डेकॅथलॉन एल्सेट्रा.
मी कागदोपत्री ब्राम्हण आहे
ह्याने तुला काय कळाले ?
ब्राह्मणांच्या दृष्टीने
माझे आख्खे घराणे
डीकास्ट झालेले ब्राम्हण घराणे आहे
ह्याने तुला काय कळाले ?
माझी मातुल आजी कायस्थ
म्हणून मी पाव कायस्थ
ह्याने तुला काय कळाले ?
माझा मातुल आजोबा वैश्य आणि गुरव
म्हणून मी ओबीसी
ह्याने तुला काय कळाले ?
माझे पैंतुल आजोबा वाळीत टाकले गेलेले
म्हणून मी अवर्ण
ह्याने तुला काय कळाले ?
माझे वडील वैश्य समाजाचे सभासद आहेत
पण त्यांना ते मूळचे ब्राम्हण आहेत म्हणून
कधीकधी बोलावले जात नाही
ते हसून जिथे जाता येते ती जात असं म्हणतात
ह्यानं तुला काय कळालं ?
ह्यातल्या एकाही गोष्टीनं
माझा साधा मेकुडसुद्धा बदलत नाही
मग मी नाकासमोर चालणारा
कसा होणार ?
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सीरीजमधील डेकॅथलॉन एलसेट्रा ह्या फाईलमधून
Comments
Post a Comment