इस्रायल इराण युद्धात भारताने काय करावे श्रीधर तिळवे नाईक
उत्तर आधुनिकतेचा पहिला पायोनियर हा फ्रेडरिक नितशे होता एकीकडे ईश्वराचा मृत्यू झालेला आहे हे तो सांगत होता आणि दुसरीकडे इतिहास म्हणजे माणसाने तयार केलेली सरचना असते कन्स्ट्रक्शन असते असेही मांडत होता सर्व संहिता म्हणजे कन्स्ट्रक्शनच असे त्याचे सिद्धांतन दिसते कळत नकळत तो नकळतपणे नवीन धर्माची नवीन धर्मनिर्माणची आवश्यकता सांगत होता पण भारत सोडला तर कोणीही ही गोष्ट फारशी मनावर घेतलेली दिसत नाही
याचा व्हायचा तोच परिणाम झाला जुना धर्म परत आला तो सर्वात प्रथम इस्लामने आणला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो प्रथम भारतात परतला काँग्रेसच्या सेक्युलरिझम मुळे तुम्ही काँग्रेसला जॉईन होऊ नका असे सांगणारा हा सर सय्यद अहमद खान नावाचा विचारवंत मुस्लिमांच्या पारंपारिक धर्माचा कट्टर पुरस्कर्ता आणि एज्युकेशनिष्टसुद्धा होता त्याच्यामुळेच मुस्लिम लीग स्थापन झाली आणि पुढे पाकिस्तान नावाचे राष्ट्र निर्माण झाले उत्तर आधुनिक तत्त्वज्ञानामध्ये जी धर्माची वापसी झाली त्याला ज्या घटना जबाबदार होत्या त्या मधले सर्वात महत्त्वाचे प्रकरण हे अर्थातच हिटलरचे आहे इथे धर्म निगेटिव्ह मार्गाने परतला जू धर्माचा द्वेष हा त्याचा पाया होता सर सय्यद हिंदू लोकांचा द्वेष करत होते आणि नंतर उत्तरार्धातले मोहम्मद अली जिना सुद्धा ! हिटलर ज्यू लोकांचा द्वेष करत होता म्हणजेच ही धर्मवापसी द्वेषाच्या आधारे जास्त उभी होती यातून मार्ग म्हणून पुढे मग ज्यू लोकांचे स्वतंत्र राष्ट्र ही संकल्पना आली आणि तिच्या समर्थनासाठी म्हणून उत्तर आधुनिक तत्त्वज्ञान जन्मले बहुतेक महत्त्वाचे उत्तर आधुनिक तत्त्वज्ञ हे ज्यू आहेत हा काही योगायोग नाही
प्रश्न असा होता की हे राष्ट्र निर्माण करायचे कसे आणि त्यासाठी जी भूमी निवडली गेली होती ती नेमकी कोणाची होती? ज्यू लोकांच्या मते ती फार प्राचीन काळापासून त्यांना देण्यात आलेली आहे तिला ते प्रॉमिसड लँड म्हणतात आणि आत्ताचे पॅलेस्टाईन हे त्या प्रॉमिस लँड चा भाग आहे असे ते मानतात आता याला तार्किक आधार कसा काय देणार कारण हा तर सगळा श्रद्धेचा प्रश्न झाला ही ज्यू लोकांची श्रद्धा गैरज्यू लोकांनी का स्वीकारावी साहजिकच या सर्व प्रदेशांमध्ये इस्रायल नावाचे राष्ट्र निर्माण करण्याकरता सक्ती झाली यामध्ये सर्वाधिक पिसले गेले ते पॅलेस्टाईन ! यावर उपाय एकच होता तो म्हणजे इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन या दोन राष्ट्रांची निर्मिती ! ती जर का झाली असती तर प्रश्नच निर्माण झाला नसता पण दोन्हीही धर्म इस्लाम आणि ज्यू धर्म कट्टर असल्याने आजचा तिढा निर्माण झालेला आहे याला आपण जुडाईक धर्मांच्या मधला अंतर्गत वाद म्हणून बघावे का ?
याला दुसरी जी डायमेन्शन आहे ती अर्थातच पुन्हा जुड्याइकच आहे आणि ती इस्लामिक आणि गैर इस्लामीक अशी आहे इराणचा खोमेनी हा सरळ सरळ गैर इस्लामिक अस्तित्वांना आणि धर्मांना नकार देतो आणि अर्थातच हिंदू सुद्धा मूर्ति पूजक असल्याने त्याच्या दृष्टीने शत्रू आहेत त्यामुळे त्याची जे लोक बाजू घेत आहेत त्यांना बहुतेक तो काय आहे हे माहित नाही असे दिसते वस्तुस्थिती अशी आहे की दोन्ही बाजूने धर्मांधता आहे आता या दोघांच्याही धर्मांधतेचे ओझे जगाने का वहावे?
माझे स्वतःचे स्पष्ट मत असे आहे की जोपर्यंत भारतावर या संदर्भात काही आक्रमण वगैरे होत नाही तोपर्यंत भारताने अलिप्त राष्ट्र चळवळ चालवावी आणि या युद्धापासून अलिप्त राहावे जेव्हा दोन्ही बाजूंनी धर्मांध हुकूमशहा लढत असतात तेव्हा कुणाचीही बाजू घेणे लोकशाहीसाठी हिताचे नसते यातला कोणीही विजयी झाला तरी धर्मांधताच वाढणार आहे मला मुळात कोणी विजयी होईल की नाही याबद्दलच शंका आहे अपवाद फक्त खुद्द इराणच्या अयातुला खोमीणीची राजवट अंतर्गत कारणामुळे कोसळली तर कदाचित इराणचा पराभव होईल
भारतापुढची सर्वात मोठी समस्या अशी आहे की भारताचे विशेषता भारतीय धर्माचे मग तो शैव असो किंवा वैष्णव ज्यू धर्मी लोकांशी खूप चांगले संबंध राहिलेले आहेत तर हिंदुत्ववाद हा कायमच इस्लाम बाबतीत तणावात असतो त्यामुळे साहजिकच एक नैसर्गिक ओढ ज्यू धर्माची लागायला लागते प्रश्न असा आहे की ही ओढ आता वाहती ठेवावी का ? पाकिस्तानच्या प्रश्नांमध्ये इस्रायल ने कायमच भारताला मदत केलेली आहे तर अलीकडे पाकिस्तान प्रश्नाच्या संदर्भात कट्टर इस्लामिक असल्याने इराण भारताचा उघड उघड शत्रू झालेला आहे त्यामुळेच शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने आपण इस्त्राईलची बाजू घ्यावी असा कल भारतामध्ये विशेषत: हिंदुत्ववादी लोकांच्या मध्ये वाढलेला दिसतो प्रश्न असा आहे की आपले परराष्ट्रीय धोरण हे इस्लाम केंद्री किंवा पाकिस्तान केंद्री ठेवायचे का ? एका अर्थाने भारताची गोची झालेली आहे सध्या तरी भारताने या संदर्भात मौन पाळावे हेच उत्तम आहे अनेकदा मौनानेच अनेक गोष्टी साधल्या जातात असे आपले पूर्वज म्हणून गेलेलेच आहेत
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment