मोक्ष कधी मिळतो आणि त्याचा काय परिणाम होतो श्रीधर तिळवे नाईक

प्रश्न : मोक्ष कधी मिळतो ?मोक्ष मिळालेल्या माणसाचा खरोखर काही परिणाम जगावर होत असतो का ? 

उत्तर: हा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो म्हणून त्याचे उत्तर देत आहे दुसरा प्रश्न नेहमीच मोक्षाच्या संदर्भात मोक्ष कधी मिळतो असा असतो 


याचे साधे उत्तर असे आहे की तुमचा जो मेंदू आहे त्याचा मूळ उद्देश शरीराला जतन करणे शरीराचे संरक्षण करणे आणि हे शरीर कामवासणीच्या साह्याने पुढच्या पिढ्यांसाठी कंटिन्यू करणे हा आहे मेंदूचे मूलभूत काम हेच आहे हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे मग मोक्ष तो कुठून किंवा ज्ञान ही संकल्पना येते कुठून ? तर तिचा संबंध हा थेट सर्वांयवलशी ,टिकण्यासाठी आणि जतन करण्यासाठी आणि या जीवाचे जे जीन्स आहेत ते जीन्स कंटिन्यू खोडे व्हावेत मधून मुलांना जन्म देणे यांच्याशी आहे त्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्यांच्याशीच आहे हे करण्यासाठी माणसाला आपल्या आसपास जे काही घडते आहे त्याचे ज्ञान मिळणे आवश्यक असते. साहजिकच तो ज्ञानाच्या मागे लागतो जर ज्ञान चुकले तर तुमचे जिवंत असणे धोक्यात येऊ शकते म्हणजे समजा तुम्ही उडी मारली पण ती जर का अंतराचा अंदाज न आल्याने अंतराचे योग्य ज्ञान न झाल्याने चुकीची पडली तर तुम्ही जखमी होऊ शकतात किंवा तुम्ही चुकीचे भोजन खाल्ले की ज्यामध्ये विष आहे हे तुम्हाला कळलेच नाही त्याचे ज्ञान झाले नाही तर तुम्ही मरू शकता त्यामुळे ज्ञान अचूक असणे हे खूप आवश्यक आहे माणसाच्या सत्यशोधाची प्रेरणा ही त्याच्या टिकून राहण्याच्या आणि स्वतःला जतन करणे स्वतःचे जेनेटिक कोड जतन करणे या दोन प्रेरणांच्या मध्ये समाविष्ट होते त्यामुळे साहजिकच टिकून राहणे टिकणे आणि स्वतःचे अस्तित्व जतन करणे यासाठी माणूस सत्याचा शोध घेऊ शकतो त्याचा हा शोध प्रामुख्याने सुरुवातीला तथ्याशी निगडित असतो जे दिसते तेच खरे मानण्याची त्याची प्रवृत्ती असते कारण शेवटी इंद्रियजन्य कृती हीच सर्वायवल ची मुख्य कृती असते परंतु आवश्यक इतके तथ्य प्राप्त झाले की मनुष्य आणि त्याचा मेंदू ताबडतोब मंद आणि ढीला होतो आणि साहजिकच अंतिम सत्य वगैरे प्रश्न त्याला पडायचे बंद होतात माणसे मोक्षाकडे वळत नाहीत त्याचे कारण मुळातच मानवी मेंदू हा मोक्षासाठी जन्मलेला नाही मग मोक्ष येतो कुठून? तर मोक्ष येण्याचे सर्वात मोठे कारण मेंदूच्या पलीकडे आहे.आणि माणसाचे वैशिष्ट्य असे आहे की माणूस जितका जीवाशी निगडित निगडित आहे तितकाच तो शिवाशी निगडित आहे त्यामुळे साहजिकच हा शिव त्याला अधून मधून मी आहे याची जाणीव करून देत राहतो जगण्याच्या प्रक्रियेमध्येच तो वाकून पाहत राहतो एका अर्थाने असणे जगण्याला वाकून पाहत राहते यातूनच मग त्या शिवाला जाऊन मिळण्याची एक असोशी माणसांमध्ये निर्माण होत राहते घंटा ही प्रामुख्याने त्याचे प्रतीक आहे ती वाजत राहते अधून मधून वाजत राहते पण वाजत राहते प्रार्थना ही सुद्धा घंटाच आहे जी आपण स्वतःच वाजवत असतो 


परंतु जो पर्यंत मेंदूला असे वाटत नाही की सत्य मिळाल्याशिवाय आपण जिवंतच राहू शकणार नाही तोपर्यंत मेंदू स्वतःचा शेवट घडवत नाही स्वतःचं फंक्शनिंग थांबवत नाही त्यामुळे मेंदू सतत सविकल्प समाधीच्या अलीकडेच वावरत राहतो मग निर्विकल्प समाधी तर फारच दूर ! याचा एक परिणाम असा होतो की अशा प्रकारची जतन करण्याची आणि टिकून राहण्याची जी मूलभूत नैसर्गिक प्रेरणा आहे ती जोपर्यंत मोक्षाशी संपूर्णपणे एकरूप होत नाही तोपर्यंत माणसाला मोक्षाची ती तडस लागत नाही ती तळमळ निर्माण होत नाही आणि ती निर्माण होत नाही तोवर माणसाला मोक्ष मिळत नाही परंतु एकदा जर का त्या मेंदूला ही तडस निर्माण झाली ही तळमळ निर्माण झाली की तो आपोआपच सगळी साधना तडीस नेण्यासाठी म्हणून धडपडतो आणि मोक्षाला उपलब्ध होतो. माणसाच्या मेंदूमध्ये ही क्षमता असते तिला मी मोक्षक्षमता म्हणतो .परंतु मेंदू या मोक्षक्षमतेबाबत झोपलेला असतो एका अर्थाने स्वतःचाच कम्प्युटर ऑफ करणे असे त्याचे स्वरूप असते आणि हा कम्प्युटर स्वतःलाच ऑफ करतो हा कॉम्प्युटर ऑफ झाल्या झाल्या ताबडतोबच मग त्याची रिप्लेसमेंट त्या मेगाकॅम्पुटर कडून होते किंवा शिवाकडून होते जीव गेल्याशिवाय शिव मिळत नाही आणि हे एका अर्थाने हातावर शीर घेऊन हातावर मेंदू घेऊन लढण्यासारखे असते हे ज्याला जमते तो मोक्षाला उपलब्ध होतो ज्याला हे जमत नाही तो मोक्षाच्या कायमच अलीकडे राहतो माणसांमध्ये ही क्षमता आहे परंतु ही मोक्षक्षमता वापरण्याची जैविक गरज त्याच्या ठायी नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळेच हा सर्व गोंधळ निर्माण झालेला असतो पण काही लोकांना ती तडस लागते ती तळमळ लागते आणि साहजिकच ते जीव खाऊन मोक्षाच्या मागे लागतात हे जीव खाऊन मोक्षाच्या मागे लागणे शेवटी अंतिम पातळीवर त्याला मोक्ष मिळवून देते आणि एकदा का मोक्ष मिळाला की फक्त त्या जीवापुरतेच नाही तर इतर जीवांच्यासाठी सुद्धा काही प्रमाणात फरक पडतो कारण शेवटी या जगातले सर्व काही या ब्रह्मांडातले या शिवांडातले सर्व काही एकमेकाशी कनेक्टेड आहे त्यामुळे एका जीवात झालेला मोक्षाचा स्फोट हा संपूर्ण ब्रह्मांड संपूर्ण शिवांड हलवतो आणि संपूर्ण शिवांडात एका विशिष्ट पातळीवर फरक पडतो आणि म्हणूनच जितक्या अधिक लोकांना मोक्ष मिळतो तितक्या अधिक मोक्षाच्या शक्यता वाढत जातात इतर मेंदू सुद्धा त्या शक्यतांच्या कडे वाटचाल करू शकतात 


त्यामुळेच एक मोक्ष मिळवलेला माणूस संपूर्ण जग हालवून टाकतो सर्व काही कनेक्टेड आहे अगदी तुमचा जीव सुद्धा संपूर्ण शिवांडाशी कनेक्टेड आहे त्यामुळे साहजिकच एक जीव मोक्षाला पोहोचला की ब्रह्मांडाला संपूर्ण मोक्ष मिळाल्यासारखे होऊन जाते 


जगामध्ये फक्त एक टक्के लोकांना जरी मोक्ष मिळाला तरी सुद्धा उरलेले 99% आपोआप मोक्षाच्या दिशेने उत्क्रांत होते परंतु दुर्दैव असे आहे की एक टक्के लोकांना सुद्धा मोक्ष मिळत नाही कारण मुळात त्यासाठी कोणी ट्रायच करत नाही त्यातून सगळा गोंधळ आहे 


जर भारतामध्ये फक्त एक टक्के लोक मोक्ष मिळवतील तर संपूर्ण जग मोक्षाकडे सरकू शकते परंतु अशाप्रकारे काही होत नाहीये कारण धर्माचा गौरव इतका प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे की लोक मोक्षाकडे वळत नाहीत. लोक मोक्षाचा शॉर्टकट म्हणून धर्माकडे वळतात आणि धर्म हा शॉर्टकट देतो किंबहुना आपल्याकडे तो शॉर्टकट आहे असे सांगतो प्रत्यक्षामध्ये त्याच्याकडे तो नसतो हे एका अर्थाने राजकीय आश्वासन असते ज्याचा मोक्षाच्या संदर्भात काहीही उपयोग नसतो धर्म हा एका अर्थाने इतका राजकीय असतो की तो मोक्षाला स्वातंत्र्य देत नाही आणि हे तो अत्यंत अप्रत्यक्षपणे आणि हळुवारपणे घडवत असतो त्यामुळेच धर्मापासून असलेला धोका अनेकदा लक्षातच येत नाही धर्म हा मोक्षाची सुरुवातीचे दरवाजे स्वतःकडे ठेवून घेतो विशेषता पुरोहितशाही हे घडवत असते आणि भारतामध्ये हे वारंवार घडत असते त्यामुळे होते काय? लोक धर्मालाच मोक्ष समजायला लागतात आणि मोक्षालाच धर्म समजायला लागतात या सगळ्यातून फक्त कर्मकांड आणि ज्ञानकांडे निर्माण होतात त्यामुळे मोक्ष मिळत नाही फक्त धर्म आणि तात्पुरती धार्मिक शांती मिळते पण ही शांती सुद्धा आर्टिफिशियल असते एका अर्थाने धर्म हा मोक्षाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे जो पॉलिटिकल फंक्शनिंग करण्यामध्ये अत्यंत वाकबगार आहे आणि आपल्या मेंदूला धर्म नेहमीच ताब्यात घेतो आणि आपल्या तालावर नाचवतो यापेक्षा वाईट अवस्था रीलिजनची असते महाश्रद्धेची असते कारण रिलीजनमध्ये मोक्ष नावाची संकल्पना नसल्यामुळे अनेकदा त्या रिलीजनमध्ये जन्म घेणारे लोक मोक्षाचे विशेष पाहू शकत नाहीत त्याचा साधा विचार पण करत नाही हे म्हणजे विज्ञानाची माहिती नसलेला माणूस विज्ञानाविषयी विचार करत नाही तसे असते साहजिकच विज्ञानच माहीत नसलेल्या माणसांमुळे तुम्ही कितीही विज्ञानाबद्दल बोलला तरी त्याला समजावून सांगणे अवघड होऊन बसते. जुडाईक सर्वात मोठी मायनस गोष्ट जी आहे ती हीच आहे की तिथे मोक्षाला वाव नाही तिथे कयामत किंवा लास्ट डे ऑफ जजमेंट आहे स्वर्ग आणि नरक आहे आणि मोक्ष म्हणजे स्वर्गात जाणे असे आहे या मोक्ष विषयीच्या फिकट संकल्पना आहेत त्या प्रत्यक्षामध्ये स्वर्ग आणि नरक यांच्याशी निगडित आहेत आणि मोक्ष म्हणजे मोक्ष नाही तर साल्वेशन आहे ज्यामध्ये जीव हा ईश्वराच्या शेजारी जाऊन बसतो किंवा ईश्वराच्या राज्यात जाऊन बसतो 


त्यामुळे जुदाईक म्हणजेच ज्यू ,ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मांना वारंवार मोक्षाची आठवण करून द्यावी लागते त्यांना सांगावे लागते की धर्म वेगळा मोक्ष वेगळा आणि रिलिजन तर बिलकुलच वेगळा! रीलिजन हा श्रद्धेवर अवलंबून असतो तो प्रत्यक्ष प्रमाण मानत नाही त्या उलट मोक्षामध्ये प्रत्यक्ष प्रमाण आणि अति प्रत्यक्ष प्रमाण हीच दोन प्रमाणे मुख्य असतात बाकी सर्व अनुमानात्मक आणि चिन्हात्मक प्रमाणे मोक्षामध्ये वर्कआउट होत नाहीत मोक्ष त्यांच्यामुळे मिळत नाही त्यामुळे या अंगाने जी काही अमिषे दाखवली जातात लाभ दाखवले जातात ते फक्त धार्मिक धंद्याचा भाग असतो 

मोक्ष स्वतः साधना केल्याशिवाय मिळत नाही म्हणजेच एका अर्थाने मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसाच मेल्याशिवाय मोक्ष दिसत नाही जोपर्यंत तुमचा जुना ब्रेन जुना मेंदू मृत होत नाही मरत नाही तोपर्यंत मोक्ष मिळत नाही जुना मेंदू हाच फार मोठा अडथळा बनून येतो मोक्ष म्हणजे एका अर्थाने तुमच्या मेंदूचा पुनर्जन्म असतो ज्यात सर्व काही मागील गोष्टी असतातच ज्या जीवाशी जोडलेल्या असतात परंतु आता तो त्यांच्या ऐवजी शिवाशी म्हणजे शून्याशी जास्त जोडलेला असतो 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे