रश्मिका मंदाना आणि स्त्रीमुक्ती श्रीधर तिळवे नाईक
रश्मीका मंदाना ही एक सशक्त अभिनेत्री आहे हे बहुमान्य आहे साहजिकच तिच्या मुलाखती घेतल्या जाणार हे उघड आहे त्यामुळे एका मुलाखतीमधील तिचे एक विधान ज्यात तिने म्हटले होते की पुरुषांना एकदा तरी पाळी आली पाहिजे म्हणजे त्यांना कळाले असते की स्त्रियांना काय त्रास होतो यावर झालेला वाद आपण समजू शकतो कारण काही लोकांनी ज्याला बात का बतंगड म्हणतात ते बनवलेले आहे
आपल्याकडे जे काही गैरसमज आहेत त्यातील एक गैरसमज म्हणजे भारतामध्ये पुरुषसत्ताक राजवट ही सर्व धर्मांनी स्वीकारली होती. मी हे नेहमीच सांगत आलेलो आहे की शैव धर्मामध्ये पुरुषसत्ताक राजवट मान्य केली गेली नव्हती. मुळातच ज्याप्रमाणे इतर धर्म हे पुरुष सत्ताक आहेत आणि ज्यांच्या मधला ईश्वर हा पुरुष आहे त्यांच्यामध्ये ही पुरुषसत्ताकता प्रचंड बोकाळलेली दिसते परंतु शैव-धर्माबाबत गोष्ट वेगळी आहे. इथे संसाराचीच (जगाचीच) निर्मिती ही शिव आणि शक्ती यांनी मिळून केलेली असल्याने आणि प्रत्यक्ष जग हे शक्तीने निर्माण केलेले असल्याने आपण सर्व मनुष्य मात्र हे शक्तीतुन निर्माण झालेलो आहोत असे तत्व आहे या तत्त्वाची गणिती मांडणी म्हणजे हे शिवांड शून्य आणि अनंत यांच्यापासून निर्माण झालेले आहे म्हणजे एका अर्थाने इतर सर्व धर्मामध्ये ईश्वराने म्हणजेच पुरुषाने संपूर्ण जग निर्माण केलेले आहे तर शैव-धर्मामध्ये मात्र स्पष्टपणे स्त्रीने जग निर्माण केलेले आहे त्यामुळेच ह्या जगाला संसार असे म्हटले जाते आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा आपण जवळजवळ सर्वच भारतीय संसार असाच शब्द वापरतो . जोपर्यंत आपण हे लक्षात घेत नाही तोपर्यंत ही जी काही गैरसमजुत पसरलेली आहे की भारतामध्ये पूर्णपणे पुरुषसत्ताक राजवट होती ती समजूत कशी चुकीची होती हे कळणे अशक्य आहे.
मुळात एका मूलभूत गोष्टीचा सर्वांनाच विसर पडलेला आहे ती गोष्ट म्हणजे स्त्रियांना येणारी पाळी आणि वारंवार दरवर्षी स्त्रियांच्या वाट्याला येणारी प्रेग्नेंसी ! यामुळे स्त्रियांच्या हालचालींना प्रचंड प्रमाणात मर्यादा होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे . त्या काळामध्ये कंडोम नव्हते ही गोष्ट अनेकांना अजूनही नीट कळलेली दिसत नाही त्यामुळे साहजिकच कामवासना ही स्वाभाविक गोष्ट असल्याने आणि कंडोम उपलब्ध नसल्याने अनेकदा स्त्रिया या दरवर्षी गर्भवती होत असत . आणि एकदा तुम्ही का गर्भवती झाला की तुमच्यावर मर्यादा येतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे . विसाव्या शतकातल्या कसोट्या त्या आधीच्या शतकांना लावू नयेत या मर्यादेमुळे स्त्रीला घराबाहेर पडणे अवघड होऊन बसले होते यावर उपाय स्त्रीने पुरुषाने ब्रह्मचर्य पाळणे हाच होता पण पुरुषाच्या कामवासनेला किंवा स्त्रियांच्या कामवासनेला आवर कसा घालायचा ? त्यामुळेच प्राचीन काळात संन्यासी लोकांच्यावर सुद्धा त्यांनी ब्रह्मचर्य पाळावे अशीच आज्ञा अनेकांच्या धर्मामध्ये आलेली दिसते विशेषतः ज्या धर्मांच्या मध्ये मोक्ष मिळणे हेच अंतिम मानले गेलेले आहे त्या धर्मांच्या मध्ये तर हे विशेष करून घडलेले आहे .
दुसरा मूलभूत मुद्दा हा मुळात त्या काळात उपलब्ध असलेल्या व्यवसायांच्या संदर्भात आहे आपल्याकडे एक फार मोठी गैरसमजुत अशी आहे की जसे आता व्यवसाय उपलब्ध झालेत तसे त्या काळात झाले होते पण ही वस्तुस्थिती नाही मुळातच सर्व उत्पादन व्यवस्था ही शेतीप्रधान होती हे लक्षात घेतले पाहिजे आणि आपण जर का बारकाईने शेतकऱ्यांच्या आयुष्याकडे पाहिले तर तिथे पूर्णपणे या उत्पादनामध्ये स्त्रिया समानतेने भाग घेत होत्या असे दिसते विशेषता शैव स्त्रियांच्या बाबतीत तर हे अगदीच कॉमन होते . अगदी आज सुद्धा स्त्रिया शेतीची कामे करत असतात . त्यामुळे शेती नावाच्या उत्पादन व्यवस्थेत स्त्रियांचा सहभाग नव्हता हा एक फार मोठा गोंडस गैरसमज आहे .
दुसरी गोष्ट व्यापार यात पणी लोक फार कमी होते पण वाणी मात्र खूप होते आणि वाणी लोकांच्या दुकानांमध्ये कायमच स्त्रिया ऍक्टिव्ह होत्या मुळातच घरापासून दुकान लांब ठेवणे ही औद्योगिक जगामध्ये घडलेली क्रांती आहे त्यापूर्वी अनेकदा दुकाने आणि घरे ही एकत्रच असत हीच गोष्ट उत्पादन करणाऱ्या कुंभार चांभार वगैरे लोकांच्या बाबतीत होती यांची उत्पादने आणि घरे ही वेगवेगळी नसत . आणि या सर्व उत्पादन व्यवस्थेत आणि व्यापारामध्ये स्त्रियांचा सहभाग होता माझ्या स्वतःच्या घरामध्ये माझी स्वतःची बहीण अनेकदा दुकान चालवत होती माल आणायला गेलेला नवरा किंवा बाप आणि त्याच्या पाठीमागे दुकान सांभाळणारी त्याची बायको किंवा मुलगी किंवा बहिण ही सर्व वाण्यांच्या घरांमध्ये आढळणारी वस्तुस्थिती आहे किंवा कुंभार काम चालू असताना त्याला मदत करणारी कुंभारीन ही कामसू मानली जात होती .
त्यामुळेच कदाचित वैष्णव धर्माने वैश्य शूद्र अति शूद्र आणि आदिवासी यांना पाप योनीत टाकून दिले मेहनतीची कामे ही वाईट असतात हे संस्कार ब्राह्मणी वैष्णव धर्मातून आले आहेत.
यात सुद्धा जर का आपण शैव राजवटी पाहिल्या तर त्यामध्ये शैव राण्या दिसतात अगदी मुघलांशी युद्ध करणाऱ्या अनेक राण्या या शैव होत्या आपल्याकडे जिजाबाईंनी सांभाळलेला कारभार हा प्रसिद्ध आहे . त्यांच्यानंतर अत्यंत आदराने येणारे नाव म्हणजे अहिल्याबाई होळकर होय आणि पुढे झाशीची राणी लक्ष्मीबाई ! म्हणजे वीर समाजामध्ये सुद्धा समता होतीच पण अनेकदा आपणाला असे दिसते की या स्त्रिया विधवा आहेत त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर गृहिणी म्हणून असलेल्या स्त्रीची जी गर्भवती असल्याने मर्यादा येते ती येत नसल्याने साहजिकच त्या काम करायला मोकळ्या होत्या आणि त्यामुळेच त्या राजकारणामध्ये प्रत्यक्ष भाग घेत होत्या. अनेकदा संसारामधल्या स्त्रिया या पतीच्या अनुपस्थितीत घरचे व्यवसायिक व उत्पादक काम चालवत होत्या जबाबदाऱ्या सांभाळत होत्या. मात्र विधवा स्त्रियांचा जसा स्पष्ट आणि स्वच्छपणाने प्रत्यक्ष सहभाग दिसतो प्रत्यक्ष राजवटसुद्धा दिसते तशी राजवट वा सहभाग या संसारी स्त्रियांना फार प्रमाणात मिळालेला दिसत नाही.
मग हा सगळा स्त्रीमुक्तीचा गदा रोल नेमका कशा संदर्भात चाललेला असतो ? तर ही कामे प्रामुख्याने ब्राह्मण धर्माची आहेत म्हणजे धार्मिक कामे आणि वैष्णव धर्मामधील राजकीय कामे ! माझा प्रश्न असा की तुमच्या वैष्णव धर्मातल्या समस्या तुम्ही भारतातल्या शैव धर्मावर का लादता ? याबाबत इस्लाम सुद्धा पुढारलेला दिसतो खुद्द महंमद पैगंबर यांची बायको ही उत्तम व्यापारी होती . मात्र राजकीय कामांच्या बाबतीत तिथे मर्यादा दिसते . किंवा धार्मिक कामांच्या बाबतीत सुद्धा मर्यादा पडलेली आहे फारशा स्त्री मुल्ला स्त्री मौलवी दिसत नाहीत
मग हा सगळा गोंधळ नेमका आहे कुठून ? तर जिथे जिथे ब्राम्हण्याचे संस्कार येतात तिथे तिथे हे सर्व प्रकार सर्व मर्यादा येतात आणि ब्राह्मणधर्मच हिंदूधर्म आहे असा प्रचार झाल्याने आणि शेवटी शेवटी खरोखरच हिंदू धर्म हा ब्राह्मण धर्म झाल्याने आपणाला असे दिसते की हिंदू धर्मामध्ये या सर्व गोष्टी बोकाळत गेल्या वाढत गेल्या मी नेहमीच सांगितले आहे की वैदिक धर्म वेगळा आणि ब्राह्मणधर्म वेगळा ! खुद्द वैदिक धर्मामध्ये सुद्धा अनेक विद्वान स्त्रिया दिसतात पण दुर्दैवाने नंतर ब्राह्मण धर्मात ब्राह्मण सामील झाल्यावर ही संख्या घटत गेलेली दिसते .
खुद्द शैव धर्मात सुद्धा वैष्णव धर्माच्या प्रभावामुळे जे काही दुर्गुण शिरले त्यामध्ये स्त्रियांना पुरोहितपणा नाकारणे शिरला अन्यथा सर्व शक्ती लिंगे ही स्त्रियांच्याकडेच होती आणि आज सुद्धा माझी मागणी असते की सर्वच्या सर्व शक्ती लिंगे आणि सर्वच्या सर्व शाक्त मातृदेवता स्त्रीदेवता यांची मंदिरे बहुजन समाजातल्या स्त्रियांच्याकडे देऊन टाकावीत त्यांना त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण द्यावे . हा एक निर्माण केलेला बॅकलॉग आहे तो भरून काढणे अत्यंत आवश्यक आहे . मी ब्राह्मण स्त्रियांना नकार देतो कारण ब्राह्मण स्त्रियांच्या ताब्यातली मंदिर हे ब्राह्मण पुरुष आपल्या ताब्यात घेणार आणि पुन्हा एकदा वर्णजाती अधिष्ठित व्यवस्थाच आणणार याविषयी माझ्या मनात शंका नाही किंबहुना ब्राह्मण पुरुषांपेक्षा ब्राह्मण स्त्रिया वर्णाचा प्रश्न आला की फार वेगळ्या आता वागत नाहीत होत नाहीत हा अनुभव आहे शिवाय ही मंदिरे ब्राह्मणांनी स्थापन केलेली नाहीत ती ब्राह्मणेतर लोकांनीच बांधलेली आहेत त्यामुळे त्यावर हक्क हा ब्राह्मणेतर स्त्रियांचाच आहे
वास्तविक स्त्रिया ह्या जास्त चांगल्या रीतीने मंदिर चालवू शकतात मंदिरातली स्वच्छता ही कमालीची असावी लागते आणि ती बायकांना अधिक चांगली जमेल असा माझा अंदाज आहे त्यामुळे खरे तर सर्वच मंदिरे बायकांना द्यायला हवीत याशिवाय जो मंदिरांचा उद्देश आहे जो मी इतरत्र लिहिलेलाच आहे त्याला सुद्धा स्त्रियांचे काम जास्त चांगले पूरक आहे अर्थात काही पुरुष अधिक उत्तम करू शकत असतील तर त्यांना चान्स मिळायलाच हवा पण इथे कर्तुत्व प्रमुख मानले गेले पाहिजे फक्त बायका कर्मकांडात जास्त अडकतात हा माझा अनुभव आहे त्याबाबतीत त्यांनी अधिक मोकळे होणे गरजेचे आहे . अन्यथा मंदिरांचा उद्देशच नाहीसा होईल
थोडक्यात काय स्वतःला उच्च कुलीन समजतात त्यांची जी कामे आहेत तिथे फार मोठे प्रश्न आहेत बाकी वैश्य शूद्र अति शूद्र आदिवासी यांच्यामध्ये या भानगडी हल्ली झीरपलेल्या असल्या तरी त्या काढून टाकणं अवघड नाही. मुख्य म्हणजे समतेचा विचार हा शैव धर्माचा पाया आहे हे यांना वारंवार आता सांगणे गरजेचे बनलेले आहे. याबाबतीतली सर्वात जास्त जबाबदारी ही शैव पुरोहितांची असते हे मी वारंवार सांगितलेले आहे आणि त्यांना मी हे वारंवार सांगत असतो.
कुठलीही अर्थव्यवस्था हीच पोषण व्यवस्था झाली पाहिजे शोषण व्यवस्था नाही. त्या अंगाने जे अडथळे येतात ते फक्त स्त्रियांच्या पुरते मर्यादित नाहीत तर काही अडथळे हे स्त्री आणि पुरुष या दोघांना कॉमन आहे आणि आसक्तीचा भुकेचा तृष्णेचा आणि निकडीचा जो प्रश्न आहे असतो तो प्रश्न दोघांनाही कॉमन आहे दोघांच्यातही अफाट लालसा ,लालच आहे त्यामुळे दोन्ही ठायी निर्माण होणारे प्रॉब्लेम सतत येत राहणार पण त्यावर दोघांनीही मात करायला शिकले पाहिजे . एका अर्थाने हे जेंडर न्यूट्रल प्रश्न आहेत ते प्रत्येकाला आपापल्या कुवतीनुसार सोडवावे लागतात तिथे तुमची साधनाच उपयोगी पडते
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment