मी लाईक करायला मनाई का केली आहे श्रीधर तिळवे नाईक
मी फेसबुक वर असल्यापासूनच अनेकांना फोन करून सांगत असतो की लाईक करू नका आणि माझे काही मित्र व्यवस्थित हा नियम पाळतात काही मित्र असे आहेत की जे सरळ सांगतात तू जे करायचे ते कर पाहिजे तर अनफ्रेंड कर पण आम्ही लाईक करणारच त्यांचे काय करायचे हा कायमच माझ्यापुढे प्रश्न असतो पण असे अपवाद फार कमी . साहजिकच त्यामुळे काही लोकांना नेहमीप्रमाणे टीका करायला खाजगी मध्ये श्रीधर कसा मनमानी करतो लहरी आहे वगैरे वगैरे टीका करायला वाव मिळतो मी कधी त्याची परवा केली नाही पण आता वेळ आली आहे की मी या संदर्भात काही अधिक स्पष्टीकरण कारण माझे काही विद्यार्थी यामध्ये इनवॉलव झालेत लाईक करतील म्हणून मी जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारत नसतो अपवाद फक्त पूजा मून हिचाच असावा तिला अपवाद करण्याचे कारण ती फक्त माझी नाही तर माझ्या फॅमिलीची फॅमिली फ्रेंड आहे आणि अनेक कर्तव्य तिने प्रामाणिकपणाने निभावलेली आहेत . बाकी विद्यार्थ्यांच्या मध्ये मला असे काही दिसलेले नाही अर्थात काही अपवाद आहेत पण एकंदर फ्रेंड रिक्वेस्ट करण्याकडे माझा कल असतो. मुळातच मी वर्गातच विद्यार्थ्यांना पहिल्याच तासाला सांगतो की फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नका त्यामुळे थोडेसे प्रश्न शक्यतो उद्भवत नाहीत काहीतरी ट्राय करून बघतात पण मी ते यशस्वी होऊ देत नाही
मी लाईक नाकारण्याचे सर्वात मोठे कारण लाईक पासूनच सर्व काही सुरू होते. माणसाच्या आत ज्या काही मूलभूत असती आहेत आसक्ती आहेत त्यामध्ये लोकमान्यता ही एक फार मोठी आसक्ती आहे . तिचा सर्वाधिक वावर हा आपणाला कलावंतांच्या कलेच्या क्षेत्रामध्ये दिसतो कारण प्रत्येक क्षेत्र हे कुठल्या ना कुठल्या तरी मूलभूत आसक्तीने व्यापलेले असते. उदाहरणार्थ राजकारण क्षेत्र सत्तेच्या आसक्तीने व्यापलेले आहे त्याबाबतीत काहीच करता येत नाही. किंबहुना ज्यांना सत्ता हवी असते असेच लोक राजकारण खेळत असतात मग क्षेत्र कुठलेही असो. अगदी साहित्यात सुद्धा जे राजकारण चालते त्याचे कारण सत्तेची आसक्ती असते किंवा मग प्रसिद्धी नावाच्या आसक्तीची प्रचंड सखोलता हे कारण असते.
तिची सुरुवात साधारणपणे दाद पासून होते प्रत्येक कलावंताला त्याच्या कलेसाठी दाद हवी असते अर्थात इतर क्षेत्रातही ती आहे परंतु कलेमध्ये ती फारच असते अनेकदा तर पैसासुद्धा बाजूला सारायला कलावंत तयार असतात परंतु दाद त्यांना लागतेच पैसा नाही दिला तरी किमान दाद तरी आपणाला मिळावी अशी प्रत्येक कलावंताची अत्यंत नैसर्गिक अपेक्षा असते पण ज्यांना मोक्ष हवा आहे त्यांच्याबाबत गोष्टी बदलतात . मोक्ष हवा असलेला कलावंत कधीही दाद ह्या गोष्टी मागे जात नाही . त्याचे लेखन हे केवळ मोक्षाची साधन असते अनेकदा आपलेच प्रतिबिंब पाहण्यासाठी ही साधना त्याला खूप उपयोगी पडते . कधीकधी मोक्ष मिळवण्यासाठी आपण जर का देवाची स्तुती केली तर किंवा एक कोटी अभंग आपण नामदेवांच्या आज्ञेप्रमाणे रचले तर आपणाला मोक्ष मिळेल असेही वाटणारे कलावंत असतात त्यामुळे हा सगळा लेखन व्यवहार प्रामुख्याने मोक्षासाठी चाललेला असतो मोक्ष मिळाल्यानंतर हा व्यवहार बदलतो आणि लोकांना शहाणे करणे त्यासाठी लिखाण सुरू राहते. आपल्याकडे संत नामदेवांच्या पासून ते संत तुकारामांच्या पर्यंत अनेक लोकांनी जे लिखाण केलेले आहे ते केवळ यासाठी आहे. कोणाचे लाईक मिळावे किंवा दाद मिळावी म्हणून ते केलेले नाही किंबहुना लाईक ही दाद असते पण मोक्षाच्या मागे नसणाऱ्या कलावंतांच्यासाठी मात्र दाद ही अतिशय महत्त्वाची आहे आणि मी कधीही त्यांच्या या गोष्टीचा द्वेष केलेला नाही . माझे म्हणणे फक्त इतकेच असते की गुणवत्तेशी तडजोडी करू नका . मुळातच निसर्गाची योजना अशी आहे की 100 बियाणे लावली तर त्यातली अनेकदा किमान 50% बियाणे वाया जातात . शंभर टक्के बियाणे यशस्वी होण्यासाठी फार आर्टिफिशियल लागवड करावी लागते कलावंतांनी करावी असे मला वाटत नाही पण अनेक कलावंत अरुण कोल्हटकर यांच्यासारखे अशी लागवड करतात मला स्वतःला हे स्कूल कधीच आवडले नाही त्यापेक्षा मला तुकाराम मार्ग चांगला वाटतो. तुकारामाला जर का दीर्घायुष्य मिळाले असते तर मला खात्री आहे त्याने किमान दहा हजार अभंग लिहिले असते. पण सर्वांना तुकाराम व्हायचे नसते हेही तितकेच खरे आहे यामध्ये सर्वाधिक केविलवाणी जमात जर कुठली असेल तर ती म्हणजे मोक्षाची पाठराखण केली की आपणाला प्रचंड कीर्ती मिळू शकते अशी वाटणारी जमात ही जमात अशी आहे की मोक्षाची साधना तर करायची नाही परंतु मोक्षावर काहीतरी रोमँटिक लिहीत राहायच. इंग्लिश मध्ये यांना मेटा फिजिकल पोएट म्हणतात तिथून ही जमात भारतामध्ये पुरोगामी आणि आधुनिक कालखंडामध्ये प्रचंड वाढली. काही तर एवढे अति महान की कसली साधना न करता मोक्षाबाबत इतरांची मापे काढायची. आपण काय आहोत त्या क्षेत्रामध्ये याचे निदान आत्मभान तरी हवे पण ते आत्मभान सुद्धा या लोकांना नसते अनेकदा तर लोकांना उपदेश देत फिरत बसतात आणि घरात बायकोला मारहाण ! खरा डेंजर वारा या लोकांच्या हृदयातून वाहत असतो. लाईक्स मिळत नाहीत म्हणून कासावीस झालेले अनेक सो कॉल्ड मेटा फिजिकल पोएट मी आयुष्यात बघितलेले आहेत आणि मराठीत त्यांची संख्या बरी आहे . त्यामुळे जर का लोकांना या पहिल्या टप्प्यातच आपण मनाई केली तर पुढच्या बऱ्याचशा गोष्टी टळू शकतात .
यानंतरचा टप्पा आहे :प्रतिष्ठा! या टप्प्यामध्ये साधारणपणे काही लोक सातत्याने दात देणारे भेटतात आणि या लोकांच्या प्रतिष्ठा प्राप्त होते केवळ प्रतिष्ठा प्राप्त होते म्हणून हल्ली कोणीही हौसे गौसे लोक कलाक्षेत्रात पाऊल ठेवतात आणि पद्धतशीर मॅनेजमेंट करून प्रतिष्ठा मिळवतात मात्र त्यांना त्यांच्या सर्कलपूर्ती मिळालेली प्रतिष्ठा ही साहित्याला हानिकारक ठरत नाही ती साहित्याला हानिकारक तेव्हा ठरते जेव्हा ती पुढचा टप्पा गाठते.
तिसरा टप्पा असतो :मान्यता! फक्त आपल्या सर्कल पुरताच नाही तर सर्कलच्या बाहेर सुद्धा जेव्हा लोक तुम्हाला ओळखायला लागतात आणि दात देऊ लागतात तेव्हा हा टप्पा येतो . एकेकाळी हा टप्पा हानिकारक न होता कारण सर्कल बाहेरचे लोक फार प्रामाणिक असायची परंतु अलीकडे संबंध वाढवणे आणि संबंधांच्या साह्याने हितसंबंधांचे रक्षण करणे हे इतके वाढलेले आहे की सर्कल बाहेरची लोक सुद्धा जर संबंधित व्यक्ती आपल्या उपयोगाची असेल तर तिला मान्यता देऊन मोकळे होतात याचे अनेक दुष्परिणाम झालेले आहेत वास्तविक अशावेळी समीक्षा करणे अत्यंत आवश्यक होते मी माझ्या काही मित्रांची अत्यंत क** समीक्षा या अंगाने केलेली आहे उदाहरणार्थ मंगेश बनसोड मित्र म्हणून समीक्षा करत असतानाच मी त्याच्या पहिल्या काव्यसंग्रहातील कवितेतील सर्व दोष दाखवलेले मर्यादा सांगितल्या होत्या त्याचाही चांगुलपणा इतका मोठा की त्याने या सर्व गोष्टीला अत्यंत गांभीर्यपूर्वक घेतले .आमची मैत्री कायम राहिली . पण हे तसे दुर्मिळ दृश्य असते . माझ्या मंगेश वरच्या कवितेनंतरच्या भाषणानंतर सर्वात प्रथम दाद जर कोणी दिले असेल तर ती मंगेशची आईच होती तिने मला सांगितले ,"लेकरा , तूच एकटा काय ते खरा बोललास . तू मंगेशचा खरा मित्र आहेस मुंबईत सांभाळून घे त्याला आणि अशीच कान उघडणी करत रहा ." हे असे खूप क्वचित घडते .
यानंतरचा टप्पा आहे :कीर्ती ! या टप्प्यात सर्वसाधारणपणे केवळ स्वतःच्या प्रतिभेच्या जीवेवरच लोकमान्यचा मिळत राहते . कीर्ती ही सर्वसाधारणपणे आपोआप होत असते पसरते . मराठीमध्ये कीर्ती ही फार दुर्मिळ आहे बहुतेकांना थेट पुढचा टप्पा हवा असतो
यानंतरचा टप्पा आहे :प्रसिद्धी ! खरे तर हा शैव शब्द आहे आणि त्याचा मूळ अर्थ खूप छान आहे . सिद्धीच्या आधीचा टप्पा प्रसिद्धी आहे . एका अर्थाने जेव्हा तुम्ही धारणा आणि नंतर ध्यान करून लोकांच्यात वावरायला लागतात तेव्हा कळत नकळत लोक तुमच्याकडे तुमचा आरा तयार व्हायला लागल्यामुळे आकर्षित होऊ लागतात आणि त्यामुळे जी मान्यता मिळते ती मान्यता म्हणजे प्रसिद्धी होय पण दुर्दैवाची गोष्ट अशी की हल्ली कोणी साधना करतच नाही . प्रसिद्धी ही धोकादायक यासाठी असते की तुम्ही मग सिद्ध व्हायला धडपडत नाही ही प्रसिद्धी तुमचे सिद्ध होणे खाऊन टाकते म्हणूनच वार्निंग म्हणून हा शब्द आलेला आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी की बहुतांशी साधक याला बळी पडतात अनेकदा तर आश्रम थाटून बसणारे बहुतांशी लोक हे प्रसिद्धी मध्ये अडकलेले लोक असतात . निर्माण झालेल्या थोड्याशा प्रभेमुळे हे प्रभावी होत जातात आणि आश्रम काढून बसतात त्यांच्यामुळे मोक्षाच्या क्षेत्रात जेवढी धंदेवाईक बजबज पुरी मांडली माजलेली आहे तेवढी कुणामुळेच माजलेली नसेल वार्निंग म्हणून आलेला हा शब्द कलावंतांच्या आणि कलेच्या क्षेत्रात मात्र खूपच डॉमिनेट होताना दिसतो काही कलावंत असे असतात की त्यांना कीर्तीने समाधान होत नाही ते स्वतःची पब्लिसिटी करत बसतात अनेकदा पेड पब्लिसिटी सुद्धा करावी लागते आणि ती ते करतात. विशेषता सिनेमाच्या क्षेत्रामध्ये तर हे खूपच करावे लागते. प्रसिद्धी ही चांगली असेलच याची खात्री नाही अनेकदा ती मॅनेज केलेली सुद्धा असू शकते खरी गोष्ट कीर्तीच जी तुमच्या केवळ कामामुळे मिळत असते. अलीकडचा काळच असा झालेला आहे की प्रसिद्धी केल्याशिवाय कीर्ती मिळत नाही आणि यामुळेच अनेक चांगले चांगले कलावंत सुद्धा झक मारत पब्लिसिटी मध्ये प्रसिद्धीमध्ये उतरतात .
ही चेन जर का आपण पहिल्याच टप्प्यात पहिल्याच ठिकाणी अडवली की बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊन जातात म्हणूनच मी लाईक देऊ नका असे आवाहन करतो . याला अपवाद मात्र मी एक क्षेत्र केले आहे ते म्हणजे सिनेमा होय . कारण तिथे प्रश्न फक्त माझा नाही तर टीमचा सुद्धा असतो पण तिथेही मी अनेकदा स्वतःच्या बाजूने काही होणार नाही याची काळजी घेत असतो.
या पुढचा प्रश्न आहे मग मी कॉमेंट का करू देतो त्याचे कारण उघड आहे मला असे वाटते की आपले काम हे टीकेसाठी खुले असणे आवश्यक आहे आणि कॉमेंट टीका करतात तिथे दाद असते परंतु ती फारशी नसते कारण बहुतांशी लोक हे दाद द्यायची म्हणून देत असतात . कॉमेंट मध्ये असे नसते काही कॉमेंट तर आपले डोळे उघडतात याबाबतीत सतीश तांबे यांनी काही केलेल्या निगेटिव्ह कॉमेंट्स मला फार उपयोगी पडलेल्या आहेत त्यांच्या पॉझिटिव्ह कॉमेंट सुद्धा उपयोगी असतात . कुठलाही कलावंत परफेक्ट असत नाही कॉमेंट्स अनेकदा काय परफेक्ट आहे आणि काय इंपरफेक्ट आहे ते सांगत असतात . मी सुरुवातीच्या काळामध्ये सौष्ठ आणि अभिधा दोन्ही ठिकाणी कॉमेंट अत्यंत प्रामाणिक याव्यात यासाठी धडपड केलेली आहे आणि या दोन्ही ठिकाणी कॉमेंट साठी अत्यंत ओपन असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला होता दुर्दैवाने नंतर मंगेश काळे यांच्यासारखे काही लोक आले आणि त्यांनी स्तुती म्हणजे टीका असे समीकरण रोड करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच मग मी बाजूला झालो . अभिजीत देशपांडे माझ्या कवितेवर जितकी सडकून टीका करायचा तितकी कदाचित कोणी केली नसेल अर्थात अत्यंत मवाळ भाषेत तो हे सर्व करायचं पण मी त्याचा प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐकायचो . अर्थात तो असा प्रामाणिक असल्यामुळेच शब्द वेद आणि अभिदानंतर दोन्ही ठिकाणी अडचणीचा ठरला मला नेहमीच वाटते की सर्वांनी त्याला नीट ऐकावे . सर्वच मते पटतील असे नाही राजकुमार यादव हा माझा मित्र सुद्धा असाच होता . त्याच्या खाजगीतल्या कॉमेंट मला फार उपयुक्त ठरलेल्या आहेत हीच गोष्ट सचिन केतकरची पण सुरुवातीला होती पण दुर्दैवाने तो आणि हेमंत दिवटे नंतर कळत न कळत राजकारण करायला लागले. यांच्या नादाला लागणारे बरेच जण नंतर बिघडले. बिघडलेल्या लोकांच्या मध्ये संतोष पवार चा नंबर कदाचित पहिल्या क्रमांकावर ठेवावा लागेल . तू पुन्हा आता शहाणा झाला असे दिसते खरे खोटे मला माहित नाही खरे तर हेमंत हाही सुरुवातीला खूप प्रामाणिक होता . काय आवडले आणि काय नाही आवडले हे तो स्पष्ट सांगायचा पण नंतर गडबड सुरू झाली . ज्ञानदा म्हणजे तर माझी चालती बोलती टीकाकार ! सर्वच कलावंतांना मी नेहमीच सांगत असतो की कठोर जितकी टीका कोणी करतो तितका तो तुमचा अधिक मित्र असतो . तो मैत्रीची परवा न करता सर्व गोष्टी स्पष्ट सांगतो. मी कॉमेंटचा section त्यामुळे उघडा ठेवला आहे अर्थात याबाबतीत सुद्धा काही लोक अप्रामाणिक असतात पण त्यांचे काय करायचे ते आपल्याला ठरवता येते कधी कधी लोक हितसंबंधांच्या अंगाने अप्रामाणिक होत जातात अशा लोकांच्या बाबतीतही मग काय करायचे ते ठरवता येते. पण बहुतांशी कॉमेंट्स ह्या विचारात घेण्याजोग्या असतात हा माझा अनुभव आहे. मी कॉमेंट्स कडे स्वतः आला सुधारण्याची नामी संधी या अंगाने घेतो. निंदकाचे घर असावे शेजारी असे तुकारामाने म्हटलेलेच आहे. फक्त निंदकाने आपले राजकारण सुरू करू नये अशी अपेक्षा असावी पण एका काळानंतर ती ही अपेक्षा निघून जाते. मला वाटते एवढा खुलासा पुरेसा आहे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment