ईश्वर, देव, God, उपयुक्ततावाद ,व्यवहार वाद, आणि सत्य २ श्रीधर तिळवे नाईक


गेले दोन दिवस जावेद अख्तर यांच्यामुळे आणि God बद्दल जो लल्लनटॉप वर वाद झाला त्यामुळे एक चर्चा सुरू झालेली आहे. याबाबत शैव काय म्हणतात आणि ईश्वरी संकल्पना काय आहे हे सांगणे आवश्यक वाटते म्हणून हा सर्व खटाटोप पुन्हा करतो आहे. यातले सर्व मुद्दे पूर्वी मांडले गेले होते फक्त ते वेगवेगळ्या लेखात असलेले यानिमित्ताने एकत्र आणतो आहे .


शिव सत्य असेल पण ईश्वर सत्य आहे का हा खरा प्रश्न आहे ? याचे कारण असे की शिव म्हणजे शून्य शक्ती म्हणजे अनंतता ! यांनी मिळून संसार निर्माण होतो आणि या संसारामध्ये शिवाची जी उपस्थिती आहे ती महाप्राणाची आहे आणि हा महाप्राण म्हणजे ईश्वर होय ही शैवांची संकल्पना आहे . याचा अर्थ स्पष्ट आहे की ईश्वर हा चौथ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर नाही आणि मुळातच ईश्वर ही संकल्पनाच शैव लोकांनी जन्माला घातली . ती आधी कुठल्याच श्रद्धेत नव्हती धर्मात नव्हती . या ईश्वराकडून या महाप्राणाकडून आणि शक्तीकडून जीवन आणि जीव निर्माण झाला आणि या जीवामध्ये जो प्राण आहे तो प्रत्यक्षात महाप्राणाचा भाग आहे प्राण आणि महाप्राण हे भिन्न नाहीत ते अभिन्न आहेत शैव भाषेत अभेद आहेत . म्हणजे असेही म्हणता येते की प्राण नाहीच फक्त महाप्राण अस्तित्वात आहे . जे कृष्णमूर्ती हेच सत्य वेगळ्या भाषेत सांगतात ते म्हणतात की संपूर्ण विश्वाला एकच mind आहे . पाश्चात्त्य देशांना अजूनही ही संकल्पना नीट पचवता आलेली नाही . मी स्वतः माईंड हा शब्द वापरत नाही कारण शैव धारेमध्ये माइंड हा शब्द प्रामुख्याने मन म्हणून येतो आणि तो भावशक्तीशी संबंधित आहे . म्हणजेच जीवाजवळ शरीर असते बुद्धी असते त्याचप्रमाणे मनही असते. मन हे भाग आहे पण पाश्चात्त्य देशांमध्ये जे कृष्णमूर्ती जेव्हा बोलतात तेव्हा ते अनेकदा पाश्चात्य संकल्पना सुद्धा वापरतात आणि म्हणूनच ते म्हणतात की संपूर्ण विश्वाचे एकच माईंड आहे . त्यांना प्रत्यक्षात म्हणायचे असते की संपूर्ण विश्वाचा एकच महाप्राण आहे पण शैव परिभाषेशी संबंध नसल्याने हा गोंधळ निर्माण झालेला आहे . मन हा शब्द वापरल्याने किती मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो याची कल्पना बहुतेक जे कृष्णमूर्ती यांना नसावी. त्यांनी पाश्चात्त्य देशातील माइंड आणि मॅटर यांच्या मधला वाद इथे जोडला आहे .त्यांनी ही गोष्ट लक्षातच घेतली नाही की जुडाईक परंपरेमध्ये फक्त भाव तंत्र आहे ज्ञानतंत्र नाही क्रिया तंत्र नाही शक्ती तंत्र नाही जोगतंत्र नाही आणि मोक्षही नाही. त्यामुळे साहजिकच त्यांच्यासाठी प्राण अस्तित्वातच नाही त्यांच्यासाठी फक्त मन अस्तित्वात आहे आणि बुद्धी व शरीर दुय्यम आहे .


उपयुक्तता वाद हा सुद्धा त्यामुळे जुड्याईक परंपरेमध्येच राहतो आणि त्यातून अनेक गोंधळ निर्माण होतात. म्हणजे उपयुक्तता वाद अनेकदा असे सांगतो की ईश्वर ही एक उपयुक्त संकल्पना आहे आणि जवळजवळ हाच धडा नंतरचा व्यवहार वाद सुद्धा गीरवतो. म्हणजे माणसाला नैतिक धारणा देण्यासाठी ईश्वरी संकल्पना उपयुक्त असल्याने आपण तिचा वापर केला पाहिजे किंवा ती व्यवहाराला उपयुक्त असल्यामुळे व्यवहारवादामध्ये तिचा वापर आपण केला पाहिजे असे व्यवहार वास सांगणाऱ्या तत्त्वज्ञानांना आणि त्याचा पुरस्कार करणाऱ्या अनेकांना वाटते. आता गमतीचा भाग असा आहे की जर का ईश्वर नाही असे वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे सिद्ध होत असेल तर एरव्ही वैज्ञानिक पुरावा स्वीकारणारा व्यवहार वाद इथे मात्र का शेण खातो ? वास्तविक व्यवहारवादाचा सिद्धांत जर का आपण बघितला तर वैज्ञानिक प्रामाण्य हे तिथे फार महत्त्वाचे त्यामुळे ईश्वर नाकाला पाहिजे परंतु तरीसुद्धा उपयुक्तता ही कसोटी लावून ईश्वर स्वीकारला जाऊ शकतो आणि ही जी जागा आहे ती उपयुक्तता वादाला आणि व्यवहारवादाला दुबळी बनवते .


प्रश्न असा आहे की ईश्वरी संकल्पना मग युरोपियन पद्धतीने कशी काय भारतात आली ? तर सर्वात प्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे की ही संकल्पना आत्मसात केली गेली प्रत्यक्षामध्ये ती वैदिक युरेशियन परंपरेमध्ये अस्तित्वातच नव्हती . याचे कारण उघड आहे वैदिक परंपरा ही बहुदेववादी परंपरा आहे त्यामुळे तिच्यामध्ये अनेक देव आहेत आणि होते. एकच एक देव प्रमुख केला पाहिजे ही संकल्पनाच मुळात वैदिक धर्मात आणि नंतरच्या ब्राह्मण धर्मात नाही. एका अर्थाने आपण असे म्हणू शकतो की ब्राह्मण धर्म हा अत्यंत व्यवहारवादी आहे आणि हा व्यवहार ब्राह्मणांच्या स्वार्थांशी निगडित असतो . धर्म ही उपयुक्त गोष्ट असल्याने आपण ती स्वीकारली पाहिजे आणि धर्माच्या आधारे आपल्याला राज्य प्रस्थापित करता येत असल्यामुळे आणि आपल्याला स्वतःला सर्वोच्च वर्ण म्हणून स्थापित करता येत असल्यामुळे आपण धर्म स्वीकारला पाहिजे अशी ब्राह्मण धर्माची कळत नकळत जडणघडण असते आणि त्यामुळे सगळी मांडणी ही त्या अंगाने येते यामुळेच मग जेव्हा इंद्र हा देव किंवा यज्ञ उपयुक्त ठरत नाही तेव्हा तो सहज रित्या त्या देवाला फेकून देतात आणि विष्णू हा देव उपयुक्तता वादाच्या अंगाने डेव्हलप करत नेतात. हीच गोष्ट ते शिवबाबत करतात . ते रुद्र ही संकल्पना वापरत त्यामध्ये शिव विरघळवत नेतात याचा दुष्परिणाम असा होतो की रुद्र हाच शिव असा प्रचार मग तयार होतो आणि तो इतका मोठ्या प्रमाणात केला जातो की हळूहळू शिव आणि रुद्र एक होऊन जातात . वास्तविक पूजा ही संकल्पनाच मुळात वैदिक धर्मामध्ये नाही . त्यामुळे साहजिकच ती ब्राह्मण धर्मात पण नाही परंतु पूजा स्वीकारावी लागेल कारण उपयुक्तता वादाच्या तत्त्वावर व्यवहारवादाच्या तत्वावर आता जर का आपल्याला आपले पौराहित्य टिकवायचे असेल तर आपण बदलले पाहिजे हे लक्षात आल्याने मग एकीकडे वेद प्रमाण मानायचे पण दुसरीकडे वैष्णव नावाचा नवीन धर्म निर्माण करायचा असा प्रकार सुरू होतो यातूनच मग वेदातलीच एक देवता जे अत्यंत दुय्यम होती ती विष्णू ही देवता निवडली जाते आणि मग हळूहळू हरी ही संकल्पना जी आत्तापर्यंत वेदांमध्ये जवळजवळ शत्रू सारखी आहे ती अधिक वाढवत नेली जाते 


या सर्वांमध्ये देव ब्राह्मणांना निर्माण करत नसून अनेकदा ब्राह्मणच देवांना निर्माण करतात असे चित्र निर्माण होते. साहजिकच मग शिवाचे काय करायचे तर त्याला सुद्धा एक देव स्वरूप दिले पाहिजे म्हणून मग महादेव नावाची संकल्पना निर्माण केली जाते आणि ती व्यवस्थित भारतामध्ये प्रचलित केली जाते . त्याचे प्राचीनत्व स्वीकारले जाते तो आपल्या आधी आहे हेही स्वीकारले जाते . हळूहळू त्यानेच वेद निर्माण केले अशी ही संकल्पना मांडली जाते. साहजिकच मग एकदा वैदिक प्रामाण्य तुम्ही स्वीकारले की आपोआपच ब्राह्मण धर्मातला वर्णाश्रम सुद्धा तुम्ही स्वीकारता . वर्णजात व्यवस्था स्वीकारता. पण प्रश्न तसाच राहतो तो म्हणजे ईश्वर कसा निर्माण झाला हा संसार कसा निर्माण झाला ? 


आपण जर का बारकाईने पाहिले तर आपणाला असे दिसते की संसाराच्या निर्माण होण्याचा जो शैव सिद्धांत आहे तो स्वीकारला जात नाही . त्याएवजी ब्रह्म किंवा पुरुष ही संकल्पना आणली जाते . आणि ब्रह्मदेवाने संसार निर्माण केला असे तत्व प्रस्थापित केले जाते. साहजिकच मग प्रश्न निर्माण होतो की हा संसार कोणी निर्माण केला त्यासाठी मग ब्रह्मदेव नावाचा देव आणला जातो . ब्रह्मदेवाने हा संसार कसा काय निर्माण केला . त्यातूनच मग त्याने प्रथम स्त्रीला निर्माण केले हा सिद्धांत येतो पण प्रॉब्लेम असा येतो की ब्रह्मदेवाने जर काय प्रथम स्त्री निर्माण केली तर तो तिचा बाप होतो आणि त्यामुळे तिच्यापासून ब्रह्मदेव संतान निर्मिती करायला जातो आणि यातूनच मग फार नैतिक पेच तयार व्हायला लागतात यातून पळ काढण्यासाठी मग शापाची संकल्पना येते आणि ब्रह्मदेवाची पूजा करू नये असा सिद्धांत तयार करावा लागतो. राम आणि कृष्ण हे मूळचे स्थानिक लोकांचे असलेले शैव आदर्श पूर्णपणे बदलून टाकून त्यांच्या आधारे महाकाव्य निर्माण होते आणि अवस्था अशी होते की मूळचा सकाळचा सूर्य असणारा सकाळचा राम हा विष्णूचा अवतार बनतो तर संध्याकाळचा सूर्य असणारा श्याम रात्रीचा सूर्य असणारा कृष्ण हे दोघेही विष्णूचे अवतार बनतात. म्हणजेच इथे माणूसच ब्राह्मणच देव निर्माण करताना दिसतात. भारताची विशेषता हीच आहे की तिथे हे सर्व एका अर्थाने नोंदवले गेले आहे . युरोपमध्ये मात्र याची नोंदणी नीट झालेली नाही .


कुठल्याही ईश्वर वादाविषयीचा जेव्हा डिबेट सुरू होतो तेव्हा साहजिकच देवाने माणूस निर्माण केला की माणसाने देव निर्माण केला हा सर्वात पहिला प्रश्न असतो. या अंगाने येणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच असतो की जर का ईश्वराने संसार निर्माण केला असेल तर मग ईश्वराला कोणी निर्माण केले. जैन लोकांनी हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे आणि शेवटी त्यांनी दिलेले उत्तर असे आहे की ईश्वर अस्तित्वात नाही किंबहुना जगामध्ये सर्वात प्रथम निरीश्वर वाद व्यवस्थित कोणी मांडला असेल तर तो जैन लोकांनी मांडलाय शेवटी मग जैन धर्माचा निष्कर्ष असा असतो की ईश्वर अस्तित्वात नाही आणि विश्व स्वयंभू आहे . म्हणजेच मूळ मुद्दा ईश्वर स्वयंभू आहे की विश्वस्वयंभू आहे? जावेद अख्तर जेव्हा या संदर्भात डिबेट मध्ये भाग घेतात तेव्हा त्यांना भारतीय परंपरा बहुतेक माहीत नसते जैन परंपरा त्यांना माहित नसते त्यांना असे वाटते की हे सगळे काही पाश्चात्त्य देशात सुरू झालेले आहे परंतु प्रत्यक्षामध्ये मूळचा हा डिबेट शैव लोकांच्यातला आणि महावीर प्रणित जैन धर्मातील लोकांच्यातला होता . तुम्ही जर ईश्वराने संसार जन्माला घातला ही संकल्पना घेतली तर मग ज्याने जन्म दिला त्याला कोणी जन्माला घातले असा प्रश्न निर्माण होतो आणि हे नेव्हर एंडिंग आहे म्हणूनच आपण हे विश्व कोणी जन्माला घातले हा प्रश्न विचारू नये असे जैन म्हणतात त्यापेक्षा विश्व स्वयंभू आहे हे जर का स्वीकारले तर प्रश्न मिटतो त्या उलट बुद्ध हा प्रश्न अव्याकृत म्हणून सोडून देतो त्याऐवजी आता जो माझ्या पुढचा संसार आहे त्या संसारामध्ये मला निर्वाण कसे मिळेल हा मूलभूत प्रश्न बुद्ध विचारतो कारण निर्वाणासाठी ईश्वराची आवश्यकता नाही असे त्याचे म्हणणे आता हे म्हणणे कुठून येते तर ही मुळातच ज्ञानतंत्राची संकल्पना आहे. ज्ञान तंत्रामध्ये ईश्वराची गरज नाही योग तंत्रामध्ये जोगतंत्रामध्ये ईश्वराची आवश्यकता नाही क्रिया तंत्रामध्ये ईश्वराची आवश्यकता नाही मग आवश्यकता कुठे आहे तर भावतंत्रामध्ये ईश्वर आवश्यक बनत जातो कारण भावना ह्या नेहमीच सगुण असतात आणि त्यांना काहीतरी समूर्त आणि सगुण द्यावे लागते. शैवांचा ईश्वर हा असा भावतंत्रासाठी म्हणून जास्त प्रचलित केला गेला आहे आणि त्या ईश्वराच्या संदर्भातच मग भगवान महावीर यांनी प्रथम युक्तिवाद सुरू केले . अधिक खोलात गेले तर आपणाला असे दिसते की मुळात निर्माण आणि निर्मिती यांच्यात भेद मानला तरच हा प्रश्न निर्माण होतो. शैव असला भेद मुळात मानतच नाहीत त्यामुळे ईश्वर म्हणजेच महाप्राण आणि संसार वेगळे मानले जात नाहीत. इतकेच कशाला प्राण आणि महाप्राण सुद्धा वेगळे नसतात फक्त शरीराच्या उपस्थितीमुळे शरीरातील महाप्राण हा स्वतंत्र प्राण वाटतो ही शैवांची धारणा आहे . हा प्राण जेव्हा स्वतःला स्वतंत्र समजायला लागतो तेव्हा मग मद तयार होतो मग मन तयार होते अहंकार तयार होतो अहं तयार होतो . स्व तयार होतो .


पण ज्या क्षणी प्राणाला कळते की आपणच महाप्राण आहोत त्या क्षणी मोक्ष प्राप्ती होते . जोपर्यंत मी असतो तोपर्यंत मोक्ष असत नाही आणि जेव्हा मोक्ष असतो तेव्हा मी असत नाही .


याउलट सर्व जुडाइक धर्मामध्ये ईश्वर वेगळा आणि विश्व वेगळे असते अनेकदा तर हे विश्व म्हणजे फक्त पृथ्वी आहे त्यापलीकडे काही असते याची फारशी कल्पना या धर्मांना नाही . त्यामुळेच दिवस ही संकल्पना सुद्धा मानवी असून सुद्धा ते ईश्वराला लावतात आणि हे विश्व गॉड ने सात दिवसात तयार केले असे मानतात जणू काय दिवस ही फुटपट्टी माणसाची असली तरी ती जणू देवाची पण होती. साहजिकच हा सगळा डिबेट मग इस्लाम मध्ये सुद्धा अवतरतो आणि तो कसा अवतरतो त्याचे प्रत्यंतर आपण आत्ता नुकतेच लल्लनटॉप वरच्या या वादामध्ये पाहिलेले आहे . 


वास्तविक यातला एक मुख्य युक्तीवाद म्हणजे God हा ज्ञानाच्या कक्षेत येत नाही तो मेटा फिजिकल आहे प्रत्यक्षामध्ये ही संकल्पना ना वैदिक आहे ना शैव आहे .शैवांच्या मध्ये ईश्वर ही संकल्पना मुळातच शिव आणि शक्ती यांच्यामुळे आपणाला ज्ञात होत असल्याने ती ज्ञानाच्या कक्षेत येते आणि तिच्यावर चर्चा झाली पाहिजे. शैव तिला मेटा फिजिकल मानत नाहीत त्यांच्या मते हे सर्व फिजिकल आहे . अगदी विचार सुद्धा ते केमिस्ट्री आहे असेच म्हणतात . विचारांना सुद्धा वजन असते हे त्यांना मान्य आहे भले ते अतिशय सूक्ष्म असेल पण असते . त्यामुळे आपल्याकडे प्रत्यक्षात काय असते तर आपल्याकडे ईश्वर नावाचा विचारच असतो आणि म्हणूनच ईश्वरावर वाद होऊ शकतात अगदी God हा सुद्धा एक विचार असतो आणि संस्कार असतो . जेव्हा एखादी गोष्ट विचार व संस्कार यांच्यामध्ये सापडते तेव्हा ती आपोआपच वैचारिकतेत येते. त्यामुळे आस्तिकतेचा जो हा विचार आहे की God हा मेटा फिजिकल आहे तो चुकीचा आहे . 


वैदिकांची देव ही संकल्पना आणि युरोपियन लोकांची देव ही संकल्पना एकच आहे दोघेही मूर्त असतात सगुण असतात फक्त युरोपियन लोक सुद्धा ग्रीक धर्मामध्ये बहुदेववादी होते आणि ते नंतर जुडाईक होऊन एक देववादी झाले ख्रिश्चन झाले . आणि याला जबाबदार रोमन लोक होते त्यांनी रोमन कॅथॉलिक नावाचा एक धर्म तयार केला आणि संपूर्ण युरोप वर युरेशियन प्रभुत्व लादले . मी मागेच म्हटल्याप्रमाणे युरेशियन लोकांना ही अत्यंत घाणेरडी सवय आहे ते व्यवस्थितपणे सर्व सत्ता आपल्या हाताखाली आणतात आणि त्यासाठी धर्माचा वापर करतात. आजही ग्रीक धर्मामध्ये मोक्ष ही संकल्पना होती की नव्हती हा एक वादाचा विषय आहे कारण तिथे सुद्धा हेरॉकलिटीस आणि पायथागोरस हे अशा प्रकारच्या कुठल्यातरी मुक्तीच्या संकल्पनेच्या दिशेने नक्कीच विचार करत होते प्रत्यक्षात त्यांना ती मुक्ती मिळाली नाही आणि पुढचा गोंधळ तयार झाला. किंबहुना त्यांच्यानंतर कदाचित मुक्तीकडून ते मोक्षाकडे गेले असते परंतु ते तसे गेले नाहीत कारण अचानकपणे रोमन लोकांनी आक्रमण करून तिथे हा सगळा जो विचार होता तो सगळाच्या सगळा नाहीसा केला आणि आपल्या अत्यंत हृस्व दृष्टिकोनातून जग तयार केले. साहजिकच मग ग्रीक तत्त्वज्ञानाचे युग नाहीसे झाले आणि त्या जागी रोमन कॅथॉलिक धार्मिक अंधार पसरला.


असाच प्रकार आरब स्थानात होता तिथे सुद्धा बहुदेव वाद होता तो रोमन कॅथोलिक आणि जुडाईक परंपरेच्या प्रभावाखाली येऊन एक देव वादी झाला म्हणजे इथे सुद्धा युरेशियन लोकांचे तत्त्वज्ञान राजकीय तत्वज्ञान बनले आणि इस्लाम या युरेशियन राजकीय तत्त्वज्ञानाची सर्वोच्च आविष्कृत शैली बनली इस्लामने आफ्रिकेतले सगळे प्राचीन धर्म नाहीसे केले आणि तिथे आपला धर्म लादला. 


साहजिकच लल्लन टॉप वर जो डिबेटसुद्धा झाला तो विचित्र होता कारण तो चक्क जुडाईक होता. या डिबेटचा आणि भारतीय धर्मांचा संबंध काय हा प्रश्न मूलभूत प्रश्न आहे आणि तो कोणी विचारलाच नाही जणू काय भारत हा काहीतरी जुडाईक परंपरेमध्ये वावरत असतो असा गैरसमज दोन्ही वक्त्यांचा होता आणि एक हिंदू ज्याला स्वतःला हिंदू म्हणजे काय माहित नाही भारतीय धर्म म्हणजे काय माहित नाही हा डिबेट कंडक्ट करत होता . कॉन्व्हेंट मधल्या शिकलेल्या लोकांसाठी त्यामुळे हा साहजिकच चर्चेचा विषय झाला . कॉन्व्हेंट चा सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की कॉन्व्हेंट नेहमीच भारतीय धर्मांच्या पासून विद्यार्थ्यांना तोडते . ही एक ख्रिश्चन कॉन्स्पिरसी असते पण ती कळत नाही . अगदी महात्मा ज्योतिबा फुले यांना सुद्धा ती कळाली नाही तिथे इतरांच्या बाबतीत काय बोलावे ? 


प्रॉब्लेम असा आहे की अनेकांचा असा गैरसमज आहे की ईश्वर ,देव आणि God या संकल्पना एकच आहेत . हा भ्रम पुरोगामी लोकांनी तयार केला प्रत्यक्षामध्ये या पूर्णपणे तीन वेगळ्या कल्पना आहेत यातील देव ही संकल्पना बहुदेववादाशीच निगडित आहे त्या उलट God अल्लाह ही संकल्पना हळूहळू एक देव वादाशी निगडित झाली आहे पूर्वी ती बहुदेववादाशीच निगडित होती. आपल्याकडे सुद्धा नंतर याच प्रवाह खाली शिव शैव आणि वैष्णव विष्णू असे दोन एक देववादी धर्म तयार झाले आणि हे प्रामुख्याने ब्राह्मण लोकांनी तयार केले . मात्र बहुदेव वाद सुटला का? तर नाही कारण मुळातच ब्राह्मणांना अनेक देव लागतात कारण जेवढे देव तेवढी दक्षिणा हे समीकरण त्यांना व्यवस्थित माहिती आहे.


हे देव इतके वाढत गेले की शेवटी नाईलाजाने आचार्य शंकर यांनी पंचायतन दिले ते म्हणजे शिव,शक्ती, गणपती, स्कंद आणि सूर्य ! पुढे आद्य शंकराचार्य यांनी ते शिव ,शक्ती, गणपती ,स्कंद आणि विष्णू असे केले तर त्या पुढचे पाऊल रामानुजाचार्य यांनी टाकले आणि त्यांनी स्कंद बाजूला करून त्या जागी सूर्य आणला आणि विष्णू मुख्य केला. 


भारतामध्ये त्यामुळे ईश्वर ही संकल्पना फक्त शैव धर्मात उरली . प्रबोधन काळामध्ये हा ईश्वर पुन्हा एकदा जुड्याईक परंपरेशी जोडला गेला आणि त्यातूनच ईश्वर = God हा आजचा गोंधळ सुरू झाला .


सावरकर यांनी गाय हा उपयुक्त पशु आहे असे म्हटले होते याच काळामध्ये ईश्वर ही उपयुक्त संकल्पना आहे असे व्यवहार वाद सांगायला लागला .या दोन्ही संकल्पनांच्यात खरोखर काही फरक आहे का असा प्रश्न विचारता येतो . सावरकर उपयुक्ततावादी आहेत तर व्यवहार वाद हे त्याचे आधुनिक रुप आहे.


त्यामुळे साहजिकच रसेल यांच्या वाय आय एम नॉट ख्रिश्चन या ग्रंथाचा प्रचंड प्रभाव या डिबेटवर पडलेला दिसतो . युरोपच्या प्रबोधन युगामध्ये ज्या काही संकल्पना आल्या त्यामधली एक संकल्पना म्हणजे फ्री विल होय साहजिकच धर्मवादी लोक ही संकल्पना वापरतात याचे कारण असे आहे की या जगामध्ये प्रचंड हिंसा होते या जगामध्ये प्रचंड अन्याय असतो युद्ध असतात या सर्व गोष्टींना अर्थात त्या हिंसेला सुद्धा God जबाबदार आहे की नाही असा प्रश्न येतो.


गाजा पट्टीमध्ये झालेला हिंसाचार यामुळे केंद्रस्थानी आला. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी म्हणूनच सैतान संकल्पना निर्माण झाली . म्हणजे जगात जे काही वाईट होते त्यामागे सैतान असतो आणि God तुमची परीक्षा घेण्यासाठी म्हणून सैतानाला वापरत असतो असे उत्तर धर्माने दिले प्रश्न असा आहे की जर God परम दयाळू असेल तर त्याला हे सर्व करण्याची गरज काय ? या प्रश्नापासून सुटका करून घेण्यासाठी म्हणून मग माणसालाच फ्री वील दिली आहे असे समीकरण मांडले गेले आणि हे समीकरण पुरोगामी आहे . या संपूर्ण डिबेटमध्ये या पुरोगामी संकल्पना वारंवार वापरल्या गेल्या मात्र ज्यांनी त्या वापरल्या त्यांनी हे सांगितले नाही की या जुन्या पुरोगामी व मध्ययुगीन संकल्पना आहेत. 


प्रश्न असा आहे की मगया बाबतीत शैव काही सांगतात की नाही ? तर याबाबतीत उत्तर स्पष्ट आहे ते म्हणजे शक्ती स्वभावत: अनंत आहे ती नेहमीच प्रसरण पावत असते आणि त्यामुळेच शिव आणि शक्ती यांनी युक्त असलेल्या जीवामध्ये सुद्धा दोनच शक्यता तयार असतात एक मोक्षाची शक्यता असते आणि दुसरी अनंत होत सतत पसरत जाण्याची व्याप्ती वाढवण्याची शक्यता असते . जीव जेव्हा व्याप्ती वाढवायला निघतो तेव्हा मग त्याच्या हातून अनेक गोष्टी घडायला लागतात त्यातील एक गोष्ट म्हणजे समोरच्या माणसाचा प्रदेश आणि जीव बळकावणे . हे सर्व प्रसार पावण्याच्या शक्तीच्या सर्व काही व्यापत जाण्याच्या स्वभावामधून निर्माण होते . प्रचंड प्रसरण पावणे हे आज सुद्धा या ब्रम्हांडात चालू आहे. संसारात चालू आहे . याला मी नेहमी इन्फिनिटींग infiniteing हा शब्द वापरतो . शक्ती ही अशी इन्फिनिटीच होत जाते आणि आपण तिच्या या प्रसरण पावण्याच्या उद्योगाचे केवळ भाग आहोत आणि जेव्हा तुम्हाला हा सगळा उद्योग कळत जातो त्यातली निरर्थकता कळत जाते तेव्हा तुम्ही मग शांतपणे पुन्हा शून्यात परतण्यासाठी यात्रा सुरू करता आणि हिलाच मोक्षाची यात्रा म्हणतात . जीव हा मोक्षात परतू शकतो विशेषता मनुष्य म्हणून मोक्षात परतु शकतो शून्यात परतू शकतो ही त्याची सर्वात मोठी खासियत आहे .


जुड्याईक धर्माचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ते शेवटपर्यंत देववादात एक देव वादात अडकून राहतात ईश्वरवादाकडे येतच नाहीत डिबेट करणाऱ्या आणि डिबेट स्पॉन्सर आणि कंट्रोल करणाऱ्या एकालाही हे कळलेले दिसत नाही . भारतात जन्मून सुद्धा भारत न कळणारे असे खूप लोक आहेत. म्हणून तर हिंदुत्ववाद निर्माण झाला व तो पण आश्चर्यकारकरीत्या युरोपियन आणि युरेशियन होत जातो . शैव श्रुतीची किती आवश्यकता आहे हे या डिबेटमध्ये पुन्हा एकदा लक्षात येते .


याचा अर्थ स्पष्ट आहे तो म्हणजे ईश्वराचे सत्याशी काहीही देणे घेणे नाही .God चे काहीही देणे घेणे नाही. या दोन्ही शेवटी अंतिमतः धार्मिक संकल्पना बनून राहतात . सत्य या दोघांच्या पलीकडे शिव आणि शक्ती म्हणून आहे. शून्य आणि अनंत म्हणून आहे .


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे