ऋतू पाऊस आणि शैव

 ऋत , ब्रम्ह आणि ताओ श्रीधर तिळवे नाईक 


भारतामध्ये वैदिक श्रद्धा आणि नंतर तिच्यातून निर्माण झालेला वैदिक धर्म ज्याचा आधार सांख्य धर्म आणि ब्रह्म धर्म यांची चर्चा मी नेहमी करत असतो मी हे नेहमीच मांडत आलेलो आहे की युरेशियन श्रुतीमध्ये आद्य धर्म म्हणून आपणाला वैदिक धर्माचाच उल्लेख करावा लागतो जो साधारणपणे इसवी सन पूर्व 1500 ते 1000 या दरम्यान विकसित झालेला आहे 


या धर्मावर शैव धर्माचा प्रचंड प्रभाव पडलेला होता ही वस्तुस्थिती ! विशेषता शैव श्रुतीमधील मोक्षाचा स्वीकार नंतर केला गेला आहे आणि त्यातूनच धर्माबरोबर अर्थ काम मोक्ष यांचे पुरुषार्थात रूपांतर केले गेले आहे शैव धर्माची जी संकल्पना ईश्वर किंवा ईश किंवा ईशान (हे शंकराचे नाव आहे हे वैदिक श्रुतीला मान्य आहे) तिला नेमके काय नाव द्यावे हा प्रश्न ऋग्वेदामध्ये कायम दिसतो ब्राह्मणधर्माने मात्र ठामपणे पुरुष हे नाव दिले आणि या पुरुषाच्या पासूनच पुरुषार्थ आणि वर्णव्यवस्था निर्माण करण्यात आल्या यातील धर्म या पुरुषार्थामध्येच संस्कारांचा समावेश करण्यात आलेला आहे हे संस्कार करण्याचे हक्क फक्त ब्राह्मणांना नंतर मिळालेले दिसतात सुरुवातीच्या कालखंडामध्ये असे असेल असे वाटत नाही. 


हे लोक सोबत एक संकल्पना जी घेऊन आले तिला नंतर मग भारतामध्ये त्यांनी एक वेगळे नाव दिले हे नाव म्हणजे ऋत ! मला अनेकदा असे वाटते की जे लोक मंगोलिया मधून वाया इराण भारतामध्ये आले त्यांच्या टोळीमध्ये ही संकल्पना प्रथम जन्मलेली असावी याच मंगोलिया मधून जे लोक चीनमध्ये गेले त्यांच्या मधूनच नंतर मग ताओ ही संकल्पना जन्मलेली असावी इतके साम्य या दोन संकल्पनांच्यात आहे भारतामध्ये नंतर या संकल्पनेची रूपांतर ब्रह्म या संकल्पनेत झाले याला कारण भगवान शंकरांच्या शिष्यांपैकी एक असलेल्या ब्रह्माचे वाढत गेलेले प्रस्थ होय त्यातूनच उपनिषदांच्या मधून ब्रह्म धर्म प्रस्थापित होत गेला 

कपिलच्या षष्टी तंत्रातून पुढे  सांख्य दर्शन आणि त्या दर्शनाच्या आधारे सांख्य धर्म प्रस्थापित होत गेला आणि याच सांख्य धर्माची व ब्रह्म धर्माची सांगड नंतर वासुदेव धर्माशी घालत आणि नंतर ब्राह्मण धर्माशी घालत वैष्णव धर्म जन्मलेला आहे 


मोक्ष ही संकल्पना स्वीकारल्यानंतर तिला जागा कशी द्यावी हा एक फार मोठा प्रश्न वैदिक लोकांच्या पुढे होता . पार्वती ही रंगाने गोरी असल्यामुळे तिच्याबद्दल त्यांना अगत्य होते आणि ती हिमालय कन्या असल्यामुळे तिचा सहर्ष समावेश करणे गरजेचे होते त्यामुळे साहजिकच नि: ऋती ही संकल्पना निर्माण होत गेली वाढत गेली ऋग्वेदामध्ये तिचा प्रचंड उल्लेख आहे आणि तीच मुख्य राणी आहे. वैदिकांची ही नि:ऋती कशी काय साईडलाईन झाली आणि प्रकृती कशी काय मुख्य बनली ?


शक्ती हे तत्व या लोकांना मान्य होते आणि त्यांनी मग ते प्रकृती म्हणून सादर करायला सुरुवात केली किंबहुना कपिल यांच्या षष्ठी तंत्राचे रूपांतर सांख्य धर्मात करताना मूळचा वैदिक पुरुष शाबूत ठेवला गेला आणि शक्तीचे प्रकृतीत रुपांतर केले गेले पुढे शाबूत ठेवले गेले आणि या पुरुष आणि प्रकृती या संकल्पनेतून सर्व मांडणी येत गेली मुळात भगवान शंकर यांच्या काळामध्येच गोरा वर्ण हा हिमालयाच्या पायथ्याशी राहणाऱ्या गणांच्या मध्ये उपस्थित होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे किंबहुना त्यामुळेच शंकर आणि पार्वती यांचे लग्न झाले हे लोक स्वतःला देव म्हणवून घेत होते त्यामुळेच आपणाला अगदी अलीकडे जिच्यावरून सतत चर्चा होते त्या पाकिस्तानात उपस्थित असलेल्या कलश जमातीमध्ये गणामध्ये महादेव दिसतो किंबहुना या लोकांनीच शंकराचे रूपांतर देवात केले आणि पुढे महादेवात केले हे लोक ग्रीक नाहीत हे आता सिद्ध झालेले आहे ते त्यांच्याही आधीचे आहेत कलश एका अर्थाने पार्वतीच्या मूळ देवगणाचे व त्या गणाच्या उपगणाचे सध्याचे जिवंत पुरावे आहेत. या देवांच्या बरोबर मंगोलिया मधून व्हाया तिबेट भारतात आलेल्या आर्य लोकांनी व्यवस्थित जमवून घेतलेले दिसते अगदी अफगाणिस्तानातल्या हिंदू कुश पासून थेट नेपाळ पर्यंत हे लोक पसरलेले होते . हे सुरुवातीच्या कालखंडामध्ये कदाचित आफ्रिकेतून आलेले असावेत आणि हिमालयाच्या काठीच ते सेटल झालेले असावेत त्यामुळे त्यांची सेटलमेंट ही आपणाला अफगाणिस्तान ते नेपाळ अशी पाहता येते या देव लोकांशी किंवा देव गणाशी ब्राह्मण मांत्रिकांचा आणि वैदिक गणांचा नंतर संबंध आलेला दिसतो आणि त्यातूनच मग देवगण इराण अफगाणिस्तानातून आलेले वैदिक गण ब्राह्मण गण आणि मंगोलिया व्हाया तिबेट मधून आलेले आर्यगण अशी गोऱ्या रंगाची एक समष्टी उभी राहिलेली दिसते जिच्यातून युरेशियन परंपरा विकसित होत राहिली 


या परंपरेनेच पुढे शंकर सामावून घेण्यासाठी शंकराचे रुद्रिकरण सुरू केले आणि रुद्र आज शंकर असे समीकरण प्रस्थापित करून हळूहळू शंकराची मंदिरे ताब्यात घेतली आणि अनेक ठिकाणी शंकराच्या नावाला रूद्राचा शब्द जोडून त्याची प्रतिष्ठापना करायला सुरुवात केली. आमच्या नागेशाच्या मंदिरामध्ये अलीकडच्या काळामध्ये नागेश महारुद्र नावाची गोष्ट सुरू झालेली आहे ती यातूनच जन्मलेली आहे. शंकराला रुद्र म्हणायचे आणि पार्वतीला महालक्ष्मी म्हणायची असे हे नवे धोरण आहे जेणेकरून सर्वशैव मंदिरात घेता येतील आणि बहुजन समाजावर वर्चस्व गाजवता येईल इतके स्पष्ट धोरण आहे आणि ते यशस्वी होताना दिसते आहे. खुद्द माझ्या गावात ते नागेश श्री महारुद्र म्हणून प्रस्थापित झालेले आहे आणि कोल्हापूर मध्ये सुद्धा अंबाबाई महालक्ष्मी बनताना दिसते . या सगळ्या पॉलिसीचे मूळ हे वेदांमध्ये आहे.


व्यासांनी जे वेदांचे संकलन केले त्यामध्ये त्यांनी या चारही लोकांचा समावेश केलेला दिसतो यातील देवगण हा मूळचा शैवगण असल्याने साहजिकच जास्त गुंतागुंतीचा बनलेला दिसतो मुळची पंचमहाभूतांची परंपरा या लोकांनी अतिशय व्यवस्थित जपलेली दिसते या लोकांच्यातूनच पहिला ब्रह्म हा शंकरांच्या कडे गेला आणि ब्रह्मसूत्र घेऊन आला त्याच्यामुळेच ब्रह्मा ही एक पदवी बनली आणि आपणाला गौतम बुद्धाचे सुद्धा ब्रह्माशी संवाद झालेले दिसतात ही परंपरा सातत्याने ब्रह्मगणाची परंपरा होऊन बसलेली दिसते खुद्द शंकरांच्या काळातच मोक्ष स्वीकारलेले हिमालय शैव पंडित जन्मलेले दिसतात मोक्षावर ठाम विश्वास असल्याने हे लोक साधना करत होते आणि काही लोक मोक्षालाही पोहचलेले दिसतात याच पंडित परंपरेतले लोक पुढे काही ठिकाणी ब्राह्मण बनलेले दिसतात.


याउलट आर्य गणामध्ये स्थिती असावी या लोकांनी त्यांची मूळची जी सामण परंपरा आहे आणि जिला युरोपमध्ये उत्तर आफ्रिकेमध्ये शामन परंपरा म्हणतात कधीही सोडलेली दिसत नाही संपूर्ण जगभर हे लोक ती परंपरा घेऊन गेले याच शामन परंपरे मधून जिला आज आपण श्रमण परंपरा म्हणतो ती विकसित झालेली आहे शामन भगत होते मांत्रिक होते पण भारतात आल्यानंतर मात्र त्यांनी मोक्ष स्वीकारला आणि मग या शामन भगत मांत्रिक लोकांचे रूपांतर श्रमण लोकांच्यामध्ये झालेले दिसते ज्यातून पुढे जैन आणि बौद्ध असे दोन श्रमण धर्म निर्माण झालेले दिसतात. 


हेच शामन लोक जेव्हा मंगोलियाकडून पूर्वेकडे सरकत सरकत इराण युरोप या दिशेने गेले आणि नंतर भारतात आले तेव्हा ते स्वतः बरोबर ऋत ही संकल्पना घेऊन आले मात्र सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांना मोक्ष स्वीकारताना शक्तीचे काय करायचे असा प्रश्न पडला आणि शेवटी ऋतुच्या पलीकडे ती असल्याने तिला नि : ऋती असे नाव दिलेले दिसते म्हणजेच जिला ऋतू लागू होत नाहीत अशी शक्ती ! जसा जसा ब्राह्मण धर्माचा प्रभाव वाढत गेला तशी तशी निऋतीची ताकद संपत गेलेली दिसते . याचे कारण ब्राह्मण शेवटी मांत्रिक होते त्यांना फक्त आपला व्यवसाय चालवायचा होता 


मोक्षाचा धंदा कसा चालवायचा हा या लोकांच्या पुढचा सर्वात मोठा प्रश्न होता आणि हा प्रश्न जैमिनीने सोडवला. त्यातूनच जैमिनी दर्शन निर्माण झाले. या लोकांनी यज्ञ केल्याने मोक्ष मिळतो अशी संकल्पना मांडायला सुरुवात केली जी पूर्णपणे निरर्थक आणि व्यावसायिक होती साहजिकच आद्य शंकराचार्यांनी ज्यांना पराभूत केले त्यामध्ये जैमिनी आचार्य होते या लोकांच्या पाडावानंतरच यज्ञामार्फत मोक्ष मिळवण्याचा व्यवसाय बंद पडला आणि आद्य शंकराचार्यांच्या प्रभावाखाली या सर्व लोकांनी वेदांत स्वीकारला. त्याचा थेट परिणाम भारतीय संस्कृतीवर असा झाला की मूळची मंगोलियन असलेली संकल्पना आता भारतीय बनली आणि तिने ब्रह्म स्वीकारले.


खरे तर वेदांमध्येच वैदिक श्रद्धेच्या कालखंडामध्येच आपणाला हा वाद सुरू झालेला दिसतो आणि या वादाचे एकरूप आपणाला विश्वामित्राच्या रूपात दिसते किंबहुना विश्वामित्र याज्ञवल्क ही ब्रम्हपरंपरा त्यातूनच निर्माण झालेली आहे अर्थात याआधी शुक्राचार्य होते किंबहुना शुक्राचार्य ही एक अशी वैदिक व्यक्ती होऊन गेली जिने सर्वात प्रथम शैव लोकांचा मोक्ष स्वीकारला आणि नंतर शैव असलेल्या असुरांचे ते गुरू झाले पुढे मग विश्वामित्र आलेले दिसतात आणि नंतर याज्ञवल्क! 


आज सर्वच ब्राह्मणांनी ब्रह्म ही संकल्पना स्वीकारलेली दिसते एका अर्थाने ब्राह्मणधर्म आणि ब्रह्म धर्म हे दोन ब्राह्मणांचे धर्म आहेत आणि यांचा आपापसात वाद सुरू असतो ब्राह्मणधर्म स्मृती स्वीकारतो मनुस्मृतीला वर्ण व्यवस्थेला पाठिंबा देतो तर ब्रह्म धर्म हा फक्त ब्रह्म प्रमाण मानतो . कर्माप्रमाणे वर्णव्यवस्था मानतो. त्याच्यासाठी इतर सर्व काही भ्रम आहे माया आहे. 


हीच संकल्पना जेव्हा चीनमध्ये जाते तेव्हा तिथे प्रश्न असा आहे की ब्रह्म आणि ताओ यांच्यामध्ये फरक काय तर तो फरक असा की ब्रह्मामध्ये पुनर्जन्म स्वीकारला जातो ताओ पुनर्जन्म मानत नाही याचे कारण हा ताओ चीन मध्येच थांबला त्याउलट जो ताओ भारतात आला तो आपोआपच प्रथम ऋत आणि नंतर ब्रह्म बनत गेला सहाजिकच पुनर्जन्माची संकल्पना स्वीकारली गेली. कर्मफल सिद्धांत ही पुढे स्वीकारला गेला .  


एकदा का हा ऋत, ब्रम्ह आणि ताओ यांचा उत्क्रांत क्रम लक्षात आला तर मग अनेक गोष्टी स्पष्ट होतात. युरेशियन श्रुती आणि शैव श्रुती यांच्या संबंधांच्यावर आणि त्यातल्या गुंतागुंतीवर काही प्रमाणात प्रकाश पडतो. देव गण हा अफगाणिस्तान आणि नेपाळ यांच्या दरम्यान पसरला होता हे लक्षात आले की मग झोराष्ट्रीयन धर्म का या लोकांच्या विरोधात उभा राहिला तेही कळते . आणि का ब्राह्मण लोकांना झोराष्ट्रीय लोकांच्यामुळे अफगाणिस्तान इराण सोडून भारतात यावे लागले ते स्पष्ट होते. ब्राह्मण लोकांचा मांत्रिक बनण्याचा अट्टाहास जोवर संपत नाही तोपर्यंत ब्राह्मण धर्म नष्ट होणे अशक्य आहे. स्वतःची ही मांत्रिक गिरी शाबूत ठेवण्यासाठी त्यांनी प्रथम झोराष्ट्रियन त्या नंतर शैव नंतर वैदिक यांच्याशी पंगा घेतला आहे आणि आता वैष्णव आणि हिंदू यांच्याशी ते पंगा घेणार आहेत का हा प्रश्न आहे. ज्यू मुस्लिमांचा कडवे पणा आणि ब्राह्मण लोकांचा कडवेपणा याच्यामध्ये फारसा फरक नाही आणि आश्चर्यकारकरित्या ब्राह्मण आणि मुस्लिम एकमेकांच्या वर टीका करतात . दोघेही पुस्तकांच्या किंवा शब्दांच्यात अडकलेत दोघांनाही लोकांना पुस्तकांच्यात अडकवून ठेवायचे आहे पुस्तकी बनवायचे आहे. 


यांच्यापासून सुटका व्हावी म्हणून मोक्षवादी मुस्लिमांनी सुफी नावाचा मार्ग शोधला तर मोक्षवादी ब्राह्मणांनी सांख्य धर्म, ब्रह्मधर्म आणि पुढे वेदांत नावाचे तीन धर्म तयार केले आणि स्वीकारले . या तिन्ही धर्मांचा पाया ब्रह्म ही संकल्पना आहे आणि तिचा उगम ऋतवादात आणि नि: ऋती वादात आहे.


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे