 

राहिले तरी उथळ वरवर 

सेक्सचा कंटाळा आलाय 


बहुदा मोक्ष बोलवतो आहे 

कंटाळा माझ्यात थाटतो आहे 

त्यापार जाईन म्हणतो खोलवर 

सेक्सचा कंटाळा आलाय 


श्रीधर तिळवे नाईक 

( चॅनेल सिरीज मधील चॅनेल dnya लव,लव इन अँड लव आउट या काव्यफायलीतून)

लोकेशन श्रीधर तिळवे नाईक 


लोकेशन मधून निघताना 

काळीज गुंतवू नकोस 

लोकेशन इतकाच मोकळा राहा 

ती त्यांचा पाय गुंतवतात काय ?


त्यांना डोळे नसतात 

त्यामुळे खबर ही नसते 

तू तिथे शूट केलाय त्याची 

ती फक्त असतात 

स्वतःतच 

आणि आपण वावरत असतो 

त्यांच्या अंगा खांद्यावर 

एखाद्या किड्यासारखे 


आपणाला वाटतं 

आपण मालक आहोत 

पण खरा ओनरचा तोरा त्यांच्याकडेच असतो 

मालकी हक्क वगैरे माणसाचा कृत्रिम aura

पाऱ्या इतका चंचल 


लोकेशन मरत नाहीत 

मालक मरतात 

तू तर इथला मालकही नाहीस 

एका दिवसाचा भाडेकरु होतास 

एका दिवसात आटपलास 


इथली झाडे इथले डोंगर 

ही फक्त तुझ्या जवळच्या कॅमेराची सोय होती 

नाहीतर तू तरी कुठे पडला असतास प्रेमात यांच्या ?


लोकेशन आवडलं नाही म्हणून निघून गेला नसतास काय ?


काय आहे 

आपणही तेवढेच व्यवहारी असतो 

आणि या लोकेशन इतके त्रयस्थ 


त्यांच्या दृष्टीने वावरणारी माणसे म्हणजे कदाचित केस 

कदाचित वीग 

किंवा आकस्मिक उगवलेली भूछत्रे 


ती आकाशाकडे पाहतात 

आणि जमिनीत झोपी जातात 


त्यांना माहिती आहे 

जो वर जमीन आहे 

तो वर ती टिकून असणार आहेत 


तेव्हा निघ 

पाय अडकवायला 

ती काही आयुष्याचा पाया नाहीत


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल बॉलीवूड या काव्यफायलीतून)


वाटो कितीही ते मुलायम आहे

आत्महत्या शेवटचे पलायन आहे


तू तिला धाडणार वनवासातच 

शेवटी खिशात तुझ्या रामायण आहे 


कोण ज्यास दुःख नाही झाले आयुष्य 

प्रेमभंग , रोग, मृत्यू , म्हातारपण आहे


त्याचा अमरत्वाचा ध्यास इतका की 

क्षणभंगुर आनंद वाया घालवण्यात त्याचे तज्ञपण आहे 


मिळेल तसा अनुभव कवटाळतो जाणतो 

येणार मिठीत शेवटी शहाणपण आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डे कॅथलॉन: अनकॅटेगरीकल : तंत्र या काव्यफायलीतून)

सदा सर्वकाळ सर्वांना करणे समाधानी

शक्यच नाही होणार होणार तणातणी 


कोणीतरी बोंबलणारच तुझ्या नावाने 

कुठेतरी हरणारच तू एका डावाने 


कितीही कर भक्कम राहणारच भोक 

शरीरावर एखादी चालून येणारच तोफ 


राहणारच कुठे ना कुठे ढासळत बांधकाम 

परिपूर्ण असत नाही कधीही कुठले काम 


जमेल तेवढे कर आणि कर बंद कान 

कोणी म्हणो न म्हणो म्हणत रहा छान 


वावरोत कितीही आजूबाजूला छपरी 

श्वासावर वाजवत राहा आनंदाने बासरी 


कामातून आनंद मिळाला ना ?हाच खरा प्रश्न 

बाकी सारे आवन जावन तात्पुरते जश्न 


आयुष्य पोकळ आहे पोकळच राहणार 

संसार हा वाहता तू ही त्यात वाहणार 


बघ काठाकाठाने फुलतात का मळे 

पाण्यात सोडून दे लोकांचे फालतू चाळे


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन या सिरीजमधील डे कॅथलॉन : अनकॅटेगरीकल :कर्म या काव्यफायलीतून)


मी तुला निर्माण करायला बसलोय 

आणि मला कळत नाही 

तुला कसं निर्माण करायचं ते 


देव निर्माण करणं इतकं सोपं नसतं 


मी तुला थेट भाषेतून निर्माण करू 

की भाषेतून चालत आलेल्या संहितेतून निर्माण करू? 


भाषा नव्हती तेव्हा तू कुठे होतास ?

तुझ्या निर्माणाची संकल्पना कुठे होती ?


मी भाषा शिकलोय 

आणि मी आता भाषा निर्माण करू शकतो 

माझ्या पूर्वजांनी आता इतका तरी भार 

माझ्यावर टाकलेला नाही 


मी विचार करतोय की 

पूर्वजांनी माझी भाषा कशी निर्माण केली असेल ?

त्यांना त्यासाठी किती खटपटी कराव्या लागल्या असतील ?


भाषा तुला निर्माण करणारी माती आहे 

आणि त्या मातीपासून भाषेतून तुला मला निर्माण करायचंय 


झूसपासून ज्युपिटर निर्माण झाला तसे तुला मी निर्माण करू का ?

की नाहीशा झालेल्या इंद्रापासून तुला मी पुन्हा जन्माला घालू ?


देव जन्मतात आणि मरतात 

अमर असतात ते फक्त भक्त 

आणि कदाचित पुरोहित 


भक्त आणि पुरोहित पुन्हा पुन्हा जन्म घेतात 

आणि म्हणूनच देव पुन्हा पुन्हा निर्माण करावे लागतात 


काळानुसार आणि अवकाश बघून 

मला तुला निर्माण करायचंय 


की शिव जसे तत्व होते मग देव झाले तसे एखादे तत्त्व निवडू ?


उदाहरणार्थ उत्क्रांती या तत्त्वापासून देव निर्माण करता येईल का ?

की उत्क्रांती स्त्रीलिंगी असल्यामुळे मी देवता निर्माण करावी उत्क्रांती नावाची ?


विष्णू वेदांच्या मध्ये फक्त काही सूक्ते होता 

मग वाढवत वाढवत मोठा देव झाला 

मीही आरंभ काही सुक्तांच्या पासून करावा का ?

आणि वाढवत नेण्याची जबाबदारी माझ्या वंशजांच्यावर टाकावी ?


किंवा मग एखादे महाकाव्य लिहावे का? 

रामायण आणि महाभारतासारखे ?

आणि मग त्या महाकाव्याचा नायक देव बनवून सादर करावा? लोक त्या काल्पनिक महाकाव्याला 

इतिहास म्हणतील 

याची खात्री मी बाळगावी का ?


मला तुला जन्माला घालायचंय 

आणि मला सुचतच नाहीये 

करावं काय ?

बाईला मुल जन्माला घालताना अशाच प्रश्नकळा होत असतील काय ?

की मूल जन्माला घालता येत नाही म्हणून 

मी देव जन्माला घालतो आहे ?


माझ्या अस्तित्वात न आलेल्या मुला 

मी तुला देव म्हणून कसे जन्माला घालावे?


श्रीधर तिळवे नाईक 

(डे कॅथलॉन या सिरीजमधील डे कॅथलॉन :अन कॅटेगरी कल : भक्ति या काव्यफायलीतून)


भाषा बोंबलत जातात 

शून्य चालत जातात 


निर्माण व्हायचे असते 

शक्ती हलत जातात 


होतात फक्त स्फोट 

आकार उचलत जातात 


संसार उभा राहतो 

ब्रह्मांडे डुलत जातात 


आत एकवटतो प्राण 

ईश्वर झुलत जातात 


वाढत राहतो आकार 

मर्यादा सलत जातात 


मुळाकडे जावेसे वाटते 

नद्या कलत जातात 


साधना तेजस्वी होतात 

सर्वस्व सोलत जातात 


परतणारा परतत जातो 

शून्य उमलत जातात 


श्रीधर तिळवे नाईक 

(डे कॅथलॉन या सिरीजमधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल:तंत्र या काव्यफायलीतून)


माझ्या बाबतीत नेमका तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे 

बैलासारखा सांड म्हणून की मी दुभती गाय आहे 


माझा फायदा घेणे कसे तुम्हाला नेमके जमते 

नेमके कसे कळते मी आता खाण्याजोगी साय आहे 


कसे डावपेच टाकता सृजनशीलता जाणण्यासाठी 

काय चाललय म्हणताना तुमच्यात सैतानी काय आहे 


दरवेळी माहिती काढायची स्वतःच्या नावावर करायची 

ज्याचा पाया घालायला जावे तिथे तुमचा पाय आहे 


कुठे फेडणार आहात तुम्ही तुमची ही पापे 

की तुम्हाला काहीच होणार नाही ही खात्री ठाय आहे 


हिशेब तर इथेच सारे मांडले जाणार आहेत तुमचेही 

कळणार नाही कुठे लागले बांबू कुठे न्याय आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन या सिरीजमधील डेकॅथलॉन:अनकॅटेगरीकल :कर्म या काव्यफायलीतून)


निरागस मुलाचं हसू पाहण्यासाठी 

मी बाळांच्या सामानांच्या जाहिराती पाहतो


उत्तम मेकअप केलेल्या सुंदरी पाहण्यासाठी 

मी जाहिराती पाहतो 


उत्तम दातासाठी 

मी टूथपेस्टच्या जाहिराती पाहतो


उत्तम आरोग्य पाहण्यासाठी 

मी औषधांच्या सेमी औषधांच्या जाहिराती पाहतो


उत्तम पैसे पाहण्यासाठी 

मी इन्व्हेस्टमेंटच्या जाहिराती पाहतो 


मला खात्री आहे 

जे जे उत्तम आहे 

ते ते फक्त जाहिरातीत आहे 


मी मरत नाही 

कारण उत्तम कसे मरावे 

याची जाहिरात अजून आलेली नाही 


ती आली 

की मी जाईनच

जाहिरातीप्रमाणे मरून ऍड स्टाईलड

आणि मग त्यानंतर मी जाहिरात पाहणार नाही 


जाहिराती बाहेर गेलेल्या माणसाचं काय होतं 

मला माहीत नाही


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल वर्डस या काव्यफायलीतून)


चांगल वाटावं म्हणून 

मी टेकवले ओठावर 

माझ्या ओठांचे ओठावले 


पाठवले चुंबनातून चुंबक निर्माण करतील असे चुम्मक

तुझ्या मॅग्नेटिक फिल्डच्या कमळदार अंतरंगात 

बहरात आणले अंगमंच 

अंगसज्जा 

कोंबल्या त्रिज्या त्रिकोणात 

चकरा टाकून पूर्ण केले वर्तुळ 

संपूर्णा नदी वाहती ठेवली 

चांगले वाटावे म्हणून 


चांगले वाटावे म्हणून 

एका डॉगला बांधून ठेवली पाच मिनिटांची लाइफ स्टाईल 

पेटवले smile 

पेशींच्या स्मॉल स्मॉल मॉलमध्ये 

खरेदी केला माल 

फ्री विकला 

चांगले वाटावे म्हणून 


मांड्यांचे सगुण भोपळे खाल्ले चांगले वाटावे म्हणून 

दातांना तुझ्या न दुखवता दंतकथा रचल्या 


चांगले वाटावे म्हणून 

प्यालो पाणी 

आरोग्याची पर्वा न करता 

रचले मेळे 

मूळे फेकत 

फेक झालो 

चांगले वाटावे म्हणून 


आता चांगले वाटल्यानंतर 

पुन्हा उदास बसलोय 

तुझ्या शरीराच्या ओरिजनल झाडाखाली तर 

तू झोपी गेलीयेस तुझ्या मेंदूतल्या अरण्यांत 


आणि मी उदास पाहतोय 

माझा चार्ज न झालेला चार्जर 

स्वतःच्या फेक डोळ्यांनी 

चर्रचर्र 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल लव लव्हर अँड टेरर या काव्यफायलीतून)


प्रवास निरर्थक 

ध्येय निरर्थक 

आणि आता कंपनीही तुझी निरर्थक 


आयुष्य इतक्या सहजरित्या सांडपाण्यात जाईल 

असं कधी वाटलं न्हवतं 


शांतता सुद्धा आवाज करत झोपी जाते आजकाल तुझ्या माझ्यात 


प्रत्येक दिवस गेलेल्या आयुष्याचा दिएंड असतो 

प्रत्येक दिवस उरलेल्या आयुष्याची सुरुवात असतो 


आणि प्रेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत 


तुझे डोळे मला टोपी घालायला लागले आहेत 

तुझ्या ओठावर लिंबू पिळून ठेवल्यासारखी भाषा असते 


माझी लेमोनेड बनवण्याची क्षमता आता संपलेली 


जास्तीचे जेवण आता सणासारखे वाटत नाही 

उलट तू भीक म्हणून ते खायला लावशील असे वाटते 


कम्युनिकेशन ब्रेकअप झालय 


एवढे जगूनही फक्त प्रायव्हसी वाटायला येणार असेल 

तर एकांतातच ठीक होतो की


जे आंधळे नसतात 

ते हत्तीवर बसतात 

बाकीच्यांच्या वाटायला फक्त अवयव 


वाट्याला आलेले वाटे वाटत गेलो 

म्हंटले जे मिळालय

ते संपलेलेच बर 


झोपेची समृद्धी हा माझा स्वभाव आहे 

कदाचित सगळ्याच आळशांच्या तो अंगावर झोपलेला असावा 


कष्ट करायचे नसतात असे नाही 

पण कामाची भीक मागणे जीवावर येते 


तुला श्रीमंत व्हायचंय 

आणि मला काहीच व्हायचं नाही 


दिवस जातायत

सूर्य लीक झालाय म्हणून 


ऊन कोवळे वाटत नाही आता 

गवत वाटतं 


प्रेम त्वचा झालेच नाही 

पोशाख मात्र भेट दिले एकमेकांना 

प्रेमाच्या नावाखाली 


देव शेवटचा दिलासा झालाय 

आणि आपण दोघेही नास्तिक 

त्यामुळे त्याच्याकडेही नाते भिजत ठेवण्यात अर्थ उरलेला नाही 


तुझं तर एक तर स्वतःवर संपूर्ण प्रेम 

किंवा स्वतःचा संपूर्ण द्वेष 


तुझ्या दोन टोकांच्या वर एकाच वेळी उभा राहून 

खूप प्रयत्न केला मी 

सुवर्णमध्य साधण्याचा


झाले काहीच नाही 

माझ्या मर्यादांचे पितळ उघडे पडले 


तू आलेली नाहीस 

आणि मला तू येण्याआधी निघून जायचंय


शक्य असतं तर 

काळीज फ्रिजमध्ये ठेवून निघून गेलो असतो 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीजमधील चॅनेल: ज्ञ: लव, लव इन अँड लव आऊट या काव्यफायलीतून)


ये एहसास दिल का है या जानका 

शायद दोनोंका नही | है बदनकी पहचानका


इश्क ने न्यू कॉलेज निकम्मा कर दिया

वरना मै भी स्टुडंट था कम्प्लीट विज्ञानका


पढाई करू या मै तुझे ही पढ लू?

पता नही क्या हो जाएगा मेरी शानका


पिक्चरकोभी बुरखा पहनके आयेगी क्या?

मै फॅन हू मिथुनका ना फिरोज खान का


ये इश्क का मामला है दो इंसानों के बीच 

तू क्यूँ बना रही है इसे हिंदूका मुसलमानका


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तू म्हणतीयस की झाड आहे तिथे मुळे आहेत 

मी म्हणतोय झाड आणि मुळे दोघेही पृथ्वीवर आहेत आणि पृथ्वीला मुळे नाहीत 

पृथ्वी तरंगते आहे


तू म्हणतेस 

तू फक्त नास्तिक आहेस 

असंच तिरसटासारखं बोलणार 

मी म्हणतोय 

तुझ्या झाडाचं काय झालं ?

कि मुळासकट पसार झालं?


तू आता झाडाविषयी बोलतच नाहीस 

तू आता फक्त तुझ्या धर्मग्रंथांच्याविषयी बोलतीयस


मी म्हणतोय  

तू ज्या धर्मग्रंथांच्या विषयी बोलतीयस 

ते कागदांच्यावर लिहिण्यात आलेत 

आणि कागद झाडांच्या पासून तयार झालेत 

आणि झाड आणि मुळे 

पृथ्वीवर आहेत 

आणि पृथ्वी तरंगती आहे

झाडांच्या पासून तयार झालेले कागद सुद्धा तरंगते आहेत आणि त्या कागदावर लिहिलेले सुद्धा तरंगते आहे


तू म्हणतीयस 

निदान डायरेक्ट संभाषण झाले 

हे तरी तू मान्य करशील की नाही ?


मी म्हणतोय 

संभाषणाला तिसरा माणूस हजर कुठं होता 

मीही म्हणेन 

देव माझ्याशी प्रत्यक्ष बोलला म्हणून 

त्याने काय होते 

संभाषण झालेच असेल तर 

तेही तरंगते आहे 

जिथे झाले तेही तरंगते आहे


तुझ्या डोळ्यात रागाची दोन कासवे 

शर्यत जिंकता न आल्याने 

पाय आत ओढून घेऊन


सखी 

तू तेच बोलतीयस जे तुला शिकवण्यात आले. 

जर काही वेगळे शिकवण्यात आला असत तर 

तू ते शिकवलेलं बोलली असतीस 

काय आहे आपण सगळे संस्काराचे गुलाम आहोत

फक्त शिकवलेले बोलत असतो


आपली स्वप्न आणि आपलं जग 

यांच्यात काहीही फरक राहिलेला नाही 

फक्त स्वप्न स्वप्न आहेत 

हे आपणाला माहित आहे 

आणि आपलं जग आपण स्वप्न नाही असं म्हणतोय म्हणून ते स्वप्न नाही 

उद्या कोणी त्यांना स्वप्न म्हणाले तर काय नेम 

कदाचित ते स्वप्नही असेल त्याच्या दृष्टीने


तेव्हा जे मॅन्युफॅक्चर करायचं आहे 

ते तू मॅन्युफॅक्चर कर 

पण ते तुझेच मॅन्युफॅक्चर आहे हे लक्षात ठेव 

अन्यथा फक्त फॅक्चर फॅक्चर खेळत राहशील 

आणि जखमा हा तुझा मेनू होऊन जाईल


वस्तुस्थिती अशी आहे की जे समोर ठाकते

तेवढेच आयुष्य असते 

बाकी आठवणी आणि त्यांच्या आधारे उभा राहिलेली स्वप्ने 


तेव्हा बघ समोर आहोत

शरीर आहोत 


म्हंटले तर कपडे काढता येतात 

नाहीतर देहावर मिरवता येतात 


काय करतेस 

काढतेस 

की मिरवतेस?


सेक्समध्ये धर्म आणण्याचे स्वातंत्र्य तुला आहे 

नास्तिकाशी सेक्स न करण्याचे स्वातंत्र्य तुला आहे


मी संस्कारांच्या विरुद्ध आहे तुझ्याविरुद्ध नाही 


आता संस्कार वजा केले तर माणसात जनावरच शिल्लक राहतं 

असं तू म्हणू शकतेस 


पण राहते का 

की शून्य उरते? 


शक्य आहे की 

आपण सर्व शून्याने तरंगत ठेवलेली 

शून्याची स्वप्ने आहोत


श्रीधर तिळवे नाईक

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल लव टेरर अँड टेररिझम काव्यफायलीतून)


अश्रफ घनी श्रीधर तिळवे नाईक 


तो रणछोडदास ठरलाय 

सगळ्यांना वाटत होतं कि त्यानं तालिबानकडून मारलं जाण्याची प्रतीक्षा करायला हवी 

पळालापेक्षा मेला तोही कट्टरतेकडून हे अधिक ब्रेकिंग ठरलं असतं 


तो जो सकाळी उठून पाच वाजता 

आठपर्यंत वाचन करायचा 

आपला देश मॅनेज करू शकलेला नाही 


वाचणारी माणसं देश मॅनेज करू शकत नाहीत काय 

कि वाचन तलवारीपुढं लोटांगण घालतं ?


किमान ३ सेंटीमीटर फाईली गठ्ठ्यातून सोडवणं 

एका पुस्तकाला मात देऊ शकत नाही काय ?


त्याने निवडलेले होतकरू राजकारणी 

आता सोयीस्कर तालिबानवादी होतील काय ?


तालिबानवादी म्हणजे काय ?


एखादा समूह ईश्वराचा किंवा एका पुस्तकाचा विध्यार्थी बनून राहतो 

ह्यात सिलॅबस देणाऱ्याची चूक नाही काय ?


कि ह्याला निष्ठा म्हणून शरण जावं ?


त्याने निवडलेले इंजिनियर आता नवं काबूल बांधणार नाहीत 

हे तर उघडच आहे 

आता फक्त इंजिनियरिंग साईडलाईन करणे बघावे लागणार आहे काय ?


काबूलला येणारा बॉम्बचा वास आता द्विगुणित होईल काय ?


समाजवादाकडून भांडवलवादाकडे जाणारे पूर्व युरोपीय 

आता त्याच्या डोळ्यात मरून पडले असतील काय ?

कि चायनीज डोळ्यांचा कार्पोरेट सोशॅलिज्म 

धार्मिक दरवाज्यातून त्याचे दोन्ही डोळे गिळेल ?


हजार वर्षाच्या प्रबोधनाला हजेरी लावून  

क्लासरूम हस्तगत करू पाहणारे हात 

आता पळून गेल्याने डेड म्हणून डिक्लेअर करावेत काय 

कि अख्ख्या प्रबोधनाने धर्मापुढं त्यागपत्र दिलंय असं समजावं ?


त्याच्या रक्तात वाहणाऱ्या अफगाणी नद्या आता काय करतील 

कि त्याही त्याच्या हृदयापर्यंत पोहचायला नकार देतील 

आणि त्याला हार्ट अटॅक येईल ?


त्याच्या डेस्कवरची उघडी पडलेली पुस्तकं तालिबानी वाचतील काय ?

कि एक पुस्तक लय भारी 

त्याच्या बाहेर कायी नाही म्हणून 

ती टेबलावरून कब्रस्थानात हलवली जातील ?


कब्रस्थानात पुस्तकांना जागा असेल काय ?


श्रीधर तिळवे नाईक


(मोक्ष सिरीज मधील मोक्ष :स्पंद या काव्य पाहिलीतून)

माणसे धर्माकडे का परततायत 

ईश्वर मेला मग काय पाहतायत ?


घरातल्या देव्हाऱ्यावर समाधान नाही 

मंदिराच्या देवाऱ्यात काय शोधतायत ?


घरातला वेगळा मंदिरातला वेगळा 

देवा देवा मध्ये फरक का करतायत ?


ही हतबलता कशातून येते 

जगण्याचे ओझे देवात पेलतायत ?


असल्या भक्तीतून निराशाच मिळणार

हा शॉर्टकट आहे पुन्हा पुन्हा आजमावतायत 


लोकांचे काहीच करता येत नाही 

आणि लोक आहेत की पाठलाग करतायत


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल: भक्ती या काव्यफायलीतून)


लाटा निर्माण करून मी निवांत आहे 

सर्वच क्षणांच्यात मी प्रगाढ नि शांत आहे 


जे वादळ येते ते फक्त अंगावरून जाते 

अंगामध्ये माझ्या मी रम्य निवांत आहे 


तुम्ही पाठवा जहाजे मी आरामात पेलेन 

हेलकावे देतानाही स्वाभाविक शांत आहे 


आकाशाला देता श्रेय पण मी पाठवतो ढग 

पावसाळा तुम्हाला पाठवून मी निवांत आहे 


माझ्याच पोटामधून जीवन उगम पावते 

तुमचे सारे अस्त पचवून मी शांत आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

उंच उडी मारताना 

पार्श्वभाग 

किमान दोन इंच अधिक उचलावा लागतो 

तर पाय पार होतात 


ब्रह्मचर्य म्हणजे कामवासना 

दोन इंच अधिक उचलणे 


तुला होणारा त्रास मी समजू शकतो 

पण मला आता मोक्षाखेरीज काहीच दिसत नाही 


मी तुला आयुष्यातून मिस्टर इंडिया हो म्हणत नाही 


मी फक्त यापुढे शारीरिक संबंध अशक्य आहेत एवढेच म्हणतोय


स्त्री पुरुष संबंध 

फक्त कामवासनेपर्यंतच गेले पाहिजेत असं कुठंय ?


मी आधी झालेल्या सेक्सचा राजीनामा देऊ शकत नाही 

कारण तो देता येत नाही 


परंतु तुझ्या शरीरात काम करणे मी रीझाईन केलेले आहे


माझ्या कामवासनेचा राजीनामा तू स्वीकारावा 

अशीही माझी अपेक्षा नाही 

ये

हव्या तेवढ्या शिव्या दे 

फसवणुकीचे आरोप कर 

मी षंढ आहे असे जगाला ओरडून सांग 

पण मी हे सर्व कशासाठी करतो आहे 

हे निदान तू तरी समजून घे 


मलाही वाटत होतेच 

काम शाबूत ठेवून मोक्ष मिळवता येईल 

मी तसे प्रयत्न केले 

पण ते फळलेले दिसत नाहीत


आता मला कामवासना टाळून मोक्षाकडे जाता येते का 

हे आजमावयाचे आहे 

तू म्हणशील 

मग एवढी वर्षे काय फालतूमध्ये घाम गाळत होतास काय ?

हो मोक्ष मिळवला तर मी हेही म्हणेन की मी कामवासनेत २८वर्षे वाया घालवली 

पण आयुष्य वाया घालवण्यापेक्षा हा पर्याय चांगला नाही का ?


मी फार गुंतागुंतीच बोलत नाहीये 

मी थेट बोलतोय हे लक्षात घे 


शक्य आहे की हा ही प्रयत्न वाया जाईल 

पण मला प्रयत्न तर करू दे 


तरीही कायमचाच राजीनामा स्वीकारायचा असेल तर 

मी तो ठेवलाच आहे 


शेवटी मोक्ष मिळवू इच्छिणाऱ्या माणसाला बरेच काही रीझाईन करावे लागते 

शक्य आहे मोक्षाची ही किंमत असेल 


मुली ,

प्रेमासाठी एकत्र आलो होतो 

आणि कामामुळे वेगळे होतो आहे 

हा शेवट मला खटकतोय 

त्यापेक्षा अनुमती दे ना 


बाकी माझ्यावर रुष्ट झालेल्या लोकांचा ट्रॅफिक 

माझ्या आसपास नेहमीच असतो 


त्याच ट्रॅफिकमध्ये तुला तुझीही गाडी घालायची असेल तर 

ते स्वातंत्र्य तुला आहे 

मात्र एक लक्षात ठेव 

प्रत्येक रस्त्यावर यू टर्न असतोच 

तुला घ्यावासा वाटला तर थेट पार्क हो 

शेवटी मोक्षामध्ये 

सर्वांच्यासाठीच पार्किंगची जागा खुली असते 

तीही विदाऊट तिकीट 


तो एकच अवकाश असा आहे 

जिथे माणसाला मालकी हक्क मिळालेला नाही


ये 

मालकी हक्क नसलेल्या कामगार वस्तीत


श्रीधर तिळवे नाईक


(निर्वाण सिरीजमधील निर्वाणापूर्वीच्या कविता या काव्यफायलीतून)


मै और मेरी तनहाई 

आती जाती कामवाली बाई 


बर्तन धोनेकी हलकीसी आवाज

सफेदीके नाम पे थोडी धुलाई 


झाडू तो लगाती है जमी पे 

मिटती नही मगर मेरी परछाई 


पोछा इधर उधर घुमता हुआ 

भीगी हुई आईने की अंगडाई 


थँक्यू बोलनेसे होती है खुश 

मुझेभी लगता है एक कली मुस्काई 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल : ज्ञ: लव, लव इन अँड लव आऊट या काव्यफायलीतून)

दुसरा हमेशा और होता हैं

इसिलिये उसपे गौर होता हैं


करवट बदले तो होता है शोर 

नजर आती है तो गौर होता है 


वो सामने फिरभी दिल तन्हा 

मोहब्बतमे ये भी दौर होता हैं 


वादे तो करता हैं जीवनभरके 

उसकी आँखोमें कुछ और होता हैं 


मोहब्बतका रास्ता अलग यहाँ 

मिलका पत्थरभी और होता है


मेरा छोर छोड के नही जाता 

अपना घर उसे बौर होता हैं 


आते रहते है लोगों के ताने 

लोगोंसे क्या काम और होता है


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


विंदा करंदीकर यांच्यासाठी


प्रत्येक घोडा बारा टक्के 

कोणीच नाही शंभर टक्के 

एका डोक्यात दहा मते 

निवडून देऊ सर्वत्र भूते 

घालून लाथ मारू बुक्के 

प्रत्येक घोडा बारा टक्के 


मवाळांचे चालत नाही 

सारे झाले आता जहाल 

जनता फक्त स्वतःचे बघते 

जो तो बघतोय स्वतःचा माल 


कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ 

भाड्याचेच सगळे तट्टू 

कोणी कच्चे कोणी पक्के 

सगळे झाले आता फट्टू 

एकमेकास देत मुक्के 

प्रत्येक घोडा बारा टक्के 


बारावाला टाकतो प्रेशर 

म्हणे माझा टाक शेअर 

नाहीतर तुला देइन धक्के 

प्रत्येक घोडा बारा टक्के 


डोक्यावरती असो छप्पर

घरामध्ये येवो टीव्ही 

उडवण्यापुरता मिळो पैसा 

शृंगारापुरती एक बीवी 


भिंतीला चढो नवा रंग 

जेव्हा उडून जातील टवके 

प्रत्येक घोडा बारा टक्के 


घोड्यामध्ये भरू धर्म 

घोड्यामध्ये टाकू जाती 

रोज नव्याने करू साजरी 

माझी माणसे माझी माती 


तीन चौके वा दोन छक्के 

आमचा घोडा बारा टक्के 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


अब तक नही समझे मोहब्बत कैसी है 

इतनी चर्चा क्यूँ है ये बगावत कैसी है 


इस कदर बिझी है की मिलते भी नही हमे 

और फोन पे पुछते है शिकायत कैसी हैं 


हमे हाल से बेहाल कर दिया उन्होने 

और कशिशसे पूछ रहे हैं तबीयत कैसी हैं 


हर मोटिवेशन के बाद ढूंढते है नया खुदा 

मै भी पुछता हूँ नई नई इबादत कैसी है 


खुदके खुदा के नही हुए मेरे खुदा के क्या होंगे 

उन्हे मत पूछो सवाल उनकी रियासत कैसी है 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधल्या डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल: भक्ती या काव्यफायलीतून)


ग्रेस गेले त्या रात्री श्रीधर तिळवे नाईक 


पोपट पांढरे पडलेत 

त्यांच्यावर हिमालय कोसळलेत

बर्फमोहिनीची तुझी विद्या परागंदा

उरलेली थंडी स्वेटरवर भागवता येईल

म्हटलं तर कविता लिहिणं खूप सोपं 

म्हटलं तर कठीण 

तू दगडातून फुलं उमलवलीस 

वेली गगनावर चढण्याआधीच ठार 

मी कित्येकदा तुला फरार कवी घोषित केलेलं आहे 

तू ऋचांचे कासवावतार निवडलेस 

डुकरांच्या चिखलापासून उमलणारी कमळे 

तू दूर ठेवलीस 

त्यातली अहंकाराची मिजास 

मी तिच्या मिशा पाहिलेत खूपदा 

भ्रमांचा आरसेमहाल खोट्या राण्या मिळवतो 

ब्रह्मसाधकाला ब्रह्मचर्य पाळावे लागते


वृत्तांना पोरखेळ करून तू त्यांना मुग्धतेला टांगलस 

अंगांच्या तरंगढंगांना शब्दांचे ढग पाजलेस 

वासनांची वसने होतात वस्त्या नाहीत 

गैरसमज थुंकीसारखा गिळता येतो 

काव्याच्या भातुकलीत भावल्या फक्त तात्पुरत्या असतात 

ओसाडीचे सांड चालत आले 

तेव्हा तू गाईला पुढे केलेस 

तळटीपेतली दुःखे मुखपृष्ठावर न्हेलीस 

आणि आता तू गेल्यावर 

ही वाळवंटे माझ्याकडे पाणी मागतायत 


मी ना राजपुत्र आहे ना डार्लिंग 

असलोच तर नाराजपुत्र आहे 

आणि शिवलिंग 

मला सांध्यपर्वातील वैष्णवी शैव कशा करायच्या ते ठाऊक आहे

माझे हत्ती ढगात जात नाहीत 

ते जमिनीला सर करतात 


आणि दिवसाचं म्हणशील 

तर मला केवळ संध्याकाळ दिसत नाही 

सकाळी उगवणे आणि संध्याकाळी मावळणे मला जमते 


तू साधनेत उतरला असतास 

तर कदाचित तुझा पाठीचा कणा सोन्याचा झाला असता 



तुझ्या असण्याचे सुख नव्हते 

तुझ्या नसण्याचेही दुःख नसेल 

पण तू कवितेला भरजरी केलीस हे कोण नाकारेल ?


आयुष्य म्हणजे केवळ मोक्ष नसतो 

त्यात धर्मांतराच्या प्रार्थनाही असतात 


देव बदलणाऱ्या देशात जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या नशिबी 

दुःख असते 


आत वाकून पाहणाऱ्याला तळाबरोबरच तळे दिसते 


तू पाण्याची एक ओंजळ उचललीस 

आणि भाषेत हातासकट ठेवून दिलीस 


मी तू गेल्यानंतरची प्रार्थना लिहित नाहीये 


फक्त तू गेल्यानंतरच्या थेंबाला 

भाषेत ओततोय 


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण या सिरीज मधील निर्वाणापूर्वीच्या कविता या काव्यफायलीतून)


प्रत्येकाच्या आत मध्ये एक झाड 

ज्याला मुळे नाहीत


वाघ सिंहांना अंगावर खेळू देण्याइतपत दयाळू 

फुलपाखरांचे रंग खूडून घेण्याइतपत हिंस्र 


तुम्ही त्याचं काहीच करू शकत नाही 

कारण त्याला द्यायला 

तुमच्याजवळ मुळेच नाहीत 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


माणसे शरीरकेंद्री असतात 

ती देवालाही शरीर देऊन टाकतात 


त्यांना कळतही नाही 

ती केव्हा त्यांनी निर्माण केलेल्या देवाच्या शरीराची सावली बनतात 


धर्म म्हणजे अशा दैवी सावल्यांची भुतावळ 


मोक्ष मिळवायचा असेल 

तर प्रथम या भुतावळीतून मुक्त हो


मग शरीरातून 


मग देवाच्या शरीरातून 


मग देवातून 


मोक्ष अंतिमतः देवापासून मिळवलेली मुक्ती असते 


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरीज मधील निर्वाणानंतरच्या कविता या काव्यफायलीतून)


मी नाही ज्ञानेश्वर तुकाराम 

माझ्या मोक्षाचे अद्ययावत धाम 


माझ्यात नको शोधू तुझा विठ्ठल 

पृथ्वीपुरता त्याचा ध्यास अट्टल


हे सगळे आहे अफाट अनंत 

धर्मात बसत नाही यांचा सीमांत 


सोड सगळे धर्म सोड सर्व पंथ 

स्वतःपासून सुरू कर साधनेचा आसमंत 


आधी कर स्वतःच्या ईश्वराचे विसर्जन 

मगच सुरू होईल मोक्षाचे सर्जन 


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरीज मधील निर्वाणानंतरच्या कविता या काव्यफायलीतून)

गोष्टी 

आकाशगंगा उडतायेत 

त्या कुठे अडतायेत


सर्व गोष्टीं गतिमान 

त्याही ज्या पडतायेत 


स्व कळत नाहीत त्या 

स्वतःतच तडतडतायेत


काहीही उरत नाही 

एकमेकाला खोडतायत


अदमास घेतायत किंवा 

एकमेकाला ताडतायेत 


अज्ञात कुठून निघाल्या 

कुठे जाऊन बुडतायेत


तू शून्य होऊन जा 

सर्व शून्याला भिडतायेत


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरीजमधील निर्वाणानंतरच्या कविता या काव्यफायलीतून)


माझ्या गर्जना आवळल्या गेलेत 

मी ओरडलो की किंकाळी निघते


आता मी सर्वदूर व्हावे म्हणून 

गाढव व्हावे का ?


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


प्रत्येकाच्या आत मध्ये एक झाड 

ज्याला मुळे नाहीत


वाघ सिंहांना अंगावर खेळू देण्याइतपत दयाळू 

फुलपाखरांचे रंग खूडून घेण्याइतपत हिंस्र 


तुम्ही त्याचं काहीच करू शकत नाही 

कारण त्याला द्यायला 

तुमच्याजवळ मुळेच नाहीत 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


ब्राह्मणांनो ,

तुम्ही पंचांग तयार केली म्हणून 

ऋतू थोडेच तुमच्या तालावर नाचणार आहेत?


ते समग्र ब्रम्हांडाचा ताल वाजवतच येणार 

त्यांचा जन्म तुमचा तबला वाजवण्यासाठी नाही 


त्यांना अरण्य निर्माण करायचंय आणि ऊनही 

त्यांना पाऊस पाडायचा आहे 

आणि वाळवंटही 


तेव्हा कितीही शिव्या घाल्या 

एकटा आहे याचा अर्थ खोटा आहे असा नाही 

आणि तुम्ही करोडो आहात म्हणून तुम्ही खरे आहात असाही नाही 


सत्याला पुरावे लागतात 

आणि ऋतू सत्याला फॉलो करतात 


तेव्हा पंचांगांच्या नावाने वाजवत बसा 

तुमच्या आऊट डेटेड झालेल्या तारखा 


मी माझ्या तिथ्या फॉलो करत 

चंद्र सूर्य यांच्या

प्रकाशात जाऊन झोपेन म्हणतो 


जाग आली की उठवा 

शैव असलो तरी 

कुंभकर्णाला फॉलो करणारा नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल: ज्ञान या काव्यफायलीतून)



मी सहा दिशेने वाहत गेलो तोडत सिमेट्री 

संगमावर उभी ती झाली नाहीशी जॉमेट्री 


ना चुंबन ना चुंबक होता फक्त एक स्पिन 

चादर होती तरी नव्हती दिसत मजला वीण 


इंद्रियांचे तळ नाहीसे तळवाही नाहीसा 

अरण्य नाही वाघही नाही ना कुठे ससा 


स्मृती उडाली उरले ठसे जगण्यापुरता मेंदू 

साधू सुद्धा उडून गेले उडून गेले भोंदू 


कदाचित आहे ही फक्त शून्याची सुरुवात 

माहित नाही अंत काय ?काय काय आहे आत 


(डे कॅथलॉन सिरीजमधल्या डेकॅथलॉन:अनकॅटेगरीकल: तंत्र या काव्यफायलीतून)

तुझे जवळ असणे सत्य असो वा भास 

सरपटणारा असेल पण पुरेसा सहवास 


किती किती तुझ्या निघाव्यात आठवणी 

फुलपाखरासारखे उडून गेले तास 


गर्दीत असून मी गर्दी पासून निराळा

उमलण्यास माझ्या नाही गर्दीचा वास 


ती सांगत राहते तिच्या धर्म मर्यादा 

आरंभ आनंदी देह निघताना उदास 


सगळे विसर्जित करतो तरी समाज उरतो 

जसे शेवटी उरतात झुरळ नि डास 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


चांगल्या माणसांचे श्रीधर तिळवे नाईक 

कुठेच काही चालत नाही चांगल्या माणसांचे 

डोकेसुद्धा डोकावत नाही चांगल्या माणसांचे 


समोर थोडी इज्जत आणि पाठीमागे टवाळकी 

बोलणे मॅटर करत नाही चांगल्या माणसांचे 


दुरून ती जरी दिसतात एखाद्या अरण्यासारखी

पान सुद्धा हलत नाही चांगल्या माणसांचे 


या देशाचे कपडे फक्त मिरवतात अध्यात्मिकता 

देहपण आत आढळत नाही चांगल्या माणसांचे


तथाकथित चांगली माणसे देश सोडून चालली 

चांगुलपण इथे का थांबत नाही चांगल्या माणसांचे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

अजूनही कुठे गेलो तरी का स्ट्रगलरसारखं वाटतं 

बोलणं काही झालं तरी ते पॉवरसारखं वाटतं 


माणसासारखे वागत आहेत पाळलेले प्राणी सुद्धा

तरी का माझ्या आत लपलय जनावर सारखं वाटतं


बाळग सह्याद्रीसारखा आत्मविश्वास काळजामध्ये 

हिमालय का आहेस जे मुवर अँड शेकरसारखं वाटतं ?


घोडे येतात आणि जातात जगायचं तर हत्ती सारखं 

कोल्हापुरात राहूनसुद्धा तुला का दादरसारखं वाटतं ?


ती जे जे घालून येते त्याचा बनतो मोर पिसारा

वरती माझा बनतो ढग खाली शॉवरसारखं वाटतं


श्रीधर तिळवे नाईक 

(नेट सिरीज मधील नेट बॉलीवूड या काव्य फायलीतून )

कुठलीही आई 

मोक्षासाठी मुलांना तयार करत नाही 

कारण शेवटी ती तिच्या कामातून जन्मलेली असतात 


पण तुझ्या बापाच्या भविष्यकथनाने 

माझ्या बाबतीत घातलेला घोळ 

आणि माझ्या नावाने होणारी चमत्कारिक आध्यात्मिक आंघोळ 


असं नाही की तू मला मोकाट सोडलं 

पण असं ही नाही की तू मला बांधून ठेवलं 


जगाच्या पाठीवर पोट लिहिलेलं असतं 

जो पोट फाट्यावर मारायला शिकला 

तो संन्यासी 


मी कधीच भगवी वस्त्रे घातली नाहीत 

संन्यास दाखवण्यासाठी 

रंगाने अंग बदलले असते 

तर लोकांनी कपडेच घातले नसते 


आता तू नाहीयेस 

पण तुझ्या आठवणींचा वावर 

या घरात वावरतोय 


गणपती घरात बसवला गेलाय 

आणि मला माहित आहे 

माझं शेवटचं विसर्जन 

तुझा देह होता 


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष या सिरीजमधील मोक्ष: स्पंद या काव्यफायलीतून)

लोगों को झूठ के आधार पर जिंदा रखना 

पर काटके आसमानमें परिंदा रखना 


कहाँसे सिखा तूने ये गजब का हुनर 

24 घंटे पब्लिक को शर्मिंदा रखना


दवा के नाम पे पिलाना जहर 

और उसके बाद भी मरीज को जिंदा रखना 


तुम्हे डान्स नही आता फिर भी तुम्हारा

हर कोरिओग्राफी मे खुद को परिंदा रखना


गली गली मे गुंजता है धर्म का नाम 

तुम्हारा हर नाके पे खुदा जैसा बंदा रखना 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधल्या डेकॅथलॉन वर्ड्स या काव्यफायलीतून)

नश्वर श्रीधर तिळवे नाईक 


शेवटी सर्व गोष्टी पैशापाशी थांबतात 

विनाशी असतात आणि उपाशी थांबतात 


तसा दिवसभर मी पैशामागे धावतो 

पावले मात्र रात्री तिच्यापाशी थांबतात 


ती माझ्या आयुष्याचा असा तुकडा की 

समग्र असलेल्या गोष्टी त्या तुकड्यापाशी थांबतात 


सर्व काही मी हसत हसत करतो 

अश्रू मात्र तिच्या ओठापाशी थांबतात 


जे देवापाशी ते कचऱ्यात जाणार आहे 

तरी सारे भक्त फूलहारापाशी थांबतात


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

न्यूज गेली मेली प्रचार चालू आहे 

सत्याच्या नावाखाली बाजार चालू आहे 

हा मीडिया आहे की आहे भाडीया

मालक चालू की पत्रकार चालू आहे 


चढतो आहे की उतरतो आहे पायऱ्या 

संपल्यात की सुरू करतो आहे पायऱ्या 

की सर्वत्रच केवळ पायऱ्याच पायऱ्या 

अन आकाशही बनून उतरते पायऱ्या 


सारे जग कसे आता उलटे टांगले आहे

शोधतो जो तो त्यात काय चांगले आहे 

काय चालले आहे काहीं केल्या कळेना 

हाताने हातांपासून काय राखले आहे


आपण त्वचेपुरते स्वतःस लिमिटेड ठेवू 

बाहेर जे जे आहे त्यास अफवा समजू 

शरीरापुरता मांडू आयुष्याचा खेळ 

आपल्यापुरतेच जग इतके आता उमजू 


कदाचित हीच एक नवीन सुरुवात ठरेल 

हाच एक कदाचित उचित तोडगा ठरेल 

बाकी जे बाहेर ते समोर आल्यावर भिडू 

खेळवू त्वचेवर तेच मैदान आता ठरेल 


पायऱ्यांच्यापासून पायऱ्यांकडे यात्रा 

हे शरीर आहे केवळ अवयवांची जत्रा 

काळजासाठी आता काळजी नि खतरा 

मेंदू म्हणजे अख्ख्या ब्रह्मांडाचा कुत्रा


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष सिरीज मधील मोक्ष आफ्टर इफेक्ट या काव्यफायलीतून)


एक पिढी अशीही येईल 

जी माझ्या कवितांचे फ्रेश वाचन करेल


तिला माझ्या कवितेत सापडतील काही न्यूट्रॉन तारे 

काही प्रोटीन्स 

काही फॅट चांदण्या 

आणि काही ओठ 

ज्यांच्यातून काही सूर्य सांगतील काही चंद्रकथा 

जो कदाचित त्यांना चांदोबा सारखा वाटेल 


त्यांना आश्चर्य वाटेल 

या माणसाबद्दल समकालीन लोकांचे इतके मौन कसे ?

याच्या कवितेत आशयांचे इतके टन कसे?

चुंबक कसे चुंबन कसे ?

हलक्या गोष्टींनाही वजन कसे ?


त्यांना कदाचित सापडणार नाही 

हार्ड पॉलिटिक्सचे हाडहुड मूड हार्डवे हार्डवेअर 

सॉफ्ट सोश्यालॉजीचे सोसो शो 


कदाचित माझ्या कवितेशी चेस खेळण्यात त्यांचाही वेळ जाईल वाया 

कदाचित अर्थ कॅशलिंग करतील 

शिवलिंग शोधता शोधता 

शब्द कधी छत्रपती होऊन तर कधी भूछत्र होऊन उगवतील 

त्यांनीच तयार केलेल्या एखाद्या अद्ययावत छत्री खाली 

लुप्त होऊन गेलेली एक नवता सांगत 

गोव्यातले एखादे शेत भांगलत 


रॅपिड हाय क्वालिटीची ash 

कदाचित ट्रे घेऊन येईल त्यांच्याकडे 

आणि म्हणेल कवितेत त्याचे प्रेत शोधू नका 

मोक्ष शोधणाऱ्या माणसाला प्रेताचा लाभ होत नाही 


त्यांना कदाचित माझ्या कवितेत सापडेल एक सांड 

एक जहाज 

आणि एक रावणासारखेच काळाने कवितेतून सोडलेले विमान 

जे पुष्पक आहे की फायटर आहे 

हे उडतानाही कळाले नाही 


प्रवासाच्या नोंदी दिसतील काही रिकाम्या जागात 

पॅचवर्क आणि प्रोग्रेस यांचे ग्राफही आढळतील एखाद्या ग्राहक झालेल्या पंचायतीत 

आणि ग्रहण न झालेले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण 

घेऊन उभे असलेले कॅलेंडर 


त्यांना आढळणार नाही सरेंडर झालेला मी 

ते विचारतील ही 

कॉमन माणसांच्या युगात हा माणूस स्वतःला हिरो समजत होता काय ?


कदाचित त्यांनाही ठरवता येणार नाही माझे युग 

आणि कदाचित त्याही काळात 

ते मला ढकलून देतील 

अज्ञात लेखकांच्या यादीत 


मी तेव्हाही मरेन 

आणि वाट पाहिन 

त्या युगाची 

जिथे पुन्हा एकदा मला कोणी फ्रेश कवी म्हणून वाचेल 


श्रीधर तिळवे नाईक 

(नेट सिरीज मधील नेट : वर्ड्स या काव्यफायलीतून)


मला वाटले वाद संपला 

मग कळाले संवाद संपला 


संपतांना फक्त एकच फिलिंग 

डाव शेवटी सर्वबाद संपला


शव जरी आढळले नाही 

तिचा लागलेला नाद संपला 


तिला पाहताच शरीर उमलते 

हृदया भवतालचा प्रवाद संपला 


समाधानी फक्त आई-वडील 

म्हणाले बरे झाले उन्माद संपला 


समस्त मुस्लिम खुश म्हणाले

राजाने मांडलेला उच्छाद संपला


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

ग्रेस यांची माफी मागून

अभिनेत्री गेली तेव्हा श्रीधर तिळवे नाईक 


ती गेली तेव्हा झूम झूम 

मीडिया कोसळत होता 

तिच्या प्रेताभोवती 

पत्रकार सळसळत होता 


ती प्रसिद्ध होती म्हणून 

न्यूजव्याकुळ होऊन रडले 

काही असेच रडले काही 

काम आडले म्हणून रडले 


अंगणात गमले कोणास 

संपले करियर त्याचे 

मुद्रित आधीच गेले होते

आता गेले वाचे 


संध्याकाळ आयुष्याची 

येऊन ठेपली होती 

शेवटी ही कळले नाही 

कोण कुठे झोपली होती 


कोण द्रौपदी होती 

आणि होता कोण कृष्ण 

दंतकथांच्या पसाऱ्यात 

आता व्हायचे उष्ण 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मी दक्षिणवादी आहे 

आणि माझी दक्षिण हिमालयापासून सुरू होते 


माझी राजधानी सह्याद्री आहे 

आणि माझी छाती विंध्य 


माझ्या डोक्यातून गंगाच वाहते 

जी शिवाच्या डोक्यातून उगम पावली होती 


तुम्ही माझ्या भूप्रदेशात आश्रयाला आलात 

आणि मालक झालात 


मला विंध्य पर्वता पलीकडे पाठवत 

किंवा थेट आरण्यात धाडत  

स्वतःला आर्यावर्त करत राहिलात 


असं समजू नका की जागा नाही 

बस अजून जागृत करण्यात कमी पडतोय 


ओळख विसरून गेलेल्या लोकांना 

ओळख सांगतोय 


मी जाणतो 

मी तुमच्या दृष्टीने गुन्हेगार आहे 

त्या गुन्ह्यासाठी 

ज्यात केवळ मुलीचा 

आंतरजातीय विवाह करून दिला म्हणून 

माझ्या आजोबाला वाळीत टाकले 

त्याचाच शैव नातू आहे मी 


कितीही नाक्यावर मला बहिष्कृत ठेवा 

कितीही गल्ल्यातून मला हद्दपार करा 

मी नष्ट होणाऱ्याच्यातला नाही 


मी शंकरशिष्य आहे 

शंकेखोर आहे 

शंकांना उत्तेजन देणारा आहे 


मी संकर आहे 

संकरखोर आहे 

संकराला उत्तेजन देणारा आहे 


मी या राष्ट्राचा विवेक आहे 


मी डावेउजवे करत नाही 

मी दोन्ही हातांनी ऍक्टिव्हेट होतो 

समतेच्या गणांना 

आणि ज्ञान केंद्री गण प्रमुखांना 

जन्म देतो 


प्रेयसीला शिष्य करतो 

मोक्षाची वाट दाखवतो 


मला बाप मानणाऱ्या मुलाला योद्धा बनवतो 

आणि युद्ध तंत्रा सकट मोक्षतंत्रही शिकवतो 


तेव्हा सावध 

माझी पारध करायला जाल 

तर सारे बाण 

माझ्या अंगाला लागून 

तुमच्याच अंगात शिरतील


तेव्हा मी जसा आहे तसा स्वीकारा 

तुमचे शिवकल्याण होईल 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधल्या डेकॅथलॉन:अनकॅटेगरीकल:भक्ती या काव्यफायलीतून)

चितेत न जळता मरणे रोजचे 

स्वतःचेच प्रेत आवरणे रोजचे


ती क्लिष्ट लिपी की मी अडाणी 

वाचण्यास तिच्यात उतरणे रोजचे 


हिशेब नाही किती ठेचा लागल्या 

काळीज नि जखमा भरणे रोजचे 


येऊच देत नाही दारात पुरांना

नदी- पाण्यास शाकारणे रोजचे 


माझ्याच गल्ली पती सापडावा?

शेजारी राहून समांतरणे रोजचे


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


देख रहा हू मगर पता नही क्या कह रहे हैं 

युद्धके अरबी घोडे शादी में नाच रहे है


उसने कहा था पहलेही शादी नही कर सकुंगी 

फिर उसकेभी आखों से आँसू क्यूँ बह रहे है 


दिन मे चांद नजर आया अब रातमें बारात 

किस बात से मेरे जजबात डर रहे है 


शायद इस रात के बाद सब कुछ भूल जाऊंगा 

यही एक तसल्ली है बाकी सब टूट रहे है


मजहब मसला था खतम किया नतीजे पे पहुंचे 

अब लोग क्यूँ हमारे नाम से झगड रहे है 


एक मौत थी जो दिल को छुकर गुजरी 

एक जिंदगी है जिसकी तलाश मे हम करवट बदल रहे हैं 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)



गझल अक्षर गणवृत्त श्रीधर तिळवे नाईक 

वजनी मनात काही फुलते हलके होते 

टिपताच ओठ ओठी जगणे हलके होते 


बुरखा सुगंध आहे म्हणते हलते 

गाते 

तन झाकते तरीही उघडे हलके होते 


जलवा सदोष आहे जलसा म्हणुनी होतो 

दिसताच खोट खोटी बघणे हलके होते 


हरवून काळजाला तिजला पिसतो आहे 

जगणेच खेळणे हे बनते हलके होते 


मरणे उरात आहे जगणे तरते आहे 

शरिरात तीर आहे उडणे हलके होते 


श्रीधर तिळवे नाईक

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

हर किसी के अंदर अब सेक्स जागा हुआ है 

एक्सेप्ट करलो ये चुपचाप दुनिया नई दुनिया है 


स्टाईल जो कभी जगत मे दवा हुआ करती थी

अब वो बिमारी हैं जिसे सबने गले लगाया है 


हर कोई सेट पे ऑन है या स्ट्रगल कर रहा हैं 

या ऑडिशन ले रहा है या ऑडिशन दे रहा है 


हॉरर को भी जॉनर बनाया हॉरर आदत हो गयी

इतना फिल्मी बनाया की किसी को फिल नही हो रहा है 


कोई जी रहा है या कोई मर रहा है क्या लेना 

या खुदका करियर बना या तरफ कदम उठाया है


ये अब ऐसा ही है और ये अब ऐसा ही रहेगा 

पहलेही ऐसा हुआ था या अभी ऐसा हुआ है ?


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीजकी चॅनेल बॉलीवूड काव्यफाईल से)

ओव्हरटेक कसा करू मी मला स्वतःला 

जो करतो ड्राईव्ह फास्ट तो आहे आतला 


घडणे हे अटळ आहे कधी ना कधीतरी

जीने हृदय घेतले तिनेच अटॅक घातला


ते होते माझे भय की तो होता माझा लोभ

नसलेला ईश्वर कसा आत इतका मातला?


अजूनही स्वतःला मी करू शकतो मदत रे 

अजूनही मजबूत आहे हेल्पिंग हॅन्ड आतला 


पाहून तिची नग्नता मी गेलो भारावून 

पाहायचाय देह आता तिचा त्वचेच्या आतला


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


हर किसी के अंदर अब सेक्स जागा हुआ है 

एक्सेप्ट करलो ये चुपचाप दुनिया नई दुनिया है 


स्टाईल जो कभी जगत मे दवा हुआ करती थी

अब वो बिमारी हैं जिसे सबने गले लगाया है 


हर कोई सेट पे ऑन है या स्ट्रगल कर रहा हैं 

या ऑडिशन ले रहा है या ऑडिशन दे रहा है 


हॉरर को भी जॉनर बनाया हॉरर आदत हो गयी

इतना फिल्मी बनाया की किसी को फिल नही हो रहा है 


कोई जी रहा है या कोई मर रहा है क्या लेना 

या खुदका करियर बना या तरफ कदम उठाया है


ये अब ऐसा ही है और ये अब ऐसा ही रहेगा 

पहलेही ऐसा हुआ था या अभी ऐसा हुआ है ?


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मे चॅनेल बॉलीवूड इस काव्यफाईल से)


संपूर्ण अंगभर शेकडो जखमा 

विषाने स्वतःला बाहेर काढण्याचे शोधलेले विविध मार्ग 

24 तास कळा 

शून्याकडे किंचाळ्यांचे नियंत्रण 


माझा फक्त कंठ निळा नाही 

माझा देह निळकंठ झालाय


यातना आणि दुःख यांच्यातला फरक कळलेला 

माझ्यातला श्रीधर जळलेला 


सहन करतोय ते शरीर आहे 

सर्वत्र शिव आहे 

म्हटलं तर हे खूप सोपं आहे 

म्हटलं तर सर्वात कठीण आहे 


मी आनंद सुदर्शनासारखा पेललाय 

मी अनंत त्रिशुळासारखे पकडलेले आहे


मी जीवनाचा अस्त झालेला जीव आहे 

म्हणूनच सदा- शिव आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष या सिरीज मधील मोक्ष : स्पंद या काव्यफायलीतून)


शत्रूंच्यावर टीका करणारे 


शत्रूंची जाहिरात करत असतात 




जीवन आणि आयुष्यातील बाई 


एकमेकांच्या विरोधात ठाकत असतील तर 


बाई बदल 




म्हातारपणापर्यंत रोमांस टिकत नाही 


प्रेम पेशन्सवर टिकते 




तिनं तुला शत्रू म्हणून घोषित केलं 


ह्याचा अर्थ 


तीच अजूनही तुझ्यावर प्रेम आहे 




ती खूप दुःखी होती म्हणून ती प्रेमाला हो म्हणाली 


थोडी सुखी झाली म्हणून आयुष्यातून निघाली  


समजून घे 




दुःख कधीकधी इतकं खोल असतं 


कि पाण्यासाठी 


तुझ्यासारख्या समुद्रालाही हो म्हणतं




समुद्र हा फक्त खोलातून 


वर येण्यासाठी केलेली उपाययोजना असते 




प्रेम पुरावे सोडत नाही 


फक्त कविता सोडतं 


आणि कोर्टाला कविता पुरावे म्हणून मान्य नाही 




आंधळ्या तारुण्याने डोळे उघडले 


हे काय कमी आहे 




फक्त मीरा रोडला जाणं बंद कर 


म्हणजे मृत्यूही जगण्याला कारण पुरवायला लागेल 




पृथ्वी आकाशातून निळी 


आणि जमिनीवरून हिरवी असते 




तेव्हा आभाळातच चिता जळाली पाहिजे 


हा हट्ट सोडून दे 




चिता कुठेही पेटली तरी पिवळीच दिसणार - स्वीकार 




नात्याचा मृत्यूही सापेक्ष आणि क्वांटम असतो 




त्याला नेटवर्कमध्ये ठेव 




आपोआप सपाट होईल 




श्रीधर तिळवे - नाईक


(चॅनल : लव , सेक्स एण्ड एलसेट्रा ह्या काव्यफाईलीतून)




मिले साज इसतरहकी दिलसे सितार निकले


वक़्तभी ठहर जाये ठहरावसे प्यार निकले




यकीन तो नहीं हैं मेरा यहाँ किसी शख्सपे  


इसबार शायद यहाँ कोई वफादार निकले 




जुदाइमे तड़पभी इसकदर घनी हो  


 हीरोंसेभी मेरे तेरे अश्क़ चमकदार निकले 




हर आग बुझती हैं अपनीभी बुझेगी मगर 


बूझते समय इश्क़का उससे निखार निकले 




मैं इस शहरमे इस उम्मीदसे आया हूँ 


मैं अच्छा बागबाँ बनु वो खुशबूदार निकले 




श्रीधर तिळवे नाईक


( एका भारतीय विद्यार्थ्याचे उदगीर अप्रकाशित ह्या काव्यफाईलीतून )


मला पृथ्वीसाठी बनवलं गेलं होतं 


पृथ्वीवरच पाठवलं गेलं 


वांदा एकचं झाला 


दुसऱ्या प्लॅनेटसाठी बनवण्यात आलेल्या बायका 


पृथ्वीवर थेट आयुष्यात दाखल झाल्या 




त्यांच्या बुद्धिमत्ता ब्लंट कि चंट कळेस्तोवर 


शरीरसंबंध डन झाले होते 


अन मातृमुखी स्तनांचे पागोडे उल्गडेतोवर 


बेडरूम खुर्ची मांडून बसली होती 




हृदयाचं ट्रेनिंग झालं नाही 


आणि रक्तातल्या ट्रेन्स 


लोकल्सनी ताळ्यावर आणल्या होत्या




सतत परकेपण अनुभवनाऱ्या बायकांना पुरुष आपला वाटावा म्हणून काय करावं?




आईला विचारलं तर आईं म्हणाली 


बायकांच्यापुढें बायकांना पुरुषच लागतात 




पण परकेपणाच काय 




मूल झालं की निघून जातो 


आणि पुरुष ही आपल्या आई बनवण्यासाठी धाडलेली गेस्ट रूम आहे हे कळून चुकलेले असतं 




बाईकडे अख्खा प्लॅनेट म्हणून बघ 


मॅच्युअर् होशील 




गेली कित्येक वर्षे मी प्लॅनेटसची बहीणगर्दी सांभाळत 


फुगे उडवतोय 




श्रीधर तिळवे नाईक 


(चॅनेल सिरिजमधील लव अंडर टेररिझम ह्या काव्य 

फायलीतून)


एकट्याने यावे आणि एकट्याने जावे 

गावामधून निघताना एकट्याने निघावे 


कुठले कर्म वाढून ठेवले असेल न येते सांगता 

गाव गावात ठेवावे आणि शहरात निघावे 


सगे सोयरे असतातच गावात भोवताली 

त्यांना गावात ठेवावे शहरात अनोळखी व्हावे 


बोलू नये शहरांमध्ये गावातल्या शेतीवर 

गावात शेती करताना शहर विसरून जावे 


सांगू नये इथल्या गोष्टी तिथे तिथल्या इथे 

शहरात असताना शहरी गावात गावकरी बनावे


कळणार न पसारा कुठला फापटपसारा कुठला 

दोन्हींना गोड मानून आपण पसार व्हावे 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल :तंत्र या काव्य फायलीतून)


प्रत्येक वेळी जन्मलेल्या प्रत्येक जनावराला 

माणूस बनवणे 

एक अखंड सातत्य 

टिकवावे लागणारे


तू जनावर म्हणून जन्मलास 

आणि माणूस झालाच नाहीस 


का झाला नाहीस ?


तुझ्या आई-वडिलांची ही जबाबदारी नव्हती का ?

त्यांनी का तुला जनावरच राहू दिले की 

त्यांनी मनुष्य प्रथम जनावरच असतो हे साधे सनातन सत्य डावलले 

आणि जन्मजात माणूसपणाचा हट्ट ऑटोमॅटिक केला?


आईच्या पोटातून जे येते 

ते जनावरच असते 

त्याला माणूस बनवावे लागते 


समाज हे कृत्रिम जंगल आहे 

त्याचे नियम नाही पाळले की ते पाशवी बनते 

तू पाशवी बनलास म्हणून तर अत्याचार केलास 


तू अपयश आहेस आमच्या सर्व व्यवस्थांचे 

तू जाणीव आहेस की 

अजूनही जनावर शिल्लक आहे 

आणि शिल्लक राहतेच 

संपत नाही 


तू का संपत नाहीस ?


वासना इतक्या टोकेरी होतात कशा?


कायदा केवळ डोक्यावरचे केस कसे बनतो ?


कायद्याचा धाक खाक कसा होतो ?


बेभानपणा कसा स्वभाव बनतो ? 


रक्त इतके पिसाळते कसे?


वीर्य संपूर्ण मेंदूचा ताबा कसा घेते? 


मी तुझ्यासारख्या अनेकांना कानाखाली वाजवलेल्या आहेत 


तुला फाशी देऊन नाहीसे करावे असे वाटावे 

इतकेही नागडे निर्लज्जपण 

मी तुमच्यासारख्यांच्या चेहऱ्यावर पाहिलेले आहे 


भोग हवा आत्ता नि इथेच 

ही तडस येते कुठून ?


नकार झेलण्याची सभ्य रीत कशी शिकवावी ?


किं काही तुझ्यासारखेच राहणार 

कायम आडवे येणारे 

कधीच न सुधारणारे ?


मी शार्प शूटर्सनाही गांधीवादी बनवलेले आहे 

पण साला तुमची जमात मात्र संपत नाही 

शार्पशूटर निदान कळतात 

तुम्ही कुठे लपलेला असता ते कळतही नाही


सभ्यता शिकवण्याच्या सगळ्या शिक्षणतऱ्हा अपंग करून टाकणारे तुमचे व्यंग 


की हे सर्व हिंसेचे मादक

आवर्तनाय ?

अहंकाराचा स्फोटक थयथयाट

ज्याचा कामवासनशी संबंधच नाही?


जेलमध्ये ठेवून तुझ्या सेल्स बदलतील? 

की फाशीच द्यावे निर्लज्ज बेलगाम वासनेला? 


माझ्या हातात ऑर्डर आहे 

जिला एक सिस्टीम द्यायची आहे


तुझ्या बलात्काराने ऑर्डर 

डीसऑर्डर बनवलीये 

आणि माझ्यापुढे प्रश्न तुला सिस्टीम बाहेर ठेवण्यासाठी जेल पुरेशी आहे की मृत्युदंड ?


फाशीचा निकाल देताना मीही अनेकदा माझ्या शाईत खून वळवळताना पाहिलेला आहे 

जणू एक झुरळ 


मी तुला नाहीसा होण्याची सजा देत 

आणि माझ्या पाठीवर एक झुरळ वळवळत


माझी पाठ अशा अनेक वळांनी भरून गेली आहे 


मी सामोरा आहे आरशासमोर 

आणि मला माहित नाही 

तुझ्या चूकचूकणाऱ्या मृत्यूत माझा नेमका सहभाग किती


मी म्हणतोय मी शिकारी आहे 

आणि मी एका जनावराची शिकार केलेली आहे 


शंभरदा हे पटविन 

डायरीत लिहीन 

आणि मग हा सगळा घटनाक्रम सवयीचे मेमरी कार्ड बनेल


काळ भल्या भल्या जनावरांना सपाट करतो 

एवढा एकच दिलासा 

या आयुष्यात जगण्याला हलका करतो 


शेवटी स्किन इज फ्लॅट

जिचा गवगवा शरीरभर होतो


श्रीधर तिळवे नाईक


(चॅनेल सिरीजमधील चॅनेल वर्ड्स या काव्य फायलीतून)


शिवलिंग हे झाड आहे 

पण तुला कुठं चाड आहे?


तुला हवेत कृत्रिम देव 

नि महादेव तर झाड आहे 


तो आहे अनादी अनंत 

त्याला कुठं पाड आहे 


त्यांना आहेत अनंत मुले 

जरी त्यांची एक नाड आहे 


पाच बोटात पाच नद्या 

तरी तुझ्यात भिताड आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( डेकॅथलॉन सीरिजमधील डेकॅथलॉन अनकॅटेगरीकल: तंत्र या काव्यफायलीतून)

तू काफी हैं जीनेके लिये 

जैसे शराब पीनेके लिये 


तू पास हैं तो लगता हैं

एक दिल हैं जखम सीनेकेलिये 


दिल? होगा यही आ जायेगा 

कौन मेहनत करे कमीनेकेलिये 


दिमाग बन या तू दिमक बन 

कोई किमत नहीं पसीनेके लिये 


मैं उस पे मरता नही जिता हुं 

मोहब्बत हैं साथ जीनेके लिये 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


अंधेरेको मैने कपडेकी तरह लपेटा , पहना और चल पडा 

सुरज ने पूछा ये किस तरह का पहना हैं गहना और चल पडा 


मैं शिव की प्यासमें इस तरह बढा की हो गया महासागर 

उसने कहा मै दिखाऊ तुम सिर्फ उसतरफ बहना और चल पडा 


मायाने ढाये सितम पे सितम मगर एक पल भी मैने न किया उफ 

वो थक गई उसे कहा मुझे और है सहना और चल पडा


दुर्गा ने कितने दुर्ग खडे किये मेरे रास्ते मे कहा सत्तामें रह 

मैंने कहा मुझे रहना नही है इनमे मुझे है ढहना और चल पडा 


आखिरकार शिव शक्ती साथ साथ मेरे सामने प्रकट हुए 

अंदर मौन हुए कहा मुझे आपके अंदर हैं रहना और चल पडा 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल: भक्ती या काव्यफायलीतून)


अंधेरेको मैने कपडेकी तरह लपेटा , पहना और चल पडा 

सुरज ने पूछा ये किस तरह का पहना हैं गहना और चल पडा 


मैं शिव की प्यासमें इस तरह बढा की हो गया महासागर 

उसने कहा मै दिखाऊ तुम सिर्फ उसतरफ बहना और चल पडा 


मायाने ढाये सितम पे सितम मगर एक पल भी मैने न किया उफ 

वो थक गई उसे कहा मुझे और है सहना और चल पडा


दुर्गा ने कितने दुर्ग खडे किये मेरे रास्ते मे कहा सत्तामें रह 

मैंने कहा मुझे रहना नही है इनमे मुझे है ढहना और चल पडा 


आखिरकार शिव शक्ती साथ साथ मेरे सामने प्रकट हुए 

अंदर मौन हुए कहा मुझे आपके अंदर हैं रहना और चल पडा 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल: भक्ती या काव्यफायलीतून)

प्रथम मनाली डिंग डॉंग 

मी पण म्हणालो सिंग सॉंग 


मग म्हणाली कार्यक्रम 

मी म्हणालो ठीक ठरवूया क्रम 


मग म्हणाली पिऊया कॉफी 

मी पण मग दाखवली टॉफी 


मग म्हणाली करूया जेवण?

मीपण स्वीकारले हे आवतण


आता उरला आहे एकच प्रश्न 

भाषा बदलली तसे बदलत होते का जश्न ?


(चॅनेल सिरीजमधील चॅनेल: वर्डस या काव्यफायलीतून)


उडून गेलेली भनभन आणि रात्र 

खूप खूप शांत मन आणि रात्र 


कुठल्याही जातीचा नाही आवाज 

समाज वगळलेले तन आणि रात्र 


गुलाम बनवणारा नाही स्मार्टनेस 

फक्त काकणांची किनकिन आणि रात्र


एकमेकांवर आदळणारी ग्रॅव्हिटी 

वासनेची मुक्त छनछन आणि रात्र 


आकर्षणाचे संपत चाललेले घर्षण 

उरलेली शेवटची दणादण आणि रात्र 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तुझ्यावर होते प्रेम तर द्वेष करणारा कोण होता 

कुठून आला होता मत्सर द्वेष करणारा कोण होता 


बागा घेऊन आली होतीस होतो फुलासारखा उमलत

काय करपले झालो अत्तर द्वेष करणारा कोण होता


ठरवले तर होते ना मी द्यायचा निरोप तुला प्रेमाने 

कुठून आले हत्ती शहात्तर द्वेष करणारा कोण होता 


काळजाने कसा दगा दिला ऐनवेळी वरातीमध्ये 

घोड्याजागी नाचला मत्सर द्वेष करणारा कोण होता


शेवट खतरनाक झाला आणि उरला शेवटी पश्चाताप 

काय चाटायचे आहे झुंबर द्वेष करणारा कोण होता ?


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

कसा ओव्हरटेक करू मी स्वतःला 

जो फास्ट ड्राईव्ह करतो तो आहे आतला 


कधी ना कधीतरी हे घडणे अटळ आहे 

जीने हृदय घातले तिनेच अटॅक घातला


ते माझे भय होते की तो माझा लोभ होता 

नसलेला ईश्वर जो आत इतका मातला


मी अजूनही स्वतःला मदत करू शकतो 

अजूनही मजबूत आहे हेल्पिंग हॅन्ड आतला 


नग्नता पाहून तिची मी गेलो भारावून 

पाहायचाय देह आता तिचा त्वचेच्या आतला


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


पृथ्वीवर पाय आणि डोके मात्र वाऱ्यामध्ये 

लक्ष मात्र लागलेले आभाळाच्या ताऱ्यामध्ये


आजन्म ते पटवत राहिले मला त्यांचा परमेश्वर

मला बसवू पहात होते धर्माच्या खटार्‍यामध्ये


अजूनही सत्तर टक्के जमीन एक टक्क्याकडे 

अजूनही ऐंशी टक्के ऊन थंडीच्या माऱ्यामध्ये 


जे वास्तवात पाहिले तेच चेहरे दिसती स्वप्नात 

कल्पनेची धाव होती वास्तवाच्या पहाऱ्यामध्ये 


मला हवी अशी ऑफर कोणती तुझ्याकडे 

कोणता चेहरा जो न्यायचाय मला पाऱ्याकडे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मला पाण्याची भीती वाटली

आणि मी बुडालो


श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /ज्ञान ह्या काव्यफायलीतून )

फेसबुक वर गाजलेल्या कविता 

श्रीधर तिळवे नाईक 

१ पाच चिन्ह गजला आणि पाच कवितेवरच्या कविता पण आता कवितेवरच्या कविता पहिल्यांदा म्हणजे कवींनो 

२ ज्ञानदा वरच्या दहा कविता 

३ बांधकाम चालू आहे वरच्या दहा कविता 

४ निर्वस्तू कविता 10 

५ चॅनेल वर्ड्स वरच्या दहा कविता 

६ कवी दोन मधल्या दहा कविता 

७ निर्वानापूर्वीच्या दहा कविता 

८ निर्वाणानंतरच्या 10 कविता

पृथ्वीवर पाय आणि डोके मात्र वाऱ्यामध्ये 

लक्ष मात्र लागलेले आभाळातील ताऱ्यामध्ये


आजन्म ते पटवत राहिले मला त्यांचा परमेश्वर

मला बसवू पहात होते धर्माच्या खटार्‍यामध्ये


अजूनही सत्तर टक्के जमीन एक टक्क्याकडे 

अजूनही ऐंशी टक्के ऊन थंडीच्या माऱ्यामध्ये 


जे वास्तवात पाहिले तेच चेहरे दिसती स्वप्नात 

कल्पनेची धाव होती वास्तवाच्या पहाऱ्यामध्ये 


मला हवी अशी ऑफर कोणती तुझ्याकडे 

कोणता चेहरा जो न्यायचाय मला पाऱ्याकडे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


हा कोणता पाण्याचा प्रकार तुम्ही पाळला 

थोडेसे ऊन लागता समुद्र तुमचा वाळला 


प्रेम दिसत नव्हते तरी मी कसा घुसमटलो 

अंतकरणात कोणता कापूर तिने जाळला 


तिच्या विरहामध्ये कसा येणार माझा अश्रू 

एकदाच रडलो असा की डोळा माझा वाळला 


काळजाची होती कशी जमणार आप्तावळी 

ज्यास वापर करायचा होता तोच माझ्यावर भाळला


कोल्हापुरातील हवेनेच केला असा बोलबाला 

ज्याने त्याने मजनू म्हणून माझा मिजाज सांभाळला 


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

ओव्हरटेक कसा करू मी मला स्वतःला 

जो करतो ड्राईव्ह फास्ट तो आहे आतला 


घडणे हे अटळ आहे कधी ना कधीतरी

जीने हृदय घेतले तिनेच अटॅक घातला


ते होते माझे भय की तो होता माझा लोभ

नसलेला ईश्वर कसा आत इतका मातला?


अजूनही स्वतःला मी करू शकतो मदत 

अजूनही मजबूत आहे हेल्पिंग हॅन्ड आतला 


पाहून तिची नग्नता मी गेलो भारावून 

पाहायचाय देह आता तिचा त्वचेच्या आतला


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

जे रडायचे ते रडून झाले 

एकदा तिला आवडून झाले 


मी पुन्हा फुल बनून परतलो 

जे सडायचे ते सडून झाले 


कशास बालपणात परतायचे 

जे बागडायचे ते बागडून झाले 


मला पुढचेच रस्ते दिसतात 

भूतकाळांशी झगडून झाले 


मला कशाचाही विटाळ नाही 

आयुष्य सर्व बाजूंनी ताबडून झाले 


जाताना तिने कारण दिले 

"तुला संपूर्ण ओरबडून झाले ''


आता तुला माझी उंची दिसते 

कित्येक पळ आखडून झाले 


तिचा शेवटचा बहाणा संपला 

माझेही नाते खरवडून झाले 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


स्वतःचे अलौकिकत्व नाकारावे इतका करंटा नाही 

आणि दुसऱ्यांना गंडवायला मी काही भामटा नाही 


मी झेलत असतो मुकाट तुझे सर्व क्षुद्र राजकारण 

काय करू शकतो मी थोरला आहे धाकटा नाही


माझी आईवडील भक्ती म्हणजे तुम्हाला वाटते चेष्टा 

यातच समाधानी मी कुलदीपक आहे दिवटा नाही 


माझ्या डाव्या बाजूला मार्क्स उजव्या मानवेंद्र रॉय 

त्यांना नीट जोडू शकेल असा माझ्याजवळ चिमटा नाही 


आता जरी मी तुम्हाला एकांतातच आढळतो आहे 

मी क्रांती घेऊन येतो आहे विश्वास ठेवा एकटा नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


जिला मेकअप येतो तीच सुंदर 

मेकअप खाली गरीबी सुरू निरंतर 


दुकानाखालून माझ्या गंगा वाहते 

दुकानातून विकतो तिचे अवडंबर


कुणालाही कोणाबद्दल पडलेले नाही 

फक्त हितसंबंधच आता अक्षर आणि अमर 


माझ्या व्यापारी असण्याला तुमचे ऑब्जेक्शन 

नि मी विचारतो किती काळ तुम्ही बनणार माझे नोकर 


राजाराणी गुलाम सर्वांच्या कडे सत्ता 

पण तो जिंकतो ज्याच्याकडे सर्वाधिक जोकर


व्यापारी असताना त्याने कविता लिहिली नाही 

मी व्यापार करत लिहितो पैसामुक्त अक्षर 


ठीक आहे माझी लायकीच नाही मराठीत 

पण तुम्ही तरी कुठे आहात पुरेसे साक्षर 


मी उंटांचे कधीही मुके घेत नाही 

मात्र मुके घेणारे उंट विकतो राखत अंतर

श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


रात्र जाते टांगून स्वप्न  

खुंटा बनती थकली हाडे 

ऋतूवहीतली पृथ्वी म्हणते 

भविष्यातले हिरवे पाढे 


नाडीखालचा थंड नव्हेंबर 

शीळ घालतो शिशीराची 

तू गळणार का मी गळणार 

पानांमध्ये बाचाबाची 


टाकत टांगा लांब लांब 

क्षितिजी जाऊन धुळीस मिळतो 

आईच्या दंतकथेतला 

देवमासा समुद्र गिळतो 


समुद्र मोजून काळजातला 

लाटादेखील होती शांत 

उद्या जीवन्त नक्कीच असणार 

खात्रीने मी झोपतो निवांत 


****


दंतकथांना हरवून रिचवेन 

सत्याचे मी महासमुद्र 

भविष्यवाणीचे मी पोपट 

मुरगाळून बनेन शूद्र 


शब्द करतील जरी पराभव 

कविता बनवेन भुईकोट किल्ला 

शंकरशाळा करून शोधेन 

कुठे कुठे तुम्ही मारला डल्ला 


प्रतिनाद जादूचे चुकवून 

शोधून काढेन मूळ सूर 

कागदी होड्या दाखवून तुम्ही 

किती सिद्धले खोटे पूर 


सावध असा जरी मी कवी 

बसवण्णांचे माझे कूळ 

समुद्र म्हणून ज्यास घाबरता 

ती असते माझी चूळ 

(श्रीधर तिळवे नाईक 

एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )


क्रांती करावयाला चाललेल्या तरुणास उद्देशून 

श्रीधर तिळवे नाईक 


मेले कोण याची चौकशी करू नको

थडग्यावर कोण उभे आहेत ते नीट बघ


क्रांती करणाऱ्यांना प्रतिक्रांतीची कल्पना येत नाही 

त्यांना अनेकदा हेही कळत नाही की तेच प्रतिक्रांतीची पूर्वतयारी करत आहेत


ज्या वाटा परंपरेला कधीच दिसल्या नव्हत्या 

त्या वाटा ते परंपरेला दाखवत आहेत 

परंपरेला या वाटा पळून जाण्यासाठी उपयुक्त आहेत एवढे उपजत शहाणपण परंपरेकडे आहे 


ती क्रांतीही होऊ देते 

आणि क्रांतीने दिलेल्या वाटा बरोबर पळवाटा बनवते 


आयुष्य हे इतकं सोपं नसतं जितकं ते क्रांती करणारे समजतात 

हे सगळं एक कॉम्प्लिकेटेड मिशन आहे 

जिथे क्रांतीकारक सुद्धा साधन म्हणून परंपरेकडून वापरले जातात 


सावध राहा 

जितके दिसते तितके नसते आणि जितके असते ते तर नसतेच नसते 

खूप काही पलीकडे असते


इतिहास हा फक्त इंद्रियांनी घातलेल्या सीमेमध्येच सीमाबद्ध असतो 

न्यूटनची ग्रॅव्हिटेशनल एक्टिंग म्हणून तिच्याकडे पाहू नकोस 

सीमा नित्यनूतन असते 


एक भोपळा दिसतो 

आणि आपल्याला वाटते शून्य आहे 

एक कलिंगड दिसते आणि आपल्याला वाटते लाल क्रांती आहे 

एक छोटेसे द्राक्ष दिसते 

आणि आपल्याला वाटते इतकी दारू ठासायला पुरेशी आहे


जमाव सरकत राहतो त्या दिशेने जिथून म्याव म्याव ऐकू येते शेवटी गेले की कळते ज्याला आपण मांजर समजलो ती अशी टायग्रेस होती 

जी केव्हापासून सिंहासनावर बसण्याची तयारी करत होती

आणि आपल्याला म्याऊ म्याऊ करत प्रोवोक करत होती


माणूस असा नट आहे 

आणि तसा खट आहे 

कितीही खाटा टाकल्यास तरी त्याची अभिनय करण्याची खाज कमी होणार नाही 


तेव्हा नीट बघ 

जिला क्रांती समजतोयस 

ती क्रांती नावाची नटी असू शकते 

ज्याला सुपरस्टार समजतोयस तो मनोजकुमार नावाचा ठोकळा असू शकतो 

ज्याला डिरेक्शन येते


तेव्हा सावध 

हिरोईनचे वक्षस्थळ 

केवळ आमंत्रण म्हणून धाडलेले ॲपल असू शकते 


जिंदगी कि ना टूटे लडी

फार गुंतागुंतीची असते 

आणि म्हणूनच दिसते तशी नसते


तू विचारशील 

मग काय क्रांतीचा नाद सोडून द्यावा काय ?


मी तुला काहीच सोडायला सांगत नाही 

कारण निर्णय तुझा आहे 

पण काय आहे ते नीट बघ 

कारण दिसते तसे नसते 

म्हणून क्रांती फस्त होत फसते


तेव्हा फसफसणारे आवाज म्हणजे क्रांती नसते 

धुमसणारी धूसमुस म्हणजे परिवर्तन नसते 


रंग कसाही असो 

जर त्यात रक्त मिसळले की 

तो लाल होतो 

तेव्हा कोणाचेही रक्त सांडण्यापूर्वी थोडे सावध 

अन्यथा रस्त्यावर फक्त मिळतात माणसांचे वध 

 

मिळतात माणसांच्या प्रति

ज्या गिळतात ओरिजिनल माणसांना 


मिळतात 

प्रत्येक प्रतिवर मोफत प्रेते 

जी जिवंत असतात 

आणि तरीही मेल्यासारखी वागत असतात 


तेव्हा सावध 

क्रांतीनंतर लोक फक्त

प्रेतांच्या प्रति मागायला लागतात


शेवटी खेळ प्रतिमेपर्यंत जातो. 

परंतु प्रतिमा म्हणजे क्रांती नसते

कारण दिसते तसे नसते 

म्हणून क्रांती फसफसत फसते


तेव्हा केवळ तारुण्य आहे म्हणून कारुण्यात येऊ नकोस 

जरासा तथागतपण हो 

आणि सत्य काय ते ओळख 

तथ्य काय आहे ते जाण


अन्यथा राहशील कोरडा पाषाण 

आणि दुसऱ्यांना देत राहशील ओले ओले ज्ञान 


फेक आयडेंटिटी कार्डांचा फेकडा जमाना आलेला आहे 

जो खेकड्यासारखा ओढून घेतो 


त्याच्या साहाय्याने

कोणीही कुठलेही कार्ड मिळवतो 

आणि स्वतःला काहीही म्हणवतो


तेव्हा नीट बघ 

कारण दिसते तसे नसते 

क्रांती म्हणूनच फसते 

आणि क्रांतीच्या नावाने काहीही वसते 


तेव्हा सावधान रहा 

समग्र रहा 

आणि जीवात जीव असेपर्यंत

शिव रहा 

तरच जीव जीवनाला सार्थक करेल 

आणि ज्यासाठी जन्मला आहेस ते सार्थकी लागेल 


अन्यथा निरर्थक म्हणून मरण्याचा चॉईस

या व्यवस्थेत कित्येक शतकांपासून अवेलेबल आहेच


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन या सिरीजमधील डेकॅथलॉन: वर्ड्स या काव्यफायलीतून)


परतीचा पाऊस सुरू झाला आहे 

पण पडला कुठे पाऊस आधीचा आहे


बघता बघता देव पुरोहितांच्या ताब्यात गेला 

जो पुरोहितांचा नाही तो देव तरी कुठे खरा आहे 


तिने खरेदी करावी म्हणून मी आणखी सवलत दिली 

तिच्यासोबत वेळ घालवायचा हाच बहाणा आहे 


बघता बघता शहराचा या भूगोल बदलला 

आता बघावे लागेल इतिहास किती बदलला आहे 


तुला माहीत नाही तरी जबर आत्मविश्वास 

मला उगाच वाटले तो तू ज्ञानाने कमावलेला आहे 


मी फक्त तुझ्यापुढे प्रेमाची शक्‍यता बोललो 

तू ही फक्त सांग ना प्रेमाची किती शक्यता आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


माझ्यावर माझ्या घराची जबाबदारी आहे 

जर तुला हे कळत असेल तर प्रेमाची तयारी आहे 


"खरी औरत कधी आपले शरीर दाखवत नाही ''

माझ्यापुढे का नग्न होण्याची तुझी मग तयारी आहे ?


बघू माझे काय काय तुझ्या ढिगार्‍याखाली जाते 

आणि कशाची ढगावरून उतरण्याची तयारी आहे


डॉक्टर मी समजू शकतो पण सैतानाचे काय 

ॲपल खाऊन सैतानाला परत पाठवण्याची तयारी आहे? 


सगळे काही काळया रंगापासूनच जन्मलेले 

तुझ्या त्वचेचा उजेडसुद्धा तात्कालीक प्रकाशवारी आहे 


मी तुझ्या घरासमोरच नांगर टाकून बसलो आहे 

तुझे घर पंढरपूर माझा ठिय्या वारी आहे 


कधी कधी मला तू खूप खूप प्राचीन वाटतेस

कधी वाटते आत्ताच तर जन्मलेली कुमारी आहे 


पहिल्यापेक्षा कदाचित मी आता अधिक समजूतदार 

किंवा कदाचित स्वतःला सुधारण्याची तयारी आहे 


बघू तुझे प्रेम मला कुठे नेते काय बनवते 

सध्या तरी मी रोज घायाळ आणि तू शिकारी आहे 


(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


काही काळासाठी हृदयाला ते स्वतःच्या झुंजार करतात 

फार खोलात जाऊन म्हणे ते जग निराकार करतात


कोणी शिकवले नाही त्यांना विचार करायला 

शिकवल्याप्रमाणे ते आपल्या मेंदूचा प्रचार करतात


गुडघ्यामध्ये त्यांच्या काही हालचाल होते 

आणि ते म्हणतात ते खोलवर विचार करतात


त्यांना कितीही समजावून सांगा अंतराळाविषयी

घरी बसून अर्ध्या चड्डीत ताऱ्यांची ते तार तार करतात 


बघता बघता माणूससुद्धा त्यांचा देव होतो 

आणि आमच्या देवांनासुद्धा ते प्राण्याचा आकार करतात


मला वाटते मी त्यांचा नादच सोडून द्यावा 

दिवसाढवळ्या जे स्वतःशी व्यभिचार करतात 


आयुष्य म्हणजे स्वतःच्या हितसंबंधांचा जुगाड करणे 

हीच ज्यांची व्याख्या त्यांच्याशी कसा व्यवहार करतात 

 

श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आपली गुणवत्ता कूचकामी आहे

असे वाटणेही आता निकामी आहे 


ती चुकीची होती की मी चुकीचा होतो 

की असा प्रश्न सुद्धा तिची गुलामी आहे? 


स्त्रीवाद सुद्धा झाला आता जातिवाद 

तो सुद्धा जातीच्या आता मुक्कामी आहे 


स्वप्नात का होईना आहे तिचा वावर 

सत्यात तिची आठवण दूरगामी आहे


आयुष्यातलं चांदणं म्हणून होतो ओळखत 

माहित नाही आता कुठल्या धामी आहे


मी झालो नापास साऱ्या परीक्षांच्यात

तसाही मी कुठे विद्यार्थी नामी आहे


कधी सायन्समधून मी पडणार बाहेर 

आर्ट साईडला वाट पाहणारी एक मुलगी बदामी आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

हे ब्रम्हांड म्हणजे अनंत विस्तार शून्य संकोच आहे 

तुला उगाच वाटते की तू या जगाचा कोच आहे 


सगळ्या झाडाझुडपांचा तो पाचोळाच करणार 

जंगल कसे टिकवायचे याचा कुठे त्याला पाचपोच आहे


संसार ही गोष्टच अशी की तिथे येतात तडजोडी 

आणि प्रत्येक तडजोडीत एक हताश बोच आहे 


काहीही झाले तरी तू प्राण तुझा जागता ठेव 

मोक्ष जागता ठेवणारा तोच एक खोच आहे 


कंटाळा ही येईल तुला हळूहळू या साधनेचा 

विश्वास ठेव सर्वत्र शिव नि मोक्षदाताही तोच आहे


(डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल :तंत्र या काव्यफायलीतून)

कधीतरी या सगळ्याचा देहाला कंटाळा येईल

सारे शिशिर संपवेल असा उदयाला उन्हाळा येईल


मी आतून खंगाळून पाहिले समस्त हृदय 

वाटले माझ्याविषयी तिला असलेला उमाळा येईल 


माझ्या प्रत्येक अफेअरमध्ये जे घडले तेच घडेल 

मी निघून जाईन आणि तुला माझा पडताळा येईल


किती जाणीवपूर्वक तुम्ही विज्ञान संपवता आहात 

एक दिवस गणिताऐवजी वाट्याला ठोकताळा येईल 


न्याय व्यवस्थेवर तुमच्या आहे विश्वास माझा 

मी मेलेलो असेन आणि तिचा निर्वाळा येईल 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


रातोरात 

कैलास भूमी ऐवजी वैकुंठ भूमी 


रातोरात 

भगवान शिव ऐवजी भगवान विष्णू 


रातोरात 

मरणारा मनुष्य शैव असण्याऐवजी वैष्णव 


एक सायलेंट युद्ध 

बहुजन समाजाविरुद्ध 

ज्याला हेही कळत नाही 

एक बोर्ड बदलल्याने 

धर्म बदलतो 


एक बोर्ड बदलल्याने 

तो शूद्र होऊन जातो 


ब्राह्मणी संस्कारांना आमंत्रण 

आणि ब्राह्मणांची उपस्थिती 


स्पेशल पौराणिक मंत्र 


स्मशान ही शेवटची जागा आहे 

जिथे मेल्यानंतर सुद्धा परिवर्तन केले जात आहे 


आणि तरीही हरिहर एक आहेत 

असा डिप्लोमॅटिक डांगोरा 


माझ्या समजावण्याने काहीच फरक पडत नाही 

मरताना सुद्धा "चलता है" एटीट्यूड 


कॅज्युअलिटी घेणारी कॅज्युअल जीवनशैली 


आता बघायचे 

तुकारामाचे विमान 

कोणाकोणाला वैकुंठात घेऊन जाते? 


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष सिरीज मधील मोक्ष आफ्टर इफेक्ट या काव्यफायलीतून

)



जे देवाच्या दारात भेदाभेद करतात 

ते स्वतःच्या धर्माला छेद करतात 


देव दर्शनाचे सुद्धा दर ठरवणार का?

ठरवणारे स्वतःच्या धर्माला छेद करतात 


कुठल्या देवाने सांगितले "पैसे घ्या" 

कुठल्या देवाच्या आधारे हे भेद करतात 


की देवळांना स्वतंत्र करण्याची गरज आहे 

त्यांच्यापासून जे देवापुढे भेदाभेद करतात 


आत्ताच सुधारा नाहीतर लोक तुम्हाला सुधारतील 

त्यांना जे धंदा करून पुन्हा वेद करतात 


जो मोक्षाची कास धरतो तोच पंडित 

धंदा करणारे स्वतःलाही छेद करतात 


एक दिवस तुमच्याही कर्माचा हिशोब होईल 

जे पुण्य कर्म करताना पापाचा नाद करतात 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सीरीजमधील चॅनेल स्पीरीचुअल या काव्यफायलीतून)


सर्व सामाजिक शेवटी राजकीय होते 

डिप्लोमॅटिक होत होत धराशयी होते 


धूर्त माणसे फुलांच्या मध्ये शिरतात 

मध पळवणारे बागांचे मालक बनतात 


राबणाऱ्या मुंग्या जातात वारूळा बाहेर 

सासर तर संपतेच खलास होते माहेर 


कोपऱ्यात कुठेतरी उलथून पडतात निष्ठावान 

ज्यांनी उभी केलेली असते आन-बान शान 


कोणालाही शोक नसतो सत्तेचा चढतो माज 

कालचा गाडला जातो बुद्धिबळ खेळतो आज 


रहाडगाडगे फिरते आणि काळ देतो ढेकर 

नैतिकतेचे ही उरत नाही कोणावरती प्रेशर 


चला आता उचला शव शो झाला पूर्ण 

निष्ठेची कहाणी असते इतकीच सफल संपूर्ण 


श्रीधर तिळवे नाईक 

(डे कॅथलॉन सिरीज मधील डे कॅथलॉन वर्ड्स या काव्य फायलीतून)


विषापेक्षा विषाचे साईड इफेक्टच जास्त 

जगलो कमी जगण्याचे स्पेशल इफेक्टच जास्त


ज्यांना मला मारावयाचे होते एड्सने बेडवर खिळून 

त्यांच्या आतंकवादामध्ये धर्म कमी धर्माचे डिफेक्टच जास्त 


जो खूनी होता तो सुद्धा माफी मागून निघाला 

त्याला क्षमा केली तर त्या क्षमेला निगेटिव्ह इफेक्टच जास्त


हे जग म्हणजे माया आहे इकडे जावा वा तिकडे जावा 

इथल्या प्रत्येक साईडमध्ये साईड इफेक्टच जास्त 


मरावयास तशी मला काही हरकत नव्हती 

पण "मेल्यानंतर काय?" प्रश्नांमध्ये 

इंटरकनेक्टच जास्त


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष या सीरिजमधील मोक्ष आफ्टर इफेक्ट या काव्यफायलीतून)



Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे