काँग्रेस ,भारतीय स्वातंत्र्य चळवळ : नोकर वादाकडून हिंदुत्ववादाकडे श्रीधर तिळवे नाईक 


भारतीय इतिहासाची मांडणी करताना काँग्रेस या संस्थेचे काम नेहमीच महत्त्वाचे मानले गेले आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामध्ये मुख्य संघटना म्हणून कायमच काँग्रेसला मान्यता दिली गेली आहे आणि ते योग्य आहे . परंतु या अंगाने जे प्रश्न निर्माण होतात त्यातील काही प्रश्न मात्र जाणीवपूर्वक साईडलाईन केले जातात त्यातील पहिला प्रश्न म्हणजे खरोखर काँग्रेस सुरुवातीपासूनच स्वातंत्र्यवादी होती का? कि ती फक्त उच्चवर्णीय ब्राह्मणांचे आणि क्षत्रियांचे आणि उच्च मुस्लिमांचे पारशी लोकांचे हितसंबंध सांभाळणारी उच्चवर्णीय उच्च धर्मीय प्रस्थापित लोकांची संघटना होती?


आपण जर का या संदर्भामध्ये स्थापना कोणी केली हे पाहिले तर तिथे ब्रिटिश लोकांच्या नोकर लोकांनी ही संघटना स्थापन केली हे आपण लक्षात घेतले पाहिजे म्हणजे सुरुवातच ब्रिटिश सेवक संघाकडून झालेली आहे ही स्थापना का केली गेली? तर या संदर्भामध्ये अत्यंत स्पष्टपणे ॲलन ह्युम या काँग्रेसच्या संस्थापकाने मांडणी केलेली आहे त्या मांडणीचा सारांश सर्वत्र उपलब्ध आहे भारतामध्ये १८५७ ला जे बंड झाले त्या बंडाचा फटका सर्वाधिक जर कोणाला बसला असेल तर तो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करणाऱ्या नोकर लोकांना.! प्राण गेले ते या नोकर लोकांचे गेले इंग्लंडमध्ये बसलेल्या राजे आणि राजेशाहीत वावरणाऱ्या लोकांचे गेले नाहीत. साहजिकच भारतात काम करणाऱ्या सेवकांना एक गोष्ट नेहमीच सतावत होती ती म्हणजे जर का भारतामध्ये १८५७ सारखे बंड झाले तर आपल्या प्राणाच्या सुरक्षिततेचे काय? या संदर्भातली कसलीही गॅरंटी इंग्लंड मधल्या राजवटीने घेतलेली नव्हती हे लक्षात घेतले पाहिजे किंबहुना भारतामध्ये येणे ही एक अशी रिस्क होती जी घेण्यापूर्वी तुमचा तुम्हीच विचार करा आम्ही फक्त पॅकेज देऊ असा एक अलिखित करार इंग्लंडचे सरकार आणि भारतामधल्या ब्रिटिश राजवटीत काम करणाऱ्या अधिकारी आणि कामगारांच्यामध्ये होता कारण शेवटी ही राजवट इंग्लंडच्या सरकारचा विस्तार साम्राज्यशाही विस्तार होती. प्रत्यक्षात जरी ती ईस्ट इंडिया कंपनी या व्यापारी संघटनेने स्थापन केली होती तरी! जगाच्या इतिहासामध्ये ज्या काही विचित्र गोष्टी क्षत्रिय लोक करत असतात त्यातली एक गोष्ट म्हणजे व्यापारी लोकांनी आपल्या मेहनतीने साकार केलेल्या संघटना आणि त्यांनी बळकावलेले क्षेत्र यामध्ये जमीन पण येते केवळ दादागिरी करून किंवा कायदेशीर दादागिरी करून स्वतःच्या ताब्यात घेणे ! म्हणजे "सेवा करा तुम्ही मेवा खाऊ आम्ही" ही पॉलिसी कायमच जगातल्या सर्व क्षत्रियांची राहिलेली आहे . कसलेही श्रम न करता जास्तीत जास्त संपत्ती बळकवण्याचा उद्योग म्हणजे म्हणजे शासन उद्योग होय असे मानावयास बरीचशी जागा निर्माण आहे आणि या मागचा सर्वात मोठा पुरावा हा युरोप मधल्या व्यापारी कंपन्यांनी बळकावलेली कॉलनीज आणि त्यांचे क्षेत्र यांची युरोपमधल्या ऐतखाऊ व सिंहासनावर बसलेल्या राजवटींनी केलेली बळकावणी होय . व्यापारी लोकांच्या कंपन्यांनी स्थापन केलेल्या या राजवटी पुन्हा त्यांच्याकडून राज्य या संस्थेने राष्ट्रीय संस्थेने कशा काढून घेतल्या बळकावल्या हे पाहिले की माझे म्हणणे सहज सिद्ध होईल . ही एक प्रोसेस आहे जिच्याकडे इतिहासकारांचे लक्ष जात नाही कारण इतिहासकार नेहमी क्षत्रियधार्जिणे असतात या काळात तर ते विशेषतः अधिक जास्त होते कारण बहुतेक इतिहासकार परंपरा वाद, राजेशाही वाद ,समाजवाद आणि मार्क्सवाद यांच्या प्रभावाखाली होते जे पूर्णपणे उद्योगपतींच्या आणि वैश्य लोकांच्या विरोधात होते व्यापारी लोकांच्या विरोधात होते शासन ही संस्था किती वाईट असते किंवा किती दादागिरी करणारे असते हे या लोकांच्या कधीही लक्षात आले नाही आणि त्यातूनच नंतर कम्युनिस्ट राजवटीत प्रचंड मोठ्या शोषणयंत्रणा शासन यंत्रणेच्या नावाने उभ्या राहिल्या. या राजवटींच्या मध्ये आणि युरोपमध्ये धर्माच्या नावाने उभ्या राहिलेल्या धार्मिक राजवटींच्या मध्ये त्यांच्या शासन यंत्रणेमध्ये फारसा फरक नव्हता हे स्पष्ट आहे फक्त तिथे धर्म ही राजकीय प्रणाली होती त्यानंतर पुरोगामी कालखंडात मार्क्सवाद ही राजकीय प्रणाली आली . मार्क्सवाद ही आर्थिक प्रणाली आहे असा एक फार मोठा गैरसमज आपल्याकडे झालेला आहे. प्रत्यक्षात ती एक नवीन राजकीय विचार प्रणाली आहे आणि नवीन राजकीय शासन यंत्रणा निर्माण करणे हेच मार्क्सवादाचे अंतिम उद्दिष्ट होते आणि त्याने ते रशियामध्ये आणि नंतर चीनमध्ये साध्य केले जगात सर्वत्रच डाव्या राजवटी यानंतरच आलेल्या दिसतात कारण मुळातच ही विचार प्रणाली राजकीय विचारप्रणाली आहे आणि म्हणूनच तिच्या नावाने क्रांत्या पण झाल्या कारण सत्तापिपासु लोक जे त्या त्या देशाच्या राजकारणात साईडलाईन झालेले असतात सर्वच ठिकाणी असतात आणि त्यांना क्रांती करणे ही सत्ता मिळवण्याची एक शक्यता वाटत असते म्हणूनच राजकीय क्रांती होतात किंबहुना ब्राह्मण लोकांच्याकडे राजकीय सत्ता स्थापन करण्याचा दुसरा कुठलाही वाद ब्रिटिश कालखंडामध्ये दुसरा कुठला वादच नव्हता म्हणून त्यांनी मार्क्सवादी राजकीय विचार प्रणाली स्वीकारली जेणेकरून शासन यंत्रणा पुन्हा एकदा आपल्या ताब्यात यावी . पुरोगामी साम्राज्यवाद हा भांडवलवाद या राजकीय प्रणाली मधून उभा राहिलेला आहे आणि होता . साहजिकच राजकीय भांडवल वादाने ज्यांना कोणाला या संदर्भात अधिक तपासणी करायची आहे त्यांनी एकदा या काळामध्ये युरोप मधल्या राज्यकर्त्या लोकांनी विशेषत: राजे लोकांनी कुठे कुठे आणि कधी कधी कशा कशा इन्वेस्टमेंट केल्या होत्या कुठले कुठले व्यापारी लोकांच्या बरोबर करार केले होते याचा इतिहास एकदा तपासून पहावा म्हणजे मग सर्व काही कळेल किंबहुना वास्को द गामासारख्या लोकांना लागणारा फायनान्स अनेकदा राजकारणातल्या लोकांनी पुरवलेला आहे याचे सर्वात मोठे कारण या लोकांना त्यामध्ये जास्त कष्ट न करता अधिकाधिक पैसे मिळण्याची संपत्ती मिळण्याची शक्यता वाटत होती. हे एका अर्थाने आजच्या काळातल्या शेअर होल्डर सारखे आहेत आजही राजकारणी लोकांची ही प्रवृत्ती कमी झालेली आहे असे नाही दुर्दैवाने या प्रवृत्तीकडे खूप कमी लोकांचे लक्ष असते . राजकारणी म्हणजे कमीत कमी श्रमात व्यापार करणारी व्यापारी जमात हे जे नवसमीकरण आहे ते आजचे राजकारण पाहिले की जास्त चांगले कळते आणि त्याची सुरुवात प्रथम युरोपमध्ये झाली होती आणि ती तत्कालीन राजे लोकांनी केली होती . भारतामध्ये सुद्धा वर्ण आणि जाती या व्यापाराला अडचण आहेत हे लक्षात आल्याने त्या विरोधात संपूर्ण व्यापारी समाज आणि राजकारणी ज्यांना व्यापार काय आहे हे कळाले होते ते या व्यवस्थेच्या विरोधात उभे राहिले पुढेही ते उभे राहतीलच मग भाजप काय पण म्हणो. याचे कारण स्किल लेबर ही भांडवलशाहीची कार्पोरेटशाहीची आद्य गरज आहे आणि ती अशी जात आणि वर्ण निगडीत ठेवून चालूच शकत नाही त्यांच्याविना कार्पोरेट शाही चालू शकत नाही कारण कुठल्या गोष्टीचे कौशल्य कोणा मध्ये आढळेल हे सांगता येत नाही जात आणि वर्ण अशी बंधने घालून भांडवलशाही स्वतःलाच लिमिटेड करू शकत नाही आणि म्हणूनच वर्ण जात विरोधी जो लढा व्यापारी उद्योगपती लोकांचा सातत्याने चाललेला असतो तो या अंगाने चाललेला असतो. विशेषतः युरोप मधले भांडवलदार याबाबतीत अधिक शहाणे होते. गांधीजींनी आपल्या भांडवलदारांना शहाणे करायचा प्रयत्न केला पण तो किती यशस्वी झाला हा प्रश्न आहे पण इतर कोणापेक्षाही गांधीजी अधिक यशस्वी झाले.


या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्यलढा पहावा लागतो . प्रश्न असा होता की ब्राह्मणांची या सगळ्या नवीन व्यवस्थेमध्ये काय भूमिका राहणार? या काळात माझे स्वतःचे घराणे व्यापाराकडे वळलेले आहे रवींद्रनाथ टागोर यांची फॅमिली सुद्धा अशी वळलेली पण आश्चर्यकारित्या या लोकांना मग वैश्य असा स्टॅम्प मारलेला दिसतो आणि ब्राह्मण या जातीच्या बाहेर पण काढलेले दिसते कारण या गोष्टीकडे मग अ धर्म म्हणून पाहिले गेले आणि या सर्व लोकांची वर्णच्युती केली गेली हीच गोष्ट माहेश्वरी ब्राह्मणांची पण आहे त्यांना मग मारवाडी अशी संज्ञा देऊन टाकली त्यांना कोणीही ब्राह्मण असं म्हणत नाही . त्यामुळे जे व्यापाराकडे गेले ते ब्राह्मण ब्राह्मण राहिलेच नाहीत अनेकदा त्यांच्यावर बहिष्कार पडून ते वैश्य झालेले दिसतात पण जे ब्राह्मण ब्राह्मण राहिले आणि जे शासनामध्ये काम करत होते त्यांचे काय ? साहजिकच मग व्यापार न करता येणाऱ्या किंवा ज्यांना व्यापार करायचा नाही अशा ब्राह्मणांनी करायचे काय असा प्रश्न होता ?आणि या अंगाने हे सर्व लोक ब्रिटिश शासन यंत्रणेत कशी जागा मिळवायची याची चाचपणी करत होते आणि त्याच वेळेला नेमकी काँग्रेसची स्थापना अँलन ह्युम याने केली म्हणजेच एकीकडे ब्रिटिश राजवटीत प्राणाची सुरक्षितता नसलेले असुरक्षित झालेले इंग्रज अधिकारी आणि दुसरीकडे ज्यांना अधिकारी बनायचे आहे परंतु ज्यांना शासनात प्रतिनिधित्व मिळत नाही असे वाटत होते असे व ब्राह्मण आणि इतर उच्च वर्गीय माजी अधिकारी जे पूर्वीच्या प्राचीन शासकीय संस्थेमध्ये काम करत होते असे एकत्र आले आणि मग काँग्रेस वाढत गेली ही काँग्रेस नोकरवादी होती साहजिकच काँग्रेसची सुरुवात नोकरवादापासून झाली हा नोकर वाद काय होता तर जास्तीत जास्त चांगली नोकरी प्रस्थापित ब्रिटिश शासनामध्ये मिळवणे आणि ब्रिटिश शासनामध्ये अधिकाधिक उच्च जागा घेतल्या देशी लोकांना मिळाव्यात म्हणून प्रयत्न करणे. जेव्हा मुस्लिम या देशांमध्ये आले तेव्हा ब्राह्मणांनी हेच केले होते तेच आता पुन्हा एकदा ब्रिटिश राजवटीत सुरू झाले .त्यासाठी स्वतःचे पुरेसे ब्रिटिशीकरण करणे आवश्यक होते आणि हे काँग्रेसमध्ये करणारे लोक होते ज्यांनी स्वतःला ब्रिटिश केले. या लोकांना काळे इंग्रज म्हटले जाते आणि ते काँग्रेसमध्ये भरपूर होते . या लोकांना कुठलेही स्वातंत्र्य नको होते त्यामुळे काँग्रेस जी आता आम्ही स्वातंत्रवादी म्हणून डिंगा मारते त्यात काहीही अर्थ नाही काँग्रेस काही स्वातंत्र्यासाठी सुरू झाली नव्हती आणि काँग्रेसमध्ये हा दम कधीच नव्हता मग हा दम आणला कोणी ? तर हा दम लोकमान्य टिळक यांनी आणला तो त्यांनी कसा आणला हे मी फेसबुक वर अतिशय व्यवस्थित साधारण शंभर एक लेख लिहून सिद्ध केलेले आहे आणि म्हणूनच मी म्हटलेले आहे की लोकमान्य टिळक हे आद्य हिंदू सम्राट होते पण फक्त टिळकच असे होते का ? ज्याला स्वातंत्र्याचा लढा म्हणावा असा ऑफिशियल लढा टिळक यांनी सुरू केला ही वस्तुस्थिती आहे त्यांच्या आधीही होऊन गेलेले त्यांचे पूर्वज काही होते परंतु ब्रिटिशांच्या विरोधातला लोकशाही पद्धतीचा लढा लढला पाहिजे हे कळलेले लोकमान्य टिळक पहिलेच होते . मात्र त्याआधी यशवंतराव होळकर यांच्यापासून ते अनेक बिरसा मुंडा सारख्या आदिवासी लोकांच्यापर्यंत ब्रिटिश राजवटीला ती येण्याआधीच किंवा ते अस्तित्वात आल्या आल्या अनेक लोकांनी प्रतिकार केलेला आपल्याला दिसतो आपल्याकडे वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक मांडले जाते ते पूर्णपणे चुकीचे आहे त्यांचे आधी कितीतरी आदिवासी नेते असे होऊन गेले ज्यांनी ब्रिटिशांना हाकलून देण्याचा प्रयत्न केला. पण हे सर्व प्रतिकार होते त्या उलट लोकमान्य टिळक जे करत होते ते ओळखून होते की मूळ जी शासन संस्था आहे ती भारतामध्ये नसून इंग्लंडमध्ये आहे. आणि आपल्याला प्रतिकार करताना तो सर्वांगीण पद्धतीने करावा लागेल आणि लोकशाही पद्धतीने करावा लागेल.


प्रश्न असा आहे फक्त मराठी ब्राह्मणांनाच असे स्वातंत्र्य का हवेसे वाटले ? याचे कारण तपशीलवार मी पूर्वी दिलेलेच आहे पण आता थोडक्यात सांगतो . उत्तर पेशवाई मध्ये आपणाला असे दिसते की ब्राह्मण धर्माला प्रचंड मोठा शासन यंत्रणेमध्ये वाटा मिळाला होता आणि संपूर्ण शासन हे ब्राह्मण धर्माच्या आणि ब्राह्मण लोकांच्या हातात आले होते साहजिकच जेव्हा ब्रिटिशांचा शेवटचा लढा झाला तो पेशवे लोकांशी आणि यशवंतराव होळकर यांच्या बरोबर झाला म्हणजेच अंतिम लढाई जी होती ती कळत नकळत महाराष्ट्रातले ब्राह्मण आणि इंग्रजांच्यात होती किंवा मग मराठी शैव आणि इंग्रजांच्यात होती यामध्ये जे शैव होते ते कळत नकळत शेवटी पराभव स्वीकारून बसले 1857 स*** त्यांनी शेवटचा प्रयत्न केला त्यानंतर मात्र सर्वच राजवटी शरण गेल्या. ही सर्व संस्थाने ब्रिटिशांच्या अंकित झाली पण ब्राह्मणांचे तसे नव्हते त्यांच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी गेल्या होत्या त्यामध्ये उच्चपदे होती आणि म्हणूनच त्यांना एक गोष्ट हळूहळू लक्षात आली की केवळ प्रशासन यंत्रणा आपल्या हातात असून चालणार नाही तर आपल्या हातात संपूर्ण शासन यंत्रणाच असायला हवी आणि ती आपणाला लोकशाही पद्धतीने चालवावी लागणार हे कळलेले पहिले द्रष्टे म्हणून आपणाला लोकमान्य टिळक यांचे नाव घ्यावे लागते. लोकमान्य टिळक हे कट्टर हिंदुत्ववादी होते पण फक्त तेच असे होते का तर नाही त्यांच्या बरोबरीने जे लाला लजपतराय आणि बिपिनचंद्र पाल होते हे सुद्धा हिंदुत्ववादी होते आणि याच लोकांना स्वातंत्र्य चळवळ चालवण्याची गरज वाटत होती कारण या लोकांना हे कळून चुकले होते की फक्त प्रशासन यंत्रणा ताब्यात असून चालणार नाही तर शासन यंत्रणा सुद्धा आपल्या ताब्यात असायला हवी . साहजिक हे कळालेले स्वातंत्र्यवादी लोक जहालवादी म्हणून ओळखले जाऊ लागले होते त्या उलट जे नोकरवादी होते ते फक्त आपल्याला ब्रिटिश शासन यंत्रणेमध्ये जास्तीत जास्त काय पदरात पाडून घेता येईल याचाच विचार करत होते या लोकांना नोकऱ्यांची संख्या वाढवा हिंदुस्तानी नोकर वाढवा अशा प्रकारच्या मागण्या ज्या सुचत होत्या त्या याच अंगाने सुचत होत्या शिवाय कळत नकळत ब्रिटिशांचे राज्य ही आपल्यावर झालेली कृपा आहे असा मानणारा हा एक वर्ग होता त्यात तथ्य नव्हते अशा भाग नाही अगदी महात्मा फुले सुद्धा असे समजत होते ती उलथून ट**** म्हणजे त्याला पर्यायी शासन देणे असे होते आणि पर्यायी शासन यंत्रणा देण्याची कसलीही व्यवस्था त्या काळामध्ये कोणाकडेच नव्हती जे कोणी संस्थानिक होते तशा प्रकारची संस्थाने राजकारणात आली तर तर पुन्हा एकदा आपण दहाव्या शतकात जाऊ पेशवाई मध्ये जाऊ किंवा मग ब्रिटिश पुन्हा येऊन आपल्याला सहज हारवून पुन्हा ही संस्थाने ताब्यात घेतील असेच सगळ्यांना वाटत होते त्यामुळे कोणीही या गोष्टीला तयार नव्हते म्हणजेच हे जे नोकरवादी लोक होते त्यांना ब्रिटिश शासन यंत्रणा हवी होती त्या यंत्रणेकडून मिळणारे सर्व फायदे हवे होते त्यांना या फायद्याचे बलिदान द्यायचे नव्हते त्याउलट लोकमान्य टिळक असे होते की ज्यांनी तुरुंगात जाण्याची सुद्धा तयारी ठेवली होती भारतामध्ये लोकमान्य टिळकांच्या आधी सुद्धा अनेक प्रतिकार उभे राहिले परंतु हे प्रतिकार प्रस्थापित होऊ घातलेल्या नव्या व्यवस्थेला केलेला प्रतिकार होता त्याउलट ब्रिटिश व्यवस्था भारतामध्ये प्रस्थापित झाल्यानंतर काँग्रेसने उभा केलेल्या प्रतिकार हा त्या ब्रिटिश प्रस्थापित व्यवस्थेच्या साम्राज्यशाही विरोधात होता त्याआधी झालेला प्रतिकार हा आक्रमक ब्रिटिश व्यवस्थेच्या विरोधात होता ब्रिटिश व्यवस्था जिथे प्रस्थापित झाली नव्हती अशा सर्व आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी लोकांनी या काळामध्ये बंड केलेले दिसते अनेक आदिवासी लडाखू लोक या काळामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात उभे राहिलेले दिसतात हे सर्वच आद्य क्रांतिकारक होते त्यामध्ये वासुदेव बळवंत फडके यांचा नंबर खूप नंतर आहे त्यांच्या आधीच खूप आदिवासी लोकांनी प्रतिकार केला होता यामधला सर्वात उत्तम संघटित प्रतिकार हा यशवंतराव होळकर यांचा होता पण हा प्रतिकार ती व्यवस्था काय आहे हे समजून झाला नव्हता त्या उलट लोकमान्य टिळक ज्या प्रतिकाराची भाषा करत होते तो प्रतिकार ब्रिटिश शासन यंत्रणा काय आहे हे समजून झालेला प्रतिकार होता पण हा सर्व प्रतिकार हा जहालवादी आणि हिंदुत्ववादी लोकांनी केलेला आहे . म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीची जर का आपण मीमांसा करायला गेलो तर हे आपणाला म्हणावे लागते की भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीची पायाभरणी ही हिंदुत्वाने केलेली आहे आणि हे हिंदुत्व लोकमान्य टिळक लाला लजपतराय जे आर्य समाजाशी निगडित होते आणि बिपिन चंद्र पाल यांचे आहे लाल बाल पाल या नावाने हे प्रसिद्ध आहे पण हे हिंदुत्ववादी होते हे मात्र कोणी सांगत नाही . आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की खुद्द हिंदुत्ववादी लोकांच्याकडे सुद्धा प्रॉपर इतिहासकार नाहीत त्यामुळे ते ही मांडणी करतच नाहीत 


थोडक्यात काय हिंदुत्ववादी लोकांचे योगदान स्वातंत्र्य चळवळीमध्ये काय आहे हे विचारणारे लोक भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास नीट वाचत नाहीत ते लोकमान्य टिळक यांचे लिखाण वाचत नाहीत नाहीतर त्यांना हे कळाले असते की टिळकांनी हिंदुत्व या नावाचा एक निबंधच लिहिलेला आहे आता या पुढची स्टेप म्हणून कदाचित तुम्ही लाल बाल पाल सुद्धा इतिहासामधून बघायला बघाल आणि ते कसे ब्राह्मणी दृष्टिकोनाचे होते हेही सांगा परंतु तसेच सिद्ध झाले तरी स्वातंत्र चळवळीचा पाया हा या हिंदुत्ववादी असलेल्या तिघांनी घातला हे तुम्हाला कधीही नाकारता येणार नाही आणि महात्मा गांधी सुद्धा सुरुवातीच्या कालखंडामध्ये हिंदूवादी किती आणि हिंदुत्ववादी किती होते हे एकदा आपण तपासले पाहिजे माझे स्वतःचे मत असे आहे की सुरुवातीच्या कालखंडामध्ये विशेषतः पहिल्या पाच वर्षात गांधी सनातन हिंदूच म्हणवून घेत होते मात्र ते अधिक व्यापक होते टिळकांचाच लढा त्यांनी अधिक व्यापक केला मात्र हळूहळू ते हिंदुत्ववादाकडून हिंदू वादाकडे सरकत गेले सनातन कर्मठ हिंदू राहण्यापेक्षा अधिक मोकळे होत गेले सेक्युलर होत गेले मात्र गांधीजींच्या नेतृत्वाला त्या काळात मिळालेल्या एकमेव पाठिंबा हा लोकमान्य टिळक यांचा होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे 


थोडक्यात काय भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये हिंदुत्ववादी लोकांचे योगदान विचारणाऱ्या लोकांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा पायाच मुळात हिंदुत्ववादी लोकांनी घातलेला आहे तुम्हाला हे सत्य आवडो अगर न आवडो. 


श्रीधर तिळवे नाईक


काँग्रेस ,भारतीय स्वातंत्र्य चळवळ : नोकर वादाकडून हिंदुत्ववादाकडे श्रीधर तिळवे नाईक 


भारतीय इतिहासाची मांडणी करताना काँग्रेस या संस्थेचे काम नेहमीच महत्त्वाचे मानले गेले आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामध्ये मुख्य संघटना म्हणून कायमच काँग्रेसला मान्यता दिली गेली आहे आणि ते योग्य आहे परंतु या अंगाने जे प्रश्न निर्माण होतात त्यातील काही प्रश्न मात्र जाणीवपूर्वक साईडलाईन केले जातात त्यातील पहिला प्रश्न म्हणजे खरोखर काँग्रेस स्वातंत्र्यवादी मुळात होती का? किती फक्त उच्चवर्णीय ब्राह्मणांचे आणि क्षत्रियांचे आणि उच्च मुस्लिमांचे पारशी लोकांचे हितसंबंध सांभाळणारी संघटना होती?


आपण जर का या संदर्भामध्ये स्थापना कोणी केली हे पाहिले तर तिथे ब्रिटिश लोकांच्या नोकर लोकांनी ही संघटना स्थापन केली हे आपण लक्षात घेतली पाहिजे म्हणजे सुरुवातच ब्रिटिश सेवक संघाकडून झालेली आहे ही स्थापना का केली गेली? तर या संदर्भामध्ये अत्यंत स्पष्टपणे ॲलन होऊन या काँग्रेस च्या संस्थापकाने मांडणी केलेली आहे त्या मांडणीचा सारांश सर्वत्र उपलब्ध आहे भारतामध्ये 1857 स*** जे बंड झाले त्या बंडाचा फटका सर्वाधिक जर कोणाला बसला असेल तर तो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करणाऱ्या नोकर लोकांना.! प्राण गेले ते या नोकर लोकांचे गेले इंग्लंडमध्ये बसलेल्या लोकांचे गेले नाहीत. साहजिकच भारतात काम करणाऱ्या सेवकांना एक गोष्ट नेहमीच सतावत होती ती म्हणजे जर का भारतामध्ये 1857 सारखे बंद झाले तर बंड झाले तर आपल्या प्राणाच्या सुरक्षिततेचे काय? या संदर्भातली कसलीही गॅरंटी इंग्लंड मधल्या राजवटीने घेतलेली नव्हती हे लक्षात घेतले पाहिजे किंबहुना भारतामध्ये येणे ही एक अशी रिस्क होती जी घेण्यापूर्वी तुमचा तुम्हीच विचार करा असा एक अलिखित करार इंग्लंडचे सरकार आणि भारतामधल्या ब्रिटिश राजवटी यांच्यामध्ये होता कारण शेवटी ही राजवट इंग्लंडच्या सरकारचा विस्तार होता प्रत्यक्षात जरी ती ईस्ट इंडिया कंपनी या व्यापारी संघटनेने स्थापन केली होती तरी! जगाच्या इतिहासामध्ये ज्या काही विचित्र गोष्टी क्षत्रिय लोक करत असतात त्यातली एक गोष्ट म्हणजे व्यापारी लोकांनी केलेल्या आपल्या मेहनतीने साकार केलेल्या संघटना आणि त्यांनी बळकावलेले क्षेत्र यामध्ये जमीन पण येते स्वतःच्या ताब्यात घेणे ! म्हणजे सेवा करा तुम्ही मेवा खाऊ आम्ही ही पॉलिसी कायमच या देशातल्या क्षत्रियांची आणि जगातल्या सर्व क्षत्रियांची राहिलेली आहे . कसलेही श्रम न करता जास्तीत जास्त संपत्ती बळकवण्याचा उद्योग म्हणजे म्हणजे शासन उद्योग होय असे मानावयास बरीचशी जागा निर्माण होते. आणि या मागचा सर्वात मोठा पुरावा हा युरोप मधल्या व्यापारी कंपन्यांनी बळकावलेली राज्य आणि त्यांचे क्षेत्र यांची युरोपमधल्या ऐतखाऊ व सिंहासनावर बसलेल्या राजवटींनी केलेली बळकावणी होय . व्यापारी लोकांच्या कंपन्यांनी स्थापन केलेल्या या राजवटी पुन्हा त्यांच्याकडून राज्य या संस्थेने राष्ट्रीय संस्थेने कशा काढून घेतल्या बळकावल्या हे पाहिले की माझे म्हणणे सहज सिद्ध होईल . ही एक प्रोसेस आहे जिच्याकडे फारसी इतिहासकारांच्याकडे इतिहासकारांचे लक्ष जात नाही कारण इतिहासकार नेहमी क्षत्रियधार्जिणे असतात या काळात तर ते विशेषतः अधिक जास्त होते कारण बहुतेक इतिहासकार समाजवाद आणि मार्क्सवाद यांच्या प्रभावाखाली होते जे पूर्णपणे उद्योगपतींच्या आणि वैश्य लोकांच्या विरोधात होते व्यापारी लोकांच्या विरोधात होते शासन ही संस्था किती वाईट असते किंवा किती दादागिरी करणारे असते हे या लोकांच्या कधीही लक्षात आले नाही ते मुळात महाराष्ट्रच लक्षात आले नाही आणि त्यातूनच नंतर कम्युनिस्ट राजवटीत प्रचंड मोठ्या शोषणयंत्रणा शासन यंत्रणेच्या नावाने उभ्या राहिल्या. या राजवटींच्या मध्ये आणि युरोपमध्ये धर्माच्या नावाने उभ्या राहिलेल्या धार्मिक राजवटींच्या मध्ये त्यांच्या शासन यंत्रणेमध्ये फारसा फरक नव्हता हे स्पष्ट आहे फक्त तिथे धर्म ही राजकीय प्रणाली होती त्यानंतर पुरोगामी कालखंडात मार्क्सवाद ही राजकीय प्रणाली आली .ती आर्थिक प्रणाली आहे असा एक फार मोठा गैरसमज आपल्याकडे झालेला आहे आणि होता प्रत्यक्षात एक नवीन राजकीय विचार प्रणाली आणि नवीन राजकीय शासन यंत्रणा निर्माण करणे हेच मार्क्सवादाचे अंतिम उद्दिष्ट होते आणि त्याने ते रशियामध्ये आणि नंतर चीनमध्ये साध्य केले जगात सर्वत्रच डाव्या राजवटी यानंतरच आलेल्या दिसतात कारण मुळातच ही विचार प्रणाली राजकीय विचारप्रणाली आहे आणि म्हणूनच तिच्या नावाने क्रांत्या पण झाल्या कारण सत्तापिपासु लोक सर्वच ठिकाणी असतात किंबहुना ब्राह्मण लोकांच्याकडे राजकीय सत्ता स्थापन करण्याचा ब्रिटिश कालखंडामध्ये दुसरा कुठला वादच नव्हता म्हणून त्यांनी मार्क्सवादी राजकीय विचार प्रणाली स्वीकारली जेणेकरून शासन यंत्रणा पुन्हा एकदा आपल्या ताब्यात यावी . पुरोगामी साम्राज्यवाद हा भांडवल वाद या राजकीय प्रणाली मधून उभा राहिलेला आहे आणि होता . साहजिकच राजकीय भांडवल वादाने ज्यांना कोणाला या संदर्भात अधिक तपासणी करायची आहे त्यांनी एकदा या काळामध्ये युरोप मधल्या राज्यकर्त्या लोकांनी विशेषता राजे लोकांनी कुठे कुठे आणि कधी कधी कशा कशा इन्वेस्टमेंट केल्या होत्या कुठले कुठले व्यापारी लोकांच्या बरोबर करार केले होते याचा इतिहास एकदा तपासून पहावा म्हणजे मग सर्व काही कळेल किंबहुना वास्को दगामासारख्या लोकांना लागणारा फायनान्स अनेकदा राजकारणातल्या लोकांनी पुरवलेला आहे याचे सर्वात मोठे कारण या लोकांना त्यामध्ये जास्त कष्ट न करता अधिकाधिक पैसे मिळण्याची संपत्ती मिळण्याची शक्यता वाटत होती. आजही राजकारणी लोकांची ही प्रवृत्ती कमी झालेली आहे असे नाही दुर्दैवाने या प्रवृत्तीकडे खूप कमी लोकांचे लक्ष असते . राजकारणी म्हणजे कमीत कमी श्रमात व्यापार करणारी व्यापारी जमात हे जे नवसमीकरण आहे ते आजचे राजकारण पाहिले की जास्त चांगले कळते आणि त्याची सुरुवात प्रथम युरोपमध्ये झाली होती आणि ती तत्कालीन राजे लोकांनी केली होती . भारतामध्ये सुद्धा वर्ण आणि जाती या व्यापाराला अडचण आहेत हे लक्षात आल्याने त्या विरोधात संपूर्ण व्यापारी समाज आणि राजकारणी ज्यांना व्यापार काय आहे हे कळाले होते ते या व्यवस्थेच्या विरोधात उभे राहिले पुढेही ते उभे राहतीलच मग भाजप काय पण म्हणो. याचे कारण स्किल लेबर ही भांडवलशाहीची आद्य गरज आहे आणि ती अशी जात आणि वर्ण निगडीत ठेवून भांडवलशाही चालूच शकत नाही कार्पोरेट शाही चालू शकत नाही कारण कुठल्या गोष्टीचे कौशल्य कोणाचा आढळेल हे सांगता येत नाही जात आणि वर्ण अशी बंधने घालून भांडवलशाही स्वतःलाच लिमिटेड करू शकत नाही आणि म्हणूनच वर्ण जात विरोधी जो लढा व्यापारी उद्योगपती लोकांचा सातत्याने चाललेला असतो तो या अंगाने चाललेला असतो. विशेषतः युरोप मधले भांडवलदार याबाबतीत अधिक शहाणे होते. गांधीजींनी आपल्या भांडवलदारांना शहाणे करायचा प्रयत्न केला पण तो किती यशस्वी झाला हा प्रश्न आहे पण इतर कोणापेक्षाही गांधीजी अधिक यशस्वी झाले.


या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्यलढा पहावा लागतो . प्रश्न असा होता की ब्राह्मणांची या सगळ्या नवीन व्यवस्थेमध्ये काय भूमिका राहणार? माझे स्वतःचे घराणे व्यापाराकडे वळलेले आहे रवींद्रनाथ टागोर यांची फॅमिली सुद्धा अशी वळलेली पण आश्चर्यकारित्या या लोकांना मग वैश्य असा स्टॅम्प मारलेला दिसतो आणि ब्राह्मण या जातीच्या बाहेर पण काढलेले दिसते हीच गोष्ट माहेश्वरी ब्राह्मणांची पण आहे त्यांना मग मारवाडी अशी संज्ञा देऊन टाकली कोणीही ब्राह्मण असं म्हणत नाही . त्यामुळे जे व्यापाराकडे गेले ते ब्राह्मण ब्राह्मण राहिलेच नाहीत अनेकदा त्यांच्यावर बहिष्कार पडून ते वैश्य झालेले दिसतात पण जे ब्राह्मण ब्राह्मण राहिले आणि जे शासनामध्ये काम करत होते त्यांचे काय आणि या अंगाने हे सर्व लोक चाचपणी करत होते आणि त्याच वेळेला नेमकी काँग्रेसची स्थापना अँलन ह्युम याने केली म्हणजेच एकीकडे ब्रिटिश राजवटीत प्राणाची सुरक्षितता नसलेले असुरक्षित झालेले इंग्रज अधिकारी आणि दुसरीकडे ज्यांना अधिकारी बनायचे आहे परंतु ज्यांना शासनात पुरेशी प्रतिनिधित्व मिळत नाही असे वाटत होते असे व ब्राह्मण आणि इतर उच्च वर्गीय जे पूर्वीच्या प्राचीन शासकीय संस्थेमध्ये काम करत होते असे एकत्र आले आणि मग काँग्रेस वाढत गेली साहजिकच काँग्रेसची सुरुवात नोकरवादापासून झाली हा नोकर वाद काय होता तर जास्तीत जास्त चांगली नोकरी शासनामध्ये मिळवणे आणि ब्रिटिश शासनामध्ये अधिकाधिक उच्च जागा घेतल्या देशी लोकांना मिळाव्यात म्हणून प्रयत्न करणे. त्यासाठी स्वतःचे पुरेसे ब्रिटिशीकरण करणे आवश्यक होते आणि हे काँग्रेसमध्ये करणारे लोक होते ज्यांनी स्वतःला ब्रिटिश केले. या लोकांना काळे इंग्रज म्हटले जाते आणि ते काँग्रेसमध्ये भरपूर होते . या लोकांना कुठलेही स्वातंत्र्य नको होते त्यामुळे काँग्रेस जी आता डिंगा मारते त्यात काहीही अर्थ नाही काँग्रेस काही स्वातंत्र्यासाठी सुरू झाली नव्हती आणि काँग्रेसमध्ये हा दम कधीच नव्हता मग हा दम आणला कोणी तर हा दम कसा लोकमान्य टिळकाने आणला हे मी फेसबुक वर अतिशय व्यवस्थित साधारण शंभर एक लेख लिहून सिद्ध केलेले आहे आणि म्हणूनच मी म्हटलेले आहे की लोकमान्य टिळक हे आद्य हिंदू सम्राट होते पण फक्त टिळकच असे होते का ? ज्याला स्वातंत्र्याचा लढा म्हणावा असा ऑफिशियल लढा टिळक यांनी सुरू केला ही वस्तुस्थिती आहे त्यांचे पूर्वज काही होते परंतु ब्रिटिशांच्या विरोधातला लोकशाही पद्धतीचा लढा लढला पाहिजे हे कळलेले लोकमान्य टिळक पहिलेच होते . मात्र त्याआधी यशवंतराव होळकर यांच्यापासून ते अनेक बिरसा मुंडा सारख्या आदिवासी लोकांच्यापर्यंत ब्रिटिश राजवटीला ती येण्याआधीच किंवा ते अस्तित्वात आल्या आल्या अनेकाने प्रतिकार केलेला आपल्याला दिसतो आपल्याकडे वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक मांडले जाते ते पूर्णपणे चुकीचे आहे त्यांचे आधी कितीतरी आदिवासी नेते असे होऊन गेले ज्यांनी ब्रिटिशांना हाकलून देण्याचा प्रयत्न केला. पण हे सर्व प्रतिकार होते त्या उलट लोकमान्य टिळक जे करत होते ते ओळखून होते की मूळ जी शासन संस्था आहे ती भारतामध्ये नसून इंग्लंडमध्ये आहे. 


प्रश्न असा आहे फक्त मराठी ब्राह्मणांनाच असे स्वातंत्र्य का हवेसे वाटले ? याचे कारण तपशीलवार मी पूर्वी दिलेलेच आहे पण आता थोडक्यात सांगतो . उत्तर पेशवाई मध्ये आपणाला असे दिसते की ब्राह्मण धर्माला प्रचंड मोठा वाट मिळाला होता आणि संपूर्ण शासन हे ब्राह्मण धर्माच्या आणि ब्राह्मण लोकांच्या हातात आले होते साहजिकच जेव्हा ब्रिटिशांचा शेवटचा लढा झाला तो पेशवे लोकांशी आणि यशवंतराव होळकर यांच्या बरोबर झाला म्हणजेच अंतिम लढाई जी होती ती कळत नकळत महाराष्ट्रातले ब्राह्मण आणि इंग्रजांच्यात होती किंवा मग मराठीशैव आणि इंग्रजांच्यात होती यामध्ये जे शैव होते ते कळत नकळत शेवटी पराभव स्वीकारून बसले 1857 स*** त्यांनी शेवटचा प्रयत्न केला त्यानंतर मात्र सर्वच राजवटी शरण गेल्या. ही सर्व संस्थाने ब्रिटिशांच्या अंकित झाली पण ब्राह्मणांचे तसे नव्हते त्यांच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी गेल्या होत्या त्यामध्ये उच्चपदे होती आणि म्हणूनच त्यांना एक गोष्ट हळूहळू लक्षात आली की केवळ प्रशासन यंत्रणा आपल्या हातात असून चालणार नाही तर आपल्या हातात संपूर्ण शासन यंत्रणाच असायला हवी आणि ती आपणाला लोकशाही पद्धतीने चालवावी लागणार हे कळलेले पहिले द्रष्टे म्हणून आपणाला लोकमान्य टिळक यांचे नाव घ्यावे लागते. लोकमान्य टिळक हे कट्टर हिंदुत्ववादी होते पण फक्त तेच असे होते का तर नाही ज्यांना आपण आज बाल-पाल लाल म्हणतो हे सर्वच्या सर्व हिंदुत्ववादीच होते आणि याच लोकांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा पाया घातला थोडक्यात जे लोक आज हिंदुत्ववादाला हा प्रश्न विचारतात की तुम्ही स्वातंत्र्य चळवळीत काय केले तर त्याचे उत्तर स्वातंत्र्य चळवळीचा संपूर्ण पायाच हिंदुत्ववादी विचारसरणीने विचार प्रणालीने घातलेला आहे हे सत्य तुम्हाला आवडे अगर ना आवडो या काळामध्ये बाकीचे लोक काय करत होते तर आपणाला किती सीट्स मिळतील आपणाला किती नोकऱ्या मिळतील यांचे हिशेब मांडत ब्रिटनमध्ये आपली भूमिका मांडत होते ती भूमिका मावळवादी म्हणून फेमस आहे जहालवादी लोक जे हिंदुत्ववादी होते तेच फक्त या अंगाने स्वातंत्र्याच्या अंगाने स्वातंत्र्य चळवळीच्या अंगाने मांडणी करत होते पण हा इतिहास अशा तऱ्हेने लिहिला जात नाही याचे कारण हिंदुत्ववादी लोकांच्याकडे इतिहासकार नाहीत 

प्रश्न असा आहे की मग हे श्रेय का मिळत नाही याचे कारण सुरुवातीच्या कालखंडामध्ये काँग्रेसला हिंदुत्ववादाबद्दल ऍलर्जी नव्हती . मात्र काही झाले तरी हा हिंदुत्ववाद अध्यक्ष होता कामा नये हे मात्र त्यांना खूप क्लियर होते आणि त्यामुळेच लोकमान्य टिळक यांना त्यांनी कधीही काँग्रेसचे अध्यक्ष पद दिले नाही. किंबहुना हिंदुत्ववाद हा वापरून घ्यायचा हे या नोकरवादी लोकांच्या दृष्टीने अतिशय क्लियर होते या काळातले फिरोज सहा मेहतापासून अनेकांचे राजकारण यासंदर्भात तपासात या लोकांना ब्रिटिश शासनामध्ये असलेल्या आपल्या पोझिशनचे आणि कुठल्याही गोष्टीचे बलिदान करायचे नव्हते फक्त अधिकाधिक आपल्या पदरात पाडून घ्यायचे होते 


Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे