पुन्हा शशी थरूर, नेहरू ,मोदी आणि हिंदुत्ववाद श्रीधर तिळवे नाईक
शशी थरूर यांनी मोदी हे हुकूम शहा नाहीत याची खात्री देत नेहरूं यांचे योगदान मान्य करून मोदी यांची जी नेहरू यांच्यावर टीका सुरू आहे तिला पाय बंद घालण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा नेहरूंचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. मुळातच प्रत्येकाचे राजकारण सध्या नेहरू यांच्याशी निगडित असल्यामुळे काय घडले हे राजकारण बाजूला काढून बघावे लागते त्याचप्रमाणे खुद्द नेहरूही या काळात आपले राज्य कारण खेळत असल्यामुळे ते काय करत होते हेही नीट पाहावे लागते पंडित नेहरू म्हणजे काय कोणी संत नव्हे . त्यामुळे एकदा नेमके काय घडत होते ते पाहणे आवश्यक आहे म्हणजे मग ही टिका योग्य आहेत की अयोग्य आहे ते ठरवता येते .
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मुस्लिम येण्यापूर्वीची भारतीय परंपरा ही निर्विवादपणे धर्मनिरपेक्षण नसली तरी सर्वधर्मसमभावी होती ही वस्तुस्थिती आहे. पण ही वस्तुस्थिती जणू काय मुस्लिम काळात सुद्धा कंटिन्यू होती हे गृहीत धरणे हा काँग्रेसचा नतद्रष्टपणा आहे तो इतिहासाचा विपर्यास आहे . वस्तुस्थिती अशी आहे की इसवी सन १००० नंतर आलेल्या मुस्लिम राजवटी कधीही सेक्युलर नव्हत्या .त्या कायमच जास्तीत जास्त धर्मांतर घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या होत्या .त्यामुळे याबाबतीत मुळातच काँग्रेसने कायमच इतिहासाचा आपलाप केला आहे . सेक्युलर लोकांनी हे इस्लामच्या बाजूने केलेले अपमंडन आहे जे इतिहासाला धरून नाही . प्रॉब्लेम असा झाला की हिंदूंची अफाट लोकसंख्या आणि मुसलमानांची अतिशय अल्पसंख्या यामुळे सर्व हिंदूंचे धर्मांतर घडवणे हे कुठल्याच मुस्लिम राजाला शक्य नव्हते ( यात निजाम सुद्धा येतो)कारण शेवटी बहुसंख्यांक लोकांचा एक दबाव संख्येमुळे बनत राहतो तरीसुद्धा एवढ्या अल्पसंख्याने येऊन सुद्धा मुस्लिमांनी जवळजवळ त्या काळातील भारताची 40 ते 45 टक्के लोकसंख्या ही मुसलमान बनवलेली आहे आणि आता या लोकांना शंभर टक्के धर्मांतर घडवता येणे शक्य आहे असे वाटत असते कारण आता तर आमची लोकसंख्या प्रचंड आहे जर एक टक्का लोकसंख्या असताना आम्ही एवढे मोठे धर्मांतर घडवतो तर मग एवढ्या मोठ्या लोकसंख्येत आता आम्ही आहोत तर सहज आम्ही धर्मांतर घडवू शकतो हे तर्कशास्त्र ऑलरेडी मुसलमानांचे तयार झालेले आहे ते तुम्हाला आवडो अगर ना आवडो .मात्र मुस्लिम राजवटीमध्ये मुसलमानांची संख्या ही कधीही दहा टक्क्यांच्या वर गेलेली नव्हती जास्तीत जास्त काही प्रदेशांमध्ये ती 25% होत यापेक्षा जास्त लोकसंख्या कधीच मुस्लिम लोकांची नव्हती हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि याला कारण अर्थातच हिंदू सुद्धा मग ते बौद्ध असोत जैन असोत वैष्णव असोत किंवा शैव असोत लोकसंख्या नियंत्रण करत नव्हते त्यामुळे लोकसंख्या सगळ्यांचीच वाढत होती त्यामुळे जे लोक हे सांगतात की मुस्लिम राजवटीमध्ये प्रयत्न नव्हते त्यांना इतिहास नीट माहीत नाही उलट जी काही लोकसंख्या होती त्याच्या आधारे सर्व मुल्ला मौलवी या देशांमध्ये हिंदूंचे धर्मांतर कसे घडवता येईल हेच पाहत होते आणि हीच गोष्ट ख्रिश्चन पादरी लोकांच्या बाबतीतही आहे हे दोन्ही धर्म इस्लाम आणि ख्रिश्चन हे भारतात कायमच धर्मांतराची मोहीम चालवत आलेले होते आणि आता सुद्धा ते ती चालवत आहे पण या धर्मांतराचा प्रतिकार ज्या लोकांनी प्रामुख्याने पुरोहित करायचा होता त्यांनी तो केला का ? या काळामध्ये ब्राह्मण असोत किंवा पंडित असोत या प्रतीकारासाठी काय करत होते ?वस्तुस्थिती अशी आहे की या धर्मांतराचा प्रतिकार फक्त शैव धर्माने केलेला आहे शिवाजी महाराज वगैरे जे राजे आले त्यांनी केलेला आहे या काळातले सर्व वैष्णव राज्यकर्ते या धर्मांतराबाबत काय भूमिका घेत होते ? तर काहीही नाही! कसल्याही प्रकारचा प्रतिकार या लोकांनी केलेला नाही आणि हे लोक आता खोटा इतिहास सांगत आहेत . वस्तुस्थिती अशी आहे की राजपूत लोक जेव्हा वैष्णव झाले तेव्हा त्यांनी आपल्या मुली मुस्लिम बादशहांना दिलेल्या आहेत या एका ऐतिहासिक वस्तूस्थिती वरून सुद्धा आपल्याला स्पष्टपणे कळते की नेमके काय चालले होते? हीच गोष्ट आपण जर का तुकारामाचे अल्ला बद्दलचे अभंग रामदासाचे अल्ला बद्दलचे अभंग बघितले की वैष्णव कोणत्या भूमिकेत होते हे आपणाला कळते . त्यामुळे वैष्णव कायमच अल्लाच्या प्रेमात होते हे लक्षात घेतले पाहिजे आणि कबीरांच्या सारखे काही अपवाद असणारे संत हे वैष्णव लोकांच्या प्रेमात होते हेही आपण लक्षात घेतले पाहिजे . संक्रांत आली ती नेहमीच शैव लोकांच्यावर आलेली आहे . आणि ही संक्रांत ब्राह्मण आणि ब्राह्मण धर्माने आणली आणि इस्लामनेही आणली ब्राह्मण धर्माने नेहमीच शैव लोकांना अधिकाधिक शूद्र करण्याचा प्रयत्न केला आणि या शूद्रत्वातून बाहेर पडण्यासाठी म्हणून अनेक शूद्र लोकांनी शैव लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारायला सुरुवात केली म्हणजे एका अर्थाने हे जे काय धर्मांतर झाले त्याला ब्राह्मण धर्म जबाबदार आहे जर का ब्राह्मण धर्माने वैष्णव धर्माने वर्णव्यवस्था एवढी कठोर पद्धतीने अमलात आणली नसती तर मुस्लिम धर्म स्वीकारण्याची गरज निर्माण झाली नसती याबाबतीत ब्राह्मण धर्म वैष्णव धर्म आपली जबाबदारी झटकून देतो परंतु त्याला काही अर्थ नाही आता तर अवस्था अशी आहे की ज्यांनी नाईलाजाने धर्मांतर केले ते कसे डरपोक होते ते सांगितले जात आहे ब्राह्मण धर्माची ही मखलाशी आजची नाही . ती कायमच चाललेली असते. आत्मपरीक्षण नावाची भानगड ब्राह्मण धर्माला माहित नाही त्याला फक्त आपला स्वार्थ कळतो आणि त्या स्वार्थाला किती बळी पडायचं हे या देशातल्या बहुजन शैव लोकांना कळत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. ब्राह्मणांच्या बद्दल एक अजीबो गरीब फेसिनेशन शूद्र लोकांना आहे की काय अशी आता शंका येते अशी शंका घेण्याइतपत बहुजनांच्या मानसिकतेत प्रॉब्लेम तयार झालेले आहेत . परधर्मधारजीणेपणा हा सर्वच भारतीय धर्मांचा दुर्गुण आहे हे लक्षात घेतले पाहिजे जे जे परकीय त्याचे आकर्षण असा हा प्रकार आहे एक प्रकारचा परगंड याबाबतीत असावा असे दिसते
तेव्हा मुळातच मुस्लिम काळातल्या इतिहासाबद्दल नीट जागरूक असणं आवश्यक आहे आणि तो जसा आहे तसाच पाहिला पाहिजे. या काळातले मुस्लिम खूप सज्जन होते हे जे काय सांगितले जाते ते बकवास आहे . काँग्रेसला हे असे सांगणे त्या काळामध्ये आवश्यक का होते असा प्रश्न विचारता येतो. त्याचे कारण उघड आहे मुळातच इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी हिंदू मुसलमान युती काँग्रेसला आवश्यक वाटत होती आणि म्हणूनच मुसलमानांचे जास्तीत जास्त खोटे पिक्चर काँग्रेसने तयार केले पण दुर्दैवाने हे खोटे पिक्चर मुस्लिम लोकांनी स्वीकारलेले दिसत नाही त्यांनी आपली जी खरी ओळख आहे तीच कायम जोपासलेली दिसते अनेकदा तर काँग्रेसने काही खरे प्रश्न विचारले नाहीत म्हणजे काँग्रेस हिंदू मुस्लिम संबंध चांगले होते याचा आधार काय सांगते तर मुस्लिम काळात झालेले हिंदू मुस्लिम विवाह! परंतु काँग्रेस कधीही हे सांगत नाही की बायका फक्त हिंदूंनी मुसलमानांना दिलेल्या आहेत आणि याला गुलामगिरी म्हणतात धर्मनिरपेक्ष धोरण नाही . या काळात मुस्लिम लोकांनी किंवा राजांनी हिंदूंना आपल्या बायका दिलेल्या नाहीत आणि याला कारण दोन्ही बाजूनी आहेत मुळातच हिंदूंची मुसलमान बायका स्वीकारण्याची तयारी नव्हती बाजीराव मस्तानी हे प्रकरण त्याचे उत्तम उदाहरण आहे आणि त्याच वेळी मुसलमानांची मात्र हिंदू बायका जास्तीत जास्त स्वीकारण्याची तयारी होती त्यामुळे प्रत्येक मुस्लिम बादशहाने किमान दहा हिंदू बायकांशी लग्न केलेली दिसतात किंवा हरम मध्ये ठेवलेले दिसते आणि दुसरे कारण अर्थातच मुळातच मुस्लिम धर्मामध्ये आपल्या मुलीचा विवाह हा दुसऱ्या धर्मात करणे हा गुन्हा मानला गेलेला आहे त्यामुळे कधीही मुस्लिम बादशहाने आपल्या मुली हिंदूंना दिलेल्या नाही भारतीय धर्मात दिलेल्या नाहीत तेव्हा या संबंधात जे काही दिसते त्यामध्ये फक्त भारतीय धर्मांची गुलामगिरी दिसते त्याला सेक्युलारिझम असे गोंडस नाव देण्याचे काही कारण नाही . खरे तर अल्पसंख्य असलेला समाज तुमच्या घरातल्या बायका घेऊन जातो त्यांना हरम मध्ये ठेवतो किंवा त्यांचे धर्मांतर घडवतो याची लाज वाटली पाहिजे . पण हि लाज राहिली बाजूला कारण लाज कायम कोळूनच पिलेले लोक होते उलट याला उदाहरण म्हणून प्रस्तुत केले जाते याचे सर्वात उत्तम उदाहरण जोधा-अकबर आहे ही सगळी कहाणी नेमकी काय होती हे आता स्पष्ट पणाने समोर आलेले आहे. मूळ जोधाबाई चे धर्मांतर झाले होते असेच दिसते . आता या काळामध्ये आपण जर का हिंदू धर्मातली स्त्री आणि मुस्लिम धर्मातली स्त्री यांची तुलना केली तर कोणाचे जीवन जास्त चांगले होते तर वस्तुस्थिती अशी आहे की शैव धर्म सोडला तर ब्राह्मण आणि वैष्णो धर्मामध्ये सती वगैरे प्रथा असल्यामुळे आणि कमावण्याचा हक्क नसल्यामुळे आणि स्त्रीचा दर्जा हा शूद्र असल्यामुळे या धर्मातल्या स्त्रियांचा दर्जा आणि मुस्लिम धर्मातल्या स्त्रियांच्या दर्जा यांची जर का आपण तुलना केली तर मुस्लिम धर्मातल्या बायकांची स्थिती ही अधिक चांगली होती ही परखड वस्तुस्थिती आहे . आपल्या बायका स्वतःहून जर तिथे जात असतील तर त्याला जबाबदार तुमचे धर्म आहेत पण त्यासाठी आपल्या धर्माला जबाबदार मानण्या ऐवजी तुम्ही जर मनस्मृतीचे समर्थन करणार असाल तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही आंधळे आहात तुम्ही अजूनही सुधारलेले नाही आहात तुम्हाला अजूनही सुधारायचे नाही. त्या काळामध्ये नवऱ्याचा मृत्यू होणे हे इतके स्वाभाविक होते की अनेकांना राजपूत समाजामध्ये सती असण्याचा धोका पत्करावा लागत होता इस्लाम मध्ये हा धोका कमी होता तिथे विधवांना सती जावे लागत नव्हते हा एक फरक सुद्धा नेमक्या आपल्या बायका का तिकडे जात होत्या हे सांगायला पुरेसा आहे जर का आपला धर्म त्या काळामध्ये चांगला असता तर आपल्या बायका या लग्नाच्या विरुद्ध लढल्या असत्या याबद्दल माझ्या मनात शंका नाही . कृपया गोष्टी जशा घडल्या तशा पहा अन्यथा कधीही इस्लामला तुम्हाला मात देता येणे शक्य नाही . मुळात सुधारणा आपल्यात झाल्या पाहिजेत आणि मग इस्लामला सुधारायला आपण सांगतच आहोत .
पण त्याचबरोबर हेही खडे आहे की मुस्लिम राजवटीत गुलामगिरी होती ही वस्तुस्थिती आहे सगळे मुसलमान बादशहा हे गुलाम ठेवायचे याला अगदी अकबर सुद्धा अपवाद नाही त्यामुळे हे सगळं छान छान होतं हे कशाच्या आधारे सांगता ? आणि हे गुलाम प्रामुख्याने शूद्र , अतिशूद्र आणि आदिवासी असत याची आता शूद्र, अतिशूद्र आणि आदिवासी यांनी जाणीव ठेवली पाहिजे. इस्लामचे सर्वात मोठे बळी आपण आहोत उच्चवर्णीय लोक नाहीत याची जितक्या लवकर आपल्याला जाणीव होईल तितके बरे ! शोषण मुस्लिम राजवटीत जे काही झाले ते आपले झाले हे जोपर्यंत शूद्र अति शूद्र आणि आदिवासी लोकांना कळत नाही तोपर्यंत त्यांना मुस्लिम लोकांनी आणि नंतर ब्रिटिश ख्रिश्चन लोकांनी आपल्याशी काय केले हे कळणं शक्य नाही सर्वच युरेशियन धर्मामध्ये गुलामगिरी मान्य आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे ख्रिश्चन लोकांनी हिंदू लोकांची विक्री केलेली आहे आणि त्यात मुख्य लोकसंख्या ही नेहमीच बहुजन समाजाची होती. वस्तुस्थिती अशी आहे की ब्राह्मण धर्म वैष्णव धर्म ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम धर्म हे चारही धर्म गुलामगिरीला दास प्रथेला मान्यता देतात आणि हीच दास प्रथा नंतर हिंदू धर्मात आली .
आता प्रश्न येतो पुरोगामी काळातल्या हिंदू-मुस्लिम प्रश्नाचा ! मी हे खूपदा व्यवस्थित सिद्ध केलेले आहे की सुरुवातीच्या काळामधला काँग्रेसचा लढा हा ब्रिटिश धार्जिना सेक्युलर वादीच होता पण नंतर हा काही काळ म्हणजे टिळक जिवंत असे तोवर हिंदुत्ववादीच होता आणि हिंदुत्ववादी नेतृत्वाखालीच चाललेला होता आणि हे सहन न होणारे अनेक मवाळ लोक त्या काळामध्ये काँग्रेसमध्ये होते ज्यामध्ये गोखले मेहता वगैरे वगैरे लोक येतात मग काँग्रेस सेक्युलर कधी बनली तर काँग्रेसमध्ये सुरुवातीपासूनच वैष्णववादी लोक होते आणि रानडे आणि गोखले हे दोघेही गीताधर्मीय वैष्णव असल्याने त्यांनी कायमच सेक्युलरवादाचा पुरस्कार केला तेव्हा सेक्युलरवादाचा आरंभ पुन्हा मराठी लोकांनीच केलेला आहे हे लक्षात घेतलेले बरे! मात्र टिळक बिपिन चंद्र पाल लाला लजपतराय हे टिळकांच्या काळामध्ये हिंदुत्ववादी झालेले दिसतात . मात्र याला पुन्हा एकदा काँग्रेस मधल्या गोखले वगैरे लोकांनी शह दिला आणि त्यांची खरी ताकद नंतर महात्मा गांधींच्या रूपाने उदयाला आली म्हणजेच एका अर्थाने असे म्हणू शकतो की काँग्रेस सुरुवातीपासूनच वैष्णववादाच्या आणि गीतेच्या प्रभावाखाली असल्याने सेक्युलर होती पण सेक्युलर होती म्हणजे काय होती हे एकदा नीट तपासले पाहिजे
गांधींनी हा सेक्युलरिझम अतिशय व्यवस्थित सादर केला आणि म्हणूनच तेच मॉडेल आपल्या घटनेमध्ये आले हे मॉडेल दोन लोकांच्यामुळे आलेले आहे पहिले पंडित जवाहरलाल नेहरू आणि दुसरे बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही सेक्युलर होते हे आपण मुळात स्वीकारायला हवे प्रश्न असा आहे की या लोकांना असे सेक्युलर होणे का भाग पडले ?
हिंदू-मुस्लीम एकत्र राहणे आणि त्यांचे एक राष्ट्र होणे सतत एक राष्ट्राची मागणी करणे ही त्या काळातल्या स्वातंत्र्यलढ्याची गरज होती आणि ही गरज गांधी आणि नेहरूंनी पुरवली हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यांच्या प्रभावाने या काळामध्ये मुळातच 90% हिंदू सेक्युलर होते ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्याकडे मोदी वगैरे सर्व हिंदुत्ववादी लोकांचा जो प्रॉब्लेम आहे तो हा आहे की त्यांना हे लक्षातच येत नाही की या काळामध्ये नेहरू म्हणजे काही देश नव्हता या काळामध्ये भारतातली जनता म्हणजेच देश होता आणि भारतातली हिंदू जनता तुम्हाला आवडो अगर न आवडो ही सेक्युलर झालेली होती. आता हे सेक्युलर होणे चांगले की वाईट हा प्रश्न आपण नक्की विचारू शकतो जर टीकाच करायची असेल तर मग त्या काळातल्या केवळ नेत्यांना दोष देऊन चालणार नाहीत तर त्या काळातल्या जनतेला सुद्धा दोष द्यावा लागेल भारतातल्या हिंदू जनतेला सेक्युलरिझमचा मोह का पडला हा एक प्रश्न विचारला तर आपणाला असे लक्षात येते की मुळातच भारतातली जी भारतीय धर्मांची परंपरा होती ती सर्वधर्मसमभावाची होती . साहजिकच सेक्युलरिझम म्हणजेच धर्मनिरपेक्ष वाद हा सर्वधर्मसमभावाची पुढची आवृत्ती आहे अशीच लोकांची समजूत होती त्यांच्या मुस्लिम राजवटीच्या काळामध्येच सर्वधर्मसमभावाला ठोकले गेलेले आहे हे लक्षात आलेले नव्हते आणि काँग्रेसच्या काळात सुद्धा ते लक्षात आले नाही . अपवाद पुन्हा एकदा शैव धर्म आहे . याचे कारण सर्वसाधारणपणे असे दिसते की ब्राह्मण आणि क्षत्रिय यांना धार्मिक बाबतीत सामाजिक उदासीनता प्राप्त झालेली होती. यातली सर्वात हाईट जर कुठली असेल तर ती म्हणजे भारतातले त्या काळातले सगळे क्षत्रिय हे मुस्लिम धार्जिने बनत चाललेले होते जवळजवळ या काळातले सगळे मुस्लिम हे अल्पसंख्य असूनसुद्धा राज्य करत होते आणि त्यांचे राज्य सांभाळणारे लोक हिंदू होते हा दैव दुर्विलास होता हा का घडला याचे कधी विश्लेषण करणार आहोत की नाही ?याबाबतीत हिंदुत्ववादी लोक कधी या क्षत्रियांच्यावर टीका करतात का? एकदा तरी स्पष्टपणे या क्षत्रियांनी मुस्लिम धारजीणेपणा का स्वीकारला असा प्रश्न विचारतात का? तर नाही विचारत कारण कारण केवळ क्षत्रियच नव्हे तर ब्राह्मण लोक सुद्धा हेच करत होते . याचे एकमेव कारण असे होते की ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन्ही वर्णांचे हितसंबंध व्यवस्थितपणे या सर्व प्रकारच्या मुस्लिम राजवटींच्या मध्ये सांभाळले जात होते मुळातच बादशहा होण्याची आकांक्षा ही धड 1% क्षत्रिय लोकांच्यातसुद्धा असत नाही बाकीच्या सर्वांनाच सरंजामदार आणि क्षेत्रपाल बनण्यातच रस असल्याने साहजिकच या लोकांनी बादशाह कोण सम्राट कोण हिंदू की मुसलमान याविषयी कधीही परवाच केली नाही अगदी कनिष्काच्या काळात आणि अशोकाच्या काळामध्ये दुसऱ्या धर्माचा म्हणजेच बौद्ध धर्माचा सम्राट मुख्य होता पण त्याला कसलाही प्रतिकार त्या काळातल्या अबौद्ध असलेल्या सरंजामवादी लोकांनी केलेला दिसत नाही आणि नंतर ही मुस्लिम राजवटीत थेट हेच झाले बादशहा कोण आहे याच्याशी काहीही आम्हाला देणे घेणे नाही आमचा सरंजाम व्यवस्थित शाबूत राहतो ना ? मग झाले अशी ही सरंजामवादी प्रवृत्ती होती आणि आहे . आज सुद्धा हा सरंजाम वाद नाहीसा झालेला नाही म्हणून तर शिंदे आणि अजित पवार आज हिंदुत्ववादात जाऊन बसलेले दिसतात
हे तेच लोक आहेत जे एकेकाळी मुस्लिम लोकांना साथ देत होते . आणि हेही तेच लोक आहेत जे ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश लोकांचे गुलाम संस्थानिक म्हणून वावरत होते . त्यामुळे खरा प्रश्न हा विचारता आला पाहिजे की क्षत्रिय लोक कायमच आपल्या धर्मभक्ती पेक्षा किंवा राष्ट्रभक्ती पेक्षा नेहमीच फक्त स्वतःचा सरंजाम का बघतात ?(अर्थातच याला पुन्हा एकदा शैव वीर समाज म्हणजे मराठा ,जाट, वैष्णव होण्यापूर्वीचे राजपूत, सिख वैगरे अपवाद आहे) मग तुमच्या लक्षात येईल की ही मुळात ब्राह्मण आणि नंतर वैष्णव धर्माने निर्माण केलेली प्रवृत्ती आहे मुळातच ब्राह्मणांना आपण बाहेरून आलेलो आहोत हे इतके सुरुवातीपासून स्पष्ट माहिती आहे की आपण वेगळे आहोत हा गंड त्यांनी कायमच जोपासलेला आहे हा गंड कधी कधी सुपेरियर बनतो तर कधी इन्फेअर त्यामुळे साहजिकच या गंडाच्या प्रभावाखाली ब्राह्मण फक्त स्वतःचा सरंजाम सांभाळत बसतात याचा अर्थ युरोशियन श्रुती मधून आलेले ब्राह्मण आणि क्षत्रिय हे दोघेही फक्त कट्टर सरंजामवादी आहेत यांच्यापैकी एकही राष्ट्रवादी नव्हता त्याच्या पैकी कोणीही संपूर्ण धर्माचा साकल्याने विचार करत नव्हता कारण हे सगळे बहुजन समाजातील वैश्य शूद्र हे पापी लोक आहेत पापी योनीतले लोक आहेत असे गीतेला धरून मानत होते .त्यांच्या या श्रद्धेनेच घात केला कारण त्यामुळेच ब्राह्मण आणि क्षत्रियांना कधीही वैश्य शूद्र अतिशूद्र आदिवासी या चौघांचा कसलाही विचार करण्याची गरज भासली नाही त्यांच्या दृष्टीने हे एका अर्थाने गुलाम लोक होते दास लोक होते तर त्यांच्या बाबतीत काय घडायचे ते घडू दे आपल्याला काय असा हा विचार आहे इंग्रजांच्या काळामध्ये वैश्यकेंद्रीय राजवट आली कारण खुद्द इंग्रज वैश्य व्यापारी बनवून आलेले होते म्हणून या लोकांनी 1915 स*** चक्क ठराव करून वैश्य लोकांना पुन्हा एकदा उच्चवर्णांमध्ये सामील करून घेतले दुर्देवाने याची जाणीव वैश्य लोकांना नाही त्यांना असे वाटते की आपल्याला फार पूर्वीपासून हे लोक उच्च समजत होते पण वस्तुस्थिती अशी आहे की वैष्णव धर्माचे प्रभुत्व निर्माण झाल्यानंतर वैश्य सुद्धा शूद्र लोकांच्या बरोबर पापयोनी झालेले आहेत आणि पुढे शूद्र पण झालेले आहेत अलीकडे जो वैश्य लोकांचा संसार ब्राह्मण आणि क्षत्रियांशी सुरू आहे त्यांनी हे लक्षातच घेतले पाहिजे की आज ना उद्या उद्या जर का वैष्णव धर्म आला तर गीतेनुसार तुम्ही पाप योनीमध्ये असणार आहात आणि तुमची सर्व प्रकारची संपत्ती हिसकावून घेण्याचा अधिकार या दोन वर्णांना असणार आहे मनुस्मृती हे स्पष्टपणे सांगते तेव्हा सावध राहा हे जितके साधे दिसते तितके साधे नाही .
साहजिकच आपण जर का पुरोगामी कालखंडातले हिंदुत्व पाहिले तर त्याचे स्पष्ट प्रतिबिंब आपणाला गोळवलकरांच्या विचारांमध्ये दिसते . त्यांच्या बंच ऑफ थॉट मध्ये स्पष्टपणे कळते की हिंदुत्व म्हणजे या काळामध्ये काय होते. यालाच मी ब्राह्मणी हिंदुत्व म्हणतो या ब्राह्मणी हिंदुत्वाला वर्णव्यवस्था आदर्श वाटत होती ही वस्तुस्थिती आहे. आता मोदी वगैरे सर्व लोकांची अपेक्षा अशी आहे का की वर्णव्यवस्था स्वीकारणारे गोळवलकर यांचे हिंदुत्व काँग्रेसने किंवा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वीकारले पाहिजे होते ? आपण हिंदुत्व म्हणजे नेमके त्या काळामध्ये काय सादर करत होतो याचा विचार कधी करणार आहात की नाही ? वस्तुस्थिती अशी आहे की या काळामध्ये हिंदुत्व हे ब्राह्मणी हिंदुत्व होते साहजिकच गांधी आणि नेहरू यांनी ठामपणे विरोध केला आणि माझा स्वतःचा सुद्धा ब्राह्मणी हिंदुत्वाला ठाम विरोध आहे . की मोदी यांना हे ब्राह्मणी हिंदुत्व पटते ?जर मोदी यांना ब्राह्मणी हिंदुत्व पटत असेल तर त्यांनी आता हे स्पष्टपणे सांगावे. कारण आत्तापर्यंतची त्यांच्याबद्दल बहुजन समाजाची जी समजूत आहे ती अशी आहे की ते हर हर महादेव म्हणत असल्याने ते शैव हिंदुत्ववादी आहे . जर का ते शैव हिंदुत्ववादी राहिलेले नसतील तर त्यांनी तसे स्पष्ट सांगावे आणि मी बंच ऑफ थॉट हा ग्रंथ प्रमाण मानतो असे सांगावे . महात्मा गांधी यांची हत्या ही या देशातल्या ब्राह्मणी हिंदुत्वाने घडवलेली आहे याबद्दल शंका घेण्याचे कारणच नाही नववैष्णववादाला विरोध हे या ब्राह्मणी हिंदुत्वाचे वैशिष्ट्य होते आणि महात्मा गांधी हे चक्रधरांच्याच परंपरेतून निर्माण होत हळूहळू एक नवा वैष्णववाद मांडत होते आणि हा नववैष्णववाद त्या काळातल्या ब्राह्मणी हिंदुत्वाला झेपला नाही ही वस्तुस्थिती आहे . ही खरे तर एक लाजिरवाणी घटना आहे . सुदैवाने नंतर अटल बिहारी वाजपेयी आले आणि हळूहळू नववैष्णव हिंदुत्ववाद पूर्णपणे स्वीकारला गेला . २०१४ ला मोदी यांना आणून हिंदुत्ववादाने शैव हिंदुत्ववाद स्वीकारला परंतु आता असे वाटते की ही केवळ खेळीच होती आणि ही जर का फक्त खेळी असेल आणि बहुजन समाज त्यामध्ये फसला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एका भ्रमामध्ये आहात. बहुजन समाज व्यवस्थित जागृत आहे आणि जर का तुम्ही शैव हिंदुत्वाचा त्याग करणार असाल आणि त्या जागी ब्राह्मणी हिंदुत्व आणणार असाल तर त्याला कसे उत्तर द्यायचे ते आम्हाला शिवाजी महाराजांनी व्यवस्थित शिकवलेले आहे मी नेहमी सांगतो की शैव लोकांना फक्त इस्लामधार्जिन्या काँग्रेस समाजवादी आणि कम्युनिस्ट विरोधात लढून चालणार नाही तर ब्राह्मणी हिंदुत्व विरोधात सुद्धा लढावे लागेल किंबहुना ह्या दोघांनाही ताळ्यावर आणण्याची जबाबदारी आता शैववादावर पडलेली आहे . त्यासाठी दोन्ही दिशांनी प्रयत्न हवेत . पुरोगामी चळवळीमध्ये शैव पुरोगामी वाद आला पाहिजे आणि त्याचबरोबर भाजपमध्ये शैव हिंदुत्व केंद्रस्थानी आणले पाहिजे .
त्यामुळे मुळातच सर्व हिंदुत्ववादी लोकांनी दोन घटना लक्षात ठेवाव्यात पहिली गोष्ट काँग्रेसचा आणि नेहरूंचा या काळातला जो विरोध आहे तो विरोध ब्राह्मणी हिंदुत्वाला होता मुळातच नव वैष्णववाद हिंदुत्ववादाने स्वीकारला नाही ही त्या काळातली एक परखड वस्तुस्थिती आहे . त्यामुळे त्या काळामध्ये प्रचलित असलेल्या ब्राह्मणी हिंदुत्वाला काँग्रेसने केलेला विरोध हा योग्य विरोध होता . सावरकरांच्या बाबतीत मात्र खुद्द गांधीजी सुद्धा ओपन होते कारण त्यांना शक्यता दिसत होत्या पण दुर्दैवाने हे दोन लोक एकमेकाला भेटणारच नाही त्यांची युती होणारच नाही याची व्यवस्थित काळजी घेणारे काही ब्राह्मणी हिंदुत्ववादी लोक या काळामध्ये कार्यरत होते नंतर नंतर तर सावरकर सुद्धा नकोसे झाले याचे कारण हेच होतं सावरकर यांचा हिंदुत्वविचार हा खरोखर ब्राह्मण लोकांनी स्वीकारलेला आहे काय? हे एकदा ब्राह्मणांनी स्वतःलाच विचारावे सावरकर हे एकमेव कदाचित या काळातले असे नेते होते ज्यांना इस्लामचे स्वरूप काय होऊ शकते याचा अंदाज आलेला होता मात्र इस्लामच्या वाढीमध्ये ब्राह्मण धर्माचा आणि लोकांचा वाटा आहे हे मात्र त्यांनी कधीही नीटपणे पाहिले नाही ते जर का त्यांनी पाहिले असते आणि अधिक परखड भूमिका घेतली असती तर हिंदुत्ववाद कधीच नव वैष्णववादी झाला असता आणि गांधींची हत्या झालीच नसती पण प्रत्येक वेळेला ब्राह्मण लोक त्यांच्यावर येणारा दोष नाकारायला बघत असतात ही एक अत्यंत घाणेरडी प्रवृत्ती आहे अर्थात सर्वच ब्राह्मण असे असतात असे नाही अनेक ब्राह्मण असे आहेत म्हणजे लोकहितवादी आगरकर ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत अनेक ब्राह्मण असे आहेत की जे वारंवार स्वतःचे आत्मपरीक्षण करत असतात परंतु या ब्राह्मणांना नावे ठेवणे असा एक अजेंडा हिंदुत्ववादी लोकांचा चाललेला असतो पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की प्रत्यक्ष व्यवहारांमध्ये मात्र पुरोगामी ब्राह्मणांचा व्यवहार ब्राह्मण लोक अगदी हिंदुत्ववादी ब्राह्मण लोक सुद्धा स्वीकारत असतात तिथे त्यांना ज्ञान आणि तंत्रज्ञान हवे असते .
लक्षात ठेवण्याचा दुसरा मुद्दा म्हणजे या काळामध्ये हिंदू सेक्युलर होते. आता तुम्ही त्या काळातल्या जनतेला शिव्या घालणार आहात काय ? हिंदू लोकांना या काळामध्ये शहाणपण नव्हते असे म्हणता येईल का ? वस्तुस्थिती अशी आहे की या काळामध्ये मुस्लिम सुधारतील अशी सर्व सेक्युलर झालेल्या हिंदूंना अपेक्षा होती . १९८० नंतर हळूहळू ही अपेक्षा मुस्लिम लोकांनी धुळीला मिळवली आणि यासाठी मुस्लिम लोकांना दोष देण्याऐवजी आपल्याकडचे तथाकथित पुरोगामी लोक हिंदूंना दोष देत बसले हा त्यांचा सर्वात मोठा दोष आहे काँग्रेस या बाबतीत एकदमच भुक्कड निघाली काँग्रेस नंतर मग समाजवादी आणि साम्यवादी ही असेच भुक्कड निघाले इस्लामच्या बाबतीत एकंदरच पुरोगामी लोकांना एक वेगळेच कुत्रे चावते वास्तविक जेव्हा पाकिस्तानाने शरीयत स्वीकारले तेव्हाच दक्षिण आशिया मधला मुस्लिम कोणत्या दिशेने चाललेला आहे हे स्पष्ट झाले होते. हीच गोष्ट नंतर बांगलादेशने केली. वस्तुस्थिती अशी आहे की मुसलमान आणि इस्लाम धर्म सुधारतील यावर कोणाचाच विश्वास उरलेला नाही मला खात्री आहे हळूहळू अमेरिका आणि युरोप मधले सगळे सेक्युलर लोक याबाबतीत शहाणे होत जातील अपवाद फक्त भारतातले सो कॉल्ड सेक्युलर लोक असतील इस्लामचा कट्टरपणा हा या देशातला आणि जगातला सुद्धा एक अत्यंत वादग्रस्त प्रश्न बनलेला आहे आणि त्याने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे देश वेगवेगळी राष्ट्रे काबीज करायला सुरुवात केलेली आहेत आता ही साधी वस्तुस्थिती तुमच्या आसपास घडत असताना तुम्हाला जर दिसत नसेल तर तुम्ही नतद्रष्ट आहात . इस्लामफोबिया अशी एक नवीन टर्म सध्या प्रचलित केली गेली आहे प्रत्यक्षामध्ये फोबिया निर्माण व्हावा यापेक्षा वेगळ्या काही ऍक्टिव्हिटी इस्लामच्या बाजूने चालू नाहीच आहेत म्हणजे भीती भय पण निर्माण करायचे आणि तुम्ही घाबरला की तुम्हाला इस्लाम फोबिक म्हणून शिव्या पण घालायच्या असा काहीतरी उद्योग सुरू आहे. मुस्लिमांचा एक फार मोठा गैरसमज असा आहे की हे सर्व अल्लाह घडवत आहे आणि हे जे घडत आहे ते त्याच्या योजनेनुसारच घडत असून त्यांना यामध्ये विजय मिळणार आहे . संपूर्ण जग इस्लामिक होणार आहे . ही श्रद्धा थेट इस्लाम मधूनच प्राप्त झालेली आहे. आता अशा सगळ्या वातावरणामध्ये मुस्लिम लोक सुधारतील ही शक्यता जवळजवळ संपलेली आहे पण ह्याला जो उपाय ब्राह्मणी हिंदुत्व सांगते आहे तो योग्य नाही . मुळातच ब्राह्मणी हिंदुत्वाने हे सर्व थांबवण्यासाठी आजपर्यंत काय केले ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटना पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये का उघडली गेली नाही ? तिने का मुसलमानांना त्या देशात जाऊन अडवण्याचे काम केले नाही? असे प्रश्न खरे तर आता विचारायला हवेत . पण इथे पुन्हा एकदा आपण काय केले त्याबद्दल बोलायचे नाही आणि आपल्या निकम्यपणावर पांघरून टाकायचे असा उद्योग चाललेला असतो .
त्यामुळे एकंदरच फक्त खयाली पुलाव करण्यापेक्षा प्रॅक्टिकल लेवल ला काय घडले ते पाहणे आवश्यक आहे आणि नेहरूंना दोष देणे आता थांबवावे त्यापेक्षा पुढे काय करता येईल ते पाहणे आवश्यक आहे याचा अर्थ असा नाही की नेहरूंचा दोष नाही नेहरूंचा दोष आहेच नेहरू अत्यंत इस्लामधार्जिणे होते ही वस्तुस्थिती आहे . त्या अंगाने टीका करत राहावी परंतु नेहरूंनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने ज्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्याबद्दल त्यांना दाद दिलीच पाहिजे हे राष्ट्र बांधण्यामध्ये गांधी आणि नेहरू यांचे योगदान मान्य केलेच पाहिजे स्वातंत्र्य चळवळ किती हिंदुत्ववादी लोकांनी नंतर कंटिन्यू केली हे स्पष्ट आहे स्वातंत्र्य चळवळीमध्ये 1920 नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी लोकांचे योगदान दोन टक्के पण नाही तेव्हा उगाच न घडलेल्या गोष्टी सांगायच्या फंदात पडू नये. सुभाषचंद्र बोस काँग्रेसचे होते आणि ते जर का सत्तेवर आले असते तर त्यांनी सेक्युलर राजवट स्वीकारली असती हे लक्षात घेतले पाहिजे सुभाष चंद्र बोस हे हिंदुत्ववादी नव्हते ते डावे होते कदाचित कम्युनिस्ट राजवट त्यांनी आणली असती पण हिंदुत्ववादी राजवट नक्की आणली नसती उगाच खोटे प्रोजेक्शन देऊन भुलभुलय्या निर्माण करण्यात काही अर्थ नाही .
वस्तुस्थिती अशी आहे की हिंदुत्ववादी राजवट ही संपूर्णपणे यशस्वी झालेली नाही तिच्यातले जे भाग अपयशी झालेत त्याची जबाबदारी घेण्याऐवजी पंडित जवाहरलाल नेहरू यांना दोष देणे सुरू आहे पण त्याने काय साधणार? देश बदलायचा असतो आणि त्यासाठी आवश्यक असलेली सत्ता कायमच बहुजन समाजाने तुम्हाला दिलेली आहे तेव्हा हा देश आता बदलण्यासाठी काय करता येईल ते पाहिले पाहिजे . गांधी काय कि नेहरू काय हे हिंदूंच्यात असलेल्या सर्वधर्मसमभावांमध्ये वाढले होते आणि त्यामुळेच ते इस्लाम आणि ख्रिश्चनिटी बाबत बाबत आंधळे झाले . याशिवाय झाले असे की ख्रिश्चन लोक जे आले होते ते अत्यंत प्रगतीक होते त्यांनी प्रचंड विकास घडवला होता तुमच्या देशाला जिंकले होते त्यामुळे त्यांचा प्रत्येक अंश चांगला वाटणे स्वाभाविक होते शेवटी जो जिंकतो त्याचे सर्व काही श्रेष्ठ असते असे मानणारे लोक असतातच त्यांच्यातल्याच काही लोकांनी सुरुवातीला इस्लाम आणि नंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला ही दिसतो यामध्ये अनेक ब्राह्मण लोक आहेत हे ब्राह्मण लोकांनी विसरू नये त्यामुळे साहजिकच जिंकला गेलेला देश पुन्हा एकदा ताब्यात यावा म्हणून आत्मपरीक्षण सुरू झाले आणि त्यातूनच साहजिकच आपला विकास असा घडला नाही याला कारण आपला धर्म आहे याची जाणीव या लोकांना झाली होती आपल्या धर्माकडे त्यामुळे संशयास्पद नजरेने पाहणे हे अत्यंत स्वाभाविक होते आज सुद्धा आपले अनेक प्रश्न हे युरेशियन श्रुतीमध्ये अडकल्यामुळे निर्माण झालेले आहेत. वर्ण आणि जात व्यवस्था नष्ट होत नाही याचे सर्वात मोठे कारण युरेशियन श्रुतीचा आजही प्रभाव आहे . ते कबूल करण्याऐवजी मुळात शैव धर्मामध्ये जन्मलेल्या कश्मीरी पंडिताला दोष देणे थांबवावे अलीकडेच भागवत यांनी स्मृती सुद्धा पंडितांनी लिहिली असे विधान केले होते हा इतिहासाचा आपलाप आहे. पंडित लोक या भानगडी मध्ये कधीच पडले नव्हते हा सर्व ब्राह्मणांचा उद्योग आहे तेव्हा उगाच त्यामध्ये पंडित लोकांना खेचू नका . इसवी सन १००० नंतर मात्र पंडित लोक धर्मांतर झाल्याने भ्रमिष्ट झाले ही वस्तुस्थिती ! त्यामुळेच त्यानंतरच्या सर्व ब्राह्मणी उद्योगांमध्ये पंडित लोकांचा मोठा वाटा आहे आणि काही ठिकाणी तर ब्राह्मणांच्या पेक्षा जास्त वाटा आहे. पण याचे कारण पंडित नाही तर पंडित लोक ब्राह्मण झाले हे कारण आहे. त्यांनी ब्राह्मण धर्म स्वीकारला हे कारण आहे आणि एकदा का धर्म बदलला की तो माणूस बदलतो ही वस्तुस्थिती आहे आणि हे सिद्ध करायला या देशातले मुस्लिम पुरेसे आहेत . हिंदू असताना हे लोक किती वेगळे होते आणि मुस्लिम झाल्यानंतर हे लोक किती कट्टर झाले हे आपणाला आत्ता दिसतेच आहे हीच गोष्ट पंडित लोकांच्या बाबतीत झालेली दिसते जोपर्यंत पंडित फक्त शैव होते तोपर्यंत नीट चालले होते परंतु ते वैष्णव झाले ब्राह्मण झाले आणि अधिक कट्टर ब्राह्मणवादी झाले . या पंडितांनी खरे तर स्वतःला पंडित म्हणवून घेऊ नये त्यांनी शांतपणाने स्वतःला ब्राह्मण म्हणवून घ्यावे उगाच आमच्या डोक्याला ताप देऊ नये बाटला तर पुरते बाटा अर्धवट कशाला बाटता ? आणि जर का हे ब्राह्मण असणे झेपत नसेल तर शांतपणाने पंडित व्हा आणि वर्णजातव्यवस्थेचा त्याग करा . असो.
थोडक्यात काय मुळातच नेहरू काय किंवा गांधी काय हे तुमच्या सर्वधर्मसमभाव या प्राचीन काळापासून चालत आलेल्या परंपरेमधूनच निर्माण झालेले होते आणि मुस्लिम सुधारतील ही त्यांची अपेक्षा होती जी त्या काळामध्ये चुकीची वाटत नव्हती . कारण केमाल पाशाचा सुद्धा उदय या काळामध्ये झाला होता आणि या दिशेने मुस्लिम समुदाय जाऊ शकतो असे वाटले होते आता हे सर्व काही कोसळलेले आहे आणि गांधी आणि नेहरू काळाच्या pकसोटीवर इस्लामच्या बाबतीत मूर्ख ठरलेले दिसतात . त्यासाठी त्यांच्यावर टीका आवश्यक करावी परंतु केवळ धार्मिक धोरण म्हणजे काही व्यक्तिमत्व नसते त्यांच्या इतर अनेक गोष्टी अशा आहेत ज्या अतिशय उत्तम आहेत त्यांचे कौतुक पण केले पाहिजे . तुम्ही सुद्धा काही ईश्वर नाही आहात तुमच्याकडून सुद्धा चुका घडतात घडत आहेत आज ना उद्या त्याचाही निर्णय होईलच तेव्हा सर्वजण काळाचे अपत्य असतात एवढे लक्षात ठेवावे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment