थांमा, वेताळ, वेताळ नाथ,आणि शैव श्रुती श्रीधर तिळवे नाईक 


आयुष्यमान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या थामाँ या चित्रपटातील अभिनयामुळे थांमा हे नाव अचानक प्रचलित झाले दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हे मराठी असल्यामुळे जास्तच उत्सुकता होती पण प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात आले की ज्यांनी कोणी हा चित्रपट लिहिला आहे त्यांना प्रत्यक्ष वेताळ गणाविषयी फारशी माहिती नाही . फीक्षण रचायला हरकत नाही पण निदान ते रचताना ते ज्या मूळ कथांच्या वर आधारित आहे त्याच्या मुळात जाणे आवश्यक असते . इथे ते घडलेले नाही त्या ऐवजी Twilight या हॉलीवुड पटातील सिरीज मधील आशयाची मदत इथे घेतलेली आहे मुळातच वोल्फ ही एक गाजलेली सिरीज असते आणि त्यानंतर vampire ही एक असते wolf वर भेडीया आल्यानंतर vampire वर काही ना काही येणे अटळच होते तसे ते आले असे दिसते पण हे येताना भारतीय परंपरेचा पुरेसा विचार झालेला नाही.


माझा स्वतःचा वेताळ गणाशी असलेला संबंध अत्यंत वैयक्तिक आहे . आई आणि वडील यांच्याकडून आमच्या ज्या कुलदेवता आहेत त्यातील एक वेताळ आहे आणि आमच्या मालकीचे एक मंदिर वेताळाचेही आहे जे तुम्ही आमच्या गावात येऊन बघू शकता. साहजिकच वेताळ या देवतेबद्दल मला लहानपणापासूनच जबरदस्त उत्सुकता आणि प्रचंड इन्फॉर्मेशन आहे तिच्यात मी वाढलेलो आहे. त्यामुळे या चित्रपटांमध्ये नेमके काय असणार याविषयी अधिक उत्सुकता होती .


सर्वसाधारणपणे आमच्या भागामध्ये प्राचीन काळामध्ये सातेरी आणि वेताळ हे एकत्रच असायचे . साहजिकच आमच्याकडे जी मंदिरे होती त्यामध्ये सातेरीचे ही एक मंदिर आमच्याकडे होते जे नंतर आम्हाला सोडावे लागले . केरीमधील सातेरीचे एक मंदिर माझे आते भाऊ आजही सांभाळतात . 


जे वेताळ गणातले लोक आहेत त्यांच्यासाठी विठोबा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून वेतोबा आहे विठोबा हा त्याचा अपभ्रंश होय. ही मूळची शैव देवता आहे हे मी अनेकदा सांगितलेलेच आहे . प्रश्न पंढरपुरातला विठोबा हा देव की भक्त असा आहे आणि दोन्ही बाजूने पुरावे मांडता येतात मात्र एका गोष्टीबद्दल शंका नाही ती म्हणजे ही मूळची शैव देवता आहे जी ब्राह्मण लोकांनी अत्यंत जाणीवपूर्वक वैष्णव करत नेली आणि तिच्या आधारे नंतर महाराष्ट्रामध्ये वर्णव्यवस्था रुजवली. 


आदिशैव धर्मामध्ये वेताळ हा वेताळनाथ सिद्ध आहे पण लोकशैव धर्मामध्ये वेताळ हा लोक दैवत आहे रक्षक दैवत आहे आणि त्याचे हे स्वरूप साधारणपणे इसवी सन 200 पासून प्रस्थापित झाले . आणि लहानपणापासून तेच ऐकवले गेलेले होते.


लहानपणी मला घरात सांगण्यात आले होते की आपले एक कुलदैवत वेताळ असल्याने आपल्याला भूतप्रेतांची कसलीही भीती बाळगायचे कारण नाही आपला रक्षक हा खुद्द वेताळच असल्याने आपल्याला भूत घाबरतात . साहजिकच सर्वसाधारणपणे लहान मुले ही ज्या भीतीमध्ये वाढतात त्या भीतीमध्ये मी वाढलेलो नाही उलट सगळे भूत आणि राक्षस हे आपले दोस्त असतात अशी माझी लहानपणापासूनच संकल्पना असल्याने मला कधी या लोकांची भीतीच वाटली नाही .


याबाबतीत बालपणी एकदा तर मी नको ते सहज केलेले होते . मी ज्यांच्याकडे राहत होतो ते पाटील श्रीमंत झाले आणि त्यांच्या श्रीमंतीचे रहस्य हे वेताळाकडून त्यांना प्राप्त झालेल्या गोंड्याकडे आहे अशी दंतकथा गल्लीमध्ये होती त्याबाबतीत सांगितले गेले ते असे की पाटील यांना वेताळाचा गोंडा प्राप्त झाला आणि त्यांची मांडी कापून त्यांनी तो मांडी कापून मांडीत ठेवून दिला आणि तेव्हापासून ते भरभराटीला आले . साहजिकच आमची स्वारी हा गोंडा पटवण्याच्या मागे लागली. याबाबतीतली दंतकथा अशी होती की आमच्या गल्लीच्या शेजारीस एक थट्टी गल्ली नावाची गल्ली आहे आणि तिथे रात्री बारा वाजता वेताळाची पालखी निघते आणि त्या वेळेला जर का तुम्ही हा गोंडा पळवण्यात आणि नंतर स्वतःच्या मांडीत ठेवण्यात यशस्वी झाला तर तुम्ही प्रचंड श्रीमंत होता. फक्त मांडी कापून त्यात गोंडा लपवण्याचे धाडस तुम्हाला असले पाहिजे. मात्र त्यासाठी तो गोंडा पळवावा लागतो आणि भुते जी पालखी वाहतात ती तुमच्या मागे लागतात तर त्यांना चकमा देऊन तुम्हाला हे करावे लागते. साहजिकच आमची स्वारी हा गोंडा मिळवायचा म्हणून सोबत स्वतःची मांडी कापायला एक सुरी घेऊन एके रात्री निघाली. आमचे मित्र त्या काळातले किरण यांच्या अंगणामध्ये जाऊन मेंदीत लपली. रात्रीच्या अकरा वाजले बारा वाजले आम्ही वेताळाची वाट बघतोय . पण वेताळाची पालखी काय शेवटपर्यंत आली नाही . तोवर घाबरून गेलेल्या माझ्या कुटुंबीयांनी माझा माग काढला. मग आम्ही अत्यंत निराशेने श्रीमंत होण्याचा हा मार्ग विसरलो पण सांगण्याचा मुद्दा असा की केवळ वेताळ निघतो म्हणून या काळामध्ये संपूर्ण थट्टी गल्ली प्रत्येक अमावस्येला सात वाजल्यानंतर बंद असायची . वेताळाचे हे जनमानसामधले स्वरूप नेमके कोणी निर्माण केले ? वेताळ हा भूतांचा राजा कसा काय बनला ? त्याची पालखी भुते कशी काय वाहतात ? मी हे १९७५ च्या लोककथे बद्दल बोलतोय हे लक्षात घ्या. 


हा चित्रपट पाहण्याआधी साधारणपणे याच कथेसारखे काही ना काही तरी असणार अशी माझी समजूत होती. त्यातच सरपोतदार किंवा पोतदार हे आता मोठे झालेले आडनाव असले तरी आणि वैदिक लोकांच्यात ते प्रस्थापित झाले असले तरी मूळचे ते पोतराज आहेत आणि पोतराज म्हणजे ज्यांच्या ताब्यामध्ये संपूर्ण एकेकाळी वस्त्र व्यवसाय होता असे शैव व्यापारी होत. उत्तर भारतामध्ये ते पोद्दार म्हणून फेमस आहेत . आणि त्यांचे अधिकच उन्नयन झालेले आहे. आपल्या या मुळाशी जाणे अनेकांना आता अवघड वाटत असल्याने अपेक्षा फार नव्हत्याच. एकच अपेक्षा होती ती म्हणजे वेताळगणाच्या विषयी निगेटिव्ह गोष्टी बोलल्या जाऊ नयेत. पण दुर्दैवाने असे झाले नाही .


मुळात कोकणामधला हा अत्यंत प्रतिष्ठित असा व्यापारी पणी गण होता . माणसाने आदिम काळात शिकार आणि मासेमारी (म्हणजे माशाची शिकार ) चा शिकार कालखंड आत्मसात करून पुढे पाऊल टाकले आणि त्यातूनच व्यापार आणि पशुपालन असे दोन व्यवसाय उदयाला आले. भगवान शंकर यांचा जन्म हा या कालखंडातला आहे आणि म्हणूनच पशुपती नावाने सुद्धा ते ओळखले जाऊ लागले कारण त्यांनी पशुपालनाला एक शिस्त दिली पण त्याचबरोबर शेती या नवीन व्यवसायाची ओळख पण करून दिली बाग शेतीचा शोध हा प्रथम पार्वतीने लावला आणि नांगरट शेतीचा पहिला प्रयोग भगवान शंकर यांनी केला इथून जे भारतीय समाजाला वळण मिळाले ते पूर्ण वेगळे होते पुढे यातूनच आजकाल जिला सिंधू संस्कृती म्हणतात ती उदयाला आली या संस्कृतीतील आदिवासी लोकांनी आज सुद्धा लिंगो देवता म्हणून किंवा शंभू/शंभो देवता म्हणून शंकरांना आणि भगवान शिव यांना जिवंत ठेवलेले आहे.


भगवान शंकर यांच्यामुळे जवळजवळ भारतातील तत्कालीन सर्वच गणांचा एक संघ तयार झाला आणि भारत एकसंध झाला. सिंधू संस्कृती ह्या एकसंधपणाची फलश्रुती आहे . साधारणपणे इसवी सन पूर्व 2000 च्या आसपास भारतात नेमके काय झाले हे माहित नाही पण बहुदा कोरडा दुष्काळ पडल्यामुळे अचानक स्थलांतर सुरू झाले आणि उत्तरेकडचे सगळेच्या सगळे शैव हे एक तर जंगलात गेले किंवा दक्षिणेकडे आले आणि तेव्हापासूनच संपूर्ण उत्तर भारत हा रिकामा पडायला सुरुवात झाली आणि याचाच फायदा साधारणपणे याच काळात इतरत्र सुद्धा दुष्काळ अवतरल्याने जे स्थलांतर झाले त्यामध्ये वैदिक लोकांचे स्थलांतर होते ते उत्तर भारताकडे होऊन त्यांच्या ताब्यात सुरुवातीच्या कालखंडामध्ये सिंध आणि पंजाब आला. साधारण याच वेळेला मंगोलिया वाया तिबेट मधूनही स्थलांतर झाले आणि त्यातूनही लोक बिहार उत्तराखंडमध्ये आले . हा संपूर्ण आशियाला व्यापून टाकणारा दुष्काळ असावा कारण सर्वच लोकांनी स्थलांतर केलेले दिसते हे अन्नासाठी आणि पाण्यासाठी केलेले आहे हे तर उघडच आहे. पण याचा एक परिणाम असा झाला की अचानक शहरातले शैवसुद्धा सुद्धा जंगलात शिरल्याने आदिवासी लोकांच्या गणसंख्या अचानक वाढली . तर दक्षिणेत सुद्धा लोकसंख्या वाढल्याने आणि त्या काळात लोकसंख्या वाढणे हे चांगले असल्याने साहजिकच अधिकच दणकट अशी शैव संस्कृती उभी राहिली . आणि यातूनच ज्याला लोकशैव धर्म म्हणतात तो उदयाला आला . या लोकशैव निर्माण केलेली ही दक्षिणात्य शैव संस्कृती महाराष्ट्रापासून सुरू होते आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की खुद्द मराठी लोकांना त्याचा विसर पडलेला आहे.


खुद्द भगवान शंकर यांच्या कालखंडामध्येच मुळात वेगवेगळ्या गणातून अनेक लोक मोक्षाला पोहोचले . त्यापैकी कोकणातून जे लोक मोक्षाला पोहोचले त्यामधले महत्त्वाचे नाव वेतनाथांचे होते किंवा वेताळनाथांचे होते आणि पुढे हा गण वेताळाच्या नावाने ओळखला गेला. महाराष्ट्रातून याच काळात आलेला दुसरा गण हा राऊळ (राहुल हे आत्ताचे अत्यंत sophisticated आणि अभिजात म्हणून प्रसिद्ध असलेले नाव प्रत्यक्षामध्ये राऊळ असे आहे उत्तरेमध्ये हळूहळू ळ नाहीसा झाला आणि त्या जागी ल आला म्हणून आता राऊळचा राहुल झाला. युरोपमध्ये सुद्धा Rawls आहेतच आणि कदाचित पुढे याचेच रॉयल झालेले असावे )या गणातून आलेल्या (राऊळ)रवळनाथालाही मोक्षप्राप्ती झाली . तिसरा गण अर्थातच भूतगण आहे आणि याच गणातून भूतनाथ मोक्षाला पोहोचले आणि त्यांच्याच नावाने मग हा गण ओळखला जाऊ लागला . भूत या शब्दाचा अर्थ Ghost असा नाही तर पंचमहाभूतांच्या पैकी भूत हा आहे. ज्याचे पंचमहाभूतांच्या वर प्रभुत्व आहे असा तो भूतनाथ होय. चौथा गण हा स्त्रीगण आहे आणि तो पैशाची गण (हा पंजाब दिल्ली साईडला पण होता)आहे या गणाच्या प्रमुख स्त्रीला पिशाचिनी म्हटले जाते . हीसुद्धा मोक्षाला पोहोचली .


महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकातले म्हणजेच कर्नाटातले हे चार आद्य मोक्ष मिळवलेले महामानव आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात यांची मंदिरे आपणाला दिसतात ही सर्व सिद्ध म्हणजे मोक्ष मिळवलेल्या साधकांची मंदिरे आहेत . शैव परंपरेमध्ये मुळातच सिद्ध लोकांचा आदर सर्वाधिक आहे साहजिकच त्यांच्याच नावाने नंतर गण ओळखले गेलेले दिसतात मात्र त्यांचा प्रभाव कमी व्हावा म्हणून मग ब्राह्मणांनी जे काही नटदृष्ट उद्योग केले त्यातील एक म्हणजे या गणांना आणि या सिद्धांना बदनाम करण्यासाठी म्हणून अत्यंत वाईट अशा पौराणिक कथा लिहिल्या ज्या आता आपल्या समाजामध्ये प्रचलित झालेल्या आहेत आणि अनेक लोक आता या पौराणिक कथांच्या आधारे वेताळांच्या विषयी रवळनाथांच्या विषयी भूतनाथांच्या विषयी काहीतरी भलतं सलतं लिखाण करत असतात. वास्तविक पिशाचिनी किंवा डाकिण म्हणजे मोक्षाची साधना करणाऱ्या स्त्रिया आहेत आणि त्यांच्यापैकी काही योगिनी म्हणजे जोगतीण आहेत परंतु मुद्दाम म्हणून त्यांना बदनाम करण्यासाठी पिशाचीनी आणि डाकीण या दोन्ही शब्दांना बदनाम करण्यात आले. पुढे तर यातूनच देवदास देवदासी ही प्रथा उदयाला आणली गेली . बौद्ध परंपरेत सुद्धा हे शब्द नंतर विशेषता डाकीन हा शब्द अत्यंत आदराने येतो. पुढे मग तो बदनाम झालेला दिसतो . थांमा(याचा मूळ अर्थ शक्ती आणि यावरूनच हिंदीत कामना आणि थांमना आणि थमना ही क्रियापदे आलेली आहे त्यांचा अर्थ आधार देणारी शक्ती किंवा थांबलेली शक्ती असा होतो)या चित्रपटामध्ये प्रत्यक्षामध्ये योगिनी आहे . पण तिचे सादरीकरण अत्यंत विकृत मध्ययुगीन कालखंडाला साजेसे असे होते. त्यामुळेच ती सुद्धा रक्त पिणाऱ्या वंशाची दाखवलेली आहे जिने १९४७ मधल्या हत्याकांडामुळे मानवी रक्त पिणे सोडले. आता १९४७ मधल्या घटनेचा असा वापर करणे आणि माणूस हा वेताळांच्या पेक्षा देखील वाईट आहे असे सांगणे हे इंटरेस्टिंग आहे . एका अर्थाने दंतकथेचे हे उत्तर आधुनिक रुप आहे. पण ते फारसे कन्विन्सिंग झाले नाही याचे कारण मुळात हे लोक रक्त का प्यायला लागले त्याचे कसलेही स्पष्टीकरण नाही आणि ड्रॅक्युला सारखे हे काहीतरी आणलेले आहे. म्हणजेच एका अर्थाने वेताळांना या युरेशियन लोकांनी मिळून आता vampire मध्ये कन्व्हर्ट केलेले आहे . 


साहजिकच थांमा या चित्रपटामध्ये साहजिकच हे सगळे पौराणीक रूप येते आणि पुराणांच्या मते वेताळ माणसांना खातात किंवा त्यांचे रक्त पितात . हा सरळ सरळ शैव धर्माला बदनाम करायचा प्रकार आहे . जे जे बहुजन समाजासाठी पूजनिय आहे ते ते बदनाम करून टाकायचे हे धोरणच आहे वर पुन्हा आम्ही ब्राम्हण लोक काहीच करत नसतो ब्राह्मण कसे इनोसंट असतात वगैरे वगैरे मखलाशी आहे. अगदी एकविसाव्या शतकात सुद्धा नेमके हेच व्हावे आणि पडद्यावर यावं ही शोकांतिका न्हवे काय ? साहजिकच या चित्रपटामध्ये वेताळगणाचा जो प्रमुख आहे जो मी नेहमीच सांगत आलोय की यक्ष म्हणजेच रक्षक व्यापारी त्याच्या नावाने येतो. त्याला यक्षासन असे नाव दिलेले आहे. युरेशियन लोकांनी नेहमीच यक्षांची बदनामी केलेली आहे आणि दक्षिणात्य पंडित लोकांनी उत्तम कथा लिहिल्या होत्या पण नंतर ते सुद्धा या बदनामीत सामील झाले म्हणजे आपण जर का कालिदासाचे मेघदूत हे काव्य घेतले तर तिथे यक्ष हा खूप प्रेमाचा संदेश देणारा देव आहे . याचे कारण उघड आहे कारण कालिदास स्वतः कालीचा भक्त आहे आणि शैव आहे . यक्ष केवळ रक्षक नव्हते तसे ते होते असे सांगितले जाते परंतु प्रत्यक्षात ते उत्तम वाद-विवाद करणारे पंडितही होते यातला सध्या युरेशियन लोकांच्यातला गाजलेला वाद विवाद म्हणजे महाभारतातला यक्ष आणि यमराज यांचा पुत्र धर्मराज युधिष्ठर यांच्यातला वाद विवाद होय. (महाभारतामध्ये युधिष्ठराला जेष्ठ करून कळत नकळत यमाला इंद्रा पेक्षा जास्त श्रेष्ठत्व दिले जाते तो इंद्रापेक्षा आधीचा आहे हे स्वीकारले जाते हा बदल आहे) त्यातूनच यक्षप्रश्न हा शब्द आलेला आहे . यक्षाच्या फॉलोअर्सना नंतरच्या काळामध्ये बंजारा म्हटले गेले . आणि आता तेच बंजारी आणि वंजारी म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत . हे सर्व मूळचे वाणी पणी गणातले आहेत म्हणजेच व्यापारी आहेत आणि म्हणूनच एकेकाळी श्रीमंत ही होते. खरे तर आत्तासुद्धा बऱ्यापैकी श्रीमंत आहेत . तरीसुद्धा यक्षांसन याची बदनामी रक्त पिणारा अशी या चित्रपटात का केली गेली असावी ? सुरुवातीला अत्यंत उत्साहाने त्यामुळे स्वागत करायला तयार असणारे बहुजन लोक चित्रपटात बदनामी आहे हे कळाले तेव्हा आपोआपच बघू नका असा संदेश देऊ लागले आणि बॉक्स ऑफिस फिरायला सुरुवात झाली . बॉलीवूडचे बॉक्स ऑफिस हे शैव लोकांच्या हातात गेलेले आहे याची अजूनही अनेकांना कल्पना आलेली दिसत नाही. आदित्य सरपोतदार हे त्यापैकी एक. त्यांनी वेताळ हा शब्द निवडला आणि त्यामागे कारण अर्थातच Twilight हा इंग्लिश चित्रपट आहे या चित्रपटावरून बेतलेला हा चित्रपट नेमके काय करायचे हे न कळल्याने थोडासा गोंधळलेला झाला . मागच्या दोन्ही चित्रपटांमध्ये म्हणजे स्त्री या दोन भागात आलेल्या चित्रपटात युरोपियन आणि भारतीय यांची सांधेजोड चांगली होती इथे मात्र ती फसलेली आहे त्याचे कारण वेताळगणाचा अभ्यासच नाही . वेताळ पंचविशी हा नंतर रचलेला पौराणिक ग्रंथ आहे ज्याच्यातल्या कथा या पौराणिक वैष्णव धर्माला धरून आहेत . तुम्ही जर का आदिवासी समाजांच्यात गेला तर तिथे विक्रम हा आदिवासी राजा आहे जो भारताचा महासम्राट बनला . त्याचे कुलदैवत वेताळ आहे . साहजिकच त्यातून वेताळ पंचवीशी आली पण तिचे मूळ आदिवासी स्वरूप बदलून टाकण्यात ब्राह्मण धर्माला कमालीचे यश आले . 


वेताळ गणावर चित्रपट सादर करताना यामुळेच फक्त युरेशियन स्त्रोतावर अवलंबून राहता कामा नये पाहिजे होते . त्या ऐवजी शैव श्रुती सुद्धा तपासायला हवी होती जशी ती कांतारा मध्ये तपासली गेली होती परंतु एकंदरच मराठी संस्कृती ही सध्या इतकी युरेशियन होत चाललेली आहे की तिला आपल्या मुळांचा विसर पडलेला आहे स्वतःला ती उत्तर भारतीय संस्कृतीचे एक्सटेन्शन समजते त्याचा स्पष्ट प्रभाव या चित्रपटावर दिसतो . 


साहजिकच इथे वेताळगण हा रक्तबीज नावाच्या राक्षसाच्या कथेतून येतो जी शैव कथा आहे. याला भगवान शिव यांनी वरदान दिले होते की तुझ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून रक्तबीज निर्माण होईल. त्यामुळे याला मारणे अशक्य बनले आणि याच्या जीवावर शुंभ आणि निशुंभ यांनी संपूर्ण ब्रह्मांड जिंकले आणि या राक्षसाने धुमाकूळ घातला आणि त्याला कारण त्याच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून रक्तबीज नावाचा दुसरा राक्षस तयार होत असल्याने संख्या वाढत जायची त्यामुळे तो नाश पावायचा नाही आणि युद्ध जिंकायचा तर त्यासाठी म्हणून त्याच्या रक्ताचा थेंब पडला की तो जमिनीवर पडण्याच्या आधीच ताबडतोब शोषून घेण्यासाठी म्हणून मा चंडीकेने आपली जिम अतिशय लांब जिवला आपली जीभ अतिशय लांब करून त्याचा रक्ताचा थेंब आपल्या जिभेवर घेत राहिली या चित्रपटात ही कथा बदललेली आहे आणि वेताळांच्या वंशाची निर्मितीकथा म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न प्रयत्न केलेला आहे त्यासाठी चंडिकेऐवजी वेताळ वंशाने रक्त पिण्याचा उद्योग केला असे सांगितले गेले आहे आणि हेच वेताळ लोक रक्त पितात आणि त्या रक्त पिण्याचे कारण हा रक्तबीज राक्षस आहे अशी कारण मीमांसा केलेली आहे आणि रक्त बिजाचे रक्तच पिण्यासाठी जन्म असल्याने ज्या ज्या माणसांमध्ये असा रक्त विश दिसतो त्याचे रक्त हे लोक पितात असे पुढचे संदर्भ आहेत. मूळ कथेत प्रत्येक रक्ताच्या थेंबातून रक्तबीज निर्माण होत असल्याने साहजिकच त्याचा नाश देवीला करता आला नाही पण थोडे चँडी का देवी मुळे तिने प्रत्येक थेंब पिल्याने रक्तबीज्याचा नाश करता आला अशी ही पौराणिक कथा आहे रक्त विजयाची हीच कथा उत्तराधुनिक स्वरूपात चित्रपटात आली आहे आणि त्यामुळेच पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी म्हणून वेताळ अवतरला अशी कारणमीमांसा या चित्रपटात तयार केलेली आहे . शैव लोक आपल्यावर कसलेही ऑब्जेक्शन घेणार नाही हे या लोकांना माहिती आहे कारण शैव श्रुतीमध्ये स्वातंत्र्य असते .


एकदा का एकदा का नव्याने तयार केलेले हे कारण स्वीकारले की साहजिकच मग मध्ययुगात तयार झालेल्या वेताळकता वापरता येतात तशा त्या वापरल्या गेल्या आहेत. साहजिकच मोक्षाला पोहोचलेला वेताळनाथ नावाचा जो सिद्ध होता तो आता इथे रक्षकदेवता बनून जातो आणि त्याची मंदिरात स्थापना होते तर चंडिकाही देवता सुद्धा स्त्रीशक्ती म्हणून अवतरते आणि शेवटी खलनायकाला म्हणजे यक्षासनाला तीच संपवते . इथे एक शैवदेवताच दुसऱ्या शैवदेवतेला संपवत असल्यामुळे कोणाला काहीच ऑब्जेक्शन घेता येणे शक्य नाही अशी ही योजना आहे . आपापसात भांडण लावण्याचा उद्योग अतिशय सूक्ष्म पद्धतीने काम करत असतो तो इथे काम करतो.


यासाठी साहजिकच वेताळगण जसा आहे तसा स्वीकारून चालणार नव्हता म्हणूनच मग प्रत्यक्ष चित्रपटांमध्ये वेताळगण हा Twilight एका अमेरिकन चित्रपटाच्या तिथल्या गणप्रभावातून आलेला आहे . फक्त लिंग परिवर्तन झालेले आहे म्हणजे Twilight या अमेरिकन चित्रपटांमध्ये स्त्री पुढे हे प्रश्न उभे ठाकले कारण तिचा प्रियकर हा दुसऱ्या वेताळा सारख्या vampire गणामध्ये आहे इथे प्रेयसी वेगळ्या vampire वेताळ गणा मधली आहे आणि नायक माणूस आहे . त्याचे प्रेम इतके उत्कट होत जाते की शेवटी तो तिचा पाठलाग करताना मरतो आणि त्याला वाचवण्यासाठी म्हणून नायिका त्याला स्वतःच्या गणामध्ये घेऊन जाते आलोकला (आयुष्यमान खुरानाला वाचवण्यासाठी) म्हणून प्रेयसी तडाका (रश्मीका ) शेवटी त्याचे रक्त पिऊन त्याला वेताळगणामधली करते . Twilight या चित्रपटात सेम घटना घडलेली आहे फक्त नाही का माणूस आहे आणि ती प्रेमापोटी आपल्या प्रियकराच्या vampire गणामध्ये सामील होते इथे हिंदी चित्रपटात हिरो वेताळ गणामध्ये सामील होतो .


पुढची सगळी फिल्म ही Twilight या अमेरिकन फिल्मची भारतीय कॉपी बनत जाते कारण आता प्रतिभेची कसोटी असते आणि जेव्हा जेव्हा भारतीय लेखकांच्या पुढे असा प्रश्न येतो तेव्हा ते अमेरिका किंवा इतर कुठल्या देशातील आशयाची कॉपी मारण्याचा शॉर्टकट शोधतात तोच इथे शोधला गेलेला आहे Twilight हा अमेरिकन चित्रपट यासाठी निवडला गेला आहे.


शेवटी मग वेताळ शिल्लक उरतच नाही उरतो तो फक्त vampire आणि त्याची ढापलेली Twilight! शेवटाला आपणाला एकच गोष्ट कळते पुढचा पार्ट भेडिया विरुद्ध वेताळ म्हणजेच वरून धवन विरुद्ध आयुष्यमान खुराणा असा असणार आहे . माझा अंदाज चुकला नाही तर आता हे दोघे दोस्त बनतील आणि यक्षासनाशी लढतील 


एकंदरीत काय युरेशियन श्रुतीचे उत्तर आधुनिक शैव पंथी विस्तार सध्या अत्यंत जाणीवपूर्वक मांडले जात आहेत . हा सिनेमा त्याचा नमुना आहे 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे