शैव इतिहासामध्ये आणि हिंदू परंपरेमध्ये कालिदास इतका महत्त्वाचा कसा काय ? श्रीधर तिळवे नाईक
Final शैव इतिहासामध्ये आणि हिंदू परंपरेमध्ये कालिदास इतका महत्त्वाचा कसा काय ? भाग एक श्रीधर तिळवे नाईक
युरेशियन लोकांनी सर्वाधिक हायजॅक केलेले जे काही शैव कवी आहेत त्यात कालिदासाचे नाव अग्रगण्य होईल तो इसवी सन पूर्व 150 ते 200 या कालखंडात जन्मलेला असावा त्याला गुप्त कालखंडात टाकण्याचा प्रयत्न युरेशियन लोक नेहमीच करत असतात परंतु हा प्रयत्न आता फसलेला आहे नवरत्नांच्यापैकी एक रत्न म्हणून दाखवणे हे सुद्धा त्यामुळेच येते पण "मालविका अग्नी मित्र " हे नाटक असे आहे की जे स्पष्टपणे तो अग्नी मित्राचा मित्र असावा असे सांगते हा शृंग कालखंडातला होता (बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतीक्रांती या संकल्पनेमुळे हा वंश वादळात सापडला असला तरी प्रत्यक्षात या वंशाने कधीही संस्कृतची पाठ राखण केलेली नाही त्यांचे सारे सारे शिलालेख हे प्राकृत भाषेत आहेत) आणि कालिदासाची बहुतांशी नाटके आणि कलाकृती प्राकृत आणि संस्कृत अशा दोन्ही भाषांनी बनलेल्या आहेत माझे स्वतःचे वैयक्तिक मत असे की मुलत: हा प्राकृतिक भाषेतच लिहीत होता आणि गुप्त काळामध्ये त्याच्या नाटकांचा अनुवाद संस्कृत मध्ये होऊ लागला आणि संस्कृत मध्ये भाषांतर करताना त्याला अधिकाधिक युरेशियन करण्याचा प्रयत्न झाला शक्यता अशीही आहे की त्याने संस्कृत आणि प्राकृत अशा दोन्ही भाषेत लिखाण केले असेल कारण संस्कृत ही मुळात शैव लोकांनी जन्माला घातलेली संपर्कभाषा आहे जी युरेशियन लोकांनी नंतर स्वीकारली व तिला अधिकाधिक इंडो युरोपियन बनवले
कालिदासावर मराठीमध्ये सर्वात प्रथम विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंध लिहिला होता त्यानंतर मग वा वि मिराशी यांनी कालिदासावर नवभारत ग्रंथ मालेमध्ये सहा लेख लिहिले आणि नंतर त्याचे पुस्तक झाले जे आता मराठी साहित्य संस्कृती मंडळाकडून प्रसिद्ध झालेले आहे सर्वसाधारणपणे कालिदासा बद्दल मराठीत चर्चा होती ती या पुस्तकाच्या आधारे होते त्यामुळे सर्व चर्चेला कळत नकळत हिंदू बाज चढत जातो म्हणजे मालविका अग्नी मित्र नाटकांमध्ये राणीच्या दारू पिण्याचा प्रसंग हा घडू शकत नाही अशी भूमिका मिराशी घेतात वास्तविक ब्राह्मणांनी दारू पिणे सोडले ते दुसऱ्या शतकानंतर जेव्हा बौद्ध धर्माचा प्रचार वाढला प्रसार वाढला अन्यथा वैदिक संस्कृतीमध्ये दारू पिणे हा प्रॉब्लेम नव्हता हे आपण लक्षात घेतले पाहिजे इथे तर राजा आणि राणी यांनी दारू पिणे हे फारच सामान्य मानले जात होते दुसरी गोष्ट या नाटकामध्ये आणि मित्रा विषयीचे तपशील आहेत शृंग घराण्याविषयीचे तपशील आहेत ते नंतरच्या काळातच उपलब्ध होऊ शकतात अशी ही भूमिका घेतली जाते प्रत्यक्षात माझे म्हणणे उलटे आहे मुळात इतिहासाबद्दलचा आपला जागृतपणा लक्षात घेतला तर इतक्यावर शतकानंतर कालिदासाला हे तपशील मिळणे शक्यच नाही त्यामुळे तो या घराण्याच्या आणि अग्नी मित्राच्या दरबारी असल्याशिवाय त्याला हे तपशील मिळाले नसणार आणि मुख्य म्हणजे हे तपशील सादर करण्याचे धाडसच झाले नसते कालिदास शैव होता हे आपण नेहमी लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे शृंग स्वतः जरी वैदिक आणि ब्राह्मण धर्मीय असला तरी जनतेचा धर्म त्या काळामध्ये शैवच होता आणि साहजिकच कालिदासाची पंगा घेणे त्या अर्थाने त्याला परवडणारे नव्हतेच शिवाय तो मित्र असावा आणि कदाचित जावई किंवा भाऊजी असावा गुप्त काळामध्ये कालिदासाची लोकप्रियता चरम सीमेवर होती साहजिकच गुप्त काळानंतर तो सर्वच कवींचा कवी कुलगुरू झालेला दिसतो
अश्वघोष आधी की कालिदास आधी हा प्रश्न सुटणे शक्य नाही कुमार संभव मधील काम भस्म झाल्यानंतरतीने केलेला विलाप व सौंदर्य नंदाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्याची पत्नी सुंदरीने केलेला विलाप यांच्यातल्या साम्य स्थळावरून एकमेकावर आरोप केले जातात पण मिराशी यांनी म्हटल्याप्रमाणे काही सिच्युएशन्स फार रेगुलर असतात तसे काहीसे इथे घडलेले आहे
कालिदास हा संस्कृत साहित्यातला सर्वश्रेष्ठ कवी नाटककार आहे साहजिकच त्याचे काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न होता त्याला हायजॅक करणे ही युरेशियन लोकांची गरज होती हा विदर्भातल्या पंडित घराण्यात जन्मला होता आणि थोडासा माठ होता आपल्याला बुद्धी प्राप्त व्हावी म्हणून त्याने महाकालीची उपासना सुरू केली आणि महाकालीच्या आशीर्वादानेच त्याचा शक्तिपात होऊन त्याला असाधारण प्रतिभा प्राप्त झाली त्यामुळेच त्याचे नाव कालिदास पडले कारण तो स्वतःला कालीचा दास मानत होता आता इतकी साधी सरळ असलेली शैवकथा नंतर कशी काय बदलते आणि कालीच्या जागी सरस्वती का आणावीशी वाटते हा प्रश्न कधीतरी ब्राह्मण परंपरेला विचारावा लागतो त्यांना विचारावे लागते की तुम्ही असे का करता ? प्रत्येक महत्त्वाचा शैव माणूस तुम्ही का हायजॅक करता ? का सरस्वती आणि इतर वैदिक देवता मुद्दाम म्हणून चिटकवायला बघता? विशेषता इंटरनेट आल्यापासून कालिदासाला सरस्वतीचीच कृपा लाभली असे भ्रम पसरवायला सुरुवात झाली आहे म्हणून हे सांगावेसे वाटते इतकेच नव्हे तर त्याच्यावर पूर्णपणे आरक्त आसक्त झालेल्या एका राजकन्याच्या आणि त्याच्या विवाहाची कथा सुद्धा आता बदलून सांगितली जाते तो राज्यातला सर्वाधिक मूर्ख होता आणि राजकन्येवर सूड घेण्यासाठी म्हणून सर्व विद्वान ब्राह्मण लोकांनी मुद्दाम म्हणून त्याला वाद विवादाला भरीस घातले आणि राजकन्येला पराभूत केले त्यामुळे तिचा विवाह कालिदासाशी झाला पुढे जेव्हा तिला कळाले की कालिदास मूर्ख आहे तेव्हा तिने कालिदासाला सांगितले की तू विद्वान झालास की मग मी तुझ्याबरोबर संसार करेन या घटनेमुळे अपमानित झालेला कालिदास हा कालीची उपासना करतो आणि मग त्याला विद्याप्राप्ती होते आता प्रत्यक्षामध्ये असे काही झालेले नाही अग्नि मित्राच्या दारी असलेल्या या कवीच्या प्रेमात राजकन्या पडली आणि त्यांचा विवाह झाला इतकीच सत्य कथा आहे एकाच वेळी काव्यप्रतिभा आणि ज्ञान प्रतिभा याचा विलक्षण संगम त्याच्या ठायी होता आणि त्यामुळेच राज कन्या त्याच्या प्रेमात पडली मेघदूत हे काव्य सुद्धा तिच्या विरहातच कालिदासाने लिहिले होते जेव्हा तो हिमालयाकडे गेला होता
पूर्वी हा प्रचार तितका नव्हता पण नंतर हा वाढत गेला विशेषता कोणीही विदवान जन्मला की त्याला सरस्वती प्रसन्न होते हा प्रचार नवव्या आणि दहाव्या शतकामध्ये सुरू झाला पुढे पुढे हा प्रचार इतका डॉमिनेट होत गेला की शैवलोक सुद्धा गणपतीची पूजा करायला लागले आधी गणपतीला वंदन करायचे आणि मग सरस्वतीला वंदन करायचे अशी प्रथाच जणू बाराव्या शतकानंतर पडलेली दिसते आणि शैव परंपरेमध्ये सरस्वती सामावली गेली पंडितांचे प्रथम सरस्वतीकरण आणि मग ब्राह्मणीकरण इथून सुरू होते अगदी शिवचरित्र हा ग्रंथ घेतला तर हे स्पष्ट होते म्हणून त्याची आता चर्चा करू
कालिदासाचे महत्त्व समजायचे असेल तर आपण कविवादिशेखर या कवीचा शिवचरित हा ग्रंथ घ्यावा या ग्रंथाच्या आरंभी अर्थातच तो दक्षिणेचा असल्याने दक्षिणामूर्तीला नमस्कार आहे त्यानंतर अर्थातच तो शैव असल्याने त्याने भगवान शिवांना महेश्वरांना नमस्कार केलेले आहेत आणि मी इतर देवतांना पूजत सुद्धा नाही बघत सुद्धा नाही असेही सांगितलेले आहे गमतीचा भाग असा आहे की एकीकडे मी शिवाशिवाय कुणाकडे पाहत नाही असे म्हटले आहे आणि दुसरीकडे सुरुवातीलाच गणपती सरस्वती यासारख्या देवतांना प्रणाम केलेला आहे त्यामुळे मग हा गणपती आणि सरस्वती यांच्या नमस्कार चा भाग नंतर घुसवलेला आहे का असा प्रश्न निर्माण होतो मात्र जेव्हा स्वतःच्या कवी कुलाची तो मांडणी करायला लागतो तेव्हा त मात्र तो सर्वात प्रथम कालिदासाला नमस्कार करतो त्यानंतर तो क्षेमेंद्रला नमस्कार करतो आता हेच दोन कवी का निवडले गेलेले आहेत असा प्रश्न आपण विचारायला हवा उत्तर स्पष्ट आहे हे दोन कवी असे आहेत की जे शैव असून सुद्धा ज्यांनी एका अर्थाने जिला आज हिंदू परंपरा म्हणतो त्याची सुरुवात केलेली आहे वैष्णव आणि शैव एकत्र आणणे हे कळत नकळत कालिदासापासून सुरू होते पुढे क्षेमेंद्र हेच काम करतो याचा एक स्पष्ट परिणाम शिवचरित्र या ग्रंथातील कथनावर झालेला दिसतो म्हणजे मातृसत्ताक असलेला शैव धर्म हा हळूहळू पितृसत्ताक होत गेला आणि साहजिकच मग इथे जी सुरुवातीला कथा येते त्यामध्ये जो मृकंडू ऋषी व मुनी आहे त्याला पुत्रप्राप्ती होत नाही म्हणून तो व्यथीत झालेला आहे आणि पुत्र नसेल तर आयुष्याला जणू काही अर्थ नाही अशा पद्धतीने तो आपला उद्वेग आपल्या पत्नी पुढे व्यक्त करत आहे हा बदल वैष्णव परंपरेमुळे युरेशियन लोकांच्या प्रभावातून निर्माण झालेला आहे हे उघड आहे
ह्या महाकाव्यामध्ये शंकराचे वर्णन करताना त्याला पंडित असे म्हटलेले आहे हा कवी दाक्षिणात्य आहे असे मी म्हणतो कारण यामध्ये जो ऋषी आहे तो तपस्या करताना कावेरी नदीच्या काठी करतो त्यामुळे साहजिकच कावेरीचा महिमा ही सांगितलेला आहे शंकराचा महिमा सांगताना त्याला कर्णधार म्हणजेच कोळी असे म्हटलेले आहे आपल्याकडे अनेक लोकांना कर्णधार या शब्दाचा मूळ शैव अर्थ माहित नसतो म्हणून मी हे सांगतो आहे इंदीवर या शब्दाचा अर्थ कमळ असा होतो तोही इथे येतो (ज्या देशात कमळे फुलतात तो देश म्हणजे इंद होय व त्यावरूनच इंडिया हा शब्द आलेला आहे चंद्र आणि कमळ या दोन्हींनी जो देश युक्त आहे तो इंडिया होय यातील चंद्र हा कालग गणणेशी तर कमळ हे मोक्षाशी निगडित आहे किंबहुना त्यांचे प्रतीक आहे प्रत्यक्षात कमळे अनेक देशात फुलतात पण त्यावेळेला हे बहुधा माहित नसेल इंद ही देवता ही आहे जिला नंतर युरेशियन लोकांनी शैव कथांच्या मध्ये सर्रास इंद्र करून टाकले अगदी तंत्रात सुद्धा इंदाय नम: चे इंद्राय नमः झालेले दिसते ही देवता कुंडलिनीचे कमळ फुलवते असो) गमतीचा भाग असा की इथे शंकर प्रसन्न झाल्यानंतर मुनीला "तुला ब्रह्म देवा जवळ नसेल असे मी पांडित्य तुला द्यायला तयार आहे "असे म्हणतात म्हणजे शंकराच्या दृष्टीने ब्रह्मदेव हा सर्वश्रेष्ठ पंडित आहे हेही इथे येते पुढे मग शंकर पर्याय देतो " एक तर पंडित पण फक्त सोळा वर्षे जगणारा पुत्र तुला मी देतो किंवा मूर्ख 100 वर्षे जगणारा पुत्र तुला देतो "तेव्हा मग हा पंडित विद्याहीन म्हणजे काय हे सांगतो हे कळत नकळत त्या काळाचे प्रतिबिंब आहे विद्या प्राप्त नसलेला विद्या अवगत नसलेला ब्राह्मण हा ब्राह्मण नव्हे असे कळत नकळत इथे बिंबवलेले आहे म्हणजेच पुन्हा एकदा ब्राह्मणाची व्याख्या पंडित म्हणून केलेली आहे पराक्रम नसलेले क्षत्रिय आणि विद्या नसलेले ब्राह्मण हे समानच लायकीचे आहेत असेही तो इथे म्हणतो इथे एक गोष्ट पुन्हा एकदा लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे वेद या शब्दाचा अर्थ शैव परंपरेमध्ये आयुर्वेद ज्योतिषवेद शस्त्रवेद असा होतो मुळात आरंभीच्या काळात युरेशियन वेदांना सुद्धा वेद असे म्हटले जात नव्हते तर त्यासाठी संहिता असा शब्द होता केवळ शैव धर्माला शह देण्यासाठी या लोकांनी आपल्या या संहितांना वेद म्हणायला सुरुवात केली जेणेकरून त्यांना पावित्र्य प्राप्त व्हावे व ते ऑथेंटिक व्हावेत साहजिकच हे मुनी वेदार्थसंपन्न पुत्र मागतात मात्र आता वेदांचा अर्थ युरेशियन झालेला आहे साहजिकच पुढे सर्व संस्कार सुद्धा या मुलावर झाले असे सांगितले जाते मात्र मुलगा विभूती भस्म ओढतो हे सांगतात मृत्यू पासून वाचण्यासाठी हा मुलगा ज्याचे नाव आता मार्कंडेय झालेले असते तांडव नावाच्या नगरीत येतो आणि तपश्चर्या करायला लागतो त्याला मारावयास आलेले यमदूत त्याच्या तेजाने ओशाळतात आणि निघून जातात पुढे यम स्वतः येतो तर तोही त्याला स्पर्श करायला घाबरतो आणि कुठल्याही शिवभक्ताला स्पर्श करायला मी घाबरतो अशी कबुली देतो साहजिकच त्याची स्तुती करावी म्हणून तो त्याला म्हणतो," भो मार्कंडेय (आज आपण ज्याला ब्रो किंवा भावा म्हणतो त्याची ही आद्य सुरवात आहे) मला तुला न्यावेच लागेल मला साक्षात शिवानेच हा सर्व अधिकार दिलेला आहे . ज्याप्रमाणे पावसापासून वाचण्यासाठी छत्रीचा उपयोग होतो तसा मृत्यूपासून वाचण्यासाठी तू जे करतो आहेस त्याचा उपयोग होणार नाही कारण छत्री पावसापासून संरक्षण देऊ शकते पण छत्रीवर वीज कडाडली तर ती संरक्षण देऊ शकेल का? मृत्यू ही वीज आहे आणि कुठलीही छत्री त्याच्यापासून संरक्षण देऊ शकत नाही तेव्हा तू माझ्यासोबत यमलोकी चल "
continue
श्रीधर तिळवे नाईक
युरेशियन लोकांनी सर्वाधिक हायजॅक केलेले जे काही शैव कवी आहेत त्यात कालिदासाचे नाव अग्रगण्य होईल तो इसवी सन पूर्व 150 ते 200 या कालखंडात जन्मलेला असावा त्याला गुप्त कालखंडात टाकण्याचा प्रयत्न युरेशियन लोक नेहमीच करत असतात परंतु हा प्रयत्न आता फसलेला आहे नवरत्नांच्यापैकी एक दाखवणे हे सुद्धा त्यामुळेच येते पण मालविका अग्नी मित्र हे नाटक असे आहे की जे स्पष्टपणे तो अग्नी मित्राचा मित्र असावा असे दिसते असे सांगते हा शृंग कालखंडातला होता आणि कालिदासाची बहुतांशी नाटके आणि कलाकृती प्राकृत आणि संस्कृत अशा दोन्ही भाषा निवडलेले आहेत भाषांनी बनलेल्या आहेत माझे स्वतःचे वैयक्तिक मत असे की मुलत: हा प्राकृतिक भाषेतच लिहीत आणि गुप्त काळामध्ये त्याच्या नाटकांचा अनुवाद संस्कृत मध्ये होऊ लागला आणि संस्कृत मध्ये भाषांतर करताना त्याला अधिकाधिक युरेशियन करण्याचा प्रयत्न झाला शक्यता अशीही आहे की त्याने संस्कृत आणि प्राकृत अशा दोन्ही भाषेत लिखाण केले असेल कारण संस्कृती मुळात शैव लोकांनी जन्माला घातलेली संपर्कभाषा आहे संस्कृत साहित्यातला हा सर्वश्रेष्ठ कवी नाटककार आहे साहजिकच त्याचे काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न होता त्याला हायजॅक करणे ही युरेशियन लोकांची गरज होती हा विदर्भातल्या पंडित घराण्यात जन्मला होता आणि थोडासा माठ होता आपल्याला बुद्धी प्राप्त व्हावी म्हणून त्याने महाकालीची उपासना सुरू केली आणि महाकालीच्या आशीर्वादानेच त्याचा शक्तिपात होऊन त्याला असाधारण प्रतिभा प्राप्त झाली त्यामुळेच त्याचे नाव कालिदास पडले कारण तो स्वतःला कालीचा दास मानत होता आता इतकी साधी सरळ असलेली शैवकथा नंतर कशी काय बदलते आणि कालीच्या जागी सरस्वती का आणावीशी वाटते हा प्रश्न कधीतरी ब्राह्मण परंपरेला विचारावा लागतो त्यांना विचारावे लागते की तुम्ही असे का करता ? प्रत्येक महत्त्वाचा शैव माणूस तुम्ही का हायजॅक करता ? का सरस्वती आणि इतर वैदिक देवता मुद्दाम म्हणून चिटकवायला बघता? विशेषता इंटरनेट आल्यापासून कालिदासाला सरस्वतीचीच कृपा लाभली असे भ्रम पसरवायला सुरुवात झाली आहे म्हणून हे सांगावेसे वाटते इतकेच नव्हे तर त्याच्यावर पूर्णपणे आरक्त आसक्त झालेल्या एका राजकन्याच्या आणि त्याच्या विवाहाची कथा सुद्धा आता बदलून सांगितली जाते तो राज्यातला सर्वाधिक मूर्ख होता आणि राजकन्येवर सूड घेण्यासाठी म्हणून सर्व विद्वान लोकांनी मुद्दाम म्हणून त्याला वाद विवादाला भरीत घातले आणि राजकन्येला पराभूत केले त्यामुळे तिचा विवाह कालिदासाशी झाला पुढे जेव्हा तिला कळाले की कालिदासा मूर्ख आहे तेव्हा तिने कालिदासाला सांगितले की तू विद्वान झालास की मग मी तुझ्याबरोबर संसार करेल त्यामुळे अपमानित झालेल्या कालिदास हा कालीची उपासना करतो आणि मग त्याला विद्याप्राप्ती होते आता प्रत्यक्षामध्ये असे काही झालेले नाही अग्नि मित्राच्या दारी असलेल्या या कवीच्या प्रेमात राजकन्या पडली आणि त्यांचा विवाह झाला इतकीच सत्य कथा आहे एकाच वेळी काव्यप्रतिभा आणि ज्ञान प्रतिभा याचा विलक्षण संगम त्याच्या ठायी होता आणि त्यामुळेच राज कन्या त्याच्या प्रेमात पडली मेघदूत हे काव्य सुद्धा तिच्या विरहातच कालिदासाने लिहिले होते जेव्हा तो हिमालयाकडे गेला होता
कालिदासाला हायजॅक करणे ही यूरोशियन परंपरेची गरज असल्याने साहजिकच मग कालिदासाला काली नाही तर सरस्वती प्रसन्न झाली असे सांगण्यात हल्ली येते सरस्वती ही एक राजकीय गोष्ट होऊन गेली आणि कोणीही विदवान जन्मला की त्याला सरस्वती प्रसन्न होते हा प्रचार नवव्या आणि दहाव्या शतकामध्ये सुरू झाला पुढे पुढे हा प्रचार इतका डॉमिनेट होत गेला की शैवलोक सुद्धा गणपतीची पूजा करायला लागले आधी गणपतीला वंदन करायचे आणि मग सरस्वतीला वंदन करायचे अशी प्रथाच जणू बाराव्या शतकानंतर पडलेली दिसते आणि शैव परंपरेमध्ये सरस्वती सामावली गेली पंडितांचे प्रथम सरस्वतीकरण आणि मग ब्राह्मणीकरण इथून सुरू होते
कालिदासाचे महत्त्व समजायचे असेल तर आपण कविवादिशेखर या कवीचा शिवचरित हा ग्रंथ घ्यावा या ग्रंथाच्या आरंभी अर्थातच तो दक्षिणेचा असल्याने दक्षिणामूर्तीला नमस्कार आहे त्यानंतर अर्थातच तो शैव असल्याने शंकराला भगवान शिवांना महेश्वरांना नमस्कार केलेले आहेत आणि मी इतर देवतांना पूजत सुद्धा नाही बघत सुद्धा नाही असेही सांगितलेले आहे गमतीचा भाग असा आहे की एकीकडे मी शिवाशिवाय कुणाकडे पाहत नाही असे म्हटले आहे आणि दुसरीकडे सुरुवातीलाच गणपती सरस्वती यासारख्या देवतांना प्रणाम केलेला आहे मात्र जेव्हा स्वतःच्या कवी कोणाची तो मांडणी करायला लागतो तेव्हा त मात्र तो सर्वात प्रथम कालिदासाला नमस्कार करतो त्यानंतर तो क्षेमेंद्रला नमस्कार करतो आता हेच दोन कवी का निवडले गेलेले आहेत असा प्रश्न आपण विचारायला हवा उत्तर स्पष्ट आहे हे दोन कवी असे आहेत की ज्यांनी एका अर्थाने जिला आज हिंदू परंपरा म्हणतो त्याची सुरुवात केलेली आहे वैष्णव आणि शैव एकत्र आणणे हे कळत नकळत कालिदासापासून सुरू होते पुढे क्षेमेंद्र हेच काम करतो याचा एक स्पष्ट परिणाम कथनावर झालेला दिसतो म्हणजे मातृसत्ताक असलेला शैव धर्म हा हळूहळू पितृसत्ताक होत गेला आणि साहजिकच मग इथे जी सुरुवातीला कथा येते त्यामध्ये जो मृकंडू ऋषी आहे त्याला पुत्रप्राप्ती होत नाही म्हणून तो व्यथीत झालेला आहे आणि पुत्र नसेल तर आयुष्याला जणू काही अर्थ नाही अशा पद्धतीने तो आपला उद्वेग आपल्या पत्नी पुढे व्यक्त करत आहे हा बदल वैष्णव परंपरेमुळे युरेशियन लोकांच्या प्रभावातून निर्माण झालेला आहे हे उघड आहे
ह्या महाकाव्यामध्ये शंकराचे वर्णन करताना त्याला पंडित असे म्हटलेले आहे हा कवी दाक्षिणात्य आहे असे मी म्हणतो कारण यामध्ये जो ऋषी आहे तो तपस्या करताना कावेरी नदीच्या काठी करतो त्यामुळे साहजिकच कावेरीचा महिमा ही सांगितलेला आहे शंकराचा महिमा सांगताना त्याला कर्णधार म्हणजेच कोळी असे म्हटलेले आहे आपल्याकडे अनेक लोकांना कर्णधार या शब्दाचा मूळ शैव अर्थ माहित नसतो म्हणून मी हे सांगतो आहे इंदीवर या शब्दाचा अर्थ कमळ असा होतो तोही इथे येतो (ज्या देशात कमळे फुलतात तो देश म्हणजे इंद होय व त्यावरूनच इंडिया हा शब्द आलेला आहे प्रत्यक्षात कमळे अनेक देशात फुलतात पण त्यावेळेला हे बहुधा माहित नसेल इंद ही देवता ही आहे जिला नंतर युरेशियन लोकांनी सर्रास इंद्र करून टाकले ) गमतीचा भाग असा की इथे शंकर मुलीला मुलीला तुला ब्रह्म देवाप्रमाणे मी पांडित्य द्यायला तयार आहे असे म्हणतात म्हणजे शंकराच्या दृष्टीने ब्रह्मदेव हा सर्वश्रेष्ठ पंडित आहे हेही इथे येते पुढे मग शंकर पर्याय देतो एक तर पंडित पण फक्त सोळा वर्षे जगणारा किंवा मूर्ख 100 वर्षे जगणारा तेव्हा मग हा म्हणे विद्याहीन ब्राह्मण म्हणजे काय हे सांगतो हे कळत नकळत त्या काळाचे प्रतिबिंब आहे विद्या प्राप्त नसलेला अवगत नसलेला ब्राह्मणावर ब्राह्मण नव्हे असे कळत नकळत इथे बिंबवलेले आहे म्हणजेच पुन्हा एकदा ब्राह्मणाची व्याख्या पंडित म्हणून केलेली आहे पराक्रमाने ही नसलेले क्षत्रिय आणि विद्या नसलेले ब्राह्मण हे समानच लायकीचे आहेत असेही इथे सांगितले जाते इथे एक गोष्ट पुन्हा एकदा लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे वेद या शब्दाचा अर्थ शैव परंपरेमध्ये आयुर्वेद ज्योतिषवेद शस्त्रवेद असा होतो मुळात युरेशियन वेदांना सुद्धा वेद असे म्हटले जात नव्हते तर त्यासाठी संहिता असा शब्द होता केवळ शैव धर्माला शह देण्यासाठी या लोकांनी आपल्या या संहितांना वेद म्हणायला सुरुवात केली साहजिकच हे मुनी वेदार्थसंपन्न पुत्र मागतात मात्र आता वेदांचा अर्थ युरेशियन झालेला आहे साहजिकच पुढे सर्व वैदिक संस्कार सुद्धा या मुलावर झाले असे सांगितले जाते मात्रांचा विभूती भस्म ओढतो हे सांगतात मृत्यू पासून वाचण्यासाठी हा मुलगा ज्याचे नाव आता मार्कंडेय झालेले असते तांडव नावाच्या नगरीत येतो आणि तपश्चर्या करायला लागतो त्याला माराव्यास आलेले यमदूत त्याच्या तेजाने ओशाळतात आणि निघून जातात पुढे या मिळतो तर तोही त्याला स्पर्श करायला घाबरतो आणि कुठल्याही शिवभक्ताला स्पर्श करायला मी घाबरतो अशी कबुली देतो साहजिकच त्याची स्तुती करावी म्हणून तो त्याला म्हणतो," भो मार्कंडेय (आज आपण ज्याला ब्रो म्हणतो त्याची ही आद्य सुरवात आहे) मला तुला न्यावेच लागेल मला साक्षात शिवानेच हा सर्व अधिकार दिलेला आहे . ज्याप्रमाणे पावसापासून वाचण्यासाठी छत्रीचा उपयोग होतो तसा मृत्यूपासून वाचण्यासाठी उपयोग होणार नाही कारण छत्रीवर वीज कडाडली तर ती संरक्षण देऊ शकेल का? मृत्यू ही वीज आहे आणि कुठलीही छत्री त्याच्यापासून संरक्षण देऊ शकत नाही
पाण्याचे बिंदू कुलपात ठेवले तरी ते स्थिर राहणार का ? मनुष्याचेही असेच आहे मधुपान करणाऱ्या भुंग्याने दगड खाण्याची इच्छा केली म्हणून त्याला दगड खाता येईल का ? अगदी ब्रह्मदेव सुद्धा मृत्यूपासून वाचू शकत नाही विष्णूचा एक दिवस पूर्ण झाला की त्याचा मृत्यू होतो अगदी विष्णू सुद्धा मृत्यूपासून वाचू शकत नाही शिवाचा म्हणजेच परमेश्वराचा एक दिवस पूर्ण झाला की त्याचा मृत्यू होतो अशा त्या शिवाचा काल मोडण्यास कोण समर्थ आहे ? ब्रह्मदेवाला ही जी गोष्ट साध्य होणार नाही ती गोष्ट तू कशी साध्य करणार जे वजराने फुटत नाही त्या ठिकाणी सुईचा काय उपयोग होणार ? मनुष्यमात्राला रहाटगाडग्यात अडकलेल्या प्राण्यांना स्थिरता ना या लोकात आहे ना परलोकात आहे तेव्हा मोहाला अवकाश देऊ नकोस मरण हे स्वभाव सिद्ध असून कधीही चुकत नाही तेव्हा तुझे शरीर लवकर सोड मूर्ख असो बुद्धिमान असो तरुण असो आमच्या सभेत कोणाचीही गणना नाही आम्ही मध्येस्त भावाचे अवलंबून करत प्राण्यांना मृत्यू लोकात नेत असतो आणि मृत्यू हा कर्माच्या स्वाधीन आहे विनाकारण वेळ घालवण्यात काय अर्थ ? कर्मांना अनुसरून हे महानुभाव तू माझ्यात परत मी बहुमानपूर्वक तुला नेण्यासाठी आलेलो आहे"
यानंतर अर्थातच मार्कंडयाचे फ्रस्टेशन येते आपण अतिशय चांगल पूर्वक जगलो कधी पाप केली नाही तरीही हा मृत्यू टळत नाही याचे हे फ्रस्टेशन आहे पण उपाय काय शेवटी तो पशुपतिनाथ तर तारणार म्हणून मग मार्कंडेय शिवलिंगाला मिठी घालून बसतो अर्थात यामुळेच यमापुढे पेच तयार होतो . या काव्यात यमासाठी अंतक शब्द वारंवार येतो एका अर्थाने इथे यमाचा अंतक वाद येतो ज्यावरून अलीकडे आतंक असा शब्द आलेला आहे जो प्रत्यक्षात चुकीचा आहे अंतक वाद हा शब्दच योग्य आहे आणि मार्कंडेयाची धारणा अशी आहे की शिव हा कालातीत असल्याने काळाचा स्वामी असल्याने महाकाळ असल्याने त्याला यम काही करू शकत नाही आणि आपणाला जर वाचायचे असेल तर आपणाला शिवाकडे जाण्याखेरिज पर्याय नाही म्हणून मग मार्कंडेय शिवलिंगाला मिठी घालून बसतो आणि त्याच्या त्याअसाधारण भक्तीमुळे ब्रह्मांड हलायला लागते ब्रह्मदेव हलायला लागतो खुद्द लक्ष्मी भीतीने विष्णूला मिठी मारते आणि मग खुद्द शिवलिंगातून शिव प्रकट होतात यमाला लाथ घालतात त्या लत्ता प्रहारमुळे यम घायाळ होतो अर्थातच मग ते त्याला वर मागायला सांगतात इंद्रपद देतो कुबेर पद मोक्ष लक्षमी देतो वगैरे वगैरे पण भक्त फक्त तुझ्या चरणापाशी मला जागा दे असे मागतो तुझे स्मरण देते राहो असे मागतो
पुढेही अशाच पद्धतीने चरित्र सांगितले जाते ही पद्धत पौराणिक आहे हे स्पष्ट दिसते मात्र इथे भक्ताला कुठलाही ब्राह्मण लागत नाही त्याचा थेट शिवाशी संबंध येतो आणि तोच या कथेचा इसेन्स आहे
रघुवंशाची सुरुवातच कालिदास पार्वती आणि परमेश्वर यांना नमस्कार करून करतो यातील परमेश्वर शिव आहे हे उघड आहे किंबहुना इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासूनच शिवाची पूजा करणाऱ्या लोकांनी त्याच्यासाठी परमेश्वर हा शब्द वापरायला सुरुवात केली त्याचा मूळ अर्थ सर्व ईश्वरांचा परम असलेला तो शिव म्हणून परमेश्वर ! एकेश्वर वाद वाढायला लागल्यानंतर ईश्वराला वेगवेगळी नावे मिळायला लागली आणि त्यामुळेच मग शिव वेगळा काढायचा म्हणून त्याला परमेश्वर म्हणायला सुरुवात झाली कालिदास त्यामुळेच शिवाऐवजी परमेश्वर हा शब्द वापरतो नंतर मात्र जी कथा येते ती पूर्णपणे रघुवंशाची आहे
म्हणजेच एका बाजूला शैव कुमार संभव आहे आणि दुसऱ्या बाजूला वैष्णव रघुवंश आहे आणि दोन्ही बाजूंनी त्यांचे सादरीकरण केले जाते त्यामुळेच कालिदासा पहिला हिंदू कवी होता का असा प्रश्न निर्माण होतो कारण तो शैव आणि वैष्णव असा दोघांना घेऊन जाताना दिसतो पण आश्चर्यकारकरीत्या त्याची मुख्य देवता ही शंकराचा आहे आणि रघुवंशी सुद्धा त्यामुळेच पार्वती आणि परमेश्वर यांना नमस्कार करूनच सुरू होते प्रश्न असा आहे की हे चरित्र प्रथम लिहिले गेले की रामायण प्रथम लिहिले गेले आजही या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण जाते कारण कालिदासाचा काळ जर का इसवी सन पूर्व असेल आणि तो खरोखरच शृंग वंशातील अग्नीमित्र चा मित्र असेल तर मग त्याचा का इसवीसनपूर्व दीडशेपाशी जातो एकदा का आपण हे स्वीकारले की मग शिवचरित्र लिहिणारा शेखर का कवी कालादास कालिदासापासून आपले आपली काव्य परंपरा सांगतो ते लक्षात येईल
प्रश्न असा आहे की ही चरित लेखनाची ही काव्यपरंपरा कालिदासापासून त्याच्या कुमार संभव या महाकाव्यापासून सुरू होते आणि पुढे ती क्षेमेंद्र चालवतो असे कवीला का वाटते? याचे कारण उघड आहे कारण कालिदासानेच कुमार संभवम नावाचे महाकाव्य (याच विषयावर त्याने नाटक ही लिहिले होते पण ते आता उपलब्ध नाही) लिहून शिवचरित्राची सुरुवात केली असे मानले जाते या शिवचरित्राचा विसर पडावा म्हणून शंकराचा विसर पडावा म्हणून शिवाचा विसर पडावा म्हणून मग ब्राह्मण लोक पेशवे काळामध्ये विशेषता ब्रिटिश काळामध्ये अत्यंत जाणीवपूर्वक शिवचरित्र हा शब्द शिवाजी महाराजांच्या संदर्भात वापरायला लागतात जेणेकरून मूळ शिवाचा विसर पडावा असो
भारताच्या इतिहासामध्ये आजही कालिदास आधी की अश्वघोष हा प्रश्न सुटलेला नाही अश्व घोषाचे बुद्ध चरित्र आणि कालिदासाचे रघुवंश आणि कुमारसंभव हे शिवचरित्र ही भारतातली चरित्र वाङ्मयाची सुरुवात आहे साहजिकच कवीने कालिदासाला प्रणाम केलेला आहे कारण शिवचरित्राची सुरुवात कुमार संभव या ग्रंथापासून होते
कालिदासानेच रघुवंश लिहिलेले आहे प्रत्यक्षात ते कालिदासाचे आहे की नाही हा वाद आहे आणि तो सध्या कोणी घालत नाही कारण कालिदासाने रामायण लिहिले हे सांगणे युरेशियन लोकांना भयंकर गरजेचे वाटते साहजिकच रघुवंश हा त्याच्या नावाने टाकला गेलेला ग्रंथ आहे की तो प्रत्यक्षात त्याने लिहिला आहे हा ही एक वादाचा मुद्दा आहे
शैव परंपरेमध्ये भर्तृहरी नावाचा एक विलक्षण कवी होऊन गेला जो संन्यासी होता तरीही कवी होता यानेच चारीच्या चारी वेद रचले असे मानणारे ही काही लोक आहेत आता ही अफवा कोणी पसरवली तर ती युरेशियन लोकांनी पसरवली हे उघडच आहे जेणेकरून हा ही कवी युरेशियन परंपरेतला वाटावा प्रत्यक्षात तो शैव कवी आहे आणि म्हणूनच तो स्पष्ट आणि स्वच्छ पणाने शृंगार शतक लिहू शकतो खुद्द कालिदासाच्या कुमार संभव मध्ये एका अध्यायात शंकर आणि पार्वती यांच्या शारीरिक संबंध विषयी अत्यंत तपशीलवार मांडणी येते आणि त्यामुळेच त्याविषयी अनेक दंतकथा पसरल्या म्हणजे कालिदासाने असे लिहिले म्हणून त्याला कुष्ठरोग झाला अशा पर्यंत हा प्रचार गेलेला आहे कालिदास शैव होता हे जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत कालिदास असे का करतो हे तुम्हाला कळणे अशक्य बनते काम हा नेहमीच शैव लोकांच्या मध्ये सहज स्वीकारलेला असा अक्ष आहे साहजिकच तो त्यांच्या साहित्यामध्ये सहजरित्या येत राहतो किंबहुना त्यामुळेच काम शास्त्र हे शैव लोकांनी सांगितले ते नंतर हळूहळू युरेशियन लोकांनी स्वीकारले खरे तर ब्रिटिशांनी स्वीकारल्यानंतरच युरेशियन लोकांनी कामशास्त्राचा स्वीकार केलेला आहे अन्यथा याबाबतीत कट्टर ब्रम्हचारी व ब्रह्मचर्य हाच कायम या परंपरेचा विशेष राहिलेला दिसतो कुमार संभव मधील कालिदासाचा हा सर्ग असो भर्तृहरी चे शृंगार शतक असो ही एक परंपरा आहे आणि ती शैव असल्यानेच अनेकदा तिला कसे स्वीकारायचे असा प्रश्न युरेशियन परंपरे पुढे असतो कारण संस्कृत वर फक्त युरेशियन लोकांची मक्तेदारी सिद्ध करायची असते आणि ती या शैव कवी लेखकांच्या मुळे सिद्ध होत नाही
साहजिकच हा जो शिवचरित्र लिहिणारा शेखर नावाचा कवी आहे तो आपल्या ग्रंथाच्या सुरुवातीला काव्यपरंपरा सांगताना कालिदासापासून सुरुवात करतो आणि मग क्षेमेंद्रला नमस्कार करतो
प्रश्न असा आहे की खरोखरच कालिदासापासून हिंदू परंपरा सुरू होते असे मानावे का ?
श्रीधर तिळवे नाईक
शैव इतिहासामध्ये आणि हिंदू परंपरेमध्ये कालिदास इतका महत्त्वाचा कसा काय ? भाग दुसरा श्रीधर तिळवे नाईक
मग यमाने विचारले,"पाण्याचे बिंदू कुलपात ठेवले तरी ते स्थिर राहणार का ? मनुष्याचेही असेच आहे मधुपान करणाऱ्या भुंग्याने दगड खाण्याची इच्छा केली म्हणून त्याला दगड खाता येईल का ? अगदी ब्रह्मदेव सुद्धा मृत्यूपासून वाचू शकत नाही विष्णूचा एक दिवस पूर्ण झाला की त्याचा मृत्यू होतो अगदी विष्णू सुद्धा मृत्यूपासून वाचू शकत नाही शिवाचा म्हणजेच परमेश्वराचा एक दिवस पूर्ण झाला की त्याचा मृत्यू होतो अशा त्या शिवाचा काल मोडण्यास कोण समर्थ आहे ? ब्रह्मदेवाला ही जी गोष्ट साध्य होणार नाही ती गोष्ट तू कशी साध्य करणार जे वजराने फुटत नाही त्या ठिकाणी सुईचा काय उपयोग होणार ? मनुष्यमात्राला रहाटगाडग्यात अडकलेल्या प्राण्यांना स्थिरता ना या लोकात आहे ना परलोकात आहे तेव्हा मोहाला अवकाश देऊ नकोस मरण हे स्वभाव सिद्ध असून कधीही चुकत नाही तेव्हा तुझे शरीर लवकर सोड मूर्ख असो बुद्धिमान असो तरुण असो आमच्या सभेत कोणाचीही गणना नाही आम्ही मध्यस्थ भावाचे अवलंबन करत प्राण्यांना मृत्यू लोकात नेत असतो आणि मृत्यू हा कर्माच्या स्वाधीन आहे विनाकारण वेळ घालवण्यात काय अर्थ ? कर्मांना अनुसरून हे महानुभाव तू माझ्यात परत मी बहुमानपूर्वक तुला नेण्यासाठी आलेलो आहे"
यमाच्या या बोलण्यानंतर अर्थातच मार्कंडयाना फ्रस्टेशन येते आपण अतिशय चांगुलपूर्वक जगलो कधी पाप केली नाहीत तरीही हा मृत्यू टळत नाही याचे हे फ्रस्टेशन आहे पण उपाय काय? शेवटी तो पशुपतिनाथ तर तारणार म्हणून मग मार्कंडेय शिवलिंगाला मिठी घालून बसतो अर्थात यामुळेच यमापुढे पेच तयार होतो . या काव्यात यमासाठी अंतक शब्द वारंवार येतो एका अर्थाने इथे यमाचा अंतक वाद येतो ज्यावरून अलीकडे आतंक असा शब्द आलेला आहे जो प्रत्यक्षात चुकीचा आहे अंतकवाद हा शब्दच योग्य आहे आणि मार्कंडेयाची धारणा अशी आहे की शिव हा कालातीत असल्याने काळाचा स्वामी असल्याने महाकाळ असल्याने त्याला यम काही करू शकत नाही आणि आपणाला जर वाचायचे असेल तर आपणाला शिवाकडे जाण्याखेरिज पर्याय नाही म्हणून मग मार्कंडेय शिवलिंगाला मिठी घालून बसतो आणि त्याच्या त्याअसाधारण भक्तीमुळे ब्रह्मांड हलायला लागते ब्रह्मदेव हलायला लागतो खुद्द लक्ष्मी भीतीने विष्णूला मिठी मारते आणि मग खुद्द शिवलिंगातून शिव प्रकट होतात यमाला लाथ घालतात त्या लत्ता प्रहारमुळे यम घायाळ होतो अर्थातच मग ते मार्कंडयाला वर मागायला सांगतात ,"इंद्रपद देतो कुबेर पद मोक्ष लक्षमी देतो वगैरे वगैरे" पण भक्त फक्त तुझ्या चरणापाशी मला जागा दे असे मागतो तुझे स्मरण येत राहो असे मागतो
पुढेही अशाच पद्धतीने चरित्र सांगितले जाते ही पद्धत पौराणिक आहे हे स्पष्ट दिसते मात्र इथे भक्ताला कुठलाही ब्राह्मण लागत नाही त्याचा थेट शिवाशी संबंध येतो आणि तोच या कथेचा इसेन्स आहे
या ग्रंथाचे सार्थत्व हे भक्तीचे मूल्य पटवण्यात आहे आणि हा लिहिताना कालिदासाला नमस्कार केलेला आहे कारण शिवचरित्राची सुरुवात ही कालिदासाने केली निदान या कवी कुळात केली असे कवीचे म्हणणे आहे पण कालिदासाने फक्त शैव ग्रंथ लिहिले का त्याच्या नावावर एक वैष्णव ग्रंथ पण आहे त्याचे नाव रघुवंश हा वैष्णव आहे की केला गेला हा प्रश्न आहे कारण त्याचा उद्देश रामायण सांगणे नाही तर रघुवंश सांगणे हा आहे
आपल्या या ग्रंथाची म्हणजेच रघुवंशाची सुरुवातच कालिदास पार्वती आणि परमेश्वर यांना नमस्कार करून करतो यातील परमेश्वर शिव आहे हे उघड आहे किंबहुना इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासूनच शिवाची पूजा करणाऱ्या लोकांनी त्याच्यासाठी परमेश्वर हा शब्द वापरायला सुरुवात केली त्याचा मूळ अर्थ सर्व ईश्वरांचा परम असलेला तो शिव म्हणून परमेश्वर ! एकेश्वर वाद वाढायला लागल्यानंतर ईश्वराला वेगवेगळी नावे मिळायला लागली आणि त्यामुळेच मग शिव वेगळा काढायचा म्हणून त्याला परमेश्वर म्हणायला सुरुवात झाली कालिदास त्यामुळेच शिवाऐवजी परमेश्वर हा शब्द वापरतो नंतर मात्र जी कथा येते ती पूर्णपणे रघुवंशाची आहे
म्हणजेच एका बाजूला शैव कुमार संभव आहे आणि दुसऱ्या बाजूला वैष्णव रघुवंश आहे आणि दोन्ही बाजूंनी त्यांचे सादरीकरण केले जाते त्यामुळेच कालिदास पहिला हिंदू कवी होता का असा प्रश्न निर्माण होतो कारण तो शैव आणि वैष्णव असा दोघांना घेऊन जाताना दिसतो पण आश्चर्यकारकरीत्या त्याची मुख्य देवता ही शंकर आहे आणि रघुवंश हे काव्यसुद्धा त्यामुळेच पार्वती आणि परमेश्वर यांना नमस्कार करूनच सुरू होते प्रश्न असा आहे की हे वंशचरित्र प्रथम लिहिले गेले की रामायण प्रथम लिहिले गेले ? आजही या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण जाते कारण कालिदासाचा काळ जर का इसवी सन पूर्व असेल आणि तो खरोखरच शृंग वंशातील अग्नीमित्र या राजाचा मित्र असेल तर मग त्याचा काळ इसवीसनपूर्व दीडशेपाशी जातो एकदा का आपण हे स्वीकारले की मग शिवचरित्र लिहिणारा शेखर का कवी कालिदासापासून आपले आपली काव्य परंपरा का सांगतो ते लक्षात येईल
प्रश्न असा आहे की ही चरित लेखनाची ही काव्यपरंपरा कालिदासापासून त्याच्या कुमार संभव या महाकाव्यापासून सुरू होते आणि पुढे ती क्षेमेंद्र चालवतो असे कवीला का वाटते? याचे कारण उघड आहे कारण कालिदासानेच कुमार संभवम नावाचे महाकाव्य (याच विषयावर त्याने नाटक ही लिहिले होते पण ते आता उपलब्ध नाही) लिहून शिवचरित्राची सुरुवात केली असे मानले जाते या शिवचरित्राचा विसर पडावा म्हणून शंकराचा विसर पडावा म्हणून शिवाचा विसर पडावा म्हणून मग ब्राह्मण लोक ब्रिटिश काळामध्ये अत्यंत जाणीवपूर्वक शिवचरित्र हा शब्द शिवाजी महाराजांच्या संदर्भात वापरायला लागतात जेणेकरून मूळ शिवाचा विसर पडावा असो
भारताच्या इतिहासामध्ये आजही कालिदास आधी की अश्वघोष आधी हा प्रश्न सुटलेला नाही अश्व घोषाचे बुद्ध चरित्र आणि कालिदासाचे रघुवंश हे वंश चरित्र आणि कुमारसंभव हे शिवचरित्र ही भारतातली चरित्र वाङ्मयाची सुरुवात आहे साहजिकच कवीने कालिदासाला प्रणाम केलेला आहे कारण शिवचरित्राची सुरुवात कुमार संभव या ग्रंथापासून होते
कालिदासानेच रघुवंश लिहिलेले आहे प्रत्यक्षात ते कालिदासाचे आहे की नाही हा वाद आहे आणि तो सध्या कोणी घालत नाही कारण कालिदासाने पहिले रामायण लिहिले हे सांगणे युरेशियन लोकांना भयंकर गरजेचे वाटते साहजिकच रघुवंश हा त्याच्या नावाने टाकला गेलेला ग्रंथ आहे की तो प्रत्यक्षात त्याने लिहिला आहे हा ही एक वादाचा मुद्दा आहे
शैव परंपरेमध्ये भर्तृहरी नावाचा एक विलक्षण कवी होऊन गेला जो नाथसंन्यासी होता तरीही कवी होता याचा सातवे ते दहावी शतक या चारशे वर्षात प्रचंड प्रभाव होता तो इतका की खुद्द पूर्व मीमांसेच्या आचार्य परंपरेत नंतर याचा समावेश करण्याचा प्रयत्न केला गेला आणि अर्थातच मग त्या हिशोबाने त्याच्या जन्म कथा रचल्या गेल्या उदाहरणार्थ शबरस्वामीने चार वर्णाच्या स्त्रियांशी लग्न केले आणि त्यांना त्यांच्यापासून सहा पुत्र झाले त्यातील एक भर्तृहरी होता वैगरे पुढे पुढे तर
यानेच चारीच्या चारी वेद रचले असे मानणारे ही काही लोक निर्माण झाले आणि आजही आहेत वैदिक परंपरे कडून त्याला गिळंकृत करण्यासाठी ही कथा रचलेली आहे हे उघड आहे आता ही अफवा कोणी पसरवली तर ती युरेशियन लोकांनी पसरवली हे उघडच आहे कारण श्रेय वेद (मंत्र)लिखाणाचे दिलेले आहे ब्राह्मण ग्रंथ लिखाणाचे नाही ज्यांना पूर्व मीमांसा परंपरा माहिती आहे त्यांना हे माहित असेलच की पूर्व मीमांसा परंपरेत श्रुती फक्त ब्राह्मण (विधी)ग्रंथांना मानले जाते मूळ वेदांना नाही म्हणजे शैव आहेत म्हणून वेद लिखाणाचे श्रेय देऊन टाकावे पण ब्राह्मण ग्रंथावरची मक्तेदारी ज्यामध्ये यज्ञ यागविधी कसे करायचे याविषयी जास्त मौलिक माहिती आहे असे वाटते त्याचे श्रेय द्यायचे नाही म्हणजे आपली मक्तेदारी जाणार नाही जेणेकरून हा ही कवी युरेशियन परंपरेतला वाटावा पण तरीही बाहेरचा वाटावा प्रत्यक्षात तो शैव कवी आहे आणि म्हणूनच तो स्पष्ट आणि स्वच्छपणाने शृंगार शतक लिहू शकतो खरे तर खरी गोची अशी आहे कि युरेशियन लोकांना शैव लोकांचे काय करायचे हे शेवटपर्यंत समजलेले नाही ते अजूनही समजत नाही
भावाभुती नंतरचा महत्त्वाचा शैवकवी म्हणून मग आपणाला क्षेमेंद्र चे नाव घेता येते कविवादी शेखर भवभूतीचे नाव घेत नाही याचे कारण त्याला शृंगार रसाचे काय करावे स्वीकारावे की नाकारावे हे कळलेले नाही कारण भर्तृहरी हा वैष्णव परंपरा तितकीशी मनःपूर्वक स्वीकारत नाही म्हणजेच आता कळत नकळत हिंदू परंपरा कवीवादीशेखरच्या काळामध्ये प्रस्थापित होत चाललेली आहे म्हणूनच तो भर्तृहरीला आपल्या काव्य परंपरेतला समजत नाही
अर्थात कालिदासाच्या बाबतीत तरी हा स्वीकार पूर्ण येतो का? तर नाही! खुद्द कालिदासाच्या कुमार संभव मध्ये एका अध्यायात शंकर आणि पार्वती यांच्या शारीरिक संबंध विषयी अत्यंत तपशीलवार मांडणी येते आणि त्यामुळेच त्याविषयी अनेक दंतकथा पसरल्या म्हणजे कालिदासाने असे लिहिले म्हणून त्याला कुष्ठरोग झाला अशा पर्यंत हा प्रचार गेलेला आहे कालिदास शैव होता हे जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत कालिदास असे का करतो हे तुम्हाला कळणे अशक्य बनते काम हा नेहमीच शैव लोकांच्या मध्ये सहज स्वीकारलेला असा अक्ष आहे साहजिकच तो त्यांच्या साहित्यामध्ये सहजरित्या येत राहतो किंबहुना त्यामुळेच काम शास्त्र हे शैव लोकांनी सांगितले ते नंतर हळूहळू युरेशियन लोकांनी स्वीकारले खरे तर ब्रिटिशांनी स्वीकारल्यानंतरच युरेशियन लोकांनी १८५० नंतर कामशास्त्राचा स्वीकार केलेला आहे अन्यथा याबाबतीत कट्टर ब्रम्हचारी व ब्रह्मचर्य हाच कायम या युरेशियन परंपरेचा विशेष राहिलेला दिसतो कुमार संभव मधील कालिदासाचा हा सर्ग असो भर्तृहरी चे शृंगार शतक असो ही एक परंपरा आहे आणि ती शैव असल्यानेच अनेकदा तिला कसे स्वीकारायचे असा प्रश्न युरेशियन परंपरे पुढे असतो कारण संस्कृत वर फक्त युरेशियन लोकांची मक्तेदारी सिद्ध करायची असते आणि ती या शैव कवी लेखकांच्या मुळे सिद्ध होत नाही त्यामुळेच रघुवंश हे खरोखर कालिदासाने लिहिले की त्याला वैदिक परंपरेत सामावून घेण्यासाठी त्याच्या नावाने हे लिहिले गेले हा प्रश्न उठतो नंतरच्या काळात तर मीमांसा दर्शनात सुद्धा साधारण धर्म म्हणजे तंत्र अशी व्याख्या केली गेलेली आहे आणि त्यांना अनुसरणाऱ्यांना तंत्रि म्हटले गेलेले आहे इथे साधारण याचा अर्थ सर्वसाधारण लोकांचा धर्म म्हणजेच लोकांचा धर्म लोकधर्म हा अर्थ अपेक्षित आहे असो
अर्थात कवीवादी शेखरला हे माहित नाही त्याच्या दृष्टीने कालिदास आणि क्षेमेंद्र शैव आणि वैष्णव दोन्ही परंपरा फॉलो करतात
साहजिकच हा जो शिवचरित्र लिहिणारा कविवादीशेखर नावाचा कवी आहे तो आपल्या ग्रंथाच्या सुरुवातीला काव्यपरंपरा सांगताना कालिदासापासून सुरुवात करतो आणि मग क्षेमेंद्रला नमस्कार करतो
प्रश्न असा आहे की खरोखरच कालिदासापासून हिंदू परंपरा सुरू होते असे मानावे का ?
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment