मिती , मितीके (म्हणजे मितिने बद्ध झालेले आकार) आणि दिशा श्रीधर तिळवे नाईक 

आचार्य शंकर यांनी या विश्वाला पाच मिती सांगितलेल्या होत्या अवकाशाच्या तीन काळाची एक आणि दिशा यातील दिशेचा विचार अजूनही स्पष्ट झालेला नाही खुद्द त्यांची याबाबतीतली कागदपत्रे आणि लिखाण आद्य शंकराचार्यांच्या उदयानंतर गायब झालेली आहेत त्यामुळे नेमके काय झाले हे आता कळणे अवघड आहे मात्र आपण आता त्याचा विचार करू शकतो अनेकदा ज्या गोष्टी गहाळ झालेल्या असतात त्या स्वतःला शोधाव्या लागतात 


माझ्या मते दिशा एकमितीय नाही तिच्या आठ मिती आहेत 


१ शिव दिशा किंवा शून्य दिशा ही संपूर्ण शिवांडाला लागू होते संपूर्ण शिवांड हे जेव्हा शून्यात विलीन व्हायला लागते तेव्हा ही निर्माण होते मात्र मोक्ष मिळवणारा माणूस या दिशेने जाणारा असतो साहजिकच तो शून्यवत होत जातो आणि शेवटी शून्याला उपलब्ध होतो 

२ शक्ती दिशा किंवा अनंत दिशा ही अनंताकडे जाणारी दिशा आहे जेव्हा शिवांड आणि त्यातील ब्रम्हांडे ही विस्तार पावत असतात तेव्हा ती शक्ती दिशेने जात असतात आपण सर्व जीव सुद्धा शक्तीच्या दिशेने चाललेलो आहोत विस्तार पावत आहोत आपली वाढ होत असते 

३ वर दिशा :जेव्हा कुठलाही पदार्थ किंवा मितिक स्वतःच्या मितीक बिंदूपासून वर जात असतो तेव्हा ही दिशा निर्माण होते 

४ खाली दिशा :जेव्हा कुठलेही मितिक स्वतःच्या मितीकबिंदूपासून खालच्या दिशेने जात असते तेव्हा ही दिशा निर्माण होते 

५ डावी दिशा जेव्हा मितिक स्वतःच्या मितीकबिंदूपासून डाव्या अंगाच्या दिशेने जात असतो तेव्हा ही दिशा निर्माण होते मी पूर्व असा शब्द मुद्दामच वापरत नाही कारण जी आपली पूर्व असते ती दुसऱ्याची पश्चिम असू शकते आणि त्यामुळे गोंधळ उडू शकतो 

६ उजवी दिशा :जेव्हा मितिक स्वतःच्या मितीकबिंदूपासून उजव्या दिशेने जात असते तेव्हा ही दिशा निर्माण होते 

७ आत दिशा :जेव्हा आकर्षण निर्माण झाल्याने एखादे मितिक स्वतःच्या मितीकबिंदूपासून दुसऱ्याकडे खेचले जात असते किंवा स्वतःलाच त्या दिशेने घेत असते तेव्हा ही दिशा निर्माण होते

८ बाह्य दिशा : जेव्हा मितिक बिंदूपासून प्रतिकर्षण निर्माण होऊन त्या मितीकबिंदूपासून दूर जात असते तेव्हा ही दिशा निर्माण होते 

९ याशिवाय कक्षा ही दिशा मानावी का हा एक फार मोठा प्रश्न आहे ती दिशा स्वीकारली तर मात्र आपल्या दिशा वाढतात आणि मितीची संख्या एका मितीने वाढते

 

कुठल्याही मितिकाच्या संदर्भात आणि त्याच्या गतीच्या आणि वेगाच्या संदर्भात विचार करताना नेहमीच या दिशांच्या नव वा अष्टदिशामितींचा विचार करावा लागतो अवकाशाच्या लांबी रुंदी खोली या तीन आणि काळाच्या भूत भविष्य वर्तमान अशा तीन मिती पकडल्या की मग 14 /१५ मिती आपणाला सहज मिळून जातात आणि ह्यात शक्ती दिशा आणि शिव दिशा या दोन दिशा ऍड केल्या की आपणाला एकूण सोळा मिती मिळतात हे भवताल आणि संसार या १६/१७मितींच्या आधारे चाललेला आहे . याशिवाय अर्थातच विज्ञानाला आणखीन काही मिती सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा उद्या विज्ञान यातील काही मिती मोडीत सुद्धा काढू शकते . विज्ञान ही सतत उत्क्रांत होणारी ज्ञानाची प्रोसेस आहे या सगळ्या मितींचा विशेष पुरावा मिळत नाही तोपर्यंत कुठलीही मिती स्वीकारली जाणार नाही हे तर उघडच आहे कोणाला हा विचार अतिशय बाळबोध सुद्धा वाटू शकतो आणि तो बाळबोध असण्याची शक्यताही नाकारता येत नाही विज्ञान हे नेहमीच खुले असले पाहिजे असे मी मानतो खरे तर हे मी लिहिले नसते पण झाले असे आहे की आयुष्य फार कमी उरलेले आहे त्यामुळे जितके फेकता येईल तितके फेकून द्यावे असे आता वाटते. 

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे