शैव श्रुती किंवा धर्म स्वतंत्र का आहे शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक
कुठलीही श्रुती वा महाधर्म प्रामुख्याने 12 गोष्टींनी युक्त असते असतो
१ अनेक सहितांनी नटलेले शरीर असते उदाहरणार्थ काश्मीर शैवागममधल्या अभिनव गुप्ताच्या संहिता किंवा ज्ञाननाथांच्या अनुभवामृत किंवा चांगदेव पासष्टी
२ या संहितांना लोकांना समजावून सांगणारे आचार्य पुरोहित शैव धर्माबाबत आचार्य ,पंडित ,पुजारी व गुरव यांचे सातत्य व उपस्थिती स्पष्टपणे दिसते
३ केवळ त्या सातत्यातच उपस्थित असणारी
भूतकालिनता जिच्यात परंपरा इतिहास सातत्य वारसा आणि जनुकता टिकून असते तेही स्पष्टपणे दिसते
४ अशी उपस्थिती जी नेहमीच इतर उपस्थितीच्या पेक्षा आपण कसे वेगळे आहोत हेही सांगत असते यासंदर्भात सतत तुलना करत असते
५ तस्सम आणि तद्भव संस्थाशी स्पर्धा याबाबतीत शैव आणि वैष्णव धर्म यांनी संस्थात्मक प्रचंड स्पर्धा केली असे दिसते दक्षिणेत्तर शैव धर्माची मुख्य स्पर्धा ही जैन आणि बौद्धांशी झालेली आहे आणि वादही झालेले आहेत
६ त्या धर्माच्या संस्थापकावर विश्वास असतो भारतात शैव धर्म हा नेहमीच भगवान शंकरांनी स्थापन केला आणि त्यांनी प्रथम तो पार्वतीला सांगितला याबद्दल एक मत आहे शिव, शक्ती, संसार , जीव आणि मोक्ष ही पाच मुख्य तत्वे म्हणून सर्वांनाच मान्य आहेत मग त्यांचे स्कूल काहीही असो मग लिहिणारा अभिनव गुप्त असो किंवा ज्ञानेश्वर असो सर्वांनाच हे मान्य असते
७ कुठल्याही धर्मामध्ये धर्म परिवर्तन करण्याचा एक विधी असतो असा विधी शैव-धर्मामध्ये व्यवस्थित अस्तित्वात आहे कुठल्याही धर्माची व्यक्ती शिवलिंग धारण करून आपण शैव झाले आहोत असे जाहीर करू शकते इतकेच कशाला त्यासाठी आचार्याची किंवा गुरूची गरज आहे असे नाही जर गुरू किंवा आचार्य किंवा पंडित असेल किंवा पुजारी अथवा गुरव असेल तर तो अशा प्रकारचे शिवलिंग दुसऱ्या धर्मातून आलेल्या व्यक्तीला घालायला लावून ओम नमः शिवाय नमः हा मंत्र तीन वेळा म्हणायला लावून त्याचे धर्म परिवर्तन करू शकतो अनेकदा तर मध्यस्ताची सुद्धा गरज नाही कुठलीही व्यक्ती शिवमंदिरात जाऊन स्वतःला शिवलिंग धारण करत मी आता तुझा अनुयायी झालो आहे किंवा मोक्षासाठी प्रयत्न करणारा मोक्षक झालो आहे असे म्हणून शैव होऊ शकते अशा प्रकारची मोकळीक इतर कुठल्याही धर्मामध्ये नाही हे शिवलिंग त्याने किती वेळ घालावे हा त्याचा पूर्णपणे वैयक्तिक प्रश्न आहे मात्र कमीत कमी एक दिवस त्याने ते घालावे अशी मर्यादा आहे काहींच्या मते तीन तास घातले तरी चालते
८ सर्व शिव मंदिरामध्ये आत्ता आवश्यक असलेला परंतु पाळला न जाणारा धर्म म्हणजे लिंगर धर्म होय सर्व भुकेल्या लोकांना कसलेही पैसे न घेता धन न घेता अन्न पुरवण्याची जबाबदारी ही शिवमंदिरांच्या वर टाकलेली होती अलीकडे ही जबाबदारी विशेषता 1000 नंतर शिवमंदिरानी सोडलेली आहे ती पुन्हा एकदा आता त्यांनी पकडायला हवी शैव धर्माचे एक स्वरूप जिथे ओमकार हे शिव तत्व म्हणून पुजले जाते त्या शिखधर्मामध्ये लंगर टिकलेला आहे किंबहुना गुरुनानकाने ज्या काही महत्त्वाच्या गोष्टींचे पुनर्जीवन केले त्यामधली ही एक गोष्ट आहे सर्व शैव धर्मी लोकांनी याबाबतीत गुरु नानक यांचे अनुकरण करावे
९ प्रत्येक धर्मामध्ये दान ही एक फार महत्त्वाची संकल्पना आहे आणि ती दक्षिणेच्या विरोधात आहे शैव धर्म याला अपवाद नाही ब्राह्मणाला दक्षिणा दिली पाहिजे अशी ब्राह्मण धर्मात अट आहे इथे ती अट नाही सर्व दानांच्यामध्ये श्रमदान आणि विद्यादान हे महत्त्वाचे आहे ते कधीही करता येते प्रत्येक शैव भक्ताने किमान आठवड्यात एकदा मंदिरात येऊन श्रमदान केले पाहिजे दान आणि दक्षिणा यांच्यामध्ये फरक आहे दर सोमवारी ज्यांना वस्त्र आणि गृह दान करायचे आहे त्यांना तशी करण्याची अनुमती आहे
पूर्वी खुद्द गणनायक मग तो राजा असो अगर लोकशाही तंत्राने आलेला गणनायक असो त्याला दर पाच वर्षांनी स्वतः जवळ असलेली सर्व संपत्ती दान करायला लागत होती आत्ताच्या भाषेत प्रत्येक राजकारणी माणसाने निवडून आलेल्या प्रत्येक राजकारणी उमेदवाराने पाच वर्षांनी त्याची सर्व संपत्ती जनतेला दान केली पाहिजे फार फार तर स्वतःला जीवन आवश्यक म्हणजे एक घर काही वस्त्रे तितकी संपत्ती ठेवून घ्यावी पण ती किती आहे त्याचा हिशेब द्यावा तुम्ही जर शैव असाल तर तुम्ही हे पाळले पाहिजे केवळ भगवान शंकरांचे नाव घेऊ नका त्यांच्याप्रमाणे वागा
१० प्रत्येक धर्मात संस्थापकाचे शिष्य असतात शैव-धर्म त्याला अपवाद नाही त्यामुळेच शंकर पार्वती गणपती स्कंद नंदी हे पंच सिद्ध आणि पंच योद्धे म्हणजे यम , बळी , कुबेर, नरक , परशुराम (शैव परशुराम वेगळा आहे तो मार्शल आर्टचा मुख्य शिवशिष्य आहे )यांची पूजा प्राचीन काळापासून सुरू आहे शिवाय योद्धा म्हणून स्कंद कार्तिकेयची पूजा पण केली जाते कारण तो जसा मोक्षाला पोहोचला आहे तसा तो योद्धाही आहे
११ सर्व धर्मामध्ये त्यांचे त्यांचे संत किंवा सेंट असतात तसे ते शैव धर्मात सुद्धा आहेत त्यांना सिद्ध म्हणतात हे सिद्ध मग ते स्त्री ही असतात किंवा पुरुष! ते पाच प्रकारचे असतात जो योगाने पोहोचला तो जोगी किंवा योगी किंवा जोगिनी योगिनी , जो ज्ञानाने पोचला तो ती नाथ किंवा ताई , जो भक्तीने पोहोचला तो ती संत , जी जो शक्तीने पोचली तो ती अमां आई किंवा परमहंस आणि जो कर्माने पोहोचला किंवा पोचली तो ति बा किंवा बाई किंवा ई म्हणजे ज्योतिबा खंडोबा रखुमाई म्हाळसाई वगैरे
१२ शैव धर्माची शैव धर्माची स्वतःची अशी धर्मस्थाने आहेत यात प्रामुख्याने मंदिरे, मठ ,दुर्ग , आखाडे आणि व्यायाम स्थाने शिवाय स्थानिकांचे मंडल अथवा मंडळ या गोष्टी येतात
शैवांचे मुख्य धार्मिक स्थान काशी आहे आणि त्याच्यावरच हल्ला करून मुस्लिम लोकांनी शैव धर्माशी शत्रुत्व पत्करले आहे काशी पडल्यानंतरच शैवधर्मी लोक प्रचंड एकत्र आले आणि त्यांनी मुसलमानांच्या विरोधात अतिशय संघटित प्रतिकार उभा केला हल्ली अत्यंत वेगळ्या पद्धतीने असेच हल्ले चालू आहेत का हे तपासणे गरजेचे झालेले आहे कोणीही यावे आणि टिचकी मारून जावे हे फार काळ सहन केले जाणार नाही
शैव हा स्वतंत्र धर्म आहे हे खुद्द वैदिक लोकांनी अनेकदा वेगवेगळ्या मार्गाने कबूल केलेले आहे उदाहरणार्थ मेधतिथीचा मनुस्मृतीभाष्य नावाचा एक ग्रंथ आहे त्यामध्ये जैन शैव आणि इतर सर्व धर्म वेदबाह्य धर्म आहेत असे म्हटलेले आहे साहजिकच त्यांना मनुस्मृती लागू नाही किंवा इतर कुठली स्मृती लागू नाही साहजिकच वर्ण व्यवस्था ही लागू नाही कुमारील ने तर जैन आणि बौद्ध हे थोडे तरी वेदांच्या जवळ आहेत पण शैव या धर्मांच्या ,लोकांच्यापेक्षा वेदांच्या पासून खूप दूर आहेत असे सांगितलेले आहे त्यामुळेच पुढे पुढे तंत्र श्रुती आणि वैदिक श्रुती या दोन वेगळ्या श्रुती आहेत ही संकल्पना मध्ययुगात प्रस्थापित झालेली होती
थोडक्यात काय स्वतंत्र धर्म असण्यासाठी जे काही लागते ते सर्व शैव-धर्माकडे आहे म्हणूनच शैव धर्म हा/ही एक स्वतंत्र महाधर्म किंवा श्रुती आहे जी/ज्याच्यात पाशुपत धर्मापासून लिंगायत धर्मापर्यंत अनेक धर्म सामावले गेलेले आहेत
शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक
शैव धर्म स्वतंत्र धर्म का आहे भाग दोन श्रीधर तिळवे नाईक
T W Rhys Davids या ब्रिटिश ऑफिसरचे भारतीय इतिहासामध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे त्याच्या बुद्धिस्ट इंडिया नावाच्या ग्रंथात सर्वात प्रथम आर्यांच्या पेक्षा आधीच एक अतिशय प्रगत संस्कृती भारतामध्ये होती हा सिद्धांत मांडला गेला बौद्धकालीन समाजाची रचना तपासण्याचा प्रयत्न त्याने केला होता अर्थातच त्या काळामध्ये बुद्धाचा प्रभाव जगभर असल्याने शैव धर्माची शक्यता आजमावीशी कोणालाच वाटली नाही इतका ब्राह्मणांनी आणि ब्राह्मण इतिहासकारांनी शैव हा हिंदू धर्मातला एक पंथ असून तो हिंदू धर्माचा एक भाग आहे असा प्रचार केला होता यामध्ये भांडारकरांचा वाटा सर्वात मोठा होता त्यांनी प्रथम वैष्णव आणि शैव या दोन्हींनी हिंदू धर्म बनलेला आहे याची सखोल मांडणी केली होती आजही या प्रचाराचे ओझे उतरलेले नाही 1903 साली तर हे शक्यच नव्हते त्यातला विरोधाभास असा होता की बसवेश्वर यांचा लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म म्हणून हळूहळू मान्यता पावू लागला होता कारण तशी डॉक्युमेंटेशन मिळायला सुरुवात झाली आता त्यातला विरोधाभास असा होता की लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म जो प्रत्यक्षात शैव श्रुती मधला नवा धर्म होता त्याला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्यायची पण शैव धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्यायची नाही असे काहीतरी राजकारण त्या काळात चाललेले दिसते मात्र हळूहळू काही विचारवंतांना हे स्पष्ट दिसायला लागले की आपण सांगतो तशी वस्तुस्थिती नाही पण हे बोलायची हिंमतच कोणाला होत नव्हती शेवटी आमच्या पिढीला या संदर्भात मांडणी करणे गरजेचे भासायला लागले आणि या सगळ्या मागे ज्याने सुरुवात केली तो हा ब्रिटिश ऑफिसर होता त्याने स्पष्टपणे लिहिलेले आहे की ही जी काही मांडणी आत्तापर्यंत भारतीय इतिहासाची आणि भारतीय इतिहासकारांची चालत आलेली आहे ती सर्व ब्राह्मण ग्रंथांच्या आधारे चालत आलेली आहे तो प्रथम असा होता ज्याने पाली भाषेतील संहितांचा अत्यंत मुलगामी अभ्यास केला त्याच्या प्रस्तावनेची सुरुवातच मी ब्राह्मण दृष्टीकोनातून नव्हे तर राजपूत दृष्टिकोनातून हे तपासतो आहे अशी मांडणी आहे इतकेच नव्हे तर क्षत्रिय आणि ब्राह्मण इतिहासाच्या बाबतीत कसे कायमच एकत्र येतात याची पहिली उदघोषणा या प्रस्तावनेत आहे मात्र त्याने हेही सांगितले आहे की जेव्हा यांचे एकमेकांच्या वर क्लेम येतात तेव्हा मात्र हे एकमेकांशी भांडतात एका ब्रिटिश ऑफिसरचे हे निरीक्षण आहे दुर्दैवाने या निरीक्षणाकडे फारसे लक्ष अजूनही गेलेले नाही मात्र हे सर्व लिहिताना बौद्ध धर्मग्रंथातले मुख्य जे द्वंद्व आहे डायलेक्टिक आहे म्हणजे ब्राह्मण धर्म विरुद्ध बौद्ध धर्म ते ह्या ग्रंथांमध्ये आपणाला सतत प्रकट होताना दिसते किंबहुना ब्रिटिश काळामध्ये 19व्या शतकामध्ये हिंदू धर्माला हिंदू धर्म म्हटले जात नव्हते तर ब्राह्मण धर्म म्हटले जात होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे या मांडणीकडे दुर्लक्ष होण्याचे कारण सुद्धा त्याने स्वतःच दिलेले आहे त्याने याला ब्राह्मणी इतिहासाचा व वर्ण जाती सिद्धांताचा परिणाम म्हटलेले आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्याने बहुदा महात्मा फुले वाचलेले नव्हते पण तरीसुद्धा कळत नकळत ब्राह्मण विरुद्ध काहीतरी हे जे द्वंद्व आहे ते त्याला नीट कळलेले असावे अर्थात हे सर्व त्याच्या निरीक्षणातून आलेले होते तत्कालीन इतिहासांच्या मध्ये अनेकदा ब्राह्मणेतर राजांची नीट नावे सुद्धा आलेली नाहीत त्याचे कारण सुद्धा त्याने ब्राह्मणांनी लिहिलेल्या इतिहासात आणि त्यांच्या इतिहास विषयक सिद्धांतात आहे असे स्पष्ट म्हटलेले आहे
या काळात अगदी नाग लोकांचा इतिहास सुद्धा वैष्णव इतिहास बनवण्याचा प्रयत्न झालेला आहे उदाहरणार्थ J P H vogel याने त्याच्या indian serpant Lore या ग्रंथामध्ये काश्मीरच्या किंग नागपाल आणि अकबर यांच्या संबंधाविषयीची एक काल्पनिक कथा दिलेली आहे या काल्पनिक कथेमध्ये वासुकी नागाचा हा वंशज आहे असे सांगितले गेलेले आहे आता ही कथा त्याला सांगितली कुणी ? तर ही त्याला ब्राह्मण लोकांनी सांगितलेली आहे प्रश्न असा आहे की अकबराच्या काळामध्ये असा कोणी राजा काश्मीरवर राज्य करत होता का? तर नाही परंतु नागलोक हे कसे वासुकी नागाशी जोडले गेलेले आहेत हे पटवणे आवश्यक आहे आणि आश्चर्यकारकरीत्या ब्रिटिश लोक खातरजमा सुद्धा त्या काळात करत नव्हते साहजिकच ही कथा येत राहते आता हा युरेशियन लोकांचा खटाटोप कशासाठी आहे तर हे सर्व नाग हे फार प्रचंड प्रमाणात असल्याने त्यांना काहीही करून वैष्णव धर्माशी जोडणे आवश्यक होते त्यासाठी या खोट्या दंतकथा इतिहासात रचल्या गेल्या इतकेच नव्हे तर या कथेमध्ये अकबर नागपालाला घाबरतो असे दाखवले आहे आणि अकबर कशाला घाबरतो तर हा नागपाल नावाचा राजा चक्क वासूकी नाग काढून दाखवतो त्याची पाच तोंडे पाहून अकबर बावचळतो घाबरतो आणि त्याची अट स्वीकारतो बरं या सगळ्या प्रकारामध्ये जी अट आहे ती चक्क सोवळ्याओवळ्याची अट आहे म्हणजे जणू काय नागलोक ब्राह्मण धर्म फॉलो करत होते आता असा इतिहास जर का वारंवार ब्रिटिश लोकांच्या पुढे उभे केला गेला असेल आणि भारतीय इतिहासकार जर त्यांचे अनुकरण करणार असतील तर मग शैव धर्माला न्याय कुठून मिळणार ? पुढे जाऊन मी जर असे म्हणालो की ब्रिटिश लोकांनी अत्यंत जाणीवपूर्वक हिंदूधर्म प्रमुख केला कारण शैव धर्म नाहीसा करण्याचा हाच एक उपाय त्यांना दिसत होता कारण शेवटी ब्रिटिशांच्या विरोधात होळकर आणि शीख हे दोन शैव लढले होते शैव धर्मापासून आणि शैव लोकांच्या पासून काय धोका आहे याची त्यांना कल्पना आली होती हिंदू धर्मामध्ये शैव धर्म विलीन केला तर तो आपोआप नष्ट होईल याची त्यांना खात्री होती आणि म्हणूनच हे पद्धतशीरपणे केले गेले
ब्राह्मण लोकांच्यासाठी ब्राह्मण धर्म वैष्णव धर्म आणि ब्राह्मणे तर लोकांच्यासाठी बौद्ध धर्म वैष्णव धर्म पुढे आणण्याचे सगळे उद्योग हे ब्रिटिश काळात झालेले आहेत वारकरी पंथाचे सुद्धा प्रचंड प्रस्थ याच काळात माजवले गेलेले आहे
साहजिकच पंडित नेहरूंच्यासारख्या अनेक लोकांना आणि या कलोनाइज्ड स्कूलमधल्या इतिहासकारांना , शैव दिसलेले नाहीत आजही अगदी तीन स्थलांतरे झाली हे मान्य करणाऱ्या लोकांना सुद्धा सिंधू संस्कृती बाहेरच्याच लोकांनी घडवलेली आहे असे अलिकडे वाटत असते कारण या स्कूलचा प्रभाव ओसरलेला नाही ब्रिटिश वसाहत वादा पुढे लोटांगण घालणारे हे सगळे इतिहास आहेत अशावेळी ब्रिटिशांच्या पासून शैव लोकांना आपला इतिहास सोडवावाच लागतो पण त्याचबरोबर युरेशियन लोकांच्या तावडीतून सुद्धा शैव लोकांना आपला इतिहास बाहेर काढावा लागतो
याउलट आपण जर का दहा शतकापूर्वी असलेले सर्व ग्रंथ वाचत गेलो तर तिथे स्पष्टपणे वैष्णव धर्म आणि शैवधर्म हे पूर्णपणे स्वतंत्र धर्म आहेत हे मान्य केलेले दिसेल नव्या आणि दहाव्या शतकामध्ये स्पष्टपणे आणि स्वच्छपणे शैव,वैदिक, जैन, बौद्ध आणि वैष्णव अशा पाच धर्मांना स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळालेली दिसते आणि या धर्मांची चर्चा करताना त्या काळातले सर्व विद्वान पंडित यांना स्वतंत्र धर्म मानतच चर्चा करताना दिसतात या काळामध्ये हिंदू नावाचा धर्म धर्म म्हणून अस्तित्वात नव्हता म्हणूनच आपल्या सर्व संतांच्या मध्ये वैष्णव धर्म हा स्वतंत्र धर्म म्हणूनच येत राहतो शैव हा सुद्धा स्वतंत्र धर्म म्हणून येत राहतो ते हिंदू हा शब्द वापरत नाही कारण तो फारसा प्रचलित नाही आणि नव्हता
21व्या शतकात मात्र युरोपियन विचारवंत सुद्धा अत्यंत गांभीर्याने शैव धर्माचा स्वतंत्र धर्म म्हणून विचार करायला लागलेले दिसतात मला खात्री आहे एकदा गोऱ्या लोकांनी शैवधर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता दिली दिली की आपले लोक सुद्धा आपोआपच मान्यता द्यायला लागतील यासाठी वाट पाहावी लागेल पण आज नाही उद्या हे घडेलच
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment