नकुलीशांचे झालेले ब्राह्मणीकरण आणि पाशुपत दर्शन श्रीधर तिळवे नाईक 


भारतीय इतिहासामध्ये ब्राह्मणीकरण हा एक फार तापदायक मुद्दा आहे. ब्राह्मणे तारांच्या मधील एखादा अतिशय महान असा पुरुष ब्राह्मणवणे आणि शेवटी त्याला स्वतःच्या ब्राह्मणी धर्मात किंवा वैष्णव धर्मात किंवा वैदिक धर्मात सामावून घेणे ही ब्राह्मणांची एक स्पेशल खेळी असते ज्या मनुष्याला आणि ज्याच्या विचाराला पराभूत करता येत नाही त्याला अशा पद्धतीने आत्मसात करत आणि मग हळुवारपणे विरुपीकरण घडवत त्याला पूर्णपणे भ्रष्ट करणे हा उद्योग सतत चाललेला असतो. त्यातूनच मग शिवाचे रुद्रिकरण होते विनायकाचे गणपतीकरण होते कुमारचे स्कंदीकरण आणि पुढे आणखी काय काय होते .


इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ला ओहोटी लागल्यानंतर शैव धर्माची जी भारतामध्ये पीछेहाट झाली तिला थांबवणारा अतिशय महत्त्वाचा महापुरुष म्हणजे नकुलीश होय. हा आजच्या धनगर समाजातून आलेला होता आणि त्या काळामध्ये धनगर समाजातील अनेक नावे ही कुठल्या ना कुठल्या पशुच्या नावाने ठेवली जात होती. नकुलिश त्याला अपवाद नव्हता साहजिकच धनगर समाजातून आलेला माणूस कसा काय विद्वान असू शकतो असा प्रश्न ब्राह्मण लोकांना पडला असेल तर नवल नाही. त्यामुळे त्याने स्थापन केलेला पाशुपत दर्शन किंवा त्या दर्शनांमधून निर्माण झालेला पाशुपत धर्म स्वीकारायचा असेल तर त्याचे ब्राह्मणीकरण आवश्यक वाटलेले असणार . त्याच्या नावाचा दुसरा अर्थ ज्याला कुळ नाही असा असाही केला जातो. त्या काळातल्या समाज व्यवस्थेमध्ये शैव लोकांच्यात हा प्रॉब्लेम नव्हता. त्याला कोळी जिथे पुरोहित आहे अशा शिव मंदिरामध्ये आश्रय मिळाला आणि त्या पुजाऱ्यांच्या सहवासातच तो वाढल्याने दर्शनशास्त्राशी त्याचा परिचय झाला असे पाशुपत परंपरा सांगते ते मात्र खरे असावे .


त्याचा जन्म इसवीसन पूर्व नवव्या शतकामध्ये झाला आणि ज्याला आजकल बळीवंश म्हटले जाते आणि जो प्रत्यक्षामध्ये हिरण्य वंश आहे त्या वंशाचा मुख्य म्हणजे हिरण्य या राजाचा तो राजगुरू आणि धर्मगुरू झाला . अर्थातच हिरण्य याने पाशुपत धर्म आणि पाशुपत दर्शन स्वीकारले आणि आपल्या संपूर्ण प्रदेशांमध्ये ज्यामध्ये प्रामुख्याने आजचा काश्मीर,हरियाणा आणि पंजाब हा प्रदेश असावा एक स्वायत्त शैवराज्य निर्माण केले. त्याच्या या स्वीकारामुळे अनेक गोष्टी बदलत गेल्या अर्थातच त्याच्या वंशाची नंतर जितकी बदनामी करता येणे शक्य आहे तितकी बदनामी ब्राह्मण लोकांनी पुराणांच्या मधून केली पण त्याच्या वंशजांचा असलेला प्रभाव कधीही मिटवता आला नाही त्यातील बळी हा सुप्रसिद्ध आहे पण त्याचबरोबर विरोचन हा सुद्धा लोकायत दर्शनाचा पायोनियर मानला जातो पुढे याच वंशातला कपिल हा सांख्य दर्शन मानतो जे मूळचे षष्ठी तंत्र म्हणून लिहिले गेले होते मात्र सामान्य लोकांच्या मध्ये आजही सर्व वंशजांची स्मृती अतिशय जिवंत आहे आणि त्याच्याच वंशातल्या बळीमुळे तर तो भारतातल्या घराघरांमध्ये आहे अलीकडेच बुद्ध आणि धम्म या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी कपिल आणि बुद्ध यांचा संबंध जोडल्याने कपिल ही अतिशय प्रसिद्ध होत चाललेला आहे मात्र अनेकांना हे माहीत नाही की हिरण्य वंश हा पाशुपत दर्शन आणि पाशुपत धर्म स्वीकारलेला वंश होता अलीकडे हा वंश पुन्हा एकदा प्रकाश झोतात वेगळ्या कारणाने आला आहे कारण पुन्हा एकदा हिरण्यकश्यपू आणि नरसिंह अवतार यांच्यावर आधारित असलेली फिल्म हीट झालेली आहे 


हिरण्य हा काश्मीर मधील मूळचा कश्यप वंशातला असावा . काश्मीर पर्यंत कदाचित त्याचे राज्य असू शकते कारण तो ज्या कश्यप वंशातून आला होता तो शिवभक्त होता काश्मीर हे नाव मुळातच कश्यप या वंशावरूनच आलेले आहे आणि अलीकडे अनेक पंडित आपण कश्यप वंशातून किंवा गोत्रातून आलेलो आहोत हे अभिमानाने सांगत असतात .


मात्र नकुलीश हा फक्त हिरण्य वंशामध्येच थांबला नाही आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी तो थेट ग्रीस पर्यंत पोहोचला आणि नंतर कर्नाटक गोव्यामध्ये आला. 


ज्याला आज हेराकलिस किंवा हर्क्युलस म्हटले जाते तो त्याचा शिष्य होता हा हर्क्युलस कुशान वंशाचा आद्य देव होय आणि नंतरच मग हा कुशान वंश जो हर्क्युलस भक्त होता शिवभक्त झालेला दिसतो आणि त्यामुळेच कुशानाच्या वडिलांच्या नाण्यावर हर्क्युलस जाऊन शिवाची स्थापना झालेली दिसते. अर्थात कधीकधी हर्क्युलस हाच शिव आणि शिव हा हर्क्युलस असण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा कदाचित असेही झालेले असू शकते की शंकराने केलेले सगळे पराक्रम हे हर्क्युलस च्या नावाने नंतर सांगितले गेले असावे कारण गुजरात मध्ये सुद्धा जेव्हा लकुलीशाचा प्रश्न आला तेव्हा त्या लकुलीशाला सुद्धा शिवाचे अवतार मानले गेले हर्क्युलसचा Cynics पंथ आणि पाशुपत दर्शन यांच्यात प्रचंड साम्य आहे आणि आजही या दोघांच्या संबंधांची तपासणी अभ्यासक करत असतात .


महाभारतात जे मोजके शैव धर्म आणि पंथ दर्शन आलेली आहेत त्यापैकी एक पाशुपत आहे . अगदी दुसऱ्या शतकातील लकुळीशाचा उल्लेख सुद्धा आपणाला 380 सालाच्या एका इंस्क्रीप्शन मध्ये मिळतो. पुढेही हे कुल तसेच कार्यरत राहून अलीकडे विसाव्या शतकामध्ये ते थेट राजर्षी महाराजांच्या पर्यंत गुजरात मध्ये ऍक्टिव्ह असताना दिसते .(हे महाराज मूळचे क्षत्रिय आणि ऑफिसर होते पण चुकून एका गुहेत शिरले तेव्हा त्यांना पाहताच त्यांच्या गुरुने मी तुझीच वाट पाहत होतो असे सांगितले आणि त्यांनी सर्व काही सोडून तिथेच शिष्यत्व पत्करले होते. नरेंद्र मोदी यांनी ज्या मोजक्या लोकांना गुरु म्हणून स्वीकारले त्यामध्ये त्यांचा समावेश होतो) थोडक्यात काय पाशुपत धर्म हा इसवी सन पूर्व नवव्या शतकापासून ते आज तागायत चालू आहे याच दर्शनातले आणखी तीन मोठे महापुरुष म्हणजे आचार्य शंकर ,आद्य शंकराचार्य आणि बसवेश्वर होय . त्यातील आद्य शंकराचार्य हे त्यांच्या नावाने वर्णव्यवस्था सांगितली जात असल्याने आता बदनाम आहेत विशेषता पुरोगामी लोकांच्या मध्ये ते खूपच बदनाम आहेत तर हिंदुत्ववादी लोकांना अजूनही डोक्यावर घेत असतात. प्रत्यक्षामध्ये ते मूळचे पशुपत दर्शनाचे असल्यानेच कर्नाटकातील सर्व शांभवी पंडित म्हणजेच आत्ताचे गौड सारस्वत ब्राह्मण GSB आद्य शंकराचार्यांनाच आपले गुरु मानत असतात. नकुलिशांच्या पासून सुरू झालेली ही धारा आजही जिवंत आहे . मी स्वतः या धारेतच आहे आणि तरीही मी या धारेच्या बाहेर आहे . जे मूळचे माहेश्वरी असतात मग ते माहेश्वरी ब्राह्मण असोत किंवा माहेश्वरी क्षत्रिय किंवा माहेश्वरी वैश्य असून हे सर्व मूळचे पशुपत दर्शनाशीच निगडित असलेले लोक आहेत फक्त ते स्वतःच आता विसरून गेलेत की आपण शैव परंपरेतले लोक आहोत अलीकडे या तिघांना मिळून मारवाडी असा शब्द रूढ झालेला आहे आणि मारवाडी लोकांचा व्यवहार हा महाराष्ट्रात खूपच खूप कुप्रसिद्ध आहे याचे कारण हे लोक आता वैष्णव बनलेले दिसतात . ज्याला आज राजस्थानमध्ये एकलिंगजी म्हटले जाते ते मुळातच राजस्थानातील पाशुपत दर्शनाचे भक्तांनी उभे केलेले शिवरूप आहे. राजपूत लोकांची युद्ध घोषणा त्यामुळेच जय एकलिंगजी किंवा जय एकलिंगजी जय महाकाली हीच होती आणि पुढेही राहील.


नकुलीशजी जसे ग्रीस मध्ये गेले तसे ते गुजरात मध्ये आले. आणि तिथून मग व्हाया महाराष्ट्र ते गोव्यात आले आणि गोव्यातून मग कर्नाटकात आणि शेवटी तामिळमध्ये गेले . त्यांचा मृत्यू शेवटी गोव्यामध्ये झाला आणि गोवा संपूर्णपणे शैव असण्याचे सर्वात मोठे कारण नकुलिश आहेत . 


त्यांचे शिष्य असलेले लकुलिश नेमके मूलचे कोण होते हा अलीकडे निर्माण झालेला प्रश्न आहे कारण ब्राह्मण परंपरेने गोऱ्या लोकांना सुद्धा पटवून दिले की ते ब्राह्मण होते. प्रत्यक्षामध्ये गुजरात मध्ये त्यांचा उल्लेख लकुलिश पाणी किंवा पणी असा झालेला दिसतो. यावरून मला असे वाटते की ते पणी समाजातले म्हणजेच पाण्यावरून म्हणजेच नदी आणि समुद्रावरून व्यापार करणाऱ्या पणी लोकांच्यातले असावेत. त्यांच्या जन्माचे क्षेत्र म्हणून सुद्धा गुजरात सांगितले जाते आणि गुजरात मधले व्यापारी लोक स्वतःला ब्राह्मणांच्या पेक्षा उच्च समजतात हे सर्वांना माहिती आहे त्याचे एक मोठे कारण हे लकुलीश पणी आहेत . पुढे मग इसवी सन दुसऱ्या शतकामध्ये लकुलीश ही गादी निर्माण झाल्यानंतर तिथे लकुलीश नावाचे ब्राह्मण या दर्शनाच्या गादीवर आले आणि तिथून पुढे थेट राजर्षी महाराजांच्या पर्यंत आपणाला ही विरासत सांभाळली गेलेली दिसते. मी स्वतः त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला तुझा मुक्तीचा मार्ग मोक्षाचा मार्ग हा माझ्यातून जात नाही तो तू स्वतः शोधशील असे सांगितले होते . राजर्षी महाराजांचे सर्वोत्तम पुस्तक हे अर्थातच योग तंत्रावर आहे . त्यांचे आसनावरचे प्रभुत्व तर अफाट आहे किंवा होते असे आता म्हणावे लागेल ते क्षत्रिय म्हणजेच शैवांच्या दृष्टीने वीर समाजातून आले होते आणि तरीही ते दर्शन प्रमुख होते कारण ते शैव होते आणि शैवांच्यात कोणीही दर्शन प्रमुख होतो तो ब्राह्मण असण्याची काहीही गरज नसते. आता या दर्शनाचा विसाव्या शतकातला दर्शन प्रमुख सुद्धा ब्राह्मण नसेल तर मग लकुळीश यांना ब्राह्मण करण्याचा हा खटाटोप का गेला गेला आणि तो प्रामुख्याने ब्राह्मण लोकांनीच का केला ? याचे कारण उघड आहे या देशांमध्ये जे काही व्यापक काम होते ते फक्त ब्राह्मणांच्या मुळेच होते असे दाखवण्याची ही खोड आहे आणि ती टिपिकल ब्राह्मणी खोड आहे . 


प्रश्न असा आहे की याचा काही फायदा झाला का ? तर नाही . उलट नंतर नंतर लकुलिश म्हणजेच नकुलीश असे समीकरण जुळवत नकुलीशांना थेट नाहीसे करण्याचा प्रयत्न सुरू झाला. सुदेवाने काही जुन्या ग्रंथांमध्ये नकुलीशांचा उल्लेख नकुलीश म्हणूनच झाल्याने हे अवघड झाले त्यातच इंडोनेशियन परंपरेमध्ये त्याचा उल्लेख नकुलीशाचा असल्याने आणि ही परंपरा नकुलीषांचे लकुलीश आणि पतंजलीनाथ असे दोन शिष्य मानत असल्याने आणि त्यातील एक पतंजली नाथ जे कर्नाटकातले होते आणि ज्यांचा मूळ प्राकृत ग्रंथ हा नंतर संस्कृत मध्ये भाषांतरित झाला आणि आता जगप्रसिद्ध झाला गाजला . पुढे सर्वदर्शन संग्रहामध्ये सुद्धा माधवाचार्यांनी पाशुपतदर्शनाचे संस्थापक म्हणून प्रामुख्याने नकुलीश यांचेच नाव घेतले त्याआधीही विश्वकर्मावास्तूशास्त्र या संस्कृत ग्रंथात जो शैव आहे आणि ज्यामध्ये खुद्द शंकर विश्वकर्माला संपूर्ण शिल्पकला स्थापत्य कला प्रदान करतात ( या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये धर्मअर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ म्हणून नव्हे तर वर्ग म्हणून येतात तर शिल्प स्थापत्य करणाऱ्या लोकांसाठी चक्क वर्ण हा शब्द वापरला जातो म्हणजे समाज हा शब्द जाऊन वर्ण हा शब्द आला होता आणि शिल्पकार समाज किंवा वास्तुशास्त्र कार समाज असे म्हणण्याऐवजी शिल्प स्थापत्य समाजाला वर्ण म्हणायला सुरुवात झाली होती हे या ग्रंथात दिसून येते.) या ग्रंथामध्ये सुद्धा नकुलिश यांचाच उल्लेख आहे 


थोडक्यात काय पशुपालक वर्गामध्ये जन्मलेल्या आणि मोक्षप्राप्ती झालेल्या नकुलीश नावाच्या एका असामान्य माणसाने एक शैव दर्शन जन्माला घातले त्यातून पुढे एक शैव धर्म जन्माला आला आणि त्याच्या परंपरा विविध प्रांतामध्ये सुरू राहिल्या त्यांनी स्वतःच्या पद्धतीने स्वतःचा विकास केला आणि भारतावर आपली अमिट छाप सोडली.


आता ज्यांना तो ब्राह्मणे तर असल्याचे सहन होत नाही त्यांनी त्याला ब्राह्मण करत बसावे . ब्राह्मणे तर लोकांनी मात्र हा धनगर समाजातून आलेला महान पुरुष आहे हे ओळखून तो काय सांगतो आहे ते समजून घ्यावे सर्वदर्शन संग्रह हे पुस्तक त्याच्या तत्त्वज्ञानाची सुद्धा ओळख करून देते ते वाचावे. 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे