उपयुक्ततावाद व्यवहार वाद उत्तर व्यवहार वाद आपण अनेक पेपरमध्ये हळूहळू व्यवहार वाद अशी गोष्ट समजून घेतो आहे आणि त्याचबरोबर त्याच्या नवीन काही दिशा शोधतो आहोत. आपण हे पाहतो आहोत की ज्ञानाची नवता आणि ज्ञानाची जूनता यांचा आयुष्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो आता आपण आता मूलभूत गोष्टीवर चर्चा करू. माणसाचे जीवन हे प्रामुख्याने कशावर अवलंबून असते असा प्रश्न जर का आपण मोक्षवादी लोकांना विचारला तर त्याचे स्पष्ट आणि स्वच्छ उत्तर मोक्षकी देते ते म्हणजे प्राण आणि प्राणायाम ! मी हे खूपदा सांगितलेले आहे की भगवान शंकर ही कदाचित पहिली अशी व्यक्ती होती की जिने माणसाचे प्राणी असणे माणसाचे पशु असणे अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ पणाने आणि ठामपणाने स्वीकारले कुठलाही परलोकाचा अलौकिक मुलामा दिला नाही आणि त्याचबरोबर हा प्राणी मोक्ष अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो हेही त्यांनी स्वतःच्या जीवनशैली मधून सिद्ध केले . त्यामुळेच पशुपतिनाथ हे नाव त्यांनी अभिमानाने मिरवले . हेच नाव पुढे शिव ह्या तत्वालाही दिले आणि एक नवीन तत्त्वज्ञान पशुपती या आपल्या शिष्याला दिले जो मूळचा बहुदा नेपाळी असावा किंवा पंजाबी ! हेच तत्त्वज्ञान पुढे पाशुपत दर्शनाच्या द्वारे मोक्ष मिळालेल्या नकुलिश यांनी नव्याने सादर केले आणि त्यातूनच पुढे पाशुपत दर्शन आणि पाशुपत धर्म यांचा उदय झाला आणि यातूनच लोकशैवधर्म भारतामध्ये प्रचलित झाले ज्यातील एक नाथधर्म सुद्धा होता ज्यातून पुढे जैन धर्म उदयाला आला आणि जैन धर्मामुळेच बौद्ध धर्म सुद्धा उदयाला आला आणि पुढे मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ यांच्यामुळे नवनाथ धर्म पुन्हा उदयाला आला . याच पाशुपत धर्मामधून पुढे बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली . आणि एक पुरोगामी नवा धर्म कसा स्थापन करता येतो तो कसा विज्ञानाशी आणि कायकशी जोडता येतो आणि शिवकल्याणाशी जोडता येतो हे नव्याने सादर केले या सगळ्या प्रवाहांच्या मध्ये आपण एक गोष्ट कॉमन बघू शकतो आणि ती कॉमन गोष्ट म्हणजे प्राण आणि प्राणायाम होय . आज विज्ञानामध्ये सुद्धा प्राणवायूचे ऑक्सिजनचे असलेले महत्त्व सर्वांना माहिती आहे म्हणूनच त्यासंदर्भातच आता आपण काही चर्चा करतो आहे .
आमच्या पिढीमध्ये ज्या काही नवीन ज्ञानाच्या लाटा आल्या त्यामधल्या काही महत्त्वाच्या लाटा या ऑक्सिजन संदर्भात होत्या . जवळजवळ सर्व उत्तर आधुनिकता आणि आधुनिकता यांचा यावर विश्वास होता की ऑक्सिजन हाच प्राण जिवंत ठेवणारा आहे पण पुढे असे लक्षात आले की पृथ्वीवर ऑक्सिजनपूर्वी सुद्धा जीवन अस्तित्वात होते . इतकेच नव्हे तर अंतराळामध्ये गेलेल्या गोष्टींच्याद्वारे हळूहळू हेही स्पष्ट होत आहे की अंतराळामध्ये ऑक्सिजन नसून सुद्धा काही प्रमाणात का होईना पण अतिशय सूक्ष्म पद्धतीची अशी जीवसृष्टी अस्तित्वात आहे . याचा अर्थ स्पष्ट होता प्राण फक्त प्राणवायूमुळे नव्हता तर इतरही वायूंच्यामुळे अस्तित्वात होता आणि म्हणून ऑक्सिजनलाच प्राणवायू म्हणणे बरोबर नाही पुढे आणखी लक्षात आले की पृथ्वीवर एक कालखंड असाही होऊन गेलेला आहे ज्यावेळी ऑक्सिजन शिवाय एक जीवसृष्टी अस्तित्वात होती . ग्रेट ऑक्सिडेशन एक्सिटस्टींशन होण्यापूर्वी ऑक्सिजनने कोणी जगत नव्हते उलट ऑक्सिजन निर्माण झाला सायनो बॅक्टेरिया मुळे आणि ऑक्सिजन शिवाय जगणारे सर्वजण मारले गेले म्हणजेच ऑक्सिजन जिवंत जीवन देणारा होण्याआधी किलर होता आणि हे सत्य काहीसे धक्कादायक आहे पण मग लक्षात येते की जी गोष्ट जगवते तीच मारणारी ही असू शकते . जीवन आणि मृत्यू हे असे एकत्र जोडलेले असतात पुढे पुन्हा दुसरी गोष्ट अशी घडली की खुद्द पृथ्वी मध्ये पृथ्वीवर जिथे ऑक्सिजन पोहोचत नव्हता तिथे सुद्धा जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचे आता लक्षात आलेले आहे आणि आत्ता या क्षणी ते अस्तित्वात आहे . ही अतिशय प्राथमिक अवस्था असेल पण आहे परंतु इतरत्र तिथे जे काही वायू आहेत त्यांच्या आधारे एखादी प्रगत वायूसृष्टी प्रगत जीवसृष्टी असू शकते त्यामुळे मुद्दा आता असा आहे की ऑक्सिजन हाच तुमच्या जीवसृष्टीच्या केंद्रस्थानी असेलच याची खात्री नाही माझ्या मनामध्ये ऑक्सिजन बद्दल आदर आहे आणि मी त्यावर कविताही लिहिली आहे परंतु मला हेही माहिती आहे की मी माणूस म्हणून होमो सोपियन म्हणून ऑक्सिजनमुळे अस्तित्वात आहे याचा अर्थ संपूर्ण जीवसृष्टी तशी आहे असा नाही होत .
या अंगाने अनेक प्रश्न निर्माण होतात कारण ज्ञान हे कायम नवीन जेव्हा येते तेव्हा त्याचे काय करायचे हा फार मोठा प्रश्न असतो पुन्हा तंत्रज्ञान निर्माण होते म्हणजे आता असे समजा की आपण जर का असे फुफ्फुस तयार केले जे प्राणवायू बरोबर कार्बन डाय-ऑक्साइड सुद्धा शोषून घेईल आणि त्या कार्बनडाय-ऑक्साइडच्या आधारे पण जर आपला मेंदू आणि जीव जगू शकेल तर मग पर्यावरणाचा संपूर्ण प्रश्नच बदलून जातो आणि हा जो तंत्रज्ञान शाखेचा पॉसिबिलिटी ग्राफ असतो तो फार वेगळ्या पद्धतीने काम करायला लागतो. आता आपण अशा प्रकारचे फुफ्फुस जे आरटीफिशियल असेल तयार करू शकतो का ते माणसाला बसवू शकतो का शकू का आणि समजा एखाद्या चिप्स सारखे ते बसवता आले फुफ्फुसात तर आपण मग कार्बनडायऑक्साईड आणि ऑक्सिजन अशा दोन्ही वायूंच्यामुळे जगू शकू म्हणजे समजा इमर्जन्सी मध्ये आणीबाणी मध्ये आपणाला ऑक्सिजन कमी पडत असेल तर आपण कार्बन-डाय-ऑक्साईडचे चीप किंवा कृत्रिम फुफ्फुस ऑन करायचे तर अशा जेव्हा शक्यता निर्माण होत जातात तेव्हा तुमचा व्यवहार बदलत जातो ऑक्सिजनच्या वापराबाबत तुम्ही अधिक संवेदनशील होता आणि ज्याच्या आधारे प्राणायाम हवा आहे तो प्राणायाम म्हणजे फक्त ऑक्सिजनचा आयाम नाही तर इतर कुठल्याही वायूचा आयाम होऊ शकतो हे तुम्हाला लक्षात यायला लागते तुमची प्राणवायू या शब्दाची व्याख्या बदलते कारण आता कुठलाही वायू प्राणवायू बनू शकतो .आता हे प्रश्न काही जे कृष्णमूर्ती आणि ओशो रजनीश्यांना पडणे शक्य नाही पण मला ते पडले याचे कारण साधना करताना मग आणखीन काही शक्यता दिसायला लागल्या. सर्वसाधारणपणे शरीर तंत्रामधल्या (इतर तंत्रांनी मोक्ष साधू इच्छिणाऱ्या साधकांनी या भानगडीत पडू नये )प्राणायाम करताना एक गोष्ट तुम्ही मूलभूत शिकता ती म्हणजे येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाच्या दरम्यान जो एक क्षण असतो त्यात मृत्यू असतो आणि हा मृत्यू जर का तुम्ही अधिकाधिक लांबवत नेला तर तुमच्या मोक्षाच्या शक्यता अधिकाधिक वाढत जातात . आणि याचे कारण असे असते की संपूर्ण मेंदूच प्राणायामाची निगडित असल्यामुळे जर का त्याला अचानक तुम्ही मृत्यूची सवय लावायला लागला की तो मृत्यू झाला मोक्ष बनत जातो परंतु त्याचबरोबर ही प्रोसेस फक्त सेपियन ला लागू आहे की इतर प्राण्यांना ही लागू आहे असा प्रश्न निर्माण होतो .त्यामुळे इतर प्राण्यांच्या बाबतीत किंवा वनस्पतींच्या बाबतीत मोक्षाची शक्यता काय असू शकते याच्या नवीन चाचपण्या करण्याची चाचण्या करण्याची गरज निर्माण होते विशेषतः मोक्षाच्या संदर्भामध्ये हे शक्य होते उदाहरणार्थ जेव्हा जेव्हा वनस्पतींच्या संदर्भात मोक्षाचा प्रश्न येतो तेव्हा वनस्पती या कार्बनडायऑक्साईडच्या साह्याने सुद्धा प्राणायाम साधत असतील कारण प्राण त्यांच्यात पण असतो परंतु तो प्राण कार्बनडायऑक्साइडच्या आधारे चाललेला आहे आपल्या शेजारचे हे उदाहरण आहे परंतु ते आपल्याला आधी कळत नाही आणि इथेच आपल्या ज्ञानाच्या सर्व मर्यादा दिसतात आणि आपल्यावर ज्ञानाचे होणारे संस्कार आपल्याला कसे जवळची गोष्ट बघू देत नाहीत तेही कळते. अनेकदा मी बघितलेले आहे की प्राणायाम करणाऱ्या राजयोगी माणसाला दोन श्वासांच्या मधला हा मृत्यू हा कणा आहे हेच कळत नाही . त्यामुळेच शिव जेव्हा म्हणतो की मी मृत्यू आहे तेव्हा त्याचा अर्थ काय आहे हे कळायला हवा. आपल्याकडचा ब्राह्मण लोकांचा मूर्खपणा इतका आहे की त्यांनी काय शिव म्हणतो आहे ते लक्षातच घेतले नाही आणि त्याला मृत्यूचा देव करून टाकला संहाराचा प्रलयाचा देव करून टाकला. शैव श्रुती काय आहे हे माहीत नसले की अडाणीपणाने काय काय गोष्टी होतात याचे हे एक फक्त उदाहरण आहे असा अडाणीपणा कुठे कुठे युरेशियन श्रुतीमध्ये आहे त्याची अजून कल्पना सुद्धा भारतीयांना आलेली नाही ते आपले युरेशियन श्रुतीमध्ये गायन करत बसले आहेत करत आहेत परंतु यामुळे कधी कधी फार गोंधळ निर्माण झालेला असतो . एकदा का तुम्ही त्या मृत्यूला स्पर्श करून आला की तुम्हाला वर्ण जात व्यवस्था सुचत नाही कारण तुम्हाला एकच गोष्ट माहिती असते ती म्हणजे आपण सर्व प्राणी आहोत प्राण हा आपला प्राण आहे आणि होमोसेपियन म्हणून फक्त आपल्यामध्येच अशा प्राणायाम द्वारा मोक्षाची शक्यता आहे इतरांच्या मध्ये असलेली मोक्षाची शक्यता काय आहे हे आपणाला कधीही कळू शकत नाही किंवा आता कळाले तरी आपल्याला हा आरंभ आहे हे लक्षात घ्यावे लागते
तुम्ही म्हणाल हे तुम्ही आता का सांगता आहात याचे कारण स्पष्ट आहे की व्यवहार वाद आणि उत्तर व्यवहार वाद यांना या गोष्टी माहीत नव्हत्या त्यांचा विचार आता नव्या व्यवहारवादामध्ये ज्याला मी जालव्यवहारवाद Netpragmatism म्हणतो करायला लागतो आणि मला हे सांगायचे आहे की प्राण ही मूलभूत गोष्टच आपण जर का चर्चेला घेतली तर व्यवहार वाद आणि उत्तर व्यवहार वाद यांना माहीत नसलेला अनेक प्रकारच्या ज्ञानांचा जो अव्याप्त प्रकाश आहे जो आधीच्या लोकांना माहीत नव्हता त्याला आपणाला आता भेटावे लागते आणि त्याला आपणाला असे म्हणावे लागते की बाबा धन्यवाद तू व्यवहार वाद आणलास किंवा आणलीस पण आता हा नवाव्यवहार आहे हा जाल व्यवहार वाद आहे ही पुढची स्टेप आहे हे जर का आपणाला कळले नाही तर मग काहीच कळले नाही
चौथी नवता ही या जालव्यवहारवादाला धरून असते ती आस्थापन वाद , व्यवस्थापन वाद , उपयुक्ततावाद ,व्यवहार वाद आणि उत्तर व्यवहार वाद या सर्वांना सामावून घेत पुढे सरकते
श्रीधर तिळवे नाईक ११ अर्थात सावरकर वादी हिंदुत्ववादाच्या व्यवहाराची चौकट आणि त्यांना मिळणारे यश उदाहरणार्थ मंगेशकर परिवार श्री श्याम पोंक्षे श्रीधर तिळवे नाईक
भारतामध्ये एका विशिष्ट पद्धतीने व्यवहार करणाऱ्या लोकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे आणि ही लोकसंख्या तुम्हाला पदोपदी भेटत असते तिचे वागणे अतिशय सभ्य असते बोलण्यातले उच्चार अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट असतात आणि सादरीकरण हे विसाव्या शतकाला आणि एकविसाव्या शतकाला साजेसे असते. साहजिकच तुम्ही या लोकांच्या प्रेमात पडतात वैयक्तिक पातळीवर तुमच्याशी यांचे संबंध कायमच मधुर राहतात ते तुम्हाला वापरत राहिले तरीसुद्धा तुम्हाला धन्यता वाटत राहते आणि अचानक एखाद्या आणीबाणीच्या क्षणी तुम्हाला कळून चुकते की आवश्यक ती मदत आलेली नाही फक्त शब्दाचा फुलोरा आलेला आहे तेव्हा मग तुम्ही थोडेसे सटपटता बोलाचीच कढी बोलाचाच भात असा हा प्रकार असतो अपवादात्मक वेळेला कधीतरी अचानक पणे मदत केली जाते पण ही मदत अनेकदा हे लोक एकमेकांना आपापसातच करत असतात त्यांचा विचार तुम्ही स्वीकारलेला नाही हे लक्षात आले की व्यवहाराची तरा ही वेगळी असते.
हा व्यवहार नेमका काय असतो आणि त्याचे तत्त्वज्ञान असते का तर हो त्याचे तत्त्वज्ञान असतं हा व्यवहार स्पष्ट आणि स्वच्छपणाने सावरकर यांचा उपयुक्ततावाद आणि व्यवहारात यांची सांगड घालत उभा राहत असतो
सर्वसाधारणपणे हे लोक मोक्ष स्वीकारतात मात्र हा मोक्ष वेदांती असतो हे लोक तुमच्या सर्व देवतांना भेट देतात मात्र त्यांना हे माहीत असते की ही भेट केवळ उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून आपण देतोय . साहजिकच जो देव फळतो त्यामागे हे लोक जास्त असतात अपवादात्मक वेळेला श्रद्धात्मक आकलन डेव्हलप होत असते मात्र मनोमन कुठेतरी हे लोक नास्तिकच असतात आणि देवाकडे सुद्धा उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून बघत असतात अनेकदा काही लोक आतून कट्टर नास्तिक असतात आणि सावरकरांनाच मानत असतात पण हे बोलून दाखवत नाहीत जनतेच्या भावनेला ठेस पोचता कामा नये याविषयी हे विलक्षण सजक असतात. साहजिकच जनसामान्यांना याविषयी एक विश्वास निर्माण झालेला असतो हे कधीही तुमच्या पैशाची चोरी करत नाहीत त्यामुळे वागण्यामध्ये एक प्रकारचा विलक्षण प्रामाणिकपणा आहे असे वाटत राहत मात्र हे आपल्या हक्काचे पैसे कधीही सोडत नाहीत ते कसे वसूल करायचे याविषयी साम दाम दंड भेद हे यांना फार क्लिअर असते फार अपवादात्मक वेळेला समोरच्याची स्थिती खरोखरच देण्यासारखी नाही याची खात्री यांना पटले तर हे तुम्हाला क्षमा करू शकतात क्वचित घडणारी घटनास्थळी विशेषता जर यांच्याजवळ पुरेसा पैसा पोहोचलेला असेल आणि आपल्याला या पैशामुळे काहीही आणणार नाही याची खात्री पटलेली असेल तर हे पैसा सोडून देतात अन्यथा आपल्या हक्काचा पैसा हा वसूल कसा करायचा हे बघत असतात सर्वसाधारणपणे एक गोष्ट आणखी कॉमन असते ती म्हणजे हे लोक जेव्हा उधारीने पैसे घेतात तेव्हा तो पैसा शक्यतो डुबत नाही बुडवत नाहीत त्यामुळेच जनसामान्यांना कायमच या लोकांच्या विषयी एक आदर वाटत राहतो .
दुसरी गोष्ट व्यवहारामध्ये जेव्हा भावनेचा प्रश्न येतो तेव्हा हे कधीही भावनेला प्राधान्य देत नाहीत हे व्यवहार अत्यंत सोखपणाने करतात त्यामुळेच लता मंगेशकरने नाकारलेली गाणी आशा भोसले व्यवस्थित गाते अनेकदा आशा भोसले चे किंवा लता मंगेशकर चे एखाद्या व्यक्तीशी काही भांडण झाले असेल तर असे कधी होत नाही की एका व्यक्तीचे एका बहिणीचे भांडण झाले म्हणून दुसरा बहिणीने त्या संगीतकाराशी संबंध तोडले अनेकदा जर का स्वतःच्या व्यवहारामध्ये उपयुक्तता दिसत असेल तर हे लोक बिनधास्तपणे भावना बाजूला ठेवून आपल्याला मिळालेली असाइनमेंट कम्प्लीट करत असतात यामध्ये अनेकांना असे वाटते की बहिणींचा झगडा होईल भांडण होईल परंतु प्रत्यक्षामध्ये असे काहीही होत नाही व्यवहार चोखपणे पार पाडला जातो म्हणजेच यदाकदाचित एकमेकाशी स्पर्धा आहे हे लक्षात आले तरी ही स्पर्धा ते वैयक्तिक पातळीवर कधीही घेत नाहीत आणि वैयक्तिक भावना घरामध्ये वेगळ्या आणि व्यवहारिक भावना व्यवहारांमध्ये वेगळ्या अशा तऱ्हेचे वर्गीकरण सहजरीत्या केले जाते .
लैंगिक बाबतीत हे लोक अत्यंत स्वच्छ असतात. ब्रह्मचर्य यांना साधायचे असते परंतु जर का ते साधले जात नसेल तर लैंगिकता ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट असे हे लोक समजत असतात आणि त्यामुळेच दोन लोकांच्या जे काही लैंगिक पातळीवर चाललेले असते त्यामध्ये हे लोक कधीही टोकावर नाही डोकावत नाहीत तो त्यांचा आपापसातला व्यवहार आहे आणि आपण कशाला त्यात झक मारा अशा प्रकारची भावना असते त्यामुळे साहजिकच दोन पक्ष जर का संमतीने हे सर्व काही करत असेल तर हे लोक कधीही त्या दोन लोकांना त्रास द्यायला जात नाही . अनेकांना हिंदुत्ववादी संघटनेमध्ये होणारे लैंगिक व्यवहार हा इशू बनवावा लागतो परंतु प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारचा इशू संघटनेमध्ये अस्तित्वातच नसतो. या अंगाने कधीही संघटना हस्तक्षेप करत नाही त्यांच्या दृष्टीने तो आतला घरातला प्रकार आहे आणि त्यांचा त्यांनी तो बघून घ्यावा अशीच संघटनात्मक भूमिका असते . जर का त्या दोघांचा व्यवहार चव्हाट्यावरच आला तर मात्र अशा लोकांची खूप दा पंचाईत होते . शक्यतो कामवासणा हा पब्लिक प्लॅटफॉर्म वरचा व्यवहारच नव्हे याविषयी हे लोक अत्यंत स्पष्ट असतात . याबाबतीचा संघटनात्मक गोंधळ हा अनेकदा इतर संघटनांचा प्रश्न होतो आणि अनेकदा सोयीस्कर रित्या मौन पांघरून हे लोक वेळ येण्याची वाट बघत व्यवस्थित कल्टी मारतात . कालांतराने हे सर्व डिस्कशन आपोआप युजले जाते आणि विझले जाते .
या लोकांचा कधीही अहिंसा या गोष्टीवर विश्वास नसतो त्यामुळेच भारतीय स्वातंत्र्य युद्ध हे सावरकर आणि नंतर बोस यांच्यामुळे जिंकले गेले आणि यांच्या सशस्त्र वादामुळेच जिंकले गेले याविषयी यांच्या मनामध्ये काडीची ही शंका नसते आणि ते याबाबतीत गांधीजींना कायमच खलनायक मानत असतात . त्यामुळे सर्वसाधारणपणे गोडसे यांनी केलेल्या हत्ती बद्दल अनेकदा हत्ती बद्दल गांधी यांच्या हत्येबद्दल अनेकदा व्यवस्थित मौन पाळले जाते मात्र खाजगी मध्ये ह्या लोकांना हे हत्या झाली हे मान्य असू शकते अनेकदा असेही असू शकते ही चुकलेली गोष्ट आहे परंतु यावर सार्वजनिक भूमिका घ्यायची नाही हा सर्व व्यवहार या संदर्भामध्ये नेहमीच उपयुक्तता काय आहे हे पाहून पार पाडला जातो. हा सशस्त्र इतिहास त्यामुळेच वारंवार मांडला जातो आणि यामध्ये मग शिवाजी महाराज सुद्धा येतात कारण त्यांनी सशस्त्र प्रतिकार केला आणि सावरकर हे राज्याभिषेक झाल्यामुळे वैदिक राज्याभिषेक झाल्यामुळे कसे सशस्त्र हिंदूवादी होते अशी भूमिका सातत्याने बिंबवत नेली जाते आणि नंतर मग पहिला बाजीराव प्रमोट केला जातो आणि नंतर कळत नकळत उत्तर पेशवाई प्रमोट केली जाते . मग लोकमान्य टिळक आणि सावरकर येतात आणि मग सुभाष चंद्र बोस येतात आणि नंतर मग हिंदुत्ववादातले काही लोक येतात हा एक क्रोनोलॉजिकल ऑर्डरचा प्रकार असतो आणि तो कायम प्रमोट केला जातो त्यामुळेच शिवाजीचे गुरु कोण या विषयांना शंका नसते आणि त्या अंगाने वारंवार रामदास स्वामी लोकांच्या पुढे आणून त्यांना शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून बिंबवले जाते इतकेच नव्हे तर अनेकदा भाषणांच्या मध्येच स्वामी समर्थ रामदासांचा व्यवहारच होता व्यवहारिक उद्देश होता उपदेश होता तो वारंवार आणला जातो आणि अनेकदा हे लोक त्या उपदेशाला खुद्द सावरकर कसे फॉलो करत होते तसे फॉलो करतात आणि त्यामुळेच अनेकदा हे लोक यशस्वी सुद्धा झालेले दिसतात हा व्यवहार सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करत असतो परंतु त्याचबरोबर व्यवहारात वाकताना निशस्त्रवाद स्वीकारणे गरजेचे असेल तर ते स्वीकारले जाते अनेकदा स्वतःची जर काय भयावर माय मात करता आली नाही तर निदान बोली भाषेत कृती करता येत नाही ही मर्यादा स्वीकारत हिंसा आणली जाते . हिंसा अतिशय सुषमा असते आणि स्वतःला नाही जमली तरी मग निदान सुभाषचंद्र यांना कशी ती जमली पूर्वी शिवाजी महाराज संभाजी महाराज याचा रस भरीत कहाण्या सांगितल्या जातात अनेकदा या कथा सांगताना यांना जेव चढतो, शेव चढतो सेव चेव चेव चढतो तो बघून यांचे राष्ट्रीय प्रेमाविषयी कोणालाही शंका नसते मात्र जर का वेळ पडली तर हे लोक व्यवस्थित परदेशात जाऊन सेटल होतात आणि तिथे पुन्हा एकदा आपला हा हिंदुत्ववाद अतिशय व्यवस्थितरीत्या प्रमोट केला जातो एकमेकांना मदत सुद्धा केली जाते आणि यांचे अनेकदा आपापसात न सांगता संघ बनत जातात . अनेक लोक असे आहेत जे कळत नकळत अशा वेळेला विश्व हिंदू परिषदेचे सदस्य असल्यासारखे वागत असतात आणि हे वागणे अनेकदा समोरच्या लोकांना लक्षात येत नाही
या व्यवहारवादाचे एक विलक्षण वैशिष्ट्य असे असते की सावरकर यांनी जी जेनेटिक्स अनुवंशिक अशी गुणांची परंपरा स्वीकृत केलेली असते आणि ही परंपरा ब्राह्मणांच्यात आहे ब्राह्मणांच्या कळत न कळत एक जन्मदत्त श्रेष्ठत्व आहे आणि हे श्रेष्ठत्व त्यांना त्यांच्या जीन्स मधून मिळालेले आहे अशी एक जी मांडणी आलेली असते ती स्वीकारली जात असते आपल्या श्रेष्ठत्वाबद्दल या लोकांना काडीचीही शंका नसते पण त्याचबरोबर या लोकांना ब्राह्मणे तर लोकांच्या मध्ये अशा प्रकारचे श्रेष्ठत्व असलेले गुण असलेले लोक मान्य असतात आणि ते लोक ते बरोबर करतात हेरत असतात आणि त्यांना जर का सावरकर त पटलेला असेल तर मग ते आपलेच मानतात यामुळे होते काय बहुजन समाजातले मंगेशकरांच्या सारखे लोक हे स्वतःला कट्टर सावरकरवादी समजतात आणि त्यांचे प्रमोशन सर्व लेवलला हे लोक करत असतात तिथे मग ब्राह्मण्य आडवे येत नाही अनेकदा तर समाजातले एक्स्ट्रा ऑडिनरी टॅलेंट असेल तर ते त्याला कधीही वादा आणत नाही आणि मग ब्राह्मणे तर समाजातला माणूस हळूहळू हिंदुत्ववादी ब्राह्मण बनत जातो आणि एक कर्मनिष्ठ हिंदुत्ववादी ब्राह्मण तयार होत जातो . हे अत्यंत सूक्ष्म रित्या तयार होत असते पण जर का हे लोक बहुजन समाजातले असून फ्लॉप झालेले असतील तर मात्र हे लोक व्यवस्थितरित्या अंग काढून घ्यायला लागतात . त्यामुळेच राधा मंगेशकर यांच्या करिअरला या लोकांचा काडीचाही उपयोग होत नाही आणि बहुजन समाजातल्या लोकांच्या पुढे मग एक या विषयी शोक उरतो .
सर्वसाधारणपणे या लोकांचा व्यवहार देण्याघेण्याच्या बाबतीत फारच विलक्षण असतो याबाबतीत हे कट्टर सावरकरांना फॉलो करत असतात म्हणजे काय तर हे लोक शक्यतो देत नाहीत पण घेताना मात्र हे लोक अजिबात लाजत नाही मग ती गोष्ट अन्न असेल वस्त्र असेल निवारा असेल किंवा दारू असेल बहुजन समाजातला एक माणूस एका हे सर्व जर का आवड करत असेल afford करत असेल तर हे लोक आनंदाने मग त्यांना झेपेल एवढीच दारू पीत सर्व व्यवहार चालवत असतात अनेकदा मग बहुजन समाजातला माणूस गोंधळात पडतो कारण हे लोक या व्यवहारांमध्ये जोपर्यंत समोरचा देत असतो तोपर्यंत विलक्षण गोड असतो मात्र जर का दोन हिंदुत्ववादी सावरकर वादी लोक एकमेकांना भेटत असतील तर मात्र हा व्यवहार अतिशय सांभाळून केलेला व्यवहार असतो आणि ज्याने बोलावले त्याने मग मेहमाननवाजी करावी हे या लोकांना खूप स्पष्ट असते संपूर्ण व्यवहारामध्ये एक विलक्षण काटेकोरपणा आणि विलक्षण शिस्त आपणाला दिसते देताना हात आखडता घेतला जात नाही मात्र विचारपूस करताना एक प्रकारचा काटेकोरपणा तुम्हाला दिसतो . अण्णा असो किंवा दारू असो व्याया जाता नये याविषयी विलक्षण जागृत असतात मात्र माझा अनुभव असा की कधी ना कधीतरी या लोकांना दारू सोडायचे असते आणि जवळजवळ नव्वद टक्के लोक आयुष्यात कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावर दारू सोडतात आणि जे दहा टक्के सोडत नाहीत त्या माणसाविषयी या लोकांना मग काडीचीही सहानभूती असत नाही त्यांचेही विलक्षण मर्यादित असलेले आयुष्य बहुजन समाजातल्या लोकांना कायमच आवडत राहते त्यांना त्यांच्यासारखे बनायचे असते आणि मग साहजिकच मी दारू किंवा सिगरेट कशी सोडली याची सुद्धा नंतर एक पेशंकश तयार व्हायला लागते सावरकरांचा जो संयम होता तो विलक्षण रित्या आपल्या आयुष्यात बाणवण्याचा प्रयत्न हे लोक सातत्याने करत असतात . अनेक लोक यशस्वी होतात. तुम्ही जर का बहुजन समाजातले मोकळे ढाकळे असाल तर मग तुम्हाला कधी कधी असे वाटते की ब्राह्मण असणे म्हणजे असेच असते त्यामुळे कधी कधी तुम्ही यावर विलक्षण रित्या टीका करू शकता परंतु आपली टीका फोल आहे अशी सुद्धा या लोकांना वाटत असते . मुळातच अशा प्रकारचा संयम आपल्याला सुद्धा साधायला हवा होता असे कळत नाही नेहमी मध्ये वाटत असल्याने हे लोक विलक्षण टोकाला जाऊन व्यवहार कधीच करत नाही आणि म्हणूनच या लोकांच्या वर आयुष्यात कधीही बहिष्कार टाकला जात नाही उलट आपल्या मुलांना अनेकदा हा व्यवहार सांगितला जातो की कसा हा ब्राह्मण काटेकोर आहे आणि काटकसरी आहे संयम आणि काटकसर हा संपूर्ण यजमानगिरीचा एक विलक्षण व्यवहार असतो अपवादात्मक वेळेला मग नंतर अतिथी म्हणून सुद्धा हा व्यवहार पाळला जातो आणि जर का एखादी व्यक्ती यजमानगिरी आणि अतिथीगिरी यांच्यामध्ये जर का संपूर्ण समतोल साधून व्यवहार करत असतील तर मात्र असे लोक शक्यतो वारंवार बहुजन समाजाकडून बोलवले जातात कारण या लोकांच्या मुळे काहीही विलक्षण नुकसान होत नाही आणि हे लोक कंपनीला अतिशय चांगले वाटत राहतात.
हे लोक साधारणपणे आपली स्वतःची प्रायव्हसी कधीही सोडत नाही आणि त्यामुळेच अनेकदा यांच्या घरामध्ये तुम्हाला क्वचितच आमंत्रण मिळते सर्व व्यवहार शक्यतो हॉटेल किंवा तस्सम गोष्टी मध्ये व्हावे याविषयी लोक विलक्षण रित्या जागृत असतात . जोपर्यंत तुमच्याबद्दल विश्वासार्हता निर्माण होत नाही तोपर्यंत हे लोक शक्यतो त्यांच्या फॅमिली मध्ये कुटुंबामध्ये हे घेऊन जात नाहीत. पुन्हा अपवाद शक्यतो यांच्यासारखेच जे हिंदुत्ववादी लोक असतात तिथे मात्र अनेकदा एकमेकांबद्दल आधीच विश्वास निर्माण झालेला असतो .
त्या लोकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असे असते की एकदा जर का व्यवहार ठरला किंवा तो व्यवहार हे लोक कधीही सोडत नाहीत यातले बहुतांशी लोक हा व्यवहार चोखपणे पार पडतात त्यामुळेच अनेकदा असे होते की व्यवहाराच्या पातळीवर हा व्यवहार बहुजन समाजातल्या अनेक लोकांना परवडणारा असतो अनेक यशस्वी झालेले बहुजन समाजातील लोक शक्यतो ब्राह्मणांनाच कामावर का ठेवतो याचे कारण या लोकांचा हा चोख व्यवहार असतो हे शक्यतो आपल्या मालकाचे नुकसान होऊ देत नाहीत . राजकीय पातळीवर एकदा का मालकाने आपले धोरण काय आहे ते सांगितले की मग हे धोरण कसे अमलात आणायचे याविषयी हे लोक विलक्षण संवेदनशील असतात आणि आपल्या मालकाचे चांगले आणि वाईट व्यवहार हे व्यवस्थित पार पाडत असतात शक्यतो कथा कादंबऱ्यांच्या मध्ये असलेले अनेक ब्राह्मणांचे वाचले धोका दिल्याचे व्यवहार प्रत्यक्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घडत नसतं कोणीतरी एखादा जो ब्राह्मण असा असतो की जो याबाबतीत नको पाठीत खंजीर खूप असते त्यामुळे बहुजन समाजातले अनेक यशस्वी झालेले बिझनेस मॅन स्पेशली राजकारणी हे ब्राह्मणांना आपल्या ठाई नोकरीमध्ये ठेवतच असतात कारण एक प्रकारची लॉयल्टी मिळण्याची शक्यता असते आणि मुख्य म्हणजे व्यवहारांमध्ये एक विलक्षण सातत्य असतं कथा कादंबऱ्यातले पाठीत खंबीर असणारे व्यवहार प्रत्यक्षामध्ये घडतीलच याची शक्यता फक्त एक टक्का असते मग हे लोक नेमके कधी धोका द्यायला तयार होतात तर सर जर का तुम्ही त्यांच्या संपूर्ण ब्राह्मणी व्यवहाराबद्दल विलक्षण टीका करायला लागला किंवा त्या ब्राह्मण असण्यालाच चॅलेंज द्यायला लागला की मग यांचा व्यवहार बदलायला लागतो हे डोक्यात ठेवून व्यवस्थित तुमचे जे काय करायचे ते करत राहतात किंवा हळूच गोड बोलून तुमच्याबरोबर असलेला व्यवहार संपत त्यापेक्षा अधिक संधी देणाऱ्या व्यवहार स्वीकारतात. अनेकदा नकार देताना सुद्धा भाषा अतिशय सभ्य असते . अपवादात्मक वेळेलाच कुणी डिवचला जातो आणि त्याचा नाना फडणवीस होतो अनेकदा तुम्ही घाशीराम कोतवाल सारखे पंडित असला तरी सुद्धा तुम्हाला सोडले जात नाही .
व्यवहार करण्याची विलक्षण तैलबुद्धी हा या संपूर्ण जमातीचा एक विलक्षण विशेष आहे आणि आपल्याला हा ब्राह्मण असल्यामुळेच किंवा जन्मदत्त व्यवहाराची परंपरा असल्याने प्राप्त झालेला आहे याविषयी या लोकांना शंका नसते .
संपूर्ण भारतामध्येच या लोकांची प्रशासन क्षेत्रामधली उपस्थिती ही लक्षणीय आणि अनेकदा हे लोक एकमेकांबरोबर व्यवहार व्यवस्थित ठरवून पार पाडत असतात आणि एकमेकाला प्रमोट करत असतात विशेषतः जर का व्यवहार क्रॉस करत नसेल तर मग ती व्यक्ती विलक्षण रित्या प्रमोट केली जाते कारण आपल्याला त्या व्यक्तीचे काम येणार नाही हे यांना माहिती असते म्हणजे उदाहरणार्थ जर का लता मंगेशकर सारखे आपण गाऊ शकत नाही हे माहिती असेल तर मग हे लोक त्या लता मंगेशकर ला जितके प्रमोट करता येईल तितके ते करत राहतात त्यामुळेच या लोकांची करीयरस कायमच बनत असतात यासाठी लागणारे सर्व प्रकारचे कष्ट घेण्याची तयारी या लोकांची असते अंदमानमध्ये प्रचंड मेहनत करणारे सावरकर या लोकांना त्यामुळेच कायमच आमंत्रित करत असतात. कष्टांच्यावर ईश्वरापेक्षा जास्त श्रद्धा हा एक विलक्षण गुण लोकांच्या ठाई असतो संधी नेमकी कुठे आहे हे यांना आपोआपच कळत असते आणि त्या संधी प्राप्तीनंतर किंवा संधी मिळवण्यासाठी हे विलक्षण मेहनत करतात व्यवस्थित फिल्डिंग लावतात आणि संधी मिळाल्यानंतर शक्यतो आपण त्यामध्ये अपयशी होता कामा नये याचे संस्कारच या लोकांच्यावर झालेले असतात या लोकांचे सर्वाधिक पंचाईत श्रीधर तिळवे नाईक यांच्यासारखे लोक करत असतात कारण यांच्यासारखे लोक व्यवहारच करत नसतात आता व्यवहारच न करता आपल्या पद्धतीने जगणारा ह्या माणसाचे करायचे काय हे यांना कधीही कळत नाही आणि म्हणूनच गांधींच्या सारखे लोक यांच्यापुढे फार मोठा पेचप्रसंग निर्माण करत असतात. एकीकडे मोक्ष या संकल्पनेविषयी आदर असतो आणि दुसरीकडे धार्मिक प्रश्नांच्या बाबतीत धर्माबाबत हा माणूस अडथळा असल्याने हा माणूस प्रमोट होऊ नये कारण तो आपल्या धार्मिक विचारांच्या संदर्भामध्ये आणि विचार प्रणालीच्या संदर्भामध्ये अडथळा आहे याची या लोकांना कल्पना असते मग काय करायचे शक्यतो अशा माणसांना मरण येईपर्यंत वाट बघायची आणि एकदा अशा प्रकारचा माणूस मेला की मग त्याला सामावून घेण्यासाठी आपल्या परंपरेमध्ये काय करता येईल तीच्यात काही बदल करता येईल का? हे आजमावत मग त्याला एक विशिष्ट पद्धतीची प्लेसमेंट द्यायची आणि हा माणूस आपलाच कसा होता हे सांगत राहायचे . मरणोत्तर तुमचे काय करायचे याविषयी सुद्धा या लोकांना विलक्षण तैलबुद्धी प्राप्त झालेली असते त्यामुळेच मेल्यानंतर सुद्धा या लोकांचे काहीही तुम्ही बिघडवू शकत नाही . त्यामुळे गांधीजींनी खरोखरच मेल्यानंतर किती हिंदुत्ववादी लोकांचे व्यवहारिक पातळीवर नुकसान केले असा जर का प्रश्न आपण विचारला तर त्याचे उत्तर शून्य असे येते . अपवादात्मक वेळेला यांच्यातले अत्यंत कट्टर लोक उदाहरणार्थ श्याम पोंक्षे गांधी हत्येचे सुद्धा समर्थन करत राहतात पण हे करताना ते कधीही स्पष्ट स्वच्छ भूमिका घेत नाहीत पण नथुराम गोडसे यांची भूमिका तात्विक पातळीवर कशी बरोबर होती हे सांगत राहतात .
युरेशियन लोकांच्यातला किलर इस्टिंक्ट या लोकांच्या मध्ये सौम्यपणे वावरत असतो त्यामुळेच त्या वावराचे काय करायचे असा प्रश्न यांच्या विरोधकांना पडत असतो कारण हे थेट कधीही हा किलर इस्टिंक्ट मिरवत नाहीत . मात्र खाजगी मध्ये स्वतःच्या ठायी असलेले भय हे लोक सांगत राहतात.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment