शिवशक्ती विवेक तंत्र श्रीधर तिळवे नाईक १ इंद्रियांना रूप गोचर होते इंद्रिय मेंदूला गोचर होतात मेंदू प्राण लिंगाला गोचर होतो प्राणलिंग कोणालाही गोचर होत नाही २ प्राणलिंग म्हणजे शरीरामध्ये असलेला प्राण आणि त्याच्या मर्यादा कारण तो शारीरी असतो मात्र तरीही तो शिवाचा भाग असतो ३ रूपाला रंग असतो रूपाला आकार असतो सूक्ष्म अथवा स्थूल अथवा मध्यम अथवा प्रचंड ! रूप लघु असते किंवा दीर्घ असते इंद्रिये त्यांना इंद्रियतात गोचरतात आणि मायेत सापडली की गोंजारतात ४ इंद्रिय संवेदनशील असतात किंवा संवेदन बधिर डोळस असतात किंवा आंधळी तीक्ष्ण असतात वा बावळी तरीही मेंदू जाणण्याचा प्रयत्न करतो आणि मेंदू द्वारा प्राणलिंग जाणत असते जाण एकप्राण असते ५ चित्त जाणीव आणि जाण यांनी युक्त असते मन असोशी आस आणि आसक्ती यांनी युक्त असते बुद्धी सतर्क ,तर्क आणि कुतर्क यांनी युक्त असते अंत:करण मज्जा जिच्यात मेंदूही येतो , चित्त , मन , स्मृती , अहम यांनी युक्त असते हे अंतकरणच श्रद्धा आणि अश्रद्धा , इच्छा आणि अनिच्छा, काम आणि अकाम , निश्चय आणि अनिश्चय , दृढता आणि चंचलता , भय आणि धैर्य , विवेक आण...
Posts
Showing posts from January, 2026
- Get link
- X
- Other Apps
नाव ठेवण्याचे उद्योग आणि युरेका डेकॅथलॉन माझ्या एका जुन्या मित्रांने तू युरेका हे नाव बदलून डे कॅथलोन हे नाव का निवडले असा प्रश्न विचारलाय जवळजवळ 1992 पर्यंत मी १ गझल २ अफवा ३ युरेका ४ महानुभव या चार नावांचा विचार करत होतो म्हणजे गझलचे चार खंड काढायचे अफवाचे दोन खंड काढायचे युरेकाचे दहा खंड काढायचे आणि महानुभवचे तीन खंड काढायचे असे हे प्लॅनिंग होते यातील अफवा हा नंतर एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार म्हणून आल्याने प्रश्न मिटला खरे तर काव्यसंग्रहाला काय नावे द्यायचे हा माझ्या पुढे कायमच प्रश्न असतो कारण तुमच्या कवितांचे संपूर्ण सत्व त्या काव्यसंग्रहाच्या नावामध्ये उमटलेले असते आणि मी इतक्या विविधतेत नांदणारा कवी आहे की नावामध्ये सगळं कसं मॅनेज करायचा हा फार मोठा प्रश्न असतो युरेका हे नाव मी ठेवले होते कारण मला कविता सापडली होती आणि माझ्यासाठी तो अतिशय आनंदाचा क्षण होता त्यातून ते नाव ठेवले परंतु सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या केरीज खेरीज त्यामागचा इतिहास अनेकांना माहित नाही असे माझ्या लक्षात आले शिवाय दहाच्या दहा खंडांना कसे काय युरेका हे नाव द्यायचे असा प्रश्न निर...
- Get link
- X
- Other Apps
सत्य ,व्यवहार वाद आणि उत्तर व्यवहार वाद भाग ११ माया , कला आणि व्यवहार वाद श्रीधर तिळवे नाईक आपण सध्या व्यवहाराची चर्चा करत आहोत आणि त्या अंगाने व्यवहारवादाची ! सर्वसाधारणपणे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्यांची दखल व्यवहार वादाला घ्यावी लागली. इंग्लंड मध्ये या काळामध्ये लॉजिकल पॉझिटिव्हिजम ही एक फार मोठी वैचारिक चळवळ होती तिचा आधार इंद्रिय वाद आणि इंद्रियप्रामाण्यवाद होता ज्याची पहिली मांडणी फ्रान्सिस बेकन यांनी केली होती. तर दुसऱ्या बाजूला हेगेलचा विश्वचैतन्यवाद प्रभावित करत होता ज्याची मांडणी बुद्धी प्रामाण्यवाद व भाव प्रामाण्यवाद त्यांच्यावर उभ्या राहिलेल्या हेगेल कडूनच आली होती एका अर्थाने आपल्याला येणारा अनुभव हा इंद्रियांच्यामुळे येतो की आपल्या मनामुळे येतो हा मूलभूतच प्रश्न होता . गणिताचे ज्ञान हे अमूर्त असल्याने साहजिकच ज्यांना गणित कळायचे ते सर्व लोक या काळामध्ये चैतन्य प्रामाण्यवादी होते आपल्याकडे मात्र शैव लोकांची माया ही संज्ञा फार लोकप्रिय झालेली आहे मायेचा साधा सरळ अर्थ मांची म्हणजे आईची काया असा होतो पण नंतर याला अनेक ...
- Get link
- X
- Other Apps
पुन्हा एकदा स्वामी विवेकानंद श्रीधर तिळवे नाईक काल स्वामी विवेकानंद यांची जयंती झाली आणि त्याबद्दलच्या अनेक चर्चा नेहमीप्रमाणे दुमदुमल्या . स्वामी विवेकानंदांना अनेक पद्धतीने पाहता येते १ वैदिक दृष्टीकोन २ ब्राह्मणी दृष्टिकोन ३ वैष्णव दृष्टिकोन ४ वेदांती दृष्टिकोन ५ हिंदुदृष्टिकोन ६ नव बौद्ध दृष्टिकोन आणि अर्थातच ७ शैव दृष्टिकोन ! स्वामी विवेकानंद हे वैदिक धर्मानुसार वेदांना प्रमाण मानणारे होते पण त्यांचा भर वेदांच्या पेक्षा उपनिषदांच्यावर होता याचे एकमेव कारण ते वेदांती होते आणि वेदांताची सुरुवात उपनिषदांच्या पासून होते ब्राह्मणी दृष्टिकोनाने मात्र अलीकडे ब्राह्मणी हिंदुत्ववादी दृष्टिकोनामध्ये त्यांना बसवण्याचा आटोकॉट प्रयत्न चालवलेला आहे. हा प्रयत्न वर्ण जाती संदर्भातील त्यांचे विचार स्वीकारणार की नाही हे मात्र कधीही स्पष्ट होत नाही फक्त त्यांनी सनातन हिंदू धर्माचा प्रचार अमेरिकेमध्ये सर्वात प्रथम केला अशा प्रकारचा दृष्टिकोन हे लोक बाळगतात आणि तोच अनेकदा आपल्याला पाठ्यपुस्तकातून शिकवण्यात येतो . प्रत्यक्षामध्ये अलीकडे अ...
- Get link
- X
- Other Apps
पुन्हा शशी थरूर, नेहरू ,मोदी आणि हिंदुत्ववाद श्रीधर तिळवे नाईक शशी थरूर यांनी मोदी हे हुकूम शहा नाहीत याची खात्री देत नेहरूं यांचे योगदान मान्य करून मोदी यांची जी नेहरू यांच्यावर टीका सुरू आहे तिला पाय बंद घालण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा नेहरूंचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. मुळातच प्रत्येकाचे राजकारण सध्या नेहरू यांच्याशी निगडित असल्यामुळे काय घडले हे राजकारण बाजूला काढून बघावे लागते त्याचप्रमाणे खुद्द नेहरूही या काळात आपले राज्य कारण खेळत असल्यामुळे ते काय करत होते हेही नीट पाहावे लागते पंडित नेहरू म्हणजे काय कोणी संत नव्हे . त्यामुळे एकदा नेमके काय घडत होते ते पाहणे आवश्यक आहे म्हणजे मग ही टिका योग्य आहेत की अयोग्य आहे ते ठरवता येते . सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मुस्लिम येण्यापूर्वीची भारतीय परंपरा ही निर्विवादपणे धर्मनिरपेक्षण नसली तरी सर्वधर्मसमभावी होती ही वस्तुस्थिती आहे. पण ही वस्तुस्थिती जणू काय मुस्लिम काळात सुद्धा कंटिन्यू होती हे गृहीत धरणे हा काँग्रेसचा नतद्रष्टपणा आहे तो इतिहासाचा विपर्यास आहे . वस्तुस्थिती अशी आहे की इसवी सन १००० नंतर आलेल्या ...