भास : संहिता उपलब्ध नसलेल्या नाटककाराला वैष्णव संहिता पुरवून निर्माण केलेला भास श्रीधर तिळवे नाईक 

भारतातील साहित्याचा इतिहास हा कायमच शैव विरुद्ध वैष्णव यांच्या संघर्षाने व्याप्त आहे . त्यातील नाट्यशास्त्राच्या अंगाने मी लिखाण केलेलेच आहे माझे अनेक व्याख्याने पण आहे आता इथे संस्कृतच्या नाटककारांचा आद्य आरंभ म्हणून सादर केले जाणारे नाव भास त्याचा विचार करायचाय 

मुळातच नाट्यकला ही कधीच युरेशियन परंपरेने फारसी विकसित केली नव्हती किंबहुना नट लोकांना शूद्र मांडण्याची परंपरा मानण्याची परंपरा ही सातत्याने आपणाला युरेशियन लोकांच्या दिसते अगदी गौतम बुद्धासारखा अतिशय प्रज्ञावान पुरुष सुद्धा याबाबतीत नटांची विद्या ही कुविद्या होय असे सांगतो अर्थात त्यावरून त्या काळामध्ये त्याच्यासमोर नाटक सादर होत असणार हे उघडच आहे पण त्याने नकार दिल्याने पुढे संपूर्ण बौद्ध परंपरेनेच नाटकाला नकार दिलेला होता शेवटी जेव्हा महायान बौद्ध उदयाला आले तेव्हा मग बौद्ध धर्मात सुद्धा नाटककार दिसायला लागतात . अर्थात बौद्ध नाटककार यांच्यामध्ये अश्वघोष आद्य नाटककार मानला जातो मात्र त्याची नाटके फारशी उपलब्ध नाहीत हीच वस्तुस्थिती आहे. बुद्ध चरित हे त्याचे नाटक होते की त्याच्या चरित्रावरून नंतर नाटक लिहिले गेले हा एक फार मोठा प्रश्न आहे . 

भास हे नाव कालिदासाने एका नाटकांमध्ये उल्लेख केलेल्या तीन नाटककारांच्यापैकी एक आहे असे मानले जाते हा उल्लेख मालविका अग्निमित्र या नाटकात आपण भास ,सौमिल्य , कविपुत्र यासारख्या तज्ञ नाटककारांना उपेक्षेत ढकलू शकतो का असा प्रश्न विचारून येतो. माझे स्वतःचे मत असे आहे की प्रत्यक्षात दोघांचा उल्लेख होता आणि भासाचा उल्लेख नंतर घुसवला गेला त्याचा परिणाम असा झाला की हा उल्लेख असल्यामुळे त्याच्या जीवावर भास हा नाटककार जिवंत राहिला प्रत्यक्षामध्ये भास या नाटककाराचे नाव असलेले नाटक उपलब्ध नाही आणि नव्हते प्रत्यक्षामध्ये गणपत शास्त्री या साउथ इंडियन केरळ मधील मल्याळम शास्त्रीने जो सरळ सरळ अय्यर होता प्रथम 1910 यावर्षी काही नाट्यसंहिता उजेडात आणल्या आणि या नाट्यसंहिता भासाच्या आहेत असे जाहीर केले प्रत्यक्षामध्ये भासाच्या नाटकाला नाटक म्हणावे असा एकच उल्लेख आपणाला मिळतो तो म्हणजे राजशेखर याच्या काव्यमीमांसेमध्ये स्वप्न वासवदत्तम हे भासाने नाटक लिहिले असा ! पण हा फक्त उल्लेख आहे राज शेखर याला उपलब्ध झालेले नाटक हे कोणते कारण हा मुळात स्वतःच दहाव्या शतकात झाला आणि तो महाराष्ट्रीयन होता साहजिकच त्या काळामध्ये महाराष्ट्र हा दख्खनचा भाग होता आणि त्यामुळे केरळमध्ये उपलब्ध असलेली ही नाटके त्यालाही उपलब्ध असावीत आणि तो फक्त स्वप्न वासंव दत्ता या एकमेव नाटकाचा उल्लेख करतो याचा अर्थ त्याला हे नाटक उपलब्ध असावे पण बाकीची जी नाटके भासाची म्हणून सांगितले जातात ती भासाची नसावीत नाहीत हे त्याला माहीत असावे अन्यथा अलमोस्ट समकालीन असणारे हे दोन्ही संहिताकार आणि नाटककार आहेत हा स्वतः नाटककार असल्यामुळे याला नक्कीच नाटकाचा त्या काळाचा इतिहास माहिती असावा म्हणूनच स्वप्न वाचव दत्त हे कदाचित एकमेव नाटक असे असेल जे भाषाचे असावे पण हे नाटक मल्याळम लिपी मध्ये आहे आणि खरा प्रकार इथेच उघडी किस येतो संस्कृत या काळामध्ये अध्यय शंकराचार्यांच्यामुळे व्यवस्थित प्रचार पावलेली भाषा होती. साहजिकच संस्कृत मधली नाटके कोण कशाला मल्याळम लिपीत लिहिल ? दुसरी गोष्ट संस्कृती देवनागरी लिपीत आली त्याचा पुरावा आपणाला फक्त दहाव्या शतकातच पुन्हा मिळतो आणि तो नेपाळमध्ये आहे ? इथे एक प्रश्न हाही होतो निर्माण की संस्कृत खरोखरच देवनागरीमध्ये लिहिली जात होती का की प्राकृत भाषांच्या प्राकृत लिपिंच्यात सुद्धा लिहिली जात होती ? या नाटकाच्या संदर्भात असे अनेक प्रश्न निर्माण होतात 

याचा अर्थ स्पष्ट आहे की ही नाटके तिथल्याच परंपरेने आपल्या भाषेत लिहिली आणि सादर केली. मात्र भाषा मात्र संस्कृत ठेवली कारण हा काळ मल्याळम काळ होता मल्याळम भाषा निर्माण होण्याचा काळ होता त्यामुळे मल्याळम भाषेत नाटके नाहीत परंतु जी वैष्णव परंपरा तिथल्या नव्यानेच ब्राह्मण झालेल्या लोकांना सादर करायची होती तिला मूळ मल्याळम भाषेत काही फार मोठा वारसा नसल्याने कलोनाइज झालेल्या तत्कालीन मल्याळम संस्कृतीने आपल्या नाटकांची कथानके सरळ सरळ उत्तर भारतातल्या वैष्णव परंपरेतून मल्याळम मध्ये आणली . ही नाटके संस्कृत मध्ये सादर केली जात होती याचा अर्थच स्पष्ट आहे की ती प्रामुख्याने ब्राह्मण वर्णापुढे सादर केली जात असावी किंवा तिथल्या वैष्णव देवळांच्या मध्ये सादर करण्यासाठीच ती लिहिली गेली असावीत कारण संस्कृत भाषा बोलण्याची अनुमती या काळामध्ये फक्त ब्राह्मणांच्या दिशेने सरकायला लागली होती आणि याला सुरुवात मल्याळम संस्कृतीने केली. केरळ मध्ये असलेली वर्ण व्यवस्था भारतामधल्या इतर जागी अवतरत असलेल्या वर्णव्यवस्थेपेक्षा सर्वात कट्टर सर्वात नीच सर्वात संकुचित आणि कर्मठ होती (अर्थात त्यामुळेच पुढे कम्युनिजमला तिथे वाव मिळाला कारण ब्राह्मणवाद इतका प्रबळ होता की त्यावर कम्युनिजम हेच उत्तम औषध आहे हे अजूनही मल्याळम लोकांचे मत आहे) वैष्णव परंपरा जी त्या काळामध्ये केरळमध्ये नुकतीच राजसत्ता म्हणून उदयाला यायला लागली होती तिच्या पुष्टीकरणासाठी म्हणून ही सर्व नाटके लिहिली गेलेली आहेत लिहिणारे लोक हे लोककलावंत आहेत आणि लोक कलावंत हे नेहमीच ट्रेंड बघून नाटक लिहितात . भाषाचे मूळ नाटक उपलब्ध झालेच नाही पण राज शेखर याच्या उल्लेखामुळे या नाटकाचा प्लॉट आपल्या पद्धतीने रचला गेला आणि ज्यांना संस्कृत परंपरा माहिती आहे त्यांना हे ही माहिती आहे की वैष्णव परंपरेमध्ये अनेकदा नाटकावर नाटक बेतले जात होते यामुळे हे नाटक भाषाचे नसून भासाचे नसून ते भासाच्या प्लॉटवर आधारित रचलेले दुसरे नाटक आहे त्याचे श्रेय भाषा नाटककाराला देता येत नाही याच्यामुळे झाले काय की ही जी 13 नाटके सापडली त्यामध्ये स्वप्न वासवदत्त नावाचे टायटल सेम असलेले नाटक होते म्हणून बाकीची ही नाटके भास या नाटककराची आहेत असा तर्क लढवला गेला पण या नाटकाच्या अंतर्गतच एक असा पुरावा आहे की ज्या स्वप्नावरून हे नाटक रचले गेले आहे किंवा त्याचे टायटल ठेवले आहे त्या स्वप्नामध्ये उदयन हा राजा चक्क समुद्रगृहामध्ये आहे म्हणजेच केरळामध्ये समुद्रकाठी आहे आणि तिथे त्याला स्वप्न पडत आता हा समुद्र आला कुठून ? कारण राजा तर उत्तरेत राज्य करतोय तर हा उल्लेख नाटककार खुद्द केरळचा असल्यामुळे आलेला आहे (हे अगदी तसेच आहे की हरी ही देवता दक्षिणात्य आहे असे आम्ही म्हणतो कारण ती समुद्रावर झोपलेली आहे आणि आर्या वर्तातील लोकांना समुद्र माहित नव्हता ते सागर सरोवराला म्हणत) म्हणजेच जवळजवळ 1910 पर्यंत भास हा नाटककार भारतीय लोकांना उपलब्ध नव्हता आणि विसाव्या शतकामध्ये वैष्णव लोकांनी संपूर्ण हिंदू परंपरा आपल्या ताब्यात घेऊन आपला अजेंडा ढकलला त्यामध्ये 1910 नंतर भास हा आद्य नाटककार आहे असा प्रचार सुरू केला आणि तो अद्यापही सर्वत्र चालू असतो आणि तो ज्याच्या आधारे केला जातो ती नाटके मात्र भास याने लिहिली आहेत की नाही याबद्दल कोणीच काही चर्चा करत नाही . यामध्ये होते काय की ज्या लोककलावंतांनी ही नाटके लिहिली त्यांचे श्रेय हिरावले जाते . ते दक्षिणात्य असल्यामुळे त्यांची पर्वा करण्याची गरज भासत नाही त्यामुळे महाराष्ट्रपासून कश्मीरपर्यंत सर्वच विसाव्या शतकात नॉर्थ इंडियन झाल्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा आद्य नाटककार म्हणून होते आणि प्रत्यक्षात मल्याळम लिपीत लिहिली गेलेली ही तेरा नाटके भासाची नाटके म्हणून सांगितली जातात शिकवली जातात

यामुळे नेमके काय साधले जाते तर आद्य नाटककार म्हणून अलीकडे दोन नावे येतात पहिले नाव हे कालिदासाचे आहे आणि दुसरे अश्व घोषाचे यातील पहिला शैव आहे तर दुसरा बौद्ध आहे आता या दोघांच्या पैकी पहिला कोण हा वाद इतरत्र मी घातलेला आहेच आणि अजूनही हा वाद ओपन आहे पण भास हा आद्य नाटककार असावा तो कालिदासाच्या आधीचा असावा पण तो नेमके काय लिहीत होता हे आजही सांगणे कठीण आहे . फार सवलत दिली तर आपण असे म्हणू शकतो की स्वप्न वासवदत्ता हे कदाचित त्याचे नाटक असू शकते . खरे तर खात्री नाही . कारण या नाटकाची मूळ संस्कृत संहिता अजूनही उपलब्ध झालेली नाही जे काही चालले आहे ते मल्याळम लिपीतल्या सहिते वरूनच चालले आहे. 

यालाच आणखी एक विचित्र क्रॉस असा आहे की मल्याळम भाषा नेमकी अधिकृत लिखित स्वरूपात कधी आली ? त्यात पुन्हा एक विचित्र उपगोष्ट अशी आहे की वैष्णव लोक मल्याळम भाषेतले पहिले पुस्तक म्हणून रामचरीतचा उल्लेख करतात जे चौदाव्या शतकात आहे. दुसरी गोष्ट मल्याळम संस्कृतीमध्ये मल्याळम आणि संस्कृत यांचे क्रॉसिंग होऊन मणी प्रवाळम नावाची भाषा तयार झालेली आहे आणि ती 14 व्या शतकात आहे तर मग दहाव्या शतकामध्ये हे कसे काय भासाच्या नाटकाबाबत घडले ? ही नाटके आली कुठून ती ही मल्याळम संस्कृती मध्ये ? हाच प्रश्न अर्थशास्त्र या कौटिल्याच्या पुस्तकाबाबत सुद्धा निर्माण होतो कारण या दोन्ही संहितांचा जो शोधकर्ता गणपत शास्त्री आहे तो एकच आहे तो अय्यर आहे आणि ह्याच संशोधकाच्या शोधलेल्या अर्थशास्त्र या पुस्तकापासून आर्य चाणक्य हा अचानक ऑथेंटिक बनला तोपर्यंत तो केवळ साहित्यात होता अर्थातच पुस्तकाच्या लेखकाचे नाव मात्र कौटिल्य आहे आणि तो दुसऱ्या शतकात होऊन गेलेला आहे त्यामुळे हा दुसऱ्या शतकातला मनुष्य चंद्रगुप्ताच्या काळात कसा काय निर्माण झाला हा आणखी एक प्रश्न आणि हे प्रश्न एकाच शोधकारक लेखकामुळे निर्माण झालेले आहेत कुठे ना कुठेतरी स्वतःला आर्य म्हणवून घेत स्वतःचे ब्राह्मण्य शाबूत ठेवण्यासाठी खेळली गेलेली ही खेळी आहे का असा एक फार मोठा प्रश्न या अंगाने निर्माण होतो. वेद सुद्धा लिखित स्वरूपात सर्वात जुने हे नेपाळमध्ये सापडतात भारतामध्ये नव्हे. आणि तेही बरोबर दहाव्या शतकात असतात हे सर्व पुरावे स्पष्ट करत असतात की वैष्णव परंपरा दहाव्या शतकापासूनच प्रबळ झालेली आहे राम आणि कृष्ण यांची मंदिरे सुद्धा खूप उशिरा सापडत जातात आणि उत्खननामध्ये सुद्धा किती मुर्त्या नेमक्या या देवतांच्या आहेत त्याबद्दल अनेक प्रश्न आहेत साहजिकच नाटकाच्या क्षेत्रामध्ये आपला प्राचीन पुरुष शोधणे हे या काळामध्ये अत्यंत आवश्यक होते आणि त्याचा भाग म्हणून भास हा केरळातल्या 13 नाट्यसंहितांच्या सहाय्याने निर्माण करण्यात आला . आणि नेहमीच्या युरेशियन थाटामध्ये या संदर्भात एकापाठोपाठ एक ब्राह्मण संहितांच्या लाटा येत गेल्या आणि ब्राह्मणांच्या संहितावर्षावानंतर भास प्रस्थापित होत गेला. यामध्ये ज्याने ओरिजनल लिखाण केलेले आहे तो नाटककार किंवा अनेक नाटककार आपण डावलतोय त्यांचे श्रेय नाकारतोय असे मात्र कोणालाच वाटत नाही आणि याचे सर्वात मोठे कारण नाटककाराचे नाव सहितांच्या वर नाही ही पद्धत लोक कलावंतांना साजेशी आहे भास पंडित किंवा ब्राह्मण होता असे जर गृहीत धरले तर एखादा पंडित किंवा ब्राह्मण आपले नाव सोडून संहिता सादर करेल हे अशक्य वाटते 

भासाची ही सर्व तेरा नाटके पाहिली तर त्यातली सर्वच वैष्णव नाटके आहेत आणि हा योगायोग आहे असे मला वाटत नाही. 

थोडक्यात काय हा सगळा फिनॉमिना एकदा आपण मायक्रोस्कोपच्या खाली घेतला पाहिजे आणि नेमके काय झाले हे आता शोधणे गरजेचे झालेले आहे .

प्रश्न अर्थातच एक उरतो तो म्हणजे जर का कालिदासाचा उल्लेख योग्य असेल तर भासाने नेमके काय लिहिले ? कालिदासाने उल्लेख केलेल्या कोणाचेच पुढे काहीही सापडत नाही हे नेमके काय गोड बंगाल आहे ?  भासाच्या काही संहिता जर मूळ स्वरूपात उपलब्ध झाल्या तर बराचसा प्रश्न सुटू शकतो . मला स्वतःला असे वाटते की स्वप्नवासवदत्ता हे त्याचे नाटक खरोखरच त्याने लिहिलेले असावे . पण त्यावरून त्याचा काळ निश्चित करता येईल का? हा एक फार मोठा प्रश्न आहे .

श्रीधर तिळवे नाईक 


Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे