उपयुक्ततावाद , व्यवहार वाद आणि सत्य श्रीधर तिळवे नाईक 


भारतामध्ये ज्या काही गोष्टींच्या बाबतीत गोंधळ माजवला जातो त्यातील एक गोष्ट म्हणजे उपयुक्ततावाद आणि व्यवहार वाद यांना एक समजणे प्रत्यक्षामध्ये या दोन गोष्टी वेगळे आहेत कारण एक म्हणजेच उपयुक्ततावाद हा पुरोगामी प्रबोधनवादी नवते मधून जन्मलेला आहे त्या उलट व्यवहार वाद हा आधुनिक नवतेमधून जन्मलेला आणि अस्तित्ववादाच्या तोडीस तोड असलेला असा वाद आहे अशी मांडणी आहे.


दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे कलावंतांच्या मुळे अस्तित्ववादाचा खूप गाजावाजा झाला पण व्यवहारवादाची मात्र फारशी दखल घेतली गेली नाही सर्वात आश्चर्यकारक जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे आंबेडकर वादी लोकांनी सुद्धा व्यवहार वादाकडे प्रचंड दुर्लक्ष केले वास्तविक व्यवहारवादाचा सर्वाधिक सखोल परिणाम ज्या व्यक्तीवर झाला ती व्यक्ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर होय मी स्वतः व्यवहारवादाचा अत्यंत खोलात जाऊन अभ्यास करण्याचे पहिले कारण रसेल आणि दुसरे कारण आंबेडकर होते.


माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी वाचलेला पहिला पाश्चिमात्य तत्त्वज्ञ सुदैवाने रसेल होता त्यामुळे माझ्या बाळबोध कवितांच्या वर त्याचा प्रचंड परिणाम आहे. रसेल नसता तर मी कदाचित जडवादाचा इतका खोलात जाऊन विचार केला नसतो माझे लोकायतवादाशी या काळामध्ये नाते रसेल वाचून अधिक घट्ट झाले नंतर मी शक्तिपाता नंतर बदललो असलो तरी बर्ट्रांड रसेल हा माझा कायमच ऑल टाइम फेवरेट पैकी एक राहिला काळ गेला तसा त्याच्या प्रभावातून बाहेर मी आलो परंतु त्याच्यामुळेच संपूर्ण युरोपियन जग काय पद्धतीने विचार करते हे कळण्यासाठी मला खूप मदत झाली . मी बारावीला सायन्सला असल्यामुळे साहजिकच त्याची सायन्स विषयक मते मी अत्यंत खोलात जाऊन तपासलेली आहेत .


या काळातल्या तत्त्वज्ञांच्या पुढे सत्य विषयीचे जे प्रश्न होते ते खूप विलक्षण होते मुळातच कळत नकळत सत्य सापेक्ष असते किंवा निस्से म्हणतो तसा सत्य कन्स्ट्रक्टेड असते यात मुख्य तत्वज्ञानाचा प्रभाव प्रचंड पडायला लागला होता . उत्क्रांतीनी वादाने यात अधिकच भर टाकली कारण पुरोगामी वाद वारंवार एकाच गोष्टीपाशी आडत होता ती म्हणजे माणूस कसा तयार झाला हे पुरोगामी वादाला सांगता येत नव्हते . पुरोगामी वादाच्या शेवटी चार्ल्स डार्विनने या प्रश्नाचे उत्तर दिले आणि गोष्टी बदलल्या. डार्विन वाद पुरोगामी वादळातून जन्मलेल्या धार्मिक सिस्टीम स्वर सिस्टिम्स वर प्रचंड मोठा आघात करत होता आणि त्याचा परिणाम कळत नकळत आधुनिकतेला जन्म देण्यामध्ये होत होता . मार्क्स आणि डार्विन हे दोन पुरोगामी वादाचे शेवटचे ग्रेट फिलॉसऑफर होते . 


व्यवहारवादाचा सर्वात मोठा विजय जर कुठला असेल तर तो म्हणजे हे तेच लोक होते ज्यांनी संरचना वादाचा पाया घातला आपल्याकडे अनेक लोकांना असे वाटते की सरचनावादाचा पाया हा फर्डिनांड सस्युर ने घातलेला आहे यावर मी वारंवार टीका केलेली आहे आणि हे फार सुरुवातीपासून ही टीकामी केलेली आहे याचे कारण असे की आमच्या पिढीपासूनच इंग्लंड साईडला पडले आणि अमेरिका केंद्रस्थानी आली होती साहजिकच अमेरिका काय म्हणते याबद्दल आमच्या मनात भयंकर उत्सुकता होती यात हॉलिवूडचा सुद्धा प्रचंड वाटा होता साहजिकच संस्युर च्या आधी मी Charles Sanders Peirce वाचला होता आणि कळत नकळत त्याचा काही परिणाम माझ्यावर झाला होता पुढे भाषाशास्त्राचा अभ्यास करताना तर तो संपूर्ण आकलनाच्या कक्षेत आणून मला संपवावाच लागला . गंगाधर पाटील यांच्यावर मी प्रत्यक्ष भेटीत याच अंगाने खूप टीका केली होती पण त्यावर त्यांचे उत्तर अत्यंत स्पष्ट होते ते म्हणजे तू अनुष्टुभसाठी त्याच्यावर मराठीत मालिका दे मी छापतो. माझी त्यावेळी PhD चालू असल्याने ते शक्यच नव्हते . शिवाय मी त्यावेळेला माझी चिन्ह की तयार केली होती . ती डेव्हलप करण्यात मला जास्त रस होता. 

Charles Sanders Peirce बद्दल खुद्द रसेलनेच"he was one of the most original minds of the later nineteenth century and certainly the greatest American thinker ever" असे म्हटले आहे आणि ते विकिपीडियावर उपलब्ध आहे . मलाही तो अमेरिकेचा सर्वश्रेष्ठ विचारवंत वाटतो किमान १९ व्या शतकातला तो सर्वश्रेष्ठ अमेरिकन विचारवंत आहे याबद्दल आता कोणाला शंका उरलेली नाही .


दुर्दैवाची गोष्ट अशी की बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचे संपूर्ण वाचन केलेले नव्हते. त्याऐवजी ते व्यवहारवादाचे जी मुख्य धारा आहे जिला आता आपण व्यवहारवादाची दुसरी पिढी म्हणतो तिच्यापासून ते जास्त प्रभावित होते कारण या दुसऱ्या पिढीतील जॉन ड्यूई हे त्यांचे गुरु होते . आताच एक प्रॉब्लेम आणखी होता तो म्हणजे मुळात Charles Sanders Peirce चे लिखाण या काळामध्ये फार प्रसिद्ध झाले नव्हते जेव्हा ते झाले तेव्हा अर्थातच खळबळ उडाली कारण अनेक बेसिक संकल्पना त्याने फार वेगळ्या पद्धतीने वापरल्या होत्या मांडल्या होत्या आणि हळूहळू स्पष्ट झाले की तोच खरा व्यवहारवादाचा संस्थापक आहे आणि आज त्याला पूर्णपणे मान्यता आहे. 


आंबेडकरांचे सगळे समाजकारण आणि राजकारण हे त्याने मांडलेल्या व्यवहारवादापासूनच प्रेरणा घेऊन सुरू होते त्यामुळे आंबेडकर यांना अभ्यासायचे आहे त्यांनी प्रथम व्यवहार वाद नीट अभ्यासणे आवश्यक आहे . आंबेडकरांच्या अनेक संकल्पनांचे मूळ व्यवहार वादात आहे. 


अलीकडे या व्यवहारवादाच्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा जी सुरू झालेली आहे ती प्रामुख्याने सत्य या बाबतीत सुरू झालेली आहे. याचे कारण अर्थातच पोस्ट truth फिनॉमिना आहे . व्यवहार वादामध्ये प्रोसेस फार महत्त्वाची असते यातूनच मग सायंटिफिक प्रोसेस म्हणजे नेमके काय असा प्रश्न निर्माण होतो आणि या सायंटिफिक प्रोसेस मधून नेमके सत्य कसे सापडते असा आधुनिक प्रश्न निर्माण होतो. 


मी नेहमीच मांडत आलेलो आहे की सत्य मुळात दिसतच नाही ते अनुभवता येते पण ते फक्त मोक्ष मिळालेल्या माणसालाच अनुभवता येते . त्यामुळे सत्य विषयी कसलाही सिद्धांत लागूच होत नाही . मात्र आपण वास्तव आणि तथ्य या दोन गोष्टींच्या विषयी बोलू शकतो . प्रश्न असा आहे की आपणाला वास्तव कसे प्राप्त होते. ते इंद्रियांना संपूर्ण दिसते का आणि खरा गोंधळ इथेच सुरू होतो कारण वास्तव आपल्या इंद्रजांना पूर्णपणे दिसतच नाही आणि अनेकदा वास्तव आपली इंद्रिय कुठे असतात कुठल्या पोझिशनमध्ये असतात त्यावर अवलंबून असते साहजिकच त्यामुळेच तथ्य सर्वाधिक महत्त्वाचे होते कारण आपणाला खरे तर वास्तव दिसतच नाही आपणाला फक्त वास्तवाचा एक तुकडा दिसतो आणि म्हणूनच त्या तुकड्याला आपण तथ्य समजू शकतो वास्तव समजण्याचे कारण नाही . साहजिकच मग त्या तथ्यामुळेच आपणाला सत्य हेच अपेक्षा असते असे म्हणावे लागते आणि आधुनिक आणि उत्तराधुनिक यांची हीच भूमिका आहे . राशोमांसारख्या कलाकृती त्यामुळे जन्मले. भारतात अर्थातच हे नवीन नाही याचे कारण जैन लोकांनी हा सिद्धांत आधीच मांडलेला आहे. फक्त त्याचे स्वरूप मोक्षिक होते आधुनिक आणि उत्तर आधुनिकतेत मात्र त्याचे स्वरूप हे वैज्ञानिक करण्याचा प्रयत्न झालेला आहे . सत्याच्या आकलनासाठी सर्वबाजूवाद" अत्यंत आवश्यक आहे अशी चौथ्या नवतेची भूमिका आहे एकेकाळी वास्तव न्याहाळण्यासाठी आपणाला योग्य अशी साधने उपलब्ध नव्हती परंतु आता अशी साधने उपलब्ध आहेत विशेषता डिजिटल साधने त्यामुळे साहजिकच या डिजिटल साधनांनी वास्तवाशी केलेला करेस्पोंडन्स म्हणजे तथ्य अशी भूमिका आपण घेऊ शकतो आणि अशा अनेक डिजिटल साधनांनी सर्व बाजूंनी गोळा केलेली तथे गोळा केलेली तथ्ये आणि त्यातून निरीक्षकाने अत्यंत तटस्थपणे काढलेले तथ्यांविषयीचे निष्कर्ष म्हणजे वास्तव होय असे आपण म्हणू शकतो . तुम्ही सर्व पोझिशन वर जोपर्यंत फोकस करत नाही आणि त्यांच्याविषयीची नेटवर्क सिस्टीम तुम्ही ऑपरेट करत नाही तोपर्यंत तुम्हाला आजच्या वास्तवाचा उलगडा होऊ शकत नाही . त्यामुळेच माणसाला पडलेली ही मर्यादा त्याच्या न्यायला पडलेली ही मर्यादा अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती स्वीकारावी लागते म्हणूनच सर्व बाजूवाद महत्त्वाचा होतो मी माझ्या कवितांच्या मध्ये अनेकदा हा सर्व बाजू वाद हाताळत असतो म्हणजे माझ्या बॉल वरच्या ज्या कविता असतात त्या मॉल कडे एका बाजूने पाहत नाही ते अनेक बाजूने पाहतात आणि त्यामुळेच अनेकांचा गोंधळ उडालेला दिसतो. याचे कारण आपल्याला याची सवय नाही आपण सर्व अजूनही आधुनिक आणि उत्तराधुनिकतेत अडकलेलो आहोत . मुळा त्यासाठी मुळात यासाठी कवीचे अस्तित्व केव्हा कवीचे शरीर हेच मल्टीपोझिशनल असावे लागते आणि त्याला तसे ट्रेनिंग लागते आपल्याकडे अशा ट्रेनिंगची प्रचंड वाणवा आहे. माणसे अनेकदा एक बाजूवादी एक पार्टी वादी एक इझम वादी असतात आणि त्यातून हाती काहीच लागत नाही . मी नेहमीच या बाबतीत जैन धर्माचे आभार मानत असतो की त्यांच्या अनेकांत वादामुळे मला बारावीपासूनच यासंदर्भात ट्रेनिंग मिळायला सुरुवात झाली . जैन गल्लीत राहिल्याचे व जैन गल्लीत वाढल्याचे जे काही फायदे होते त्यामध्ये हा एक फायदा होता आणि आहे. 


गौतम बुद्ध याने काही प्रश्न अव्याकृत अनावश्यक मानले होते माझ्या मते खरे प्रश्न विशेषता तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातले अनावश्यक प्रश्नच असतात पण ते फार मूलभूत असतात खरे उत्तर हेच आहे की सत्य आपणाला फक्त अनुभवता येते पण ते ज्ञानाच्या कक्षेत अजून तरी आणता आलेले नाही आणता येत नाही . भविष्यात कधीतरी कदाचित हे शक्यही होईल परंतु ते जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण पाहूच . सध्या तरी ते अशक्य बनलेले दिसते . सध्या आपण अनेक बाजूवादी आहोत आणि कधी ना कधीतरी आपणाला सर्व बाजूवादी होता येईल . किंबहुना अनेक बाजूवादाचे जे मूळ उद्दिष्ट आहे ते सर्व बाजू वाद आहे एकदा का आपण व्यवहाराच्या सर्व पातळ्यांच्या वर सर्व बाजूवादी पुण्यात होण्यात तंत्रज्ञानाच्या पातळीवर यशस्वी झालो तर बऱ्याचशा प्रॉब्लेम्सची सोडवणूक आपल्याला सापडेल .


चौथ्या नव्हत्यातला आणखी एक प्रश्न असा आहे की डिजिटल करसपोंडन्समध्ये प्रत्यक्ष असलेले वास्तव आपणाला कळू शकते का आणि डिजिटल कळणे म्हणजे ब्रेनल कळणे आहे का ? की अंतिम सत्य कधीच कळणार नाही आणि हा संसार कधीच आपल्याला आकळणार नाही ? सध्या तरी आपणाला इतकेच माहिती आहे की आपले ब्रह्मांड हे संसाराच्यापैकी एक ब्रम्हांड आहे आणखी पुढे किती संसार वाढून ठेवलेत माहित नाही . किंबहुना आणखी किती ब्रम्हांडे वाढवून ठेवलेत तेही माहित नाही . चौथ्या नव्हते मध्ये माणसाच्या ज्ञानाच्या मर्यादा जितक्या पुढे येऊ लागलेले आहेत तितक्या त्या यापूर्वी कधीच पुढे आलेल्या नव्हत्या पण त्याचबरोबर हेही तितके खरे आहे की डिजिटल मुळे ज्ञानाच्या अनेक सर्व बाजू आपल्या कक्षेत येण्याच्या शक्यता वाढलेले आहे वाढलेले आहेत म्हणजेच जितके ज्ञान वाढते तितकेच आपले अज्ञान वाढते असे दिसते. याला मी ज्ञानाचा वर्ग वादाचा सिद्धांत म्हणतो म्हणजे दोन चा वर्ग चार होतो चार चा वर्ग आठ होतो तसे काहीसे ज्ञानाबाबत आणि अज्ञानाबाबत एकाच वेळी घडत जाते .


प्रश्न असाही निर्माण होतो की डिजिटल रियालिटी ही किती स्टाईलआईज डिजिटल रियालिटी आहे की सत्याने मारलेली ती केवळ स्टाईल आहे? दुसरा प्रश्न साधनांच्या मर्यादांचा आहे आणि तो म्हणजे आपली साधने आपली सत्य शोधणारे साधने ही खरोखरच सत्याशी करस्पॉंडन्स करत असतात का ?करू शकतात का ? की त्यांच्या मर्यादा या आपल्या ज्ञानाच्या मर्यादा होतात ? व्यवहारवादामध्ये निगोशियेशन्स फार महत्त्वाच्या असतात . प्रश्न असा आहे की तुमचे साधन तुमचे माध्यम या निगोसेशन्स करू शकते का ? त्यांची निगोसिएशन्स करण्याची क्षमता हीच तुमची ज्ञान क्षमता बनते का ? की तुमच्या मेंदूतले अपरोक्ष बायस बनवून सतत येत राहते आणि तुमची ज्ञानाची मर्यादा तुमच्या बायसची मर्यादा ही तुमच्या ज्ञानाची ही मर्यादा होते ? व्यवहार वाद खूप प्रत्यक्ष ला महत्त्व देतो आणि आज प्रॉब्लेम असा आलेला आहे की प्रत्यक्ष जे असते ते सापेक्षतेमुळे खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष नसतेच ते तथ्य असते . आपणाला दिसणारे भौमितिक आकार हे प्रत्यक्ष त्या वास्तवात उपस्थित आहेत की आपल्या परोक्षमध्ये म्हणजे मेंदूमध्ये उपस्थित असलेल्या भूमितीची भौगोलिकतेची ती निर्मिती आहे ? उदाहरणार्थ पृथ्वी गोलाकार आहे असे आपणाला वाटते परंतु ती प्रत्यक्षात परफेक्ट गोलाकार नाही . ती प्रचंड खडबडीत आहे . तर तिचा व्यास मोजताना जिला आज आपण फ्रॅक्टल जॉमेट्री म्हणतो तिचा वापर करावा का ? चौथी नव्हता असे सांगते की होय हे करावे लागेल आणि हे करणे इतके सोपे नाही . पृथ्वीच्या गोलाकारावर असणारे फ्रॅक्टल मोजणे हे इतके सोपे नाही . तुम्ही म्हणाल की कदाचित सेंटीमीटर चा फरक असेल परंतु प्रत्यक्ष वास्तवात सेंटीमीटर फार मोठी गोष्ट होऊन बसते . ज्यांना स्पेसीकल्स कशी घुसवायची हा प्रश्न पडतो त्यांना समोरच्या गुंफे मधला मिलिमीटर सुद्धा काउंट करावा लागतो . फिनिशिंग टचेस ऍक्युरेट असावे लागतात . दैनंदिन व्यवहारामध्ये या गोष्टी इतक्या डॉमिनेट आत्ता करत नाहीत परंतु भविष्यात त्या करत जाणार आहेत . हीच गोष्ट रंगांच्या बाबतीत आहे . रंग एकाच वेळेला सापेक्ष आहेत आणि तरीही मानवी जीवनात चित्रकलेमध्ये ते निरपेक्ष होत जातात. मानवापुरते असलेली ही निरपेक्षता ही सापेक्ष निरपेक्षता आहे . त्यामुळे वाटाघाटी करताना जास्तीत जास्त त्या ऍक्युरेट असणे अत्यंत आवश्यक बनते आणि कलावंतांचा आळशीपणा तिथे चालत नाही. 


विल्यम जेम्स किंवा रसेल यांनी मांडलेले सत्यांचे सिद्धांत हे त्यामुळेच तपासून घ्यावे लागतात . वाटाघाटी ह्या सत्यांच्या संदर्भात चालतातच परंतु त्यांचे नेमके संदर्भ काय आहेत हे पुन्हा पुन्हा तपासणे आवश्यक झालेले आहे . आजचा व्यवहार वाद सुद्धा अनेकदा असे गृहीत धरतो की समोर ऑब्जेक्टिव्ह रिऍलिटी आहे ती तशी खरोखर आहे का हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे. कारण शेवटी ही ऑब्जेक्टिव्ह रियालिटी सुद्धा आपणाला दिसणारे आहे आणि कदाचित तिच्या इतर ऑब्जेक्टिव्ह रियालिटीशी चाललेल्या वाटाघाटी आपणाला दिसतच नसतील तर त्यांचा नेमका प्रभाव तिच्यावर कसा पडतो हे कसे निश्चित करायचे आणि मुळात ते आपणाला कळणार कसे आपल्या साधनांना माध्यमांना हे कळणार कसे ? साधे रंग सुद्धा आपणाला सर्वच्या सर्व दिसत नाहीत आणि आपणाला दिसणारे रंग सुद्धा फक्त आपणालाच दिसणारे रंग असतात अशावेळी मानवी अनुभवांच्या टीमक्या वाजवणार कोण ? विल्यम जेम्स फाफलतो तो इथेच! आपण केवळ अनुभवांच्यावर अवलंबून राहावे असे तो सुचवत राहतो आणि आपल्याला तसे अवलंबून राहता येईल का हा खरा प्रश्न आपल्या काळात उपस्थित होत राहतो. मोक्षामध्ये सत्याचा अनुभव येतो ही वस्तुस्थिती परंतु तो अनुभव व्यक्त मात्र करता येत नाही आता मग करायचे काय ? जे कृष्णमूर्ती आणि ओशो रजनीश यांच्यामध्ये अडकलेल्या लोकांना हे कसे समजवायचे ? प्रश्न केवळ सापेक्षतेचा राहिलेला नाही जो त्यांच्या काळामध्ये राहिलाय असे वाटत होते . सर्वांसाठी मोक्ष उपलब्ध झाला पाहिजे अशी माझी तळमळ आहे पण तो उपलब्ध करण्याची साधने आणि माध्यमे माणसाला डेव्हलप कसे करता येतील हा खरा प्रश्न आहे . सध्या सर्व काही बायोलॉजिकल साधनांच्या आधारे चाललेले आहे . बायोलॉजिकल साधने ही प्रत्येक माणसात वर्कआउट होत नाहीत त्यामुळे प्रश्न असा आहे की सर्वांच्यासाठी मोक्ष असे जर आपण म्हणणार असू तर प्रत्यक्ष बायोलॉजिकल साधनेच फक्त घेऊन चालणार नाही सामान्य माणसांच्या साठी प्रत्येक बायोलॉजिकल साधन हे कार्यक्षम आणि फंक्शनल साधन बनवायचे असेल तर आपणाला अनेक ठिकाणी रोबोटिक्स ची मदत घ्यावी लागेल . हे सर्व दिसते तितके सोपे नाही आणि मोक्ष मिळालेला पुरुष किंवा स्त्री यापुढे यांच्यावर अवलंबून राहणार आहे हे तर उघड आहे . 


व्यवहार वात सुद्धा अनेकदा असे मान्य करतो की आपण फायनल सत्यापर्यंत पोहोचणारच नाही पण त्या काळामध्ये मुळात तशी चौथ्या नवतेची माध्यमे आणि साधने नव्हती पण आताची उपलब्ध झाली असल्याने आपणाला जे सापेक्ष आहे ते कसे निरपेक्ष करता येईल याच्या शक्यता आजमावता येतात . यासाठी सत्याशी सतत वाटाघाटी कराव्यास लागतील पण त्याआधी आपणाला या वास्तवाशी अधिक वाटाघाटी नीट नेटक्या कराव्या लागतील हबल ही याची सुरुवात होती परंतु आपण अजूनही त्याबाबतीत प्राथमिक अवस्थेतच आहोत मी म्हणतो आहे ते कदाचित पुढच्या पिढ्यांना अधिक चांगले समजेल असे मला वाटते . वास्तवाशी सतत आणि सातत्यपूर्ण वाटाघाटी हा सत्याचा मार्गच आहे त्याबद्दल शंका असू नये. दुर्दैवाने भारतामध्ये या अंगाने विचारही होत नाही म्हणजे चौथ्या नवतेचा विचार म्हणजे काय तरी फालतुगिरी आहे असे उगाच काही जणांना वाटते त्यांना नेमके काय चाललेले आहे संसारामध्ये हे सुद्धा माहीत नसतं . बक्कल लावून बसलेली अक्कल असे मी कोल्हापुरात याला म्हणायचो. 


अर्थात या पुढचा प्रश्न आणखीन वेगळा आहे तो म्हणजे प्रत्यक्ष ब्रम्हांड आपल्याला ज्ञान देण्याला सज्ज आहे का की ते आपणाला ज्ञान होऊ देत नाही . भारतीय परिभाषेमध्ये ते माया थाटून बसलेले आहे का ? आणि ही माया जर का पुन्हा पुन्हा आपला पराभव करणार असेल तर आपण सत्यापर्यंत कसे काय पोहोचणार ? केवळ उपयुक्तता वादाच्या कसोट्या लावून उपयुक्त आहे तेवढे सत्य असे म्हणता येणे आता अशक्य बनत चाललेले आहे किंबहुना पूर्वीही ते अशक्यच होते व्यवहारवादाच्या व्यवहारिक पातळी पुरते कदाचित उपयुक्त तेच व्यवहारिक असू शकते परंतु जे व्यवहारिक आहे ते अंतिम सत्य असेल असे नाही कदाचित शक्य आहे की ते मायाचा कारभार आहे . असेल चे सर्वात मोठे योगदान जे काही आहे त्यामध्ये एक मोठे योगदान म्हणजे त्याने व्यवहार वादातल्या उपयुक्ततावादी सिद्धांतांची मांडणी ही किती absurd आहे हे दाखवून दिले . रसेलच्या मते सत्य हे उपयुक्ततेच्या पलीकडे असणारच आणि सुदैवाने ते तसे आहे . किंबहुना म्हणूनच तर सत्य सुंदरसुद्धा आहे . पर्यावरणाची नासाडी करायला निघालेल्या लोकांना सत्याचे सौंदर्य पर्यावरणामुळे शाबूत राहते इतके बेसिक सुद्धा कळत नसते आणि म्हणूनच प्रचंड गोंधळ व्यवहाराच्या पातळीवर उपस्थित होतात. याला मी व्यवहारिक हलकटपणा म्हणतो . उपयुक्तता वादाला तो कधी दिसला नाही आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हिंदुत्ववादावर उपयुक्तता वादाचा प्रचंड प्रभाव वाया सावरकर पडलेला आहे . विल्यम जीएमसी सर्वात मोठी शोकांतिका हीच होती की तो शेवटी व्यवहारवादाच्या नावाखाली उपयुक्तता वादापर्यंत पोहोचला आणि याचा एक परिणाम किंवा दुष्परिणाम असा झाला की अमेरिका व्यवहारवादी आणि उपयुक्ततावादी अशाच अंगांनी चालत राहीली आणि जगभरच्या पर्यावरणाची नासाडी करत राहीली मी हे नेहमीच मांडत आलेलो आहे की कुठलेही राष्ट्र नेमके कोणते तत्वज्ञान स्वीकारते हे नीट पाहिले पाहिजे कारण त्यांची सगळी पॉलिसी त्या तत्त्वज्ञानानुसार चाललेली असते आणि हे आपल्याला अनेकदा लक्षात येत नाही. सेक्युलर वादा मधला सर्वात मोठा प्लस पॉईंट हाच होता की इतरांच्या असण्याची शक्यता तिथे स्वीकारली जाते परंतु ज्यांच्या असण्याची शक्यता तुम्ही स्वीकारतात त्यांना दुसऱ्यांच्या असण्याची शक्यता मान्य होत नसेल तर काय करायचे या संदर्भात काही भूमिका त्यांनी घेतली नाही . आणि इथे हिंदुत्ववाद पुन्हा प्रकट होतो. सत्य हे स्वतःच्या हितसंबंधावर निर्धारित करायचे नसते ते तसे होत नसते . सत्य हे पूर्णपणे स्वयंभू आहे आणि ते माणसावर आणि माणसांच्या गरजांच्यावर अवलंबून नाही. आम्ही जेव्हा शिव हे स्वयंभू आहे असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ हा असतो की जे शून्य आहे जे सत्य आहे ते स्वयंभू आहे. उद्या जर का सत्याला असे वाटले की संपूर्ण मानव जातच फेटाळून लावावी तर त्याला क्षण सुद्धा पुरेसा आहे . आणि त्याचे वाटणे हे मानवी वाटण्याशी निगडित नाही .


माणसाला शिवाबाबत सत्याबाबत शून्याबाबत इतकी मूलभूत गोष्ट जरी कळाली तरी खूप झाले. 

(क्रमशः )


श्रीधर तिळवे नाईक

ईश्वर, देव, God, उपयुक्ततावाद ,व्यवहार वाद, आणि सत्य २ श्रीधर तिळवे नाईक


गेले दोन दिवस जावेद अख्तर यांच्यामुळे आणि God बद्दल जो लल्लनटॉप वर वाद झाला त्यामुळे एक चर्चा सुरू झालेली आहे. याबाबत शैव काय म्हणतात आणि ईश्वरी संकल्पना काय आहे हे सांगणे आवश्यक वाटते म्हणून हा सर्व खटाटोप पुन्हा करतो आहे. यातले सर्व मुद्दे पूर्वी मांडले गेले होते फक्त ते वेगवेगळ्या लेखात असलेले यानिमित्ताने एकत्र आणतो आहे .


शिव सत्य असेल पण ईश्वर सत्य आहे का हा खरा प्रश्न आहे ? याचे कारण असे की शिव म्हणजे शून्य शक्ती म्हणजे अनंतता ! यांनी मिळून संसार निर्माण होतो आणि या संसारामध्ये शिवाची जी उपस्थिती आहे ती महाप्राणाची आहे आणि हा महाप्राण म्हणजे ईश्वर होय ही शैवांची संकल्पना आहे . याचा अर्थ स्पष्ट आहे की ईश्वर हा चौथ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर नाही आणि मुळातच ईश्वर ही संकल्पनाच शैव लोकांनी जन्माला घातली . ती आधी कुठल्याच श्रद्धेत नव्हती धर्मात नव्हती . या ईश्वराकडून या महाप्राणाकडून आणि शक्तीकडून जीवन आणि जीव निर्माण झाला आणि या जीवामध्ये जो प्राण आहे तो प्रत्यक्षात महाप्राणाचा भाग आहे प्राण आणि महाप्राण हे भिन्न नाहीत ते अभिन्न आहेत शैव भाषेत अभेद आहेत . म्हणजे असेही म्हणता येते की प्राण नाहीच फक्त महाप्राण अस्तित्वात आहे . जे कृष्णमूर्ती हेच सत्य वेगळ्या भाषेत सांगतात ते म्हणतात की संपूर्ण विश्वाला एकच mind आहे . पाश्चात्त्य देशांना अजूनही ही संकल्पना नीट पचवता आलेली नाही . मी स्वतः माईंड हा शब्द वापरत नाही कारण शैव धारेमध्ये माइंड हा शब्द प्रामुख्याने मन म्हणून येतो आणि तो भावशक्तीशी संबंधित आहे . म्हणजेच जीवाजवळ शरीर असते बुद्धी असते त्याचप्रमाणे मनही असते. मन हे भाग आहे पण पाश्चात्त्य देशांमध्ये जे कृष्णमूर्ती जेव्हा बोलतात तेव्हा ते अनेकदा पाश्चात्य संकल्पना सुद्धा वापरतात आणि म्हणूनच ते म्हणतात की संपूर्ण विश्वाचे एकच माईंड आहे . त्यांना प्रत्यक्षात म्हणायचे असते की संपूर्ण विश्वाचा एकच महाप्राण आहे पण शैव परिभाषेशी संबंध नसल्याने हा गोंधळ निर्माण झालेला आहे . मन हा शब्द वापरल्याने किती मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो याची कल्पना बहुतेक जे कृष्णमूर्ती यांना नसावी. त्यांनी पाश्चात्त्य देशातील माइंड आणि मॅटर यांच्या मधला वाद इथे जोडला आहे .त्यांनी ही गोष्ट लक्षातच घेतली नाही की जुडाईक परंपरेमध्ये फक्त भाव तंत्र आहे ज्ञानतंत्र नाही क्रिया तंत्र नाही शक्ती तंत्र नाही जोगतंत्र नाही आणि मोक्षही नाही. त्यामुळे साहजिकच त्यांच्यासाठी प्राण अस्तित्वातच नाही त्यांच्यासाठी फक्त मन अस्तित्वात आहे आणि बुद्धी व शरीर दुय्यम आहे .


उपयुक्तता वाद हा सुद्धा त्यामुळे जुड्याईक परंपरेमध्येच राहतो आणि त्यातून अनेक गोंधळ निर्माण होतात. म्हणजे उपयुक्तता वाद अनेकदा असे सांगतो की ईश्वर ही एक उपयुक्त संकल्पना आहे आणि जवळजवळ हाच धडा नंतरचा व्यवहार वाद सुद्धा गीरवतो. म्हणजे माणसाला नैतिक धारणा देण्यासाठी ईश्वरी संकल्पना उपयुक्त असल्याने आपण तिचा वापर केला पाहिजे किंवा ती व्यवहाराला उपयुक्त असल्यामुळे व्यवहारवादामध्ये तिचा वापर आपण केला पाहिजे असे व्यवहार वास सांगणाऱ्या तत्त्वज्ञानांना आणि त्याचा पुरस्कार करणाऱ्या अनेकांना वाटते. आता गमतीचा भाग असा आहे की जर का ईश्वर नाही असे वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे सिद्ध होत असेल तर एरव्ही वैज्ञानिक पुरावा स्वीकारणारा व्यवहार वाद इथे मात्र का शेण खातो ? वास्तविक व्यवहारवादाचा सिद्धांत जर का आपण बघितला तर वैज्ञानिक प्रामाण्य हे तिथे फार महत्त्वाचे त्यामुळे ईश्वर नाकाला पाहिजे परंतु तरीसुद्धा उपयुक्तता ही कसोटी लावून ईश्वर स्वीकारला जाऊ शकतो आणि ही जी जागा आहे ती उपयुक्तता वादाला आणि व्यवहारवादाला दुबळी बनवते .


प्रश्न असा आहे की ईश्वरी संकल्पना मग युरोपियन पद्धतीने कशी काय भारतात आली ? तर सर्वात प्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे की ही संकल्पना आत्मसात केली गेली प्रत्यक्षामध्ये ती वैदिक युरेशियन परंपरेमध्ये अस्तित्वातच नव्हती . याचे कारण उघड आहे वैदिक परंपरा ही बहुदेववादी परंपरा आहे त्यामुळे तिच्यामध्ये अनेक देव आहेत आणि होते. एकच एक देव प्रमुख केला पाहिजे ही संकल्पनाच मुळात वैदिक धर्मात आणि नंतरच्या ब्राह्मण धर्मात नाही. एका अर्थाने आपण असे म्हणू शकतो की ब्राह्मण धर्म हा अत्यंत व्यवहारवादी आहे आणि हा व्यवहार ब्राह्मणांच्या स्वार्थांशी निगडित असतो . धर्म ही उपयुक्त गोष्ट असल्याने आपण ती स्वीकारली पाहिजे आणि धर्माच्या आधारे आपल्याला राज्य प्रस्थापित करता येत असल्यामुळे आणि आपल्याला स्वतःला सर्वोच्च वर्ण म्हणून स्थापित करता येत असल्यामुळे आपण धर्म स्वीकारला पाहिजे अशी ब्राह्मण धर्माची कळत नकळत जडणघडण असते आणि त्यामुळे सगळी मांडणी ही त्या अंगाने येते यामुळेच मग जेव्हा इंद्र हा देव किंवा यज्ञ उपयुक्त ठरत नाही तेव्हा तो सहज रित्या त्या देवाला फेकून देतात आणि विष्णू हा देव उपयुक्तता वादाच्या अंगाने डेव्हलप करत नेतात. हीच गोष्ट ते शिवबाबत करतात . ते रुद्र ही संकल्पना वापरत त्यामध्ये शिव विरघळवत नेतात याचा दुष्परिणाम असा होतो की रुद्र हाच शिव असा प्रचार मग तयार होतो आणि तो इतका मोठ्या प्रमाणात केला जातो की हळूहळू शिव आणि रुद्र एक होऊन जातात . वास्तविक पूजा ही संकल्पनाच मुळात वैदिक धर्मामध्ये नाही . त्यामुळे साहजिकच ती ब्राह्मण धर्मात पण नाही परंतु पूजा स्वीकारावी लागेल कारण उपयुक्तता वादाच्या तत्त्वावर व्यवहारवादाच्या तत्वावर आता जर का आपल्याला आपले पौराहित्य टिकवायचे असेल तर आपण बदलले पाहिजे हे लक्षात आल्याने मग एकीकडे वेद प्रमाण मानायचे पण दुसरीकडे वैष्णव नावाचा नवीन धर्म निर्माण करायचा असा प्रकार सुरू होतो यातूनच मग वेदातलीच एक देवता जे अत्यंत दुय्यम होती ती विष्णू ही देवता निवडली जाते आणि मग हळूहळू हरी ही संकल्पना जी आत्तापर्यंत वेदांमध्ये जवळजवळ शत्रू सारखी आहे ती अधिक वाढवत नेली जाते 


या सर्वांमध्ये देव ब्राह्मणांना निर्माण करत नसून अनेकदा ब्राह्मणच देवांना निर्माण करतात असे चित्र निर्माण होते. साहजिकच मग शिवाचे काय करायचे तर त्याला सुद्धा एक देव स्वरूप दिले पाहिजे म्हणून मग महादेव नावाची संकल्पना निर्माण केली जाते आणि ती व्यवस्थित भारतामध्ये प्रचलित केली जाते . त्याचे प्राचीनत्व स्वीकारले जाते तो आपल्या आधी आहे हेही स्वीकारले जाते . हळूहळू त्यानेच वेद निर्माण केले अशी ही संकल्पना मांडली जाते. साहजिकच मग एकदा वैदिक प्रामाण्य तुम्ही स्वीकारले की आपोआपच ब्राह्मण धर्मातला वर्णाश्रम सुद्धा तुम्ही स्वीकारता . वर्णजात व्यवस्था स्वीकारता. पण प्रश्न तसाच राहतो तो म्हणजे ईश्वर कसा निर्माण झाला हा संसार कसा निर्माण झाला ? 


आपण जर का बारकाईने पाहिले तर आपणाला असे दिसते की संसाराच्या निर्माण होण्याचा जो शैव सिद्धांत आहे तो स्वीकारला जात नाही . त्याएवजी ब्रह्म किंवा पुरुष ही संकल्पना आणली जाते . आणि ब्रह्मदेवाने संसार निर्माण केला असे तत्व प्रस्थापित केले जाते. साहजिकच मग प्रश्न निर्माण होतो की हा संसार कोणी निर्माण केला त्यासाठी मग ब्रह्मदेव नावाचा देव आणला जातो . ब्रह्मदेवाने हा संसार कसा काय निर्माण केला . त्यातूनच मग त्याने प्रथम स्त्रीला निर्माण केले हा सिद्धांत येतो पण प्रॉब्लेम असा येतो की ब्रह्मदेवाने जर काय प्रथम स्त्री निर्माण केली तर तो तिचा बाप होतो आणि त्यामुळे तिच्यापासून ब्रह्मदेव संतान निर्मिती करायला जातो आणि यातूनच मग फार नैतिक पेच तयार व्हायला लागतात यातून पळ काढण्यासाठी मग शापाची संकल्पना येते आणि ब्रह्मदेवाची पूजा करू नये असा सिद्धांत तयार करावा लागतो. राम आणि कृष्ण हे मूळचे स्थानिक लोकांचे असलेले शैव आदर्श पूर्णपणे बदलून टाकून त्यांच्या आधारे महाकाव्य निर्माण होते आणि अवस्था अशी होते की मूळचा सकाळचा सूर्य असणारा सकाळचा राम हा विष्णूचा अवतार बनतो तर संध्याकाळचा सूर्य असणारा श्याम रात्रीचा सूर्य असणारा कृष्ण हे दोघेही विष्णूचे अवतार बनतात. म्हणजेच इथे माणूसच ब्राह्मणच देव निर्माण करताना दिसतात. भारताची विशेषता हीच आहे की तिथे हे सर्व एका अर्थाने नोंदवले गेले आहे . युरोपमध्ये मात्र याची नोंदणी नीट झालेली नाही .


कुठल्याही ईश्वर वादाविषयीचा जेव्हा डिबेट सुरू होतो तेव्हा साहजिकच देवाने माणूस निर्माण केला की माणसाने देव निर्माण केला हा सर्वात पहिला प्रश्न असतो. या अंगाने येणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच असतो की जर का ईश्वराने संसार निर्माण केला असेल तर मग ईश्वराला कोणी निर्माण केले. जैन लोकांनी हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे आणि शेवटी त्यांनी दिलेले उत्तर असे आहे की ईश्वर अस्तित्वात नाही किंबहुना जगामध्ये सर्वात प्रथम निरीश्वर वाद व्यवस्थित कोणी मांडला असेल तर तो जैन लोकांनी मांडलाय शेवटी मग जैन धर्माचा निष्कर्ष असा असतो की ईश्वर अस्तित्वात नाही आणि विश्व स्वयंभू आहे . म्हणजेच मूळ मुद्दा ईश्वर स्वयंभू आहे की विश्वस्वयंभू आहे? जावेद अख्तर जेव्हा या संदर्भात डिबेट मध्ये भाग घेतात तेव्हा त्यांना भारतीय परंपरा बहुतेक माहीत नसते जैन परंपरा त्यांना माहित नसते त्यांना असे वाटते की हे सगळे काही पाश्चात्त्य देशात सुरू झालेले आहे परंतु प्रत्यक्षामध्ये मूळचा हा डिबेट शैव लोकांच्यातला आणि महावीर प्रणित जैन धर्मातील लोकांच्यातला होता . तुम्ही जर ईश्वराने संसार जन्माला घातला ही संकल्पना घेतली तर मग ज्याने जन्म दिला त्याला कोणी जन्माला घातले असा प्रश्न निर्माण होतो आणि हे नेव्हर एंडिंग आहे म्हणूनच आपण हे विश्व कोणी जन्माला घातले हा प्रश्न विचारू नये असे जैन म्हणतात त्यापेक्षा विश्व स्वयंभू आहे हे जर का स्वीकारले तर प्रश्न मिटतो त्या उलट बुद्ध हा प्रश्न अव्याकृत म्हणून सोडून देतो त्याऐवजी आता जो माझ्या पुढचा संसार आहे त्या संसारामध्ये मला निर्वाण कसे मिळेल हा मूलभूत प्रश्न बुद्ध विचारतो कारण निर्वाणासाठी ईश्वराची आवश्यकता नाही असे त्याचे म्हणणे आता हे म्हणणे कुठून येते तर ही मुळातच ज्ञानतंत्राची संकल्पना आहे. ज्ञान तंत्रामध्ये ईश्वराची गरज नाही योग तंत्रामध्ये जोगतंत्रामध्ये ईश्वराची आवश्यकता नाही क्रिया तंत्रामध्ये ईश्वराची आवश्यकता नाही मग आवश्यकता कुठे आहे तर भावतंत्रामध्ये ईश्वर आवश्यक बनत जातो कारण भावना ह्या नेहमीच सगुण असतात आणि त्यांना काहीतरी समूर्त आणि सगुण द्यावे लागते. शैवांचा ईश्वर हा असा भावतंत्रासाठी म्हणून जास्त प्रचलित केला गेला आहे आणि त्या ईश्वराच्या संदर्भातच मग भगवान महावीर यांनी प्रथम युक्तिवाद सुरू केले . अधिक खोलात गेले तर आपणाला असे दिसते की मुळात निर्माण आणि निर्मिती यांच्यात भेद मानला तरच हा प्रश्न निर्माण होतो. शैव असला भेद मुळात मानतच नाहीत त्यामुळे ईश्वर म्हणजेच महाप्राण आणि संसार वेगळे मानले जात नाहीत. इतकेच कशाला प्राण आणि महाप्राण सुद्धा वेगळे नसतात फक्त शरीराच्या उपस्थितीमुळे शरीरातील महाप्राण हा स्वतंत्र प्राण वाटतो ही शैवांची धारणा आहे . हा प्राण जेव्हा स्वतःला स्वतंत्र समजायला लागतो तेव्हा मग मद तयार होतो मग मन तयार होते अहंकार तयार होतो अहं तयार होतो . स्व तयार होतो .


पण ज्या क्षणी प्राणाला कळते की आपणच महाप्राण आहोत त्या क्षणी मोक्ष प्राप्ती होते . जोपर्यंत मी असतो तोपर्यंत मोक्ष असत नाही आणि जेव्हा मोक्ष असतो तेव्हा मी असत नाही .


याउलट सर्व जुडाइक धर्मामध्ये ईश्वर वेगळा आणि विश्व वेगळे असते अनेकदा तर हे विश्व म्हणजे फक्त पृथ्वी आहे त्यापलीकडे काही असते याची फारशी कल्पना या धर्मांना नाही . त्यामुळेच दिवस ही संकल्पना सुद्धा मानवी असून सुद्धा ते ईश्वराला लावतात आणि हे विश्व गॉड ने सात दिवसात तयार केले असे मानतात जणू काय दिवस ही फुटपट्टी माणसाची असली तरी ती जणू देवाची पण होती. साहजिकच हा सगळा डिबेट मग इस्लाम मध्ये सुद्धा अवतरतो आणि तो कसा अवतरतो त्याचे प्रत्यंतर आपण आत्ता नुकतेच लल्लनटॉप वरच्या या वादामध्ये पाहिलेले आहे . 


वास्तविक यातला एक मुख्य युक्तीवाद म्हणजे God हा ज्ञानाच्या कक्षेत येत नाही तो मेटा फिजिकल आहे प्रत्यक्षामध्ये ही संकल्पना ना वैदिक आहे ना शैव आहे .शैवांच्या मध्ये ईश्वर ही संकल्पना मुळातच शिव आणि शक्ती यांच्यामुळे आपणाला ज्ञात होत असल्याने ती ज्ञानाच्या कक्षेत येते आणि तिच्यावर चर्चा झाली पाहिजे. शैव तिला मेटा फिजिकल मानत नाहीत त्यांच्या मते हे सर्व फिजिकल आहे . अगदी विचार सुद्धा ते केमिस्ट्री आहे असेच म्हणतात . विचारांना सुद्धा वजन असते हे त्यांना मान्य आहे भले ते अतिशय सूक्ष्म असेल पण असते . त्यामुळे आपल्याकडे प्रत्यक्षात काय असते तर आपल्याकडे ईश्वर नावाचा विचारच असतो आणि म्हणूनच ईश्वरावर वाद होऊ शकतात अगदी God हा सुद्धा एक विचार असतो आणि संस्कार असतो . जेव्हा एखादी गोष्ट विचार व संस्कार यांच्यामध्ये सापडते तेव्हा ती आपोआपच वैचारिकतेत येते. त्यामुळे आस्तिकतेचा जो हा विचार आहे की God हा मेटा फिजिकल आहे तो चुकीचा आहे . 


वैदिकांची देव ही संकल्पना आणि युरोपियन लोकांची देव ही संकल्पना एकच आहे दोघेही मूर्त असतात सगुण असतात फक्त युरोपियन लोक सुद्धा ग्रीक धर्मामध्ये बहुदेववादी होते आणि ते नंतर जुडाईक होऊन एक देववादी झाले ख्रिश्चन झाले . आणि याला जबाबदार रोमन लोक होते त्यांनी रोमन कॅथॉलिक नावाचा एक धर्म तयार केला आणि संपूर्ण युरोप वर युरेशियन प्रभुत्व लादले . मी मागेच म्हटल्याप्रमाणे युरेशियन लोकांना ही अत्यंत घाणेरडी सवय आहे ते व्यवस्थितपणे सर्व सत्ता आपल्या हाताखाली आणतात आणि त्यासाठी धर्माचा वापर करतात. आजही ग्रीक धर्मामध्ये मोक्ष ही संकल्पना होती की नव्हती हा एक वादाचा विषय आहे कारण तिथे सुद्धा हेरॉकलिटीस आणि पायथागोरस हे अशा प्रकारच्या कुठल्यातरी मुक्तीच्या संकल्पनेच्या दिशेने नक्कीच विचार करत होते प्रत्यक्षात त्यांना ती मुक्ती मिळाली नाही आणि पुढचा गोंधळ तयार झाला. किंबहुना त्यांच्यानंतर कदाचित मुक्तीकडून ते मोक्षाकडे गेले असते परंतु ते तसे गेले नाहीत कारण अचानकपणे रोमन लोकांनी आक्रमण करून तिथे हा सगळा जो विचार होता तो सगळाच्या सगळा नाहीसा केला आणि आपल्या अत्यंत हृस्व दृष्टिकोनातून जग तयार केले. साहजिकच मग ग्रीक तत्त्वज्ञानाचे युग नाहीसे झाले आणि त्या जागी रोमन कॅथॉलिक धार्मिक अंधार पसरला.


असाच प्रकार आरब स्थानात होता तिथे सुद्धा बहुदेव वाद होता तो रोमन कॅथोलिक आणि जुडाईक परंपरेच्या प्रभावाखाली येऊन एक देव वादी झाला म्हणजे इथे सुद्धा युरेशियन लोकांचे तत्त्वज्ञान राजकीय तत्वज्ञान बनले आणि इस्लाम या युरेशियन राजकीय तत्त्वज्ञानाची सर्वोच्च आविष्कृत शैली बनली इस्लामने आफ्रिकेतले सगळे प्राचीन धर्म नाहीसे केले आणि तिथे आपला धर्म लादला. 


साहजिकच लल्लन टॉप वर जो डिबेटसुद्धा झाला तो विचित्र होता कारण तो चक्क जुडाईक होता. या डिबेटचा आणि भारतीय धर्मांचा संबंध काय हा प्रश्न मूलभूत प्रश्न आहे आणि तो कोणी विचारलाच नाही जणू काय भारत हा काहीतरी जुडाईक परंपरेमध्ये वावरत असतो असा गैरसमज दोन्ही वक्त्यांचा होता आणि एक हिंदू ज्याला स्वतःला हिंदू म्हणजे काय माहित नाही भारतीय धर्म म्हणजे काय माहित नाही हा डिबेट कंडक्ट करत होता . कॉन्व्हेंट मधल्या शिकलेल्या लोकांसाठी त्यामुळे हा साहजिकच चर्चेचा विषय झाला . कॉन्व्हेंट चा सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की कॉन्व्हेंट नेहमीच भारतीय धर्मांच्या पासून विद्यार्थ्यांना तोडते . ही एक ख्रिश्चन कॉन्स्पिरसी असते पण ती कळत नाही . अगदी महात्मा ज्योतिबा फुले यांना सुद्धा ती कळाली नाही तिथे इतरांच्या बाबतीत काय बोलावे ? 


प्रॉब्लेम असा आहे की अनेकांचा असा गैरसमज आहे की ईश्वर ,देव आणि God या संकल्पना एकच आहेत . हा भ्रम पुरोगामी लोकांनी तयार केला प्रत्यक्षामध्ये या पूर्णपणे तीन वेगळ्या कल्पना आहेत यातील देव ही संकल्पना बहुदेववादाशीच निगडित आहे त्या उलट God अल्लाह ही संकल्पना हळूहळू एक देव वादाशी निगडित झाली आहे पूर्वी ती बहुदेववादाशीच निगडित होती. आपल्याकडे सुद्धा नंतर याच प्रवाह खाली शिव शैव आणि वैष्णव विष्णू असे दोन एक देववादी धर्म तयार झाले आणि हे प्रामुख्याने ब्राह्मण लोकांनी तयार केले . मात्र बहुदेव वाद सुटला का? तर नाही कारण मुळातच ब्राह्मणांना अनेक देव लागतात कारण जेवढे देव तेवढी दक्षिणा हे समीकरण त्यांना व्यवस्थित माहिती आहे.


हे देव इतके वाढत गेले की शेवटी नाईलाजाने आचार्य शंकर यांनी पंचायतन दिले ते म्हणजे शिव,शक्ती, गणपती, स्कंद आणि सूर्य ! पुढे आद्य शंकराचार्य यांनी ते शिव ,शक्ती, गणपती ,स्कंद आणि विष्णू असे केले तर त्या पुढचे पाऊल रामानुजाचार्य यांनी टाकले आणि त्यांनी स्कंद बाजूला करून त्या जागी सूर्य आणला आणि विष्णू मुख्य केला. 


भारतामध्ये त्यामुळे ईश्वर ही संकल्पना फक्त शैव धर्मात उरली . प्रबोधन काळामध्ये हा ईश्वर पुन्हा एकदा जुड्याईक परंपरेशी जोडला गेला आणि त्यातूनच ईश्वर = God हा आजचा गोंधळ सुरू झाला .


सावरकर यांनी गाय हा उपयुक्त पशु आहे असे म्हटले होते याच काळामध्ये ईश्वर ही उपयुक्त संकल्पना आहे असे व्यवहार वाद सांगायला लागला .या दोन्ही संकल्पनांच्यात खरोखर काही फरक आहे का असा प्रश्न विचारता येतो . सावरकर उपयुक्ततावादी आहेत तर व्यवहार वाद हे त्याचे आधुनिक रुप आहे.


त्यामुळे साहजिकच रसेल यांच्या वाय आय एम नॉट ख्रिश्चन या ग्रंथाचा प्रचंड प्रभाव या डिबेटवर पडलेला दिसतो . युरोपच्या प्रबोधन युगामध्ये ज्या काही संकल्पना आल्या त्यामधली एक संकल्पना म्हणजे फ्री विल होय साहजिकच धर्मवादी लोक ही संकल्पना वापरतात याचे कारण असे आहे की या जगामध्ये प्रचंड हिंसा होते या जगामध्ये प्रचंड अन्याय असतो युद्ध असतात या सर्व गोष्टींना अर्थात त्या हिंसेला सुद्धा God जबाबदार आहे की नाही असा प्रश्न येतो.


गाजा पट्टीमध्ये झालेला हिंसाचार यामुळे केंद्रस्थानी आला. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी म्हणूनच सैतान संकल्पना निर्माण झाली . म्हणजे जगात जे काही वाईट होते त्यामागे सैतान असतो आणि God तुमची परीक्षा घेण्यासाठी म्हणून सैतानाला वापरत असतो असे उत्तर धर्माने दिले प्रश्न असा आहे की जर God परम दयाळू असेल तर त्याला हे सर्व करण्याची गरज काय ? या प्रश्नापासून सुटका करून घेण्यासाठी म्हणून मग माणसालाच फ्री वील दिली आहे असे समीकरण मांडले गेले आणि हे समीकरण पुरोगामी आहे . या संपूर्ण डिबेटमध्ये या पुरोगामी संकल्पना वारंवार वापरल्या गेल्या मात्र ज्यांनी त्या वापरल्या त्यांनी हे सांगितले नाही की या जुन्या पुरोगामी व मध्ययुगीन संकल्पना आहेत. 


प्रश्न असा आहे की मगया बाबतीत शैव काही सांगतात की नाही ? तर याबाबतीत उत्तर स्पष्ट आहे ते म्हणजे शक्ती स्वभावत: अनंत आहे ती नेहमीच प्रसरण पावत असते आणि त्यामुळेच शिव आणि शक्ती यांनी युक्त असलेल्या जीवामध्ये सुद्धा दोनच शक्यता तयार असतात एक मोक्षाची शक्यता असते आणि दुसरी अनंत होत सतत पसरत जाण्याची व्याप्ती वाढवण्याची शक्यता असते . जीव जेव्हा व्याप्ती वाढवायला निघतो तेव्हा मग त्याच्या हातून अनेक गोष्टी घडायला लागतात त्यातील एक गोष्ट म्हणजे समोरच्या माणसाचा प्रदेश आणि जीव बळकावणे . हे सर्व प्रसार पावण्याच्या शक्तीच्या सर्व काही व्यापत जाण्याच्या स्वभावामधून निर्माण होते . प्रचंड प्रसरण पावणे हे आज सुद्धा या ब्रम्हांडात चालू आहे. संसारात चालू आहे . याला मी नेहमी इन्फिनिटींग infiniteing हा शब्द वापरतो . शक्ती ही अशी इन्फिनिटीच होत जाते आणि आपण तिच्या या प्रसरण पावण्याच्या उद्योगाचे केवळ भाग आहोत आणि जेव्हा तुम्हाला हा सगळा उद्योग कळत जातो त्यातली निरर्थकता कळत जाते तेव्हा तुम्ही मग शांतपणे पुन्हा शून्यात परतण्यासाठी यात्रा सुरू करता आणि हिलाच मोक्षाची यात्रा म्हणतात . जीव हा मोक्षात परतू शकतो विशेषता मनुष्य म्हणून मोक्षात परतु शकतो शून्यात परतू शकतो ही त्याची सर्वात मोठी खासियत आहे .


जुड्याईक धर्माचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ते शेवटपर्यंत देववादात एक देव वादात अडकून राहतात ईश्वरवादाकडे येतच नाहीत डिबेट करणाऱ्या आणि डिबेट स्पॉन्सर आणि कंट्रोल करणाऱ्या एकालाही हे कळलेले दिसत नाही . भारतात जन्मून सुद्धा भारत न कळणारे असे खूप लोक आहेत. म्हणून तर हिंदुत्ववाद निर्माण झाला व तो पण आश्चर्यकारकरीत्या युरोपियन आणि युरेशियन होत जातो . शैव श्रुतीची किती आवश्यकता आहे हे या डिबेटमध्ये पुन्हा एकदा लक्षात येते .


याचा अर्थ स्पष्ट आहे तो म्हणजे ईश्वराचे सत्याशी काहीही देणे घेणे नाही .God चे काहीही देणे घेणे नाही. या दोन्ही शेवटी अंतिमतः धार्मिक संकल्पना बनून राहतात . सत्य या दोघांच्या पलीकडे शिव आणि शक्ती म्हणून आहे. शून्य आणि अनंत म्हणून आहे .


श्रीधर तिळवे नाईक


उपयुक्ततावाद , उत्तर - व्यवहार वाद , आहार आणि सत्य ३ संस्काराहारी की नि:संस्काराहारी श्रीधर तिळवे नाईक 


व्यवहार वादामध्ये नेहमीच एक प्रश्न उपस्थित होतो आणि तो प्रश्न असतो प्रोसेसचा ! म्हणजे सायन्सचा विचार करताना सायंटिफिक प्रोसेस म्हणजे काय असा मूलभूत प्रश्न व्यवहारवाद विचारतो तिची मांडणी करतो. आणि नंतर मग साहजिकच या सायंटिफिक प्रोसेसला काही मर्यादा असतात का असा प्रश्न उपस्थित होतो . उत्तराधुनिकतेमध्ये नंतर सायन्सला आव्हान देणारा जो डिस्कोर्स आला त्याला कळत नकळत उत्तर व्यवहारवाद जबाबदार होता. त्यानेच संपूर्ण सायंटिफिक प्रोसेस ही कधीकधी कशी पूर्वग्रहदूषित असते याची मांडणी करायला सुरुवात केली आणि त्यातून अनेक गोष्टी निर्माण झाल्या. विज्ञानाबद्दल शंका निर्माण करण्यामध्ये सायंटिफिक प्रोसेस म्हणजे काय तिला काही मर्यादा आहे की नाही किती खरोखरच संपूर्ण सत्य शोधू शकते या प्रश्नांचा प्रचंड वाटा आहे आणि आजचा जो पोस्ट ट्रूथ डिस्कोर्स उभा राहिलेला आहे त्याला सुद्धा कळत नकळत या सायंटिफिक प्रोसेस म्हणजे काय या मूलभूत प्रश्नाने चालना दिलेली आहे . अर्थातच दुसरा घटक जो जबाबदार आहे तो रसेलपासूनच सुरू होतो आणि कार्ल प्रॉपर ने सायन्स विषयक जे लिखाण केले तेही याला जबाबदार आहे आणि अर्थातच पुढे व्हिटगेस्टाईन! 


आपण करत असलेल्या या मांडणीमुळे पुढे धर्म नावाचा अत्यंत पारंपारिक असा ढोबळ दृष्टिकोन डॉमिनेट होत जाईल याची कल्पना उत्तरव्यवहारवादाला अजिबात आलेली नव्हती नाहीतर त्यांनी आधीच काही सोल्युशन शोधली असती त्यामुळे साहजिकच आता ही जबाबदारी चौथ्या नवतेतल्या विचारवंतांच्यावर पडलेली आहे.


बायस अथवा पूर्वग्रह ही एक वैज्ञानिक संकल्पना आता विचारात घ्यावी लागते याचे कारण माणसाला होणारे ज्ञान आणि खुद्द माणूस यांच्यातला करस्पोंडन्स हा माणसावर कितपत अवलंबून असतो हा निर्माण झालेला प्रश्न होय. भारतामध्ये आपण सुरुवातीपासूनच सांगतो आहे की माया नावाची गोष्ट अस्तित्वात आहे आणि माझे स्वतःचे याबाबतीतले म्हणणे असे की वास्तव उपस्थित असते परंतु त्या वास्तवाचे जे आकलन असते त्या वास्तवाशी जो करस्पॉन्डन्स होतो तो माया असतो. म्हणजेच माया वास्तवच असते आणि तरीही संपूर्ण वास्तव नसते. माया ही नेहमीच पोझिशनल असते . भारतातल्या शैव लोकांना ही गोष्ट नेमकी कशी काय कळली हा एक फार मोठा प्रश्न आहे परंतु भारतामध्ये आचार्य शंकराचा आणि आद्य शंकराचार्यांचा जो फार मोठा वाटा आहे तो ह्या संदर्भातला आहे . आद्य शंकराचार्य यांचा सामाजिक क्षेत्रातला वर्णजातवाद जो खरा आहे की नाही की त्यांच्या नावाने खपवला गेला हा फार मोठा प्रश्न असला तरी मायेच्या संदर्भातली त्यांची मांडणी अतिशय महत्त्वाची ठरत जाते. अर्थातच तत्कालीन काळामध्ये विज्ञान जास्त उपलब्ध नसल्याने त्यांना त्याचा अंदाज संपूर्ण आलेला नाही . मात्र शैवांची माया ही धारणा नेमकी काय आहे हे त्यांना नीट कळले होते किंबहुना त्यांना नंतर जो शंकराचा अवतार मानण्याचा विचार पुढे आला तो यासाठीच आला.शैव यासाठी वापरत असणारा शब्द आहे आदिमाया ! आणि हा प्रामुख्याने शक्तीच्या प्रतीत होणाऱ्या संवेदनशील इंद्रिय शील होणाऱ्या रूपाबद्दलचा शब्द आहे. यातूनच मग माणसाची माया निर्माण होते . याला मनुष्य माया म्हणावे का असा एक मोठा प्रश्न आहे पण आपण त्याला मनुष्य माया म्हणू शकतो. याचे कारण असे की वाघाला प्रतित होणारी माया ही वाघमाया म्हणू शकतो प्रत्येक प्राण्याची माया वेगळी असण्याची शक्यता बरीच आहे . याबाबतीत रंगांच्या विषयी जे संशोधन झालेले आहे ते तरी या क्षणी मायेच्या बाजूने आहे. किंबहुना शैव तत्त्वज्ञानाचा प्रचंड प्रभाव जो 1990 नंतर वाढत चाललेला आहे त्याचे सर्वात मोठे कारण शैव श्रुतीतले अनेक मूलभूत सिद्धांत हे कळत नकळत आता सायंटिफिक बनत चाललेले आहेत. 


आता असे असेल तर मग माया काल्पनिक आहे ही विचार मांडणी कुणी सांगायला सुरुवात केली? तर माया म्हणजे भ्रम किंवा काल्पनिक असे काहीतरी हा सिद्धांत प्रामुख्याने पुरोहित वर्गाने प्रचलित केला. प्रत्यक्षात तो शैव लोकांना तसा अभिप्रेत नाही . पुरोहित लोकांनी हे करण्याचे कारण स्पष्ट होते त्यांना काहीही करून सामान्य जनतेचे लक्ष दैनंदिन जीवनातील वास्तवावरून हटवून त्यातील शोषणावरून हटवून त्याला परलोकावर घेऊन जायचे होते . त्यामुळे एखाद्या शस्त्रासारखा माया सिद्धांत वापरला गेला . पण आता आपण 21व्या शतकात आलेलो आहोत म्हणून आपण या गोष्टीचा नीट विचार करू शकतो. 


माणसाच्या शरीर मर्यादा या सत्य मर्यादा असतात ही एक वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती हळूहळू अधिकाधिक उत्खननित होते आहे . पण त्याचबरोबर हेही खरे की आपली ही मर्यादा कळल्यामुळेच माणूस आपले शरीर अधिक चांगल्या पद्धतीने वाढवत चालला आहे अधिकाधिक चांगल्या टेलिस्कोप तयार करत चालला आहे मायक्रोस्कोप तयार करत चाललेला आहे . किंबहुना मायेची आणि मनुष्य मायेची मर्यादा जितकी कळत जाते तितके वास्तव आणि सत्य तुमच्याजवळ येत जाते. 


एडमंड हुसरले याने जेव्हा हेगेल याची पुरोगामी फिनॉमिनोलॉजी मोडीत काढून आधुनिक फिनॉमिनोलॉजी मांडली तेव्हा इंटेंशन्यालिटीचा हेतूग्रस्ततेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हे हळूहळू स्पष्ट होत गेले . हेतूग्रस्तता आणि पूर्वग्रह दूषितता या दोन गोष्टी माणसाच्या सत्याच्या आणि वास्तवाच्या आकलनाच्या दरम्यान ठामपणे उभे असतात आणि त्या माणसाला टाळता येणे शक्य असते. पण माणूस या गोष्टींच्या संदर्भात पुरेसा सजग होत नाही आणि आश्चर्यकारकरीत्या तो सजग होऊ नये अशीच व्यवस्थांची आणि संरचनांची सहेतुक इच्छा असते. आपले अभ्यासक्रम हे त्या हिशेबाने अत्यंत व्यवस्थित रचले गेलेले असतात. आणि अवस्था अशी होती की आपले हे सर्व अभ्यासक्रम आपल्या मेंदूची ही विचार प्रोसेस सरचित करत जातात. आपण स्वतःच यांचे बाय प्रॉडक्ट बनतो . म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की अभ्यासक्रम म्हणजे राजकीय सत्तांची त्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक सत्तांची हेतूग्रस्तता असते , त्यांनी स्पॉन्सर केलेली पूर्वग्रह दूषितता असते. याचा अर्थ स्पष्ट आहे एकीकडे व्यक्तिगत हेतूग्रस्तता आणि पूर्वग्रह दूषितता आणि दुसरीकडे सामूहिक हेतूग्रस्तता आणि पूर्वग्रहदृष्टीता यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेले असते . संस्कारीत केलेले असते . याचबरोबर काम या अक्षांमधील जी कुल आणि कुटुंब या संदर्भातली नेटवर्किंग सिस्टीम असते ती सुद्धा आपणात या गोष्टी स्पॉन्सर करत असते. म्हणजेच एका अर्थाने आपण संस्काराहारी असतो. 


म्हणजे आपण जर का आहाराचा प्रश्न घेतला तर आपल्या लक्षात येईल की आपण काय खायचे हे आपल्या वैयक्तिक , कामिक , सामूहिक संस्कारग्रस्ततेवर म्हणजेच वैयक्तिक , कामिक , सामूहिक हेतूग्रस्ततेवर आणि पूर्वग्रहदूषिततेवर अवलंबून असते. त्यामुळेच मोक्षाच्या संदर्भामध्ये ऍक्च्युली तुम्ही नेमके काय खात वाढले आहात हे पाहावे लागते. म्हणजे मी जर का जन्माने गोवन gsb असेन तर माझ्यावर मासे खाण्याचे संस्कार आपोआपच होतात माशांच्या बद्दलचे हेतूग्रस्तता आणि पूर्वग्रह दूषितता आपोआपच माझ्यात स्पॉन्सर झालेली असते . मी जर का कोल्हापुरात वाढलो असेल तर आपोआपच पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा यांच्या बद्दलची संस्कारग्रस्तता म्हणजेच हेतूग्रस्तता आणि पूर्वग्रह दूषितता आपोआपच स्पॉन्सर झालेली असते . अशावेळी मोक्षाच्या दिशेने टाकलेले पाऊल हे शाकाहारी की मांसाहारी असे नसते तर संस्काराहारी की नि: संस्काराहारी या दिशेने ठरते कारण खरा प्रश्न नि:संस्कारी कसे व्हायचे हाच असतो . आपल्याकडे तर मुद्दा असा आहे अनेकदा आपली जात आणि वर्ण हे सुद्धा संस्कार करत राहतात. त्यामुळे जैन धर्मातले लोक कुठेही जन्मले तरी ते कट्टर शाकाहारी होत जातात यामध्ये प्रत्यक्ष वास्तवाची आणि सत्याची काहीच भूमिका नसते पण संस्कारांची प्रचंड भूमिका असते. त्यामुळेच मोक्षाच्या यात्रेमध्ये नेहमीच आपल्या हेतूग्रस्ततेचे आणि पूर्वग्रह दूषितपणाचे अत्यंत बारकाईने आत्मनिरीक्षण करावे लागते मगच तुम्हाला आत्मपरीक्षण करता येते स्वतःला लॅबमध्ये नेता येते जिला मी सेल्फ लॅबोरेटरी म्हणतो .


हाच प्रश्न पुढे मग आपण जेव्हा या संपूर्ण वास्तवाचे निरीक्षण आणि परीक्षण करायला जातो तेव्हा निर्माण होतो आणि अनेकदा घडते असे की आपण ज्या विशिष्ट शाखांच्या मध्ये ज्ञान शाखांच्या मध्ये ज्ञानदर्शनांच्या मध्ये वाढलेलं असतो तिथली सगळी हेतूग्रस्तता आणि पूर्वग्रहदूषितता त्यांच्यामुळे तयार झालेली संस्कारग्रस्तता आपण मिरवत असतो गिरवत असतो . अनेकदा ही संस्कारग्रस्तता प्रत्यक्षात संसर्गग्रस्त असते संसर्गग्रस्तता असते. मनुष्य हा प्राणीच असा आहे की तो ताबडतोब संसर्ग लावून घेतो. त्यामुळेच कॉपी करण्याची आणि पेस्ट करण्याची अफाट क्षमता त्याच्यामध्ये आहे . हे कॉपी पेस्टिंग माणसाची कलेक्टिव्हिटी आणि कलेक्टिव्ह उत्क्रांती वाढवत नेते वेगाने प्रसार करत नेते आणि मनुष्य समुदाय म्हणून नेहमीच कळप म्हणून नेहमीच प्रचंड वेगाने पुढे पुढे सरकत जातो. इतर प्राण्यांच्याकडे हा गुण मनुष्याच्या तुलनेत फार कमी आहे आणि अनेकदा माणसाने केवळ या गुणाच्या जीवावर इतर प्राणी जीवांच्यावर मात केलेली आहे. ईश्वर हा सुद्धा एक संस्कार असतो आणि तो संसर्गानेच आलेला असतो . अगदी मोक्ष सुद्धा अनेकदा संस्कार असतो आणि तो संसर्गानेच आलेला असतो (माझे हे सुदैव म्हटले पाहिजे की माझ्या बाबतीत तसे झाले नाही आणि एका शक्तिपाताने आयुष्य बदलले आणि हा शक्तिपात शक्य झाला कारण माझ्या सुदेवाने संस्कारग्रस्तता फार कमी होती अर्थात दुसरे कारण मी इथे सांगत नाही कारण ते सायंटिफिकली सिद्ध करणे शक्य नाही ) 


भारतामध्ये धर्म हा यासंदर्भामध्ये म्हणजेच मोक्षाच्या संदर्भामध्ये एकाच वेळी मित्र आणि शत्रू असे दोन्ही रोल पार पाडतो एका बाजूला तो मोक्षाविषयी ठाम भूमिका घेतो आणि मोक्ष हेच अंतिम उद्दिष्ट सांगतो त्यामुळे तुम्हाला मोक्षाचे संस्कार आपोआपच मिळतात त्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत पण त्याचबरोबर अनेकदा मोक्ष कसा मिळवावा या संदर्भात तो इतके संस्कार देतो की त्या संस्कारातून बाहेर पडणे गरजेचे बनते. विशेषत: आपल्या मोक्षाच्या संदर्भात अनेकदा आपल्यावर भक्ती लादली गेलेली असते . प्रत्यक्षामध्ये जवळजवळ 80 टक्के लोक हे भक्ती बाबत प्रतिकूलत असतात. पण संस्कारग्रस्त तेथून बाहेर न आल्याने त्यांना योग्य ते महातंत्र सापडत नाही आणि ते भेलकांडत राहतात . आपण जर का जुड्याईक धर्माशी याची तुलना केली तर आपली स्थिती मोक्षाच्या संदर्भात केव्हाही सर्वोत्तम आहे हे लक्षात येते. मी नेहमीच म्हणतो की तुम्ही जर का भारतीय धर्मात जन्म घेतलेला असाल तर तुम्ही मोक्षाबाबत सुदैवी आहात . पण जर का धार्मिक संस्कार गरजेपेक्षा अधिक घनदाट झाले असतील तर मात्र यातून काही प्रश्नही निर्माण होतात आणि कधी कधी पाश्चात्य साधकाला याचा फायदा जास्त मिळतो पाश्चात्य साधक हा इतका मोकळा असतो की त्याच्यावर मोक्षाच्या संदर्भात पूर्वग्रह दूषितता आणि हेतूग्रस्तता यांचे पडणारे भारतीय धर्माचे ओझे असत नाही त्याला ते वाहावे लागत नाही मात्र अनेकदा जुड्याइक धर्मातले ओझे जर का घट्ट असेल तर त्याला मूलभूत मोक्षवीचे सत्यच कळत नाही . माझ्या आयुष्यात मी असे अनेक मुस्लिम ख्रिश्चन साधक पाहिलेले आहेत ज्यांना मोक्ष सहज कळतो कारण त्यांचा जन्म भारतात झालेला आहे. 


संस्कारग्रस्ततेमुळेच माया अधिक घनदाट बनत जाते . ही माया प्रत्येक माणसाने स्वतःच तयार केलेली असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे . तिला मी आत्ममाया म्हणतो या आत्ममायेतून मोकळे होणे ही मोक्षाची आद्याट आहे . 


आद्य आणि सद्य या दोन शैव संकल्पना आहेत आणि आपण या दोन्हींचाच फक्त विचार करू शकतो . मात्र भविष्याचा जो विचार असतो तो मात्र अनेकदा माया असतो म्हणूनच आद्य विचार , सद्य विचार आणि माया विचार यांचे अजीबो गरीब नेटवर्क आपल्यामध्ये ऑपरेट होत असते. आद्य शिव आहे शून्य आहे आणि त्याबरोबर मग येणाऱ्या इतिहासाच्या अनेक गोष्टी आहेत. म्हणूनच आपण अनेकदा आद्याला नमस्कार करतो राम या शब्दाचा मूळ अर्थ सुद्धा आद्य आहे कारण तो सुरुवातीचा सूर्य असतो सकाळचा सूर्य असतो म्हणूनच आपल्याकडे रामनवमीला आपण आद्य लिंगाची पूजा करतो पूर्वजांची पूजा करतो आपण कुठे आले आहोत आणि कुठून आलो आहोत याची आठवण करून देणे हा त्या मागचा उद्देश असतो . अर्थातच आता आपणाला डार्विनने अधिक चांगल्या रीतीने हे समजावलेले आहे.


अर्थातच आद्याला नमस्कार करा नका करू हा मुळातच तुमचा मोक्ष साधायचा आहे की नाही यावरचा प्रश्न आहे पण मोक्ष हा जर का तुमचा सिल्याबसचा भाग नसेल तर मग अशा आद्याची पूजा करण्याची काहीच गरज नसते. अनेकदा तर आद्य सोडून द्या प्रथम सद्य काय आहे ते पहा अशी स्थिती येते . साधना म्हणजे सद्याची सध्याची साधना असते सध्या मध्ये उपस्थित राहण्याची साधना असते. आणि ती जी आद्य आहे त्याच्यात जाण्यासाठी असते. 


ज्यांना मोक्ष मिळवायचा आहे त्यांच्यासाठी हे सर्व स्पष्ट असलेच पाहिजे परंतु त्याचबरोबर हेही तितकेच खरे की तुम्ही जर का वैज्ञानिक तंत्र वैज्ञानिक चिन्ह वैज्ञानिक होणार असाल तर तुम्हाला या गोष्टी कळायलाच हव्यात . किंबहुना तत्त्वज्ञानाचे जे मुख्य काम आहे दर्शनाचे जे मुख्य काम आहे ते यासंदर्भातच असते आणि भारतामध्ये अनेकदा वैज्ञानिक हवेतच काम करत राहतात आणि मूलभूत काम होत नाही .


तुमचे क्षेत्र कोणतेही असो हेतूग्रस्तता पूर्वग्रहग्रस्तता यांच्यामुळे तयार होणारी संस्कारग्रस्तता आणि या संस्कार ग्रस्ततेमुळे तुमच्या ठायी दाटलेली मायाग्रस्तता यांच्यातून स्वतःला सतत मुक्त करावे लागते भले तुम्हाला मग मोक्षाची आस असो अगर नसो . ज्याला ज्याला हे वास्तव समजून घ्यायचे आहे त्याच्यासाठी मोक्षाची मटरियालॅस्टिक असेल पण वाटचाल आवश्यकच ठरते त्यासाठी ज्ञानतंत्रातली साधना मग ती मोक्षाच्या दिशेने जावो किंवा जगाच्या दिशेने जावो आवश्यक ठरते. म्हणूनच मी म्हणतो की तुम्ही काही असा भौतिक शास्त्रातले वैज्ञानिक असा , गणित भूमितीतील शास्त्री असा किंवा मग अर्थशास्त्रातले विद्वान असा किंवा कलेतले कलावंत असा मोक्षाला टाळून तुम्हाला जाता येत नाही. कुठल्याही क्षेत्रातली नवता तिथेच शक्य होते जिथे किमान मोक्षाची आद्याक्षरे गिरवली जातात.


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे