सत्य, post truth,खरे ,श्रेय आणि जबाबदारी श्रीधर तिळवे नाईक 


सत्य हा शब्द दोन अर्थाने आपल्याकडे वापरला जातो खरे या अर्थाने आणि सत्य म्हणजेच शून्य किंवा शिव होय खरे म्हणजे तथ्याला धरून असलेले आणि तथ्याला धरून केलेले विधान ! 

मी मागेच एक सिद्धांत मांडला होता की प्रत्यक्ष, परोक्ष आणि अपरोक्ष हे कितीही कार्यान्वित झाले तरी सत्य फक्त अनुभवता येते आणि ज्ञानाचा अंत झाल्यावरच त्याची प्रचिती येते प्रतिति येते माणसाच्या इंद्रियांची मर्यादा अशी की ते दोन डोळ्यांनी दिसत नाही त्यामुळेच तिसरा डोळा खोलावा लागतो 

यातल्या गूढ गोष्टीवर बोलायला नको कारण विज्ञानाच्या कसोटीवरच सर्व चर्चा समाजात झाल्या पाहिजे असे मी मानतो पण आता हेही खरे आहे की आपणाला वास्तव प्रत्यक्ष सुद्धा संपूर्ण दिसत नाही त्यांचे संपूर्ण इंद्रियन होत नाही.वास्तव असते प्रत्यक्ष दिसते म्हणजेच माणसाला प्रतीत होणारे वास्तव म्हणजे प्रत्यक्ष होय . पुन्हा यात गोची अशी की प्रत्येक माणसाला त्याच्या पोझिशनुसार सापेक्ष वास्तव दिसत असते त्यामुळे आणखीनच पंचाईत होते म्हणूनच मी वास्तव आणि तथ्य वेगळे काढले होते .

त्यामुळे मग विधान खरे करायचे किंवा खरे विधान करायचे म्हणजे करायचे काय असा एक मोठा उत्तर आधुनिक प्रश्न आपल्या आयुष्याला आता व्यापून आहे .प्रत्येक विधान हे शेवटी कन्स्ट्रक्ट केलेले असते आणि ते त्या त्या भाषेच्या धारेमध्ये कन्स्ट्रक्ट झालेले असते त्यामुळे तुम्ही कुठलेही विधान केले की ते कन्स्ट्रक्शनच असतं . अशावेळी खरे बोलण्याचा दावा करता येईल का असा एक फार मोठा प्रश्न निर्माण होतो. आपण फक्त असे म्हणू की मनुष्य जे त्याला पारदर्शकपणे प्रतीत झालेले जसेच्या तसे भाषेमार्फत सांगतो तेव्हा ते खरे विधान असते . या खऱ्या विधानाला सुद्धा मग वैज्ञानिक पुराव्यांची कसोटी लावून तपासता आले पाहिजे तरच ते विधान सार्वजनिक खरे ठरेल . पण मोक्ष मिळवणाऱ्या माणसाला खरे विधान करावे लागते . यासाठी पारदर्शकपण हा अत्यंत नितळ आणि निखळ असा गुण त्याच्या ठाई असला पाहिजे याचा अर्थ असा नव्हे की तो चुका करणार नाही कारण शेवटी जे खरे म्हंटले जाते ते तथ्याच्या अंगाने भाषेत व्यक्त झालेले असे काही असते . त्यामुळे शेवटी कसोटी एवढीच राहते की ऑथेंटिक आहे की नाही आणि ऑथेंटिक असणे ही मोक्ष मिळवण्याची गरज आहे म्हणूनच खरे बोललेच पाहिजे असे आपण विधान करू शकतो 

मागील काळात होऊन गेलेल्या सिद्ध आणि बुद्ध लोकांच्या पुढे आत्ताच्या लोकांच्या पुढे असलेले प्रश्न नव्हते. मुळातच त्या काळात विज्ञान उपलब्ध नसल्याने आणि जे होते ते खूप मर्यादित असल्याने त्या लोकांनी अनेक विधाने बिनधास्त केली आता मात्र अशी विधाने बुद्ध आणि सिद्ध लोकांना करता येत नाही कारण नवीन चौथ्या नवतेचे ज्ञान हे पूर्णपणे वेगळे आहे लोक आत्ताच्या माणसाकडून सुद्धा बुद्धाच्या अपेक्षा करतात या अपेक्षा पूर्ण होणे हे शक्य नाही परंपरेत ऋतून बसून गोष्टी शक्य होत नाहीत. 

प्रश्न असा आहे की मग खरे बोलल्यानंतर काय ? त्यानंतर त्या खऱ्या बोलण्याची जबाबदारी घ्यावी लागते म्हणजे असे की मी जे काही लिखाण करतो त्याची जबाबदारी मला घ्यावी लागते आणि जबाबदारी घ्यायची तर मला माझे श्रेय सुद्धा घ्यावे लागते . जबाबदारी आणि श्रेय या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . त्यामुळे श्रेयासाठी लढावे लागते आणि जबाबदारी घेऊन सुद्धा त्या गोष्टीची जर शिक्षा मिळत असेल तर ती शिक्षा स्वीकारायला हवी. भारतामध्ये दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय उपटण्याचे नटद्रष्ट्र उद्योग चाललेले असतात त्याला विरोधच करावा लागतो आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये अनेक कलावंत सामील असतात जे दुसऱ्याचे श्रेय उपटायला टपलेले असतात काही कलावंत असे असतात की जे व्यवस्थित मौन पाळून या श्रेय उपटणाऱ्यांना उत्तेजन देत असतात यातूनच मग पुढचा फिनॉमिना सुरू होतो तो म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये नेहरूंचे श्रेय डावलने सुरू होते गांधीं नेहरूंचे राजीव गांधींचे श्रेय  उपटण्याचे उद्योग सुरू होतात . श्रेय हे सत्य बोलण्याचे खरे बोलण्याचे प्रकरण आहे . आपल्याकडे अनेकदा त्याला आत्मस्तुती वगैरे स्वरूप दिले जाते प्रत्यक्षात ते आत्मस्तुती नसते हो मी हे केले आणि त्याची जबाबदारी माझ्यावर आहे असे सांगण्याचा हा उद्योग असतो . एक संपूर्ण पिढी मी बिघडवली असा आरोप माझ्यावर अनेकदा झालेला आहे पण मी ती जबाबदारी नेहमी स्वीकारली जर काय ती जबाबदारी माझी असेल तर ! जबाबदारी यायची वेळ आली निगेटिव्ह टीका झाली की मग ती माझ्या दिशेने सोडायची असाही एक उद्योग चाललेला असतो . आता स्थिती अशी आहे की जवळजवळ नितीन वाघ यांच्या प्रचारामुळे ते श्रेय न राहता अपश्रेय बनले आहे माझ्या मते मग या अपश्रेयाची जबाबदारी सुद्धा मी स्वीकारलीच पाहिजे . तुम्ही केलेले काम जे तुम्ही विधायक मुक्काम म्हणून करता विधायक काम म्हणून करता ते कदाचित समाजासाठी विघातक ठरू शकते आणि जर का तसा ठपका येणार असेल तर तो तुम्ही घ्यायला हवा. फक्त विधायक असेल तर मी श्रेय घेणार आणि विघातक असेल तर मात्र मी घेणार नाही हा जो डबल स्टॅंडर्ड चा प्रकार चाललेला असतो तो खोटे लोकच करत असतात .

आता हीच गोष्ट जर का आपण समाजकारणात आणि राजकारणात गेलो तर लागू होते . तुम्ही जे खरे विधान करता किंवा खोटे विधान करता त्याची जबाबदारी घ्यावी लागते त्या विधानांची जबाबदारी घ्यावी लागते आणि ती प्रत्येकाला घ्यावी लागते सतत खोटे बोलणाऱ्या राजकारणी लोकांच्या सहवासात राहून हळूहळू सामान्य मनुष्य सुद्धा आता इतका खोटेपणाला सोकवलेला आहे की खोटे बोलण्याचे कोणाला काही वाटतच नाही अशा काळामध्ये ज्याला चुकीने post truth काळ म्हटले जातो आणि ज्याला प्रत्यक्षात लायर्स टाईम म्हटलं पाहिजे आपण ऑथेंटिकली बोलणे हे फार अवघड होऊन बसते. उत्तर आधुनिकतेने ज्या अनेक गोष्टी आपल्या बोडक्यावर ठेवल्या त्यातील लायर्स टाईम एक गोष्ट म्हणता येईल. सापेक्ष वास्तवाच्या आणि तथ्याच्या सापेक्ष पोझिशनमुळे राजकारणावर आणि ज्ञानकारणावर जे परिणाम झाले ते भयावह झाले आणि खोटे बोलण्याचा एक सुळसुळाट सुरू झाला . वास्तविक कॉनटम थेअरीने पोझिशनुसार वास्तव असाच stance  घेतला होता पण राजकारणी लोकांनी पोझिशननुसार खोटे बोलणे सुरू केले. आणि आता प्रश्न असा पडला आहे की या लोकांचे करायचे काय ?कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आता त्याची प्रचिती यायला लागलेली आहे. साहजिकच मग अशा लोकांच्या खोटेपणाला आव्हान देऊन तो खोटेपणा उघडा पाडणे काहीजणांनी सुरू केले . अशावेळी खोटे बोलणारे लोक त्यांचे खोटे पण सिद्ध केले की जबाबदारी घ्यायला नकार देऊ लागले म्हणजे खोटे पण बोलायचे त्या खोट्याची जबाबदारी पण घ्यायची नाही असा काहीतरी डबल नटद्रष्ट्र उद्योग सुरू झाला . राजकीय नेता सत्य बोलतो आहे की नाही यापेक्षा तो सादरीकरण कसे करतो हे अधिक महत्त्वाचे ठरू लागले अगदी माणसे हात थरथर कापताना सुद्धा सादरीकरण करायला लागले . ज्यांची श्रद्धा हलणारी असते त्यांची बोटे आपोआप हलतात त्यांचे हात आपोआप हलतात महाश्रद्धा म्हणजेच रीलिजन आणि धर्म या राजकीय विचार प्रणाली सातत्याने खोट्यावर खोट्या परलोकावर म्हणजे स्वर्ग नर्कावर उभ्या असल्याने त्या नेहमीच खोटेपणाला उत्तेजन देत राहतात. 

खरे तर आपल्याकडे लोकायत परंपरेने या अंगाने प्रस्थापित धर्माला अनेकदा तिखट प्रश्न विचारलेले आहेत. मला नेहमीच वाटते की लोकायत वाद आणि तस्सम जिवंत आणि सळसळत राहणे फार आवश्यक असते पण आपल्याकडे अलीकडे नास्तिक आहे म्हणून सुद्धा केसेस टाकल्या गेल्या . तुम्ही जेव्हा अशा केसेस टाकता तेव्हा तुम्ही कळत नकळतपणे फक्त आम्ही सांगतो तेच सत्य अशी भूमिका घेत असता. वास्तविक ईश्वर आहे की नाही यासंदर्भात सायन्स काहीही बोलत नाही कारण कुठल्याही गोष्टीविषयी बोलायला  तिच्याविषयी पुरावा लागतो मग त्या पुराव्याच्या अंगाने विधान खरे आहे की खोटे हे ठरवता येते सायन्स सध्या इतकेच सांगते की ईश्वरा बाबत आमच्याजवळ पुरावा नाही त्यामुळे त्याविषयी खरे किंवा खोटे विधान करता येत नाही आता त्या आधारे ईश्वर आहे असेही म्हणता येते आणि ईश्वर नाही असेही म्हणता येते त्यामुळे या दोन्ही भूमिकांना आपण मान्यता दिली पाहिजे आणि सांगितले पाहिजे की याला वैज्ञानिक पुरावा नाही पण आम्ही हायपोथेसिस म्हणून दोन्ही गोष्टींना मान्यता देतो.

भगवान शंकरांनी कधीही धर्म सांगितला नाही त्यांनी नेहमी फक्त मोक्ष सांगितला त्यांच्या नावाने मात्र धर्म सांगितला गेला किंबहुना अनेक धर्म सांगितले गेले पुढे पुढे तर युरेशियन वेद सुद्धा त्यांनी सांगितले असे म्हणणारे लोक सुद्धा झाले शेवटी शेवटी तर रुद्र हाच मूळ देव आणि त्यापासून शिव तयार झाला असे सांगणारेही दीड शहाणे झाले 

या सगळ्या अपलापामुळे सिद्धांची चांगलीच पंचाईत झाली अनेकांनी नंतर कॉम्प्रोमाइज केले आणि हिंदू धर्माची स्थापना आणि विस्तार त्यातूनच झाला. आपण युरेशियन श्रुतीला शहाणे करू शकतो असा आत्मविश्वास या लोकांना होता अगदी आमच्या पाशुपताचार्य राजर्षी महाराजांना सुद्धा होता पण प्रत्यक्षात काही तो फळला नाही उलट शैव धारेला तिच्यामुळे तडा गेला कारण ज्यांना ते सामावून घ्यायला गेले होते ते पूर्णपणे राजकीय लोक होते त्यांनी उलट शैव श्रुती कशी गिळता येईल याच अंगाने पावले टाकली. ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश लोकांनी कायमच शैवविरोधी भूमिका घेतल्याने आत्तापर्यंत मिळालेला राजाश्रय गेला आणि त्याचे अनेक दुष्परिणाम शैव श्रुतीला भोगावे लागले याची सुरुवात नानासाहेब पेशवे यांच्या कालखंडापासून सुरू झाली त्यांनी त्यांच्याच वडिलांच्या म्हणजे पहिल्या बाजीराव पेशव्याच्या शैव धर्माला तिलांजली देऊन युरेशियन धर्म स्वीकारले आणि मग जे व्हायचे ते झाले मुळात त्यांचाच नैतिक अधःपात झाला आणि शेवटी कलमिनेशन दुसऱ्या बाजीरावात झाले या अध: पाताविरोधात फक्त होळकर घराणे ठाकले कारण ते शैव होते . आज या इतिहासाची कसलीही जबाबदारी ब्राह्मण घ्यायला तयार नाहीत . उलट हा इतिहास खोटा कसा आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न ब्राह्मणी हिंदुत्व करत आहे . यातूनच मग अस्पृश्यता अस्तित्वातच नव्हती वगैरे वगैरे खोटे बोलणे सुरू झालेले आहे . आता इतके खोटे पचायचे कसे ? तुम्ही सर्वांना सर्वकाळ गंडवू शकत नाही इतके बेसिक सत्य तरी कळणार आहे का ? चुका झाल्या तर चुका स्वीकाराव्यात याबाबतीत खरंतर ब्राह्मणांनी ब्राह्मण्य स्वीकारणाऱ्या लोकांनी जपानी लोकांचा आदर्श ठेवावा . किंवा मग अलीकडच्या पोप लोकांचा ! सत्याची जबाबदारी आणि आपण बोललेल्या खोट्याची ही जबाबदारी घ्यावी लागते . गेली हजार वर्षे इस्लाम मध्ये गुलामगिरी आहे आणि ती कुराणाला मान्य आहे तर ते कबूल करायला नको का ? जगाच्या इतिहासामध्ये सर्वच धर्मांनी अपवाद फक्त शैव धर्म आहे गुलामगिरीला मान्यता दिलेली आहे त्यामध्ये ज्यू आणि ख्रिश्चन सुद्धा येतात किंबहुना शैव लोकांचा बौद्ध लोकांशी जो संघर्ष झाला त्यामध्ये प्रामुख्याने तीन मुद्दे होते पहिला मुद्दा सर्वांनी भीक मागितली आणि सर्व भिक्षू झाले तर समाज चालणार कसा आणि कष्ट कोण करणार ? दुसरा मुद्दा ब्रह्मचर्य पाळले तर मुलं निर्माण होणार कशी आणि मानव वंश चालणार कसा आणि तिसरा मुद्दा हा नेहमीच गुलामगिरीच्या संदर्भात होता जर सर्व मनुष्यच असतील जीव असतील तर एक जीव दुसरा जीवाला गुलामगिरी कसा काय करायला लावू शकतो ? त्यामुळेच अगदी शिवाजी महाराजांना सुद्धा गुलामगिरी नष्ट करायची होती अर्थातच त्यांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे ते ती बंद करू शकले नाहीत पण पुढे संभाजी महाराज थांबले नाहीत त्यांनी शेवटी गुलामगिरी कायद्याच्या क्षेत्रात आणून रद्द केली . शेती करायला फुकटचे श्रमिक हवेत म्हणून निर्माण झालेला हा प्रचंड मोठा शोषणउद्योग होता आणि त्यातूनच शूद्र अति शूद्र यांना गुलाम बनवले गेले जगभर हे घडलेले दिसते अगदी आफ्रिका या खंडात सुद्धा जेव्हा शेती वाढत गेली तेव्हा व्हाईट आणि आफ्रिकन लोकांना गुलाम केले गेलेले आहे . त्यामुळे या कालखंडाची जबाबदारी घेताना गुलामगिरीची जबाबदारी घ्यावी लागते ही जबाबदारी आपण सर्वजण घेणार आहोत की नाही ? 

प्रश्न असा आहे की सिद्ध आणि बुद्ध लोकांनी यातून का पलायन करावे ? ही मोह माया आहे असे सांगत पळून जायचे काय ? मला बसवेश्वर आवडतात त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांनी सर्वात प्रथम सामाजिक वास्तवाचा स्वीकार करून त्याविषयीची खरी विधाने करायला सुरुवात केली मोक्ष मिळालेला माणूस प्रथमच पहिला पुरोगामी म्हणून पुढे आला ज्याने या व्यवस्थेवर शोषणावर स्पष्ट आणि स्वच्छ हल्ले केले . श्रमिक आणि श्रम यांना पुन्हा एकदा प्रतिष्ठा दिली. वर्ण जात व्यवस्था नाकारली म्हणजेच तिच्यासोबत येणारे पॅकेज डील असलेली गुलामगिरीही नाकारली . साहजिकच त्यांची हत्या होणे अटळच होते. आपल्याकडे शिवाजी महाराज हे बसवेश्वरांचे राजकीय अवतार आहेत हे अजूनही कळलेले नाही . शिवाजी महाराज अधिक जगायला हवे होते म्हणजे शैवराज्य कसे चालते हे अधिक समोर आले असते 

एकोणिसाव्या शतकामध्ये आपणाला अशीच जबाबदारी स्वामी विवेकानंद यांनी घेतलेली दिसते किंबहुना रामकृष्ण परमहंस यांनी मिळवलेला प्राप्त केलेला मोक्ष आणि प्रत्यक्षात त्याची सामाजिक फलश्रुती राजकीय फलश्रुती म्हणून स्वामी विवेकानंद यांचा त्यांनी साधन म्हणून केलेला वापर हे भारतीय इतिहासातले सुवर्णपान आहे . रामकृष्ण परमहंस हे तंत्राच्या साहाय्याने मोक्षला पोहोचले होते ते काली भक्त होते हे तर सर्वश्रुत आहे . पण सामाजिक पातळीवर आवश्यक असणारे सायन्सचे ज्ञान आपल्याजवळ नाही याची त्यांना पूर्ण कल्पना होती म्हणूनच त्यांनी शिष्य म्हणून स्वामी विवेकानंद यांची निवड करून विज्ञान आणि अध्यात्म यांची अतिशय चांगली सांगड घातली . बसवेश्वरांनी केलेले काम एका अर्थाने वेदांताच्या अंगाने पुढे सरकले आणि त्याचा प्रभाव लोकमान्य टिळक यांच्यापासून ते महात्मा गांधी पर्यंत सर्वांच्या वर अत्यंत सखोल झाला. त्यामुळेच एकाच वेळी हिंदूवादी आणि हिंदुत्ववादी लोकांना आवडणारे नेतृत्व म्हणजेच स्वामी विवेकानंद होय . दोन्ही धारांच्यावर त्यांचा प्रभाव आहे. शेवटी शेवटी भगवान शिव हाच भारताचा देव आहे असा निष्कर्ष विवेकानंद यांनी काढला होता कारण त्यांचे हिंदुस्तान भ्रमण पूर्ण झाले होते आणि अंतिम निष्कर्ष त्यांच्या हातात आला होता. हाच निष्कर्ष पुढे इरावती कर्वे यांनी पुढे नेला .याचे कारण उघड होते एक तर भारत पूर्ण फिरल्यामुळे सत्य कळाले आणि ज्या युरेशियन श्रुती मधील गीतेच्या चार योगाच्या विषयी स्वामी विवेकानंद कळकळीने बोलत होते त्या युरेशियन श्रुती मधल्या ब्राह्मणांनी शेवटी ते कसे ब्राह्मण नाहीत आणि कायस्थ आहेत हे सांगत त्यांच्या विरोधात अपप्रचार केला आणि आपण काय आहोत याची जाणीव त्यांना करून दिली . जे लोक स्वामी विवेकानंद यांच्या नावाने सध्या जयजयकार करत आहेत त्याच लोकांच्या पूर्वजांनी कधीकाळी स्वामि विवेकानंद यांना ते कायस्थ आहेत म्हणून भरपूर ताप दिला होता . अपवाद लोकमान्य टिळक आणि प्रबोधनकार ठाकरे हे आहेत आणि योगायोगाने हे दोघे मराठे आहेत तिसरे आणि चौथे अर्थातच रवींद्र ठाकूर(टागोर ) आणि अरविंद आहेत .विवेकानंद यांच्या मृत्यूनंतर मात्र बंगालमध्ये त्यांच्या नावाने एक मोठे प्रबोधन सुरू झाले आणि सर्वच त्यांच्या प्रभावाखाली हळूहळू आले. यातील स्वामी विवेकानंद यांना ब्राह्मण लोकांनी अगदी शिकागो परिषदेमध्ये सुद्धा विरोध केला होता हे ब्राह्मण लोक का स्वीकारत नाहीत ? दरवेळी सत्याची जबाबदारी नाकारायची हे कसे चालेल? १९ व्या शतकात सुद्धा त्याच चुका ? पुन्हा 21व्या शतकामध्ये तुम्ही त्याच चुका करणार आहात काय ? कारण जे सत्य स्वीकारत नाही ते खोटेपणाची चूक पुन्हा पुन्हा करत राहतात . स्वतःच्याच खोटेपणाला बळी पडत पुन्हा पुन्हा खोटे बोलत राहतात . ही खोटे बोलण्याची प्रोसेस समजून घ्यायची आहे की नाही ? ती नेमकी कशातून येते हे समजून घ्यायचे आहे की नाही ? स्वतःला ज्ञानी समजता ना? मग इतिहासाचे खरे ज्ञान का घेत नाही ? दरवेळेला पलायन कसले करता ? भूतकाळात ज्यांनी चुका केल्या ते तुमचे पूर्वज असतील तर मग आमच्या पूर्वजांनी चुका केल्या पण आम्हाला त्या करायच्या नाहीत असे स्पष्ट सांगायचे ना ? की त्या चुका पुन्हा करायच्या आहेत आणि तुमचा खरोखरच पुन्हा एकदा वर्ण जाती संस्थेवर विश्वास बसला आहे ? अलीकडे अशा प्रकारच्या पोस्टस सातत्याने पडत आहेत आणि हे करणारे लोक स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेतात हे लक्षात घेण्याजोगे आहे . एक ना एक दिवस हे सगळे हिंदुत्वाचे मारेकरी ठरणार आहेत . हिंदुत्व हे जर काय सतत उत्क्रांत होणारे असेल तर मग उत्क्रांती करणार आहात की नाही ? की मागे जाऊन पुन्हा प्रतिक्रांतीच करणार आहात ? 21 व्या शतकामध्ये तुमची प्रतिक्रांती टिकेल असं तुम्हाला वाटतं ? त्यानंतर काय प्रकारची भीषण प्रतिक्रिया येऊ शकते याची तुम्हाला कल्पना आहे ? तीन टक्क्याची 6% लोकसंख्या सांगितली म्हणून उरलेल्या 94% लोकांना झुलवता येणार नाही इतके साधे सरळ स्टॅटिस्टिक्स तुम्हाला कळत नाही ? माणसे निदान स्वतःच्या संरक्षणासाठी का होईना पण वास्तव जसे आहे तसे बघत असतात . इथे त्याचा अभाव दिसतो. 

म्हणूनच सत्य बोलणे आवश्यक असते खरे बोलणे आवश्यक असते त्यासाठी मुळात खरे काय आहे ते स्वीकारावे लागते. नाकारून ते बदलता येत नाही फक्त प्रचार यंत्रणा राबवल्या म्हणजे आपण सर्व काही नाकारून आपले तयार केलेले इतिहास लादू शकतो असे जर का वाटत असेल तर तुम्ही एका भ्रमात जगत आहात जिथे ब्रिटिश लोक हे करून थकले तिथे तुम्ही यशस्वी होणार आहात ? ब्रिटिशांच्या काळामध्ये शैव लोक झोपले होते त्यामुळेच ब्रिटिशांना खोटे इतिहास रचत दीडशे वर्षे राज्यकर्ता होता आले पण आता ती स्थिती नाही. मंडल कृपेमुळे ओबीसी असलेले शैव हळूहळू जागृत होत आहेत एक मोठा भाग ऑलरेडी जागृत झालेला आहे आणि तो तुमच्या मागे आला तो एका वेगळ्या आशेने आला होता पण तुम्ही जर का त्यांना पुन्हा एकदा ब्राह्मणी हिंदुत्वाचे काढे पाजणार असाल तर ते पिण्याची आता पंडित, वीर ,वाणी- पणी(यांना सुद्धा अनेक राज्यांच्या मध्ये व्यवस्थित विचारपूर्वक ओबीसी मध्ये टाकण्यात आलेले आहे) ,ओबीसी ,बीसी ,आदिवासी लोकांची तयारी नाही हे लक्षात घ्या . 

तर एक तर खोटेपणा करू नका इतिहासात झालेल्या चुकांची जबाबदारी घ्या आणि त्या चुका आपल्या हातून पुन्हा एकविसाव्या शतकात होणार नाहीत याची काळजी घ्या . भारताचा दोन वेळा सत्यानाश तुम्ही केलेला आहे आता तिसऱ्यांदा कराल तर त्याला क्षमा मिळण्याची शक्यता नाही . सत्यमेव जयते असे नाही तरी म्हणतच असता पण प्रत्यक्षात तुम्हाला काही ते पटलेले दिसत नाही ते प्रथम पटवून घ्या . हृदय परिवर्तन झाले तर ठीक आहे पण त्यासाठी आधी प्रथम मेंदू परिवर्तन व्हायला लागते . जोपर्यंत विचारात बदल होत नाही तोपर्यंत प्राणामध्ये बदल होत नाही हृदयामध्ये बदल होत नाही. बदला. स्वतःलाही म्हणजेच मग राष्ट्र बदलता येईल घडवता येईल . सुरुवात स्वतःपासून करा .


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे