Posts

Showing posts from November, 2025
 कुंभमेळा , साधू आणि संत श्रीधर तिळवे नाईक  नाशिक मधील कुंभमेळ्यांच्या संदर्भात सयाजी शिंदे यांनी अनेक स्टेटमेंट दिलेली दिसतात त्यानिमित्ताने साधू आणि संत हे शब्द पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत . सयाजी शिंदे हे केवळ अभिनेते नाहीत तर ते विचार करणाऱ्या अभिनेत्यांच्या पैकी एक आहेत त्यामुळे त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष द्यावे लागते  वृक्षतोडीला माझा विरोध मी वारंवार अगदी सुरुवातीपासूनच नोंदवलेला आहे . त्यामुळे इथे मतभेद असण्याची गरजच नाही पण नेमका मग प्रॉब्लेम झाला कुठे आहे ? सरकार इतके आक्रमक का आहे याविषयीची काही स्पष्टीकरणे यायला हवी होती ती येत नाहीयेत आणि याचे सर्वात मोठे कारण मुळातच कुंभमेळ्याच्या लोकसंख्येबाबतचा अंदाज महाकुंभमेळ्यात चुकल्यामुळे सरकार सावध आहे . खुद्द भाजपाला महाकुंभमेळ्यामध्ये एक ते दीड करोड लोक अपेक्षित होते आणि ते अनपेक्षितपणे हळूहळू तीन करोड आणि नंतर पाच करोड झाले शेवटी शेवटी ही संख्या 10 करोड पर्यंत पोहोचली आणि संपूर्ण व्यवस्थापनाचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली. सुदेवाने मॅनेजमेंट बऱ्यापैकी जमले मात्र तरीही काही जीव हकनाक गेले ही वस्तुस्थिती!...
दया क्षमा का श्रीधर तिळवे नाईक  जंगलच आहे त्यापासून आपण माणसांचे जग बनवतो पण प्राणी म्हणून तुम्ही जंगलीच राहता किंवा मग जगलरी करत बसता . जगण्याचे नियम हे जंगल ठरवते आणि तिथे डार्विन आणि बळी तो कान पिळी हे दोनच सिद्धांत लागू पडतात आहारातून भोग निर्माण होतो संभोगातून भोग निर्माण होतो आणि त्याची लालसा वाढत जाते अन्नासाठी आणि नर मादीसाठी स्पर्धा होतेच कारण जे तुम्हाला हवे आहे ते फक्त तुम्हा एकाला हवे असत नाही हे तुमच्या सोबत अनेकांना हवे असते या अनेकांना हव्या असण्यातून आणि हव्यासातून हेवे दावे येतात .  मला जे हवे होते ते मला मिळाले नाही दुसऱ्याला मिळाले म्हणून ज्याला मिळाले त्याचा हेवा तर जे माझेच होते ते दुसऱ्याने हिसकावले म्हणून त्याच्यावर दावा हाच हेवादेवा ! तो अटळ असतो . माणूस जन्मदत्त संत नाही माणूस जन्मदत्त पशु आहे आणि म्हणूनच मला पाशुपत दर्शन महत्त्वाचे वाटते कारण ते माणूस पशु आहे यापासून सुरुवात करते   माणसाला स्वतःला पशु म्हणून स्वीकारणे फार अवघड जाते आपले जंगली गुण अवगुण आहेत असे त्याला सांगितलेले गेलेले असते साहजिकच मग शिकवण एका बाजूला आणि जंगलामुळे येणा...
 सत्य, post truth,खरे ,श्रेय आणि जबाबदारी श्रीधर तिळवे नाईक  सत्य हा शब्द दोन अर्थाने आपल्याकडे वापरला जातो खरे या अर्थाने आणि सत्य म्हणजेच शून्य किंवा शिव होय खरे म्हणजे तथ्याला धरून असलेले आणि तथ्याला धरून केलेले विधान !  मी मागेच एक सिद्धांत मांडला होता की प्रत्यक्ष, परोक्ष आणि अपरोक्ष हे कितीही कार्यान्वित झाले तरी सत्य फक्त अनुभवता येते आणि ज्ञानाचा अंत झाल्यावरच त्याची प्रचिती येते प्रतिति येते माणसाच्या इंद्रियांची मर्यादा अशी की ते दोन डोळ्यांनी दिसत नाही त्यामुळेच तिसरा डोळा खोलावा लागतो  यातल्या गूढ गोष्टीवर बोलायला नको कारण विज्ञानाच्या कसोटीवरच सर्व चर्चा समाजात झाल्या पाहिजे असे मी मानतो पण आता हेही खरे आहे की आपणाला वास्तव प्रत्यक्ष सुद्धा संपूर्ण दिसत नाही त्यांचे संपूर्ण इंद्रियन होत नाही.वास्तव असते प्रत्यक्ष दिसते म्हणजेच माणसाला प्रतीत होणारे वास्तव म्हणजे प्रत्यक्ष होय . पुन्हा यात गोची अशी की प्रत्येक माणसाला त्याच्या पोझिशनुसार सापेक्ष वास्तव दिसत असते त्यामुळे आणखीनच पंचाईत होते म्हणूनच मी वास्तव आणि तथ्य वेगळे काढले होते . त्यामुळे मग विधान ...

नवीन टाईप झालेल्या जुन्या कविता

 मशिदीचे धर्मांतर होईल ती बाबरच्या ऐवजी रामाची होईल मुस्लिमांचे धर्मांतर होणार नाही ते बाहेरच राहतील फक्त देवाला आणखी एक जागा मिळेल उद्या या जागेत  मंदिर उभा राहील आणि पुरोहितांना एक अधिक जागा व्यवसायासाठी उपलब्ध होईल  रामाच्या नावाने पैसे येतील  सोने येईल चांदी येईल  धर्मांतर माणसांचे होणारच नाही फक्त देव परतेल  जो तिथे आहे की नाही  या वरून वाद आहे  कदाचित फक्त हेच हवे आहे  मुस्लिम स्वतःच्या धर्मात नकोच आहेत माणसे नकोच होती  नकोच आहेत देवच हवे होते  आणि देवच आहेत फक्त देवच कशासाठी हवे आहेत? आणि कोणाला ? का? श्रीधर तिळवे नाईक  (चॅनेल सिरीज मधील चॅनेल स्पिरिच्युअल  या काव्यफायलीतून) परंपरा त्यालाच शोभते  ज्याच्यात नवता झळाळते तू बसलायस जुन्यात अडकून  तुझ्यात कुठे काय खळाळते  तुझा राग समजू शकतो  जेलसी अशीच वेटाळते  झ** फरक पडत नाही  जेव्हा ती मला फेटाळते  बाकी सगळ ठीक आहे  ठीक नाही ते मला वगळते  श्रीधर तिळवे नाईक तू गाडीतून उतरत  माझ्यात उलाघाल तीच चाल  तुझ्या देहातून सु...