नवीन टाईप केलेल्या कविता
औरते स्टेटस सिम्बॉल देखती है क्यूँ की हजबंड भी उनके लिए स्टेटस सिम्बॉल होता है
तू बोलून चाललेस निघून
मी प्रलंबित खटल्यासारखा खिळून
माझ्याकडे ना स्टेटस ना सिम्बॉल
केवळ एक वॉल
तूच प्रपोज मारलीस
तूच डिस्पोज
शोक तरी कशाचा करणार
जे होते ते आपोआपच वाढणार
भीड न ठेवता शरीरे भिडली
आणि आता भाड्याने दिल्यासारखी
रूम सोडून एकमेकात परतली
तुला काय हवं होतं ते मला कधीच कळलं नाही
आणि मला काहीच नको होतं
येणाऱ्या लाटा घ्या अंगावर
इतकी नदीसारखी पॉलिसी माझी
तुझ्या रक्तात विसर्जित झालो
झालो ही नाही
मूर्ती बुडवावी तशी
बॉडी बुडवत राहिलो
तुझ्या बॉडीत
नदीला घोड्यासारखं वळवता आलं पाहिजे
मी वळतोय
पहाडी होत
दुसरी नदी सखी होईलच
पुन्हा एकत्र धावू
आणि समुद्रात विसर्जित करून
चालते बनू
शेवटी पाणी आहोत
मी ढगासारखा स्वतःला उचलत चाललोय
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल लव सेक्स अँड एल्सेट्रा या काव्यफायलीतून)
एकट्याने यावे आणि एकट्याने जावे
गावामधून निघताना एकट्याने निघावे
कुठले कर्म वाढून ठेवले असेल न येते सांगता
गाव गावात ठेवावे आणि शहरात निघावे
सगे सोयरे असतातच गावात भोवताली
त्यांना गावात ठेवावे शहरात अनोळखी व्हावे
बोलू नये शहरांमध्ये गावातल्या शेतीवर
गावात शेती करताना शहर विसरून जावे
सांगू नये इथल्या गोष्टी तिथे तिथल्या इथे
शहरात असताना शहरी गावात गावकरी बनावे
कळणार न पसारा कुठला फापटपसारा कुठला
दोन्हींना गोड मानून आपण पसार व्हावे
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल :तंत्र या काव्य फायलीतून)
शिवलिंग हे झाड आहे
पण तुला कुठं चाड आहे?
तुला हवेत कृत्रिम देव
नि महादेव तर झाड आहे
तो आहे अनादी अनंत
त्याला कुठं पाड आहे
त्यांना आहेत अनंत मुले
जरी त्यांची एक नाड आहे
पाच बोटात पाच नद्या
तरी तुझ्यात भिताड आहे
श्रीधर तिळवे नाईक
( डेकॅथलॉन सीरिजमधील डेकॅथलॉन अनकॅटेगरीकल: तंत्र या काव्यफायलीतून)
अंधेरेको मैने कपडेकी तरह लपेटा , पहना और चल पडा
सुरज ने पूछा ये किस तरह का पहना हैं गहना और चल पडा
मैं शिव की प्यासमें इस तरह बढा की हो गया महासागर
उसने कहा मै दिखाऊ तुम सिर्फ उसतरफ बहना और चल पडा
मायाने ढाये सितम पे सितम मगर एक पल भी मैने न किया उफ
वो थक गई उसे कहा मुझे और है सहना और चल पडा
दुर्गा ने कितने दुर्ग खडे किये मेरे रास्ते मे कहा सत्तामें रह
मैंने कहा मुझे रहना नही है इनमे मुझे है ढहना और चल पडा
आखिरकार शिव शक्ती साथ साथ मेरे सामने प्रकट हुए
अंदर मौन हुए कहा मुझे आपके अंदर हैं रहना और चल पडा
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल: भक्ती या काव्यफायलीतून)
ब्रेकप नंतरचे मेडिटेशन श्रीधर तिळवे नाईक
प्रथम मनाली डिंग डॉंग
मी पण म्हणालो सिंग सॉंग
मग म्हणाली कार्यक्रम
मी म्हणालो ठीक ठरवूया क्रम
मग म्हणाली पिऊया कॉफी
मी पण मग दाखवली टॉफी
मग म्हणाली करूया जेवण?
मीपण स्वीकारले हे आवतण
आता उरला आहे एकच प्रश्न
भाषा बदलली तसे बदलत होते का जश्न ?
(चॅनेल सिरीजमधील चॅनेल: वर्डस या काव्यफायलीतून)
पृथ्वीवर पाय आणि डोके मात्र वाऱ्यामध्ये
लक्ष मात्र लागलेले आभाळातील ताऱ्यामध्ये
आजन्म ते पटवत राहिले मला त्यांचा परमेश्वर
मला बसवू पहात होते धर्माच्या खटार्यामध्ये
अजूनही सत्तर टक्के जमीन एक टक्क्याकडे
अजूनही ऐंशी टक्के ऊन थंडीच्या माऱ्यामध्ये
जे वास्तवात पाहिले तेच चेहरे दिसती स्वप्नात
कल्पनेची धाव होती वास्तवाच्या पहाऱ्यामध्ये
मला हवी अशी ऑफर कोणती तुझ्याकडे
कोणता चेहरा जो न्यायचाय मला पाऱ्याकडे
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
हा कोणता पाण्याचा प्रकार तुम्ही पाळला
थोडेसे ऊन लागता समुद्र तुमचा वाळला
प्रेम दिसत नव्हते तरी मी कसा घुसमटलो
अंतकरणात कोणता कापूर तिने जाळला
तिच्या विरहामध्ये कसा येणार माझा अश्रू
एकदाच रडलो असा की डोळा माझा वाळला
काळजाची होती कशी जमणार आप्तावळी
ज्यास वापर करायचा होता तोच माझ्यावर भाळला
कोल्हापुरातील हवेनेच केला असा बोलबाला
ज्याने त्याने मजनू म्हणून माझा मिजाज सांभाळला
श्रीधर तिळवे नाईक
( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
क्रांती करावयाला चाललेल्या तरुणास उद्देशून
श्रीधर तिळवे नाईक
मेले कोण याची चौकशी करू नको
थडग्यावर कोण उभे आहेत ते नीट बघ
क्रांती करणाऱ्यांना प्रतिक्रांतीची कल्पना येत नाही
त्यांना अनेकदा हेही कळत नाही की तेच प्रतिक्रांतीची पूर्वतयारी करत आहेत
ज्या वाटा परंपरेला कधीच दिसल्या नव्हत्या
त्या वाटा ते परंपरेला दाखवत आहेत
परंपरेला या वाटा पळून जाण्यासाठी उपयुक्त आहेत एवढे उपजत शहाणपण परंपरेकडे आहे
ती क्रांतीही होऊ देते
आणि क्रांतीने दिलेल्या वाटा बरोबर पळवाटा बनवते
आयुष्य हे इतकं सोपं नसतं जितकं ते क्रांती करणारे समजतात
हे सगळं एक कॉम्प्लिकेटेड मिशन आहे
जिथे क्रांतीकारक सुद्धा साधन म्हणून परंपरेकडून वापरले जातात
सावध राहा
जितके दिसते तितके नसते आणि जितके असते ते तर नसतेच नसते
खूप काही पलीकडे असते
इतिहास हा फक्त इंद्रियांनी घातलेल्या सीमेमध्येच सीमाबद्ध असतो
न्यूटनची ग्रॅव्हिटेशनल एक्टिंग म्हणून तिच्याकडे पाहू नकोस
सीमा नित्यनूतन असते
एक भोपळा दिसतो
आणि आपल्याला वाटते शून्य आहे
एक कलिंगड दिसते आणि आपल्याला वाटते लाल क्रांती आहे
एक छोटेसे द्राक्ष दिसते
आणि आपल्याला वाटते इतकी दारू ठासायला पुरेशी आहे
जमाव सरकत राहतो त्या दिशेने जिथून म्याव म्याव ऐकू येते शेवटी गेले की कळते ज्याला आपण मांजर समजलो ती अशी टायग्रेस होती
जी केव्हापासून सिंहासनावर बसण्याची तयारी करत होती
आणि आपल्याला म्याऊ म्याऊ करत प्रोवोक करत होती
माणूस असा नट आहे
आणि तसा खट आहे
कितीही खाटा टाकल्यास तरी त्याची अभिनय करण्याची खाज कमी होणार नाही
तेव्हा नीट बघ
जिला क्रांती समजतोयस
ती क्रांती नावाची नटी असू शकते
ज्याला सुपरस्टार समजतोयस तो मनोजकुमार नावाचा ठोकळा असू शकतो
ज्याला डिरेक्शन येते
तेव्हा सावध
हिरोईनचे वक्षस्थळ
केवळ आमंत्रण म्हणून धाडलेले ॲपल असू शकते
जिंदगी कि ना टूटे लडी
फार गुंतागुंतीची असते
आणि म्हणूनच दिसते तशी नसते
तू विचारशील
मग काय क्रांतीचा नाद सोडून द्यावा काय ?
मी तुला काहीच सोडायला सांगत नाही
कारण निर्णय तुझा आहे
पण काय आहे ते नीट बघ
कारण दिसते तसे नसते
म्हणून क्रांती फस्त होत फसते
तेव्हा फसफसणारे आवाज म्हणजे क्रांती नसते
धुमसणारी धूसमुस म्हणजे परिवर्तन नसते
रंग कसाही असो
जर त्यात रक्त मिसळले की
तो लाल होतो
तेव्हा कोणाचेही रक्त सांडण्यापूर्वी थोडे सावध
अन्यथा रस्त्यावर फक्त मिळतात माणसांचे वध
मिळतात माणसांच्या प्रति
ज्या गिळतात ओरिजिनल माणसांना
मिळतात
प्रत्येक प्रतिवर मोफत प्रेते
जी जिवंत असतात
आणि तरीही मेल्यासारखी वागत असतात
तेव्हा सावध
क्रांतीनंतर लोक फक्त
प्रेतांच्या प्रति मागायला लागतात
शेवटी खेळ प्रतिमेपर्यंत जातो.
परंतु प्रतिमा म्हणजे क्रांती नसते
कारण दिसते तसे नसते
म्हणून क्रांती फसफसत फसते
तेव्हा केवळ तारुण्य आहे म्हणून कारुण्यात येऊ नकोस
जरासा तथागतपण हो
आणि सत्य काय ते ओळख
तथ्य काय आहे ते जाण
अन्यथा राहशील कोरडा पाषाण
आणि दुसऱ्यांना देत राहशील ओले ओले ज्ञान
फेक आयडेंटिटी कार्डांचा फेकडा जमाना आलेला आहे
जो खेकड्यासारखा ओढून घेतो
त्याच्या साहाय्याने
कोणीही कुठलेही कार्ड मिळवतो
आणि स्वतःला काहीही म्हणवतो
तेव्हा नीट बघ
कारण दिसते तसे नसते
क्रांती म्हणूनच फसते
आणि क्रांतीच्या नावाने काहीही वसते
तेव्हा सावधान रहा
समग्र रहा
आणि जीवात जीव असेपर्यंत
शिव रहा
तरच जीव जीवनाला सार्थक करेल
आणि ज्यासाठी जन्मला आहेस ते सार्थकी लागेल
अन्यथा निरर्थक म्हणून मरण्याचा चॉईस
या व्यवस्थेत कित्येक शतकांपासून अवेलेबल आहेच
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन या सिरीजमधील डेकॅथलॉन: वर्ड्स या काव्यफायलीतून)
कधीतरी या सगळ्याचा देहाला कंटाळा येईल
सारे शिशिर संपवेल असा उदयाला उन्हाळा येईल
मी आतून खंगाळून पाहिले समस्त हृदय वाटले
बाहेर माझ्याविषयी तिला असलेला उमाळा येईल
माझ्या प्रत्येक अफेअरमध्ये जे घडले तेच घडेल
मी निघून जाईन आणि तुला माझा पडताळा येईल
किती जाणीवपूर्वक तुम्ही विज्ञान संपवता आहात
एक दिवस गणिताऐवजी वाट्याला ठोकताळा येईल
न्याय व्यवस्थेवर तुमच्या आहे विश्वास माझा
मी मेलेलो असेन आणि तिचा निर्वाळा येईल
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
सर्व सामाजिक शेवटी राजकीय होते
डिप्लोमॅटिक होत होत धराशयी होते
धूर्त माणसे फुलांच्या मध्ये शिरतात
मध पळवणारे बागांचे मालक बनतात
राबणाऱ्या मुंग्या जातात वारूळा बाहेर
सासर तर संपतेच खलास होते माहेर
कोपऱ्यात कुठेतरी उलथून पडतात निष्ठावान
ज्यांनी उभी केलेली असते आन-बान शान
कोणालाही शोक नसतो सत्तेचा चढतो माज
कालचा गाडला जातो बुद्धिबळ खेळतो आज
रहाडगाडगे फिरते आणि काळ देतो ढेकर
नैतिकतेचे ही उरत नाही कोणावरती प्रेशर
चला आता उचला शव शो झाला पूर्ण
निष्ठेची कहाणी असते इतकीच सफल संपूर्ण
श्रीधर तिळवे नाईक
(डे कॅथलॉन सिरीज मधील डे कॅथलॉन वर्ड्स या काव्य फायलीतून)
विषापेक्षा विषाचे साईड इफेक्टच जास्त
जगलो कमी जगण्याचे स्पेशल इफेक्टच जास्त
ज्यांना मला मारावयाचे होते एड्सने बेडवर खिळून
त्यांच्या आतंकवादामध्ये धर्म कमी धर्माचे डिफेक्टच जास्त
जो खूनी होता तो सुद्धा माफी मागून निघाला
त्याला क्षमा केली तर त्या क्षमेला निगेटिव्ह इफेक्टच जास्त
हे जग म्हणजे माया आहे इकडे जावा वा तिकडे जावा
इथल्या प्रत्येक साईडमध्ये साईड इफेक्टच जास्त
मरावयास तशी मला काही हरकत नव्हती
पण "मेल्यानंतर काय?" प्रश्नांमध्ये
इंटरकनेक्टच जास्त
श्रीधर तिळवे नाईक
(मोक्ष या सीरिजमधील मोक्ष आफ्टर इफेक्ट या काव्यफायलीतून)
स्वतःच्या सौंदर्याने इतकी ऑबसेसिव्ह
पाहिली नाही तुझ्यासारखी मी ताजी राजी स्त्रीव
वक्षांचा मोगरा ज्याचा गंधभारी मंडलथाट
दृश्यमय बनवून लाटा बनतो अवगूढ पाट
त्रिभुजातून घाटउगम बावळते सृजननदी
अनादीची आदिनोंद करणारी अंदाधुंदी
मी घालून ढगफुगडी होणारच ढगफुटी
मला हे माहीत तरी घेऊन येतोय जीर्ण कुटी
एक त्रुटी होते पूर्ण उणीवांचे इतर काय
पुन्हा काम बाहेर मोक्षात चालला बुडत पाय
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल ज्ञ: लव, लव इन अँड लव आऊट या काव्यफायलीतून)
माझ्या काळजाचा प्रकाश गोठलेला
आणि त्यासही तुझा चेहरा फुटलेला
बहुदा तू माझा स्माईल स्टोन आहेस
ओठ नसता नाहीतर इतका दाटलेला
तू तुझ्या ड्रेसमध्ये कातिल दिसलीस
दिवसभर डोळा आ वासून विस्कटलेला
मला न माहित माझा स्ट्रगल कधी संपणार
बहुदा माझा हेतू आहे तुझ्यात भटकलेला
तू का घेतेस माझ्याभवती मादक गिरकी
कसा आवरू माझ्या त्वचेचा कंप सुटलेला
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
तूच माझी कामाक्षी
तूच माझी मीनाक्षी
तूच घे ऊरांमध्ये
नको कोणी अधेमधे
काय होते अगोदर
काय झाले गरोदर
प्रश्न सारे निरुत्तर
तूच साऱ्यांचे उत्तर
सौंदर्याचा लागे लळा
जीव सुंदर सकळा
श्रीधर तिळवे नाईक
(डे कॅथलॉन सिरीज मधील डे कॅथलॉन:अन कॅटेगरी कल: तंत्र या काव्य फायलीतून)
तूच माझी श्रीविद्या
तूच माझी अविद्या
तूच बोलवी पलीकडे
वाटेवर दहा कडे
कोसळ तुझा आवाज
त्यांनाही चढे साज
ज्ञान अहंकार मोठा
काढे नफा देई तोटा
तुझ्यातून मुक्ताबाई
करते मला नेहमी घाई
चल म्हणते मोक्षाकडे
ज्ञानधाव कुंपणाकडे
कशास लावून घेतो ताटी
तिची तरा उफराटी
तुझ्या मध्येच कर विलीन
श्री झाला तुझ्यात तल्लीन
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन:अनकॅटेगरीकल:तंत्र या काव्यफायलीतून)
तू आई माझी भवानी
तूच कथा तूच कहानी
तुझ्यामुळे भवते सारे
आकाश पृथ्वी चंद्र तारे
तुझी इमोशनल वायर
नेहमी चालवते फायर
खूप नाजूक भवनक्षी
त्यातून उडतो पक्षी
अंगभूत वहात जाते
न कळते काय गाते
आकारात भवते भवते
मला ते भावते भावते
तुझ्या नदी माझे पाणी
तुझ्यामुळे गातो गाणी
कर पार भव सागर
फोड आकारांची घागर
विसर्जन हेच सर्जन
बाकी सर्व दंतमर्जन
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल: तंत्र या काव्यफायलीतून )
माणसांच्या इतकी स्वतःच्या उथळपणाची जाणीव
इतर कुठल्याच प्राण्यात नसते
प्रेम ओसरतंय की ॲडजस्ट करतय
कळत नाही
स्विमिंग पूल मधल्या jumps
समाधानकारक नाहीयेत
आकाशातले ढग ताशेरे
ही लग्नाची तयारी
ही घोड्यावरची सवारी
माहित नाही
नेमकी कशाची खुमारी
धामधुम आहे
पण उथळ आहे
मस्ती आहे
पण खोली नाही
काहीतरी सलतय
अस्वस्थतेत किलबिलतय
यासाठी केलं होतं का प्रेमाचं तप?
यासाठीच का तुझ्या वक्षांशी भिडलो होतो सरळ?
क्षण जे प्रेमाने ओथंबलेले
का अचानक ढगफुटी वाटतायेत ?
तू कॉल तर प्रत्येक वेळी घेत होतीस
पण तू कोणाशी बोलत होतीस कळलच नाही
पती असण्याचं हे ढोंग
की पुन्हा एकदा अवतरंगलेले मोक्षाचं लटांबर
पोशाख काढले जातायेत
की त्वचा लपवल्या जातायेत?
की खुळचटपणाची ही एक जांभई आहे ?
त्वचेला डायल करायला जावं तर रॉंग नंबर लागतो
हृदय डायल करायला जावं
तर रक्तवाहिन्या डिस्कनेक्ट होतात
समथिंग इज मिसिंग
पालथ्या घड्यावर पाणी टाकणं अशक्य
लाटावर लाटा
प्रत्येक लाटेत काटा
किती काळ करायचं गुलाब फुलल्याचं ढोंग
मी लग्नाआधीचा किस घेतोय
आणि तरी वाटतंय
सगळंच तर मिसिंग आहे
कशासाठी मग हा प्रपंच
लोकांना टंच दिसावे म्हणून आपण का टाचा घासाव्यात ?
पळून गेलो तर म्हणतील पळपुटा आहे
थांबलो तर स्वतःशीच प्रतारणा केल्याचा आभास
सतत तलवारीसारखा डोक्यावर टांगता
तू तर काहीच बोलणार नाहीस
आणि कदाचित तुला तर सगळंच कळलंय
तू काढतीयेस पाय
आणि मी माझे बूट तुझ्या दारात सोडून
निघालो शहर सोडून
आकाश नीट दिसतंय
बघू काळजातले ढग कधी नीटनेटके होतात ?
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील लव , सेक्स अँड एल्सेट्रा या काव्यफायलीतून)
एकदाचा स्टॅम्प पडला रिजेक्टेड
जगण्यासाठी तोल धडपडला रिजेक्टेड
समुद्रावरून दिल्या हाका
तुझा आवाज मला नडला रिजेक्टेड
पाठलागावर नेहमीच होतो
फक्त आत्ता आवाज फडफडला रिजेक्टेड
बोलायचे खूपच होते बोललो नाही
तुझा आवाज रात्रभर बडबडला रिजेक्टेड
एकच प्रश्न घेऊन चाललोय
जीव तुझा का म्हणताना हडबडला रिजेक्टेड
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
भांडवलदाराच्या पुत्रासाठी एक कविता श्रीधर तिळवे नाईक
फाट्यावर तर कोणीही कुणाला मारू शकतो
कोणाचंही बळ इतकं नसतं
की त्याच्यामुळं आपलं आयुष्य अडून राहावं
तुला माज आहे तुझ्या अर्थशक्तीचा
जी बापाकडून चालून आली तुझ्याकडे
तुझं कर्तुत्व ही सिद्ध नाही झालेलं
की मी तुला साकडं घालावं
काय आहे
शक्तीचा माज सगळ्यांनाच असतो
ज्याच्याकडे शक्ती त्यालाच आवाज असतो
पण याचा अर्थ
गरिबाने गळा गहाण टाकलाय असा होत नाही
मी तुला आदर देतो
याचा अर्थ मी तुला सादर करतोय असा होत नाही
तेव्हा वारसदार म्हणून
उगाच झेंडा उडवत राहू नकोस
तुझ्या अंडाखालचा गरम प्रदेश कसा थंड करायचा
ते मला ठाऊक आहे
मी गप्प असतो
कारण व्यवहाराची ती अट असते
तेव्हा निगुतीने
हातावर महागडं घड्याळ बांधलं म्हणून
काळाला गुलाम समजू नकोस
एक वेळ अशी येईल
तुझ्या पोटात काळ खूपसून
तुझं घड्याळ हिसकावलं जाईल
तेव्हा सावध
तुझ्यासाठी मी इनव्हिजिबल असलो तरी
माझ्यासाठी तू इनव्हिजिबल नाहीस
माझं लक्ष तुझ्यावर नाही
वेळेवर आहे
एव्हढंच लक्षात ठेव
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
अफगाणिस्तानात चाळीस मेले
त्यावेळी तुझे मी चुंबन घेतले
पाक इस्लाममध्ये झाला खालसा
तुझ्या गर्भात गेला वारसा
मुंबईमध्ये झाले स्फोट
तुझ्या रक्ताचे सुरू झाले लोट
भवताली टेररिस्ट मरणाचा घोर
तुला मला झाले हे अद्भुत पोर
कोणी ना कोणीतरी असते मेलेले
त्या शेजारी उभे आपले क्षण जगलेले
भवतालाने स्वतःचे अस्तित्व होत नाही कॅन्सल
आत्तापर्यंत जगलो आहे पुन्हा जगूया चल
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल लव टेरर अँड हॉरर या काव्यफायलीतून)
हर किसी के दिल में बेवफाई है
इसलिये हर किसी के नसीब में तनहाई है
चेहरा अलग मगर ब्रेन एकही है
उसके कमिनेपनमे सेम गहराई है
समाजमें है मगर समाज से टूटा हुआ
सामने संविधान है और उसकी पढाई है
झूट बोलना तो जैसे आदत है बनी
सच को देखते है जैसे कोई चीज पराई है
पुरा राष्ट्र देखते देखते बंडलबाज बन गया
ईस्ट इंडिया कंपनी की सब ने गोली खाई है
श्रीधर तिळवे नाईक
( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
सगळेचजण अर्थव्यवहाराला सोकावलेले
कागदावरच्या गांधीमध्ये सत्व सामावलेले
कोणालाही नको आहे आता तो महात्मा
सहन होत नाहीत त्याचे चष्मे डोकावलेले
सगळ्या सत्याग्रहांच्यातील मीठ संपलेले
आणि समुद्र ही सत्यांचे स्वतःवर कावलेले
माहित नाही कुठे जाणार ही तीन माकडे
त्यांनाही होमोसेपियन होण्याचे चाळे चावलेले
आता फक्त जयंती पुरताच महात्मा उरलेला
बाकी त्याच्या नावाचे धंदे पुढार्यांना पावलेले
शेवटी दारू स्वतःस पिण्यास माझ्यासोबत बसली
म्हणाली एक तूच निर्व्यसनी ज्याने भान नाही गमावलेले
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
हे माझ्या मित्रांच्यात ठरलेलं स्पष्ट आहे
श्रीधर तिळवे वापरायची गोष्ट आहे
मी माझा सूर्य स्वतंत्र निर्माण केला
चंद्र निर्माण करण्यात इतरांना कष्ट आहे
सारे आभाळ मी ताऱ्यांनी सारवले
अंधार अद्यापही मला अस्पष्ट आहे
मी पावसावर कधी राहिलो नाही अवलंबून
विहिरीत इतका बर्फ गोळा की शेत धष्टपुष्ट आहे
ती चोरी करताना सुद्धा खूप नाजूक असते
माझे जे चोरते त्यावरही मी संतुष्ट आहे
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन: वर्ड्स या काव्यफायलीतून)
एक चांद पतंग की तरह मेरे सामने उडता रहा
उसे उडानेवाला मेरा सर धीरे धीरे कटता रहा
सब आगे चले गये किसी ने मुझे बुलाया नही
मै सबके पीछे रहकर खाली रस्ता देखता रहा
तमाशा भी हुआ धमाकेसे थालीया भी बजी
आखिरकार स्क्रीन के सामने मैं अकेला खडा रहा
कई पाव तयार किए थे चलने के जुनून के लिए
वे चल पडे एक्झॉस्ट हुआ और थकावट देखता रहा
खुद से ही यात्रा शुरू हुई खुद्द पे ही खतम हुई
आखिरकार खुद कोही दम तोडते हुए देखता रहा
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्य फायलीतून)
इस्लाम काँग्रेस को ले डूबा
और इलजाम हिंदुत्व पे है
तू परदा हटा
वरना सावन की घटा क्या
पुरा सावन चला जायेगा
तेरी तलवार देख चुका हुं मैं
मगर क्या करू
मुघल दरबार खतम हो गया है
तुझे फक्र हैं औरंगजेबपे
और मै जानता हु
उसके जमाने मे सियासत की सिर्फ जेब अच्छी थी
बाकी तेरी मर्जी
कपडे अच्छे सीलाता है
ढकता रह
तेरी कॉन्टेम्पररी पराजय
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सीरीजमधील चॅनेल: स्पीरीचुअल या काव्यफायलीतून)
माझा जन्म तुझी काया
माझी काया त्याची छाया
तूच आई तूच बाप
तूच साप मी कात
तू दिसतेस, तरी नाही
काळजावर तुझी सही
भवताली तुझे भास
आयुष्य म्हणजे तू घेतलेला तास
तुझे कमळ उमलो आत
पसाऱ्यातून होवो मी पसार हातोहात
श्रीधर तिळवे नाईक
(डे कॅथलॉन सिरीज मधील डे कॅथलॉन अनेकॅटेगरीकल तंत्र या काव्यफायलीतून)
जो सगळ्यांच्या विरोधात ठाकतो
तोच महाकवी होतो
जो सगळ्यांचा होतो
तो कवितेत गोते खातो
तेव्हा बघ सगळायचं की वेगळायचं?
आयुष्य सगळं आकळायचं ?
सर्वच रस्त्यांनी जाता येत नाही
सर्व रस्त्यांच्या विरोधात जाऊन स्वतःची पायवाट निर्माण करता येते
तेव्हा काय करायचं ते बघ
गर्दी नेहमीच उपलब्ध असते भिड लगोलग
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
मी भावना विकत घेत नाही
जेव्हा कोणी भावना विकत
लोक हृदयावर सुद्धा पॅकेजिंग लावतात
रक्ताला सुद्धा ग्रुप मध्ये विभागलं शेवटी
वर आणि पुन्हा जनुकांची वरायटी
समग्र कोण पाहतोय ?
शेवटी समग्र विकता येत नाही
फक्त तुकडेच एकमेकाला तुकडे विकतात
भावना म्हणजे तरी काय
शेवटी तुकडाच
म्हणून तर जाहिराती बनवता येतात
तेव्हा माझ्याकडे हृदयशून्य दुर्लक्ष कर
मला स्वयंपूर्ण आनंद व्हायचंय
ज्यात काळीज नावाचा तुकडा सुद्धा गायब होईल
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल निर्वस्तू या काव्यफायलीतून)
आपलं क्षेत्र आपला देह
आपल्या देहापेक्षा अधिक काही जाणता येत नाही
हा देह देहापेक्षा अधिक आणता येत नाही
तेव्हा मर्यादा ओळख
जे बाहेर आहे ते कायमच अनोळखी राहणार
आपणाला फक्त अन्न कुठले पाणी कुठे बाई कुठे आणि मुले कोठे
तेवढेच शोधता आले पाहिजे
बाकीचे सगळे ज्ञान
अंतिमत: माया
ज्ञानाची मर्यादा कळणे
म्हणजे शहाणपणाला सुरुवात करणे
तेव्हा साडेपाच फुटाला
साडेपाच फूट म्हण
आणि त्यातच लक्ष पावली करत रहा
देह आवश्यक तितकाच चालव
जग चालवण्याचा प्रयत्न करू नकोस
तू शेवटी या जगात
फक्त तुझे जगणे चालवायला जन्माला आला आहेस
चालका
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल निर्वस्तू या काव्यफायलीतून)
माझं शहाणपण इतकच
मी अचूक वेळी जागा सोडतो
अचूक जागेत व्यक्ती
जागेवर जागा भरतो रिकाम्या
आणि रिकामे होणे आवश्यक असेल
तर रित्या करतो
तेव्हा यायचे असेल
तर स्त्रावणे म्हणजे काय ते शोध
नाहीतर हातात फक्त येईल
पुरुषफुगवटा
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल: निर्वस्तू या काव्यफायलीतून)
तुला बघूनच माझे पोट भरते
वासनांचा पसारा आवरते
तू फक्त माझी माझीच आहेस
या विचाराने मन तरंगते तरते
कसे तुझे डोळे झुकतात खाली
का माझी प्रत्येक पापणी बहरते
तुझ्या सुवर्ण कांतीचे काय सांगू
सोने सुद्धा तुला पाहून भिरभिरते
खूपशा आठवणी होतात अनावर
चंद्र नि तुझा चेहरा कॉम्बिनेशन गरगरते
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
जोवर तोवर श्रीधर तिळवे नाईक
मी तुला समजत नाही तोवर ठीक आहे
कळेन हाच धोका प्रेम वरवर ठीक आहे
एकमेकांना पाहून जोवर उमलतो चेहरा
मुखवट्यांचा कितीही वाढो वावर ठीक आहे
दुःखात मिठीत घेतेस आणखी काय हवं
शांतपणे ऐकतेस खरखर तोवर ठीक आहे
आहो जाहो करणारे अरे तुरे करू लागले
तेव्हाच ओळखले बाहेर गेली खबर ठीक आहे
नाही तरी माणसांची प्रचंड गर्दी हवी कशाला
घरात तू , मी आणि तुझा पदर ठीक आहे
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
हर किसी को कुछ ना कुछ मिला है
फिर भी "कम मिला" सबको यही गिला है
प्यास अनमिट है और पानी लिमिटेड
और जो प्यासा है पानी का चेला हैं
तू मुझे सरकारकी डेफिनेशन ना पूछ
ये वो संस्था है जिसके पास पानीका ठेला हैं
नदी भरतीभी है और नदी सुखतीभी है
फिर वो कौन सा मनुष्य हैं जो कहता है मैने नदी को पेला है
कौन है जो सेक्ससे प्रभावित नही हुआ
मगर ये ध्यान मे रख आखिर सेक्सभी पानी का झमेला आहे
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
प्रत्येक खरी गोष्ट खोटी केली जाते
इथे सत्याची बोटी बोटी केली जाते
घालघुसळ करणारे कोण तेही माहित आहे
आणि त्यांचीच प्रतिमा मोठी केली जाते
जे सादर केले जाते त्यावरती लोकांचा विश्वास
इथे मेकअपचीही संगोटी केली जाते
कशाला सत्य शोधतोस खोट्याच्या बाजारात
अंगावर आले की त्याची लंगोटी केली जाते
या जगात राहून राहून तूच खोटा सिक्का होशील
मेल्यावरही सोडत नाहीत खोटी केली जाते
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
पंगा घ्यायचा नाही घरात फक्त भुंकायचे आहे
त्यांना परिवर्तन नको पण व्यवस्थेवर रडायचे आहे
असे अनेक आहेत जे घरात क्रांतीकारक आहेत
त्यांना फक्त घरात राहून व्यवस्थेला ओरबडायचे आहे
तोच खरा बदलतो जो आतून स्वतःला बदलतो
बाहेर बदल मागणारे तेच ज्यांना त्वचेला खपवायचे आहे
सर्वच कमी कमी होते आहे तर मग वाढते आहे काय
सर्वच आकड्यांच्याखाली त्यांना काय झाकावयाचे आहे
फुलाच्या सुगंधावर मी आजही मोहित होत असतो
माहित नाही का पण ते फुल मला अजून आवडायचे आहे
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
ऋतूंच्या पासून कोण सुटला माणसाला ही ऋतू आहे
जन्मणे वाढणे बहरणे म्हातारणे मरणे हाच तर हेतू आहे
तुला कधीही दिले नाही निसर्गाने कुठलेही वस्त्र
मोक्षाकडे जाण्यास दिगंबर होणे हाच पुरेसा सेतू आहे
तुझी फॅशन ही तुझी निवड पॅशन ही ही तुझी निवड
कंप्याशन कमवावी लागेल सुरू तिथूनच मोक्षसेतू आहे
प्रेम देणे आणि इज्जत देणे यांच्यामध्ये न काही फरक
देव दोन्हींच्या मध्ये आहे दोघांनाही लागू ऋतू आहे
ज्यांना जगायचे खोटे त्यांना जगण्यासाठी लागती अफवा
नाहीतर देह असे भांडे की तिथे सत्य जाते उतू आहे
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनेकॅटेगरीकल: ज्ञान या काव्यफायलीतून)
चोवीस तास नजर कैद
एकदम खास नजर कैद
कॅम्पुटर वर वायरस लोड
माझा घेते तास नजर कैद
डोळा सुद्धा दिसत नाही
पापणीचा भास नजर कैद
मित्रांना काही कळत नाही
त्यांचा टाईमपास नजर कैद
तिला वाटते घाबरला आहे
वाटण्याचे आभास नजर कैद
माझे बंड तरीही सुरू
पारंपारिक न्यास नजर कैद
याचे आता करायचे काय
प्रश्न झाला आस नजर कैद
मुक्त आहे तो मुक्तच राहणार
मुक्ती पुढे भकास नजर कैद
शिवाला बांधून कसे टाकणार
जीवमग्न ध्यास नजर कैद
श्रीधर तिळवे नाईक
(मोक्ष सिरीज मधील मोक्ष आफ्टर इफेक्ट या काव्य फायलीतून)
मात्रावृत्त २६
तिजला बघता जीव हा फूलपाखरू जाहला
उडाला चेहऱ्यावर तिच्या जाऊन बसला
अनेक प्रवासी बॅग दाखवता येतिल मला
पण शोधू नका बागा तयात फिरला वारला
पोट्रेट सारखी दिसू लागली देहसावली
तिच्यात स्वस शोधले पण तो ना आढळला
तो क्रश होता की क्रॅश कधिही कळले नाही
तडा जाणार नाही इतका देह सांभाळला
मंडल होते भोवती आरश्यांचे निघाले
आणि हाईट ही त्यात खरा चेहरा न दिसला
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
१०+६+१०
दोघांनाही एका वेळेस नाराज करणे
फार अवघड असते समाजात असा माज करणे
कुणाजवळ आहे आयुष्य आता पडलेले
तू जमव"आजचे आत्ता उद्याचे आज" करणे
कोण पूर्वग्रह दुरुस्त करत बसणार लोकांत
त्यापेक्षा बरे उपेक्षा करून नाराज करणे
वय बघता बघता उलटून तिचे कधीच गेले
जगण्याला नाही तीला जमले मसाज करणे
त्वचा आहे तिथे हे सर्वच अटळपणे येणार
जखम होणे, खाज भागवणे आणि खाज करणे
शांतता वाढवायची तर जा जंगलामध्ये
या शहराला एकच जमते आवाज करणे
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
सतत वर्ण सतत जात काय करायचे अशा लोकांचे
जगती मूर्खपणा वहात काय करायचे अशा लोकांचे
पावला नाही एक देव तर चालतो देव दुसरा चटकन
कुठला पावतो त्याच्या शोधात काय करायचे अशा लोकांचे
धर्माचा सुद्धा नाही अभिमान तिथेही पंथ संप्रदाय मोठे
डबक्यांचा सतत आघात काय करायचे अशा लोकांचे
खोटे उत्सव खोटा उत्साह सतत स्वतःला खोट्यात ठेवणे
उथळपणाची काढतात वरात काय करायचे अशा लोकांचे
मोक्ष सुद्धा बनवून टाकला एक निव्वळ टाईमपास
त्यासाठी कावळे बोलवतात काय करायचे अशा लोकांचे
श्रीधरा दांभिक समाज सोडून तू आता जंगलातच जा
पण तिथेही येतील हे जंगलात काय करायचे अशा लोकांचे
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल :योग या काव्यफायलीतून)
मी रस्ता बदलला नाही ते साईडलाईन झाले
मग मीही रिऍक्ट झालो म्हणालो हेही तसे फाईन झाले
हजारो संत लागतात इथे चोरी करू नका सांगायला
नाहीतर हा देश असा की नेहमी चोर शाईन झाले
तुलाही मृत्यू येईलच बघ त्या सर्व सम्राटांच्या कडे
एकेकाळी मोठे प्रदेश होते आता फक्त कॉईन झाले
येणे जाणे तसे चालूच राहील कोण टाळू शकते काळ
एका क्षणात काही आऊट झाले आणि काही इन झाले
मी मेल्यानंतर ऑर्डर आली स्वतःचे शरीर सादर करा
मी त्यांच्या ग्लासमध्ये पोहोचलो
माझे रक्त वाईन झाले
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
मी अनेकदा intro देत नाही
मी जे काही केले ते माझ्यासाठी dead असतं
आणि माझं शरीर कायम go ahead असतं
कट्टा उडून गेला
कट्टर आला
म्हातारा खपला चुना लावून लावून
आणि ९० वयाचा तरुण आला
रिप्लेसमेंट म्हणून
बदल होत जातात
सरळ आणि उलटे
उलट्या काळजाचे सरळ होतात
सरळ उलट्या
रक्ताला पुढं ढकलत
मी पाय रेटतोय
अडकून पडलेला पाया
मोबाईल करत
क्रिकेटचं मैदान नाहीसं झालं आणि टीव्हीवर उतरलं
खेळण्याची नशा गेली
पैशाचा वास पसरला
बॅट आणि बॉल मध्ये
वॉल जास्त ऑथेंटिक झाली
आता येऊन तरी काय करायचं इथं?
काळाच दूध तर कधीच फाटलं
अमूल अमूल्य वाटण्याचा काळ टिपेला
मी फक्त ब्रँड बघत नाही
त्यांच्या मागची सॅंड बघतो
आणि उंट सुद्धा
उडपी शाबूत आहे
दडपा दडपी वाढलीये
लोक तिथे साने गुरुजींच्या मुळे येत नाहीत
जेवण चांगले आहे म्हणून येतात
डीपीची पिपाणी कधीच झाली
प्रायोगिक अभिनय इथेच ठेवून ऍक्टर निघून गेले कमर्शियल कडे
नायिका होती ती अभिजात सोडून गेली कमर्शियल अॅक्टरकडे
बदल घडतच असतात
सरफेस बदलत असतात
फेस पालटत असतात
आपण आता इथे येतो म्हणजे काय करतो
एक वारलेला भूतकाळ
आणि त्याचे आपल्या मनात उरलेले प्रीत- प्रेत
एकदा स्मशानासकट स्वतःला संपूर्ण जाळून घ्यावं लागेल
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल लव, सेक्स अँड एल्सेट्रा या काव्यफायलीतून)
मृत्यू ही एक सावली आहे
तरीही तुझी काया तिची बाहुली आहे
टिकून राहण्याचा आकांत लोकांतात भरून
मृत्यूची टायमिंग कोणाला चुकली आहे
मृत्यू अनपेक्षित होता अनपेक्षितच राहील
म्हणून तर त्याच्याविषयी इतकी धांदली आहे
पोरांना जन्म दे कारण रिपीटिशन आवश्यक
ओरिजनल शोधू नको ती बेपत्ता जाहली आहे
कधीतरी कळेलच मोक्षाचा साप तुला वेटाळून
जरी वाटते जीवन रेखा त्याच्यापासून निसटली आहे
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल : तंत्र या काव्यफायलीतून)
सतत वर्ण सतत जात काय करायचे अशा लोकांचे
जगती मूर्खपणा वहात काय करायचे अशा लोकांचे
पावला नाही एक देव तर चालतो देव दुसरा चटकन
कुठला पावतो त्याच्या शोधात काय करायचे अशा लोकांचे
धर्माचा सुद्धा नाही अभिमान तिथेही पंथ संप्रदाय मोठे
डबक्यांचा सतत आघात काय करायचे अशा लोकांचे
खोटे उत्सव खोटा उत्साह सतत स्वतःला खोट्यात ठेवणे
उथळपणाची काढतात वरात काय करायचे अशा लोकांचे
मोक्ष सुद्धा बनवून टाकला एक निव्वळ टाईमपास
त्यासाठी कावळे बोलवतात काय करायचे अशा लोकांचे
श्रीधरा दांभिक समाज सोडून तू आता जंगलातच जा
पण तिथेही येतील हे जंगलात काय करायचे अशा लोकांचे
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल :योग या काव्यफायलीतून)
रोने के लिये दिल मे जगह ना बची
यादे बहोत बची मगर वजह ना बची
वो बात कर रहा हैं मेरे प्लस पॉइंटपे
खामिया ढूनढनेकेलिये शायद सतह ना बची
चाहते हैं तुम्हे बस इतना दिलको पता हैं
और किसी खयालकेलीये सतह ना बची
बीमार तुमने किया इलाजभीं तुम हो
और किसी हंगामेकेलीये जगह ना बची
बात होती तो बनती वो फुल्ल टू जज्बात हैं
समझानेकेलिये कोई जगह ना बची
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन वर्डस ह्या काव्यफायलितून )
झाडे शाबूत ठेवून
गोष्टी बनवता येतात
पण तुम्हाला घिसाडघाई
कसाइच तुम्ही
गाय कापून खात नाही एवढेच तुमचे कॉलिफिकेशन
थाळीत शाकाहार मांडला म्हणजे शाकाहारी होत नाही माणूस
खरा शाकाहार
झाडांच्या शाखा सुद्धा शाबूत ठेवतो
तुम्ही निर्दयी आहात निर्दयी
तुम्हाला आता स्वतःच्या ऑक्सिजनचीसुद्धा परवा राहिलेली नाही
कारण
तुम्हाला वाटते परदेश खुला आहे ऑक्सिजन घ्यायला
इथल्या ऑक्सिजनची माती करायची
आणि परदेशात पैसे देऊन ऑक्सिजन विकत घ्यायचा
तुम्हाला काय वाटतं ?
पापांची परतफेड होत नाही ?
शिवाला काय तुमच्या देवघरातले भावले समजलात ?
तो महाकाल आहे
तुमची सगळी पापे तुमच्या डोक्यात हाणल्याशिवाय गप्प राहणार नाही
ही पृथ्वी
जिथे तुम्हाला सुरक्षित वाटते
त्याच्या दृष्टीने फक्त चिमूट आहे
राख व्हालच
मोक्ष मिळवून भस्म झाला असता तर बरे वाटले असते
आता बघूया स्वतःच्या किती जन्मांची राख गोळा करत या पापात हिंडता?
सुटका नाही
पैसा आला म्हणून तुम्ही देवाला बुटका करू शकत नाही
तुमची उंची थोटका इतकी सुद्धा नाही देवापुढं
आणि त्याच्याजवळ करोडो माचिस
तुम्हाला सिगरेट सारखं जाळायला
दुवा मागतो
तुमची पोरं बाळ तुमच्या या कर्माच्या आगीत सापडू नयेत
आणि हो
गंगेत डुबवण्याइतका कर्मफल सिद्धांत हलका नाही
तेव्हा यापुढे लक्षात ठेवा
तुमच्या एका गाडीच्या पाठीमागे
त्याच्या तिसऱ्या डोळ्यातून
एक लाख गाड्या पाठलागावर आहेत
मरा स्वतःच्या कर्मात
श्रीधर तिळवे नाईक
(मोक्ष सिरीजमधील मोक्ष :स्पंद या काव्यफायलीतून)
समोर तर आहेस
आणि दिसत नाहीस
तुला पाहून लोक दिवस काढतात
तुलाच डोळ्यात ठेवून लोक तेवतात
मला तुझे फ्लॅश येतात
आणि माझे लोकांशी क्लॅश होतात
तुझे असे तुकड्यात दिसणे
माझ्या संपूर्णला जखमी करते
मी तुझ्यावर नाराज होत नाही
पण तू सांगून येत नाहीस
ही माझी डोकेदुखी आहे
तुझी अद्भुत किमया
तू मला आधीच का पाठवतोस ?
मला जायचं आहे काळापलीकडे
आणि तू आहेस की
मला कालबद्ध करत
मला पियानो सारखा वाजवत
तुला फेकून द्यावं
तर तू येण्याची सुद्धा परमिशन घेत नाहीस
मी तुझी वाटही बघत नाही
कदाचित तेच माझं क्वालिफिकेशन आहे
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीजमधील चॅनेल: निर्वस्तू या काव्यफायलीतून)
शांततेत आवाज मोठ्याने ऐकू येतो
तेव्हा बस
बसेस आणि ट्रेन सुटत असतात आयुष्यात
स्टेशन सोडलास तर मूळ प्रश्नच उद्भवणार नाही
बस
प्रवास म्हणजे सतत वेगवेगळ्या प्रदेशाचा वास घेणे
बस
जीवटता चिवट असते
आणि एकदा जगायला लागलास की चालणे आणि पळणे अटळ बनते
बस
शेवटी तुला स्वतःलाच मोडीत काढावे लागेल
श्रीधर तिळवे नाईक
(डे कॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल :तंत्र या काव्यफायलीतून)
समतोल ताकद देईल
अति तिथे माती
हे नेहमीच लक्षात ठेव
मातीचे स्तन विशाल असतात
ते तुला नेहमीच एक्स्ट्रा देत राहील
पण दूध तेवढेच घ्यावे
जितके आवश्यक आहे
तुझे बालपण संपले आहे
तेव्हा विचार
दुधाची तरी आवश्यकता आहे का
नाहीतर दुधासारखाच फाटशील
आणि आयुष्यभर स्वतःला शिवत राहशील
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल :तंत्र या काव्यफायलीतून)
शहाणपण चालत आलेले असो
किंवा नवे नवे
शहाणपण असते
दिवा प्राचीन असो की अर्वाचीन
तो पेटवता येतो की नाही
पेटतो की नाही
प्रकाश देतो की नाही
हे महत्त्वाचे
न पेटणारे ताजे दिवे सुद्धा बिनकामाचे
अल्लाउद्दीनच्या काल्पनिक दिव्यांच्या मागे लागू नकोस
आणि यदाकदाचित आतच दिवा सापडला
तर प्रश्न विचारू नको
सनातन की अद्यतन
थेट पेटव
थेट प्रकाश हाच स्ट्रेट प्रकाश
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलोन या सिरीजमधील डेकॅथलोन : अनकॅटेगरीकल: तंत्र या काव्यफायलीतून )
Selfishness never goes into the details
because details are always against selfishness.
डोळस व्हायचे असेल
स्वार्थाचा आंधळा बनवणारा गॉगल लावू नकोस
वेगाकडेही लक्ष दे
फास्ट वेगाने जाणारे आंधळे कधी होतात
त्यांना कळत नाही
स्लो वेगाने जाणारे
शेवटी कधी रस्त्यावर मांडी घालून बसतात
उमजत नाही
तू मध्य गतीने जा
तपशील ही दिसले पाहिजेत
आणि देवही
झाड ही दिसले पाहिजे
आणि आरण्यही
श्रीधर तिळवे नाईक
( डे कॅथलॉन या सिरीज मधील डे कॅथलॉन : अन कॅटेगरी कल :तंत्र या काव्यफायलीतून)
मौन पाळ
म्हणजे अनावश्यक वचने कोणाला देणार नाहीस
मोजके बोल
पण न दुखावता बोल
सत्य बोल
आणि जखम झाली तर फुंकर टाकत रहा
बोलण्यापासून पळता येते का पहा
नसेल तरच बोल
माणसे जगातील सर्वात नाजूक प्रजाती आहे
ती शब्दांनी सुद्धा जखमी होऊ शकते
श्रीधर तिळवे नाईक
( डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल : तंत्र या काव्यफायलीतून)
ठीक आहे तुम्ही म्हणा आमचीच लायकी नाही
तुमच्याइतकी आमच्याजवळ साठलेली नालायकी नाही
आम्ही देतो स्त्रीला समानतेने योग्य सन्मान
अजूनही खंत काळजात आम्ही पुरेसे बायकी नाही
ऑक्सीजन पुरती तरी सोडा जगणारी आरण्यं
की डोक्यात फुफ्फुसाएवढीही
अक्कल बाकी नाही
अंग गर्मीत जळेल इतके कपडे तुम्हाला हवेत कशाला
पुन्हा उकडते म्हणून एसी लावणार आमच्याजवळ ही चालाकी नाही
कशास हव्यात इतक्या गोष्टी ज्या सांभाळताना नाकीनऊ
श्वास घेण्यासाठी नाक पुरेसे
आणखी काहीं बाकी नाही
मागासलेले तुम्ही आहात की मागासलेले आम्ही आहोत
काळच देईल याचे उत्तर
आम्हालाही घाई नाही
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
वाय बी पाटील शिकवत आहेत
प्राण्यांना माणूस बनवण्याचे नाजूक सूप्त प्रयत्न
बागा वाढत नाहीत तीच तीच झाडे आणि तसेच पानांचे यज्ञ
दगड गडगडत आहेत प्रत्येकाच्या डोक्यात
एक वसंत भरून घेऊ का? मी खोक्यात
यशवंत मनोहर यांचा कालचा पाऊस आज दारात
तरी बरे शाळेचा गणवेश नाही त्वचेची निघालेली वरात
हातांचे पंख बोथटलेले गोठलेले कवितेमुळे विखुरत
शहरी बासऱ्या मोडून पडलेल्या गाव वाऱ्यामध्ये कुरकुरत
प्रत्येकामध्ये कुलूप घातलेला प्रवासी आता दूर त्या वस्तीत
माझ्या आत वाटलेली लाज कसे आपण हिंडत होतो मस्तीत
कालचा पाऊस तिकडे पडलाच नाही आणि आपण इथे धबधबे ओतत
ग्लासात अलगद पडलेले एक प्रेत आणि पाटील सर थेट काळीज खोदत
मी लेन्स लावून पाहतोय दूरवर दिसणारी प्रयोगशाळा
आणि सावळा असणारा माझा हात आता अधिकच पडत चाललाय काळा
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
उनकी आँखोका इशारा कौन समझे?
वो बुरा हैं की अच्छा कौन समझे
आशिक हुं उनका मुझे यकीन हैं मगर
खुदकोही कोई दिवाना कौन समझे
प्यार तो था मगर बिना आवाज किये
इजहार था की नही चर्चा कौन समझे
गुस्सा इस कदर है सिस्टीम के खिलाफ
नरम बात करने का लहजा कौन समझे
खूबसूरत चेहरा बना देता है माहौल
अब दिल में हैं क्या भरा कौन समझे
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
गुजर चुकी उस जवानी कसम
याद ना दिलाना पुरानी कसम
जिंदगी नाम कर दी थी जिसके
बची नही उसकी निशानी कसम
लहू मे कोई धडकन ना बची
कहा खो गयी वो रवानी कसम
आखिर तक मुझे ये पता ना चला
मॅनीप्युलेटर थी या दिवानी कसम
कहने के लिए तो अफसाना था
देखते देखते बना कहानी कसम
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
घटना पूर्वीही घडत होत्या
आता फक्त बातम्या होत आहेत
हळूहळू हेही सरकत जाईल
आणि बातम्या बनवण्यासाठी
लोक घटना घडवतील
वाचणारे स्वतःलाच पीडतील
न वाचणारा सुखी राहील
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल निर्वस्तू या काव्यफायलीतून)
निसर्ग इमोशनल बनवला की ईश्वर होतो
ईश्वर इमोशनल बनवला की अवतार होतो
अवतार इमोशनल बनवला की
धर्म बनतो
आणि मग पुरोहित येतो
जो सगळ्यांची कबर खणतो
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल निर्वस्तू या काव्यफायलीतून)
करू तो हजारो शिकायते है ना करू तो कुछ भी नही
तुमबिन जिऊ तो कुछ बात है मगर मरू तो कुछ भी नही
वो क्या है मुझे हैं पता सवाल गर्दन पकडू तो कैसे पकडू
पास जाके पकडू तो कुछ बात है दूर से डरू तो कुछ भी नही
मा ही स्पॉन्सर कर देती है मजहब कैसे चुकाऊंगा उसे
प्यार से समझेगी तो बात है बहस करू तो कुछ भी नही
खून एक होने से क्या होता है इमोशनभी एक होनी चाहिये
दिल तो अंदर की बात है उसे बाहर करू तो कुछ भी नही
देती है मुझे हर बात पे ताना हर हादसे पे करती है बवाल
फिर भी प्यार करू तो बात है नफरत करू तो कुछ भी नही
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
तुझ्याजवळ माल किती प्रश्न विचारला होता
मी पैसे मोजण्याआधीच खिसा कापला होता
हा देश असा इथे पुस्तकांपेक्षा देव जास्त
नि देवाची कसोटी अशी कोण किती पावला होता
जपलेला जरी होता प्रत्येकाने आपला जीव
खूप मोठा समजत होता तोही खपला होता
सगळेच बधीर आहोत काळजी कोणास नाही
प्रत्येकाने आपला आजार दुसऱ्यात खूपसला होता
चांगल्या माणसास बघाया लोक येत होते
ज्याला त्याला उत्सुकता हा कुठे चुकला होता
प्रत्येक जण कधीतरी वाळूनच गेला होता
जो वाळून गेला नाही तो आतून सुकला होता
मलाही वाटले होते मला विकल्प नाही
तेराव्या आधीच तिने दुसरा शोधला होता
घंटा वाजवून त्याने देवाला जागे केले
देव उठला तेव्हा तो गाढ झोपला होता
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
गझल निर्वस्तू श्रीधर तिळवे नाईक
आपल्या आधीच एक माणूस बसला आहे
हे सहन करताना तो अवघडला आहे
त्याला महत्त्वाकांक्षा होत्या पहिला असण्याच्या
वेग कमी पडला तिथे तो बडबडला आहे
जगभर हिंडून त्याने एकच खबर आणली
ज्याला इथे नाकारले तो जगभर आढळला आहे
पहिला होता त्याने दुसऱ्याचा द्वेष न केला
जिंकतानाही त्याने दुसऱ्याचा खांदा थोपटला आहे
शेवटी त्याच्या मर्डरची तयारी पूर्ण झाली
आणि आता कळत नाही तो कुठे निसटला आहे
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल निर्वस्तू या काव्यफायलीतून)
तू मोक्ष सांगितलास
पण तो कळण्याआधीच
न कळणाऱ्यांनी त्याचा धर्म बनवला
आता तू काय करशील
तू तर गेलास
क्रूसावर कायमचा
कदाचित लोकांनाच मोक्ष नको होता
कदाचित वातावरणच तयार केले गेले नव्हते
वातावरण प्रेषिताचे होते
आणि तू प्रेषित नव्हतास
तुला मुक्ती दाता ही व्हायचे नव्हते
तुला स्वतःला मुक्ती हवी होती
आणि मुक्तीची ओळख करून देण्याची जबाबदारी तुझ्यावर पडली
ना प्रेषित ना सिद्ध
तू सविकल्प पर्यंत पोहोचलास आणि पुढची साधना करण्याआधीच
लोकांनी तुला संपवला
मोक्ष मिळवण्याआधीच मुमुक्षु मैदानात उतरला की असं होतं
न कळणारे लोक जे निर्माण होते ते गिळून टाकतात
आणि प्रभाव पडणाऱ्या लोकांना मोक्ष म्हणजे काय ते नीट कळत नाही
आता नीट न कळलेल्यांनी
तुझ्या नावाने धर्म स्थापन केलाय
आणि जग आहे
की त्या धर्मात अथांग बुडालय
एक दुरुस्त न करता येणारी चूक
आणि लोकांना आत तर मोक्षाची भूक
जो मारला जातो
त्याला राजीनामा देता येत नाही
तू एक अशी खुर्ची बनलायस
जी माझ्या डोक्यावर सतत लटकती
मी कदाचित मोक्ष मिळवून
तिच्या खालून निघूनही जाईन
पण तुझ्यामुळे निर्माण झालेल्या खुर्चीचे काय
खुर्ची ची सर्वात मोठी शोकांतिका हीच असते
कि ती स्वतः कधीच राजीनामा देत नाही
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल: भक्ती या काव्यफायलीतून)
त्याला ना अंत आहे ना आरंभ
मध्ये आहे तो समारंभ
फैलाव आहे
आणि त्यात तुझ्या देहाचं गाव आहे
तो गावातून दिसतो
आणि हा चकवा नसतो
इथेच तर खरी मेख आहे
बाकी कामझाम सुख दुःख आहे
तर उचल बूड
पहावयास गूढ
जमत नसेल तर समज तुझा आळस आहे
जमून गेले तर कळस आहे
बाकी पायरीवर राहणारे पायरीवरच राहतात
मृत्यूचा पूर येतो
वाहतात
जन्मतात पुन्हा पुन्हा
जणू जन्मणे आणि जगणे हा ठरवून करावयाचा गुन्हा
पायरीवरच बसून पहात राहतात स्वतःच्याच एररझऱ्या
हातावरचे मोजत उंचवटे आणि दऱ्या
उचल बुड नावाचा बुडबुडा
फुटलास तर नदी होशील
जिला जीवातून शिव दिसतो.
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन :अन कॅटेगरीकल : ज्ञान या काव्य फायलीतून)
मी ऑथेंटिकली वागणार आहे
मी मेल्यानंतर जन्मणार आहे
प्रथम तेव्हा मेलो जेव्हा आई म्हणाली
माझ्या पोटी शिव जन्मणार आहे
कित्येकदा आई सुद्धा आडवी येते
गरज पडली तर तिलाही साईडलाईन करणार आहे
शंकर प्राचीन म्हणून सिलेक्ट केला
त्याचे काय टिकते ते मी जोखणार आहे
माझ्या इच्छा किती वास्तव आहेत ?
की त्यांच्यामुळे फिक्शन सजणार आहे
नशिबा,कितीही चिरड माझ्या आशा
मी पुन्हा पुन्हा त्यांनी पेटणार आहे
गर्भात येण्याआधीच गर्भ आईने टिकवला
बामणा ,मला नष्ट करणे कसे तुला जमणार आहे?
तू तुझ्या वाटेने जा मी माझ्या वाटेने जातो
कुठेही गेलो तरी शिव भेटणार आहे
श्रीधर तिळवे नाईक
(डे कॅथलॉन या सिरीज मधील डे कॅथलॉन : अनकॅटेगरीकल : तंत्र या काव्यफायलीतून)
नव्या ज्ञानाची नवीन भावना तयार झाली नाही
मानव जात अद्याप नव्याला तयार झाली नाही
जुन्याच भावना अद्याप नव्यावर राज्य करतात
हृदयतार नव्या गालिबकरता तयार झाली नाही
"तू उलट्या काळजाचा "जुने काळीज आरोप करते
म्हणते,"तुझी धडकन प्रेमाला तयार झाली नाही"
नव्या जीवनधारेने कसा प्रवेश करावा? जुनी
स्वतःला साईडलाईन करायला तयार झाली नाही
हे नक्की आहे नवे काळीज जुन्याचा मर्डर करणार
प्रॉब्लेम एकच खूनासाठी नवी भावना तयार झाली नाही
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
वाचन श्रीधर तिळवे नाईक
मी आयुष्याला खूप जवळून पाहिले
त्या निमित्ताने जगाने मागे वळून पाहिले
खूप खाणाखुणा होत्या माझ्या मेंदूवरती
पुस्तक वाचताना पुस्तकाने मला बावचळून पाहिले
प्रत्येक पानावेळी वाचणारा वेगळा होता
लिहिणाराही असाच होता का मी खिळून पाहिले
कुठेही गेलो तरी पुस्तक पाहिले एवढे नक्की
कधी नकळत पाहिले कधी कळून पाहिले
कधी कधी हट्टाने जरी डावलून गेलो पुस्तक
मी सीड्युस झालो जेव्हा त्याने चळून पाहिले
कधीकधी पुस्तकाने असे काही ठेवले समोर
मी माझ्या जगाला नव्याने खळबळून पाहिले
मध्येच सोडून दिले मी जेव्हा पुस्तकाचे वाचन
त्या पुस्तकाने माझ्याकडे कळवळून पाहिले
पेजस्टॉपर म्हणून ठेवली मी कळी एक पानात
वाचन कंटिन्यू करताच तिने उमलून दरवळून पाहिले
शेवटी पूर्ण करावे लागले मला माझे वाचन
झोपेत पुस्तकाने मला डोळे बुचकळून पाहिले
वाचन संपले तेव्हा वाचणारा मेला होता
जो नवा झाला त्याने जुन्याला उचंबळून पाहिले
पुस्तकासोबत मीही गेलो होतो लायब्ररीत
नवा वाचक भेटेना मी डोळे दळून पाहिले
मी काय वाचले होते तेही आता आठवेना
मी जे पाहिले होते ते का घरंगळून पाहिले ?
हा जगण्याचा आकांत वाचनाने सुसह्य केला
वाचणाऱ्या एकांताने स्वतःला ढवळून पाहिले
जो लिहिला गेला तो वाचला गेला आणि मेला
इतकेच मला कळले जेव्हा जग आकळून पाहिले
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
जो तुझा चालला आहे तो आगाऊपणा आहे
तुझ्या समुद्री पाण्यापेक्षा जास्त खारेपणा आहे
शंकाच नाही आहे आले तुझ्या हातात नवे शस्त्र
पण वापरताना तुझ्यात जास्त निरबुद्धपणा आहे
सर्वांना सोबत घेऊन जगशील तर खरा जगशील
सर्वांना नीच दाखवण्यात कसला शहाणपणा आहे
निर्भिडपणा म्हणजे बेटा तुसडेपणा न्हवे
प्रज्ञेचा पत्ता नाही बोलण्यात दांभिकपणा आहे
असाच जगशील तर शेवटी एकटा पडत जाशील
नि पुन्हा कोकलशील पहा आला एकटेपणा आहे
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment