स्त्रीमुक्ती वाद , महा कश्यप, आनंद आणि शरद पाटील १ श्रीधर तिळवे नाईक
भारतामध्ये जेव्हा जेव्हा स्त्रीमुक्तीचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा बौद्ध धर्मामध्ये स्त्रियांचे स्थान काय हा प्रश्न येत असतो. साहजिकच या प्रश्नाच्या अंगाने सर्वात प्रथम येणारा प्रश्न म्हणजे हा प्रश्न कुठे सुरू झाला. शैव-धर्मामध्ये हा प्रश्न उपस्थित नाही याचे कारण तिथे मुळात पार्वती जी शंकरांची पत्नी होती हीच मोक्षला उपलब्ध झालेली आहे किंबहुना ती पत्नी झाल्यानंतर ताबडतोब शिष्यही झालेली दिसते . त्यामुळे या अंगाने साधी चर्चा सुद्धा करण्याची गरज कधी शैव लोकांना भासलेली नाही . अशा प्रकारचा प्रश्न कोणी विचारू शकतो इतका कोणी अडाणी असू शकतो याची कल्पनाच शैवधर्मी लोकांना नाही त्यामुळे हा प्रश्न शैव श्रुती मध्ये नाही तो नंतर उपस्थित झाला तो इतरांच्या मूर्खपणामुळे आणि हस्तक्षेपामुळे. याचे एक कारण असेही होते की ज्या पशुपालनाच्या काळामध्ये ही श्रुती अस्तित्वात आली तिच्यात स्त्रियांचे स्थान दुय्यम झालेलेच नव्हते . ते पुढे शेती व्यवस्थेमध्ये झाले.
गौतम बुद्धाचा धम्म हा शेतीचा विकासानंतर आलेला आहे हे आपण प्रथम लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे साहजिकच तिथे हा प्रश्न उपस्थित झाला .
या प्रश्नाची पार्श्वभूमी अत्यंत स्पष्ट आहे. गौतम बुद्धाचे वडील शुद्धोधन यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी आणि गौतम बुद्धाची मावस आई महा प्रजापती हिला मोक्ष साधना करावीशी वाटायला लागली आणि ज्या मार्गाने बुद्ध गेला त्या मार्गाने आपण आता जावे असेही तिला वाटायला लागले साहजिकच ती गौतम बुद्धा कडे आली आणि तिने संघाला जॉईन होण्याविषयीची परमिशन मागितली त्यावेळेला बुद्धाने फक्त एकच वाक्य उच्चारलेले आहे ते वाक्य म्हणजे ,"कृपया अशी अनुमती विचारू नकोस." गौतम बुद्धाने यानंतर आपण असे का करतो आहोत त्याचे कसलेही स्पष्टीकरण दिलेले नाही आणि त्रिपटकांच्या मध्ये या अंगाने बुद्धाची स्वतःची कसलीही भूमिका आलेली नाही आणि त्यामुळेच हा सगळा गोंधळ माजलेला आहे.
तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने काय करायचे असा एक प्रश्न असायचा शैव श्रुतीमध्ये या प्रश्नाचे उत्तर तिने कुठलेही तंत्र निवडावे आणि मोक्ष निवडावा असे होते पण ज्या आर्य लोकांच्या मध्ये गौतम बुद्धांचा जन्म झाला होता त्यांच्या शाक्य गणामध्ये जोपर्यंत पती आहे तोपर्यंत पतीची सेवा करणे हाच स्त्रीचा धर्म मांडला जात होता . पण पतीच्या मृत्यूनंतर एखाद्या स्त्रीला जर का मोक्ष हवा असेल तर काय तर तसे अनुमती शैव प्रभावाखाली असल्यामुळे शाक्य गणामध्ये होती आणि म्हणूनच गौतम बुद्धाची ही मावशी कम आई महाप्रजापती आपल्याला अशी मोक्षाची अनुमती आहे असे गृहीत धरूनच आलेली आहे. तिने हा प्रश्न विचारलेला नाही की मी मोक्षाची साधना करू की नको मी निर्वाणाची साधना करू की नको . तिने असा प्रश्न विचारला की मी संघाला जॉईन होऊ की नको? आणि या प्रश्नाचे उत्तर गौतम बुद्धाने नकारार्थी दिलेले आहे हे ही स्पष्ट आहे . कारण बुद्धाचे विधान स्पष्ट आहे कारण मात्र बुद्धाने दिलेले नाही आणि त्यामुळेच हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे . अनेक लोक बुद्धाने कारण दिले आहे असे सांगून स्वतःची कारणे पुढे करत असतात प्रत्यक्षामध्ये अशी कारणे बुद्धाने दिलेली नाहीत . एकदा बुद्धाने नकार दिल्यानंतर महाप्रजापती थांबलेली नाही तिने या विरोधात सत्याग्रह किंवा उठाव केल्या सारखा दिसतो. तिने राज दरबारातल्या पाचशे स्त्रिया सोबत घेतल्या त्यांचे मुंडन करून घेतले आणि पिवळे वस्त्र परिधान करून ती 500 भिक्खुनींच्या बरोबर बुद्धाच्या पाठोपाठ वैशाली इथे आली जिथे बुद्ध राहत होता इथे प्रवेशद्वारावर आनंद उभा होता आणि आनंदने त्यांची अवस्था पाहून त्यांच्या वतीने पुन्हा एकदा बुद्धाला अनुमती विचारली आणि बुद्धाने पुन्हा एकदा तेच उत्तर दिलेले आहे ते म्हणजे ,"अशी अनुमती विचारू नकोस"याचा अर्थ स्पष्ट आहे की बुद्धाला अशी अनुमती द्यायची नव्हती . अनेक लोक इमोशनल होऊन बुद्धाच्या मनात असे काही नव्हते असे सांगतात परंतु स्पष्ट सांगायचे तर जेव्हा एखादी व्यक्ती दोन वेळा नकार देते तेव्हा तिच्या मनामध्ये काय आहे हे स्पष्ट होते.
सर्वसाधारणपणे 500 स्त्रियांना सांभाळणे हे सोपे नव्हते त्यांचे रक्षण करणे सोपे नव्हते त्यामुळे साहजिकच हा नकार दिला असावा असे अनुमान काढले जाते दुसरे एक अनुमान म्हणजे या स्त्रिया स्वतःचा संसार सोडून येणार होत्या पण प्रत्यक्षामध्ये या अनुमानाला काही अर्थ नाही कारण नंतरचे संदर्भ असे सांगतात की मुळात या स्त्रियांचे पती संघामध्ये दाखल झालेले होते . पण मग त्यातून अनेक प्रश्न येतात म्हणजे जर का पती संघात असतील आणि पत्नी तिला जॉईन झाली तर त्यामधून त्यांचे संबंध आले तर काय? ब्रह्मचर्याचे काय ? तर ही गुंतागुंत गौतम बुद्धापुढे होती हे मान्यच केले पाहिजे. शैव श्रुतीमध्ये ब्रह्मचर्य पाळण्याची सक्ती नाही . पण गौतम बुद्धाचा धम्म वेगळा होता आणि महावीर प्रमाणे तो जरी टोकाला नसला तरी बुद्धाने सुद्धा ब्रह्मचर्य पालन आवश्यक ठरवले होते. त्याने आधीच गृहस्थांना साधना करता येईल असे सांगितले होते. प्रश्न असा आहे की गृहिणींना सुद्धा साधता येईल का? तर या प्रश्नाचे उत्तर आपणाला मिळत नाही. मात्र एक गोष्ट नक्की होती ती म्हणजे या स्त्रियांचे पती संघामध्ये दाखल झाल्यामुळे यांना दाखल करून घ्यायला काहीच हरकत नव्हती आणि ब्रह्मचर्यासाठी नजर ठेवणे अवघड नव्हते . इथे एक मुद्दा असाही उपस्थित होतो की यावेळी स्त्रियांचे धम्मशिक्षण कोण करणार ? कारण गौतम बुद्धाच्या संघामध्ये स्त्रिया नसल्यामुळे स्त्री शिक्षिकाही नव्हत्या साहजिकच हे काम पुरुषावर आले असते आणि त्यातून मग पुरुष विचलित झाला तर काय असा प्रश्न नक्की उपस्थित झालेला असणार. अर्थात गौतम बुद्धाच्या मनामध्ये काय झाले हे आजही सांगणे अवघड आहे पण त्याने नकार दिला होता ही वस्तुस्थिती. मात्र त्याचबरोबर ही ही वस्तुस्थिती आहे की गौतम बुद्धाने भगवान महावीर यांच्याप्रमाणे स्त्रियांना मोक्ष नाकारलेला नाही . मात्र घरात राहून साधना करून हा मोक्ष मिळवता येईल निर्वाण मिळवता येईल असे त्यांचे मत होते. त्यामुळे प्रश्न मोक्षा विषयी निर्वाणाविषयी नाही हे लक्षात घेतले पाहिजे अनेकदा हेच लक्षात घेतले जात नाही. प्रश्न संघ आणि संघाची शिस्त यांचा आहे आणि स्त्रिया संघ जॉईन करू शकतात की नाही हा तो प्रश्न आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे . एका अर्थाने गौतम बुद्धाने इथे सुद्धा मध्यमवर्ग काढला मध्यम मार्ग काढला होता म्हणजे एका बाजूला तत्कालीन लोकशैव (गौतम बुद्धाचा शब्द अनरिय)धर्मामध्ये ब्रह्मचर्याची सक्ती नसणे कामवासनेची अनुमती असणे आणि दुसऱ्या बाजूला भगवान महावीर यांनी स्त्रियांना मोक्ष नाकारणे अशी स्थिती होती आणि या स्थितीचा मध्य गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानानुसार त्यांनी त्या काळात काढला होता तो म्हणजे स्त्रियांना मोक्ष मिळतो परंतु हा मोक्ष त्यांना घरात विपशनेची आणि अष्टांग मार्गाची साधना करून मिळवता येईल. या मध्यम मार्गालाच महा प्रजापती कळत नकळत आव्हान देत होती . आणि म्हणूनच गौतम बुद्ध कदाचित नको हे करू नकोस हे विचारू नकोस अशा सौम्य भाषेत संवाद साधतात.
अर्थातच शेवटी आनंदाने आग्रह धरला आणि त्याचा हा आग्रह गौतम बुद्ध यांनी मान्य केला आणि स्त्रियांना सुद्धा ही बौद्ध ऑर्डर बौद्ध संघ जॉईन करण्याची अनुमती मिळाली.
पण दुर्दैवाने हा प्रश्न फक्त इथेच संपणारा नव्हता
(Continue)
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment