साधक आणि पुढारी श्रीधर तिळवे नाईक 


जो साधना करतो तो साधक आणि जो पुढे नेतो तो पुढारी! क्रिया तंत्रामध्ये सर्वात प्रथम जर काही करायला लागत असेल तर ते म्हणजे पुढारी बनणे. म्हणजे काय ? सर्वसाधारणपणे आयुष्यामध्ये विशेषत: अर्थ या अक्षाबाबत घडते असे की आपण सर्व काही इतरांच्यावर सोपवतो . कळत नकळत आपण मग हळूहळू अनुयायी होत जातो वास्तविक व्यवहार देण्याचा आणि घेण्याचा असतो आणि आपण जेव्हा देतो तेव्हा मालक असतो आणि घेतो तेव्हा गिऱ्हाईक असतो . सर्व आर्थिक व्यवहार हे आपणाला कधी मालक बनवतात कधी गिराईक बनवतात याचे कारण उघड असते आपण सर्वच्या सर्व गोष्टी तयार करू शकत नाही किंवा सर्वच्या सर्व गोष्टींचा मालकी हक्क आपल्याकडे असत नाही. पण आपण जेव्हा सामान विकतो किंवा सामान खरेदी करतो तेव्हा निर्णय प्रक्रिया नेमकी कोणाची असते? अनेकदा आपण आपले निर्णय जाहिरातीला अनुसरून घेत असतो म्हणजेच इथे जाहिरात महत्त्वाची ठरते अनेकदा जाहिरातीमधील मॉडेल आपणाला महत्त्वाची वाटते महत्त्वाचा वाटतो यामध्ये आपले स्वतःचे अनेकदा काहीही असत नाही वास्तविक आपल्याला प्रॉडक्ट ओळखता आला पाहिजे आणि जर का तो आपणाला ओळखता येत नसेल तर किमान या प्रॉडक्ट चा कोण जाणकार आहे हे आपल्याला माहित असले पाहिजे आणि त्या हिशोबाने आपण खरेदी केली पाहिजे हीच गोष्ट विक्री बाबत आहे यदा कदाचित तुम्ही व्यापारी असाल तर काय विकले पाहिजे हे तुमचे तुम्हाला कळले पाहिजे परंतु असे होत नाही अनेकदा डिमांड काय आहे त्यावरून आपण सप्लाय ठरवतो . म्हणजेच आपण आपले निर्णय घेत नाही अनेकदा गिऱ्हाईक म्हणून सुद्धा आपण इतर लोक घेतात म्हणून ती वस्तू घेतो . म्हणजे हा निर्णय आपला नसतो साधनेमध्ये असे चालत नाही कारण तिथे दुसऱ्यांनी आपल्या वतीने घेतलेले निर्णय हे नेहमीच दुसऱ्याचे निर्णय असतात आपले असत नाहीत तुम्हाला जर का मोक्ष हवा असेल आणि तोही क्रिया तंत्राने हवा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या आयुष्यातील निर्णय स्वतः घ्यावे लागतात किंवा आपण आपल्या वतीने जे निर्णय घेतले जातात त्या निर्णयांची संपूर्ण जबाबदारी आपणाला घ्यावी लागते आणि आपल्या आयुष्यामध्ये जर का आपण बारकाईने पाहिले तर पुढारी लोक हेच करत असतात ते आपल्या वतीने निर्णय घेतात आणि अनेकदा आपल्याला विचारात सुद्धा नाहीत अनेकदा आपण आपले निर्णय त्यांच्या हातात सोपवतो प्रत्यक्ष आयुष्यामध्ये असे चालत नाही जे काही तुम्ही निर्णय घ्याल त्याची संपूर्ण जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागते व्यवस्थेला दोष देणे, नशिबाला दोष देणे, कुटुंबातल्या परिस्थितीला दोष देणे ,नातेवाईकांना दोष देणे असले उद्योग क्रिया तंत्रामध्ये साधना करणाऱ्या माणसाला चालत नाहीत तेव्हा सर्वात प्रथम स्वतंत्र विकसित करावे लागते आणि हे अनेकदा अवघड जाते कारण आपण परतंत्र इतक्या सहजरीत्या स्वीकारलेले असते की आपणाला त्याची सवय झालेली असते त्यातूनच आपला ब्लेम गेम तयार होतो. म्हणूनच सर्वात प्रथम स्वतंत्र चालणार स्वतःच्या हिशेबाने चालणार आणि स्वतःच्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वतः घेणार असा दृढ निश्चय क्रियातंत्राने साधना करताना साधकाला करावा लागतो पण त्याचबरोबर दुसऱ्यांच्या आयुष्याचे निर्णय आपण घेता कामा नयेत कारण दुसऱ्यांच्या आयुष्याचे निर्णय घेणे म्हणजेच सत्ता गाजवणे होय तेव्हा सत्ता गाजवणे क्रिया तंत्रामध्ये बसत नाही तुम्ही पुढारी होऊ शकता पण फक्त स्वतःचेच पुढारी होऊ शकता यदा कदाचित लोकांचे लोकतंत्र मध्ये पुढारी झालात तर त्या लोकतंत्र्याची संपूर्ण जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागते त्या निर्णयांच्या पासून पळून जाता येणार नाही .पुढारी झाल्यानंतर तुम्हाला लोकांच्या हिताचे निर्णय स्वतः घ्यावे लागतात आणि ते तुमचे स्वतःचे निर्णय असतात आणि त्या निर्णयांची जबाबदारी भले ते लोकतांत्रिक असो परंतु स्वतःची म्हणजेच तुमची असते .. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वतः घेणे स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वतः घेणे म्हणजेच एका अर्थाने पुढारी बनणे आवश्यक असते म्हणूनच क्रिया तंत्राची सुरुवात करताना सर्वात प्रथम आपणच आपल्या आयुष्याचे पुढारी हे पहिले तत्व स्वीकारावे लागते अन्यथा तुम्ही परतंत्राच्या जाऊन संपूर्ण आयुष्य दुसऱ्याच्या हिशोबाने चालता आणि क्रिया तंत्र फळत नाही तुम्ही करता ते फक्त काम असते आणि ते अनेकदा दुसऱ्याच्या हिशेबाने चालते . मला अनेकदा प्रश्न विचारला जातो की श्रम आणि काम याच्यामध्ये फरक काय तर मी म्हणतो श्रम नेहमी दुसऱ्याच्या हिशोबाने चालतात आणि काम हे नेहमी स्वतःच्या हिशोबाने करायचे असते. कर्तव्य मात्र विधी नियम ज्या पद्धतीने तयार झालेले असतात त्या चौकटीत इतरांच्यासाठी करावयाचे काम असते. इथे पुढारी होणे गरजेचे पडले तर पुढारी म्हणून घेतलेल्या सर्व निर्णयांची जबाबदारी स्वतः घ्यायची असते .


तेव्हा तुमच्या आयुष्याचे पुढारी तुम्हीच आहात. 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे