धर्म हिंसा आणि आहार श्रीधर तिळवे नाईक


धर्म आणि हिंसा यांचे फार जुने नाते आहे प्राचीन काळी ज्या श्रद्धा होत्या त्यामध्ये प्रसाद म्हणून सर्रास मांसाहार दिला जाईल जो बळी चढवला जाईल त्याचे मांस खाणे हे अत्यंत कॉमन होते हळूहळू मनुष्य बदलत गेला माणसाच्या आहारावर धर्माचा पगडा असावा की नसावा हा एक फार मोठा प्रश्न आहे खरे तर हा प्रश्न विज्ञानाच्या कसोटीवर सुटायला हवा म्हणजे माणूस म्हणजेच होमोसोपियन हा खरोखरच मांसाहार खात होता का आणि त्याची आत्ताची शारीरिक प्रकृती ही खरोखरच मांसाहाराला पूरक आहे का अशा तऱ्हेचा वैज्ञानिक प्रश्न विचारायला हवा पण तो न विचारता हा सगळा भाग अनेक लोक धर्माच्या दारातच नेऊन ठेवत आहे त्यातली सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे ज्या मांसाहाराचा एवढा प्रसार केला जातो तो मांसाहार माणूस खातच नाही अद्याप तरी कच्चे मांस खाणारा माणूस मी पाहिलेला नाही आणि माझ्या मते खरा मांसाहारी तोच जो कच्चे मांस खातो त्या उलट शाकाहार मात्र माणूस सहजरीत्या कच्चा खात असतो शास्त्रीय वैज्ञानिक कसोटीवर खरोखरच माणसाची पचन संस्था ही मांसाहार खाण्याइतपत सशक्त आहे का हे जोपर्यंत तुम्ही कच्चे मास खात नाही तोपर्यंत कळणार कसे माझ्या मते मांसाहार हा ही एक आर्टिफिशल संस्था आहे माणसाच्या उत्क्रांतीमध्ये ती उत्क्रांत होत गेली.आग नसती तर माणूस कितपत मांसाहारी झाला असता याबद्दल माझ्या मनात स्वतःच्या अनेक शंका आहेत पण तरीही मी मांसाहाराचा कधी विरोध करत नाही याचे कारण प्रत्येक माणसाला माणूस सोडून आणि दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती सोडून (खरे तर ज्यामध्ये आता ९९ .९९९९९९९९९ टक्के प्राणी येतात) ज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत त्या खाण्याची परवानगी असावी असे मला वाटते मी मोक्षाच्या मागे आहे किंवा मी शाकाहारी आहे म्हणून म्हणून सगळ्या जगाने मोक्षाच्या मागे लागावे किंवा शाकाहारी व्हावे हे तत्व स्वातंत्र्य नाकारणारे आहे मला स्वातंत्र्य नाकारणारे काहीही बरोबर वाटत नाही फक्त मर्यादा कुठे टाकायची हे ठरवता येते आणि मांसाहाराबाबत माझी मर्यादा दुर्मिळ प्राण्यांचा आहार म्हणून हत्या होता कामा नये ही आहे याचे कारण माझी स्वातंत्र्याची कल्पना आहे आहार खाण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे आणि आपण आपला आहार दुसऱ्यावर लादू नये


मुळातच या वादाचा उगम धर्माच्या ज्या टप्प्यावर आहे तो टप्पा नीट बघणे आवश्यक आहे एकेकाळी होमो-सेपियन्स मध्ये मनुष्य बळी दिले जात होते ही वस्तुस्थिती होती त्यामुळेच हिंसेचा आणि अहिंसेचा विचार करताना आपणाला साधारणपणे तीन टप्पे गृहीत धरावे लागतात पहिला टप्पा हा मनुष्य सकट सर्व प्राण्यांना बळी देणारा टप्पा आहे दुसरा टप्पा हा मनुष्य ऐवजी मनुष्याला रिप्लेस करणारा प्राणी आणून त्या प्राण्याला बळी देण्याचा आहे म्हणजेच मनुष्याची हिंसा नाकारणारा व प्राण्यांची हिंसा स्वीकारणारा आहे त्याचा स्पष्ट निर्देश करणारी कथा ही आपणाला बायबल मध्ये दिसते तेथे अब्राहमचा मुलगा बळी जाणार आहे आणि अब्राहम तो बळी द्यायला तयार आहे परंतु स्वतः ईश्वरानेच दुसरा प्राणी बळी दे असे सांगितलेले आहे आणि त्यासाठी बळीचा बकरा देण्यात आलेला आहे म्हणूनच हा उत्सव मोठ्या प्रमाणात पाश्चात्त्य देशात होतो याचे कारण असे की मनुष्यबळी यामुळे थांबलेला आहे आपणाला त्याचे महत्त्व नाही कारण आपल्याकडे त्या आधीच बुद्ध होऊन गेला होता जैन परंपरा होऊन गेली होती तिसरा टप्पा अर्थातच जैन आणि बौद्ध धर्माचा आहे ज्यामध्ये मनुष्य बळी तर नाहीच पण प्राण्यांचाही बळी द्यायचा नाही असा आग्रह धरण्यात आलेला आहे आणि यज्ञ ही संस्था प्राण्यांचा बळी देत असल्याने तिच्यावर बहिष्कार टाका असा कळत नकळत विचार झालेला आहे साहजिकच यज्ञ हे कमी होत गेले आणि हळूहळू यज्ञ संस्था नष्ट झाली प्रश्न असा आहे की आपल्याकडे प्राणी हिंसेला संपूर्ण विरोध हा अचानक झाला का त्याची पार्श्वभूमी आधीच तयार झाली होती? वैदिक परंपरेमध्ये या संदर्भात एक नाव कायमच येते आणि ते नाव आहे याज्ञवल्क्य !


अहिंसक यज्ञाचा पुरस्कार करणाऱ्या ह्या याज्ञवलक्याचा काळ नेमका काय हे जरी अस्पष्ट असले तरी एक गोष्ट स्पष्टच दिसते ती म्हणजे जर का भीष्म आणि व्यास हे समकालीन असतील युधिष्टर आणि वैशंपायन हे समकालीन असतील तर अभिमन्यू आणि याज्ञवल्क्य हे समकालीन असण्याची बरीच शक्यता आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की महाभारतात जी प्रचंड हिंसा घडून गेलेली आहे त्या हिंसेला विटून याज्ञवल्क्य कदाचित अहिंसेकडे वळलेला असावा त्याने शतपथ ब्राह्मण लिहिले असे गृहीत धरले तर त्याचा काळ इसवी सन पूर्व एक हजार असावा अर्थात ज्या काळात त्याने हा स्टान्स घेतला त्या काळात तो जैन आणि बौद्ध यांच्यासारखा stance घेऊ शकत नव्हता कारण त्या काळात हिंसा मुबलकच होती पण एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे त्याने मनुष्य बळी देणे बंद केलेले आहे म्हणजेच किमान पशुबळीपर्यंत येण्याची सुरुवात झालेली आहे खुद्द महाभारतातील यज्ञामध्ये वाघापासून सर्व बळी आणले गेलेले आहेत आणि वाघाचा बळी स्वीकारायचा की नाही यावरून वाद ही झाला असावा म्हणजेच मनुष्य बळी होण्याचे प्रमाण घटलेले आहे आणि कौरव आणि पांडव अशा प्रकारचा यज्ञ करत नसावेत प्रश्न असा आहे की याज्ञवल्क्य याने मानलेले आणि मांडलेले अहिंसक यज्ञ होते तरी कसे यासंदर्भात काहीही तपशील उपलब्ध नाहीयेत आणि जे आहे त्यावरून काही अंदाज बांधता येत नाही महाभारत काळात ज्या ब्राह्मणाला यज्ञ करण्यासाठी बोलवले जाई त्यालाच "ब्रह्मा" केले जाई बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाला सतत एक ब्रम्हा भेटायला येत असतो व त्याचा उल्लेख वारंवार येतो हा यज्ञसंस्थेशी संबंधित आहे का हे सांगणे अवघड आहे मत्स्यपुराणातील एका कथेत दुसऱ्या जनमेजयाने अश्वमेध केला तेव्हा वाजसेनेही ब्राह्मण जो बोलावला गेला तोच बहुदा याज्ञवल्क्य असावा आणि त्याने आपल्या पद्धतीने हा यज्ञ केलेला असल्याने तो न आवडल्याने वैशंपायन यांनी त्याला तुझी शाखा फक्त तू जिवंत असेपर्यंत टिकेल असा शाप दिलेला आहे प्राचीन काळामध्ये शाप देणे याचा अर्थ शिक्षा देणे असा होतो. अर्थात ब्राह्मणांनी दिलेली ही शिक्षा प्रत्येक वेळेला काही क्षत्रियांनी स्वीकारलेली नाही किंबहुना ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामध्ये यावरूनच मतभेद झालेले आहेत शिक्षा देण्याचा अधिकार कोणाला आणि ब्राह्मण क्षत्रियांना शिक्षा देऊ शकतात का असा हा प्रश्न आहे अगदी अर्जुनाच्या हातून द्रोणाचार्यांची हत्या झाल्यानंतर याला ब्रह्महत्या म्हणावे की नाही आणि अर्जुनाने ब्रह्म हत्येसाठी शिक्षा स्वीकारावी की नाही यावरून वाद झालेला दिसतो म्हणजे काही झाले तरी क्षत्रीयांनी ब्राह्मणाचा वध करू नये असा वैदिक धर्मात धर्मनियम असावा याज्ञवालक्य क्षत्रिय असावा असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा या संघर्षाची त्या शापाला पार्श्वभूमी आहे हा शाप फळलेला दिसत नाही कारण या याज्ञवलकाची वाजसनेयी शाखा पुढे टिकलेली दिसते. 


अहिंसेचा विचार करताना अनेकदा याज्ञवलकाचा विचार करावा लागतो याचे कारण त्याचा काळ अनिश्चित असला तरी त्याने हिंसा न करता अहिंसक यज्ञाचा पुरस्कार केला असे सांगितले जाते त्याच्या वेद संहिता सुद्धा ह्या साक्षात सूर्याकडून त्याला प्राप्त झाल्या असे सांगितले जाते विश्वामित्र सुद्धा क्षत्रिय होता आणि त्याला सुद्धा सूर्याकडून थेट गायत्री मंत्र प्राप्त झालेला दिसतो एकंदरीत क्षत्रियांचे सूर्याशी काही नाते असावी की काय अशी शंका येते. विशेषतः जे जे धर्मात धर्म तज्ञ म्हणून क्षत्रिय असूनही आलेले आहेत त्या त्या सर्वांच्या बाबतीत अशी शंका घेणे इतपत सूर्याशी नाते दिसते अगदी धर्म सांगणारा राम सुद्धा सूर्यवंशी आहे असे दिसते अर्थात सुरुवातीला याज्ञवलक वैशंपायनाचा शिष्य आहे आणि आपल्या गुरुशी त्याचे मतभेद झाल्याने हे घडले असे कारण सांगितले जाते म्हणजेच परंपरेने आलेली संहिता त्याने नाकारली आणि मग ती स्वतःच्या मनाने तयार केली आणि ही आपणाला सूर्याकडून प्राप्त झाली अशी मांडणी केली हे उघड आहे हे मांडणी यजुर्वेदाची होती असेही आता मांडले जाते आणि हा यजुर्वेद हिंसक यज्ञाला प्रोत्साहन देणारा नव्हता म्हणूनच याज्ञवलक हा वैदिक परंपरेतला अहिंसेचा पहिला प्रवर्तक मांडला जातो 

अर्थात याज्ञवलक सहा होऊन गेले असे मानले जाते त्यातील एका याज्ञवलकाची ही कामगिरी आहे 


प्रश्न असा आहे की वैशंपायन हे व्यासांचे शिष्य आहेत मग व्यास तरी कोण आहेत वैदिक परंपरेत विशेषता ब्राह्मणी परंपरेत पहिला व्यास म्हणून मनूचे नाव घेतले जाते आणि मनुस्मृती ही प्रथमता त्याने दिली असे मानले जाते प्रश्न असा आहे की महाभारत ही सुद्धा एक स्मृती आहे आणि ती व्यासांनीच लिहिलेली आहे आणि ही अंतिम स्मृती आहे म्हणजे मग स्मृती लिहिणारे सर्व व्यास होते असे म्हणायचे काय ? असे मानणारे लोक असावेत किंबहुना क्षत्रियांच्या बाजूने स्मृती लिहिणारे जे लोक आहेत त्यांना व्यास म्हटले जात असावे ते व्यास असावेत आणि हीच स्मृतींची एक वेगळी क्षत्रिय परंपरा असावी म्हणूनच वैष्णव लोक धर्माविषयीचा निर्णय घेताना रामायण आणि महाभारत यांना स्मृती मानतात आणि त्यांचे कायदे प्रमाण मानतात त्यानुसार धार्मिक निर्णय घेतात मग त्यांच्यामध्ये महाकाव्यवेगळ्या स्मृती कुठे शिरल्या तर त्या नंतरच्या काळात ब्राह्मण धर्माने घुसवलेल्या असाव्यात हे सांगण्याचे कारण असे की मुळात वैदिक परंपरेतच नंतर हिंसावादी यज्ञ करणारी ब्राह्मण परंपरा विजयी झाली तरी तिला विरोध करणारे काही लोक याज्ञवलकाच्या रूपाने होऊन गेले असे वाटते कालांतराने सर्व ब्राह्मणांनी यज्ञातील हिंसेचा तर त्याग केलाच परंतु मांसाहाराचा त्याग केला आणि श्रमण परंपरेला छेद देण्याचा हा प्रयत्न आहे हे स्पष्ट आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्याला आज आपण शाकाहार वाद म्हणतो त्याचे संपूर्ण श्रेय हे जैन लोकांना द्यावे लागते प्रत्येक धर्माची काही स्वतःचे म्हणून बलस्थाने असतात जैनांच्या धर्माचे बलस्थान कडक ब्रह्मचर्य आणि कडक अहिंसा आहे ह्या दोन तत्त्वांच्यामुळे ते पार्श्वनाथपर्यंत चालत आलेल्या परंपरेपासून आणि वैदिक परंपरेपासून वेगळे होतात आणि स्वतंत्र स्वायत्त असलेल्या अवैदिक जैन धर्माचे सभासद होतात साहजिकच कुठल्याही धर्माचे लोक त्यांच्या धर्माचे जे सत्व असते त्या सत्वात टिकून राहण्याचा प्रयत्न करतात ते सत्व प्राणांतिकपणे टिकून धरण्याचा प्रयत्न करतात जैन धर्मामध्ये आज जो शाकाहारवादाचा अतिरेकीवाद दिसतो आहे तो एका अर्थाने जैन धर्मातील लोकांच्या सत्वाचा त्या सत्वाला टिकवण्याचा प्रयत्न असतो आमच्या धर्माला सन्मान म्हणून तुम्ही दोन दिवस शाकाहारी राहिला तर काय बिघडते असा हा प्रश्न आहे ह्या जैन धर्माला प्रतिस्पर्धी म्हणून बौद्ध धर्म उदयाला आलेला आहे ज्याने जैन धर्माचे वर्चस्व कमी केले पण नंतर जो स्वतःच या देशातून नाहीसा झाला हे एकेकाळचे स्पर्धक असल्याने साहजिकच शाकाहारी विरुद्ध मांसाहार हा संघर्ष नव बौद्ध अटीतटीने लढवताना दिसतात त्यामुळेच सध्या नवबौद्ध विरुद्ध जैन असा संघर्ष निर्माण झालेला दिसतो कारण नवबौद्ध अत्यंत स्पष्ट आणि ठाम पणाने मांसाहारवादाची भूमिका घेताना दिसतात कारण मांसाहार वाद हा बौद्धांना जैनांच्या पासून पूर्णपणे वेगळा काढतो शिवाय कळत नकळत मांसाहार वादामध्ये मुसलमानांच्याप्रमाणे काहींना धर्माचे सत्व आढळते


सर्वसाधारणपणे वेदांचे वर्चस्व संपवण्याचे श्रेय हे जैनांना दिले जाते किंबहुना जैनांनी हे काम उत्कृष्टपणाने करून वैदिक परंपरा संपवली आणि श्रमण परंपरेचा उदय झाला पण या वैदिक परंपरेतच अहिंसेची बीजे ज्याने टाकली त्यात याज्ञवलकाचे नाव आदराने घ्यावी लागते अर्थात बुद्धाआधी कोणी झालेच नाही असे मानणारे लोक आहेतच पण प्रत्यक्ष बुद्ध असे मानताना दिसत नाहीत अलीकडे बळीवंश प्रमोट केला गेला तो बुद्धाचे नाव मिटवण्यासाठी अशीही मांडणी पुढे आली होती प्रत्यक्षामध्ये या वंशामध्ये विरोचन नावाचा बुद्ध होऊन गेलेला आहे असे खुद्द बुद्धच मान्य करतो थोडक्यात काय , कुठे ना कुठेतरी याद्निक हिंसेला विरोध करणारे श्रमण लोकांच्या आधीही होतेच पण या अहिंसेला शाकाहारवादापर्यंत घेऊन जाणे ही किमया फक्त जैन लोकांनाच साधलेली दिसते साहजिकच आज हा शाकाहार वाद हा जैन धर्माचा कणा असल्याच्या थाटात हा वाद लढवला जात आहे 


याचाच एक भाग म्हणून अलीकडे गणपती हा शाकाहारी आहे अशी मांडणी पुढे आलेली आहे ही मांडणी ही ब्राह्मणांनी पुढे आणलेली आहे त्या उलट ज्या शाक्त देवता आहेत किंवा ज्या शाक्तरुपी आहेत त्या मात्र मांसाहाराच्या नैवेद्य प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वीकारत असतात त्यामुळे त्यामुळे शैवधर्माच्या बाबतीत अनेक जण प्रश्न विचारत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की शैव धर्मी लोकांच्या मध्ये शाकाहार आणि मांसाहार दोन्हीही चालतात मुळात इथे भक्त काय खातो हा प्रश्न आहे कारण शेवटी नैवेद्य भक्ताच्या पोटात जातो देवतेच्या पोटात जात नाही साहजिकच प्रसाद म्हणून शाकाहार दाखवावा की मांसाहार दाखवावा हा ती देवता शाकाहारी आहे कि मांसाहारी व तो भक्त काय मानतो त्या भक्ताचा प्रश्न आहे मात्र एक गोष्ट पुन्हा एकदा मर्यादा म्हणून मी माझ्या अनुभवाच्या जोरावर सांगतो आहे ती म्हणजे तुम्ही जर का मोक्षाचे साधक असाल तर मात्र सविकल्प समाधीपर्यंतचा प्रवास हा मांसाहारासकट होऊ शकतो मात्र सविकल्प समाधी आणि निर्वीकल्प समाधी या दोन्ही समाध्या या दोन्ही अंतिम अवस्था ज्या मोक्षरूप असतात मोक्षदायक असतात शाकाहाराशिवाय शक्य होत नाहीत कारण या दोन्ही अवस्थांच्यामध्ये तुम्ही कमालीचे अहिंसक असणे अत्यंत आवश्यक आहे ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचे तर मुंगीवर सुद्धा पाय पडता कामा नये इतके अहिंसक असावे लागते आहारामधली हिंसा ही कळत नकळत तुम्हाला संवेदन बधिर करू शकते तुमच्या संवेदनशीलतेला बधीर करू शकते त्यामुळे तुमच्या साधनेवर परिणाम करू शकते माझ्या आयुष्यात मी अनेक सिद्धांना भेटलेलो आहे त्यातील कुणालाही मी तरी मांसाहार खात खात निर्वी कल्प समाधी मिळालेली ऐकलेली नाही अर्थात ही माझ्या अनुभवाची ही मर्यादा असू शकते आणखी कोणाला काही वेगळा अनुभव आलेला येऊ शकतो. मला तरी तसा अनुभव आलेला नाही मी फक्त इतकेच म्हणेन की प्रत्येक विषय ताणवत नेण्याचा जो प्रकार चाललेला आहे तो बरा नव्हे सुवर्णमध्य हाच आयुष्य जगण्याचा उत्तम मार्ग आहे शाकाहारवादाची टर उडवणे हेही बरे नव्हे आणि मांसाहाराबाबत तो व्यसन झाला तरी त्याचे समर्थन करत राहणे हेही बरे नव्हे शेवटी आयुष्य तुमचे आहे आणि ते जगवायचे कसे ज्याने त्याने ठरवावे मुळात आपल्याला मांसाहार कसा चालतो का चालतो की केवळ बाप मांसाहारी आई मांसाहारी होती म्हणून आपण मांसाहार खातो असेही प्रश्न विचारणे गरजेचे असते अनेकदा मांसाहार केवळ सवय आणि घरातले संस्कार म्हणून चालत आलेला असतो प्रत्यक्षात तो आपल्या शरीराला झेपतो की नाही हे पाहणे खूप आवश्यक आहे शाकाहारवादी लोकांनी जरूर शाकाहारवाद मांडत राहावा त्यासाठी नवे नवे युक्तिवाद शोधावेत पण शाकाहाराची सक्ती करणे मात्र बरे नव्हे शेवटी सक्ती करणे ही हिंसाच नाही काय? कंदमुळांच्या बाबतीत संवेदनशील असलेला मेंदू दुसऱ्या मेंदूंच्या बाबतीत किमान कंदमुळांच्याइतका संवेदनशील असणे योग्य नव्हे काय? माणूस हा अहिंसेबाबत उत्क्रांत होत गेलेला आहे आता अशी उत्क्रांत होण्याची संधी सर्वांनाच देऊ नये काय?


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे