शिवपुराण की शैवश्रुतीविरुद्धचे कारस्थान की लोकांना कळावा म्हणून सांगितला गेलेला सुलभ सहज शैव धर्म ?श्रीधर तिळवे नाईक
भारतामध्ये शैव धर्माबद्दलचा सर्वात लोकप्रिय ग्रंथ जर कुठला असेल तर तो शिवपुराण आहे असे युरेशियन परंपरेमध्ये मानले जाते आणि त्यामध्ये कदाचित तथ्यही असू शकते शिवपुराणांमध्ये जो शिव निर्माण केला गेलेला आहे तो शैव लोकांनी निर्माण केलेला नाही तर तो वैष्णव लोकांनी शैव लोकांना सामावून घेण्यासाठी निर्माण केलेला आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे .त्यामुळेच ब्राह्मण्याच्या कचाट्यात सापडलेला असा हा ग्रंथ आहे आणि हा पूर्णपणे ब्राह्मणी ग्रंथ आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे किंबहुना यामुळेच पौराणिक धर्म असा नवीन धर्म निर्माण करण्याची वेळ नंतरच्या लोकांच्यात आली कारण पुराने फक्त वैष्णव नव्हती तर ती शैव सुद्धा होती त्यावर उपाय काय शोधायचा म्हणून मग या सगळ्या धर्माला पौराणिक धर्म म्हटले गेले आणि यातूनच पुढच्या हिंदू धर्माचा पाया घातला गेला कारण पुराने ही सर्वांनाच ओपन होती आणि त्यामुळेच बहुतेक संत जे बहुजन समाजातून आलेले होते त्यांच्यासाठी ही ती उपलब्ध होते आणि त्यांनी ती वाचूनच काही धार्मिक कल्पना करून घेतल्या होत्या संत साहित्यावरचा पौराणिक प्रभाव हा एक फार मोठा गुंतागुंतीचा विषय आहे.
युरेशियन श्रुतीमध्ये पुराणांना तीन प्रकारांमध्ये विभागले जाते पहिली सात्विक पुराण यामध्ये विष्णू वर लिहिले गेलेली पुराणे आहेत त्यानंतर राजसपुराण यामध्ये ब्रह्म आणि अग्नि यांच्यावर लिहिले गेलेली पुराणे आहेत आणि शेवटी तामस पुराण ज्यामध्ये शैव धर्मावरची पुराने येतात तामस म्हणण्यामागचा उद्देश स्पष्ट आहे अपवादात्मक वेळेला यांचा उल्लेख अधम असा सुद्धा झालेला आहे पुढे तो सुधारून मग तामस करण्यात आला . पुराण या शब्दाचा शैविकार्थ हा जे पुराबद्दल आहे ते पुराण होय .(पूर म्हणजे शहर होय जसे कोल्हापूर सोलापूर ) पूर्वी प्रत्येक शैव शहराचे स्वतःचे पुराण असायचे विषय व परंपरा असायची पण पुढे ती नाहीशी झाली कारण शहरच नाहीशी झाली पुन्हा जेव्हा नवीन शहरे आली तेव्हा पुराण लिहिण्याची परंपरा लोक पावली होती आणि त्या जागी जी पुराणे आली ती सरळ सरळ जुन्या पुराणांची भ्रष्टावृत्ती होती सर्वसाधारणपणे उगम स्थान सांगणे हा पुराणांचा उद्देश होता आणि अनेकदा हा उद्देश दंतकथांना धरूनच असायचा किंबहुना कलावंत लोकांचा कल्पनाविलास किंवा त्या त्या शहरातल्या लोकांच्या विषयी दिलेली ऐतिहासिक माहिती आणि कलावंतांचा कल्पनाविलास म्हणजे पुराण होय . शैव श्रुतीला हे नीट माहीत होते त्यामुळे गैरसमज होत नव्हते पुढे या सगळ्याला धार्मिक आधार देण्यात आला आणि मग गोंधळ सुरू झाला . प्रत्येक शहरांमध्ये कलावंत असतातच आणि ते त्यांच्या शहराबद्दल कलेच्याद्वारे भाकड कथा रचतच असतात किंबहुना कला म्हणजे भाकडकथा रचणे असते . त्याकडे कला म्हणून पाहिले की जास्त गोंधळ होत नाही पण दुर्दैवाने धर्म नावाची संकल्पना युरोशियन लोक घेऊन आले आणि त्यांनी कलावंतांच्या कृतींना धार्मिक कृतीचे स्वरूप दिले भारतातला सगळा गोंधळ हा त्यामुळे सुरू झालेला आहे . मोक्षाच्या नावाने जितक्या भाकडकथा भारतामध्ये लिहिल्या गेल्या तितक्या कदाचित कुठेच लिहिल्या गेलेल्या नाहीत . थापा मारणे हा कलेचा स्वभाव आहे . या थापा रंजक असल्या म्हणजे झाले पुराने ही कामे नेहमीच करत असतात म्हणूनच पुराने वाचावीशी वाटतात कारण ती रस रंजन करतात . पुराणांची लोकप्रियता सर्वाधिक असण्याचे कारण त्यांची ही मनोरंजन करण्याची आणि रस रंजन करण्याची क्षमता आहे. हे मनोरंजन आणि रस रंजन करण्यासाठी मग कलावंत कसलीही आणि कुठलीही पातळी गाठायला नेहमीच तयार असतात त्यामुळे पुराना मधले अध्यात्म किंवा मोक्ष हे सरळ सरळ काल्पनिक असतात कारण त्यांचा सत्याशी काडीचाही संबंध असत नाही अनेक कलावंतांना मोक्षाचा अनुभव नसल्याने कसल्याही वाकड कथा रचने त्यांना सहजशक्य होते . शिवाय नाट्यात्मक प्रभाव यावा म्हणून आपण काही लिहिले तरी चालते अशी एक समजूत कलावंतांची असते . पुराणांच्या बाबतीत हे वारंवार घडलेले दिसते .
गरुड पुराणाने पुराणांचे तीन प्रकार केलेले आहेत उत्तम मध्यम आणि अधम! पद्मपुराण सुद्धा (३०- १६३- ८१ ते ८४)मत्स्यपुराण , कुर्म पुराण, लिंग पुराण, शिव पुराण स्कंद पुराण ,अग्निपुराण यांना तामस पुराण म्हणते तर ब्रम्हांडपुराण वयवर्त पुराण ,मार्कंडेय पुराण, भविष्यपुराण, वामन पुराण आणि ब्रह्मपुराण यांना राजसपुराण म्हणते तर विष्णु पुराण, नारद पुराण ,भागवत पुराण ,गरुड पुराण ,पद्मपुराण आणि वराह पुराण यांना सात्विक पुराण म्हणते या वर्गीकरणांमध्येच वैष्णव धर्माचा प्रचार करणे हे उद्दिष्ट स्पष्ट दिसते . अग्निपूजा ही प्रामुख्याने पारशी लोकांची पूजा असल्याने अग्नीपुराण नंतर तामस पुरानातच घातलेले दिसते कारण पारसी लोक हे वैष्णव लोकांच्या दृष्टीने असुर लोकांच्यात येतात.
स्कंद पुराण ही सर्वाधिक विवादग्रस्त घटना आहे कारण आता जे स्कंदपुराण उपलब्ध आहे हे खूप नंतरच्या शतकामध्ये लिहिले गेलेले आहे प्रत्यक्षामध्ये काही भाग वाचवत जे लिहिले गेले होते ते रिप्लेस केले गेलेले आहे उदाहरणार्थ जो भाग वाचलेला आहे त्यामधला स्कंदपुराणातला एक भाग(केदार खंड पहा) स्पष्टपणे सांगतो की दहा पुराणांच्या मध्ये शिवस्तुती आहे चार पुराणांच्या मध्ये ब्रह्म स्तुती आहे आणि दोन पुराणांच्या मध्ये हरी जी दाक्षिणात्य समुद्र देवता आहे आणि देवी म्हणजेच पार्वती म्हणजे शक्ती तिचे एक पुराण आहे. ब्रह्म हा भगवान शंकर यांचा शिष्य होता त्याचा युरेशियन ब्रह्मदेवाशी काडीचाही संबंध नाही त्याची स्तुती करणारी पुराणे ही त्यामुळेच शैव-धर्मामध्ये समाविष्ट होती. आता प्रत्यक्ष आपण ही पुराने शोधायला गेलो तर आपणाला ती मिळतच नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की ही पुराने नष्ट केली गेलेली आहे आणि त्यांच्या जागी अत्यंत पद्धतशीरपणे वैष्णव धर्माला आणि युरेशियन श्रुतीला साजेशी अशी जुन्या मूळ शैवपुराणांची मोडतोड करून नवीन पुराने रचली गेलेली आहेत. आता तर अवस्था अशी आहे की मौखिक परंपरेमधून सुद्धा मूळ शैव पुराने गायब होत चाललेली आहेत(अपवाद फक्त पाशुपत दर्शनाची धर्माची परंपरा आहे) त्यामुळे एकंदरच प्रश्न फार गुंतागुंतीचा बनतो. याच गायब झालेल्या पुराणांच्या आधारे रामायण महाभारतामध्ये मग आणखीन मोडतोड केली गेलेली आहे. मूळ मोक्ष कथांना धर्म कथा केले आहे त्यामुळे मूळ उपदेश आणि उद्देशच नाहीसा झालेला आहे
पुराण वाङ्मयावर होणारी चर्चा ही प्रामुख्याने युरेशियन लोक करत असल्याने साहजिकच त्या चौकटी बाहेर जाऊन कोणी विचार करत नाही अर्थातच 1960 नंतर याला छेद देणारे काही ब्राह्मणेतर विचारवंत निर्माण झालेले दिसतात मात्र तरी अजूनही पौराणिक वाङ्मयाचा ब्राह्मणेतर सौंदर्यदृष्टीने व तर्कदृष्टीने विचार करणे अधिक गरजेचे आहे
अनेक पुराणांच्या मध्ये आपणाला असे दिसते की एक उल्लेख स्पष्ट आलेला आहे तो म्हणजे पुराणांचे हे द्वितीय संस्करण आहे .
अलबेरुनी याने पुराणांचा उल्लेख केलेला आहे आणि अर्थातच त्यामध्ये शिवपुराणाचा उल्लेख आहे .
पुराणांची मोडतोड कोणी केली ब्राह्मणांनी केली की पंडितांनी केली असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो या प्रश्नाचे माझे उत्तर असे आहे की ही मोडतोड प्रामुख्याने ब्राह्मण बनलेल्या पंडितांनी केलेली असावी आणि नंतर मग नेहमीप्रमाणे ब्राह्मणांनी ती ताब्यात घेऊन अत्यंत विचित्र मोडतोड पद्धतीला जन्म दिला असावा. तरीसुद्धा पुराणांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो याचे कारण त्यांच्यामध्ये असलेले शैव श्रुती विषयीचे उल्लेख ! उदाहरणार्थ दोन मुख्य शिवसुत्रांचा येणारा उल्लेख प्राण या शब्दासाठी नंतर चैतन्य हा शब्द वापरणे सुरू झाले त्यामुळे साहजिक प्राण हाच आत्मा हे मुख्य शिवसूत्र चैतन्य हाच आत्मा असे झालेले आहे आणि ज्ञान हेच बंधन हे दुसरे शिवसूत्र मुख्य आले आहे शिवपुराणांमध्ये ही दोन्ही सूत्र दिसतात आणि त्यांचा मुख्य सूत्रे म्हणून उल्लेख आहे. अर्थात प्राणाला चैतन्य म्हटले म्हणून फार फरक पडत नाही आशय एकच आहे तो म्हणजे आत्मा मानला जात नाही तर प्राण मानला जातो. शैव श्रुतीच्या मते पुनर्जन्म हा प्राणाचा असतो आणि तो मोक्षामुळे होतो. तो देहातल्या देहात होतो . दुर्दैवाने नंतर आत्मा ही संकल्पना स्वीकारली गेली आणि त्यातून बरेचसे घोळ झाले वास्तविक आत्मा ही एक युरेशन संकल्पना आहे आणि ती रोमन धर्मामध्येही दिसते आजही तिचा पुरावा सापडत नाही. ती मेल्यानंतर सुद्धा उपस्थित असते . आत्म्याचा पुनर्जन्म होतो . शैव शै व शैवशैव श्रुतीमध्ये प्राणाचा पुनर्जन्म होतो आणि त्यालाच मोक्ष म्हटले जाते
पण एकदा हे सत्व पकडल्यानंतर मग मात्र भलत्याच गोष्टी सुरू होतात . लिंग पुराण हे प्रामुख्याने व्रतांच्या विषयी आहे किंवा स्थळांच्या विषयी तीर्थक्षेत्रांशी संबंधित आहे. खरे तर अनेक मूळ स्थळ म्हणजेच पूर पुराणांचा तो समुच्चय आहे त्यामध्ये थोडीफार प्राचीन काळातल्या पुराणांची झलक आहे . पुन्हा या सर्व पुराणांच्या स्वतःच्या आवृत्ती आहेत प्रत्येक आवृत्तीची स्वतंत्र संहिता आहे आणि या संहिता मेळ खातातच असे नाही . मुळातच घाल घुसड इतकी झालेली आहे की त्यातले सत्व काढून घेणे हेच कठीण होऊन बसते . व्रतवैकल्याचा प्रचंड प्रभाव हा पुराणांच्या मुळे पडलेला आहे . व्रत करणाऱ्या सर्वच लोकांना व्रात्य म्हटले जात होते हे तर आता स्पष्टच आहे. हा शब्द उनाड या अर्थी आहे आजही तो त्याचा अर्थाने प्रचलित असतो युरेशियन लोकांनी दिलेली ही गाली (मी शिवी हा शब्द आताशा वापरत नाही कारण त्याचा मूळ अर्थ शिवाची बायको ती शिवा किंवा शिवी म्हणजेच पार्वती आहे)आहे . उदाहरणार्थ शिवपुराणाची जी वैद्यश्वर (युरेशियन परंपरा तिला विद्येश्वर म्हणते) संहिता आहे तिच्यात कलियुगाचे वर्णन आहे म्हणजे कलियुगात सर्व माणसे पुण्यशून्य होतील सर्व माणसे सत्य बोलण्यापासून परमुख होतील सत्याचा आपलाप करतील दुसऱ्याच्या धनाची आणि स्त्रीची आसक्ती धरतील हिंसापरायण होतील. पंडित लोभग्रस्त होऊन वेदांची विक्री करतील म्हणजेच ज्ञानाची विक्री करतील क्षत्रिय पापमय होतील पापाचा आचार करणारे होतील वैशांच्यावर संस्कार उरणार नाहीत ते संस्कारहीन होतील शूद्र ब्राह्मणांचा तिरस्कार करायला लागतील आणि आपल्या कर्तव्याचा त्याग करतील वगैरे वगैरे आता इथे जी वर्ण व्यवस्था आलेली आहे ती सरळ सरळ स्पष्ट सांगते की ब्राह्मण्याने घाल घुसळ केलेली आहे .
पुरानातला शैव धर्म हा वर्णव्यवस्था समर्थक असल्यासारखा बांधला जातो मांडला जातो. आणि हे सर्व युरेशियन लोकांनी केलेले आहे . बहुजन समाजाला चुकीची दिशा दाखवून त्याला असे भासवणे की खुद्द भगवान शंकरांनीच वर्ण व्यवस्थेला मान्यता दिलेली आहे वैदिक श्रुतीला मान्यता दिलेली आहे असे वैश्य शूद्र अति शूद्र आणि आदिवासी यांच्या डोक्यात बिंबवणे हा पुराणांचा मुख्य उद्देश आहे
हे करताना काही वेळा गोंधळ उडालेले आहे उदाहरणार्थ शिवपुराणांमध्ये पार्वती खंडात पार्वतीची आई मैना की मेनका हे ठरवता आलेले नाही मैना हा शब्द खास शैव परंपरेतला आहे त्या उलट मेनका हा सरळ सरळ युरेशियन शब्द आहे . शिवाय सती प्रथेचे समर्थन करणे हाच मुख्य उद्देश आहे अर्थात हे सर्व पुन्हा युरेशियन आहे हे सांगायला नकोच कारण सतीच्या कथेमध्ये भगवान श्री राम आलेले आहेत . मात्र मूळ पुरानातला जो उद्देश आहे की शिव निर्गुण आहे व शक्ती त्याला क्रियावान बनवते हे सांगणे तो ठेवला जातो . सर्वात हाईट काय असेल तर हे लग्नाच्या वेळी शिवाचे गोत्र आणि प्रवर सुद्धा विचारले जाते . हे सर्व टिपिकल वैदिक आहे . पुराने ही अशीच आहेत आणि त्यांचा उद्देशच मुळात वैदिक श्रुती बिंबवणे हा असल्याने सर्व पुराणांच्या मध्ये हे वारंवार होताना दिसते अर्थात शिव स्पष्ट सांगतो की शिवाला काळ नाही बांधू शकत तो काळाच्याही आधीचा आहे शेकडो ब्रह्म आणि हजारो विष्णू निर्माण होतात जातात आणि पण शिव कालातीत आहे मग ब्राह्मण गप्प बसतात .
एका अर्थाने शिव पुराण शिव हे तत्व आणि शंकर हे आदी योगी यांना एक करून टाकते .
(क्रमश:)
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment