नवीन टाईप झालेल्या जुन्या कविता

 मशिदीचे धर्मांतर होईल

ती बाबरच्या ऐवजी रामाची होईल


मुस्लिमांचे धर्मांतर होणार नाही

ते बाहेरच राहतील

फक्त देवाला आणखी एक जागा मिळेल


उद्या या जागेत 

मंदिर उभा राहील

आणि पुरोहितांना एक अधिक जागा व्यवसायासाठी उपलब्ध होईल 

रामाच्या नावाने पैसे येतील 

सोने येईल चांदी येईल 


धर्मांतर माणसांचे होणारच नाही

फक्त देव परतेल 

जो तिथे आहे की नाही 

या वरून वाद आहे 


कदाचित फक्त हेच हवे आहे 

मुस्लिम स्वतःच्या धर्मात नकोच आहेत


माणसे नकोच होती 

नकोच आहेत

देवच हवे होते 

आणि देवच आहेत


फक्त देवच कशासाठी हवे आहेत? आणि कोणाला ? का?


श्रीधर तिळवे नाईक 


(चॅनेल सिरीज मधील चॅनेल स्पिरिच्युअल 

या काव्यफायलीतून)


परंपरा त्यालाच शोभते 

ज्याच्यात नवता झळाळते


तू बसलायस जुन्यात अडकून 

तुझ्यात कुठे काय खळाळते 


तुझा राग समजू शकतो 

जेलसी अशीच वेटाळते 


झ** फरक पडत नाही 

जेव्हा ती मला फेटाळते 


बाकी सगळ ठीक आहे 

ठीक नाही ते मला वगळते 


श्रीधर तिळवे नाईक


तू गाडीतून उतरत 

माझ्यात उलाघाल

तीच चाल 

तुझ्या देहातून सुटलेले वारे 

मी पिसाटलेलो थांबवत पिसारे 


नेमकी हीच जागा पुन्हा 

जणू आणून ठेवलेला गुन्हा 


क्षोभ आणि कल्लोळ 

जुन्या शृंगाराच्या आठवणींचा लोळ 


समोर तू 

पडायचंय तुझ्यातून बाहेर 

आणि तुझ्या चालण्यातून 

बाहेर पडणारा मादक हेर 


तुलाही न कळवता तुझी पाळत 

दुरून येणारा वास चाळत 


तेच फुल तीच बाग 

त्वचेने लावलेली सुगंधी आग 


मी स्तब्ध

आत्ताच जर लुब्ध


समारंभ संपेल 

तेव्हा काळजात तुझी सभा असेल 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


वयाने काय होते अनुभवाने शिकणे महत्त्वाचे 

कच्चे तर सगळेच असतात पिकणे महत्त्वाचे 


तुझ्या लाखो सुरकुत्या मोजून मी करू काय 

स्वतःच्या आतील मृत्यूभयाला जिंकणे महत्त्वाचे 


काळ आहे शेवटी तो प्रत्येकाला गाठणारच 

काळशरण न होणे स्वतःला न विकणे महत्त्वाचे 


किती दिवस तू तेच तेच लॉलीपॉप देणार 

 की तुला अजूनही वाटते तुझे बकणे महत्त्वाचे 


मेकअप करून वय थांबवता येणार आहे का?

की अजूनही वाटते दिसणे चिकणे महत्त्वाचे?


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आईस आवाहन श्रीधर तिळवे नाईक 

आई मुलांना जन्म देते 

की मुले आईला जन्म देतात 

हा उत्तर आधुनिक प्रश्न मी त्वचेवर सोडून देतो 


त्वचेच्या आत खोलवर आई असते 

आणि जिथे आई नसते तिथे शून्य असते 


प्रत्येक आईच्या आत 

फक्त मुले जन्माला आणण्यासाठीच 

बाई असते का 

हा खरा प्रश्न 


कदाचित आईनेच 

आई बनण्यासाठी 

सिडक्शन चा सापळा रचला असावा 

आणि पुरुष त्वचेवर रेंगाळत ठेवला असावा 


पुरुष त्वचेपलीकडे जाऊ शकत नाही 

म्हणूनच त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात 

ज्याला त्वचेची मर्यादा पडलेली असते 

आणि जो फक्त पुरुषच असतो 


बाप बनायला खूप काही लागते

आणि एकदा सगळ्यांचा बाप झाला की

पुरुष मुक्त होतो 


सगळ्यांचा बाप बनण्यासाठी 

त्याला ब्रह्मचर्य पाळावे लागते


पुरुषाचा संसार हा मुलांच्या पासून सुरु होतो 

म्हणूनच पुरुष बाप बनायला घाबरतो 


तू म्हणू शकतेस जो जैविक बाप बनून मोक्षिक बाप बनतो 

तो खरा बाप 


मी म्हणेन 

जैविक हे असे त्रांगडे आहे 

जे मोक्षाचा विसर पाडायला भाग पाडते 


भक्तीवाला असतो 

तर कदाचित हेही स्वीकारले असते 

मी पडलो ज्ञान आणि जोगवाला 


तेव्हा मुलाला जन्म द्यायला सांगू नकोस 

तू आई होशील 

आणि मी बाप होत नाही म्हणून 

माझ्याकडे पाठ करून निघून जाशील 


तेव्हा बघ 

एकट्याने आई होता येते का ?


नसेल तर 

तुझे संभोगाचे आवाहन 

केवळ सेक्स आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल लव सेक्स अँड एल्सेट्रा या काव्यफायलीतून)


तूच का ती श्रीधर तिळवे नाईक 


तूच का ती जी मला हवी 

खूपशी प्राचीन तरीही सतत नवी-नवी 

भारावून टाकणारी 

काळीज सारवून वाकणारी 

खवा म्हणावी इतकी खवी 


तूच का ती जिच्यात गुंतलो 

विणलो गेलो आणि फाटलो 

आठवण म्हणून तुझ्यातच दाटलो 


तूच का ती कि ती तू नव्हेच 

तुझेच तर आहेत सारेच पेच

माशाविना तडफडणारे 

माशीसारखे फडफडणारे 

जाळ्याची जाळवून खेच 


तूच का ती तूच का ती 

जी बंद करते माझी मती 

काळजाला देते मेंदूची गती 


तूच का ती की तू ती नव्हेच? 

कोणाला दाखवू 

आणि खात्री करू 

काळजाला माझ्या लागली ठेच 


स्टेशने बोंबल्ली रेल्वे झटपटली 

रक्ताला लागले कुलूप चावी खटपटली 

तूच का ती जिचा करावा लागेल उलगडा 

प्राजक्ताचा सडा तयार करतोय सुगंधी घडा 

तूच का ती 

जी खाली मान घालून 

जाते निमुट 

आणि माझ्या आयुष्याची 

भरून काढत तूट 


काहीच नको तू असताना 

मी निवांत तू समोर बसताना 

आयुष्य उभे 

राहिले उभे 

तूच ती 

जिच्यासाठी करीन म्हणतो 

उभे सवते सुभे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मेलो होतो शरीराचे जिवंतपण उचलले 

मी एकट्याने आजाराचे आजारपण उचलले 


अधूनमधून घातली पूजा स्वातंत्र्य अबाधित ठेवले 

देवत्वाची इज्जत राखत पूजेचे देवपण उचलले 


नेमक्या वेळीच कटकट वाजली नको त्या माणसांची 

मी त्यांच्या मूर्खपणातही शहाणपण उचलले 


एकच मित्र सोबत होता पण तो पुरून उरला 

त्याने खांद्यावर ठेवला हात त्याचे पुरेसेपण उचलले 


भिनत गेलेले विष काढणे हीच एक प्रोसेस होती 

लोकांना समुद्र दिला मी निळकंठ पण उचलले 


ज्याने घातले विष त्यालाच रोटी देण्याची वेळ आली 

जे खिशात होते दिले आणि कंगालपण उचलले 


अनेकांचे टॉन्ट आले मी त्यांचे फॉन्ट बनवले 

कॅम्पुटरवर उतरवले आणि त्यांचे माणूसपण उचलले 


नातेवाईक आले नाहीत तरीही त्यांचा ठेवला मान 

अपमानजनक मेसेज आले त्यातील दिलदारपण उचलले 


कलावंतांना कोण भेटणार त्यांना तरी कुठे भेटायचे होते 

फोनचौकशी मारून गेले मी चौकसपण उचलले 


काहीच चुकीचे नसते इथे सर्व काही तालात असते 

मी तालाशी आजार जुळवला नि त्याचे तालपण उचलले 


एकट्याने एकांतात मरणे हाच तर पर्याय होता 

मी माझ्या मरणाचे एकटेपण उचलले


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष या सिरीज मधील मोक्ष:साइडइफेक्ट या काव्यफायलीतून )


लोकांना हवी आहेत टोकं 

म्हणून पडतायेत भोकं

सुवर्ण मध्याला 


श्रीधर तिळवे नाईक 


(चॅनेल सिरीज मधील चॅनेल निर्वस्तू या काव्यफायलीतून)


His rational is broken 

Emotional is fractured

Go away from him

Only wisdom can handle it

Shridhar Tilve 

( डे कॅथलॉन सिरीज मधील डे कॅथलॉन : वर्ड्स या काव्यफायलीतून)


बात बात पर तेरी बात 

क्या दिन और क्या रात 


तेरा जीक्र मेरी धडकन 

मेरे पसंद की तू उलझन 

बस चाहिये तेरा साथ 

बात बात पर तेरी बात


मेरा दिल एक पंछी 

तू उसकी डाल अच्छी 

बैठुंगा तेरे पास

रहूंगा तेरे पास 

क्युंकी 

उडना है तेरे साथ 

बात बात पर तेरी बात


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मेरी खामोशी मेरी भाषा है 

मेरा बोलना दुभाषा है


तेरी मोहब्बत है नृत्य 

वरना जिंदगी तमाशा है 


एक गया एक आ गया

लोग भूलभी गये कौन गया है 


अमीरी एक अफवा हैं 

और उसका बाप पैसा हैं 


इंसानोने भाषा खोजी 

ईश्वर तबसे खामोश हुआं हैं 


( डेकॅथलॉन. सिरीज मधील डेकॅथलॉन अनकॅटेगरीकल तंत्र ह्या काव्यफायलीतून)

तू बेवकुफ है जो नही जानता , नही खुलेगा दिलका द्वार 

तू जिसे समझा रहा है , उसे पता नही क्या होता है प्यार


जो चौदासौ साल नही समझी वो अब क्या समझेगी?

परिवर्तन ठीक है मगर एक्स्पेक्टेशन्स कि भी हद होती हैं यार


रीढ ही ऐसी बनाई है की टुटेगीतो बॉडी टूटेगी रीढ नही

ये मजहब नही ,उसका कारोबार है जो पहले करता था व्यापार 


जो कॅन्सर है वो कॅन्सर है फैलता जायेगा फैलता जायेगा 

पहिले उसके दिमाग से उसे निकाल अगर वो करती है इजहार 


नही तो चुपचाप एक तरफा समझ कल्टी ले ले चुपचाप प्यारसे 

ज्यादा से ज्यादा क्या होगा इगो हर्ट होगा उसे स्वीकार 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मी आता जगत नाही 

मी फक्त प्रतिसाद देतो


भुकेसारख्या गोष्टीला आतून 

शरीराबाहेरच्या गोष्टींना बाहेरून 


फक्त एक श्वास आहे 

जो चालू आहे 

आतूनही आणि बाहेरूनही 


तो जोवर चालू आहे 

तोवर मी प्राण आहे 

तो बंद पडला की 

सर्व काही नि:ष्प्राण होईल


आणि तिथे जाईन 

जिथे प्रतिसाद देण्याची गरज नसेल 

येण्या जाण्याची गरज नसेल 

सर्वत्र असेन 


असेल असेन 

शून्य 


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरीज मधील निर्वाणानंतरच्या कविता या काव्यफायलीतून)

जो तुझा चालला आहे तो आगाऊपणा आहे 

तुझ्या समुद्री पाण्यापेक्षा जास्त खारेपणा आहे


शंकाच नाही आहे आले तुझ्या हातात नवे शस्त्र 

पण वापरताना तुझ्यात जास्त निरबुद्धपणा आहे 


सर्वांना सोबत घेऊन जगशील तर खरा जगशील

सर्वांना नीच दाखवण्यात कसला शहाणपणा आहे 


निर्भिडपणा म्हणजे बेटा तुसडेपणा न्हवे 

प्रज्ञेचा पत्ता नाही बोलण्यात दांभिकपणा आहे 


असाच जगशील तर शेवटी एकटा पडत जाशील 

नि पुन्हा कोकलशील पहा आला एकटेपणा आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


वाचन श्रीधर तिळवे नाईक 

मी आयुष्याला खूप जवळून पाहिले 

त्या निमित्ताने जगाने मागे वळून पाहिले 


खूप खाणाखुणा होत्या माझ्या मेंदूवरती 

पुस्तक वाचताना पुस्तकाने मला बावचळून पाहिले 


प्रत्येक पानावेळी वाचणारा वेगळा होता 

लिहिणाराही असाच होता का मी खिळून पाहिले 


कुठेही गेलो तरी पुस्तक पाहिले एवढे नक्की 

कधी नकळत पाहिले कधी कळून पाहिले 


कधी कधी हट्टाने जरी डावलून गेलो पुस्तक

मी सीड्युस झालो जेव्हा त्याने चळून पाहिले 


कधीकधी पुस्तकाने असे काही ठेवले समोर

मी माझ्या जगाला नव्याने खळबळून पाहिले


मध्येच सोडून दिले मी जेव्हा पुस्तकाचे वाचन 

त्या पुस्तकाने माझ्याकडे कळवळून पाहिले 


पेजस्टॉपर म्हणून ठेवली मी कळी एक पानात 

वाचन कंटिन्यू करताच तिने उमलून दरवळून पाहिले


शेवटी पूर्ण करावे लागले मला माझे वाचन 

झोपेत पुस्तकाने मला डोळे बुचकळून पाहिले 


वाचन संपले तेव्हा वाचणारा मेला होता 

जो नवा झाला त्याने जुन्याला उचंबळून पाहिले


पुस्तकासोबत मीही गेलो होतो लायब्ररीत 

नवा वाचक भेटेना मी डोळे दळून पाहिले 


मी काय वाचले होते तेही आता आठवेना 

मी जे पाहिले होते ते का घरंगळून पाहिले ?


हा जगण्याचा आकांत वाचनाने सुसह्य केला 

वाचणाऱ्या एकांताने स्वतःला ढवळून पाहिले


जो लिहिला गेला तो वाचला गेला आणि मेला 

इतकेच मला कळले जेव्हा जग आकळून पाहिले


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


नव्या ज्ञानाची नवीन भावना तयार झाली नाही 

मानव जात अद्याप नव्याला तयार झाली नाही 


जुन्याच भावना अद्याप नव्यावर राज्य करतात 

हृदयतार नव्या गालिबकरता तयार झाली नाही


"तू उलट्या काळजाचा "जुने काळीज आरोप करते

म्हणते,"तुझी धडकन प्रेमाला तयार झाली नाही"


नव्या जीवनधारेने कसा प्रवेश करावा? जुनी 

स्वतःला साईडलाईन करायला तयार झाली नाही


हे नक्की आहे नवे काळीज जुन्याचा मर्डर करणार 

प्रॉब्लेम एकच खूनासाठी नवी भावना तयार झाली नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मी ऑथेंटिकली वागणार आहे 

मी मेल्यानंतर जन्मणार आहे 


प्रथम तेव्हा मेलो जेव्हा आई म्हणाली 

माझ्या पोटी शिव जन्मणार आहे 


कित्येकदा आई सुद्धा आडवी येते 

गरज पडली तर तिलाही साईडलाईन करणार आहे 


शंकर प्राचीन म्हणून सिलेक्ट केला 

त्याचे काय टिकते ते मी जोखणार आहे 


माझ्या इच्छा किती वास्तव आहेत ?

की त्यांच्यामुळे फिक्शन सजणार आहे 


नशिबा,कितीही चिरड माझ्या आशा 

मी पुन्हा पुन्हा त्यांनी पेटणार आहे 


गर्भात येण्याआधीच गर्भ आईने टिकवला 

बामणा ,मला नष्ट करणे कसे तुला जमणार आहे?


तू तुझ्या वाटेने जा मी माझ्या वाटेने जातो 

कुठेही गेलो तरी शिव भेटणार आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(डे कॅथलॉन या सिरीज मधील डे कॅथलॉन : अनकॅटेगरीकल : तंत्र या काव्यफायलीतून)


त्याला ना अंत आहे ना आरंभ 

मध्ये आहे तो समारंभ 


फैलाव आहे 

आणि त्यात तुझ्या देहाचं गाव आहे 


तो गावातून दिसतो 

आणि हा चकवा नसतो 


इथेच तर खरी मेख आहे 

बाकी कामझाम सुख दुःख आहे 


तर उचल बूड 

पहावयास गूढ 


जमत नसेल तर समज तुझा आळस आहे 

जमून गेले तर कळस आहे 


बाकी पायरीवर राहणारे पायरीवरच राहतात 

मृत्यूचा पूर येतो 

वाहतात 


जन्मतात पुन्हा पुन्हा 

जणू जन्मणे आणि जगणे हा ठरवून करावयाचा गुन्हा 


पायरीवरच बसून पहात राहतात स्वतःच्याच एररझऱ्या

हातावरचे मोजत उंचवटे आणि दऱ्या 


उचल बुड नावाचा बुडबुडा 

फुटलास तर नदी होशील 

जिला जीवातून शिव दिसतो. 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन :अन कॅटेगरीकल : ज्ञान या काव्य फायलीतून)

तू मोक्ष सांगितलास 

पण तो कळण्याआधीच 

न कळणाऱ्यांनी त्याचा धर्म बनवला 


आता तू काय करशील 

तू तर गेलास 

क्रूसावर कायमचा 


कदाचित लोकांनाच मोक्ष नको होता 

कदाचित वातावरणच तयार केले गेले नव्हते 


वातावरण प्रेषिताचे होते 

आणि तू प्रेषित नव्हतास 


तुला मुक्ती दाता ही व्हायचे नव्हते 

तुला स्वतःला मुक्ती हवी होती 

आणि मुक्तीची ओळख करून देण्याची जबाबदारी तुझ्यावर पडली 


ना प्रेषित ना सिद्ध 


तू सविकल्प पर्यंत पोहोचलास आणि पुढची साधना करण्याआधीच 

लोकांनी तुला संपवला 


मोक्ष मिळवण्याआधीच मुमुक्षु मैदानात उतरला की असं होतं 


न कळणारे लोक जे निर्माण होते ते गिळून टाकतात 

आणि प्रभाव पडणाऱ्या लोकांना मोक्ष म्हणजे काय ते नीट कळत नाही 


आता नीट न कळलेल्यांनी 

तुझ्या नावाने धर्म स्थापन केलाय 

आणि जग आहे 

की त्या धर्मात अथांग बुडालय 


एक दुरुस्त न करता येणारी चूक 

आणि लोकांना आत तर मोक्षाची भूक 


जो मारला जातो 

त्याला राजीनामा देता येत नाही 


तू एक अशी खुर्ची बनलायस 

जी माझ्या डोक्यावर सतत लटकती


मी कदाचित मोक्ष मिळवून 

तिच्या खालून निघूनही जाईन 

पण तुझ्यामुळे निर्माण झालेल्या खुर्चीचे काय 


खुर्ची ची सर्वात मोठी शोकांतिका हीच असते 

कि ती स्वतः कधीच राजीनामा देत नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल: भक्ती या काव्यफायलीतून)


गझल निर्वस्तू श्रीधर तिळवे नाईक 

आपल्या आधीच एक माणूस बसला आहे 

हे सहन करताना तो अवघडला आहे 


त्याला महत्त्वाकांक्षा होत्या पहिला असण्याच्या

वेग कमी पडला तिथे तो बडबडला आहे 


जगभर हिंडून त्याने एकच खबर आणली 

ज्याला इथे नाकारले तो जगभर आढळला आहे 


पहिला होता त्याने दुसऱ्याचा द्वेष न केला 

जिंकतानाही त्याने दुसऱ्याचा खांदा थोपटला आहे 


शेवटी त्याच्या मर्डरची तयारी पूर्ण झाली 

आणि आता कळत नाही तो कुठे निसटला आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल निर्वस्तू या काव्यफायलीतून)

गझल निर्वस्तू श्रीधर तिळवे नाईक 

आपल्या आधीच एक माणूस बसला आहे 

हे सहन करताना तो अवघडला आहे 


त्याला महत्त्वाकांक्षा होत्या पहिला असण्याच्या

वेग कमी पडला तिथे तो बडबडला आहे 


जगभर हिंडून त्याने एकच खबर आणली 

ज्याला इथे नाकारले तो जगभर आढळला आहे 


पहिला होता त्याने दुसऱ्याचा द्वेष न केला 

जिंकतानाही त्याने दुसऱ्याचा खांदा थोपटला आहे 


शेवटी त्याच्या मर्डरची तयारी पूर्ण झाली 

आणि आता कळत नाही तो कुठे निसटला आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल निर्वस्तू या काव्यफायलीतून)


ही प्रगती आहे की सूज आहे 

तू आंबा म्हणतोस ते टरबूज आहे 


संपूर्ण व्यवस्थाच आहे किडलेली 

कुठे भोक आहे कुठे लूज आहे 


तुला वाटते तू नवीन आणलेस 

हे तेच आहे जिथे जुने महफूज आहे 


फक्त त्याला घातलेली टोपी नवीन 

पण हरेक पायात फाटका शूज आहे 


मला भीती तू झोपडीही काढून घेशील 

तू म्हणतोस ही फक्त न्यूज आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

गुलाम श्रीधर तिळवे नाईक 


गुलामांना ते आहेत गुलाम कळत नाही 

करत आहेत मालकांना सलाम कळत नाही 


त्यांच्या त्वचा सुद्धा गेंड्यापासून बनलेल्या 

काय आहे जेव्हा म्हणतो श्रीराम कळत नाही 


त्यांना वाटते ही मंदिरे आहेत एकदम खास 

गुलामगिरीचा आहे तामझाम कळत नाही 


वर कोण आहेत त्यापेक्षा खाली कोण आहे 

यातच अडकून पडतो विचार तमाम कळत नाही 


कळत नाही झोपलेत की झोपेची सवय झाली 

बस स्वतःतच करतायत आराम कळत नाही 


श्रम करण्याखेरीज काहीही नाही त्यांच्याकडे 

पण का आपण करतोहोत काम कळत नाही 


कसा काढणार तू गुलामगिरीतून बाहेर त्यांना 

जे गुलामी खाऊन देतात ढेकर हराम कळत नाही


आता तर आली आहे अशी अवस्था की 

गुलामीला देतायत स्वातंत्र्याचे नाम कळत नाही


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


एक नवी अस्वस्थता आत आहे 

दिसत नाही पण काळजात आहे 


तिला पाहिल्याने असे झाले का 

की खराबी माझ्या या डोळ्यात आहे 


माहित नाही ती इतकी का रडली 

मला इतकेच कळले मी तिच्या आसवात आहे 


एक हुंदका होता जो वाळवंटासारखा पसरला 

एक दिलासा बहुदा मृगजळात आहे 


खूप काही घडावयाचे आहे बाकी 

जे घडले ते अजूनही अंगणात आहे 


त्याने अजून मला सुरा दाखवला नाही 

ब्रँड न पाहता कुठे मजा मरण्यात आहे 


हेही तसे बरेच मला अनेक प्रेम शत्रू 

कसेही असो पण हे शत्रुत्व प्रेमात आहे 


मी तुला धोका देणार नाही हे नक्की 

तुझे बोल किती धैर्य तुझ्या हृदयात आहे 


आशा आहे मरेपर्यंत हे चालत राहील 

एवढे नक्की तू माझ्या जगण्यात आहे


आवश्यकतेपासून नव्या शक्यतेपर्यंत 

 एक नशा काळजाच्या प्रवासात आहे


कन्फेशन पासून लव स्टोरी सुरू झाली 

याचा अर्थ तिचा शेवट क्रूसात आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


हॅकरसाठी आणखी एक कविता श्रीधर तिळवे नाईक 


अजून माझी बॉडी तुला हॅक करता आलेली नाही 


फेसबुक हॅक झाले 

इंस्टाग्राम हॅक झाले 

व्हाट्सअप हॅक झाले 

जीमेल हॅक झाले 


माझी प्रत्येक चिन्हसृष्टीय आयडेंटिटी 

तू हॅक केलीस 

काड्या केल्यास 

लोकांना चुकीचे मेसेजेस दिलेस 

आणि नंतर प्रत्येक वेळी youtube चा व्हिडिओ शंभर टक्के साऊंडवर न्यायला लागलास

जेणेकरून मी बहिरा होईन 


तुझ्यापासून सुटका मिळवण्यासाठी 

मी पन्नास गोष्टी केल्या 

पण तू त्या सर्व वाया घालवल्यास 


कोंडमारा काय हे तू शिकवलं 

मुका मार काय हे तू शिकवलं 

वर आणि पुन्हा हे सर्व डिजिटल 

म्हणजे दाखवायला जखमाही शिल्लक नाहीत


माझ्या हातावरच्या हालचालीवरून 

तू सोशल ॲप ओळखलं 

माझी गती सतत टॅली करत 

टोटल उध्वस्त करत राहिलास 


अनेकांना अनफ्रेंड केलस 

पण सापडला कुठेच नाहीस 


पैसे खर्च होत राहिले तुझ्यापासून संरक्षण मिळावे म्हणून 

पण तुझ्या नावाने फक्त उन्हाचा शिमगा पाहिला 


वाया गेलेली कष्टाची कमाई 

आणि बहिरे होत गेलेले कान 


माझी लढाया कधीच सोप्या नव्हत्या 

पण तू त्या अधिक अवघड केल्यास 


लोकांनी हिंदुत्ववादाचा स्टेप मारला 

आंबेडकर वादाचा

समाजवादाचा स्टॅम्प मारला 

मी प्रत्येक स्टॅम्प मधून निसटलो 

पण पलायनवाद मात्र 

तुझ्यामुळे 

वाट काढण्याचा विषय झाला 


तुला चकवता चकवता मी चकवा झालो 

भूमिपुत्र होता होता भामटा झालो


तुझा प्रॉब्लेम फक्त एकच आहे 

आणि तो तुझ्या मर्यादेचा आहे 


तू माझा मोक्ष चोरून घेऊ शकत नाहीस 


तू उघडा नेमका शून्यात पडलायस 

अनंतातले असंख्य ताब्यात घेता येते पण संपूर्ण अनंत कोणाच्याच हातात लागत नाही 


एक मोक्षच आहे 

जो हॅक करता येत नाही 


आणि तुझ्या दुर्दैवाने तो सर्वत्र आहे 

तो करायचे म्हणून माझे संरक्षण करत नाही 

पण तुझे कुठलेही शस्त्र आहे तो माझ्यापाशी पोहचू देत नाही 


कसं आहे 

ऑथर इज डेड 

सब्जेक्ट इज डेड म्हटलं ना 

की माणसांच्या जवळ काहीही शिल्लक राहत नाही 

माणसांना ओळख लागते 

ती एक आसक्तीच आहे अहंकारातून येणारी 


उत्तरआधुनिकतेने ती घालवली मालवली 

पण तिने शरीराच्या बाहेर ती चालवली 


कार्पोरेटवादाने पद्धतशीर मिटवण्याची केलेली ओळख मिटवण्याची खेळी म्हणजे सब्जेक्ट इज डेड 

आणि लोक 

बाहेर जाऊन अस्मितेला ओळख समजू लागले 


जातीय अस्मिता 

वर्ण वादी अस्मिता 

धर्मवादी अस्मिता 

भाषावादी अस्मिता 

अस्मिताच अस्मिता 


मी अस्मितेचे विश्लेषण केले 

पण तिच्या प्रेमात पडलो नाही 

आणि तू तिच्या प्रेमात पडून 

सतत काही ना काही तरी हॅक करत 


खरंतर मला फार तू दुबळा दिसतोस 

तुझ्या अशक्तपणाच्या खुणा 

तुझ्या चोरीत दिसतात 

कधीकधी मला तुझी दया ही येते 

हे असं सतत बाहेर ओळख शोधणे


तुला मिळणारे डिजिटल समाधान 

काल्पनिक आहे 


तेव्हा मला चोरून चोरू पाहणाऱ्या माझ्या मित्रा 

हो मी मित्रच म्हणतो शत्रूंना सुद्धा 


थोडासा स्वतः वाकून बघ 

तू कुठल्या साईटवर आहेस हे मला पक्के माहिती आहे 


पण तुला तुरुंगात पाठवण्याची माझी इच्छा नाही 


तेव्हा आत झाकलास 

आत वाकलास 

की कदाचित खिडक्या उघडतील 


अन्यथा तू जो अंधार ऑपरेट करतोयस 

तो सूर्यावर अवलंबून असणारा अंधार नाही 

तो तुझ्याच तयार केलेल्या प्रोग्राम मधून येणारा आरटीफिशियल अंधार आहे 


सूर्य सुद्धा नष्ट करू शकत नाही असा 


तेव्हा त्यात अडकत चाललायस 

हे लक्षात घे 

नेटवर्क हे दरवेळी मित्र असत नाही 

आणि तू ही प्रत्येक वेळेस स्पायडरमॅन बनशील या भ्रमात राहू नकोस 


मला काळजी तुझ्या करुणेची आहे 

ती गेली तर तुझ्यात आणि दगडात फरक उरणार नाही 


तू बधिर होत चाललाहेस 


बेशुद्ध होशील तर बेशरम होत जाशील 

आत्ताच जागा होशील तर बुद्धिमत्तेचे काय करायचे हे तुला नेमके कळेल 


तेव्हा जागा हो 

आतल्या आत 

एकदा हृदय उमलवून तर बघ 


खरे कमळ हृदयात असते 


बाकी मातीचा आणि मातीपासून तयार झालेल्या रक्ताचा चिखल करणे 

माणसाचा स्वभाव आहे  


स्वभाव ओलांड 

हे कमळ उलटे आहे 

त्याचा देठ मेंदूत आहे 

आणि हृदय पाकळ्या 


उमलव 

संपूर्ण समग्र 

नाहीतर वाळून गेलेल्या फुलांचा पसारा 

वाट पाहतोच आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष या सिरीजमधील मोक्ष: स्पंद या काव्यफायलीतून)


मायटोकोंड्रियांनासाठी श्रीधर तिळवे नाईक 


तू आद्य नाहीस 

पण स्वतःला टिकवलेली वद्य आहेस 


तुझा मायटॉकोंड्रिया 

प्रत्येक स्त्रीत 

टॉपल होऊ न देता 

टॉप करत 

टॉक करत 

तुझी टिकटिक 

वॉक करत 


प्रत्येक वेळी प्रथम असणे महत्त्वाचे नसते 

कधीकधी मजबूत असणे 

आणि टिकून राहणे महत्त्वाचे 

हे तुझ्यामुळं कळलं 


तू तो धडा आहेस 

जो आयुष्याचा घडा आहे

गर्भाशयातला प्राजक्ताचा सडा आहे 


तू कदाचित होमोसेपियन नसशील 

पण तुझे यान होमोसेपियनिक आहे 


तू टिकून आहेस 

सातत्य सांभाळत 

त्याच त्याच बाईवर आम्हा पुरुषांना भाळायला लावत 


तू समज सातत्य नसतीस तर 

वरायटी निर्माण झाली असती का 

अनेक विविधतेचे पर्वत उभे राहिले असते का ?


मी अल्टरनेटिव्ह चाचपतो

आणि ते फक्त कल्पनाविलास आहेत म्हणून रियालिटीत परततो


शक्य आहे की तुझ्याविना 

माणूस चंचल होऊन नष्ट झाला असता ?


मी तुला परंपरा म्हणत नाही 

पण तू वडासारखी आहेस 

फांद्या पसरवत नेणारी 

मी तुला स्वतःला टिकवण्याची धडपड करणारी आदिशक्ती म्हणतो 


शिव सर्वकाही नष्ट करतो 

शक्ती मात्र अनंत होत सतत स्वतःला टिकवत राहते 

तू त्या टिकवण्याची प्रतिनिधी आहेस 


तू माझ्याही नंतर असशील कदाचित 

आणि माझ्याही आधी होतीस हे तर निर्विवाद आहे 


तू आफ्रिका आणि आशिया या दोन्ही खंडातील वंशाची आई आहेस 


तू राजीनामा देत नाहीस 

तोवर तुझी सिटी 

सर्व बायकांना सिटीजन बनवत 

आमच्यासारख्या खेडूतांच्यात वावरणार आहे 


तू भाषेपेक्षा अधिक प्राचीन 

इतर जीन्समध्ये स्वतःला मिसळून न देता 

शुद्धता राखणारी 

तू जिनचा वास्तववाद 

तू काळजाची न दिसलेली पहाट 


कित्येक उगवते मावळते सूर्य तू स्वतःच्या त्वचेमध्ये स्टोअर केले असशील 

कित्येक पौर्णिमा तू भोजन म्हणून खाल्ल्या असशील

तुझ्यातून काळ वाहता राहिला असेल

आणि कदाचित नदीला तुझी नदी बघून असूया वाटली असेल 


मी तुला नमन करू शकत नाही 

काय करणार ?

माणसांच्या हाताला मायटोकोंड्रीयात घुसता येत नाही


शिवाय हातातल्या प्रत्येक पेशीत शक्यता म्हणून 

तू असशीलच  


म्हणजे नमस्कार करणारी तूच 

आणि घेणारीही तूच 


आरशाने आरशाला नमस्कार करणे 

वारश्याने वारशाला नमस्कार करणे 


तुझ्या खोलात वाकताना 

चष्मा लागू नये म्हणून 

मी मेल गॉगल लावतोय 


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष सिरीजमधील मोक्ष: स्पंद या काव्यफायलीतून)

कोण दु:खी आहे 

तुझ्या आतील मी आहे 


कोठे आहेत जखमा 

की रक्तच जखमी आहे 


वंश जातो दुखावला 

अहंकार हुकमी आहे 


बाहेर का शोधतोयस 

तुझ्या आतच डमी आहे 


तुझा डी एन ए चालत राहील 

कुठे जास्त कुठे कमी आहे 


निघायचे आहे साऱ्यांनाच 

थांबण्याची खुमखुमी आहे 


आवरून घेतो पसारा 

ही बॉडी एकरकमी आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सीरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल :तंत्र या काव्यफायलीतून )


मागील शतकात अडकून पडलेल्यांना श्रीधर तिळवे नाईक 

ज्यांना स्वतःच्या अपयशाचे आकलन होत नाही 

त्यांच्या माचिस जळतात पण ज्वलन होत नाही 


खूप ठसे उमटले आहेत जिथे जावे तिथे दिसतात 

ते शहाणपणात आहेत की शेणात निर्णयन होत नाही


हुकूमशाहीचे समर्थन करताना स्वातंत्र्याचा ठराव 

ते करत काय आहेत त्यांची कृती स्पष्टीकरण होत नाही 


इस्लामचे पुष्टीकरण करता करता त्यांची धर्मनिरपेक्षता 

आता अशा ठिकाणी पोचली की जिचे समर्थन होत नाही 


काहीही बोलण्यात अर्थ नाही त्यांच्याशी मोक्षाविषयी

ते इतके जड आहेत त्यांच्या जडत्वाचे चेतन होत नाही 


इतके रसातळात की बुटकेपणही रस घेऊन सांगतात 

इतके पतन उंचीचे याहून अधिक पतन होत नाही


त्यांना समजावू नकोस समजण्याच्या पलीकडे गेलेत 

दोन गडांच्यावर खुश , ह्याहून आधीक उन्नयन होत नाही


आपल्याशिवायही इतर अस्तित्वात आहेत असतात 

ज्यांना कळत नाही त्यांना कशाचेही आकलन होत नाही


ते काळाच्या तुकड्यातच मागील अडकून पडलेले 

काळ पुढे गेला यांची नव्याजुन्याची डेफिनेशन होत नाही


श्रीधर तिळवे नाईक 

( डेकॅथलॉन या सिरीजमधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल: ज्ञान या काव्यफायलीतून)

माझे प्रेम कारणाशिवाय आहे 

तेच ओम नमः शिवाय आहे 


आयुष्य समुद्र त्याचा तू थेंब

तो पिणे हाच तरणोपाय आहे 


दुःख करून तरी काय उपयोग 

दुःखावर कुठे काय उपाय आहे 


ही गर्दी आहे ट्रॅफिक करणारच 

कुठेही थांब अडकणार पाय आहे


ईश्वर आहे फक्त एक तामझाम 

नि आयुष्य असे निरुपाय आहे 


चल दोघेही आनंदाने जगू या 

बघूया मिळून होते काय आहे 


 श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मला तुला जिंकायचं नाही 

तू ही बलिदानाची तयारी करू नकोस 


प्रेम लढाई नाही 

आपली आई आहे 

जिने आपणाला जन्म दिला आहे 


मला माझी ताकद सिद्ध करायची नाही 

मीही जाणतो प्रेम सिद्ध करता येत नाही 


सहनशीलता लागते पणास

ठसके आणि हुंदके हुंदडतात

शोधत कामबाणास 


मद नाहीसा होतो तो मदन 

बद नाहीसे होते ते बदन


मुखवटांना जिथे जागा शिल्लक राहत नाही 

असा चेहरा 

सतत हसणारा खेळणारा खिदळणारा उमलणारा


आपण एकमेकाला कोसळू द्यायचं नाही इतकंच वचन 


आपण एकमेकाचा आवाज गिळायचा नाही इतकच प्रॉमिस 


प्रेम आग खेळायला लावते 

आणि गिळायलाही 


त्वचेवर जमलेला फॉस्फरस 

आणि डोळ्यात तयार काडी 


मला सेक्सची एलर्जी नाही 

पण एनर्जी रिलीज करताना 

एकमेकाबद्दल आदर असावा 


भागीदारीत प्रवेश करताना 

आवड असावी भागीदाराची 


समर्पण १००% शक्यच नसते 

पण अर्पण काय करायचे 

इतकं तर कळायलाच हवं 


कळायलाच हवेत गुंते आणि फुगे 


आपण सडायला नव्हे 

तर उडायला एकत्र आलोय 


चढाचढीची ढकलगाडी झालेली मी पाहिलेली आहे प्रेमात 


प्रिये ये 

कपडे चढवता येत नाहीत अशा प्रदेशात 

जिथे जियोग्राफी आणि इन्फिनिटी एकत्र भेटतात 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल: तंत्र या काव्यफायलीतून)


कपडे कैदेची सुरुवात आहे 

नागडा नाचणारा आनंदात आहे 


लोकांना दु:ख नाही दुसऱ्याचे सुख टोचते 

जो तो टोलवत काटा आणि चमच्याने खात आहे 


हे तसे बरेच की जगात सर्व काही मिळत नाही 

जो जो अस्तित्वात आहे तो इथे अर्ध्यात आहे


पूर येतात इथे फक्त पाण्याचे किंवा शब्दांचे 

बाकी उरलेले जगणे ओल्या वाळवंटात आहे 


शेवटी तिच्यासमोरच माझ्या प्रेमाचे प्रेत बनले 

ती विचारतीये राजाचे प्रेम कूठे कशात आहे? 


माझा गुन्हा हाच की मी खरे बोलत राहिलो 

मला कुठे माहित यशाचा प्राण अभिनयात आहे


श्रीधर तिळवे नाईक

(बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)


आरशात दिसणाऱ्या मांजराबरोबर का मांजर भांडते 

का प्रेम करत नाही 

का स्वतःच्या प्रतिमेबरोबर भांडते 


 मला वाटले प्रेम करता करता आतल्या आत शांत झाली 

आता कळते की दिवसरात्र 

ती तिच्या शांततेबरोबर भांडते


तुझा चेहरा पान होते आता प्रत्येक पान तुझा चेहरा 

माझ्या आठवणींची फडफड आहे जी पुस्तकाबरोबर भांडते 


भेटणार नाही म्हणते आणि पुन्हा पुन्हा भेटत राहते 

वर आणि सांगते की रात्रभर तुझ्या आठवणीबरोबर भांडते 


असे तर नाही ना किती माझ्यासमोर वेगळी आरशासमोर वेगळी 

इतक्यांदा भांडलो तरी कळत नाही की कोण माझ्याबरोबर भांडते


श्रीधर तिळवे नाईक


(बाळबोध कविता या काव्यफायलीतून )


तेरे परेशानियोंका घर तेरा मस्तक हैं 

उसे उखाडनाही खुदाके घर दस्तक हैं


कई खयाल भर देती हैं ये सिस्टीम 

और काम भी करवाती हैं जैसे तू हस्तक हैं


तू उसे आजमे बिठानेकी कोशिश न कर 

मेरी गझळ आनेवाले समयकी दस्तक हैं


जबभी मिलती हैं आय् क्यू की बात करती हैं 

पता नहीं उसके दिल में मेरा दिल हैं या मस्तक हैं


तू किंतना भी डरा मुझे दोजखकी कहानींसे 

सिर्फ शिव के सामने मेरा सर नतमस्तक हैं

श्रीधर तिळवे नाईक


(डेकॅथलोन सिरीजमधील डेकॅथलोन अनकॅटेगरीकल भक्ती या काव्य फायलीतून )

मी पूर्ण जाणतो की तू काही हिटलर नाहीस 

पण दावा करतोस तसा मोक्ष पाळणारा शासक नाहीस 


लोकांच्यासमोर कितीही बोल तू छान छान गोष्टी 

सतत खोटे बोलतोस कारण मुळात तू अस्सल नाहीस 


काही चांगल्या गोष्टी असतीलही घडलेल्या

हेही खरे त्यात तुझे काडीचेही योगदान नाही 


तुला काय म्हणून पाठवले तू काय बनला आहेस

दोन्हीचाही आपापसात कसलाही ताळमेळ नाही 


तुला महान म्हणणारे कितीही म्हणोत महान

तू तर अजून पुरेसा झालेला सज्ञान नाहीस 


एकच आशा आहे वाट पूर्ण लागणार नाही 

नशीब की तू झालेला अजून पुरा देश नाहीस


 तू जे करत आहेस त्यात लोकांचे नाही भले 

शक्य होते, केले नाहीस , अजूनही करत नाहीस


कदाचित माजोरडेपणा सत्तेचीच असावी उणीव 

उणीव दूर करायला तू विवेकाची जाणीव नाहीस


कधीतरी स्वतःतच करशील तू आत्महत्या

आणि हा उपकार होईल तू लांबलेले मरण नाहीस 


तुझ्या मृत्यूनंतर होईल शाही इंतजामही 

फटाके वाजतील या आनंदात की तू जिवंत नाहीस 


काय ठेवून जाणार आहेस याचा थोडा विचार कर 

नाहीतर म्हणू "तू कशाचीच विरासत नाहीस "


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


विश्व तटस्थ आहे त्यास तुमच्याशी देणे घेणे नाही 

त्यास तुमचे काहीही चांगले वा लाजिरवाणे नाही 


तुम्ही म्हणजे त्याच्यासाठी आलेली एक छोटी लाट 

तुम्हाला जसे वाटते तसे त्याच्यासाठी गाणे नाही 


तुम्ही कितीही दुःख करा तुमच्या दुःखी जन्माबद्दल 

तुमच्या दुःखाबद्दल ते थोडेही ओशाळवाणे नाही 


दगडात जर जन्म आहे त्या दगडाचे करणार काय 

दगडासारखे थोडेसे जिवंत दगडाइतकेही शहाणे नाही


तेव्हा मोक्ष मिळवा पण भलत्याच अपेक्षा करू नका 

तुमच्या मोक्षाशीही त्याला काहीही देणे घेणे नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण या सिरीजमधील निर्वाणानंतरच्या कविता या काव्यफायलीतून )

हॅकरसाठी आणखी एक कविता श्रीधर तिळवे नाईक 


अजून माझी बॉडी तुला हॅक करता आलेली नाही 


फेसबुक हॅक झाले 

इंस्टाग्राम हॅक झाले 

व्हाट्सअप हॅक झाले 

जीमेल हॅक झाले 


माझी प्रत्येक चिन्हसृष्टीय आयडेंटिटी 

तू हॅक केलीस 

काड्या केल्यास 

लोकांना चुकीचे मेसेजेस दिलेस 

आणि नंतर प्रत्येक वेळी youtube चा व्हिडिओ शंभर टक्के साऊंडवर न्यायला लागलास

जेणेकरून मी बहिरा होईन 


तुझ्यापासून सुटका मिळवण्यासाठी 

मी पन्नास गोष्टी केल्या 

पण तू त्या सर्व वाया घालवल्यास 


कोंडमारा काय हे तू शिकवलं 

मुका मार काय हे तू शिकवलं 

वर आणि पुन्हा हे सर्व डिजिटल 

म्हणजे दाखवायला जखमाही शिल्लक नाहीत


माझ्या हातावरच्या हालचालीवरून 

तू सोशल ॲप ओळखलं 

माझी गती सतत टॅली करत 

टोटल उध्वस्त करत राहिलास 


अनेकांना अनफ्रेंड केलस 

पण सापडला कुठेच नाहीस 


पैसे खर्च होत राहिले तुझ्यापासून संरक्षण मिळावे म्हणून 

पण तुझ्या नावाने फक्त उन्हाचा शिमगा पाहिला 


वाया गेलेली कष्टाची कमाई 

आणि बहिरे होत गेलेले कान 


माझी लढाया कधीच सोप्या नव्हत्या 

पण तू त्या अधिक अवघड केल्यास 


लोकांनी हिंदुत्ववादाचा स्टेप मारला 

आंबेडकर वादाचा

समाजवादाचा स्टॅम्प मारला 

मी प्रत्येक स्टॅम्प मधून निसटलो 

पण पलायनवाद मात्र 

तुझ्यामुळे 

वाट काढण्याचा विषय झाला 


तुला चकवता चकवता मी चकवा झालो 

भूमिपुत्र होता होता भामटा झालो


तुझा प्रॉब्लेम फक्त एकच आहे 

आणि तो तुझ्या मर्यादेचा आहे 


तू माझा मोक्ष चोरून घेऊ शकत नाहीस 


तू उघडा नेमका शून्यात पडलायस 

अनंतातले असंख्य ताब्यात घेता येते पण संपूर्ण अनंत कोणाच्याच हातात लागत नाही 


एक मोक्षच आहे 

जो हॅक करता येत नाही 


आणि तुझ्या दुर्दैवाने तो सर्वत्र आहे 

तो करायचे म्हणून माझे संरक्षण करत नाही 

पण तुझे कुठलेही शस्त्र आहे तो माझ्यापाशी पोहचू देत नाही 


कसं आहे 

ऑथर इज डेड 

सब्जेक्ट इज डेड म्हटलं ना 

की माणसांच्या जवळ काहीही शिल्लक राहत नाही 

माणसांना ओळख लागते 

ती एक आसक्तीच आहे अहंकारातून येणारी 


उत्तरआधुनिकतेने ती घालवली मालवली 

पण तिने शरीराच्या बाहेर ती चालवली 


कार्पोरेटवादाने पद्धतशीर मिटवण्याची केलेली ओळख मिटवण्याची खेळी म्हणजे सब्जेक्ट इज डेड 

आणि लोक 

बाहेर जाऊन अस्मितेला ओळख समजू लागले 


जातीय अस्मिता 

वर्ण वादी अस्मिता 

धर्मवादी अस्मिता 

भाषावादी अस्मिता 

अस्मिताच अस्मिता 


मी अस्मितेचे विश्लेषण केले 

पण तिच्या प्रेमात पडलो नाही 

आणि तू तिच्या प्रेमात पडून 

सतत काही ना काही तरी हॅक करत 


खरंतर मला फार तू दुबळा दिसतोस 

तुझ्या अशक्तपणाच्या खुणा 

तुझ्या चोरीत दिसतात 

कधीकधी मला तुझी दया ही येते 

हे असं सतत बाहेर ओळख शोधणे


तुला मिळणारे डिजिटल समाधान 

काल्पनिक आहे 


तेव्हा मला चोरून चोरू पाहणाऱ्या माझ्या मित्रा 

हो मी मित्रच म्हणतो शत्रूंना सुद्धा 


थोडासा स्वतः वाकून बघ 

तू कुठल्या साईटवर आहेस हे मला पक्के माहिती आहे 


पण तुला तुरुंगात पाठवण्याची माझी इच्छा नाही 


तेव्हा आत झाकलास 

आत वाकलास 

की कदाचित खिडक्या उघडतील 


अन्यथा तू जो अंधार ऑपरेट करतोयस 

तो सूर्यावर अवलंबून असणारा अंधार नाही 

तो तुझ्याच तयार केलेल्या प्रोग्राम मधून येणारा आरटीफिशियल अंधार आहे 


सूर्य सुद्धा नष्ट करू शकत नाही असा 


तेव्हा त्यात अडकत चाललायस 

हे लक्षात घे 

नेटवर्क हे दरवेळी मित्र असत नाही 

आणि तू ही प्रत्येक वेळेस स्पायडरमॅन बनशील या भ्रमात राहू नकोस 


मला काळजी तुझ्या करुणेची आहे 

ती गेली तर तुझ्यात आणि दगडात फरक उरणार नाही 


तू बधिर होत चाललाहेस 


बेशुद्ध होशील तर बेशरम होत जाशील 

आत्ताच जागा होशील तर बुद्धिमत्तेचे काय करायचे हे तुला नेमके कळेल 


तेव्हा जागा हो 

आतल्या आत 

एकदा हृदय उमलवून तर बघ 


खरे कमळ हृदयात असते 


बाकी मातीचा आणि मातीपासून तयार झालेल्या रक्ताचा चिखल करणे 

माणसाचा स्वभाव आहे  


स्वभाव ओलांड 

हे कमळ उलटे आहे 

त्याचा देठ मेंदूत आहे 

आणि हृदय पाकळ्या 


उमलव 

संपूर्ण समग्र 

नाहीतर वाळून गेलेल्या फुलांचा पसारा 

वाट पाहतोच आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष या सिरीजमधील मोक्ष: स्पंद या काव्यफायलीतून)


खोटे बोलून त्याने असे बरेच मुक्काम कमावलेले आहेत

खोटे बोलण्याचे आत्मविश्वास म्हणूनच तर वाढलेले आहेत


तो काहीही घडवू शकतो आणि हवा तो अर्थही देऊ शकतो 

वाजत गाजत इतिहासात बरेच ड्रामे त्याने पचवलेले आहेत 


त्याचा चेहरा गोरा गोमटा म्हणून मोहात तू पडू नकोस

त्याच्या मुखवट्यांनी बरेच चेहरे डोळ्यादेखत लुबाडलेले आहेत


त्याने मंत्र म्हणता क्षणीच सत्यानाश सुरू होतो 

प्रत्येक घरी त्याने असे सत्यानाश धाडलेले आहेत 


तुम्हालाच त्याचे धोतर लागते म्हणून तर आहे गडबड सारी

तुमचा खुंटा फिक्स नाही म्हणून तुमचे स्टान्स हडबडलेले आहेत


तू कितीही पुरावे शोध तुला काहीही मिळणार नाही 

त्याने नेहमीच दुसऱ्यांच्या हाताने तिसरे गळे आवळलेले आहेत


कितीही ओरडून सांगितले तरी तुम्ही कुठे माझे ऐकणार आहात 

शेवटी त्याच वळचणीला जाणार 

जिथे पूर्वजांचे मुडदे गाडलेले आहेत 


तुमच्याकडून अपेक्षा करणारेच 

शेवटी ठरणार मूर्ख इथे 

चालाक ते शहाणे इतिहासात खरे शहाणे अवघडलेले आहेत


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

किती काळ इमोशनल चाळवाचाळव 

तुझा भाडोत्री मेंदू थोडा 

बुद्धीत वाळव

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मायटोकोंड्रियांनासाठी श्रीधर तिळवे नाईक 


तू आद्य नाहीस 

पण स्वतःला टिकवलेली वद्य आहेस 


तुझा मायटॉकोंड्रिया 

प्रत्येक स्त्रीत 

टॉपल होऊ न देता 

टॉप करत 

टॉक करत 

तुझी टिकटिक 

वॉक करत 


प्रत्येक वेळी प्रथम असणे महत्त्वाचे नसते 

कधीकधी मजबूत असणे 

आणि टिकून राहणे महत्त्वाचे 

हे तुझ्यामुळं कळलं 


तू तो धडा आहेस 

जो आयुष्याचा घडा आहे

गर्भाशयातला प्राजक्ताचा सडा आहे 


तू कदाचित होमोसेपियन नसशील 

पण तुझे यान होमोसेपियनिक आहे 


तू टिकून आहेस 

सातत्य सांभाळत 

त्याच त्याच बाईवर आम्हा पुरुषांना भाळायला लावत 


तू समज सातत्य नसतीस तर 

वरायटी निर्माण झाली असती का 

अनेक विविधतेचे पर्वत उभे राहिले असते का ?


मी अल्टरनेटिव्ह चाचपतो

आणि ते फक्त कल्पनाविलास आहेत म्हणून रियालिटीत परततो


शक्य आहे की तुझ्याविना 

माणूस चंचल होऊन नष्ट झाला असता ?


मी तुला परंपरा म्हणत नाही 

पण तू वडासारखी आहेस 

फांद्या पसरवत नेणारी 

मी तुला स्वतःला टिकवण्याची धडपड करणारी आदिशक्ती म्हणतो 


शिव सर्वकाही नष्ट करतो 

शक्ती मात्र अनंत होत सतत स्वतःला टिकवत राहते 

तू त्या टिकवण्याची प्रतिनिधी आहेस 


तू माझ्याही नंतर असशील कदाचित 

आणि माझ्याही आधी होतीस हे तर निर्विवाद आहे 


तू आफ्रिका आणि आशिया या दोन्ही खंडातील वंशाची आई आहेस 


तू राजीनामा देत नाहीस 

तोवर तुझी सिटी 

सर्व बायकांना सिटीजन बनवत 

आमच्यासारख्या खेडूतांच्यात वावरणार आहे 


तू भाषेपेक्षा अधिक प्राचीन 

इतर जीन्समध्ये स्वतःला मिसळून न देता 

शुद्धता राखणारी 

तू जिनचा वास्तववाद 

तू काळजाची न दिसलेली पहाट 


कित्येक उगवते मावळते सूर्य तू स्वतःच्या त्वचेमध्ये स्टोअर केले असशील 

कित्येक पौर्णिमा तू भोजन म्हणून खाल्ल्या असशील

तुझ्यातून काळ वाहता राहिला असेल

आणि कदाचित नदीला तुझी नदी बघून असूया वाटली असेल 


मी तुला नमन करू शकत नाही 

काय करणार ?

माणसांच्या हाताला मायटोकोंड्रीयात घुसता येत नाही


शिवाय हातातल्या प्रत्येक पेशीत शक्यता म्हणून 

तू असशीलच  


म्हणजे नमस्कार करणारी तूच 

आणि घेणारीही तूच 


आरशाने आरशाला नमस्कार करणे 

वारश्याने वारशाला नमस्कार करणे 


तुझ्या खोलात वाकताना 

चष्मा लागू नये म्हणून 

मी मेल गॉगल लावतोय 


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष सिरीजमधील मोक्ष: स्पंद या काव्यफायलीतून)

तरुण होऊनच मरावे 

तारुण्य दीर्घकाळ लांबवावे


अश्रू डोळे चोरून नेतील 

त्यांच्यापासून डोळे लपवावे 


सावली ही सूर्याची देणगी 

तिलाही देहासारखे ट्रीट करावे


शांतता वजनदार येतील 

बोलून थोडे हलके व्हावे


जेव्हा बोलून भाषा थकतील 

एकमेकांना स्पर्श करावे


जग दुखावत राहीलच 

आपण न अंगास लावून घ्यावे 


डोक्यात महादेव असू द्यावा 

टेबलावर नशीब ठेवावे 


साऱ्या प्रतीक्षा बांधून घ्याव्यात 

डोळे नदीत सोडून द्यावे


दार लावण्याची वेळ आली तर 

आपण खिडक्यांना उघडे टाकावे


हातात माझी राख असेल

हवा सांभाळेल तिला उडवावे


(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल :भक्ती या काव्यफायलीतून)


कोण दु:खी आहे 

तुझ्या आतील मी आहे 


कोठे आहेत जखमा 

की रक्तच जखमी आहे 


वंश जातो दुखावला 

अहंकार हुकमी आहे 


बाहेर का शोधतोयस 

तुझ्या आतच डमी आहे 


तुझा डी एन ए चालत राहील 

कुठे जास्त कुठे कमी आहे 


निघायचे आहे साऱ्यांनाच 

थांबण्याची खुमखुमी आहे 


आवरून घेतो पसारा 

ही बॉडी एकरकमी आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सीरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल :तंत्र या काव्यफायलीतून )


दारा संपलाय 

अजून त्याचा गुरु बाकी आहे 


सरमदला माहित आहे दारा संपलाय 

आणि तो गुरु म्हणून जिवंत आहे 


सत्य बोलणे 

हा मोक्षकाचा स्वभाव 

सत्याला पकडणे आणि फाशी देणे

हा औरंगजेबवादाचा  


सरमद बसलाय समोर 

त्याला माहित आहे 

सत्य बोललो तर मान कटणार आहे 


मला कधीच ठरवता आले नाही 

औरंगजेबसारख्यांच्या पुढे मोक्षकाने कसे वागावे 

ज्या हलकटांना सत्य कळत नाही 

त्यांच्यापुढे सत्य का मिरवावे 


विवेक नावाची एक गोष्ट असते 

आणि तिचा पत्ता औरंगजेबापुढे लापता असतो 


सरमद विवेक सादर करतोय आणि सत्य बोलतोय 


औरंगजेब वाटच बघतोय 

हा कधी सत्य बोलतोय आणि आपण त्याला कापतो 


कदाचित मी असतो 

तर शैवासारखे औरंगजेबाचे डोके कापले असते 

औरंगजेब सारख्यांना जिवंत ठेवणे 

माझ्या तत्त्वात बसत नाही 


मोक्षाची नासाडी करणारे हे लोक 

त्यांना जिवंत ठेवून फक्त धर्माचा फायदा होतो 

आणि लाखो लोक बेजिजक कापले जातात 


सरमद विवेक दाखवत नाही 

त्याला सत्य दाखवायची खूप हौस आहे का ?


सरमद सत्य बोलतोय 

आणि औरंगजेब त्याला कापण्याचा हुकूम देतोय 


औरंगजेबाला त्यामुळे काहीच फरक पडलेला नाही 

तो सत्ता चालवतोय 

अशी सत्ता जी नीच आहे 

क्रूर आहे 


मला शहीद लोकांचे काय करायचे हे कळतच नाही 

विशेषत: औरंगजेबापुढे शहीद होणारे 

हे म्हणजे गाढवापुढे घोड्याने दिलेले बलिदान 


कदाचित मला मोक्ष मिळालेला नाही 

म्हणूनही मी असा विचार करत असेन 


कदाचित मोक्षानंतर मी तलवार उचलणार नाही 

आणि औरंगजेबाची तलवार मला कापायला निघालेली स्वीकारेन


मला माहित नाही 

मोक्षात काय होते 

पण एक आहे 

सरमद विजयी झाला की औरंगजेब 

हे कधीही कळणार नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीजमधील चॅनेल : स्पिरिच्युअल या काव्यफायलीतून)

मागील शतकात अडकून पडलेल्यांना श्रीधर तिळवे नाईक ज्यांना स्वतःच्या अपयशाचे आकलन होत नाही 

त्यांच्या माचिस जळतात पण ज्वलन होत नाही 


खूप ठसे उमटले आहेत जिथे जावे तिथे दिसतात 

ते शहाणपणात आहेत की शेणात निर्णयन होत नाही


हुकूमशाहीचे समर्थन करताना स्वातंत्र्याचा ठराव 

ते करत काय आहेत त्यांची कृती स्पष्टीकरण होत नाही 


इस्लामचे पुष्टीकरण करता करता त्यांची धर्मनिरपेक्षता 

आता अशा ठिकाणी पोचली की जिचे समर्थन होत नाही 


काहीही बोलण्यात अर्थ नाही त्यांच्याशी मोक्षाविषयी

ते इतके जड झाले आहेत त्यांच्या जडत्वाचे चेतन होत नाही 


इतके रसातळात की बुटकेपणही रस घेऊन सांगतात 

इतके पतन उंचीचे याहून अधिक पतन होत नाही


त्यांना काही समजावू नकोस समजण्याच्या पलीकडे गेलेत 

दोन गडांच्यावर खुश की ह्याहून आधीक उन्नयन होत नाही


आपल्याशिवायही इतर अस्तित्वात आहेत असतात 

ज्यांना हे कळत नाही त्यांना कशाचेही आकलन होत नाही


ते काळाच्या तुकड्यातच मागील अडकून पडलेले 

काळ पुढे गेला यांची नव्याची डेफिनेशन होत नाही


श्रीधर तिळवे नाईक 

( डेकॅथलॉन या सिरीजमधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल: ज्ञान या काव्यफायलीतून)

मागील शतकात अडकून पडलेल्यांना श्रीधर तिळवे नाईक 

ज्यांना स्वतःच्या अपयशाचे आकलन होत नाही 

त्यांच्या माचिस जळतात पण ज्वलन होत नाही 


खूप ठसे उमटले आहेत जिथे जावे तिथे दिसतात 

ते शहाणपणात आहेत की शेणात निर्णयन होत नाही


हुकूमशाहीचे समर्थन करताना स्वातंत्र्याचा ठराव 

ते करत काय आहेत त्यांची कृती स्पष्टीकरण होत नाही 


इस्लामचे पुष्टीकरण करता करता त्यांची धर्मनिरपेक्षता 

आता अशा ठिकाणी पोचली की जिचे समर्थन होत नाही 


काहीही बोलण्यात अर्थ नाही त्यांच्याशी मोक्षाविषयी

ते इतके जड आहेत त्यांच्या जडत्वाचे चेतन होत नाही 


इतके रसातळात की बुटकेपणही रस घेऊन सांगतात 

इतके पतन उंचीचे याहून अधिक पतन होत नाही


त्यांना समजावू नकोस समजण्याच्या पलीकडे गेलेत 

दोन गडांच्यावर खुश , ह्याहून आधीक उन्नयन होत नाही


आपल्याशिवायही इतर अस्तित्वात आहेत असतात 

ज्यांना कळत नाही त्यांना कशाचेही आकलन होत नाही


ते काळाच्या तुकड्यातच मागील अडकून पडलेले 

काळ पुढे गेला यांची नव्याजुन्याची डेफिनेशन होत नाही


श्रीधर तिळवे नाईक 

( डेकॅथलॉन या सिरीजमधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल: ज्ञान या काव्यफायलीतून)

मागील शतकात अडकून पडलेल्यांना श्रीधर तिळवे नाईक 

ज्यांना स्वतःच्या अपयशाचे आकलन होत नाही 

त्यांच्या माचिस जळतात पण ज्वलन होत नाही 


खूप ठसे उमटले आहेत जिथे जावे तिथे दिसतात 

ते शहाणपणात आहेत की शेणात निर्णयन होत नाही


हुकूमशाहीचे समर्थन करताना स्वातंत्र्याचा ठराव 

ते करत काय आहेत त्यांची कृती स्पष्टीकरण होत नाही 


इस्लामचे पुष्टीकरण करता करता त्यांची धर्मनिरपेक्षता 

आता अशा ठिकाणी पोचली की जिचे समर्थन होत नाही 


काहीही बोलण्यात अर्थ नाही त्यांच्याशी मोक्षाविषयी

ते इतके जड आहेत त्यांच्या जडत्वाचे चेतन होत नाही 


इतके रसातळात की बुटकेपणही रस घेऊन सांगतात 

इतके पतन उंचीचे याहून अधिक पतन होत नाही


त्यांना समजावू नकोस समजण्याच्या पलीकडे गेलेत 

दोन गडांच्यावर खुश , ह्याहून आधीक उन्नयन होत नाही


आपल्याशिवायही इतर अस्तित्वात आहेत असतात 

ज्यांना कळत नाही त्यांना कशाचेही आकलन होत नाही


ते काळाच्या तुकड्यातच मागील अडकून पडलेले 

काळ पुढे गेला यांची नव्याजुन्याची डेफिनेशन होत नाही


श्रीधर तिळवे नाईक 

( डेकॅथलॉन या सिरीजमधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल: ज्ञान या काव्यफायलीतून)

दुसऱ्याबरोबर बोलता येत नाही म्हणून तिसरा 

आणि तरीही भवताली संभाषणांचा कचरा 


कोणालाही सत्य नाही बोलता येत इथे 

बोलणेसुद्धा बनून गेले आहे आता खतरा 


भाषा म्हणजे लपवण्याची झाली फक्त सोय 

सत्य बोलता नसेल येत तर भाषा पसरा 


पाठच्यापाठीमागे बोलून करू लागले खून 

रक्ताशिवाय चालू लागला हृदयाचा नखरा 


कोणी कोणावर ठेवायचा आता इथे विश्वास 

प्रत्येक खांदा निखळलेला त्याचा चकवा बोचरा


एकमेकांवर अविश्वास ठेवत काढायचे आयुष्य 

प्रत्येकाचे घर म्हणजे दुसऱ्यासाठी कोपरा 


प्रगती केली विकास केला म्हणजे नेमके काय केले 

हा पसारा बनून गेला पिसाऱ्याऐवजी कचरा 


म्हटला तर हा सनातन आहे खेळ आयुष्याचा 

नवऱ्यापासून लपते बायको बायकोपासून नवरा


श्रीधर तिळवे नाईक


(डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल तंत्र या काव्यफायलीतून)


दिसणे श्रीधर तिळवे नाईक 

अंतरावरून सर्वकाही सुंदर दिसते 

सौंदर्याचे अंतरच एकमेव कारण दिसते 


नदीजवळ जाताना स्वच्छ असतो मी 

वाकताना तिच्यात मला तहान दिसते


तिच्या नाही येत मला नीतीचा अंदाज 

कधी कधी तिच्या शरीरी राजकारण दिसते 


हृदयात नसते पाणी असते रक्त घडविलेले 

हृदयाच्या जागी मला रक्तशिल्प दिसते 


बाकी निष्ठा कधीचीच विष्ठा झाली या युगात 

शपथेतही ती लावताना हिशेब दिसते


असे मी म्हणू शकतो असतात सर्वच अशा 

एकच चांगले ती मला खोलवर दिसते


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

दुसऱ्या घरी आहेस आणि मी म्हणतो माझी आहे 

ही कोणती प्रेमाची तऱ्हा जी अद्याप ताजी आहे 


ताजगी आहे तोवर माझे प्रेम केसात माळून घे 

नंतर फक्त सुगंध उरेल जोवर त्याची लायकी आहे 


वाळवंटांच्या लाटा आल्या म्हणून काही बिघडत नाही 

जोवर मृगजळ शाबूत आहे तोवर तहान ताजी आहे 


सर्व आकार उत्तम फक्त अपवाद हा माझा अहंकार 

त्यास कसे घालवायचे त्याचे ज्ञान नाही माहिती आहे


असे एकदा मिटून जावे की सर्व अंग उमलून जावे 

तुझ्यासोबत झोपताना इतकीच इच्छा बाकी आहे 


तू कधीही ठरवू न शकणार मी रोमँटिक की रियल 

मेंदू, हृदय दोघांचेही सारखेच नाते तुझ्याशी आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

जो माझ्याशी लढेल 

त्याला माझा शिव बघेल 


नको दाखवूस भीती 

दिसेल शक्ती जितीजागती 


मला नाही भय कशाचे 

मोडून पडतील तुझेच साचे


नको घेऊ माझ्याशी पंगा 

तुला झेपणार नाही दंगा 


तो शिव अचाट णि अफाट 

तुझ्या वाटांची लावेल वाट 


मी करतो तुला विनंती 

कारण मी जाणतो शिवगती 


बाकी तुझी इच्छा तुझी मर्जी 

तुझ्यासारखे खूप हलगर्जी 


माझी विनम्रता नाही विकनेस 

तुलाच लागेल हृदयात ठेच


कळणारही नाही संपलास कुठे 

माझ्याशी लढून संपले भामटे 


 श्रीधर तिळवे नाईक 

( डेकॅथलॉन सीरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल: शक्ती तंत्र या काव्यफायलीतून)


मी कधी म्हणालो की माझा क्लास टॉप आहे

मी आत्ताचा माणूस आहे माझे जगणे हीपहॉप आहे


किती किती गप्पा तुझ्या माझे भले करण्यासंबंधी 

मात्र हे मी जाणतो आहे हे केवळ एक लॉलीपॉप आहे 


इतकाही झूम इन होत नाही की मला माझे काळीज दिसेल 

हा इतकेच कळते माझे रक्त अद्याप टीपटॉप आहे 


ती मला प्रेम देते जसा की जीवन गौरव पुरस्कार आहे 

मीही तिला घेतो असा की ती नवीन क्रॉप आहे 


हिट होणार नाही याची सर्वतोपरी घेतलीस काळजी

आणि आता तू म्हणतोस की मी संपूर्णतः फ्लॉप आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल: वर्ड्स या काव्यफायलीतून)

दुःखी डोळ्यांची आग 

करते वासनावृक्षाला खाक 


असे दिवसा काय झाले 

की मला रात्री आली जाग 


अत्तरांचा पडला पाऊस 

करपून गेली माझी बाग 


स्वर्ग दाखवले नरक दाखवले 

पृथ्वीचा होता इतका ताप?


ज्याने हृदय चुरगळले 

वाटले नव्हते ते फूल खतरनाक 


प्रत्येकाने बदलावे स्वतःच 

त्यानेच बदलत राहतो समाज 


शेवटी डोक्यावर छत्री आली 

तिने उतरवला म्हणे उन्हाचा माज 


सतत चेस खेळत होता 

शेवटी प्याद्यास लटकली लाश 


मी फक्त ओळख करून दिली 

मग जे घडले ते घडले आपोआप 


नव्या नव्या चिंता येत राहिल्या 

मी फक्त सिलेक्ट केली कुठली टॉप 


आयुष्य कॉम्बो सेट होता 

ज्याचे कळले नाही कधीही माप


 आयुष्यभर त्याला खात्री होती 

त्याच्याकडे आहे वेळ अमाप


कोण कोणाला फसवतो इथे 

जो तो करून घेतो आत्मघात 


प्रत्येक कर्माला मिळते फळ 

खिंडीतच गाठतो त्यांचा ताप 


तो आयुष्यभर मूलच राहिला 

समजत राहिला स्वतःला सर्वांचा बाप 


जो तो स्वतःचे तयार करतो मन

ज्याच्या त्याच्या मनाचा" जगणे "प्रताप 


श्रीमंत शत्रुही होतात आवडते 

गरीब आवडत नाही कोणालाच आज


एकांतात एकाचा असतो आकांंत 

लोकांतात का नसतो लोकांचा आवाज


लोक चुकीचेच वाटतात अपयशात 

तू स्वतःस आधी दुरुस्त कर आत 


आवाज न करता बोलत राहू 

शांततेत ऐकू आतला आवाज 


काय असते बाहेर जे ठरवते नशीब 

काय असते आत जे आणते केऑस


मौनाने प्रश्न सुटतात अफवा आहे 

सुटल्या माझ्या गाठी नेहमी संवादात 


जे जे हरवले ते वाटते सुंदर 

बालपणाचा होतो म्हणूनच रोमँटिक गुलाब


कोण म्हणते नाही उडत पाणी 

मेघ म्हणजे आकाशात पाठवलेली लाट 


धोपटत असतात धोपट मार्ग नेहमी 

बिकट वाटेलाच तू कर तुझी वहीवाट 


थंडीतही प्रेम झाले नाही कमी 

तिच्या घरासमोर टाकली खाट


माझ्या गल्लीत नाईलाज म्हणून राहतो 

ती सोडून गेली गल्ली माझी केव्हाच 


सुरुवातीला असते सर्व छान छान

मग टांगा पसरतात त्यांचा ताण ताठ 


जखमांनी एकमेकांशी संपर्क साधला 

ती होती आमच्या प्रेमाची सुरुवात


प्रतीक्षेत तुझ्या झालो तुझ्यासारखा 

बघ तरी माझ्या डोळ्यांचा थाटमाट


मिळवणे गमावणे उत्कंठा आणि भय 

ह्यांच्यावर स्वार आयुष्य वेग तर्राट 


एकमेकांशी कधी बोलावे लागले नाही

डोळ्यांची भाषा पुरेशी आणि अफाट


तिच्या तळमळीने केले वेडे 

माहित नाही काय तिने पाहिले माझ्यात 


काळीज घोडा झाले धावता धावता

प्रेम माझे झाले त्यांच्या व्यसनांची टाप


शेवट गोड केला शेवटी विषाने

तिचा चेहरा होता माझ्या चषकात


बरे झाले प्रेम प्रकरण बारगळले 

आता घुसशील तू आत आत आत


ब्रम्हांड ही गिळले असतेस तू 

जर तहान असती गहन घनदाट


शोधात शिवाच्या भेटलो शक्तीला 

अन शक्ती म्हणाली घुस शिवात


शेवटी आतमध्ये उरतो शिवच 

शिवप्राप्ती होते जीवाचा ध्यास


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल: ज्ञान ह्या काव्यफायलीतून)

भावनांचा अडथळा 

आवाज करत खळखळा 

पाहू देत नाही तुझे शरीर नीट 

घेऊन येतो लावायला 

काळा काळा तीट 


मला पाहू दे तू जशी आहेस तशी 

तशी नव्हे जशी 

दाखवू इच्छितेस कशीबशी 


इमोशनची उशी 

नको माझ्या उशाला 

मला पाहू दे थेट तुला 

जशी आहेस तशी 


कपाळा जागी दिसो कपाळ 

नाका जागी नाक 

दिसोत तुझे सारे बाक

आणि वळण डोळ्यांचे

जसे असेल तसे


काढू दे मला माझी इमोशन बाहेर 

चपले सारखी 

होऊ दे नजर शुद्ध पारखी 


दिसू दे लखलखीत 

कळू दे काय आहे माझे लक 

चकाचक 


तू येवोस माझ्या वाट्याला 

त्वचेला न नटवता 


तुझा अंगमंच 

रंगमंच न होवो 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


जरी मी स्वतःला नेहमी रायगड वाटलो 

लोकांना कोसळणारी सदा दरड वाटलो 


आरसाही घाबरला मला पाहून इतका

आरशालाही शेवटी मी दगड वाटलो 


फुले फेकली तरी ना प्रतिसाद आला 

तिला नेहमी मी ऋतू कोरड वाटलो


फुलपाखरे उतरवण्याची आस का धरावी

कॅनव्हासला रंगांची मी धडपड वाटलो 


मी गल्लीत कोणाशी बोलाया ना जात 

काळजांना बंदुकीची मी धडधड वाटलो


हा जन्मजात आवाज असा लाभला मला 

साधे बोललो तरी लोकांना ओरड वाटलो 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

माझे प्रेम कारणाशिवाय आहे 

तेच ओम नमः शिवाय आहे 


आयुष्य समुद्र त्याचा तू थेंब

तो पिणे हाच तरणोपाय आहे 


दुःख करून तरी काय उपयोग 

दुःखावर कुठे काय उपाय आहे 


ही गर्दी आहे ट्रॅफिक करणारच 

कुठेही थांब अडकणार पाय आहे


ईश्वर आहे फक्त एक तामझाम 

नि आयुष्य असे निरुपाय आहे 


चल दोघेही आनंदाने जगू या 

बघूया मिळून होते काय आहे 


 श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


जरी मी स्वतःला नेहमी रायगड वाटतो 

लोकांना कोसळणारी सदा दरड वाटतो 


आरसाही घाबरतो मला पाहून इतका

आरशालाही बहुदा मी दगड वाटतो 


फुले गिफ्ट दिली तरी प्रतिसाद देत नाही 

तिला नेहमी मी ऋतू कोरड वाटतो 


फुलपाखरे उतरवण्याची आस का धरावी

कॅनव्हासला रंगांची मी धडपड वाटतो 


मी गल्लीत कोणाशी ना बोलाया जातो 

शेजाऱ्यांना बंदुकीची मी धडधड वाटतो 


हा जन्मजात आवाज असा लाभला मला 

साधे बोललो तरी लोकांना ओरड वाटतो 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


इतकी वर्षे चुकीचे होते ते कधी बरोबर झाले 

मला कळू न देता कसे ते इतके भरभर झाले 


रेंगाळत का इतका होतो मी पृष्ठभागावर ?

कोणाकडून गहनतांचे माझ्यातल्या मर्डर झाले 


रडलो नाही एकदाही मी कधी आयुष्यात

अश्रू माझे इतके कसे माझ्या घरभर झाले 


चिरडणार नाही मुंगीही काळजी घेतली नेहमी 

इतके कसे रक्त गोळा माझ्या पावलावर झाले 


काय असे घडते आहे जे नाही नियंत्रणात 

काय आहे असे ज्याचे कुवती बाहेर वावर झाले 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तू आणि तुझी नेसलेली लपेटदार साडी 

चढावयास लावतात डोळ्यांना त्वचेची माडी 


काहीतरी तर्र होते माझ्या कपड्यांच्या आतून 

रक्तातील वासना बनते तुझी वहिवाटवाडी 


तू काढतेस पदर होतो मी कमालीचा अधीर 

जसा कोल्हापुरी तर्रीचा घ्यावा नवागताने भुरका अनाडी 


होकार तरी दे किंवा नकार तरी दे पण बोल 

किती काळ प्लॅटफॉर्मवर ठेवणार आहेस तू माझी गाडी 


कधी साडी नेसतेस कधी घालतेस बुरखा ही 

तुला ताडता ताडता आता मीच बोलून गेलो ताडी


बरे झाले दुकान आहे निदान मन रमत आहे 

चालले ते बरोबर की चूक वेळ जातो करण्यात खडाखाडी 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मला नाही तसे कुठल्या मुलीच्या प्रेमाचे वावडे 

पण काय करणार झाले आहे कोर्टिंग खूप महागडे 


ती काढते बुरखा आणि घडत जातात साऱ्या गोष्टी 

जिथे जिथे ती ठेवते पाय ते क्षेत्र होते फटाकडे 


मी बाजारातच उभा आहे कारण माझे दुकान आहे 

सुदैवाने ती मराठी नाही ना पैशाशी काही वाकडे 


रक्तापेक्षा गरम लागते रक्तामधली वासना गरम 

नाहीतर नात्यात थंडी येते थंड होत जाते बाकडे 


निरोपताना म्हणते," नाही आतील माणसाशी कर्तव्य 

मला फक्त जोखायची आहेत तुझ्यातली सात माकडे"


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आयुष्य रिकामे ढग होते 

मात्र त्यात पावसाचे वग होते


हृदय का जन्मले माहित नाही 

रक्तात प्रेमाचे स्वतंत्र जग होते 


 तिच्या धूर्ततेला माफ केले मी

धूर्ततेतही ओढीचे मग होते


कुठे हिशेब ठेवू माझ्या श्वासांचा 

मोजता येतील असे कुठे नग होते


चिंता करता करता आयुष्य संपले 

तिचे अस्तित्व माझ्या लगोलग होते 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

सांगा कसे लढावे आता मी हे युद्ध

ज्यांची परवा करावी तेच आपल्या विरुद्ध 


काळजाचेही आता व्हावे का ओझे? 

हे कसले युग ज्यात रक्त सुद्धा विद्ध 


तिने लाजत लाजत घेतला माझा कीस 

होऊन गेले ओठ दोन्ही कायमचे समृद्ध 


तिच्याकडे खूप सारे खुलासे होते नग्न

प्रॉब्लेम एकच होता होते सगळे माझ्याविरुद्ध 


ठीक आहे लिहू लागलास पण लक्षात ठेव

लिहून कोणी झाला नाही इथे गौतम बुद्ध



श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मी म्हणजे महास्वप्नाची पडलेली सावली 

अशी देवी जी आतापर्यंत कुणास न पावली


तिच्याजवळ खूपश्या सूक्ष्म ओळखी होत्या 

काम झाले पण कळेना कुठली ओळख कुठे लावली 


जो तो आता घेतलेल्या स्टान्सबद्दल बोलतोय 

गाजावाजा इतका की प्रत्येक भूमिका कावली 


इतके उडाले तरी आकाशस्पर्श होत नाहीत 

पक्षांना ठाऊक नसते चवली आणि पावली 


जो मुक्त झाला स्वतःच्या कन्स्ट्रक्शनपासून 

त्याच्यामध्येच स्वतःची बिल्डिंग असते स्वामावली 


(डेकॅथलॉन सिरीजमधील डे कॅटलॉन :अन कॅटेगरी कल :तंत्र या काव्यफायलीतून)


मी म्हणजे महास्वप्नाची पडलेली सावली 

अशी देवी जी आतापर्यंत कुणास न पावली


तिच्याजवळ खूपश्या सूक्ष्म ओळखी होत्या 

काम झाले पण कळेना कुठली ओळख कुठे लावली 


जो तो आता घेतलेल्या स्टान्सबद्दल बोलतोय 

गाजावाजा इतका की प्रत्येक भूमिका कावली 


इतके उडाले तरी आकाशस्पर्श होत नाहीत 

पक्षांना ठाऊक नसते चवली आणि पावली 


जो मुक्त झाला स्वतःच्या कन्स्ट्रक्शनपासून 

त्याच्यामध्येच स्वतःची बिल्डिंग असते स्वामावली 


श्रीधर तिळवे नाईक 


(डेकॅथलॉन सिरीजमधील डे कॅटलॉन :अन कॅटेगरी कल :तंत्र या काव्यफायलीतून)

आकडे येतात म्हणून हे आकडे फेकतात 

फक्त फेक गोष्टीच जवळ आहेत त्यांना हे फेकडे फेकतात 


येऊन यांना झाली नाहीत साडेतीन हजार वर्षे 

आणि हे अब्जावधी वर्षापूर्वीचे खेकडे फेकतात 


विषमते खेरीज काय यांनी जगाला दिले आहे 

किती खोटारडे दावे ते फाकडे फेकतात


तेव्हा जरा उठा बाहेर या स्वतःच्या अंधश्रद्धा मधून 

तुमच्या अंधश्रद्धा फक्त बसायला सडलेले बाकडे फेकतात


लोक सहनशील आहेत म्हणून चालू आहेत गमजा 

सहनशीलता संपली की लोक तुमच्यासारख्यांना नागडे फेकतात 


 श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

काल नंतर आज आणि आज नंतर उद्या 

समुद्र दिसत नाहीत आणि वाहताहेत नद्या


किती काळ मौन तुझे मी समजून घेणार 

शेवटी ही भाषा आहे तरी कशाला


माझ्या प्रतीक्षेचे सार्थक यातच होते

वाट पाहण्याचा तिच्यात अंत झाला 


मी काळजाला दगड बनवले आहे 

मित्रांनो आता कितीही तुम्ही पाय द्या 


श्रद्धा आंधळी असते तरीही श्रद्धा ठेवली 

श्रद्धेशिवाय कुठला आधार असतो प्रेमाला 


शेवटी दुःखांच्याकडून एकच गोष्ट शिकलो 

काहीच कळत नाही आपल्या काळजाला 


तिला अख्खे आयुष्य प्रॉपर्टी म्हणून हवे 

कसे सांगू आईच्या नावावर माझा सातबारा


कुठून आयुष्य सारे स्निग्ध स्निग्ध झाले

कानात डूल आहे की प्रकाश दूध खुळा


एक सुद्धा फोन मला येत नाही 

लोक सारे माझ्यापासून तुटले का


ऐनवेळी त्याने मला धोका दिला 

जो वाटत होता आहे माझ्या उशाला


मी या खोलीमध्येच राहत असतो 

जरी उंबरठ्यापाशीच माझी ये जा


कोणत्या पक्षाने नाव खराब केले 

जो तो दोष देतोय दुसऱ्याच्या उडण्याला


शेवटी एकच गोष्ट होती सत्तेचा माज 

तोच नेमका तिने व्यवस्थित उतरवला


कुठल्याही दिशेने आयुष्य जाऊ शकते 

दिशा देणे शक्य नाही माणसाच्या हाताला 


शेवटपर्यंत हे ॲब्सर्ड वाटत राहणार 

जगणे विचारत नाही अर्थ जीवनाला


चला शेवटी जाऊन शक्तीची प्रार्थना करू 

शेवटी तिनेच केले आहे ऍक्टिव्ह शिवाला 


श्रीधर तिळवे नाईक 

(डे कॅथलॉन सिरीज मधील डे कॅथलॉन: अन कॅटॅगरिकल: तंत्र या काव्यफायलीतून)

माझीही साठीची मुक्त गझल विंदा करंदीकर यांची क्षमा मागून श्रीधर तिळवे नाईक


साठीत नवा लेखक म्हणून उदयाला आलो

आत्महत्या करायला मोकळा झालो 


सुरकुत्यांना माझ्या वाव मिळाला 

मी म्हातारा त्यांच्यात सुटा सुटा झालो 


रिटायरमेंट माझी किमती झाली 

वृद्धाश्रमात तरुण गाजावाजा झालो 


साठीत बुद्धी नाठी नाही झाली 

संस्कृतीला नाटा करून मी मोठा झालो


एकेकाळी हेडलाईन नावावर नव्हती 

आता या साठीत मी न्यूज पेपर झालो 


जे जिवंत त्यांच्या खिजगिणतीत नाही 

मी मेलेल्यांच्या आठवणीत उडणारा झालो


सम्राट जरी मला बनायचे होते 

तिच्या हृदयाचा मी दरवान झालो


भांडण हे शेवटी बोलण्याचे माध्यम झाले 

भाषेत तिच्याशी तुटलेला संवाद झालो 


सावल्यांनी माझ्या प्रवास केला 

थांबलेल्या देहाचा मी थांबा झालो 


डोळे बोलतात ही अफवा होती 

शब्द कळतात या थापेचा गवगवा झालो


आता या वयात ऑडियन्स नकोसा 

आता या वयात मी तमाशा झालो 


कुठल्याच पानावरती तिचे नाव नव्हते 

आणि तरी आत्मचरित्रात मी नागवा झालो 


शांतता एकेकाळी पोशाख होती 

आता तिच्या फॅशनचा ट्रेंड झालो 


कोण काय आहे कळून चुकले 

कळून काय फायदा कळण्याने काय झालो 


माझ्यावर प्रसन्न नसलेली ती देवी होती 

शेवटी मी तिचा रिकामा देव्हारा झालो 


प्रसिद्धी नावाची बाई उशिरा आली 

तिच्यापुढे झडणारा पालापाचोळा झालो 


यापेक्षा मेल्यानंतरच नाव टाकायचे होते 

उगाच सुरकुत्यांचा व्यभिचार झालो


श्रीधर तिळवे नाईक

(बाळबोध कविता या काव्यफायली मधून)

तू माझी नव्हतीस तरी मी मात्र तुझाच होतो 

प्रेम होते कारणे नव्हती बस होतो उगाच होतो 


संबंध तोडण्याची शेवटी तू दिलीस हजार कारणे

तू निघून गेलीस तरी मी कारणात मुकाच होतो


काहीतरी सळसळणारे मुकाट्याने आत मेले 

खोलवर निपचित पडून मी सुगंध सुनाच होतो 


तू जिकडे चालली होतीस तिकडे तणाव भरलेला 

तरी म्हणालो सुखी रहा म्हणताना खोटाच होतो 


तुझा नमाज दिसणार नाही पण अल्ला भेटत राहील 

मशिदी समोरून जाताना जीव धूसमुसळाच होतो


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तुझा जन्म म्हणजे काळाने मारलेली टिचकी 

तुझे आयुष्य म्हणजे अवकाशाने दिलेली उचकी 


तुझ्या आयुष्याला जन्मतः बांबू लागलेला 

तुझ्या आयुष्याची जन्मतः बासरी पिचकी 


तू जगण्यावर टाळ्या पिट किंवा कर कुचाळक्या 

अस्तित्वाच्या दृष्टीने ही केवळ उचका उचकी 


कितीही हातमाग लाव प्राणाच्या उत्क्रांतीवर

कळणार नाही माणसांची कुठून आलीत बोचकी


तुला वास येत राहील किंवा नृत्य दिसत राहील 

ज्ञानाची काही फळे नासकी काही फळे नाचकी


विश्व आता इथे मोकाट सुटले आहे 

नि तो गायब आहे ज्या क्षणाने मारली टिचकी 


(डे कॅथलोन सिरीज मधील डे कॅथलोन अन कॅटेगरीकल ज्ञान ह्या काव्यफायलीतून)

धर्म मोक्षाला गिळतो 

मग माणसाला पिळतो 


भटकवत न्हेतो तर्क 

त्याला श्रद्धेत जाळतो 


काढून घेतो पाया 

हवेतल्या हवेत पाळतो


बोलवतो स्वर्ग नरक 

नेमकी पृथ्वी वगळतो 


नादाला नको लागूस 

या नादात जीव वाळतो 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल: तंत्र या काव्यफायलीतून)

सुली पे चढ जाने की प्यार मे आयी फर्माईश हैं 

वर्ना दिल से हमारी कहा मर जानेकी ख्वाहीश हैं 


पहिली मुलाकातमेंही उन्होने गरुरमें था कहा 

मुझे यकीन नही होता तू काफीरकी पैदाईश है 


अबतक समझमे नही आया इस छातेका करू क्या 

मै कहता हुं चल निकलते है वो कहती हैं बारीश है 


होठ तक नही बचे मेरे इस मोहब्बत में 

उन्होने मुस्कुराकर कहा "मुस्कुराना" प्यार की आजमाईश है 


आसान नही होता गैरमजहबी को दिल देना 

चमडी से लेकर दमडी तक हर चीजकी आजमाइश हैं 


सास मर गई हैं मगर लाश अभीभी जिंदा है 

मजहब ने हलकेसे कहा ,"ये खुदा की नुमाईश है "


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मी मुक्कामास पोहोचू नये अशी त्यांची इच्छा आहे 

मुक्कामावर पोहचणारच असा माझा भरोसा आहे 


मी माझ्या घरामध्ये आजकाल जात नाही 

मला सतत फिलिंग की मी घराला नकोसा आहे 


कोल्हापूर शहरांमध्येच राहतो ही चूक असेलही 

दुसरे शहर बरोबर असेल याचा कुठे पुरावा आहे


ती सतत म्हणते की माझे डोळे वाचायला शिक 

इतके साक्षर व्हायला माझा कुठे तिच्यावर डोळा आहे


कोण पुढे आणि कोण मागे या वादात अडली गाडी

माहित नाही आणखी किती माझा प्रवास मोठा आहे 


सतत उपस्थित राहणे सुद्धा मला आहे इम्पॉसिबल

पाठीमागे करायचं काय हे ठरवण्यातही धोका आहे 


जे काही सध्या मिळते तेच आहे जगण्यास उत्तम

मागचे सर्व काही स्वप्न आहे पुढचे सर्व होरा आहे 


प्रेम होते पण नव्हता आदर म्हणून मी पडलो बाहेर 

नाहीतर आजही आकार तिचा प्रेमासारखा आहे 


मी जाळत नाही काळीज जे जळते राख होते 

माझ्या काळजात जिवंतपणा टिकवणारा झरा आहे 


व्यवस्थित तू झोप घे मात्र आळस नको करूस

आळशी माणसासाठी बंद मोक्षाचा दरवाजा आहे 


तुझ्याजवळ आशा आहे म्हणूनच धर्म शोषतो आहे 

प्लॅनिंग कर अंमलात आण तोच एक रस्ता आहे 


तुझ्यापूर्वीही अनेक होत्या तुझ्या नंतरही येत राहिल्या 

पण अजूनही वाटते माझ्या नावाने एक बुरखा आहे 


पापणी लावायच्या आतच हे शिवांड झाले निर्माण 

पण ज्याची पापणी आहे त्याचा कोठे डोळा आहे 


सगळा जीव शिवावर सोड मग सारे ठीक होईल 

चिंता करणे नास्तिक होणे यांचा एकच घरोबा आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल : तंत्र या काव्यफायलीतून)


माझे स्तन मातृत्वाचा आकार आहे 

मी तुला ते चोखू देते 

कारण तू अंतिमत: माझा मुलगाच आहेस 


तू ज्यांना बॉल म्हणतोस 

त्यांनीच तुझं भरण पोषण केलेले आहे 


तेव्हा कॉमेंट करताना 

शंभरदा विचार कर 


तुला आई बहिणी नाहीत का 

असा प्रश्न मी तुला विचारणार नाही 

कारण आई बहिणी नसल्या तर तू निर्माणच होणार नाहीस हे मला माहित आहे 


तू माझ्या बॉडीतून आला आहेस 

म्हणूनच तुला डेप्थ आहे 

अन्यथा माझ्या त्वचेवर रेंगाळणारी तुझी नजर 

फक्त तुझा उथळपणा साजरा करत असते 


तू माझी मापे काढत असतोस 

पण तुला हे माहित नाही 

की तुला मीच मोजमाप दिले 


तेव्हा कॉमेंट करताना जपून 


तुझ्या जिभेवर जी भाषा आहे 

ती सुद्धा माझीच निर्मिती आहे 


मीच तुला सुरुवातीपासून शिकवलेली 


तेव्हा ओरिजिनलशी छेडछाड करताना 

थोडे जपून 


अन्यथा कधी फाटला गेलास 

ते कळणारही नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल : तंत्र या काव्यफायलीतून)


कथा काव्य श्रीधर तिळवे नाईक 


नदी सागराला मिळाली 

त्याने ती गिळली 

पिळली

ढग म्हणून वाळत घातली 


ढगांचा ढीग झाला कपड्यांचा 

समारंभ झाला फॅशनेबल वावड्यांचा 


पण अचानक दोर तुटला पाण्याचा 

मूड बनला गाण्याचा 


सावन को आने दो 


कपडे कोसळता कोसळता झाले पाणी 

कुठे झाली नाणी 

कुठे झाली तनातनी 


ओढीचे बनले ओढे 

तहानेची झाली नदी 

रक्त घेऊन सुटली धावत 

आजूबाजूला निसर्ग चावत 


आणि पुन्हा बुडाली समुद्रात 

नदी समुद्राला मिळाली 

तुम्ही कथा ऐकली 

कथा तुमची झाली 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

जगण्याचा अर्थ हिसकावला जात आहे 

हळूहळू माझा आत्मा मारला जात आहे 


इतकी असुरक्षितता आहे आता पसरली 

प्राण पुन्हा पुन्हा भयात ढकलला जात आहे 


झुंडी जनावरांच्या संघटित झालेल्या 

माझ्यात एक सैतान ढवळला जात आहे 


झूठ बोलण्याचे आमंत्रण द्यावे लागत नाही 

सत्यवान तुरुंगात पाठवला जात आहे


फरिश्ता म्हणवून घेतो त्याला कसे हकलणार 

तो देव म्हणून सर्वत्र सजवला जात आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


ईश्वर नाहीये हे सर्वांनाच माहितीये 

म्हणून तर लोक बिनदिक्कत खोटं बोलतायेत 

चोऱ्या करतायेत 

हिंसा करतायेत 

वाटेल तसं वाटेल तेवढं कमावतायेत 


मात्र ईश्वरा असावा 

असं मात्र अनेकांना वाटतं 


ईश्वर हे स्वप्न आहे 

मृत्यूनंतर तरी न्याय मिळेल या शक्यतेचं


ईश्वराला मारणं शक्य होत नाही कारण स्वप्नांना मारणं अशक्य आहे 


लोकांना मृत्यूनंतरसुद्धा जगायचंय 

आणि ईश्वर मृत्यूनंतर जगण्याची शक्यता आहे 


लोकांना ही शक्यता नष्ट करायची नाही 


त्यामुळेच ईश्वराबद्दल वाद घालूनही ईश्वर नष्ट होत नाहीये 


मोक्ष ईश्वराचा डेड एंड आहे 


तो फक्त मोक्षातच वारतो 

कारण मोक्षात स्वप्नांचाही एंड आहे 


मी मोक्षाकडे जातो आहे 

याचा अर्थच 

मी मुळात ईश्वराचा मर्डर करणार आहे असा होतो 


ईश्वर मला घाबरत नाही 

कारण त्याला माहित आहे 

तो स्वप्न आहे 

आणि माझ्यात त्या स्वप्नाचा एक तुकडा आहे 


मोक्ष मिळाल्यानंतरही 

ईश्वर चारी बाजूने माझ्यावर आदळणारच आहे 


फक्त तो माझ्या अंगाला लागणार नाही 

एवढीच काय ती माझी अचीवमेंट असेल 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल : तंत्र या काव्यफायलीतून)


इतका बुद्धिमान आहे पण तो नाही जागलेला 

पहावे तेव्हा दिसतो मला थकलेला भागलेला 


इतके दंश होऊनही अजूनही कळत नाही

नागवला गेला आहे की आहे नागलेला


मी हिशेब ठेवला नाही ज्याला त्याला माहित

कोण माझ्याशी आहे कसा वागलेला


फक्त सुगंध येतो अन् तेवढा पुरेसा आहे

चौकशी का करू ? कोणत्या बागेत बागलेला


तो भलत्याच गोष्टींमध्ये दिलासा शोधतो आहे 

पराभव भलत्याच जागी त्याला आहे लागलेला


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


प्रकाश तंत्र श्रीधर तिळवे नाईक 


जिथे सूर्य असेल तिथेच उन्हापासून उत्पादन कर 

लोक अंधार विकत घेत नाहीत 

त्यांना प्रकाश लागतो 

डुप्लिकेट किंवा ओरिजनल 


कुठलाही दिवा न्यायच असतो जेव्हा प्रकाशाचा प्रश्न असतो 

तुला तो दिसला नाही 

याचा अर्थ तो दुसऱ्यासाठी अस्तित्वात नव्हता 

असे नाही 


या जगात बरेच काही आपल्याशिवायही अस्तित्वात असते 


प्रत्येकाची टॉर्च वेगळी 

आपण कशाला अट्टाहास धरायचा की टॉर्च अशी हवी आणि तिची साईज अशी हवी

ती फक्त नीट चार्ज करणारी होणारी आहे की नाही एवढेच बघ 


प्रकाश नेमका कुठे आहे ते नीट बघ 

तो जिथे दिसतो तिथे असेलच असे नाही 


प्रकाशाला ही तपशील असतात 

कणदार असतील किंवा तरंगदार असतील पण असतात 


प्रकाश कुठेही तापू शकतो तापवू शकतो 

गरम कधी व्हायचे आणि कधी व्हायचे नाही ते ठरवता आले पाहिजे


प्रकाश उत्क्रांत होत असतो का डेव्हलप होत असतो का 

सांगणे कठीण आहे 


प्रकाश प्रगती करत असतो का 

किमान आत्मप्रकाश प्रगती करत असतो का ?


एक गोष्ट नक्की आहे 

कुठलाही प्रकाश वाढीला मदत करतो 

त्या वाढीपासूनच तुझे अन्न तयार होते 


प्रकाशामुळेच अवकाश आणि काळ तयार होतात का 

हा प्रश्न प्रकाशा इतका लखलखित नाही 


तेव्हा अंधारात उभे असलेल्या माणसा 

त्या अस्तित्वात नसलेल्या आडव्या सावलीतून 

प्रकाशात ये 


कदाचित ज्याला तू स्वतः मी समजतोस 

ती प्रकाशाची सावली असेल 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरी कल :तंत्र या काव्यफायलीतून)

बाप 

तो जिथे जातो तेथे नवे मार्केट दिसते 

 स्वतःच्या उत्पन्नासाठी नवे गेट दिसते


खूप लोक भेटतात त्याला दिसतात ओळखी

कसे वापरून घ्यायचे त्याचा सेट दिसते 


काही दरवाजे खुले होतात मेंदू मधून 

काही खिडक्यांच्या मधून होणारी भेट दिसते


तो आयुष्य एक्सप्लोर करतो की पैसा 

समोर हे एकत्र दिसतात तेव्हा थेट दिसते 


घरात विचार करशील पण बाहेर विस्तार 

विस्तारातच नवी नवी बाजारपेठ दिसते


मृत्यूच ज्याच्याशी निगोशिएट करता येत नाही 

ती एकच जागा अशी जिथे चेकमेट दिसते 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

काखेमध्ये माझ्या साप निघाले 

माझ्यापेक्षा माझे बाप निघाले


जो तो तयार करतो व्यक्तिरेखा 

अभिनयात सगळेच वारेमाप निघाले 


ऋतूंच्या हस्तक्षेपाने बदलतात रंग 

पर्णसंभार ऋतूंचे टाप निघाले 


मला वाटल्या वाघांच्या डरकाळ्या 

दारावर मारलेली थाप निघाले 


नद्या फितूर नसतात ओढ असते 

भव्य विशाल समुद्र बाप निघाले


दिसत होते सारे प्रोटीन सारखे 

डॉक्टर बटाट्याचे काप निघाले


मी ब्रम्हांड मोजावयास गेलो 

माझ्याच लायकीचे मोजमाप निघाले 


मी कसा सुगंधात कैद झालो 

चाफे कसे तिचे चाप निघाले


जागतिक प्रवास कधी केले नाहीत 

माझ्या आत जग अमाप निघाले


गोड शेवट कधी वाट्यास न आला 

आयुष्याचे पुस्तक थाप निघाले 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


माझे स्तन मातृत्वाचा आकार आहे 

मी तुला ते चोखू देते 

कारण तू अंतिमत: माझा मुलगाच आहेस 


तू ज्यांना बॉल म्हणतोस 

त्यांनीच तुझं भरण पोषण केलेले आहे 


तेव्हा कॉमेंट करताना 

शंभरदा विचार कर 


तुला आई बहिणी नाहीत का 

असा प्रश्न मी तुला विचारणार नाही 

कारण आई बहिणी नसल्या तर तू निर्माणच होणार नाहीस हे मला माहित आहे 


तू माझ्या बॉडीतून आला आहेस 

म्हणूनच तुला डेप्थ आहे 

अन्यथा माझ्या त्वचेवर रेंगाळणारी तुझी नजर 

फक्त तुझा उथळपणा साजरा करत असते 


तू माझी मापे काढत असतोस 

पण तुला हे माहित नाही 

की तुला मीच मोजमाप दिले 


तेव्हा कॉमेंट करताना जपून 


तुझ्या जिभेवर जी भाषा आहे 

ती सुद्धा माझीच निर्मिती आहे 


मीच तुला सुरुवातीपासून शिकवलेली 


तेव्हा ओरिजिनलशी छेडछाड करताना 

थोडे जपून 


अन्यथा कधी फाटला गेलास 

ते कळणारही नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल : तंत्र या काव्यफायलीतून)


ऐकून आहे डोळ्यांची स्वतंत्र भाषा आहे 

भाषा तर खोटी असते डोळाही खोटा आहे?


तुझ्याशिवाय जगणारे करोडो लोक आहेत 

माझी त्यात भर पडली एवढाच नवा मुद्दा आहे


मी एक विकल्प बुरख्यामधून बाहेर पडण्याचा 

ही तर सोय झाली यात हृदयाचा कुठे ठोका आहे


भय ही आहे आणि हिंदू पोरगा ही हवा 

मुद्दलापासूनच ताळमेळ हा चुकलेला आहे


मीही हवेतले प्रेम कधीच केले नाही 

हृदय याच पृथ्वीवर राहते मातीचा ठोका आहे


दुकानदार असलो तरी कुठे व्यवहार जाणतो मी 

काळजाची लेन देन आतबट्ट्यातला धंदा आहे


फुले विकणाराही कधी सुगंध विकत नसतो 

पॅकेज डील म्हणून आलेला तो दैवी दुवा आहे


कशाला कारणे शोधतेस विरह हाच जर शेवट 

हे अनालिसिस नाही हा तर तमाशा आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

सैतान मनोरंजन करतोय 

त्याला माहित आहे 

ईश्वर त्याचं काहीच करू शकत नाही 


त्याला स्वतःचं असणं 

निरर्थक वाटतंय 

आणि त्या निरर्थकला सार्थक ठरवण्यासाठी तो मनोरंजन करतोय


लोक फक्त टाळ्या वाजवत नाहीत 

भाग सुद्धा घेतात


आपण सैतानाचा भाग बनलेलो आहोत 

हे त्यांना कळते 

पण वळत नाही 


सैतान ही त्यांची न सुटणारी सवय आहे 


ईश्वराची प्रार्थना करतानाही 

लोक हृदयात सैतानाला ठेवतात 

कधी कधी पुरोहितांना लाचही देतात 


ईश्वर काहीच करत नाही 


त्याला आपण जन्माला घातलेल्या उत्क्रांतीची लायकी माहिती आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल :तंत्र या काव्यफायलीतून)


स्लोली किती चूक किती बरोबर ठरते

किती असंह्य झाले आहे त्यावर ठरते 


तू वाहती नदी आहेस की तू बर्फ आहेस 

हे नेहमी आत्महत्येच्या काठावर ठरते 


वाट पहावी लागते वाट निर्माण होण्यासाठी 

किती पहावी लागेल हे वाटेवर ठरते 


निर्णय घेण्यासाठी कमवावे लागते धाडस 

अचूकतेवर निर्णयाच्या खरोखर ठरते 


चुकणाऱ्या प्रत्येकाला बरोबर करण्याची संधी 

तीही चुकली तर आयुष्य निष्ठुर ठरते 


तो शिव पाठीशी राहील काळजी नको 

पाठीचा कणा कसा ते जीवावर ठरते 


(डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल:भक्ती या काव्यफायलीतून)


सज्जनांची युती नाही आणि वाईटांचा पक्ष आहे 

स्वतःला तू कसा वाचवशील ते तरस तू भक्ष आहे 


हा शहरातला पाऊस आहे कसा बनशील तू चातक 

पिण्यासाठी पाणी मिळवणे एवढेच जर लक्ष आहे 


कधी कधी त्याचेही इथे डोळे ओलावत असतात 

जो स्वतःच्या इमेज विषयी तेल घालून दक्ष आहे


विचारसुद्धा जड आहे आणि थोडा अवजड आहे 

तुला वाटते तू मालक त्यास वाटते तू त्याचा कक्ष आहे 


त्यांची इच्छा असूनही ते खाऊ शकत नाहीत मला 

मी इतका करपलो आहे कि खाता न येणारा अक्ष आहे 


माझ्याआधीही होऊन गेला कालिदास नावाचा कुणी 

कोणी म्हणते ढग होता कोणी म्हणते यक्ष आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


महाराणीसाठी श्रीधर तिळवे नाईक 


प्रसिद्ध होण्यासाठी थोडे नासावे लागते 

सौंदर्य लागतेच लागते पण बोल्ड असावे लागते 


विकला जाणारा इथे शेवटी विकलाच जातो 

मांसात त्यासाठी थोडे गोल्ड असावे लागते


कोण कितीला विकला तेही आठवत नाही 

आठवण्यासाठी सतत धंद्याला बसावे लागते


तिचा अहंकार शेवटी पैशापेक्षा श्रीमंत झाला 

फक्त तिलाच माहीत त्यासाठी किती घासावे लागते 


आता जरी ती प्रेतात निपचित पडून आहे 

तिला नक्की माहित होते जिवंतपण सोल्ड आउट असावे लागते 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीजमधील चॅनेल वर्ड्स या काव्यफायलीतून)


जी वाटत होती उथळ वरवर 

ती बनून आहे ओझं काळजावर 


वाळवंटात कधी? चिखलाने उमलते 

 प्रत्येकाची नजर तरी कमळावर 


भय इथलेही नि तिथलेही संपलेले 

सुरू माझा तेव्हाच मोकळा वावर


ज्या देवाच्या हातात तो कुठे आहे 

तरी लोक जगतात देवाच्या भरोशावर 


त्यांचा देवही त्यांच्याप्रमाणेच गरीब 

ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार ज्याचा त्याचा ईश्वर 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

गहनतेत तर मी सहज उभा आहे 

उथळतेपासूनच मला खरा धोका आहे 


तुझी दादागिरी माझ्या शरीरापूरती 

तुला अंदाजही नाही खरी ताकद आत्मा आहे 


त्याच्याजवळ आहेत खूप खूप अनुभव 

प्रश्न कुठल्या अनुभवात तो खरा आहे 


पुढच्या वसंतात मी असणार नाही 

हा जो शिशिर आहे तो शेवटचा आहे 


ती सभ्य चेहऱ्याने माझा गळा कापते 

तिला माहित नाही माझा गळा चकवा आहे


मी तिच्यापासून काहीही लपवत नाही 

तिच्याजवळ माझा एकेक बारकावा आहे 


ह्याच विचारांमध्ये आंघोळ माझी संपली 

साबण जुना आहे की साबण नवा आहे 


नात्यांमध्ये आहे आमच्या सारेच सेफ 

का मग वाटते प्रेम नाही चकवा आहे 


श्रीधर म्हणतो तरी ओ देत नाही 

माझ्यात कोण हा नामा निराळा आहे 


माझ्यात असंख्य माझे भाऊ नांदत आहेत 

कळेना कोण सावत्र कोण सखा आहे 


ओठामधली साखर स्थळामधले दूध 

बाकी जो चहा आहे उत्साही कडवा आहे 


चेहऱ्यावर अनुभवांची सुरकुती नाही 

अनुभवामुळे उडालेला टवका आहे 


डायबेटिस झाला मला तर आश्चर्य नाही 

तिच्या चेहऱ्यावर भरगच्च गोडवा आहे 


हा किस आहे लग्नाची अनुमती नाही 

असे समज ऍडमिशनचा दाखला आहे 


खूप काही तिच्याविषयी बोलले जाते 

बोलत नाही त्यांच्यानुसार अफवा आहे 


कळत नाही हा तिचा नखरा आहे की चेहरा 

दोन्ही वेळा वाटते की हा खरा आहे 


माहित नाही कसली असुरक्षितता असते

नेहमीच ओळख देताना दिसायला बरा आहे 


अजूनही संभोग तीने स्वीकारला नाही 

सहा महिने झाले तरी कोवळा आहे 


अजून कोणते पॅकेज डील तुला हवे 

ती मोर आहे आणि वर मोगरा आहे 


तिच्या शरीराचे तपशील मला तोंडपाठ 

ती म्हणते श्रीधरचा अभ्यास फार गाढा आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तुम्हारे घरमे आईना है या नही 

अपना चेहरा तू देखता है या नही 


सही समयपे सही बाते होके रहेगी

होठोपे मगर सही दुआ है या नही


बहक जाना नही दिमागकी बातो मे

जिसे दिल चुने कोई ऐसा है या नही 


पुरी दुनिया अपनेही नजर का धोका है 

कभी आँखोको हवामें उछाला है या नही 


जो पुराना था वो जमाना मिट्टी हो गया

आनेवाला जमाना नया पौंधा है या नही 


उमर गुजर गई दुवा मांगते मांगते 

जो कबूल करे ऐसा खुदा है या नही 


ए जिंदगी तू आखरी धोका उब चुंका हुं 

तुम्हारे पास कोई नया धोका है या नही 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तुमचा श्रीधर तिळवे 

हा तुमचं कन्स्ट्रक्शन आहे 

माझा त्याच्याशी संबंध नाही 


तुमच्या दृष्टीने तो काहीही असू शकतो 

मला पक्कं माहिती आहे 

तो तुमचा आहे 

आणि तो मी नाही 


तुमच्या श्रीधर तिळवेप्रमाणे मी बनणार नाही 


लोक आधी कन्स्ट्रक्शन करतात 

आणि मग त्या बांधकामात 

व्यक्तीला बसवतात 


मला माहित आहे 

याचेही काही तोटे आहेत 


पण केवळ नुकसान होते म्हणून 

तुमच्या ट्रॅप मध्ये कोण सापडेल ?


तेव्हा सांभाळत राहा 

तुमचा श्रीधर तिळवे 


मी मेलो तरी 

तो मरणार नाही 

जाणतो 


बनावट गोष्टी जास्त टिकतात 

ही मृत्यूची शोकांतिका आहे


(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन: एल्सेट्रा या काव्य फायलीतून)


दिसत नाही ती वाटते हा वेळ खाण्याचा खेळ आहे

मग दिसते वाटते प्रेम तिच्या येण्याजाण्याचा खेळ आहे


ती म्हणत राहते उद्या देते उद्या देते उद्या देते उद्या 

मीही जाणतो हा तिच्या पतिव्रता बाण्याचा खेळ आहे


कुणासाठीच ती गात नाही मी फक्त अपवाद आहे

तिची माझी भेट बुरख्याआडच्या गाण्याचा खेळ आहे


आता फक्त थांबणे आहे तिच्या डोळ्यात तिच्या शरीरात 

जगणे म्हणजे रोज तिच्या नव्या बहाण्याचा खेळ आहे


सातव्या समुद्रानंतर दिसला ठाकलेला आठवा समुद्र 

तेव्हा मला कळाले की आयुष्य पाण्याचा खेळ आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

शॉर्टकटचा जमाना आहे 

आणि धर्म सर्वोत्तम शॉर्टकट आहे 


श्रद्धेच्या कीज

आळस पुरवणारी तजवीज 

विज न पकडताच

आभाळ पकडण्याचे बीज 


यम नकोत नियम नकोत 

फक्त पूजा अर्चना उपवास व्रत 

यांची मांडामांडी 

मंडीची सांडासांडी 


हवा तर अर्धांग आडदांड सांड 

नाहीतर विनोद करणारा भांड 

डिमांडप्रमाणे सप्लाय 

गरजेप्रमाणे अप्लाय


तू फक्त आऊटडेटेड नाहीस 

आउटस्पेसेड आहेस 


संसाराशी अख्ख्या नातं जोडायचं आहे 

पृथ्वीवरच प्रत्येक झाड आपल्या बापाचा माल असल्यासारखं तोडायचं आहे 


शाबूत न ठेवता काबुत 


निसर्गाचा नाश झाला 

तर पैसे आहेत 

कल्टीवेटेड निसर्ग विकत घ्यायला 


म्हणजे ज्यांनी झाडे तोडली 

ते पुन्हा नव्याने अरण्य विकत घेणार 

आणि ज्यांनी झाडे जपली 

ते गरीबीत पर्यावरण नसलेल्या अनहेल्दी वातावरणात 


आणि तरीही देव आहेत निसर्गाशी नाते जोडायला 


परस्पर विरोधात उठाव करणारे हे उठवळ

जाणीवपूर्वक जोपासलेली श्रीमंत उथळता 

पुन्हा जग फ्लॅट आहे म्हणायला मोकळी 


एक साखळी आहे हितसंबंधांची 

धर्म हा केवळ धातू आहे 

हितसंबंध जपणारा

देवापासून बनलेला 

जो अस्तित्वात आहे की नाही 

याचा विश्वास ठेवणाऱ्यांनाच पत्ता नाही 


तू काय करू शकतोस ?


मोक्ष मिळण्याआधी आश्रम थाटून बसणाऱ्या लोकांच्या पैकी तू नाहीस 

मोक्ष मिळण्याआधीच वर्तमानपत्रात कॉलम चालवणाऱ्या कॉलमकारांच्यापैकीही तू नाहीस 


हे करायला एक बधिरता लागते मोक्षाबाबत 

हे करायला कमर्शियल निर्लज्जपणा लागतो मुक्तीबाबत 


सज्जनांचे तांडे कुठे आहेत 

सर्वच तर उंटावर बसलेले शहाणे आहेत 


स्वतःच्या आयुष्याचे वाळवंट करून शेतीवर प्रयोग करणारी जमात 


यांच्याकडे कितीही अनादरी दुर्लक्ष करावे म्हटले 

तरी हे घोडे लावायला समोर 

सोबत 100 गाढवे 


काळजाचा दिवा वाचवत नेणे 

हे कठीण आहे या बल्ब आणि ट्यूबच्या जमान्यात 


शहर सोडून हिमालयात जावे 

तर तिथेही आता पर्यटकांचे तांडे 

शिवाय पत्रकारांचे चोमटे चिमटे 


हे महानगरच आहे 

जे आरण्याइतके एकटेपण देते 


ही मुंबई हाच तुझा हिमालय 

प्रत्येक वेळेला प्रत्येक साधकाला बर्फ रेडिमेड हवा असे थोडेच आहे 


पर्वताच्या उंचीचा आणि आध्यात्मिक उंचीचा काय संबंध ?


तू निसर्गाने भरलेल्या जागा 

ज्या अजूनही माणसांनी रिकाम्या सोडलेत 

या मुंबईत शोधत रहा 

साधना करत रहा 


कदाचित अर्बन मोक्ष मिळवणारा तूच असशील 

एकमेवाद्वितीय 

किंवा पहिला 

किंवा शेवटचा 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल स्पिरीच्युअल या काव्यफायलीतून

)

जागच्या जागी सर्व चोपून चोपून 

उभी नीटनेटकी ती पदर खोवून 


आकाशसुद्धा वर मोजक्या ढगांचे 

येणारे किरण मोजक्या ताऱ्यांचे 


वारा सुद्धा येणारा मोजत गारवा 

खिन्नता अशी गणिताचा पारवा 


प्रत्येक वस्तू परफेक्ट नि सुबक 

मला वाटायला लागले मी बदक 


चल चलतो मुली होऊन बेशिस्त 

काटेकोर नाही,लागते कमी जास्त 


बघ उंबऱ्याबाहेर झालो तुझ्या हंस 

मोजत बस तू निर्माण केलेले कंस 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मेरी वफा में कोई प्रॉब्लेम नही थी 

तुने बेवफाई की तेरी प्रॉब्लेम है 

मैने तो हमेशा तुझे फुल दिये है 

तुने काटे अपनाये तेरी प्रॉब्लेम है 


श्रीधर तिळवे नाईक

(बाळबोध कविता या काव्य फायलीतून)


प्रेमात आत्महत्या लपली आहे 

आणि मला ती शोधायची आहे 


ती समोर आली की लपवतो प्रेत 

जिवंतपणाची खूण पटवायची आहे 


तिला प्रमोशन देऊन मी देवी केले 

तरी माणूस बनण्याची तिला घाई आहे 


क्षितिज इतके पातळ की समुद्रात विरघळले 

तिच्या डोळ्यात शिल्लक निळाई आहे


खांद्याच्या पाठीमागून डोके काढून वाचते

मला वाचताना बहुदा अवघडलेली आहे 


नाजूक श्वास त्यात तिच्या त्वचेचे गवत 

माहित नाही कुठे कुठे उगवली आहे 


शेवटी प्रेम करणे तिने कॅन्सल केले 

कुठे घेऊन जाऊ वासना जी बुक केली आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मी मराठी साहित्यसंस्कृती फाट्यावर मारली 

तिने उपेक्षा माझ्या ताठ्यावर मारली 


कित्येक वाद घासले तासले आ वासले 

मराठी भाषेने त्यांची उंची नाट्यावर मारली 


मी इथला होतो आणि मी इथला नव्हतोही 

त्यांनी माझी सुगंधी फुले काट्यावर मारली 


मिळणार नाहीत नफे याची घेतली काळजी

मीही मग हिशोबाची वही तोट्यावर मारली 


माझा वाटा दिला नाही माझा वाटा खाऊन 

मी नीच वाटमाऱ्यांची संस्कृती गोट्यावर मारली 


रिक्त हाताने जाणार यात मलाही शंका नाही 

पण जाता जाता हीही शंका मी चव्हाट्यावर मारली 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीजमधील चॅनेल: एलसेटरा या काव्यफायलीतून)


मैं चला जाऊँगा तो रौनकभी चली जायेगी 

मैं वो दिया हूँ जो बिकता नहीं मगर जलता हैं   


श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सीरीजमधील डेकॅथलॉन वर्ड्स ह्या फाईलमधून )

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा


वादळ आले आवाज न करता आले 

श्वासात माझ्या स्वतःचे सौंदर्य ठेवून गेले 


प्रत्येकाकडे इथे आठ दहा उपाय होते 

मग मरणारे का एवढे प्रश्न ठेवून मेले 


प्रत्येक धोरणाला यांनी कुरण बनवले 

आमच्या ताटात फक्त गवत वाढून गेले 


जिथे तिथे आयुष्यावर दबाव वाढलेला 

जे क्षण आले ते ओझे घेऊन आले 


प्रत्येक माणसाने स्वतःवर कव्हर घातलेले 

आत मध्ये काहीतरी गिचमिड लिहिलेले 


मला अजून खूप खूप जगायचे आहे 

तारुण्य खोलेल प्रत्येक कुलूप लावलेले 


मॅच्युरिटी ऐश आहे तीही पुढे मी करीन 

जगू द्या आता न्हवाळीतील क्षण उमललेले 


चुंबनावर सुद्धा तू घड्याळ लावणार का 

मला नकोत ओठ काळास बांधलेले 


यशानंतर त्याला जबर माज चढला 

मैत्रीचे का होते त्याने देखावे दाखवलेले 


दोन शब्दांचा दिलासा होता दिला 

बाकी सर्व फुफाटे पेपरात पेटवलेले 


तिच्या सौंदर्याने की स्वभावाने जिंकले 

डोळ्यातून आली की दार उघडून आतले 


हसताना ज्यांचे डोळे उदास त्यांना विचारा 

दुःखाने त्यांना किती खोलवर होरपळले 


दहा वर्षाचा असताना एकवीस मी झालो 

मला नका विचारू बालपण कसे गेले 


तिला फक्त माझ्या विनोदात रस होता 

तिला हसवता हसवता काळीज काळवंडले 


आयुष्य कधी कोणाच्या नावावर करता येते 

ज्याचे त्याचे शरीर ज्याच्या त्याच्यात एकवटलेले 


आसपास माझ्या आयुष्याचे विखराव 

आत काय आहे तरीही सळसळणारे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


ये वक्त का फैसला है गुनाह है 

मेरा प्यार उसके लिए मुसीबत है 


पानीकी तरह फेकी थी मोहब्बत 

अब देखा तो दिल में सिर्फ बर्फ है


झील के किनारे कौन नाचा था 

पानीमें अब सन्नाटेकी आहट है 


ऐसा लगा था की हो गयी शादी

अब मांग चली गयी मगर सिंदूर है


ना उसका बदन है ना रही खुशबू 

जहाँ हुतात्मा हुआ वो पार्क है 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

गुलाब को क्या गुलाब दिखाये 

शराब को क्या शराब दिखाये 

तुम इतनी हो खूबसूरत कोई 

खूबसूरतीको क्या हिसाब दिखाये 


हसरते बादलकी तरह उछलती हुई 

ख्वाईशे समुंदर में तैरती हुई 

बस ये पानी आँखोका सोता नहीं है 

पानीको कौनसा ख्वाब दिखाये


अंजाम की कोई फिकर भी नही 

शुरू कब हुए ये पता भी नही 

चल रहे चल रहे चल रहे है हम 

कोई सिग्नल हमे नायाब दिखाये 


मस्ती चढती है उतर भी जाती है 

खून भी कभी प्यासा हो जाता है 

एक मतवाला दिल मे सवाल बनकर 

कोई तो आके उसे जवाब दिखाये 


गुनाहगार भी बने उसके प्यार में  

मगर अभीतक मजनू न बन पाये 

कोई तो जुनून की शराब पिलाये 

या फिर उसको खराब दिखाये 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

केवळ दुखवायचे नाही म्हणून हो म्हणू नकोस 

हा आयुष्याचा निर्णय आहे त्यात चुकू नकोस


जे आहे माझ्या बाजूने तेच तुझ्या बाजूने असावे 

जर तसे नसेल तर माझ्या बाजूस असू नको 


लग्न होणे हेच कधी खूप अक्राळ विक्राळ होते 

घाबरून निघायचे म्हणून घरामधून निघू नको 


मी माझ्या बहिणीलाही अस्वस्थ पाहतो आहे 

केवळ मी विचारले म्हणून अस्वस्थ होऊ नको


नकार हाच मानवी हक्क होकार एक शक्यता 

नाते निर्माण करायचे म्हणून स्वतःचा कणा गमवू नकोस 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तृष्णाचं वजन वाढत चाललंय 

ते कमी करायला जिम उपलब्ध नाहीत 


लोक जाडे होत चाललेत 

त्यांच्या त्वचा त्यांच्यापेक्षा जाड 


वजन दिसत नाही 

पण माणूस घेऊन कोसळतं


स्वतःच्या वजनाखालीच इतकी ठार झालेली माणसे 

कुठल्या युगात नव्हती 


श्रीधर तिळवे नाईक 

(डे कॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल :ज्ञान या काव्यफायलीतून)

बाई पुढे ज्याचे इमान ढळते 

त्याचे आतलेही इमान सरते 


पारदर्शकपणा स्वभाव कर 

त्यातच फक्त नशीब उजळते 


शॉर्टकट काही कामाचे नाहीत 

लांब प्रवासानेच दैव फळते 


अनैतिकतेचा विजय सांगत राहतील 

सांगणाऱ्यांना कधी यश गवसते ?


तुला भरपूर कष्ट पडतील 

पण घामानेच करियर फुलते 


हिशेब मांडला जातो विश्वाकडून 

त्याचे गणित कळते कधी न कळते 


एक गोष्ट नक्की सर्व परतणार आहे 

कर्म अपवाद नाही तेही परतते 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन या सिरीजमधील डे कॅथलॉन :अनकॅटेगरीकल :तंत्र या काव्य फायलीतून)

श्रीमंत कधी कुठे गर्दी करतात 

गर्दीसाठी तर ते मंदिर बांधतात 


कुठल्या राजकारणावर लिहितात ते

ते स्वतःच्या पैशावर बोलतात लिहितात


बिझनेस मधून त्यांना वेळ मिळत नाही 

गर्दी जमवण्याचा बिझनेस ते राजकारणी लोकांना देतात 


त्यांचा त्याच देवांच्या वर विश्वास बसतो 

जे देव त्यांच्यासाठी पैसा घेऊन येतात 


कधीतरी मनशांतीसाठी येतात आश्रमात 

पण तिथे तरी कुठे गरिबाच्या मांडीला मांडी लावून बसतात


श्रीमंत कधीही गर्दीचा हिस्सा असत नाहीत 

गर्दी आणि वर्दी फक्त गरिबांसाठी असतात 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

दिवासुद्धा नव्हतो आपोआप विझलो 

एकदाच विझलो पण अमाप विझलो 


नखाएवढाही उरलो नाही शिल्लक 

इतका मी तिच्या नखात विझलो


ज्या समुद्रास मिळाली तो दिसला नाही 

मी शेवटी नदीच्या पाण्यात विझलो 


झोपू दिले नाही तिच्या आठवणींनी 

ज्यांनी दुर्लक्ष केले त्या डोळ्यात विझलो 


शेवटची भेट ही तिची धावती होती 

मी त्या भेटीच्या धावण्यात विझलो 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

कधीच दाखल होत नाही घर उन्हात लोकांचे 

मात्र सावलीची अपेक्षा दरवाजे करतात लोकांचे 


तू आपल्या तालात जगत जातोस खरा 

पण अहंकार तुझ्यामुळे दुखावले जातात लोकांचे


तू एका बाजूला ठामपणे राहतोस खरा 

पण दुसऱ्या बाजूला रोल्स बदलतात लोकांचे 


हा मिळालेला माझ्या आईचा आशीर्वाद आहे 

पुरुषसत्ताक झमेले स्वतःच मला चुकवतात लोकांचे 


बाहेर तर सर्वजण सज्जनच दिसत आहेत 

कळत नाही काय चालले आहे आत लोकांचे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


पशु होतो, पाश होते , परवशता झाली 

आयुष्य कळेतोवर आयुष्याची दुर्दशा झाली 


ती चांदण्यात नाही तर जमिनीवर हिंडते 

तरी देवाकडून तिची का अशी दशा झाली 


प्रथम भेटला तेव्हा चेहरा नागवा होता 

हळूहळू दडपण वाढत ती संपूर्ण बुरखा झाली 


काळजातले प्रेम तिच्या काळजात राहिले

तिचा पोशाख आमच्या प्रेमाची सीमा झाली 


आजवर हेच होत आले शेवटी हेच झाले 

मी भगवा झालो नि ती शेवटी हिरवा झाली


मी तर आणले नव्हते जगणे माझे जगात 

मग जगणे माझे कशी माझी विवशता झाली


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आणि मी पुन्हा तिच्या प्रेमात पडलो 

बाहेर जायचे होते पण आत पडलो 


खूप साधी होती तशी तिची खोल नजर 

मी थेट जाऊन तिच्या डोळ्यात पडलो 


तिच्या त्वचेला होता मातीचा सुगंध 

तिला हुंगताना मी आभाळात पडलो 


आतून इंडियन जरी कपडे विदेशी 

त्वचेतून निसटलो कपड्यात पडलो 


काहीही मागितले नाही कधी माझ्याकडे 

मीही काही न मागता तिच्या प्रेमात पडलो 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


काळजाला पुन्हा पडतील चरे नको येऊस 

लोक होतील घाबरे घुबरे नको येऊस 


पुन्हा पुन्हा तोच रंगेल वाद तुझ्या माझ्या मध्ये 

करत बसते कुठे खोटे खरे नको येऊस


पुन्हा घालून येशील तू सनातन तुझा बुरखा 

मलाही वाटणार नाही बरे नको येऊस


वाळलेल्या फुलांना पंचगंगेत द्यावे टाकून 

गंधाने तुझ्या भरते कापरे नको येऊस 


आता फोकस करावा दुकानदारीवर हे बरे 

कोण पहात बसणार झरे नको येऊस 


होते दरम्यान ते प्रेम होते की ती होती वासना 

कुठे शोधत बसू उत्तरे नको येऊ


तू असल्याने थोडेच आहे वितळणार काठीण्य 

खडतरच राहणार दोन्ही घरे नको येऊस


अडकलेला जीव तुझ्यात आधी करू दे मोकळा 

आयुष्याचे होऊ दे पूर्ण खोबरे नको येऊ


तुला पाहून तीच प्रथम रिएक्शन असणार आहे 

पुरुषत्व पुन्हा होईल तोतरे नको येऊस 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

स्वतःशी किती खोटे बोलशील ?

आयुष्य म्हणजे फक्त तोटे बोलशील ?


तुझ्याजवळ सत्य तूच आहेस 

की दिसणाऱ्या बोटांना खोटे बोलशील ?


कधीतरी आतील शिवाकडे वळ 

दरवेळी माझ्यामागे पोटे बोलशील?


शेजारचा मेला तरी मृत्यू दिसत नाही 

कितीदा मृत्यूमुख खोटे बोलशील ?


कितीदा म्हणशील स्वतःस नाटा 

किती स्वतःचे हात थोटे बोलशील ?


खोटे बहाणे बंद कर देहपत्र वाच

कितीदा देहाला लखोटे बोलशील ?



श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल :तंत्र या काव्यफायलीतून)


एक प्यार का नगमा है 

जो मेल्यात जमा आहे 


मौजोंकी रवानी है 

आणि तिला क्षमा आहे 


जिंदगी और कुछ भी नही 

एक टिकलेला दमा आहे 


तेरी मेरी कहानी है 

पण त्यात कुठे प्रियतमा आहे 


इसी लिये कहा शोर कर 

नाहीतर नशिबी कोमा आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


भले ये देश दिखता कमसिन है

टॅलेंट खतम करने की मशिन है 


जब तक तेरे पास है इन्कम

तब तक तेरी रात तेरा दिन है


मोहब्बत का नाम है जुबा पे 

मोहब्बत पे किसको यकिन है


सडनकीभी हो चुकी है आदत 

और मजे लेकर कहेंगे क्या सिन है 


जिन्हे जमीन बेचनेमें हासील महारत 

उन्हे जमीर भी बेचना मुमकिन है 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


शेवटी दिलासा शोधावा लागतो 

देशात नसेल तर बाहेरचा शोधावा लागतो


तो पुरोगामी म्हणून विजयी कुठे झाला 

आलेख वैयक्तिक कर्तुत्वाचा शोधावा लागतो


श्रीधर तिळवे नाईक


मी खोलवर आत उदास आहे 

माहित नाही काय आसपास आहे 


का दाटून येतात आत हुंदके 

कोणत्या दुःखाचा आभास आहे 


 चित्र विचित्र मळभ दाटत राहते 

वैफल्याच्या लागलेला तास आहे


काहीतरी पोकळ सरकत राहते 

फुल आहे त्यास पोकळ सुवास आहे 


वाटले होते पाण्याने प्रश्न सुटेल

पाऊस आहे पण त्याला प्यास आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


पुरुषव्यवस्थेत श्रीधर तिळवे नाईक


माझ्या आईनं 

कधीच आरसा बाळपणी 

ठेवला नाही माझ्यासमोर 


तिला भीती होती 

मी स्वतःला प्रतिबिंब समजेन म्हणून 


मी आयुष्यात कधीही हॉल ऑफ मीरर्समध्ये प्रवेश केला नाही 


तिने ना मला जात शिकवली 

ना नातेवाईकगिरी 


मी एकदा बहिणीचा फ्रॉक घालायचा हट्ट केला 

तेव्हा तिने मला फ्रॉक घातला 

आणि मी तो फाडला 

तेव्हा म्हणाली 

“बरं झालं बाईपणापासून सुटलास 

पुरुषाला कशाला हवं बाईपण 

त्यानं आपलं पुरुषपण पेलावं हेच उत्तम ”


तिनं मला खेळू दिलं हवं तेवढं हवं त्याच्याशी हवं तितकं 


कोकणी माझी मातृभाषा होती 

मला ती शिकवण्यात आली नाही 

आणि मी भाषामुक्त झालो 


नंतर मी असा मोकळा उभा राहिलो 

आणि अनंत 

अडथळा नसल्याने आत शिरले 


माझा मी 

आजतागायत अनंतातून 

पुरुषव्यवस्थेत परतलेला नाही 


श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सीरीजमधील डेकॅथलॉन एलसेट्रा ह्या फाईलमधून

 )

मेरे बाहर भी जिंदा है जिंदगी 

मै मरा हु परिंदा है जिंदगी 

श्रीधर तिळवे नाईक


माझ्यासमोर नवा घाशीराम कोतवाल आहे 

आणि नानासाहेबांचा नवा बवाल आहे 


प्रत्येक जागी दिसतीये शहरात मला मगर

आणि सत्ता म्हणतीये ही तर पाल आहे


अजूनही चालू आहे सर्वत्र बामन हरी 

देशभर सर्वत्र पुणेरी भवताल आहे 


मारला कोण जाणार एवढाच प्रश्न 

 प्रत्येकाच्या नजरेत खूनशी चाल आहे  


हातात दिसत नाही कोणाच्याच तलवार 

प्रत्येक चेहरा मात्र बनलेला ढाल आहे


पेशवाई कोसळणार हे आहे नक्की 

आश्चर्य! कोसळण्याला नवा ताल आहे 


इंग्रज निघून गेले हे तसे बरे झाले 

नवीन आलाय तो अधिकच चवचाल आहे 


जो नवीन असतो त्यास अधिक माज

जो जुना आहे तो कबाडी माल आहे 


मला आता कळेना दुकान कुठे ठेवू 

माझ्याविरुद्ध आधीच गेलेला निकाल आहे 


हेही तसे बरेच की अजून जिवंत आहोत 

अजूनही कळते की बेकार हाल आहे 


चारी वाटा त्यांनी चौकामध्ये कोंडल्या 

वर जाणे हीच आता उरलेली उलाढाल आहे 


न्याय मागावयाला जागा नाही शिल्लक

व्यवस्थेकडे जावे तर ती xनाल आहे 


श्रीधर तिळवे नाईक

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तिच्या पदरात घुसळलेला अद्वितीय चेहरा माझा 

तिच्यामुळे एकसंध फक्त एकच गेलेला चरा माझा 


मला नाही माहित तिच्या जीन्स मधून आले काय

कळत नाही तिचा की भगवा रंग गहरा माझा


संन्यासही सांभाळतो मी दुकानही सांभाळतो 

तिच्याच घरी जातो जेव्हा उतरतो नखरा माझा 


मी मुलांना देणार नाही जन्म तिला ठाऊक आहे 

ती प्रार्थना करते निघावा एक भाऊ बरा माझा 


तिची प्रत्येक आज्ञा मी मुकाट्याने पाळत असतो 

ती यातच समाधानी की पोरगा आहे खरा माझा


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल : भक्ती या काव्यफायलीतून)


काय दिसते आहे तुला 

माझ्या मेंदूतल्या प्रीती फुला 

करशील का खुला तुझा देह 

की झाले सारेच विदेह ?


हृदयाचा खोल ड्रायव्हर 

स्ट्रॉ ने पिईन प्रेमाचा शॉवर 

सुरू होईल वावर रक्ताचा तुझ्या 

करेल माझ्या पेशी ताज्या 


नको नाकारू जे आवश्यक 

जरी तुला ती वाटते कचकच 

पाहणे एकटक हेच आहे प्रेम 

नजर माझी टांग करून फ्रेम


तिच्यातील डोळ्यांनी पाहीन तुला 

सदैव सोबत करीत गलबला

निघेल जलजला सर करत डोके 

जोवर तू म्हणत नाहीस ओके ओके ओके 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


स्वतःच्या चंचलतेला विविधता म्हणू नका 

सगळीकडूनच ओरपण्याला धर्म बनवू नका 


हा देव प्रसन्न नाही चला मग त्या देवाकडे 

स्वतःच्या स्वार्थानुसार स्वतःचे देव बदलू नका 


देव म्हणजे काय तुमच्या घरातला नोकर आहे ?

नवसाचा नावाखाली त्याला स्वतःचे काम सांगू नका 


कधीतरी आत झाकून काय आहात पहा 

हितसंबंध हाच आधार , उघडा त्याला झाकू नका 


ज्यांचा देव एक नाही त्यांची निष्ठा काय एक राहणार 

एक तर शिव निवडा नाहीतर काहीच निवडू नका 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डे कॅथलोन :अनकॅटेगरीकल :भक्ती या काव्यफायलीतून)


जेब खाली थी मगर दिल खाली नही था 

उनके लाईफमें मेरे जैसा मवाली नही था 


मेरे पास जिंदगी के ढेर सारे जवाब थे 

मगर उनके जैसा चेहरा सवाली नही था


अकेला था तो नुकसान का पता नही चला

सुकून था दिमाग पुलाव खयाली नही था


बहुत देर चला सफर अकेला ही चलता रहा 

शायद मै हाथ जिसे मिला कोई ताली नहीं था


उनके पास ना कोई लिहाज ना कोई सवाल है 

अहंकार इतना था की कमरा खाली नही था


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तुझ्या फुलांची खबर होतो ते मी कवितेत सांगेन

गंधाची तुझ्या बखर होतो ते मी कवितेत सांगेन 


अचानक तोल गेला की मेंदूला आला स्ट्रोक 

कुठल्या प्रश्नाचे उत्तर होतो ते मी कवितेत सांगेन 


माझे हृदय शाळा आहे की केवळ आहे चारा 

की केवळ तिचा पदर होतो ते मी कवितेत सांगेन


टाकलेले तिने बॉल आदळत राहिले त्वचेवर

खेळताना काळजावर होतो ते मी कवितेत सांगेन 


माझ्या चुका आजन्म तू लक्षात ठेवशीलच 

मी किती बरोबर होतो ते मी कवितेत सांगेन 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मिट्टी की गुडिया थी सितारा नही थी 

जिसने मेरा दिल चुराया वो आवारा नही थी


कैसे आईना बनता हमारे ताल्लूकातका

मोहब्बत हुई और वो पारा नही थी


नदी थी इसीलिए उसके किनारे बैठ गया 

मेरी विटंबना मेरी मोहब्बत धारा नही थी


उन्होने खफा हो के मेरे खिलाफ कुछ लिखा 

लोगोने उसे शायरी कहा जो शरारा नही थी


तितलीया मेरे फुल पे कभी बैठी नही 

और दिमक को मेरी खुशबू गवारा नही थी


श्रीधर तिळवे नाईक


(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलोन :वर्ड्स या काव्यफायलीतून)

एकांतात तू कुठे एकटी होतीस 

तुझा संसार तू कटकटी होतीस 


जे भवताली होते ते थोरले होते 

तू नेहमी त्यापुढे धाकटी होतीस 


त्यांच्या आयुष्याला बांबू लागला 

टिकून राहिली ती काटकी होतीस


 वाट पाहणे कधीचेच मरून गेले 

भेटलीस तेव्हा फक्त वाटेकरी होतीस 


हळूहळू तू आता कळते आहेस 

दास्य दाखवणारी स्वामिनी होतीस 


तुझ्यासाठी बाजार कधीचाच मेला 

तरी का बाजारात तू उभी होतीस 


तुला नवरा सागरच मिळाला असणार 

मी जाणतो तू किती तहानलेली होतीस


माझ्या डोळ्यांचा कोर्ट रूम ड्रामा होता 

मागता ही न दिली ती माफी होतीस


खालसा केलेले हृदय परत तर कर 

की तू ही राजवट इंग्रजी होतीस 


गुलाब पकडणारा काटे पकडत नाही 

म्हणून मी घायाळ तू गुलाबी होतीस


तुझी गाडी थांबत निमित्तावर होती 

जणु सणावारी लागणारी तू एसटी होतीस


मी कधी तुझी परीक्षा घेतली नाही 

पुढच्या परीक्षेची फक्त तू तयारी होतीस 


कोल्हापूरची राणी झालीस म्हणून काय 

मजा तेव्हा होती जेव्हा तू शेजारी होतीस 


जो अफू झाला तो रफू होत नाही 

जी कधी ना उतरली अशी धुंदी होतीस 


तुझ्या जागी कोणी दुसरीही येईल 

तुझे काय करायचे तू पहिली होतीस 


तुझी मुलगी डिट्टो तुझ्यासारखी हसते 

तुझ्या मुलीची का ओरिजनल मुलगी होतीस 


प्रेमाच्या समुद्रात बुडला तोही तरंगला

प्रेत पाहणारी किनाऱ्यावरची गर्दी होतीस 


तसे तर टर्मिनसचेच तिकीट काढले होते 

तू मधल्या स्टेशनवर उतरली होतीस


जरी काळ समजून तुला हातावर बांधले 

तू घड्याळातली किरकोळ आकडेवारी होतीस


कळले पण उशिरा कळले तू काळाला 

म्हातारा होण्याची लागलेली घाई होतीस


भाषा संपली आणि संवाद तुटला 

तू टेलिफोनची वायर पण सरकारी होतीस 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आपण राजे म्हणून त्यांना सहन का करतो 

आपल्याच लोकशाहीचे प्रहसन का करतो ?


कुठून येतात गाढवे सत्तेच्या घोड्यावर बसायला 

आपण त्यांच्या लाथांचे आचमन का करतो 


का परवडतात मूर्ख आपणाला पुन्हा पुन्हा 

आपल्या शहाणपणाचे त्यांच्यात दहन का करतो 


एकदा तर कळते हे सत्ता पिणारे दारुडे आहेत 

निवडून पुन्हा पुन्हा त्यांचे व्यसन का करतो


लोकशाही व्यवस्था भावजीवी का होते 

बुद्धिजीवींना मिळून आपण शासन का करतो?


श्रीधर तिळवे नाईक 

(डे कॅथलॉन सिरीज मधील डे कॅथलॉन अन कॅटेगरी गर्ल शक्ती तंत्र या काव्यफायलीतून)

मी म्हणालो सैतानाला जा उड जा आणि पकड मंगळ 

तो म्हणाला तिथे माणसे नाहीत कशी होणार माझी चंगळ 


मी म्हणालो सैतानाला जा पकड तुझा ओरिजिनल शनि 

तो म्हणाला पृथ्वीसारखी मिळणार नाहीत माणसे अडाणी 


मी म्हणालो सैतानाला जा मग तुझ्यासाठी बेस्ट हर्षल 

सैतान म्हणाला मिळणार नाही माणसासारखा मला बबल 


मी म्हणालो काय ठेवले आहे तुला इथे पृथ्वीवर 

सैतान म्हणाला मी का देऊ याचे उत्तर देईल ईश्वर


मी बोलवले ईश्वराला पण ईश्वर नाहीच आला 

मी आणि सैतान एकाच बोटीत 

आमच्या बुडाला फोड आला 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


स्वतःशी किती खोटे बोलशील ?

आयुष्य म्हणजे फक्त तोटे बोलशील ?


तुझ्याजवळ फक्त तूच आहेस 

खोटी दिसणारी बोटे बोलशील ?


कधीतरी आतील शिवाकडे वळ 

दरवेळी माझ्यामागे पोटे बोलशील?


शेजारचा मेला तरी दिसत नाही 

कितीदा मृत्यूमुख खोटे बोलशील ?


कितीदा म्हणशील स्वतःस नाटा 

किती स्वतःचे हात थोटे बोलशील ?


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल :तंत्र या काव्यफायलीतून)


महत्वाचे काय आहे आणि काय योग्य आहे? 

ठरवणे अवघड झाले गायब आरोग्य आहे


श्रीधर तिळवे नाईक


तेरी याद नही आती ऐसा भी नही मगर ये भी पता है तू भी मुझसे जुदा है

****

जे लोक मशीन कडून जप करून घेतात 

त्यांच्या भक्तीची ऑथेंटिसिटी किती ?


की हीही पण समजावी सिटी ?


अशा कित्येक सीट्या शिट्ट्या वाजवतात 

पिट्टा पाडत मशिनरी ओठांचा 


आणि साईडला 

ऑफसाइड म्हणून डिक्लेअर झालेली ऑथेंटिसिटी 


कापूर विसरलात का मामा 

तरी बरं आपला देव उगाच नियमबियम बनवत नाही


प्रदक्षिणा घातलेत इतकेच पुरे नाही का 

आता गाडी असल्यावर 

कोण घालेल पायाने खेटी 


भक्ती महत्त्वाची 

म्हणजे काय 

दिसत नाही ना 

जे दिसत नाही ते लपवता येतं 


एकंदरीत फुटकळ आहोत झालं 


मोक्ष सुद्धा आयता बसून हवा 


चला पाहू किती जणांनी 

किती कावळे नेमले 

ड्युटीवर ?


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीजमधील चॅनेल: स्पिरीच्युअल या

 काव्यफायलीतून)


अनलिंकड होण्याचा ध्यास 


कांगारूने पोटात पोर ठेवावं 

तसा ठेवलाय मोक्ष मी माझ्या पोटात 

ओठात पासवर्ड आहे 

आणि समोर करोडो लिंकस 


कशातून नेमकं मिळतं काय 

गाय झाली आता सगळ्यांची आय 

वासरूला मानावे का मी बंधू 

त्याने होईल का पार संस्कृती सिंधू 


अभिनयाचा ऊस लागतो गोड 

पण मोडून जातो ओरिजिनलची खोड 

घासतो त्रिभुवनात घसरगुंडी त्वचा 

आणि लिंक काढायला निघावे तर आपल्या हातावर माऊसच्या सफेदपॉश माशा  


मी मनू बनतो 

जणु जग वाचवायची जबाबदारी माझ्यावर 


मग हा विष्णूचा अवतार म्हणून थबकतो 

काय नेम 

आपलाही होईल गेम 

आपणही होऊ विष्णूचा अवतार 


आणि पवित्र कराराचा होईल भंग 

आणि भांग पिल्याचा आरोप होईल 

टंग तरी किती काळ टांगती ठेवणार ?


अंग होईल जे शैव होते ते वैष्णव 

 डुबक्या मारायला आजकाल स्क्रीन पुरतो 


पळा पळा पळा कोण पुढे पळे तो

ओबीसीबीसी आदिवासी आदिवासी झटपट पळा

ओपनवाल्यानो थोडे थांबा 


आरक्षणाचे सिग्नल 

सुरक्षणाचे सिग्नल 

जंगल मे मंगल 

आणि तरी पुन्हा तीच तीच जातीयवादी टिंगल 


आता जिंगल गाऊ जातीचे 

काय करावे या मातीचे 

जी सडून गेली जातीत आणि वर्णाच्या वर्णनात 


माणूस शिल्लक ठेवला नाही 

या व्यवस्थेने माणसात 

मीच वाचलो 


ज्याच्या हातात बॅट तो बॅटर 

कॅप्टन झाला तर त्याच्या हातात फ्युचर 


राजकारण चाललय की गल्लीच क्रिकेट 

कळत नाही कोण कोणाची काढतोय विकेट 


वाटले होते आहे पाटा विकेट 

पण निघत राहिले फाटे 

आता फाट्यावर तरी काय काय मारणार 

कोण कोणाला इथे तारणार 


महिषासुर मर्दिनी तारक संजीवनी 

संजीवनी विद्या गेली कुठे 


एक होता कच अजूनही कोणाला करावेसे वाटत नाही 


प्रेमाचे वय संपलेले 

तारुण्य कधीच जम्पलेले


खोड्या काढून संपत गेल्या उड्या 

आता फक्त उरलेल्या वयांच्या वावड्या 


या बेवड्या काळाला प्रत्येक वेळी दारू कशी मिळते?


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीजमधील चॅनेल : स्पिरीच्युअल या काव्यफायलीतून)


कुठे शोधत बसलायस तू तळ 

शेवटी सगळ्या सारख्याच उथळ 


कॅमेऱ्यापूरती शिल्लक आहे त्वचा 

सौंदर्य हेच आहे शरीराचे बळ 


नखरा कुठला नी चेहरा कुठला 

कशाचे नेमके डोळ्यात उठतात वळ 


कपड्यावरून शरीर ओळख 

तेच आता झाले आहे बौद्धिक बळ 


शरीर हाताळणे जमणार नसेल 

तर शांतपणे संध्याकाळी मावळ 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

********†****"*******""""""""""

ज्ञान सुख देत नाही 


ज्ञान सुख देते ही ज्ञानाविषयीची रोमँटिक कल्पना आहे


फक्त जाणल्याने आध्यात्मिक आनंद होऊ शकतो 

मात्र मोक्ष मिळेलच असे नाही 


हे जाळे विणलेले आहे 

आणि हे जाळेच कोळी आहे 


या जाळ्यालाच ईश्वर समजू शकतोस

पण हे जाळे नवसाला पावत नाही एवढे लक्षात ठेव 


हृदय म्हणजे अवयव नाही 

ते अवयवांच्या बाहेर असलेले कनेक्शन आहे 

मात्र ते संपूर्ण जाळ्याशी जोडता येते ही त्याची खासियत आहे 


तेव्हा मी हृदय म्हणतो 

तेव्हा संपूर्ण जाळ्याकडे जाणारी वाट 

एवढाच त्याचा अर्थ असतो 


मेंदू सर्वायवल आहे 

आणि तो टिकण्याच्या आणि वाढवण्याच्या हिशेबातच 

उत्क्रांत होत असतो 


आत्मा नाही 

पण प्राण आहे 

मेंदू आहे 

आणि ज्ञान आहे 


दंतकथा नव्या असल्या म्हणजे सत्य होतात असे नाही 

त्यांच्या साह्याने फक्त नवे फेक जग तयार होऊ शकते 


विचार सर्व काही सुसह्य करण्याच्या मागे असतो 

त्याच्या पाठलागाच्या मुळाशी अनेकदा आळस असतो


वास्तवाचा त्याग करता येत नाही 

त्यामुळे अतिवास्तव रचलास म्हणजे सुटलास 

हा भ्रम काढून टाक 


वास्तवाच्या पलीकडे सत्य आहे 

आणि ज्ञान वास्तवाचे होते 


सत्य ज्ञान नाही  

सत्य शून्य आहे 

जिथे ज्ञानाचाही अंत आहे 

मात्र नॉलेज इज डेड अशी घोषणा देऊ नकोस 

वास्तवात फक्त ज्ञानच जिवंत ठेवते 

ते नसेल तर तू मृत्यू पावशील आणि मोक्ष मिळवण्याची शेवटची शक्यता संपेल


त्यामुळे ज्ञानाचा द्वेष नको 

पण ज्ञानाच्या मर्यादा लक्षात घे 


भोवतालच्या दंतकथानी उभ्या केलेल्या परिसराला नीट बघ 


शिवशक्ती युग्म आहे 

पण ते अनेक पॅराडॉक्स निर्माण करतं 


त्यांच्या पलीकडे जाणे हाच या पॅराडॉक्सेसवर मात करण्याचा उपाय आहे 


तेव्हा दोन डोळे नीट कर 

आणि आत वळ 


त्यामुळेच तिसरा डोळा उघडेल 

आणि सर्वनाशाची सुरुवात होईल 


हा प्रलय म्हणजेच मोक्ष स्फोट 


त्यानंतर तू सदैव जिवंत राहशील 

संपूर्ण 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सीरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल : ज्ञान या काव्यफायलीतून)


त्याला सत्ता मिळाली की तो अवघड असह्य होतो 

बोलायला समजवायला गेले की तो गूढ गुह्य होतो 


प्रत्येक दिवशी कॅल्क्युलेशन इतका नि तितका झाला 

कधी कधी हा धंदा अन टर्नओव्हरसुद्धा असह्य होतो


गुलाब मागता मागता त्याने अचानक मागितला इन्कलाब

रोमँटिक सीजन कधीकधी असा अचानक कालबाह्य होतो 


रिश्ते आणि रिश्वत यांच्यात फारसा फरक उरलेला नाही 

इमोशनल रिश्वत दिल्यावरच आजकाल रिश्ता सुसह्य होतो


शेवटी तुमचे खरे सुद्धा हळू हळू खोटे बोलायला लागते 

आणि प्रेमाने बनलेला असूनही सहप्रवास असह्य होतो 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

जी 

कोई आ रहा है कोई जा रहा है 

बस जिंदा होनेमें कुछ पल नहा रहा है 


समुंदर पे मुझको आता हे तरस 

नदियों को किनारे लौटा रहा है 


जान निकल गई दिलको समझाते 

फिर भी पागल उसे समझा रहा है 


उसकी हाईट यहाँ कम हो गई 

जो इन्सानियत का कद बढा रहा है 


उसने तो एक बार सिर्फ ना कहा 

मुझे क्यूँ जिंदगीभर शिकवा रहा है


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


स्वतःवर तरी होणार नाराज कितीदा 

स्वतःस करणार आयुष्यातून बाद कितीदा 


सर्व बाजूंनी दिसत आहे मला माझा पराभव 

उतरवून ठेवायचा डोक्यावरून ताज कितीदा 


कितीदा ओढवून घ्यायचे उरावर विलनचे घोडे 

स्वतःच्या हृदयावर आणायची टाच कितीदा 


लोक आहेत आणि लोक आयुष्यात नाहीत 

ओघळू द्यायचे अंगावरून त्यांचे आवाज कितीदा 


मित्र ज्याला म्हणावे तो मत्सराने ग्रस्त 

किती हा धोका देईल घ्यायचा अंदाज कितीदा 


कोण असा ज्याला आयुष्य एकटे पाडत नाही 

अस्तित्वात आणायचा स्वतःमध्ये समाज कितीदा 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


जीव थोडा थोडा माझा मरत चाललाय

काळ आयुष्याची चोरी करत चाललाय 


तुझ्यासाठी प्राण द्यावा तुझी आदिम प्रेरणा ?

माझ्यात कोण जो प्रेरणेत उतरत चाललाय 


प्रेम म्हणजे हृदयात आरक्षण मागणे 

माझ्यात कोण अस्पृश्य ना ना करत चाललाय 


कोणत्या विशेषतेला स्वतःची ओळख बनवावे 

कोण ओळखीचा अट्टाहास धरत चाललाय


पुरुषाच्या पीडेचा विडा दिसत नाही 

कसा तुला घातलेला पिंकवेढा पसरत चाललाय 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


सूर्य चंद्र तारे यांच्यासारखे मला नकोत दिवे 

मला फक्त तुझ्याकडून प्रेम हवे प्रेम हवे 


प्रेमामध्ये कोणाचा कधी कोणी गुरू नसते 

इथे फक्त काळजाला वाव हवा वावर हवे 


मी माझ्यातील सैनिकाला शेतीत सेटल केले 

हिमालयापेक्षा अधिक उंचीचे मला भेटले गारवे 


पोहताना पार केली एकट्याने इंग्लिश खाडी 

शेतीपर्यंत नाही मला नेता आले पण कालवे 


जमिनीवर सशक्तपणे तिच्यामुळे उभा राहिलो 

अंधारातसुद्धा येत राहिली ती घेऊन काजवे 


इतक्यांदा देवळात गेलो अजूनही कळले नाही 

मी देवाला चालवतो की देव मला चालवे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


गोंधळाचे तयार करून जाळे बाहेर पडलो 

स्वतःचेच करून तोंड काळे बाहेर पडलो


किती नटवला होता तिने शानदार तिचा वसंत 

आणून ठेवत शिशिर उन्हाळे बाहेर पडलो


एकेकाळी थाटला होता राजवाडा मी सुद्धा 

आता देऊन भाड्याने सारे गाळे बाहेर पडलो 


मनापासून होते प्रेम कधीकाळी तिच्यावरती 

सुचू लागले मला नको ते चाळे बाहेर पडलो 


आठवत होती कधीमधी कलमडते मध्येमध्ये 

स्वतःच्या हृदयास लावून टाळे बाहेर पडलो


का बाहेर पडलो नाही माझ्याजवळ नेमके कारण 

प्रत्येक वेळी कारण देत गबाळे बाहेर पडलो 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मेरा बरबाद होना तय हैं 

मेरेही अंदर वो सतह हैं 


अब वोभी उनमें शामिल 

जो कातील जन्टलमन हैं 


भाषाने छोड दिया उन्हे 

क्या ये भाषाका रिव्हेंज है?


इगो तो हैं सबके पास 

कोई बोलता कोई चूप हैं 


इश्कमे जमीर जिंदा कैसे 

अभीभी दिल मौजूद हैं ?


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


कदाचित हे शक्य असेल की जो आहे मी इनफ नाही 

आणि लोक तर म्हणतच आहेत मी पुरेसा पुरुष नाही 


तू पकडला हात दुसरा ओळखीचे काही राहिले नाही 

अश्रू तसे खूप वाहिले 

पण डोळे काही वाहिले नाही 


मीच ओळख करून दिली आणि राहिलो सावध नाही 

आणि लोक तर म्हणतच आहेत मी पुरेसा पुरुष नाही 


चुक कोणाची होती आता त्याने काय फरक पडतो 

वाहतो वारा की नाही श्वास पडतो की श्वास झडतो 


पिसारा काढून निघून गेलीस फुफ्फुसामध्ये थयथय नाही 

आणि लोक म्हणतच आहेत मी पुरेसा पुरुष नाही 


ऐकायला तर सारेच हवे टॉन्ट असोत की खोल चेष्टा 

हीही तशी साधना आहे बनू न द्यायचे स्वतःस द्वेष्टा 


स्त्री सांभाळता येत नाही आणि राग राग करत नाही 

आणि लोक तर म्हणतच आहेत मी पुरेसा पुरुष नाही 


अंगावरती घ्यायचा आहे मागासलेला हा समाज 

ज्याच्याजवळ परंपरा आहे आणि तिचा भक्कम माज 


बदलायची आहे डेफिनेशन ती सहज बदलत नाही 

आणि लोक तर म्हणतच आहेत मी पुरेसा पुरुष नाही 


पुरुषी वादळे स्त्रियांची वादळे वादळावादळात फरक आहे 

दिसायला दिसतो सारखा वारा 

पण वाहण्यामध्ये फरक आहे 


हाही फरक पेलत न्हेईन जरी समाज सोबत नाही 

माझे पुरुषत्व मी ओळखून आहे 

जुनाट समाज मी ओळखत नाही 

म्हणायचे त्यांना म्हणू दे मी पुरेसा पुरुष नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीजमधील चॅनेल ज्ञ: लव, लव इन आणि लव आउट या काव्य फायलीतून)

जरी इथे आलो तरी माझा मुक्काम गावी आहे 

कोण अशा सिटीत राहील जिची राजधानी धारावी आहे 


मला करता येत नाही माझ्या नात्यांची देखभाल 

माझ्यात एक खुनी आहे आणि तो निनावी आहे 


कोण तिच्या नादी लागणार ती आहे जंगल अफाट

प्रॉब्लेम फक्त एकच आहे ती पत्नी भावी आहे 


हे खरे आहे की तिचे सौंदर्य मला थ्रिल देते 

मी उगाच बडबडत राहतो माझ्यापेक्षा डावी आहे 


आपल्यातला टायगर तर तिळवे भांडारात मरून गेला 

कुठल्या तोंडाने म्हणू की ती माझी छावी आहे 


तिने माझ्या त्वचेवर लावली कित्येक कुलपे 

तिला माहित नव्हतं की मी स्वतःच चावी आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मै ख्वाब में भी उसे चांद कहता नही 

वो चांद जैसी जमीन का तुकडा नही 


फुल भी खिलते रहेंगे पत्थर भी रहेंगे 

बस पत्थर जैसे दिल को मिलता नही 


उसका जिक्र करता हुं बहुत इज्जतसे 

भले उसके पास कोई वफा नही 


मैने उसे हमेशा कई बार कहा है 

तू आजाद बदन है मेरा साया नही


जानता हुं उसकी निगाहोमे मैं कुछ भी नही 

मेरे दिलमें वो है उसका दिल मेरा नही 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


नेमकं काय चुकतंय 

जे सत्य सतत हरतंय 


गंगेच्या काठावर मी 

पाणी मला टाळतंय


तशी ती देखणी नाही 

काय मोहात पाडतंय


संवाद तर खुला आहे 

मन का अडखळतंय 


हातास लागते उचलतो 

पण क्षणात गायबतंय


गर्भातसुद्धा शांत होतो 

बाहेर काय खळबळतंय 


मी आता क्वांटम झालोय

प्रेम ही वेगळं दिसतंय 


सण आहे साजरा कर 

नेहमीचच बाकी घडतंय


फुल गळलेलेच नाही 

स्व- गंधात वितळतंय


फिदा होत चाललोय 

तिचं कुतूहल उमलतंय


सात जन्मांची श्रीमंती 

काय काय तिला सजवतंय


गुलाब ओसंडून दारात 

कोण अंगणी झाड लावतंय


मी आत दाटलेलो नाही 

माझं नशीब फाटतंय 


तिला मी लिलया पेलेन 

हातात काय कापतंय


ही आत्मग्लानी नाही 

प्रेम मनाला सारवतंय


काय वाऱ्यात अपेक्षित 

कोण पोझिशन हलवतंय


सृजनशीलता मूर्ख आहे 

शहाणपण का गडबडतंय


आयुष्य गंडवतय जातंय

आठवणीत प्रेत थांबतंय


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


जग इतक्या बाजूने वाईट होत चाललंय 

तरीही दिसायला देखणी साईट होत चाललंय 


तिचे दुर्लक्ष पचवणे म्हणजे लाख अपमान पचवणे 

तिला दुकानासमोर पाहणेसुद्धा फाईट होत चाललंय 


तिच्या ड्रीम हाऊसची मी जेन्यूयन प्रॉपर्टी नाही 

काळीज तिच्या घरावर पडलेला ट्वीलाईट होत चाललंय


मला तर तिच्या पोटात जाऊन बनायचे होते भाग 

अस्तित्व घशात अडकलेला बाईट होत चाललंय 


माझ्या या रिलेशनचा बॅलन्स मी कसा साधू 

मी हेवी होत चाललोय जग लाईट होत चाललंय 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

गुलाबाशिवाय असलेले काटे वाट्यास आले 

वाटा मिळाल्या नाहीत फाटे वाट्यास आले


जो जो जवळ होता तो परका होत गेला 

संवाद तुटत गेले सन्नाटे वाट्यास आले 


मित्रांसाठी नेहमी आयुष्य गहाण ठेवले 

मित्र सावकार झाले ताठे वाट्यास आले 


भिंतींनी बनले घर जमीन खाली राहिली

खिडक्या हवेत गेल्या ढगसाठे वाट्यास आले


एक तर आहे देखावा किंवा दिखावा आहे

दोन्ही जमले त्याच्या वाटे वाट्यास आले


आग आयुष्याची शेवटपर्यंत कळली नाही

दिसले नाही वारे फुफाटे वाट्यास आले


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मलाच माहीत नसलेले अनपेक्षित अर्थ 

माझ्याच भाषेतून निर्माण होणारे 


माझ्या भाषेमार्फत 

मलाच विचलित करण्याचा हा डाव 


तुम्हाला वाटतंय 

कांद्याप्रमाणे सोलून 

तुम्ही माझा मर्डर करताय 


तुम्हाला माहीतच नाही 

संपूर्ण कांदा सोलल्यावर जे शून्य उरते 

ते मी आहे  


श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सीरीजमधील 

डेकॅथलॉन एलसेट्रा ह्या फाईलमधून )


भाषेत आलो की "मी" दुसरा होतो 

जो भाषेत नसतो तो खरा होतो 


मग मी बोलत राहतो कितीतरी काळ 

मी स्वतःच मग भाषेचा नखरा होतो 


या वाक्यावर माझी खरोखर मालकी आहे 

का या वाक्यातील प्रत्येक शब्द परका होतो 


जे सीन मध्ये आहे ते सेन्समध्ये नाही 

मग घटनेचा कसा ह्या देखावा होतो 


ती जेव्हा बोलत असते माझ्याविषयी 

कितीही प्रेम असले तरी मी दुसरा होतो 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन: वर्ड्स या काव्यफायलीतून)

तू फक्त बेड विकत घेऊ शकतोस पण झोप देवावर सोड 

बापाने दिलेला जन्म मिरव आणि मरण देवावर सोड 


पैसे देऊन पोझिशन कमावशील एमपीएससी पास होशील 

पण कामाचे काय ? भले कर आदर देवावर सोड 


आयुष्य म्हणजे तुझ्या वाट्यास आलेली लिमिटेड वेळ 

पैशाने फक्त घड्याळ मिळेल तू काळ देवावर सोड


डोनेशन देऊन तुला कदाचित ऍडमिशन मिळेलही 

ज्ञानाचे काय कसे म्हणू की तू ज्ञान देवावर सोड 


मनोरंजन करण्यासाठी नाक्यावर येतोस तेही ठीक 

पैशाने येतात ते पैशाने जातात निष्ठावान मित्र देवावर सोड 


व्यायाम करून आरोग्य कमव पैशाने मिळव औषधे 

बाकी तरीही रोग येतील ते रोग देवावर सोड 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरी कल :भक्ती या काव्यफायलीतून)


आपण झाडांच्या शिवाय जगू शकतो 

असा एक आर्टिफिशल कॉन्फिडन्स सर्वत्र 


कापायला लावणारा माजलेला 

कापणारा समाजलेला 

कुणाकडे समज आहे ?


शहाणपण मशीनवर टांगून ठेवले सर्वांनी 

वाटाघाटी करायला ही जागा शिल्लक ठेवलेली नाही मतिमंद लोकांनी 


प्रॉब्लेम इतकाच आहे 

जेव्हा आरण्य नाहीशी होतील 

तेव्हा हे लोक जिवंत नसतील 

आणि यांच्या पुढच्या पिढ्या 

परदेशात कदाचित वड लावत बसतील 


आता इतका पॅराडॉक्स असलेला हा देश 


जीव पणाला लावून झाड कोण सांभाळतो ?

जो तो आता फक्त पैशावर भाळतो 


सत्ता हातात असलेल्या लोकांचा हात हिरवागार नाही 

त्यामुळे झाडांनाही सत्तेचा आधार नाही 


त्यांच्या हातात एकच आहे 

कापले जाताना 

स्वतःला अधिकाधिक आवरून घेणे 

जणु सती 

आणि आणखी एका परकीय आक्रमकाची वाट पाहणे 

जो पर्यावरण प्रेमी असेल 

आणि झाडांना सती करणाऱ्या लोकांच्या मध्ये

सती प्रथा थांबवेल 


प्रजेला विधवा समजणाऱ्या लोकांच्या राज्यात 

याहून उंच अपेक्षा काय ?


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष या सिरीजमधील मोक्ष : आफ्टर इफेक्ट्स या काव्यफायलीतून)

दुसरीही भेटेल पण तू नाहीस ना 

पुन्हा ट्यूब पेटेल पण तू नाहीस ना 


वारा कदाचित गंधित होईल पुन्हा 

अंगालाही झटेल पण तू नाहीस ना 


एकांतातले अश्रू घेतील स्टॉप 

चेहराही हसेल पण तू नाहीस ना 


प्रेम करताना कुठले कारण नव्हते 

कारणही सापडेल पण तू नाहीस ना 


हसते खेळते होईल पुन्हा हे घर 

दरवाजाही उघडेल पण तू नाहीस ना 


जे झाले ते मुळात झालेच नव्हते 

हृदय स्वतःस पटवेल पण तू नाहीस ना 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तुम्ही त्याच्या हातात मूल्यवान हिरा ठेवला 

त्याने दगड समजून काही रुपयांत विकला


आता शोक कशाला हिऱ्याची झाली माती 

तो पुन्हा वळत बसलाय परंपरेच्या जुन्या वाती 


घेतलेले पैसे संपले त्याचे सारे दारूत 

आजकाल पडून असतो गरिबीच्या तारूत 


तुम्हाला वाटते प्रश्न आहेत त्याला दिसते तात्कालीक सोय 

तुम्हाला आंब्याचे झाड दिसते त्याला विकता येईल अशी कोय 


पाठ त्याच्याकडे करणार का किती काळ करणार शहाणपणाचा प्रयत्न 

तुमचे केस पांढरे होतील आणि तो होत जाईल काळया केसात भग्न 


ज्यांच्याजवळ आत्माच नाही ज्यांनी तो कमावलाच नाही 

ते कायम राहतात अडाणी 

मागू नकोस त्यांच्याकडे सही 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

घाबरशील मृत्यूला तर मृत्यू अधिकच भयंकर होईल 

पण त्याचे घेशील चुंबन तर तो शुभंकर शंकर होईल 


एकच घटना भेटत असते भवताली असतात चार जण 

कुणासाठी ती श्वेतांबर होईल कुणासाठी दिगंबर होईल 


का करू लग्न लग्नात भावना शीळ्या करून मिळतात 

आत्ता ताजी तोफ लग्नानंतर जुनाट बंकर होईल 


तो आयुष्यात असा हिंडला जसा निरक्षर वाचनालयात 

मनात त्याला आशा होती त्याचा अंगठा साक्षर होईल 


कोणी ज्ञानामुळे सुखी कोणी अज्ञानामुळे सुखी 

माझे ज्ञान संशयास्पद त्याचा परिणाम भयंकर होईल 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल : ज्ञान या काव्यफायलीतून)

तू अशी बेड पाशी कोणता शहाणा सभ्य राहील

तूच सांग तुझ्यासाठी कोणता बहाणा सभ्य राहील


जिथे साऱ्या संस्कृतीचे कपडे जातात काढले 

सांग कसा त्या फिनोमिनाचा ताणाबाणा सभ्य राहील


प्रेम आहे की सेक्स आहे केल्याशिवाय कसे कळेल 

एक तर दाणा कुटला जाईल किंवा घाणा सभ्य राहील 


तू माझे कपडे उतरव मी तुझे कपडे उतरवतो 

एकतर राणी नग्न होईल किंवा राणा सभ्य राहील


झेपत नाही वांदा नाही भयाने प्रेमाचा कांदा होतो 

यापुढे त्वचा बाहेर ठेवून माझा बाणा सभ्य राहील


श्रीधर तिळवे नाईक 


(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तू आलीस कि माझे हृदय खोल दुखावेल नको येऊ 

मलाच माझे अस्तित्व वाटेल एकांत जेल नको येऊ 


वेगळे होते व्हायचे ठरले आता त्यावर चर्चा नको 

चुकून प्रेम देवता पावेल संयम सुटेल नको येऊ 


मैत्रिणींना दाखवण्यास सांत्वन कशास खोटे खोटे 

कधी ना कधी त्यांना सत्य नको ते गावेल नको येऊ 


मी हिंदु आणि तू मुसलमान इतके कारण पुरेसे आहे 

तेच लोकांना देत रहा पटेल समजावेल नको येऊ 


शंभर मेणबत्या रोज असतो विकत मी दुकानात ,

ना शमा ना परवाना आपण ना वृक्ष वेल नको येऊ 


सुरुवातीपासून दोघे होतो स्वतंत्र आणि पारदर्शक 

लपून छपून प्रेम म्हणजे सुसाईड वेल नको येऊ


अचानक काय झाले तुला हात लावू देत नव्हतीस आलीस आत की काढतेस माझा टॉवेल नको येऊ 


उद्या तुझा निकाह आहे त्याचे जरा पावित्र्य राख 

झाले ते विसर तेच कर जे तुला झेपेल नको येऊ 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


वातावरण बदलत गेले त्याची खूप हवा झाली 

मग कोणी कापला वारा रात्री हवा काजवा झाली 


जी आवडती असते तीच हाताळणे अशक्य बनते 

कबूतर बनून आली माझी धर्मशाळा करून पारवा झाली 


कळलेही नाही कधी खाजगी आयुष्य नाहीसे झाले 

प्रत्येक क्षणाची बातमी झाली किंवा मग अफवा झाली 


 प्रस्थापित करण्यात हयात गेली स्वतःवरचा मालकी हक्क

सुरुवातीला अनोळखी होतो 

मग ओळख दिवा झाली 


हा आयुष्याचा वड आहे पारंब्या किती मोजता येत नाही

सुरुवातीला शून्य होते बघता बघता कारवा झाली


मी मागोवा घेत होतो तिला वाटले मी पाठलाग करतोय 

गैरसमज वाढत गेला आणि सत्याची अफवा झाली 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


कधी गोड कधी तिखट कायम चविष्ट तुझा बुरखा 

अजूनही कळत नाही इष्ट की अनिष्ट तुझा बुरखा 


माहित आहे मला त्याचे अस्तित्व आहे दंतकथा

पण असा सांगितला जातो वाटते गप्पिष्ट तुझा बुरखा


अज्ञानात सुख असते तुला पाहून मला हे पटते 

कल्पनेनेच गर्भार राहतो तुझ्यात नादिष्ट तुझा बुरखा 


अजूनही नवा ईश्वर का तुला सापडू नये 

का जुन्या ईश्वराचा आहे छंदिष्ट तुझा बुरखा 


काळजात क्रांती नाही शरीर नुसते उत्क्रांत होते 

उत्क्रांतीच का करत राहतो डिझाइनझिष्ट तुझा बुरखा ?


तो काळीज झाकत नाही मेंदू असलेले डोके झाकतो 

नेमके काय सुचवत असतो हा क्लिष्ट तुझा बुरखा ?


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

ज्ञान सुख देत नाही 


ज्ञान सुख देते ही ज्ञानाविषयीची रोमँटिक कल्पना आहे


फक्त जाणल्याने आध्यात्मिक आनंद होऊ शकतो 

मात्र मोक्ष मिळेलच असे नाही 


हे जाळे विणलेले आहे 

आणि हे जाळेच कोळी आहे 


या जाळ्यालाच ईश्वर समजू शकतोस

पण हे जाळे नवसाला पावत नाही एवढे लक्षात ठेव 


हृदय म्हणजे अवयव नाही 

ते अवयवांच्या बाहेर असलेले कनेक्शन आहे 

मात्र ते संपूर्ण जाळ्याशी जोडता येते ही त्याची खासियत आहे 


तेव्हा मी हृदय म्हणतो 

तेव्हा संपूर्ण जाळ्याकडे जाणारी वाट 

एवढाच त्याचा अर्थ असतो 


मेंदू सर्वायवल आहे 

आणि तो टिकण्याच्या आणि वाढवण्याच्या हिशेबातच 

उत्क्रांत होत असतो 


आत्मा नाही 

पण प्राण आहे 

मेंदू आहे 

आणि ज्ञान आहे 


दंतकथा नव्या असल्या म्हणजे सत्य होतात असे नाही 

त्यांच्या साह्याने फक्त नवे फेक जग तयार होऊ शकते 


विचार सर्व काही सुसह्य करण्याच्या मागे असतो 

त्याच्या पाठलागाच्या मुळाशी अनेकदा आळस असतो


वास्तवाचा त्याग करता येत नाही 

त्यामुळे अतिवास्तव रचलास म्हणजे सुटलास 

हा भ्रम काढून टाक 


वास्तवाच्या पलीकडे सत्य आहे 

आणि ज्ञान वास्तवाचे होते 


सत्य ज्ञान नाही  

सत्य शून्य आहे 

जिथे ज्ञानाचाही अंत आहे 

मात्र नॉलेज इज डेड अशी घोषणा देऊ नकोस 

वास्तवात फक्त ज्ञानच जिवंत ठेवते 

ते नसेल तर तू मृत्यू पावशील आणि मोक्ष मिळवण्याची शेवटची शक्यता संपेल


त्यामुळे ज्ञानाचा द्वेष नको 

पण ज्ञानाच्या मर्यादा लक्षात घे 


भोवतालच्या दंतकथानी उभ्या केलेल्या परिसराला नीट बघ 


शिवशक्ती युग्म आहे 

पण ते अनेक पॅराडॉक्स निर्माण करतं 


त्यांच्या पलीकडे जाणे हाच या पॅराडॉक्सेसवर मात करण्याचा उपाय आहे 


तेव्हा दोन डोळे नीट कर 

आणि आत वळ 


त्यामुळेच तिसरा डोळा उघडेल 

आणि सर्वनाशाची सुरुवात होईल 


हा प्रलय म्हणजेच मोक्ष स्फोट 


त्यानंतर तू सदैव जिवंत राहशील 

संपूर्ण 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सीरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल : ज्ञान या काव्यफायलीतून)


तुला जरी वाटते आहे आत्ता की धर्म तुझे बळ आहेत

कधीतरी तुला कळेलच की समाजाने टाकलेले गळ आहेत 


तू तुझ्या सदगुणांना दागिन्यासारखे कितीही मिरव

तुझ्याजवळ पैसा नाही 

तोवर सदगुण उथळ आहेत 


उपयुक्त आहे ईश्वर म्हणून लोक ईश्वर कन्स्ट्रक्ट करतात 

ईश्वराविरुद्धही जरी जाणतात खूप पुरावे सबळ आहेत 


ट्रेन ही अशी झुंडीने प्रवास जिच्यामध्ये करता येतो 

बाईकवर फक्त दोन बसतात म्हणून त्या निर्बळ आहेत


त्या पिढ्या निघून गेल्या त्या नद्या वाहून बुडाल्या 

आता काय उरले म्हणू ज्यांच्याविषयी "निर्मळ आहेत"


धर्म सुद्धा हळूहळू सादरीकरण होत चाललाय 

जे लोक हुंगताहेत त्यांना हवे उथळ दरवळ आहेत 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

संपूर्ण उमलायचे होते थोडे अपुरे राहिले 

आयुष्यभर चालायचे होते थोडे अपुरे राहिले 


खूप पिले एकमेकांसोबत चहा दुःख ओठ 

देह प्यायचे होते थोडे अपुरे राहिले


अनेक चेहरे घेऊन ती भेटत होती मला 

तिचे सर्व चेहरे पाहायचे होते थोडे अपुरे राहिले


खूप बारकाईने देह एकमेकाचे न्याहाळले 

आत्मेही न्याहाळायचे होते थोडे अपुरे राहिले


रात्रीपर्यंत सोबत असायची रात्री निघायची 

सारी रात्र जागायचे होते थोडे अपुरे राहिले


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मी स्वतःलाच मिठी मारली 

मी स्वतःच्याच खांद्यावर डोके ठेवून रडलो 


एकांत कधी साडी नेसला 

कधी बिकनी घालून पोहला 


दुःखांचे चेंडू समुद्रात कोसळले 

तेव्हा म्हणालो बना नावां 

आणि परता व्यवस्थित माझ्या हृदयात 


समोरचा सुरा घेऊन आला 

तेव्हा त्याच्याकडे पाठ केली 


नीतीने ठरवलेले निर्णय 

आणि निर्णयाने ठरवलेली नियती

यांच्यात फाटा फूट झाली 

तेव्हा झोपेची क्वांटिटी वाढवली 


ताणांचे अरण्य उभे केले 

आणि बघता बघता ते प्राणी झाले 


ऑर्डर आल्या त्या स्वीकारल्या 

केओस आले तेही स्वीकारले 

होम डिलिव्हरी म्हणून नेहमी 

हॅप्पीनेस डिलिव्हर केला 


प्रेमाला जिद्द बनू दिले नाही 

पाण्यासारखे आले तेव्हा गाणे केले 


लोकांनी गद्दारीच्या व्याख्या बदलल्या 

मी त्याबाबत सनातनच राहिलो 


मोक्षाने दोन पावलं मागं नेलं 

तर मी जिद्दीने शंभर पावले पुढे टाकली 


लोक प्रार्थना आणि दारू यांच्यात 

दारू निवडत असताना  

मी प्रार्थना निवडली


आता तुझ्यासमोर उभा आहे 

काहीही न मागण्यासाठी 

माझी ही ताकद 

काहीही न मागण्याची 

तेवत ठेव


श्रीधर तिळवे नाईक 


(डेकॅथलोन सिरीजमधील डेकॅथलोन :अनकॅटेगरीकल : तंत्र या काव्यफायलीतून)

खडा नही हुं बाजारमें मै, मै बाजार का हिस्सा हुं 

मेरी दुकान अलग है और मै कबीर का दोहा हुं 


कई बार मिलता हु तुम्हे हर बार नयी लगती हो 

मिलके नया हो जाता हूँ जैसे तुम्हारा बोसा हुं 


कभी उतार नही सकती तुम वो भी है ठीक अगर 

एक बार तो कहो मुझे तुम मै तुम्हारा बुरखा हुं 


ना चांदी का रंग तेरा ना सोने की गुडिया जैसी 

तू जैसी हे मस्त लगे और मै तेरा दीवाना हुं 


पता भी नही चल रहा है किस बात पर रुठी हो 

देख रही हो मुझको ऐसे जैसे मैं गलत फैसला हुं 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

धोका रेषा श्रीधर तिळवे नाईक 


तिथे काही अनोळखी मला मारणारे 

काय आहे कळत नाही पण सतावणारे 


पाकिस्तान समजून मी लढतो आहे त्याच्याशी

माझ्यामागे शत्रू म्हणून त्यास लाखो दाखवणारे 


त्याचा माझा डीएनए सुद्धा बहुदा एक आहे 

तरीही त्याच्यात काहीतरी आहे मला घाबरवणारे 


एक माणूस मारल्याने दहा जिवंत होत नाहीत 

कायमचे नाहीसे होतात प्रेतामधून मरणारे 


तो तिचा अध:पात होता पण तिला कळला नाही 

अतिशय नाजूक बांधकाम होते कोसळणारे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


स्वतःशी खोटे बोलशील तर ते सर्वात मोठे खोटे होईल 

बघता बघता नाहीसा होशील 

खोटे तुझ्यापेक्षा मोठे होईल 


तो दुसऱ्यांच्या मतालाच स्वतःचा विचार समजत आहे 

त्याला मुळातच कळत नाही हे असे जगणे खोटे होईल 


तो लाईफ लाईन होता 

शेवटी फक्त लाईन उरला 

आता त्याचे लाईफ म्हणजे केवळ बिंदूंचे साठे होईल 


मरणेसुद्धा तिच्या राज्यात 

दखलपात्र गुन्हा झाला 

शिक्षा म्हणून प्रत्येक गुलाब

म्हणे आता काटे होईल 


आकाशाची शेती करत तो काळया विवरात पोहचला 

पृथ्वीवर टेकचे वर्णन उरेल 

शेवटी तेही सन्नाटे होईल 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


दरवाजे आले कुलूप आले 

आणि आता कॅमेरे आले 

बघता बघता चेहरे जाऊन त्यांच्या जागी बुरखे आले 


चकवणारे चकवत राहतात 

नव्या नव्या ट्रीक शोधतात 

तरी तुझे नशीब चांगले की 

जन्मणारे इथे नागवे आले 


ओळख हीच फसवून जाते 

तीच convince केली जाते 

कळतही नाही आलेले लोक 

चेहरे आहेत की मुखवटे आले 


आक्रमकपणा हाच सध्या 

सत्यापेक्षा पावरफुल झालाय 

मूठ आपटली की सत्य वाटते 

उघडली की वाटते खोटे आले


सगळीकडेच अभिनय दाटला 

सगळीकडेच तोच भेटणार 

अभिनेत्यांच्या भाऊ गर्दीत 

काय खोटे काय खरे आले


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीजमधील चॅनेल स्पिरीच्युअल या काव्यफायलीतून

)

चढवण श्रीधर तिळवे नाईक 


मी त्याला चढव चढव चढवलं हरभऱ्याच्या झाडावर 

आणि तो म्हणाला मी वड आहे 


मी विचारले तुला वर्ड असे म्हणायचे आहे का 

की वर्ल्ड 


तर त्याने हरभऱ्याला फुटलेल्या पारंब्या दाखवल्या 


मग मी त्याला आणखीनच चढवले 

थेट वडाच्या झाडावर अस्तित्वात नसलेल्या 


त्याने मग चढवलेला ट्रॅप 

मला कॅप म्हणून घातला 

तर माझ्याभोवती असंख्य माकडे 


मी विचारले तुम्हाला तुमचा डार्विन सापडला की नाही 

तर माकडे म्हणतात 

आम्हाला आमचा बाप पुरेसा 


मग मी माकडांना झाडावरून वडावर चढवले 

आणि तो म्हणाला बघ किती हनुमान माझे भक्त आहेत 


मी म्हणालो अरे बाबा ही माकडे आहेत 

हनुमानाचा अपमान नको करूस 


डार्विन ला हनुमाना विषयी फारशी माहिती नसल्याने 

त्याला उत्क्रांती सुचली 

असे म्हणे तोवर 


तो स्वतः चढला चढवलेल्या झाडावरून 

थेट चंद्रावर 

आणि म्हणाला 

आता माझी प्रेयसी माझीच होईल 


मी मग त्याला सूर्यावर चढववण्याचा खूप प्रयत्न केला 

पण काय करणार 

त्याच्या राशीला मंगळ लागला होता 

आणि त्या मंगळावर त्याला पाणी दिसले 


आता तो मंगळावरून येतो 

आणि त्याची बायको शुक्रावरून 


नुकताच त्याने सिद्धांत मांडलाय 

त्याची मुले कशी माकडांच्यापासून उत्क्रांत झाली आहेत 

आणि ही क्रांती कशी हरभऱ्यांच्यामुळे झालेली आहे 


आता तो वर ढगात 

हरभरे खात 


आणि रेडिओवर गाणे लागलेले 

मेघा छाया आधी रात 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

चुंबन घ्यायचे म्हणून पुढे सरकलो 

तर ती म्हणाली 

ही गळादाबण आहे 


मी चटपटून माझ्यातला साप बाहेर काढून घेतला 

आणि पॅन्टित म्यान केला 


अंडर पॅंटीचा हंगामा सुरु होण्याआधीच 

कयामत कोसळली 

आणि आवडल्या गेलेल्या नाड्या 

पर्सनल झाल्या 


तिच्या घरून निघालो तेव्हा 

माझ्या अंगावर होता एक पडदा 


तो तिने टाकला की मी 

हे मला आजतागायत कळालेले नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


कळपणे श्रीधर तिळवे नाईक 


मला कळपण्याची इच्छा झाली तर काय करशील ?


कळप होशील 

लग्नानंतर कोल्हापूरभर बुरखा घालून हिंडशील ?


काय आहे 


कळपायला फार अक्कल लागत नाही 

स्वतंत्र व्यक्ती बनायला धैर्य लागते 


तेव्हा बघ 

माझ्या पावलात पाऊल ठेव असे म्हणणार नाही 


पण कळपातून तुझे पाऊल काढून घे 


चालायला मिळणे 

आणि चालण्याचे स्वातंत्र्य असणे 

यात फरक आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मी घरातच घराने भरून गेलो आहे 

घरातच जग आवरून गेलो आहे


आई आहे बाप आहे भाऊ आहे बहीण आहे 

इतकेच खूप झाले भरभरून गेलो आहे 


दोन राख्या तळपतात आणखी काय हवे 

दोन दिव्यात प्रेम तरतरुन गेलो आहे


अस्वस्थतेचा क्षण टिपला गेला 

आणि त्याने मी बावरून गेलो आहे 


मला देखील चान्स मिळायला हवा 

त्यासाठी जगात टवकरून गेलो आहे 


झोपण्यापूर्वी स्वतंत्र कुंभकर्ण होता 

उठल्यावर रावणदास भरून गेला आहे 


तिला पाहताच मला कसा घाम सुटला 

माझ्यात कोणता राजा थरथरून गेला आहे 


घर कोंबडा आहे घर कोंबडीच्या शोधात 

स्थळ आणणारा अंडाकरी करून गेला आहे 


मी थोडे अटेंशन स्विच ऑफ काय केले 

विजांचा कडकडाट अंगावरून गेला आहे 


बघता बघता मी पृथ्वीच्या वयाचा झालो 

कोण मला शाकारून आवरून गेला आहे 


एक धग आहे जिचा चव्हाटा झाला 

एक ढग चौकशी करून गेला आहे 


तो असा एकदाच शांत दिसणार होता 

समजून घ्या राजा मरून गेला आहे 


श्रीधर(राजा )तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


प्रेमाच्या झाडाला मूर्खपणाची फळे येतात 

वाटते की आंबे येतील पण शेवटी आवळे येतात 


होमसिकनेस समजतो असतो केवळ हार्टसिकणेस

आपले सारे विकनेसेस दाबायला आपले गळे येतात 


साऱ्या गोष्टी कशा पाईपलाईनमध्ये जात आहेत 

ऑफिसमध्ये बॉस म्हणून बसायला का टवळे येतात


वजन ठेवून दमून गेलो फायली काही हालत नाहीत 

हंस म्हणून सॅल्यूट करावा तर त्यांच्या शरीरातून बगळे येतात


त्या नदीच्या काठी मला एकच सत्य कळाले आहे 

आत्मे काही येत नाहीत शेवटी कावळे येतात 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


छान उबदार ढग पसरलाय फिलिंग गुड 

एक नवा मान्सून आलाय फिलिंग गुड 


स्वप्नसुद्धा गुलाबी धागे विणत डोळ्यात येतंय 

शुभ्र मधुर गोडवा चादर बनलाय फिलिंग गुड 


एक सुवर्णमध सुवर्णमध्य वाजवत आहे 

कानात अख्खा वड किलबिल्ललाय फिलिंग गुड 


न मागताच सारे मिळाले हात न पसरता 

अख्खा दसरा सोने बनलाय फिलिंग गुड 


तिच्या स्तनांचे सनातन दूध मी स्तनधारी 

चुंबनात माझ्या वसंत झिंगलाय फिलिंग गुड 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


असाच गुंडाळला जात नाही बस्ता कुणाचा 

लोक चुकीचे असतात किंवा रस्ता चुकीचा 


तुझी आई बाप हेच तुझे कुलदैवत आहे 

त्यांनाच अर्पण कर तुझी काया मन आणि वाचा 


बाप असल्याच्या थाटात त्याने आकाश काबीज केले 

वर जाऊन कळाले तो आहे एक क्षुद्र साचा 


एक आरसाच आहे जो टक लावून पाहतो मला 

नाहीतर ती म्हणतेच घेते खपवून चेहरा साधारणसा 


चांदणे कोण पाहत राहील जर प्रेम घरात आहे 

आपण कंफर्टेबल आहोत चालताना घराचा रस्ता 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

सगळ्या गोष्टींचे विरोधात जाऊन मी तिच्या प्रेमात पडलो 

आडात तर मी आधीच होतो जाऊन एका ढगात पडलो 


मजा तुडुंब तर येतच होती तिचे शरीर वेटाळताना 

बागेमध्ये ती इव्ह झाली मी पण जाऊन सापात पडलो 


भेटीमध्ये आल्हाद होता त्वचेवरती फुलांची दरवळ 

मला वसंत सापडले होते मी त्यांच्या दारात पडलो 


कशा कशाला टक्करलो तेही आता आठवत नाही 

तिच्यासोबत सर्व मुलायम रिक्त कृष्णविवरात पडलो 


तिने तिचे अनेक प्रकाश माझ्या काळजात दफन केले 

ती चंद्र मोजत राहिली मी तिच्या बोटात पडलो 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


पुस्तके श्रीधर तिळवे नाईक 


पुस्तक ठेवायला लागणारी जागा 

महाग होत चाललीये 


मला कळत नाही 

त्यांचे करायचे काय ?


प्रत्येक वेळी शिफ्टिंग करताना 

माझ्यासाठी एक रूम 

आणि त्यांच्यासाठी दोन रूम्स बघाव्या लागतात


पुस्तके जागा मागतात 

आणि मुंबईत जागा महाग 


पुस्तके त्यांच्या किमतीमुळे महाग होत नाहीयेत 

त्यांना ठेवायला लागणाऱ्या जागेमुळे 

आणि त्या जागेचे द्यावे लागणारे प्रचंड भाडे 

यामुळे महाग होतात 


मी आता पुस्तकांचे विसर्जन करावे का ?


पण मुंबईत पुस्तके घेणारे तरी कुठे आहेत ?


की समुद्रात गणपतीसारखी 

पुस्तके विसर्जित करावीत ?


मला कळत नाही 

पुस्तकांचे काय करायचे ?


पुस्तकांच्यासाठी मग मी 

ओल्ड एज होम निवडावे का ?

की पुस्तके एव्हरग्रीन असल्यामुळे ती म्हातारी नाहीत 

या सबबीखाली घेतली जाणार नाहीत ? 


सेकंड हॅन्ड पुस्तके किती किती आणि कुठे कुठे जागांचे भाडे देत सेकंड हॅन्ड झाली असतील ?


की पुस्तके म्हातारी झाली आहेत?

आणि आई-बाबांना जागा न देणाऱ्या पिढीमध्ये आऊटडेटेड ?


मी हल्ली e पुस्तके जास्त घेतो 

कारण मला पुस्तकांचे भाडे परवडत नाही 


कोणी सांगावे कदाचित माझ्या e पुस्तकांच्यामुळे 

काही झाडेही वाचत असतील 


आता मी झाड वाचते या सबबीखाली 

कागदाची पुस्तके घेणे बंद करावे का?


कागदी वाघाप्रमाणे पुस्तकेही कागदी झाली की काय ?


मला पुस्तकांचा गंध आवडतो 

पण आता अशा कित्येक कन्या भेटतात 

ज्या माझ्या घरात आल्या की नाक वेडेवाकडे करतात 


त्यांना पुस्तकांना येणारा उग्र वास सहन होत नाही 


आता त्यांच्या नाकाची ब्युटी टिकवण्यासाठी मी पुस्तके समुद्रात विसर्जित करावीत काय ? 


बाई महत्त्वाची की पुस्तके ?

बाईचे नाक महत्वाचे की पुस्तकांची बॉडी ?


मला ठरवता येत नाहीये 


एक काळ असा होता 

की पुस्तक पाहिले की माझे हात आपोआप सरसावत 


आता हात थंड पडलेत 

कारण भाड्याच्या जागाची किंमत 

कुल राहिलेली नाही 


मी समुद्राकाठी पुस्तकांच्या रॅक्स घेऊन उभा

आणि समुद्र म्हणतोय 

"तुझ्यासारख्या पुस्तक प्रेमी माणसाने मुंबईतून चालते झाले पाहिजे "


ज्ञानाचा समुद्र प्रत्यक्ष समुद्रापुढे फिका पडलाय 

की डिजिटल झालाय ?


अख्खा समुद्र कम्प्युटराईजड करीन 

अशी मी समुद्राला धमकी द्यावी का ?

पण या धमकीने पुस्तक ठेवणाऱ्या जागा किंमत कमी करणार आहेत का ?


मुंबईतल्या कुठल्याच गोष्टीची किंमत समुद्राच्या अंगाने ठरत नाही 

समुद्र ही एक अशी नैसर्गिक उपस्थिती आहे 

जिच्या विषयी मुंबईकर फक्त रोमँटिक असतात 

आणि त्याच्या काळजाची काळजी न करता 

भरपूर कचरा डम्प करतात 


समुद्राचा सरफेस जोवर प्रचंड कचरा दाखवत नाही तोपर्यंत 

हे अटळ 


समुद्रात पुस्तके विसर्जित केल्यानंतर ती अशीच कचरा म्हणून तरंगत वर राहणार आहेत का ?

कि ती बुडत जातील ?


ती शार्ककडून खाल्ली जातील का ?


समुद्रात पुस्तकांचे काय होईल ? 


समुद्र काहीही बोलत नाहीये 

तो फक्त लाटा उमटवतोय उचलतोय 

जणू त्याचा व्यायाम चाललाय 


पुस्तकांच्यासाठी मुंबईत एकही डम्पिंग ग्राउंड नसावे 

याला काय म्हणावे ?

ती सगळी वाचनालये 

हीच आता डम्पिंग ग्राउंड झाली आहेत ?


मी समुद्राकडे पाठ वळवून 

पुस्तकांच्याकडे चाललोय 


ज्या देशात पुस्तके लिहून पैसे मिळत नाहीत 

त्या देशात पुस्तकांचा मेंटेनन्स अवघडच राहतो 


मला कळत नाही 

मी फुकटात वाटलेल्या माझ्या पुस्तकांचे सुद्धा नेमके काय होणार आहे?


पुस्तके माझ्याबरोबर चालतायत

त्यांची अवगतिकता माझ्यासोबत घेऊन 


मी चाललोय 

आणि पुस्तके रॉयल लॉयल कुत्र्यासारखी 

यमराजाला साथ दिल्यासारखी 

माझ्यासोबत 


मी स्वर्गांच्यावर कधीच विश्वास ठेवला नाही 

त्यापेक्षा मला माझे सर्वांग विश्वसनीय वाटले 


पुस्तक माझ्या सर्वांगाचे भाग आहेत की नाहीत ?

मी भाडे देतो म्हणजे सर्वांगाचेच भाडे देतो की नाही ?


मित्र म्हणताहेत 

"निदान पुस्तकांच्यासाठी तरी संन्यास सोड 

आणि घर विकत घे

भाड्याच्या घरात पुस्तके परवडणारी होत नाहीत "


माझी पुस्तकशैली गांधींच्या जीवनशैलीपेक्षा महागडी होत आहे की काय ?


आता मी स्वतःला पुस्तकमहात्मा म्हणवून घ्यावे का ?


मी चालतो आहे माझ्या नुकत्याच भाड्याने घेतलेल्या घराच्या दिशेने 

आणि घर मालक म्हणतोय 

"साहेब मुंबईत वाळवी खूप आहे 

त्यामुळे पुस्तके तुमच्या रिस्कवर ठेवा 

नष्ट झाली तर मी जबाबदार नाही "


श्रीधर तिळवे नाईक 

(नेटसिरीज मधील नेट: थीम्स या काव्यफायलीतून)


आमच्यासारख्या लोकांचा इथे कुठे काय इतिहास बनतो 

गंध नसलेली फुले आम्ही आमचा कुठे इथे सुवास बनतो 


आम्ही काळाच्या आरशापुढे कसेबसे टिकवतो स्वतः स

सेकंद भर टिकणारे चेहरे आमचे 

आमचा कुठे इथे तास बनतो


आम्ही फक्त देत राहतो दिलासा आमचे दिवस येतील

आमच्यासाठी उगवणारा 

रोजचा सूर्य खग्रास बनतो 


आमच्या जाण्याने कुठेही कधी पोकळी निर्माण होत नाही 

अस्तित्वात नसल्यासारखे उदास जगतो उदास बनतो 


दुसऱ्यांचे कर्तुत्व वाचत वाचत 

आम्ही पावतो विलक्षण स्फुरण 

स्वतःलाही वाचत वाचत शेवटी आम्ही आभास बनतो 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


ज्यांनी हाकलले त्यांच्यासाठी एक कविता श्रीधर तिळवे नाईक 


I am dead for you 

निघून चाललो यु


तुम्हाला हवेत नेते 

आणि मी तर पॉवरलेस 

तुमच्या लेस बांधायलासुद्धा 

माझ्याजवळ वाकणे नाही 


फॉलोविंगचा मस्का कोण लावून घेणार 

हा चस्का लागला 

की माणुस किसी काम का नही रहता 


मनःशांतीच्या ऍलोपॅथिक टॅबलेट शोधल्या जात नाही तोवर 

धर्माचे शॉर्टकट अटळ 

भले मग ते बिहारी माणसासारखे दिसोत


सतत दुसरी बायको म्हणून कोण राहणार 

मला थेट शक्ती व्हायचं आहे 

जी शिवात विलीन होईल 


कॅन्सरच्या तिजोरा घेऊन येणारे लोक जोवर 

पॉलिटिकल जोर कायम तोवर 


आपण एकमेकांवर खटले दाखल करू याची भीती 

कुणी स्पॉन्सर केली ?


लोक टिकणारे काटे मागतात 

कारण फुलांचे वय कमी असते 


तुम्ही काय निवडता ?


तिच्यात प्रकाश करताना प्रवेश झाला 

की प्रवेश करताना प्रकाश झाला 

ते मला आजतागायत कळालेले नाही 


मला इतकेच माहित आहे 

माझ्यात जे ठोस होते 

त्याचे पाणी पाणी झाले 


तुमच्यातले सगळे नॅशनल पार्क आता टीन एज झालेत 

टनावारी झाडे कापली गेली 

आणि दाखवायला फक्त पार्क उरले 


मला त्यांच्यात पार्किंग करण्याची इच्छा नाही 

म्हणून मी याचा निषेध केला 


तर हा असा अनेक अंगानी मी नकोसा 

तुम्हाला वाटते मी ससा व्हावे 

आणि मी असा 

कसाबसा असूनही टायगर 


तुम्ही म्हणालात 

आमचा समाज तुला परवडत नाही म्हणून चालता हो 

मी म्हणालो 

मी तुम्हाला परवडत नाही म्हणून मी चालता होत आहे 


So I am dead for you 

निघून चाललो यु 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल स्पिरिच्युअल या काव्यफायलीतून)


एक सुरा पचवेपर्यंत चालून येतो दुसरा सुरा 

रक्त वाळवण्यास सवड नाही खुपसण्याची इतकी त्वरा 


सगळे कसे घाईघाईने रस्त्यावरून आहेत चालले

प्रत्येकात चमत्कारिक पृथ्वी जिंकल्याचा तोरा 


काहींनी तर दिशासुद्धा डोळ्यात ठेवल्या दुसऱ्यांच्या

चालले आहेत बस त्यांच्या पाठीमागे भराभरा 


गर्दी आहे पण मित्र नाही ना कोणी शेजारी आहे 

झुंड आहे आणि तिच्या दहशतीचा खूनी नखरा 


एकएकट्याला एक एक जण पाहतो एकांतात 

दुसऱ्याला समजून खोटा स्वतःस समजतो खरा


श्रीधर तिळवे नाईक 


(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मै तुझे अक्सर चांद कहता हुं 

जानता हु चांद भी पत्थर से बना है


तेरा मेरा एक दिन रिश्ता टूटेगा जरूर 

निभाने से ज्यादा उसमे जादा दिखावा है 


तू तो वजन में वैसे भी हलकी है 

मैने तो तुझसे ज्यादा भारी वक्त गुजारा है


शिकायत करकरके उन्होंने मार डाला 

मेरा गुनाह ये था कि मेरा जमीर जिंदा है


बाजारके अलावा कौन सा चॉईस है 

या खुद को बेचना या किसीको खरीदना है


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


जर काळजात प्रेम असेल 

तर एक चुंबन पुरेसे ठरते 

कशाला अख्खा संभोग हवा ?

एक आलिंगन पुरेसे ठरते 


मागील पानावरून पुढे 

भविष्य सारे जाते लिहिले 

डोळ्यात प्रेम ओतप्रोत हवे पापणीचे स्पंदन पुरेसे ठरते 


ती कितीही म्हणो की माझी 

रूम Chaos मध्ये आहे 

समजून घ्यायला ढकलाढकली एक आमंत्रण पुरेसे ठरते  


हात हातात घ्यावा की नको बोटस्पर्श हवा की नको 

चर्चा कशाला त्यास हवी 

एक निमंत्रण पुरेसे ठरते 


स्पर्शाच्या अंतरावरतीच स्पर्शभेटही ठरत असते 

भाषा बंबाळ कितीही होवो 

डोळ्यांचे निवेदन पुरेसे ठरते 


आता विश्वासही बसत नाही 

आम्ही पाठ फिरवली होती 

संपूर्ण काळ फिरवाय एका क्षणाचे आवेदन पुरेसे ठरते 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

सगळेजण जेवतात तरी शेतकरी कसा गरीब आहे 

ज्याच्या मालाची डिमांड असते तो तर प्रत्येक श्रीमंत आहे 


कोंबलेल्या गोष्टी शेवटी तुंबलेल्या होत जातात 

ही माझी अचीवमेंट की रिकामी माझी बॅग आहे 


मी नेहमीच कल्पनांना अडखळून खाली पडलो 

ज्याने नेहमी उभे केले ते ढळढळीत वास्तव आहे 


जन्माला येण्याआधीच त्याने फाईव्ह स्टार बुक केले 

ही म्हणे पिढ्यान पिढ्या त्याची खानदानी विरासत आहे 


घोड्यावरून जो आला होता तो कुठे निघून गेला 

आणि त्याचा हा घोडा गाढवांच्यात का वावरत आहे ?


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


एकही ढूंढ रहा था एकभी मिली नहीं 

कुछ पल साथ चली लाईफलॉन्ग चली नही 


मेरी मोहब्बत तो बिलकुल एफर्टलेस थी 

सामने मुश्किल लडकी थी इसीलिए चली नही 


कौन से सवालों का यहाँ हल मिला है 

प्रेशर कुकर बदलते रहे मगर दाल गली नहीं 


हर युद्ध का परपज शांती बताया जाता है 

इतने युद्ध हुए फिर शांति क्यूँ मिली नहीं 


मेरे वर्तमान में भूतकालही जियादा रहा 

किसीकी भी हो लाश वो बुरी या भली नहीं 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

सिगरेट पिली आणि चालायला लागलो 

मी फुफुसात दुनिया जाळायला लागलो 


त्यांनी काही भास मला भाड्याने दिले 

मी लाथेने त्यांना उडवायला लागलो 


सत्यापेक्षा सत्यावरचा पोशाख महत्त्वाचा 

वेळ अशी की पोशाखच विकायला लागलो 


ती म्हणाली आयुष्यात अंधार आहे 

मी सूर्यासारखा उदयाला यायला लागलो


आत्ता कुठे प्रेमाची तिच्या खात्री पटली 

आत्ता कुठे मी दिवाना बनायला लागलो 


मी फक्त हृदयाचे तिच्या गांभीर्य ऐकले 

आपोआपच व्हायोलिन वाजवायला लागलो 


कधी ना कधीतरी मनाई होणारच होती 

कुलूप दिसले म्हणून चावी हुडकायला लागलो 


मी झाडांच्या वतीने माणसांशी बोललो 

माणसांमधली करवत ऐकायला लागलो 


ते म्हणाले हे त्यांचे व्यवस्थापन आहे 

मी शेवटी व्यवस्थाच पुरायला लागलो 


त्यांनी कुठे मला काही ऑप्शन दिले 

मीही शेवटी कंपल्सरी भिरकवायला लागलो 


येणारा प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे 

या विचाराने आज बिघडवायला लागलो 


तिने म्हटले तयार आहे म्हणून तयार झालो 

आता ती येणार नाही म्हणून तयार व्हायला लागलो 


हवेमध्ये कुठे कोण भाग घेतो 

जो तो श्वासापुरता स्वीकारायला लागलो 


शेवटी प्रेमाची पातळी धोकादायक झाली 

मी प्रेमात सफोकेट व्हायला लागलो 


माझी ही जगण्याची शैली चांगली आहे 

तुला का अनोळखी वाटायला लागलो 


संपूर्ण शरीर फंक्शन करते पुरेसे आहे 

कळूनही अधिक का मी मागायला लागलो 


तू आणि दुकान एवढेच आहे माझ्याकडे 

तू विचारलेस मी गरीब वाटायला लागलो 


का तिची मी मुर्खासारखी वाट पाहतोय 

का कापरासारखा जीव जाळायला लागलो 


जिकडे पहावे तिकडे तोच तोच माल 

तेच तेच पाहून मी ही थकायला लागलो 


मी किमतीचे लेबल लावून घेतलेले नाही 

तुला का वाटले स्वतःस विकायला लागलो 


मी तुझ्या चुकीत सामील होणार नाही 

मैत्रीत चूक बरोबर पाहायला लागलो 


मी पूर्वीसारखा वाहवत जाणार नाही 

आतल्या नद्यांनाही आवरायला लागलो 


जे खाजगी असते ते सार्वजनिक होतेच ?

मी कुणाची पब्लिक प्रॉपर्टी व्हायला लागलो 


तीही हळूहळू दूर व्हायला लागली 

मीही माझे सारे दाखवायला लागलो 


समग्रता संपूर्णता स्वीकारण्याची गोष्ट 

एकमेकाला अपुरे वाटायला लागलो 


ती बहुदा मुळांसारखी सेटल झाली 

मीही तिचे खोड काढायला लागलो 


 साधे सरळ लिहायला का जमेना

की मीही गुंतागुंत जगायला लागलो 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

फळे यायची बंद झाली अशा झाडांचे करायचे काय 

निमित्त करून जे जंगल कापतील 

अशा उनाडांचे करायचे काय 


तुझे काळीज दोस्त आहे की केवळ आहे तात्पुरती तडजोड 

ज्यांचा अंदाज ही येत नाही 

अशा धिप्पाडांचे करायचे काय


मी मूर्तीपूजक आहे आणि तू पूजक आहे एका दगडाचा 

फरक ज्यांच्यातील संपत नाही 

अशा दगडलाडांचे करायचे काय 


तुला वाटते तू शहाणा आहेस 

कारण तुझा एकच साचा आहे 

पोहऱ्यात ज्यांचे ना येते पाणी 

अशा आडांचे करायचे काय 


तू नाक इतके बंद केले आहेस 

की श्वाससुद्धा बनला नाका 

काय चाफ्याचे महत्त्व सांगणार 

तुझ्या गुलाब झाडांचे करायचे काय 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

जायचं असेल तर जा ना 

कशाला उगाच नाटक करते 

समोर तर उभी तुझी लुना कशाला उगाच नाटक करते 


तुझ्या आयुष्यात सांग मी तुला कधी टोप्या घातल्या का 

दारू सांगितली सांगितला चकना कशाला उगाच नाटक करते 


कधीतरी म्हणालो आहे का 

मी तुला खूप सज्जन आहे 

जे करायचे ते केले दना दना कशाला उगाच नाटक करते 


कंटाळा येतो माणसाला आणि मुळात संबंधच कंटाळवाणे 

कुठे लावतेस स्वतःला चुना 

कशाला उगाच नाटक करते


आयुष्य हा प्रवास देहाकडे देहापासून देहामधून 

खुणावतात नव्या खाणाखुणा कशाला उगाच नाटक करते 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


अस्तित्वाचा सर्वनाश विकास होतो आहे 

कळत नाही त्यास तो भकास होतो आहे 


जन्मताना का चार डोळे आठ कान होते?

जो नाही खास तो का खास होतो आहे


कशावर फिरवत आहे तो वरवंटा 

कुठल्या ब्राह्मक धर्माचा त्यास आभास होतो आहे 


डोक्यामध्ये बुद्धी शिल्लक आहे की नाही 

तो प्रज्ञावान होतो की दास होतो आहे 


तो गुडघ्यामध्ये दिसायला लागला आहे 

गुडघ्यात का मेंदूचा निवास होतो आहे ?


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


प्रत्येकाचे प्रेम वेगळे ते कधीही सारखे नसते 

वेगळे जीन्स वेगळे हृदय वेगळा मेंदू वेगळे नाव असते 


वेगवेगळ्या वेळा असतात काही चांगल्या काही वाईट 

कधी कधी आर्ट असते कधी कधी गेम असते


कधी कधी मिळत नाही कधी खूप उशिरा मिळते 

योग्य रस्त्यावर असूनही चालण्याऐवजी कधी बसते 


पटवण्यासाठी कधी कधी असह्य अशी बडबड करते 

कधी इतके गप्प की आवाज सुद्धा करत नसते 


इतकी चर्चा करून सुद्धा काय आहे ते कळणार नाही 

ते त्यालाच कळते ज्याला एक दिवस ते येऊन डसते


कधी कधी तर असे होते आयुष्य गेले तरी कळत नाही 

काही वेळा तर एका क्षणात कळते आणि मनात वसते


ते नेहमीच गाफील असते म्हणून तर त्याचा खून होतो

कधी कधी जो माराय आला त्याच्याच डोक्यात जाऊन बसते


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)


ऋतू आहे छान पण पुढे काय 

ओके मीच घाण पण पुढे काय 


प्रेम अभ्यासक्रमात नाही 

म्हणूनच त्याचा ताण पण पुढे काय 


तू इतिहास तपास मी भूगोल वाचतो 

जाईल वेळ छान पण पुढे काय 


तू म्हणतेस तर मारतो तासास दांडी

प्रेमासाठी बलिदान पण पुढे काय


24 तास कसे तुला देता येतील 

सांभाळायचे असते दुकान पण पुढे काय 


खतरनाक गल्लीमधून जावे लागते 

तोही सोसेन ताण पण पुढे काय 


तो चार मारेल तर आठ मारु की नको 

सोसेनही अपमान पण पुढे काय


नात्यांमध्ये आपल्या एकच गोष्ट चांगली 

घडत नाही मानापमान पण पुढे काय


क्लासमध्ये तू तुझ्या मी माझ्या जातो

करू बाहेर खानपान पण पुढे काय


घाल कितीही शिव्या स्वीकारेन 

शेवटी तुझेच दान पण पुढे काय 


जे आहे ते स्पष्ट सांगितले होते 

स्पष्टता सन्मान पण पुढे काय 


मी एका जागी स्थिर राहत नाही 

चंचल माझे अवधान पण पुढे काय 


सतत वाहत जाते तीच नदी असते 

काठ माझे आत्मभान पण पुढे काय 


मान्य फुलपाखरासारखा उडतो

उडताना प्रकाशमान पण पुढे काय 


मी कुठे तुला कधी अडवले आहे 

धरण असते ताण पण पुढे काय 


बोलून दाखवत नाही नाहीतर तू माझ्याही वरताण पण पुढे काय  


जा की कुठेही दिशा मोकळ्या आहेत 

शरीर तुझेही बेभान पण पुढे काय 


तू संस्कारात अडकलीस मी नाही 

त्यांचा अटळच ताण पण पुढे काय 


शरीर आहेस सर्वात प्रथम स्वीकार 

तिथून सुरु रान पण पुढे काय 


तुझी इच्छा असेल तर राख पावित्र्य 

जाणतो सतीचे वाण पण पुढे काय 


जाणतो मी की सेक्स नंतर काय 

येते वंश निर्माण पण पुढे काय 


खरे तर पंचाईत झालीये माझी

तुझ्याकडे हृदय गहाण पण पुढे काय


मी चंचल तू स्थिर मार्ग काय 

हा स्वभावांचा ताण पण पुढे काय 


मी कुठे म्हणतोय की तू धर्म सोड 

मला स्वातंत्र्य प्रमाण पण पुढे काय 


खरे असेल झोपलेलो आहे पण 

मला झोपेची जाण पण पुढे काय 


मूड ऑफ झाला की सरळ निघतो 

विसरतो भेटीतले उधाण पण पुढे काय 


ज्याला त्याला ज्याचे त्याचे पडलेले 

जगात स्वार्थाला मान पण पुढे काय 


तुझा टवटवीतपणा मला धुंद करतो 

तू माझे नशेचे सामान पण पुढे काय

 

प्रत्येक इंद्रियांचा स्वतंत्र पेंडुलम 

मी दोलायमान पण पुढे काय 


कुठे गणित आहे ह्या प्रेमामध्ये 

लोंबकळते निदान पण पुढे काय 


जाऊ की नको जाऊ की नको 

हा प्रश्न सुद्धा छान पण पुढे काय


ठावठिकाणा तुझा लागत नाही 

म्हणून देतो ठाण पण पुढे काय


रात्र सरून बघ पहाट ताजी आली 

देशील एक मुस्कान पण पुढे काय


झोपेतसुद्धा का इतके सुंदर दिसावे 

तू सौंदर्याची खाण पण पुढे काय


गझल लिहिता लिहिता मूड ऑफ झाला 

रोजचेच हे दिनमान पण पुढे काय 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

ह्यांच्या ऐवजी ते आले 

पुन्हा शेवटी गोते आले 


वाटले झाले सर्व नवे

फक्त नवे खातेपिते आले 


मी उभा राहणार होतो 

पण आडवे नाते आले 


रोज मला कांडत असते 

वाट्यास अद्भुत जाते आले 


मी गरुड काय घाबरणार

अंगावर चालून तोते आले 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मादी ही फक्त मादी असते 

स्वतःशी ती फक्त संवादी असते 


मोठ मोठ्या गप्पा कामाच्या नाहीत 

कृतीला एक बेडरूम पुरेशी असते 


मीही उमलवतो रोमांटिक फुले 

फुले उमलवणे पटवण्याची संधी असते 


ती अशी काही कधी कधी भाव विभोर 

जणू तिची बुद्धी काळजात ठेवलेली असते 


आजचा कार्यक्रम आजच पूर्ण कर 

कुठली मुलगी इथे उद्याची असते 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

निवडून आलेल्या साठी श्रीधर तिळवे नाईक 

जास्त भाव मारू नकोस

समजू नकोस हे खास आहे 

ज्याला तू अचीवमेंट समजतो 

तो कल्पनेचा सुवास आहे


मिळालेला पाठिंबा खूप 

चंचल असतो लोकांचा

आज जरी तो तुला आहे 

उद्या आणखी कोणास आहे 


निवडून आला आहेस तर 

हत्ती सारखे काम कर 

काम करताना लक्षात ठेव 

माणसाचा हत्ती दास आहे 


कल्पनेने किती पिकशील 

कामे केलीस तरच टिकशील

नाहीतर म्हणतील लोक हा 

बदमाश आहे बास आहे 


लोकांची रहदारी दिसते 

तोवरच तुझा रस्ता शाबूत 

लक्षात ठेव राजकारण 

लोकांचा टाईमपास आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मी फक्त बाईबरोबर असतांना पुरुष असतो 

एरव्ही बाई 


पुरुषांना त्यामुळं मी झेपत नाही 

त्यांना वाटतं काय ह्याचे स्विंग होणारे मूड ?


त्यांना माहीत नाही 

मी इन स्विंग अन आऊटस्विंग 

अचूक टप्प्यावर टाकतो

फलंदाज बघून 

स्पिरिच्युअल टायमिंग साधत  


श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सीरीजमधील डेकॅथलॉन एलसेट्रा ह्या

 फाईलमधून )


इस तरहसे निकल जाऊंगा आगे

की जमाना पीछे रह जायेगा 

मै चलता रहूंगा सच की राह 

झूठ का फसाना पीछे रह जायेगा 


मै जानता हूँ आप मेरे बारे में 

कौनसी घटिया चीजे फैला रहे हो 

जो आपकी बातो मे आ रहे है 

उनका ठिकाना पीछे रह जायेगा 


ये देश ऐसा है की यहा लोग 

सच्चाई पे विश्वास नही रखते 

उनकी दिलचस्पी अफवाओमे है 

उनका अफसाना पीछे रह जायेगा 


मुझे आप लोग बुलाते भी नही 

ना मेरे घर पे आते हो कभी आप 

एक दिन आपही ढूंढते रहोगे मुझे 

आपका घराना पीछे रहे जायेगा


अभी कदमो मे छाले है तो क्या 

अभी देश निकाले है तो क्या 

शिव सामने है मेरे और क्या चाहिये 

ये घुमना घुमाना पीछे रह जायेगा


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन अनकॅटेगरीकल :तंत्र या काव्यफायलीतून)

काहीच केले नाही तरी बदनाम घर आहे 

माझ्या प्रसिद्धीचे कारण माझे सासर आहे


आकाश आकाश नसते अवकाश असते 

भूमीलाच वाटत राहते ते प्रियकर आहे


तू फक्त सवय होतीस जी तोडता येत नव्हती 

एकच प्रॉब्लेम कळण्यास झाला उशिर आहे 


माझ्या प्रेमाची तीव्रता मेंदूमध्येच होती 

हृदयामध्ये तिची फक्त एक वायर आहे


प्लग काढून टाकावा तसे तिने काढून टाकले 

फेकले असे की मी बिनकामाचा जोकर आहे 


हे धागे असे की शरीरात आढळत नाहीत 

आणि विरोधाभास असा जपणारे फायर आहे 


तिला वाचता वाचता आयुष्य संपून गेले

नि ती म्हणते मी तुझ्या आयुष्याचे फक्त कव्हर आहे


प्रेमात कधीच काही तसे सेफ नसते 

समजून घे रक्तामध्ये हा डेंजरस वावर आहे


निरमा वॉशिंग पावडर सारखी घरात आली 

माझ्या डागावरही आता तिचा अधिकर आहे 


काळ असाही वाहून जाईल तसाही वाहून जाईल 

आत्ताच जगून घे हा पाऊस क्षणभंगुर आहे 


एक चूक होती पण ती तिने सांभाळली नाही 

मीही लोकांना सांगत राहिलो तिचे बरोबर आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तू चहा पी आणि कपाला सुगंधित कर 

उष्टा पिईन माझ्या ओठाला सुगंधित कर 


जाणतो तू फक्त आईला ओळखतेस 

मलाही ओळखशील डोळ्याला सुगंधित कर


मी विहीर आहे तुडुंब भरलेली 

तू वाकून बघ पाण्याला सुगंधित कर 


तुझ्यासाठी हजारो मैल चालत जाईन 

तू फक्त एकदा माझ्या पायाला सुगंधित कर 


आयुष्याचा अर्थ कधी सापडणार नाही 

दोन शब्द बोल या शब्दाला सुगंधित कर


मेडिकलचे ऍडमिशन तुला मिळून जाईल 

हा जो आजारी पडलाय त्याला सुगंधित कर 


काळाचे काय ते आईन्स्टाईन बघून घेईल 

आत्ता या क्षणी ह्या क्षणाला सुगंधित कर 


श्रीधर तिळवे नाईक

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

सत्य आधीच्या व्यवस्थेचा मर्डर करते 

मग व्यवस्था नवी सत्याची हत्या करते 


तुमच्या ईश्वराशिवाय मी जगू शकतो 

ईश्वराला पुरून माझे अस्तित्व उरते 


मी फास्ट आहे आणि फ्रेश ही आहे 

तरी कसे माझ्या देहात शिळे उरते 


इतके वाचतो पण आजतागायत कळले नाही 

मी पुस्तकात चरतो की पुस्तक माझ्यात चरते 


धर्मग्रंथ वाचून येथे कोण शहाणा झाला 

ही अशी गोष्ट आहे जिला शहाणपण घाबरते 


मी पेठेंच्या क्लासला बसत नाही पेठेत बसतो 

पेठेतच माझे गणित आत्मविश्वासाने वावरते 


एक दिवस गेला तसा दुसरा गेला 

रात्र मात्र जात नाही ती माझ्या खोलीत काय करते 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


लोक त्यांच्या हिशेबाने तुला मनात बनवत राहतील 

त्यांची माती त्यांची दृष्टी तुझे पुतळे बनत राहतील


तुला कळणार नाही काय काल्पनिक पातळीवर बनवले 

लाखो चेहरे फिक्शनच्या पाण्यात तुझे शिजत राहतील 


खरं काय ते माहित असतं पण कल्पनेत जगायचं असतं 

खोटे मेंदू खऱ्या मेंदूना पोचण्याआधीच काटत राहतील


जेव्हा कल्पना संपतील तेव्हा इतिहासाचा भडीमार होईल 

झक मारत तुझे वर्तमान भूतकाळात पोहोचत राहतील 


त्यापेक्षा आसपासच्या लोकांना तू काल्पनिक समज 

तू त्यांच्यावर कविता लिही ते तुला कवी समजत राहतील 


श्रीधर तिळवे नाईक


(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


चांगले असा की वाईट असा 

लोक तुम्हाला ओरपतातच 

कितीही स्वतःची उंची वाढवा 

लोक तुम्हाला झोपवतातच 


त्यांच्या कामाला येता की नाही 

इतकाच फक्त निकष असतो 

हिशेब लावून गोड गोड बोलत 

लोक तुम्हाला वापरतातच


कधी टाळायचे कधी भेटायचे 

लोकांची अचूक गणिते असतात 

त्या गणितात बसला तर फिट 

नाही तर तुम्हाला फेटाळतातच


कितीही असू देत सभ्य चेहरे 

कितीही दिसो लोककळवळा 

लोकांपेक्षा अहंकारच मोठा 

लोक शेवटी वळवळतातच 


त्यांना टाळून तू जाणार कुठे 

तुझा माजसुद्धा समाज आहे 

समज गैरसमज तेच ठरवतात 

मोडीत काढून चिल्लर बनवतातच


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

एकदा जंगल स्वीकारलेस की सर्व काही तुझं चांगलं होईल 

जनावरे दिसतील जनावरासारखी आणि तुझं भलं होईल 


इथल्या सिस्टीमच्या त्वचेवरती जागोजागी आलेत महाफोड 

कितीही अस तू उसासारखा तुझं शेवटी कारलं होईल


तुलाच बनवतील ते व्हिक्टीम तुलाच बनवतील तुझा खुनी 

तुझ्यापासून बनवतील पोशाख तुझ्या काळजाचं टोपलं होईल 


त्यांच्या गाड्या धावतात फास्ट पेट्रोल म्हणून भरतात रक्त 

लोकशाहीच्या रस्त्यांवरती आयुष्य थकलं भागलं होईल 


व्यक्ती म्हणून अडवणार कसा तेच कासव आहेत तेच ससा 

शर्यत मैदान त्यांचे,अस्तित्व जयातही ईवलं इवलं होईल 


सुपरमॅनचीही नाही भीती हनुमानही आहे दंतकथा 

कितीही उडलास तरी त्यांच्या हाती तुझं एक बाहुलं होईल


ज्योतिबापुढे घाल तू खेटी आणि डोक्याचा फोड नारळ 

मोक्षच तुझी वही वाट त्यानं आयुष्याचं चांगभलं होईल 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल: भक्ती या काव्यफायलीतून)

सगळं संपलेलेच आहे 

आत वारलेलेच आहे 


नाही कुठे दिलासा 

स्वप्न खरवडलेलेच आहे 


जास्त हा भ्रष्ट की तो 

सर्व खचलेलेच आहे 


नावात न्यू म्हणून नवे

जुने गजबजलेलेच आहे 


मीही तासाला जातो 

घड्याळ तुटलेलेच आहे 


फक्त सूर्य आकाशात 

बाकी माणसाळलेलेच आहे 


कोणी काठ्या घातल्या 

बांबू लावलेलेच आहे 


दसरा चौकात भेटू 

सोने पेटलेलेच आहे 


कुठेही तू उडी मार 

हौतात्म्य ठरलेलेच आहे 


भिंती आडव्या येतात 

दार उघडलेलेच आहे 


पाऊस नसूनही ओली 

प्रेम तटतटलेच आहे 


तो एमपीएससीला बसणार 

आयुष्य उभे राहिलेलेच आहे 


तू आत जा पण पद्धतशीर 

जंगल वखवखलेलेच आहे 


निदान एक किस तरी दे 

आयुष्य वाळलेलेच आहे 


चलती का नाम गाडी 

बाकी थांबलेलेच आहे 


घोटाळ्यावर घोटाळे 

टाळे लागलेलेच आहे 


अंश ऍक्टिव्हेट आहेत 

टोटल हललेलेच आहे 


डोळे विजन उडून गेले 

भगदाड खोचलेलेच आहे 


असेल ही जिवंत वा मृत 

मुंडके टाचलेलेच आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


28 नोव्हेंबर २५


Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे