इमॅन्युअल कांट हे एक विचारवंतांच्या क्षेत्रातले फार मोठे वादळ होऊन गेले त्याने जे काही सिद्धांत मांडले त्यांचा आजसुद्धा विचार करावा लागतो आपल्याकडे त्यामुळेच त्याचा प्रचंड प्रभाव मे पु रेंग्यांच्यासारख्या विचारावर पडलेला दिसतो आश्चर्य म्हणजे तरीही हा माणूस का महत्त्वाचा वाटला याचीसुद्धा अनेकांना चौकशी करावीशी वाटत नाही पण मला वाटते त्याच्या सर्व विचारांची सर्वांगीण चिकित्सा मे पू रेगे यांच्यानंतर सुद्धा करायला हवी कारण कांट त्यांनी अत्यंत चांगल्या तऱ्हेने मराठीत आणला आहे अर्थात त्याच्याच ज्ञानपद्धतीबद्दल आणि सौंदर्यशास्त्राबद्दल त्यांना जास्त उत्सुकता असल्याने त्यांनी त्या अंगानेच ती पाहिलेली आहे सापेक्षतेचा सिद्धांत हा कळत नकळत प्रथम कांटमध्ये उदयाला आलेला दिसतो कारण तोच एकटा असा होता ज्याने पुन्हा एकदा ज्ञानाच्या संदर्भामध्ये व्यक्तिगत अतिशय महत्त्वाचे असते असे कळत नकळतपणे प्रतिपादन केले माणसाचे ज्ञान हे मानवे असते हे त्याने सिद्ध केले आणि ह्या सिद्धतेनेच पुढे सापेक्षतेची पार्श्वभूमी तयार केली. कांट नसता तर कदाचित नितशेही झाला नसता आणि आईन्स्टाईनही!असो

प्रबोधनाचा प्रोजेक्ट म्हणजे काय हा प्रश्न प्रथम इमॅन्युअल कांट यांनी विचारला आणि त्याचे उत्तर दिले ," मानव जातीचे कलेक्टिव्ह इममॅच्युरिटी मधून स्वतःला प्रमाण मानून स्वतंत्र विचार करण्याचे केलेले डेरिंग! मनुष्याने हे डेरिंग केले आणि म्हणूनच मनुष्याची प्रगती इथवर झाली". मात्र कांट म्हणतात की प्रबोधनाचा हा प्रोजेक्ट अजूनही पुरा झालेला नाही कांटचा हा सिद्धांत अलीकडे हब्बरमास ह्या मार्क्सवादी विचारवंताने अतिशय चांगल्या रीतीने पुढे नेलेला आहे

कांट म्हणतो तसे प्रबोधनाचे पहिले डेरिंग कोणते? तर प्रस्थापित धर्माविरोधात पूर्णपणे उभे ठाकणे त्याचे विश्लेषण करणे आणि त्याला रिप्लेस करणे आणि त्या जागी नवा धर्म उभा करणे आपल्याला हे सर्व काही बसवेश्वरांच्या प्रोजेक्ट मध्ये झालेले दिसते

प्रबोधनाचा हा बसवेश्वरी आरंभबिंदू भारतात सुरू झाला असला तरी दुर्देवाने तो मोक्षापुरताच मर्यादित राहिला याचे सर्वात मोठे कारण महात्मा बसवेश्वर यांची झालेली हत्या आणि त्यांच्या लिंगायत शैव धर्माचे अत्यंत पद्धतशीरपणे घडवून आणलेले विनाशीकरण आणि पुढे वीरशैविकरण !त्यामुळेच प्रोजेक्ट जो त्यांनी सामाजिक दिशेने नेलेला होता पुढे गेलाच नाही महाराष्ट्रातल्या वारकरी चळवळीने तो पद्धतशीरपणे महाराष्ट्रात थोपवून धरला आणि उत्तरेकडे त्याला सरकू दिले नाही याचा दुष्परिणाम जो व्हायचा तो होऊन गेला आणि भारत इस्लामच्या ताब्यात गेला. विशेषत: उत्तर भारत दक्षिणेकडे मात्र शैव धर्म प्रतिकारासाठी सज्ज झाला त्यामुळे शिवाजी महाराजांनी सारा इस्लाम अजेंडा थोपवला उत्तर भारतात हे घडले नाही आणि आज दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांच्यामध्ये पडलेला फरक हा प्रामुख्याने बसवेश्वरांच्यामुळे झालेला फरक आहे त्यांनी रॅशनल थिंकिंग दक्षिणेत अधिक चांगल्या रीतीने एस्टॅब्लिश केले 

त्या उलट युरोपमध्ये मात्र पुरोगामी वादाचा म्हणजेच प्रबोधनाचा हा बिंदू धर्मापाशी न थांबता ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या दिशेने पुढे पुढे जात राहिला या बिंदूचा सर्वात मोठा पहिला प्रश्न असा होता की नेचर म्हणजे काय परलोक नावाचे काही खरोखर अस्तित्वात आहे काय आणि परलोक स्वायत्त असला तरी निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी परलोकाची आवश्यकता काय ? ही सगळी विचार प्रक्रिया तिचा ग्राफ रॉजर बेकन या विचारवंतांने अतिशय छान रीतीने आपल्या लिखाणामध्ये मांडलेला आहे(त्याच्या योगदानामध्ये त्याच्या गुरुचा फार मोठा वाटा आहे)

शैव धारेची नेचर या संदर्भातली संकल्पना ही शक्तीने निर्माण केलेल्या संसाराशी निगडित आहे कारण संसार भवताल निर्माण करतो माणसाचा भवताल हा शक्तीने निर्माण केलेल्या संसाराने साकारल्याने तो शक्ती प्रमाणेच अनंत आहे साहजिकच अंत असलेल्या इंद्रियांच्या साह्याने युक्त असलेल्या लिमिटेड माणसाला तो सर्वच्या सर्व दिसत नाही माणसाच्या इंद्रियांच्या आणि मशीनरीच्या वाट्याला जो भवतालाचा भाग येतो त्याला आपण निसर्ग असे म्हणतो

बसवेश्वर येईपर्यंत हा निसर्ग कायमच धर्मामुळे दुर्लक्षित राहिला आणि निसर्गाकडे निसर्ग म्हणून पहायला आपणाला तब्बल १२ वे शतक उजाडायला लागले याचे कारण त्यांच्या आधी होऊन गेलेल्या सर्व मोक्षवाद्यांचे लक्ष मोक्षाकडे लागलेले तर धर्मवाद्यांचे लक्ष परलोकाकडे म्हणजे स्वर्ग आणि नरकाकडे लागलेले होते साहजिकच इहलोकाकडे लक्ष जाणे कठीण झाले आणि हा जो इहलोक होता व आहे तोच खरा तर मानवी जीवनाचा खरा भाग आहे 

ह्या पुढचा प्रश्न असा की इहलोकांमध्ये फक्त निसर्ग येतो का ? तर नाही ! त्या निसर्गामध्ये माणूस गप्प राहत नाही तो स्वतः निसर्गामध्ये काही बदल घडवतो आणि मानव लोकांची रचना करतो म्हणजेच माणसाच्या इंद्रियांच्या कक्षेत मानवाने स्वतःचा निर्माण केलेला मानव लोक सुद्धा येतो म्हणजेच इहलोक म्हणजे निसर्ग अधिक मानवलोक होय म्हणजेच माणूस जेव्हा काम करतो तेव्हा तो निसर्गातल्या निसर्गात एक ऍक्टिव्हिटी करत असतो भले तो निसर्गाच्या बाहेर उभे राहण्याचा किंवा उभा असल्याचा दावा करो परंतु हा दावा खोटा असतो तो निसर्गातल्या निसर्गात एखादा मासा पाण्यातल्या पाण्यात पोहावा तसा निसर्गातल्या निसर्गात पोहत असतो पण माशांची जशी स्वतःची सृष्टी असते तशीच माणसाची निसर्गात स्वतःची सृष्टी असते तिला आपण मानवलोक म्हणतो

एकदा हे स्पष्ट झाले म्हणजे मग निसर्गाकडे आणि मानव लोकांकडे कसे बघायचे हे कळू शकते मानवलोकाने निसर्गात किती हस्तक्षेप करायचा हा अलीकडच्या काळात कळीचा प्रश्न बनलेला आहे कारण मानवाने निसर्गात इतका हस्तक्षेप केला की आता तो निसर्गाला झेपत नाहीये अर्थात हे विधान सुद्धा मानवीच आहे कोणी सांगावे कदाचित निसर्गाला हे झेपत असावे म्हणूनच त्यांने अजून माणसाला जिवंत ठेवलेले असावे ज्या दिवशी त्याला हे झेपणे बंद होईल त्या दिवशी निसर्गाकडून कदाचित माणसाचा पॅकअप!

निसर्गाचा अभ्यास केला पाहिजे असं वाटणारा पहिला विचारवंत कोण हा एक फार कळीचा प्रश्न आहे आपल्याकडे युरेशियन परंपरेमध्ये प्रकृती असा शब्द वापरला जातो मात्र तो सुरुवातीच्या काळामध्ये शक्ती आणि तिने निर्माण केलेला भवताल या अर्थाने वापरला जात होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे 

भारतीय पुरोगामी वाद असो किंवा युरोपियन पुरोगामी वाद असो यांची सुरुवातच मुळी परलोकाकडे पाठ करून झाली. पुरोगामी वादाने स्वर्ग आणि नरक नाकारले आणि मग निसर्गाकडे लक्ष देणे सक्तीचे बनले निसर्गाबाबत कायमच दोन दृष्टिकोन सुरुवातीच्या काळामध्ये होते पहिला दृष्टिकोन निसर्ग बदलता येत नाही असा होता तर दुसरा दृष्टिकोन निसर्ग बदलता येतो असा होता सुरुवातीच्या काळात जेव्हा निसर्गवाद निसर्ग वाद म्हणून जन्माला आला तेव्हा रॉजर बेकन ह्याने निसर्गाचे दोन भाग केले एक प्रकृती म्हणजे मानवेतर निसर्ग आणि दुसरा मनुष्याचा स्वभाव ह्यूमन नेचर यातील मनुष्याचा स्वभाव हा बदलता येतो किंवा नाही हा निसर्गवादातला मुख्य चर्चा बिंदू ठरला याचे कारण असे होते की युरोपमध्ये विशेषता इंग्लंड मध्ये मनुष्याच्या स्वभावाला ह्युमन नेचर असाच शब्द होता आपल्याकडे स्वभाव म्हटल्याने थोडासा अवघड प्रकार बनला तरीही स्वभावाला औषध नसते अशी म्हण आपल्याकडे आहेच ती स्वभाव बदलू शकत नाही हेच सांगते 

अर्थात हे म्हणणे पटलेले काही विचारवंत उदयाला आले आणि मुख्य म्हणजे यातून एक जगातला सर्वश्रेष्ठ नाटककार जन्माला आला ज्याने ह्युमन नेचर मनुष्य स्वभाव हाच आपल्या नाटकांचा केंद्रबिंदू बनवला तो नाटककार म्हणजे विल्यम शेक्सपियर होय कित्येक वर्षे मनुष्य स्वभाव बदलता येत नाही आणि म्हणूनच मनुष्याचा स्वभाव हीच त्याची डेस्टिनी अशी व्याख्या केली होती जी शेक्सपियरने केली होती रूढ झाली होती 

याला छेद दिला तो एका समाजवादी विचारवंतांने! रॉजर ओवेन या माणसाने स्वभाव हा इनबॉन जन्मजात नसून तो परिस्थितीने आणि पर्यावरणाने घडवलेला असतो अशी मांडणी केली ही आतापर्यंतच्या जन्मवादी मांडणीपेक्षा वेगळी होती भारतातील वर्णवादी व्यवस्था ही कळत नकळत निसर्गाची जन्मवादी मांडणी स्वीकारत असते आणि भारतात विल्यम शेक्सपियर लोकप्रिय होण्याचे सर्वात मोठे कारण ही त्याची नाटकाविषयीची जीवनदृष्टीच होती त्यामुळेच ब्राह्मणी विचारसरणीचे सर्व विचारवंत हे शेक्सपियरचा धडाडीने प्रचार करत होते कारण मानवी स्वभाव बदलता येत नाही तो जन्मदत्त असतो हे एकदा स्वीकारले की जन्मदत्त प्रतिभेला प्रमाण मानणारी आणि कौशल्याला जन्मदत्त मानणारी तार्किक दृष्टी स्वीकारण्याचे काही मार्ग निर्माण होत होते आणि वर्ण व्यवस्थेत ते स्वीकारण्याचे काही मार्ग आपोआपच खुले होत होते शिवाय इंग्लंड मधून आलेल्या सर्व ब्रिटिश लोकांना आम्ही जन्मदत्त भारतीय लोकांच्या पेक्षा श्रेष्ठ होत असे सांगायचे होते कारण त्यांना आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी हे आवश्यक होते त्यांचा साम्राज्यवाद टिकवण्याचा मार्ग हा शेक्सपियर मधून जात होता आणि दुर्दैवाने भल्या भल्या लोकांना हे कळले नाही साहजिकच जेव्हा समाजवादी विचारवंत ओवनने ह्या मांडणीला विरोध केला तेव्हा सुरुवातीला त्याला प्रचंड विरोध झाला पण हळूहळू या अंगानेही विचार करणारे अनेक समाजवादी विचारवंत निर्माण झाले आणि त्यांनी अधिकाधिक ही मांडणी व्यापक केली काही रोमँटिक विचारवंतांनी तर सामाजिक पर्यावरण आणि परिस्थिती हेच माणसाचा स्वभाव घडवते अशी मांडणी केली त्यामुळे स्वभाव हा जन्मदत्त की समाजदत्त असा प्रश्न निर्माण झाला मार्क्सवादाने हे तत्त्वज्ञान अधिक पुढे नेऊन नेचर च्या जागी इकॉनोमिक सुपरस्ट्रक्चर युक्त सिस्टीम मांडली आणि हे सुपरस्ट्रक्चर माणसाचा स्वभाव घडवते असा सिद्धांत मांडला पुढे पुढे हिटलर आणि स्टॅलिनच्या काळामध्ये मानवी स्वभाव बदलण्यासाठी आणि माणसाला मार्क्सवादी क्रांतीच्या अनुरूप स्वतःचा स्वभाव बनवण्यासाठी या दोन एकाधिकारशाहीवाद्यांनी मानवी स्वभाव घडवणाऱ्या पर्यावरण आणि परिस्थिती यांनाच घडवायला सुरुवात केली तशी यंत्रणा निर्माण केली जी पुढे जाऊन अत्यंत अमानुष होती हे सिद्ध झाले जेणेकरून त्यांना हवे तसे कॉम्रेडस निर्माण वा मॅन्युफॅक्चर करता यावेत किंवा पार्टीत अनुयायी निर्माण करता यावेत ह्यातूनच माणसांचे स्वाभाविक यांत्रिकीकरण सुरू झाले आणि ज्याला इनडॉक्टरीनेशन म्हणतात तेही सुरू झाले अर्थात त्यामुळे माणसे खरोखर कितपत बदलली आणि बदलली तर नेमकी कशी बदलली काय होती काय झाली की भयाने केवळ बदल घडवले आणि हे बदल तात्पुरते होते ? वगैरे वगैरे अनेक प्रश्न या अंगाने निर्माण झाले आणि आजही ते अंगावर येतात 

भारतातील वर्णव्यवस्थेच्या आणि जातीव्यवस्थेच्या संदर्भात सुद्धा हेच प्रश्न निर्माण झाले वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था या दोन यंत्रणा अशा आहेत का की ज्या मनुष्याला मनुष्य स्वभावाला खरोखरच या व्यवस्थांच्या अनुरूप बनवतात आणि जर त्या तशा बनवत असतील तर माणसाचा स्वभाव नेमका असतो म्हणजे काय असतो असा प्रश्न निर्माण व्हायला लागला आजही हे प्रश्न संपलेले नाहीत अनेकदा जेव्हा आपण कळत नकळत आपल्या वर्णाच्या आणि जातीच्या ट्रॅप मध्ये सापडतो तेव्हा कळत नकळत आपण त्या यंत्रणेमुळे तयार झालेला आपला स्वभाव स्वीकारत असतो एका अर्थाने भारतात हिटलर किंवा स्टॅलिन ची गरजच नाही कारण ते कार्य वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था पार पाडत आहे म्हणजेच भारतीय मनुष्य हा जन्मल्यानंतर ताबडतोबच वर्ण नावाच्या हिटलर राजवटीत आणि जात नावाच्या स्टैलीन राजवटीत सापडतो

आणि जेव्हा एखादी व्यक्ती वर्णव्यवस्था किंवा जातीव्यवस्था स्वीकारते तेव्हा ती असे गृहीत धरते की तिचा हा स्वभाव जो वर्ण दत्त आणि जात दत्त आहे नैसर्गिक आहे 

मग यातूनच ह्या पुढचा प्रश्न निर्माण होतो जात आणि वर्ण हा सामूहिक निसर्गामुळे तयार होतो काय? आता खरोखर असे काही आहे का असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नकारार्थी येते कारण बुद्धिमत्ता फक्त ब्राह्मणांच्याकडेच असते किंवा शस्त्रास्त्र चालवण्याचे ज्ञान उपजत क्षत्रियांच्याकडे असते या गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत आणि म्हणूनच वर्णव्यवस्थेला आजच्या काळात काहीही अर्थ उरलेला नाही (जर खरोखर असे काही असते तर शस्त्र चालवण्याचे व शरीर कौशल्याचे सगळे क्रीडाप्रकार आपल्या क्षत्रिय लोकांनी अत्यंत हुशारीने चालवले असते आणि ऑलम्पिक मधली सगळी गोल्ड मेडल्स आपल्याकडे आली असती मुळात आपण मुस्लिम आक्रमकांच्याकडून पराभूतच झालो नसतो कारण जन्मदत्त कौशल्य असल्याने आपल्या क्षत्रियांनी सगळ्या मुस्लिम आक्रमकांना पळवून लावलं असतं पण असे काही घडलेले दिसत नाही) हे सांगण्याचे कारण अलीकडे असा काही अर्थ आहे असे भासवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झालेला आहे मानवी स्वभाव हा व्यक्तिवादी वारशातून जन्मतो सामूहिक वारशातून नव्हे 

औद्योगिक आधुनिक युगात मात्र निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुन्हा बदलला स्वभाव बदलता येतो की नाही हा चर्चेचा मुद्दा झाला तरी स्वभाव नियंत्रणात नक्की ठेवता येतो याची जाणीव कळत नकळत विकसित होऊ लागली आणि मुख्य म्हणजे प्रत्येक माणसाकडे निसर्ग दत्त असे काही ना काही कौशल्य आणि प्रतिभा असते असा सिद्धांत प्रस्थापित व्हायला लागला आणि तो विकसित सुद्धा करता येईल अशी खात्री निर्माण झाली थोडक्यात निसर्गाची डेव्हलपमेंट ही नैसर्गिक बनत गेली मात्र नेचर बदलत नाही यावर अजूनही विश्वास होता औद्योगिक आधुनिक आणि उत्तर आधुनिक युगात एक वेगळी घडलेली घटना अशी की सवयींचा अत्यंत गांभीर्याने विचार सुरू झाला आणि निसर्ग किंवा मानवी स्वभाव हा केवळ नेचर मुळे नव्हे तर हॅबिट्स मुळे सुद्धा कंडिशन झालेला असतो असे सिद्धांतिकारण झाले. साहजिकच सवयींचा जितका विचार विसाव्या शतकात झाला तितका यापूर्वी कधीही झालेला नव्हता म्हणजेच आता एखाद्या माणसाचा स्वभाव बघायचा असेल तर त्याचा निसर्ग दत्त स्वभाव आणि त्याचबरोबर सवय दत्त स्वभाव बघावा लागतो 

थोडक्यात निसर्ग दत्त स्वभावामुळे समता आणण्याऐवजी निसर्गदत्त अलौकिकता ही जास्त महत्त्वाची ठरायला लागली पण याचा एक अतिशय विचित्र परिणाम असा झाला की समतेचा जो विचार होता तो पुरोगामी विचार हळूहळू मागे पडायला लागला आणि जन्मदत्त निसर्गदत्त असलेली कौशल्य ही फार महत्त्वाची असतात असे वाटायला लागले आणि त्यातूनच एक वेगळी तत्व निर्माण झाले ते म्हणजे समता महत्त्वाची नाही तर संधीची समता महत्त्वाची आहे संधी मिळणे अधिक महत्त्वाचे आहे म्हणजेच जे प्रत्येक व्यक्तीकडे अभूतपूर्व नैसर्गिक टॅलेंट आहे त्या टॅलेंटला संधी देण्याची जबाबदारी ही कळत नकळत सरकारी जबाबदारी ठरली आणि सामाजिक जबाबदारी ही ठरली. विशेषतः अमेरिकन या संदर्भात अतिशय चांगले मॉडेल डेव्हलप केले तिथे ब्लॅक ऑफ अमेरिकन लोकांना अतिशय चांगल्या रीतीने संधी देण्याची उद्यमशीलता अमेरिकन व्यवस्थेने दाखवली अमेरिकन कार्पोरेट वादाने दाखवली आणि त्याचा परिणाम संगीत क्षेत्रावर हॉलीवुड वर आणि क्रीडा क्षेत्रावर प्रचंड प्रमाणात झाला हळूहळू राजकारणामध्ये ओबामा आले आपल्याकडच्या कार्पोरेट्सनी अशी जबाबदारी का उचलली नाही हा एक फार मोठा प्रश्न आहे अर्थात याला टाटा अपवाद आहेत पण तरीसुद्धा नेमके अजूनही आपले काय चुकते आहे याचे परीक्षण करण्याची कसलीही तयारी आपण दाखवत नाही आहोत कम्युनिझम आणायचा नाही हे निगेटिव्ह गृहीतक झाले काय आणायचा आहे या संदर्भात कुठे काय माप आहे मॅप आहे मुख्य म्हणजे ख्रिश्चन लोकांच्या मध्ये असलेले कार्पोरेट वादाचे उत्तरदायित्व निभावणारे मॉडेल हिंदू धर्मामध्ये का निर्माण झाले नाही आणि आपण फक्त कार्पोरेट वादाच्या नावाने धनचोडगिरी कसे करत राहिलो? पुन्हा एकदा सांगतो टाटा सारखे काही लोक अपवाद आहेत खरे तर टाटांचे मॉडेल हे आपण अधिक पुढे नेले पाहिजे होते पण आपल्याला ते जमलेले आहे असे वाटत नाही अजूनही प्रत्येक माणसाकडे प्रतिभा असते हे सुद्धा आपणाला स्वीकारता आलेले नाही किंवा जितका आदर पंतप्रधानाच्या कामाला आहे तितकाच आदर आपण सफाई कामगाराला सुद्धा दिला पाहिजे अशा प्रकारची श्रमिक क्षमता अजूनही आपल्या डोक्यात आलेली नाही आपण अजूनही वर्णव्यवस्थेच्या श्रमविरोधी आणि श्रमिकविरोधी मॉडेलमध्ये अडकलेलो आहोत बसवेश्वरांचे बंड हे ह्या दोन्ही विरोधात होते हे आपल्याला अजूनही लक्षात येत नाही किंबहुना बसवेश्वर असे होते ज्यांना या मॉडेलमध्ये असलेली श्रमविरोधी तत्वे आणि श्रमिक विरोधी तत्वे स्पष्टपणे दिसली होती आणि त्यांचे बंड ह्या सगळ्या विरोधात होते म्हणूनच ते जास्तीत जास्त कुजवले गेले आणि यामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे महाराष्ट्रातल्या वैष्णव मेंटॅलिटीने काय काय नुकसान केलेले आहे याचा अजूनही आपणाला अंदाज आलेला नाही अर्थात याला अपवाद होता तो म्हणजे संत तुकाराम परंतु संत तुकारामाचे काय झाले हे आपणाला माहिती आहे 

थोडक्यात काय आपणाला मनुष्य स्वभावाच्या अजूनही खोल पातळ्यांच्यात उतरावे लागेल अन्यथा सर्व बदल हे मलमपट्ट्यांच्या सारखे असतील मुख्य म्हणजेच चलता है ही एटीट्यूड वर्ण व्यवस्थेची देणगी आहे ती आपण अजूनही फेकून देऊ शकलेलो नाही वर्ण व्यवस्थेमध्ये कामाची गॅरंटी असल्याने कामाची क्वालिटी काही असली तरी चालते चालते अशी स्थिती होती आणि कळत नकळतपणे या काम चला वृत्तीमुळे काम चला वृत्तीमुळे आजही आपण गुणवत्तेकडे लक्ष द्यायला तयार नाही आहोत आपली गुणवत्ता विरोधी अटीट्युड नंतरच्या समाजवादाने अधिकच प्रबळ केली वास्तविक निदान रशिया कोसळल्यानंतर तरी आपणाला अक्कल यायला हवी होती पण अद्यापही ती आलेली आहे असे वाटत नाही अनेकदा तर गुणवत्तावादी असणे म्हणजे फक्त उच्चवर्णी यांचेच गुण दिसणे असा प्रकार झालेला दिसतो वास्तविक शूद्र अति शूद्र आणि आदिवासी यांच्यातल्या गुणवत्तेचं काय हा प्रश्न आपण विचारतच नाही यांची गुणवत्ता तोडीस तोड आहे आता शक्य आहे की एखाद्या आदिवासीला तुमच्या एखाद्या अव्वल दर्जाच्या ब्राह्मणापेक्षा तुमचे वैदिक मंत्र अधिक फास्ट अवगत होतील मग तुम्ही त्याला तुमच्या सर्वोच्च मंदिराचे पौरोहित्य देणार आहात का शंकराचार्याचे पद देणार आहात का ? जर का ते तुम्ही जन्मदत्त ठेवणार असाल तर मग वर्ण व्यवस्था कर्मदत्त असते असं सांगता कशाला? तुमच्या वागण्यावरून तुमचा दृष्टिकोन कळतो तुम्ही काय तोंडाने सांगता त्यावरून नाही अद्याप तरी युरेशियन भारतीयांच्यात जन्मदत्त दृष्टिकोनच प्रबळ असलेला दिसतो आणि मुख्य म्हणजे हा दृष्टिकोन वर्ण जात केंद्र असतो तिथे एखादा कुठे जन्मतो हे महत्त्वाचे होऊन बसते त्यामुळे तो धड जन्मदत्त पण होत नाही तो कळत नकळत राखीव जन्मदत्त होतो आणि भारताचे सर्वाधिक नुकसान यामुळे झालेले आहे अनेकदा आपणाला व्यक्तीचे नेमके काय करायचे हे कळत नाही कारण आपणाला त्या व्यक्तीच्या स्वभावाची त्याच्या प्रतिभेची त्याच्या कौशल्याची कदरच करायची नसते त्याला वाव द्यायचा नसतो त्यापेक्षा त्याचा वर्ण जातच महत्त्वाचे ठरते जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाची म्हणजेच ह्यूमन नेचर ची ज्यात त्याची कौशल्ये आणि प्रतिभापण येते आपण नीट कदर करत नाही तोपर्यंत आपले भविष्य नाही मग आपण कितीही डिंग्या मारोत सर्वश्रेष्ठ संस्कृती तीच जी त्या संस्कृतीतल्या प्रत्येक माणसाला पूर्णपणे उमलण्याची संधी देते भूतकाळात महान असणाऱ्या संस्कृतीला वर्तमानात जागा नसते आणि वर्तमान हा आत्ताच्या ह्या घडीला उपस्थित असलेल्या माणसांच्या वर अवलंबून असतो त्यांच्या उमलण्यावर अवलंबून असतो आत्ताची भारतीय संस्कृती प्रत्येक भारतीय माणसाला उमलण्याची किती संधी देते हा प्रश्न ज्याने त्याने स्वतःला विचारणे अत्यंत आवश्यक आहे इतिहासातली भव्य मंदिरे दाखवून वर्तमान घडवता येत नाही आत्ता तुम्ही काय भव्य काय घडवले ते महत्त्वाचे म्हणजे किती भव्य वैज्ञानिक शोध तुम्ही लावले किती तंत्र वैज्ञानिक इन्वेंशन तुमच्या नावावर आहेत किती कॅम्पुटर चे नवीन प्रोग्राम तुम्ही डिझाईन केले किती नव्या नव्या प्रतिवस्तू तयार केल्या किती नवीन नवीन चिन्ह वस्तू तुमच्याकडून निर्माण झाल्या शोधल्या गेल्या वर्तमानात सर्व काही युरोपाने अमेरिकेतून आयात करायचे जपान कोरिया आणि चीनमधून आयात करायचे आणि स्टेटसला मात्र भारतातली जुन्या भव्य काळातली भव्य भव्य मंदिरे दाखवायची वास्तूशिल्पे दाखवायची आणि स्वतःचा इगो कुर्वाळत बसायचा याला फार काही अर्थ असत नाही मित्रहो वर्तमानात या आत्ताचा भारत हा आत्ताच्या वर्तमानात आहे आणि वर्तमान आत्ताच्या माणसांच्या पासून बनलेला आहे त्यांच्याकडे अधिक लक्ष द्या त्यांच्या मानवी स्वभावाकडे त्या स्वभावात असलेल्या प्रतिभेकडे आणि कौशल्यांच्याकडे लक्ष द्या ती उमलवा अन्यथा भविष्यकाळातल्या पिढ्या आपल्या काळाबद्दल काय सांगणार आहेत तुमच्याकडे काय आहे जे तुमच्या पुढच्या पिढ्यांना दाखवण्याजोग्य असेल? आणि आत्ता आहे जे सतत भूतकाळ पाहतात ते वर्तमान काळात गचकतात आता वर्तमान काळात गचकायचे की या वर्तमानाचे काही भव्य करून दाखवायचे ते तुम्ही ठरवा 

श्रीधर तिळवे नाईक

चौथ्या नवतेमध्ये ही अद्वितीयता केंद्रीय स्थानी आली आहे कारण आता फक्त अलौकिकता महत्त्वाची नाही तर अद्वितीयता आता महत्त्वाची आहे इंग्लिश मध्ये याला मी युनिकॅलिटी म्हणतो प्रश्न ती कशी जाणायची आणि विकसित करायची हा आहे याचे आता अधिक चांगले उत्तर उपलब्ध आहे आणि हे उत्तर आहे जेनेटिक इंजीनियरिंगद्वारा!

थोडक्यात चौथा नवतेत निसर्ग म्हणजे मानवी स्वभाव जो जेनेटिकल प्रोग्राम असतो अन् जो रिप्रोग्राम करता येतो , डीप्रोग्राम करता येतो अन वेळप्रसंगी नष्ट सुद्धा करता येतो अर्थात ह्या शक्यता आता निर्माण झालेल्या आहेत कदाचित पुढे नवे जीन्स बसवता सुद्धा येऊ शकतील जेणेकरून मानवाचा स्वभाव जेनेटिकली बदलता येईल

हे जीन्स मानवी जीवनामध्ये फक्त व्यक्तिगत असतात का तर नाही संपूर्ण होमो सेपियन नावाची स्पेशिज यासाठी कलेक्टिव्हली डेव्हलप होत जाते असे आता सिद्ध झालेले आहे म्हणजे एक माणूस चालू जातो आणि त्याच्याबरोबर नंतर उरलेले सगळे होमो इरेक्टस चालायला लागतात आणि त्यातून होमो इरेक्टसचा होमोसोपियन घडतो सर्वांनाच कळून चुकलेले आहे की याचे कारण कॉपी आणि पेस्टिंग करण्याची माणसाची असाधारण क्षमता आहे एकेकाळी कॉपी आणि पेस्टिंग हे निषेधार्ह मानले जात होते परंतु आता असे कोणी मानत नाही उलट यामुळेच माणसाची उत्क्रांती अत्यंत फास्ट वेगाने झाली यावर आता सर्वांचा विश्वास आहे साहजिकच चौथ्या नवतेत नेचरच्या सगळ्या डायमेन्शन्स बदललेल्या आहेत मानवी स्वभाव एक नेटवर्क म्हणून काम करतो आणि त्या नेटवर्कचे पायोनियरिंग जो कोणी करतो तो खरा दादा माणूस म्हणायचा म्हणजे जो पहिल्यांदा दोन पायावर चालला तो खरा पायोंनीयर माणूस मग बाकी संपूर्ण नेटवर्क त्याच्यामुळे डेव्हलप होत जाते आणि उत्क्रांत होत जाते म्हणजेच सामाजिकतेच्या जागी आता नेटवर्कल असोसिएशनालिटी आलेली आहे आणि म्हणूनच आत्ताच्या सोसायटीला आपण नेटवर्क सोसायटी म्हणतो खरे तर त्यातला सोसायटी हा शब्द सुद्धा काढला पाहिजे आणि फक्त मेट्यानेटवर्कच म्हटले पाहिजे किंवा नेटवरक्यालिटी!

व्यक्तिगत पातळीवर सुद्धा जे आत्तापर्यंत कधी घडलेले नव्हते ते आता घडू शकते एखाद्या व्यक्तीजवळ जर इंटीलिजन्स नसेल तर त्याला आर्टिफिशियल इंटीलिजन्स विकला जाऊ शकतो आणि तो ब्रेन मध्ये बसवला जाऊ शकतो पूर्वी या शक्यता नव्हत्या पण आता त्या शक्यता आहेत आणि त्याचे सर्वांगीण परिणाम काय होणार याची कसलीही कल्पना कोणाला नाही. नेचरच्या संदर्भातच अशा क्रांतिकारक घटना घडल्याने समाजाचा संपूर्ण कायापालट होणे अटळ आहे भारतीय समाज ह्या कायापालटीसाठी तयार आहे का हा खरा प्रश्न आहे 

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे